चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शादी मे जरुर आना पाहिला, सुरवातिला वाटल बेस्ड ऑन बद्रिनाथ की दुल्हनिया सारखाच असावा पण ट्विस्ट वेगळा आहे, किर्ती खरबन्दा फ्रेश,गोड दिसते (टिव्हीवरच्या खुप पॉप्युलर हिरॉइन टाइप आहे) एक्टिन्ग ठिकठाक आहे म्हणजे सोनम कपुर्,जान्हवी कपुर वैगरे 'मला पहा आणि फुल वहा ठोकळ्यापेक्षा तर फारच बरी.
राजकुमार राव सहज्,सुन्दर आणी उत्तम अभिनय , हलका-फुलका मुव्ही, वन टाइम वॉच टाइप.

सोनम बद्धल सहमत . जान्हवी ?? नो वे... ती चांगली अभिनेत्री आहे. सारा अली चे नाव घेतला असता तर जास्त योग्य असता.
अथिया शेट्टी पण छान अभिनेत्री आहे.

पण त्यांच्यामुळे ज्यांची रोजीरोटी बंद झाली त्यांच्याबद्दल थोडी तरी सहअनुभूती हवी. ते सुद्धा यांच्याच वर्गातले आहेत. तुम्हाला तुमच्या वर्गातील लोकांबद्दल काहीही वाटत नाही तर इतर वर्गातील लोकांनी तुमच्याबद्दल काही का वाटून घ्यावे? कुठेतरी विचारसरणीतील, आजूबाजूच्या समाजातील परिस्थितीतील फरक असावा असेही वाटले. >>> good post, अगदी अगदी. कदाचित म्हणून मला फार सहानुभूती वाटली नाही त्यांच्याबद्दल. मालकाला जीवे मारल्याचा राग आला उलट. मुलगी गेली त्याचंही वाईट वाटलं.

पोलीस पिंजून कसं नाही काढत, अशा बेसमेंटस असतील की तिथे अनेक बंगल्यात त्यामुळे ती आयडिया नाही येत पोलिसांना. हा प्रश्न मनात आला. अर्थात त्या पिक्चरची थीम जी ठरवली त्या नोटवर तो संपवला बहुतेक .

पॅरासाईटबद्दलच्या या यूट्यूब क्लिप्स नक्की बघा :

Why Parasite should terrify us : https://www.youtube.com/watch?v=zgAK-4kPTb8 (स्पॉयलर्स आहेत)

The Visual Architecture of Parasite : https://www.youtube.com/watch?v=AvO8-925Edc

इतरही आहेत, सजेशन्समध्ये दिसतीलच,
'पॅरासाईट' नक्की कोण?
गरीब मुलगी श्रीमंत घराची बेल वाजवण्यापूर्वी एक गाणं म्हणते, त्याचीही एक बॅकग्राऊंड आहे.
सिनेमा बनताना किती बारीकसारीक विचार केला गेला होता ते समजतं. आणि मग ते सगळं आणखी अंगावर येतं.

पॅरासाईट बघितला.
@ललिता-प्रीती, पहिल्या पानावर तुम्ही त्या मुलीबद्दल काहीतरी लिहिलं आहे, ते उलगडून सांगाल का. ती मुलगी मला स्वार्थी वाटली कारण ती वडिलांना म्हणते कि तुम्ही त्या ड्राइवरचा नाही तर स्वतःचा विचार करा.
दोन्ही लिंक छान आहेत. या पद्धतीने विचार केला नव्हता.
वडील त्या मुलाला पत्र लिहीत असतात ते स्वतः जवळ ठेवतात का. तो दिवा चालू बंद होत असतो त्यावरून त्या मुलाला कळतं का कि त्याचे वडील तिथे आहेत.
खरंतर एखादा दिवा चालू बंद होत असेल तर तो रिपेर का नाही करून घेत. त्या दिव्याचे बटण कुठे आहे ते पार्क फॅमिलीला माहीतच नसतं का. तसंच मिस्टर पार्क जेव्हा रात्री त्या जिन्यावरून जातात तेव्हाच ते दिवे लागतात ही गोष्ट मिस्टर पार्कला तरी कशी पटते कारण ते स्वतः मोठया पदावर असतात. तसेच त्या मुलाच्या डोक्यावर इतक्या जोरात मारूनही तो जिवंत कसा राहतो. तो सतत नंतर हसत असतो ते नाटक असतं का. त्या मुलीच्या आईने खून केलेला असतो तरी तिला का सोडून देतात.
मुळात त्या आधीच्या मेडचा नवरा असा अचानक बाहेर येऊन सगळ्यांना मारत का सुटतो. त्याची बायको तिथेच मेलेली असते तरी कोणालाच वास कसा येत नाही.
गाडीची चावी घ्यायची असते तेव्हा खरंतर एवढा गोंधळ असतो, रक्ताने लाल झालेला आणि केक फासलेला त्या मेडच्या नवऱ्याच्या तोंडाला, या सगळ्या गदारोळात पार्कला तो विशिष्ट वास येतो आणि तो जाणवेल इतपत प्रतिक्रिया देतो हेच पटत नाही. त्या लहान मुलाबद्दल वाईट वाटले.

मिसेस पार्क ला , गाडीतून येताना वास येतो , पण त्याच्या बर्याच अगोदर , ती वडिलांसोबत , त्याच्या अगदी जवळ उभि असते तेन्व्हा कधी तिला वास येत नाही .

One Child Nation बघितला प्राईम वर आहे. चायनाच्या एक मूल पॉलिसी वर आहे. चायनीज किती क्रूर आहेत हे चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल. भयानक आहे. ही पॉलिसी राबवताना काय काय केले ह्यावर डॉक्युमेंटरी आहे.

मिसेस पार्क ला , गाडीतून येताना वास येतो , पण त्याच्या बर्याच अगोदर , ती वडिलांसोबत , त्याच्या अगदी जवळ उभि असते तेन्व्हा कधी तिला वास येत नाही . >>> हेही आलं मनात आणि ते नवऱ्याला म्हणालेहि मी. नंतर वाटलं की तिला वास आधी आला तरी फार जाणवला नव्हता पण तिचा मुलगा आणि नवरा तिला जाणवून देतात तो वास. मग तो ती फील करते गाडीतून जाताना. त्या ड्रायव्हरला तो अपमान वाटला असणार आणि ह्या सगळ्याचे सार शेवटी त्या मालका वर हल्ला करण्यात होतो जेव्हा एवढ्या मोठ्या प्रसंगातहि मालक वास जाणीव विसरू शकत नाही, भले मग तो वास कोणाचाही असो.

One Child Nation बघितला प्राईम वर आहे. चायनाच्या एक मूल पॉलिसी वर आहे. चायनीज किती क्रूर आहेत हे चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल. भयानक आहे. ही पॉलिसी राबवताना काय काय केले ह्यावर डॉक्युमेंटरी आहे -->
What happened to Monday नावाचा सिनेमा नेटफ्लिक्स किन्वा प्राईम कुठेतरी नक्कि असेल. वन चाईल्ड पॉलिसी वरच आहे. एक माणूस त्याच्या ७ (जुळ्या मुली) सरकारपासून कशा लपवतो त्याचि सुरस कथा.

जरूर पहा.

What happened to Monday >> ओके. तुमी कुटं गायब झालासा??

सध्या आवडलेले लहान मुलांनी काम केलेले दोन (Netflix) चित्रपट. दोघेही जण एखाद्या कसलेल्या अभिनेत्याच्या तोडीस अभिनय करून गेले आहेत.

समीक्षकांनी नावाजलेला Room - एका तरुण मुलीला किडनॅप करून रेप करून एकाकी शेडमध्ये 7 वर्षे बंद करून ठेवलेलं असतं. तिला तिथेच मुलगा होऊन तो ही त्याच छोट्याशा रूममध्ये 5 वर्षांचा होतो. कॅप्टर (मराठी शब्द माहीत नाही) अगदीच बेसिक गरजेच्या वस्तू पुरवत असतो. त्या छोट्याने TV सोडता बाहेरचं जग, माणसं, निसर्ग कधीच पाहिलेलं नसतं, आणि एके दिवशी .......

चिपा - एक खूप गोड रस्त्यावर रहाणारा मुलगा (चिपा) त्याला त्याच्या वडिलांनी उर्दुमध्ये लिहिलेलं पत्र सापडत. तो ते पत्र घेऊन उर्दू वाचता येणाऱ्या व्यक्तीच्या शोधात शहरभर फिरतो. खूप गोड चित्रपट आहे. छोटा चिपा (सुजित पवार) ने अफलातून काम केलं आहे. बाकी कथा काही ग्रेट नाही पण सम्पूर्ण चित्रपट पाहताना चेहऱ्यावर स्माईल रहातं. खूपच आवडलेला चित्रपट.

मीरा या दोन सिनेमांबद्दल लिहिलंत त्यासाठी धन्यवाद. मी नेटफ्लिक्स वर काय पहावं याच विचारात होते.

इथे वाचून रुम बघितला नेफ्लिवर. फार भारी आहे.
त्या मुलाचं काम अफलातून आहे. सुरूवातीचे त्यांचे रुममधले सीन्स बघून घुसमटायला होत होतं खरंच. विचार करूनही फार कसंतरी होतं की कशी इतकी वर्ष काढली एवढ्याश्या जागेत.
तो किडनॅपरचा अँगल काही समजला नाही पण त्यांना इतकी वर्ष डांबून का ठेवलंय? त्या मुलाला घेऊन जात असताना श्वास रोखूनच बघत होते काय होणार म्हणून.

अंकुर अरोरा मर्डर केस प्राईमवर पाहिला.चांगला आहे.
यात बरीच लूपहोल्स आहेत.पण सर्वांनी चांगला अभिनय केलाय.
टीस्का चोप्रा, केके मेनन, लहान मुलगा,मुख्य हिरो डॉक्टर सगळेच व्यवस्थित.

मी 5-10 मिनिटे पाहिला.फारसा क्लिक झाला नाही.पिक्चर चांगला असेल पण त्याच्याशी रिलेट होताच आले नाही.मग आम्ही बदलून अंकुर अरोरा पाहिला.
इथे धागे आले, त्यातून पिक्चर कळला, ओळखीचा वाटला की एकदा बसून बघेन.

Pages