चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत,
छान मजा आली या खेळात !
..................................
शब्द अंताक्षरी खेळातील २ शब्दांबद्दल रोचक:

१. डबघाई : डफावरचे गाणे संपताना वाजवणारा घाईने डफ वाजवतो >> डफघाई >> डबघाई.

२. डाकुलता : दुसरा अर्थ : ब्राह्मण-गवळीण यांच्यापासूनची संतती.

४ वीणा चिटको बरोबर. मास्टर कृष्णरावांनी काही राग, अनेक बंदिशी रचल्या. प्रभातच्या अनेक चित्रपटांना त्यांचं संगीत आहे. धुंद मधुमती रात रे, हे त्यांचं गाणं. कुलवधू नाटकातील 'बोला अमृत बोला' , 'क्षण आला भाग्याचा' ही त्यांची गाणी.

आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर सकाळी ११ ते १२ आठवणीतली गाणी हा डायल इन कार्यक्रम असे. वीणा चिटको त्यात फोन करीत.

शामा चित्तार यांची दोनच मराठी गाणी ऐकलीत.
तू थांब दूर तेथे येऊ नकोस जवळी - जुळती न जोवरी या गीतामधील ओळी

दर्यावरी रं सरली होरी रं - तुझी माझी जोरी बरी साजना
होरीतुन जाउ घरी रं - सोबत हेमंतकुमार

>>२. अमराठी गायिका. मराठीत माइल्स्टोन म्हणून ओळखलं जाणारं गाणं यांच्या नावावर. हिंदी चित्रपटात फक्त एका गीताचं संगीत यांनी केलंय.<<

कासे करु मनकि बात (काफि) - धूल का फूल
सलाम-ए-हसरत कबुल करलो (यमन) - बाबर, आणि अर्थात
तुम मुझे भूल भी जाओ (पहाडि) - दिदि

[तिन्हि गाणी साहिरची आहेत]

अजुनहि असतील कदाचित...

संगीत म्हटलंय. गायलेलं नाही.

तुम मुझे भूल मी जाओ हे दीदी चित्रपटातलं गाणं.
संगीत दिग्दर्शक एन दत्ता.
या गाण्याच्या वेळी ते आजारी होते की अपघात झाला होता.
म्हणून निर्मात्याने सुधा मल्होत्रांना विचारलं. आणि त्यांनी या गाण्याला चाल दिली. चाल दिलेलं हे एकच गीत.

संगीताच्या तरल प्रांतातून आता जाऊया पुन्हा एकदा शब्दांच्या पोतडीत ! मागच्याच धर्तीवर....
नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी

खाली ओळीने नऊ शोधसूत्रे दिली आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा) शोधायचा आहे. त्या अपेक्षित शब्दाचे शेवटचे अक्षर दिले आहे. आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:

• पहिला योग्य शब्द शोधल्यावर त्याचे शेवटचे (दिलेले) अक्षर घ्या.
• त्या अक्षराने सुरू होणारा दुसरा योग्य शब्द ओळखा.

• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे (दिलेले) अक्षर घेऊन तिसरा शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.

• नऊव्या शब्दाचे शेवटचे अक्षर हे पहिल्या शब्दाचे सुरवातीचे अक्षर आहे. असे सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.
• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही समानार्थी पर्यायी शब्द काढलेत तरी अंताक्षरी जुळलीच पाहिजे. आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या.

………………………………………………………………………………

१. मऊ धागा (४ अक्षरी) शेवटी ल

२. कसेतरी (६) ,, ड

३. प्राण्याचा आवाज (६) ,, व

४. हिशेब (७) त

५. शोधक अधिकारी (६) स

६. थकीत देणे (६) की

७. माळा (४) ना

८. तळहात (५) ब

९. कुप्रसिद्धी (४) क्र १ चे पहिले अक्षर.
.........................................

१. मलमल (?)
२.ओबडधोबड
३.डराव डराव (बेडकाचा आवाज)

२. लगडतगड आहे. / ***थ** दुसरा पर्याय दिसतोय.
३. डरावडराव >> अगदी थोडी सुधारणा हवी. शब्दकोडे म्हणून !

१. मलमल हे ‘कापड’ आहे; धागा नाही. म्हणून चूक. (हेमाम)
चर्चेस खुले. 'मलमल' असा धागा असल्यास माहित नाही.

५ हे सहा अक्षरी आहे.

ओके.

बदनामी >>>
नाही. शेवटी “म” हवा. इतका सोपा नाही !
याच जातीतला पण वेगळा शब्द आहे.

म्हणजे मलमल बरोबर आहे? मलमल / मखमल ही कापडे आहेत.... मलमलीचा धागाही असतो का?
माळा म्हणजे गळ्यातली माळ / हार (फुलांचा) याचे अनेकवचन?

Pages