चित्रखेळ ...

Submitted by हेमंतकुमार on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता...

४. हिशेब (७) व * * * * * त

८. तळहात (५) ना * * * ब

९. कुप्रसिद्धी (४) ब * * म

कुमार सर, कृपया Light 1 घ्या, पण ..
जीआरई परीक्षेसाठी तयारी म्हणून एक Barron's word list असते. त्यात इंग्रजीतले आपल्यासाठी कठीण कठीण (कारण खूप वापरात नसलेले) शब्द असतात. तसे हे मराठीतले शब्द आहेत तुमच्या कोड्यातले Lol
कधीकाळी मी या परीक्षेसाठी क्लास लावला होता. तिथले सर शिकवताना म्हणाले होते, या Barron's list मधला एकेक शब्द म्हणजे हातात घेतलेला दगड समजा Wink कुणाशी वाद घालताना यातला एखादा शब्द फेकला की समोरचा माणूस गार होणार हे नक्की. Wink

वावे,
बरोबर !
इथे बरेच भाषानिपुण असल्याने म्हटले घ्यावी एक जी आर इ !
......................................
तुमच्या GRE प्रमाणेच मी पण एकेकाळी USMLE चा अभ्यास करताना procrastinate हा शब्द शिकलो होतो. तो अजून आठवतो. Bw

अजून ३ बाकी? भरत, मानवना पण नाही आले?
४. हिशेब (७) व * * * * * त ( अरबी उगम )
८. तळहात (५) ना * * * ब ( प्रतिकात्मक वापराचा हात)
९. कुप्रसिद्धी (४) ब * * म ( हिंदी उगम )

हा प्रतिकात्मक वापर कसा?
इलेक्शन चिन्ह? मार देइन अशा अर्थाने उगारलेला? ठशावरून प्राणी ओळखण्यासाठी? शैक्षणिक मॉडेल? अजून?

मखतूल म्हणजे खुनी / खून झालेला इसम ना? जुन्या सिनेमातला कोर्टसीन शब्द?

मखतूल >>> रेशमाची कांकरी = धागा. (शब्दरत्नाकर)

तळहात (५) ना * * * ब ( प्रतिकात्मक वापराचा हात) >>> जरा ‘एका’ धर्मात डोकवा ! (एका प्रसंगात)
स्वप्नील, चालेल की .

बदनाम >>>> नाही.
कुप्रसिद्धी >>> म्हणजे एखादा नाही ; एखाद्याची .

@ swwapnil -- लिहा की, विचारत नाही बसायचे....
बदनाम / बदनामी रिजेक्ट झालेत. नवीन असेल तर लिहा.
इतका सोपा नाही म्हणाले सर. कुमार१''s word list मधला आहे. Happy

तळहात (५) ना * * * ब ( प्रतिकात्मक वापराचा हात)
ग्लवज् आहे का प्रतिक , उर्दू शब्द आहे का ?
ना * * या ब किंवा ना * * जा ब असे आहे का हिजाब सारखे ?

बद हा उपसर्ग उर्दू /फारसीतला आहे. आणि कुप्रसिद्धी या सूत्रामागच्या शब्दाचा उगम हिंदी आहे. इथे गाडे अडले.

बद .... होय
शेवट ... म
मग आता......
एकच अक्शर शोधा ! हाकानाका

'हाताची' पूजा' ...... अरबी उगम .>>>>>> ओके. मी तेच विचारणार होते. प्रत्येक धर्मात आशीर्वादाचा "हात"च असतो. आपले सगळे देव, जीझस, गुरूनानक.....तर कुठला धर्म?

बदलाम
शब्दरत्नाकर पाहिला.

हा शब्द दातेंच्या कोशात नाही.

नालसाहेब- पु. पंजा; मोहरमांत एका उंच काठीला वर पंजा बांधून व त्याला पुष्पमाळा वगैरे घालून गांवांतून मिरवीत नेतात, ही काठी हातीं धरणाराच्या अंगांत दैवी संचार होतो असें समजतात. याला भाविक लोक नालसाहेब म्हण- तात. महमंद पैगंबर ज्या घोड्यावरून मक्केहून मदिनेस गेला त्याचा नाल मिरविण्याच्या पद्धतीवरून ही पद्धत पडली असावी?

४ - हिशेब - वसूलवासलात

शब्दरत्नाकरात एक शब्द दिलाय. पण दाते - यांच्या कोशात दोन वेगवेगळे शब्द आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध नाही.

अखेर हा २ दिवसांचा सामना सुफळ संपूर्ण झाला.
सर्व छान खेळले.

बरेच शब्द वापरातले नाहीत मान्य. डोक्याला खुराक आणि इतिहासात डोकावणे हा हेतू .
‘तजकरनीस’ च्या वेळेसची शोधाशोध ... ती संध्याकाळ केवळ अविस्मरणीय ! तुम्हा सर्वांमुळेच.
धन्यवाद !

पुढचं कोडं मराठी नाट्यसंगीतासंदर्भात आहे.

सामान्यतः मराठी संगीत नाटकां तली पदे तो नाटककारच लिहीत आला आहे. पण काही मोजकी नाटके आहेत ज्यात पदे अन्य कोणी लिहिली आहेत किंवा अन्य कोणाचे पद नाटकात घेतले आहे. ही नाटके ओळखायची आहे. नाटककार आणि गीतकार सांगितले तर अधिक उत्तम.

१. क्लासिक नाटक. सर्वश्रेष्ट्ग गायक नटाची भूमिका.

२. संस्कृत नाटकाचे मराठी रूपांतर. रूपांतरकार नाटककार म्हणून प्रामुख्याने ओळखले जात नाहीत, पण महान रंगकर्मी.

३. अतिशय लोकप्रिय नाटककाराचे हे एकुलते एक संगीत नाटक. नाटकातली इतर सगळी पदे त्यांचीच. हे एक पद मात्र जुनी कविता.

४. प्रसिद्ध कादंबरीकाराने लिहिलेले नाटक.

भरत तुमची पोस्ट बघितली नव्हती.
मी नंतर देईन गुढकोडी.

४. . प्र के अत्रे हे कादंबरीकार पण होते आणि त्यांचे ‘प्रीतीसंगम’ हे सं. नाटक आहे.

Pages