चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामुटी कित्येक वर्षे आवडता आहे. मामुटी व मोहनलाल हे दोघेही प्रचंड आवडतात. टीव्हीवर दुपारी प्रादेशिक भाषेतलय चित्रपटांमुळे यांची ओळख झाली. >>> अगदी अगदी.

सुहासिनी, रेवती अशाच आवडायला लागल्या तिथले पिक्चर बघून. रेवती जास्त फेवरेट.

दलकेर सलमान >>> ह्याचं नाव ऐकून माहीतेय, एकही पिक्चर बघितला नाहीये अजून.

डुलकर सलमान असा नावाचा उच्चार करतात. . द झोया फँक्टर मधेही सोनम बरोबर होता.

तसच त्याचा ok kanmani नावाचा मुव्ही खूप हिट झाला. मणी रत्नमच् direction होते. नक्की पाहा. हिंदीत ok jaanu त्याचाच रिमेक आहे. पण ओरिजिनलच चांगला आहे.

डुलकर सलमान आणि डोलकर सलमान असं दोन्ही ऐकलं आहे मी. इथे तिसरा शब्द ऐकला दलकेर. त्यामुळे मी मामुंटीचा मुलगा असं डोक्यात ठेवलंय.

"Youtube वर असलेले काही चांगले हिन्दी , तेलगू -तमिळ हिन्दीत डब केलेले सिनेमे सुचवा प्लीज.."--> आता रे देवा!! युटूब वर आपल आपण शोधण जास्त सोयिस्कर असत दादा. गुगल म्हणालात तर लिंक्स मिळतील. Happy

सोलापूरच्या माणसाने चांगले दाक्षिणात्य चित्रपट सुचवा म्हणावे म्हणजे हद्दच झाली Happy

हे घ्या -
थडम - https://youtu.be/sFzCikcEjZY
धुवांगल - https://youtu.be/mBebsI0uVWs
रातसासन -https://youtu.be/da0_NBMTGLo

कोणत्याही माणसाची प्रमुख भूमिका नसताना बनलेला दर्जेदार सिनेमा पाहायचा असेल तर Au Hasard Balthazar (1966) आणि The Turin Horse (2011) हे दोन चित्रपट पहा. सिनेमा आणि सबटायटल मिळवायला बराच जुगाड करावा लागेल. पहिल्यात एक गाढव केंद्रस्थानी आहे तर दुसऱ्यात एक घोडा. दोन्ही भीषण शोकांतिका आहेत.
गुगलवर काही लिंक्स मिळतील यांच्या सविस्तर रिव्ह्यूजसाठी. ऑफबीट, फिलॉसॉफिकल, डार्क, डिप्रेसींग सिनेमा आवडत असेल तर जरूर बघा. हिंदीत शुजीत सरकारचा २०१८ ला आलेला "ऑक्टोबर'' सिनेमा आठवत असेल तर हे पण पाहायला हरकत नाही.

विक्रम वेधा
सुपर डिलक्स
९६
अंबेसिवम
हे मला आवडलेले काही दभा चित्रपट. जरूर बघा.

जवानी जानेमन पाहिला . आलिया फ आणि सैफ .
अगदी वैताग आला असं नाही , पण निरर्थक वाटला .
आलिया फ , पूर्ण चित्रपटभर एकच स्माईल घेउन वावरली आहे .
पण ती फार गोड वाटली . फार सुन्दर नाही पण वावर सुखद आहे तिचा . आवडली पहिल्या चित्रपटात तरी.

नेटफ्लिक्स वर दुर के दर्शन म्हणुन कॉमेडी सिनेमा पाहिला. ठि़क आहे. हलकाफुलका.

एक आजी ३० वर्ष कोमात असते तिला जाग आल्यावर काळबदलाचा एकदम ताण झेपणार नाही म्हणून ८०-९० चा काळ घरातले उभा करतात. नवरा बायकोचे पटत नसल्याने ते घटस्फोटापर्यंत आलेले असतात त्यांना आजीमुळे एकत्र राहणे भाग पडते. नातवंडांना नोकर बनून आजीची कामं करावी लागतात. ती आजी पण मजेशीर घेतली आहे एकदम. फक्त माही गिल ओळखता आली बाकीचे नाही माहित कलाकार.

प्रोजेक्ट मराठवाडा म्हणून पण एक सिनेमा दिसला नेफ्लिवर कोणी बघितला का? स्टारकास्ट तर चांगली वाटतेय सगळी. ओम पुरी आहे.

डेव्हील विअर्स प्राडा पाहिला. आवडला. Anne Hathaway , Meryl Streep आवडतात, म्हणून पाहिला. गर्ल्स मुव्ही नाइटसाठी पर्फेक्ट आणि 'आयेशा' सारखा अगदीच candy-floss नाही.
बुलबुल मलाही आवडला काहीतरी वेगळाच आहे.

काल hotstar वर लूटकेस नावाचा तद्दन टाईमपास चित्रपट पाहिला. कथेचा जीव एवढासा आणि कथा काही फार नवीन नाही.
पण दोन तास जो गोंधळ घालतात सगळे , तो धमाल आहे.
कुणाल खेमू , विजय राज , गजराज राव , रणविर शौरी आणि बाकीचे पंटर , सगळे भारी. फक्त तो लहान मुलगा नाही आवडला.

काल रात्री 8 वाजेपर्यंत office च काम चालू होतं. It was nice stressbuster after long day !

रात अकेली है - नेटफ्लिक्स - नवाजुद्दिन साठी बरीच उत्सुकता होती या चित्रपटाबद्दल. त्या मानाने डिसपॉइन्टमेन्ट झाली.
टिपिकल मर्डर मिस्टरी प्लॉट. हवेलीत खून, बरेच नातेवाइ़क मग त्याची उकल, ऑब्व्हियस वाटणारे खुनी न निघता थोडे वेगळे निघणे हेही ऑब्व्हियस Happy यात सध्याचा लोकप्रिय घिसापिटा यूपी, एमेलए इ. मसाला. काही नाविन्य वाटले नाही. नवाजुद्दिन च्या रोल मधे कुणीही चालावे. राधिका आपटेचा रोल तर ती स्क्रिप्ट न वाचता झोपेत पण करू शकेल इतका ट्पिकल हातखंडा रोल. बाकी सगळे कलाकार पण चांगले आहेत. पण कथेत नाविन्य नसल्यामुळे शेवटी ओवरऑल इम्पॅक्ट विशेष नाही.
****** किंचित स्पॉयलरः
नवाजुद्दिन च्या लव स्टोरी चा अँगल अनावश्यक आणि तिथे त्याची पोझिशन पहाता एथिकली इनअप्रोप्रिएट पण वाटला.

शकुंतला देवी पाहिला. जाम बोअर. तिचं गणित कमी आणि family drama जास्त आहे. अशक्य बोअर आहे. ताणलेले नातेसंबंधच दाखवायचे तर शकुंतलाच कशाला कोणीही करियर वुमन घेऊन चाललं असतं. शेवट तर मी बघितलाच नाही.

ह्या कुणाल खेमुचाच एक पिक्चर आहे, ढुंढते रेह जाओगे.
कुणी पाहिलाय का? असाच आचरट प्लॉट, विचित्र कॅरेक्टर्स, अगदी डोके बाजूला ठेऊन बघावा लागेल असा. पण फुल्ल कॉमेडी.
गो गोआ गॉन पण बरा होता.
ढोल चांगलाच होता.

कॉमिक टायमिंग म्हणाल तर त्या रिक्षा ड्रायवरचं काम अफलातुन आहे. दोनंच सीन्स त्याच्या वाट्याला आले आहेत पण त्याचे डायलॉग्ज आणि डिलिवरी एकदम चाबूक. आता लिहितानाहि आठवुन हसु फुटतंय... Lol

ताणलेले नातेसंबंधच दाखवायचे तर शकुंतलाच कशाला कोणीही करियर वुमन घेऊन चाललं असतं. >>असं कसं! मग अधून मधून चुटकीसरशी गणित कोण सोडवणार? Happy

नेटफ्लिक्स वर रात अकेली हैं पाहिला. बोर वाटला. रडत खडत शेवटपर्यंत पाहिला. खरतर मर्डर मिस्टरी माझा आवडता genre. नुकताच Knives out पाहिल्यामुळे तर बऱ्याच अपेक्षा होत्या. पण निराशा झाली. खूप लांबवला आहे. २०-२५ मिनिटं तरी एडिट करून कमी करायला पाहिजे होता.
@maitreyee नवाजुद्दीन च्या लव्हस्टोरी चा angle बद्दल अनुमोदन. काही गरज नव्हती. किंबहुना त्यामुळे तर मला अजून कंटाळा येत होता. राधिका आपटेचे नेहमीचेच एक्स्प्रेशन इथेही. एकदा तिला थोड्यातरी वेगळ्या रोल मध्ये पाहायचे आहे.
Whodunnit बघायचे असेल तर knives out नक्की पहा. अमेझॉन वर आहे.

राधीका आपटे सगळीकडे का असते? ती काही फार देखणी नाहीये का फार मोठी अभिनेत्री नाही तरी इतके रोल्स कसे काय मिळतात तिला? ती दिसली की कंटाळा येतो.

राधीका आपटे सगळीकडे का असते? ती काही फार देखणी नाहीये का फार मोठी अभिनेत्री नाही तरी इतके रोल्स कसे काय मिळतात तिला? ती दिसली की कंटाळा येतो. >>>>>> सहमत.

उर्मिला जशी सारखे वेड्याचे रोल करून नंतर सगळीकडे वेडीच वाटायला लागलेली तसे हिचे झाले।आहे
सगळीकडे सेमच वाटते

Pages