चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उर्वरीत कोडी:

२. ही माती कालवल्यास मिळणारे ज्ञान. (३)

३. गयावया करून प्रश्न विचारून वाईट जन्मखूण फिरवून घेऊन जा. (५)

४. कधीही हनुमानाच्या शस्त्राचा सूर काढल्यास भोवती माकडे येतात. (३)

७. तीन सूरांचा शत्रू. (३)

१०. संख्येची काठी काढून डोक्यावर तिरपी घेतली तरी काहीही हरकत नाही. (४)

४ कदापि
गदा . ग हा सूर काढून टाकला. राहिला दा. भोवती माकडे म्हणजे कपि.

३. गयावया करून प्रश्न विचारून वाईट जन्मखूण फिरवून घेऊन जा. (५)
३ काकुळतीने =
प्रश्न --- का +
वाईट जन्मखूण फिरवून --- कु + तीळ (फिरवून ळती)
घेऊन जा. --- ने

माती कालवून मी चिखल / पंक करत बसले

७ गनिम
तीन सुरांचा शत्रू

ग म नि हे सूर

१०. संख्येची काठी काढून डोक्यावर तिरपी घेतली तरी काहीही हरकत नाही. (४)
बेहत्तर = तरी काहीही हरकत नाही
बहात्तर मधील ह चा काना ब च्या डोक्यावर तिरपा घेतला

मी सा ते नी सूर लिहून रिपु / अरि जोडले एकेकाला..... मला वाटले ३ संख्येचे दुसरे नाव शोधायचे आहे

सगळे बरोबर, भरत, वावे, कारवी. स्पष्टीकरणही अगदी बरोबर.

३ तासात फडशा पाडला कोड्यांचा.
कुमार आणि देवकी यांनी अशी कोंडी फोडली मग कुमार यांनी दणक्यात सोडवणे सुरू केले. आणि शेवटी तुम्ही छान फडशा पाडला.

मानव, मजा आली.
ज्यांना गूढ कोड्यांचा दादा व्हायचे असेल त्यांच्यासाठी मनोगत डॉट कॉम वर खजिना उपलब्ध आहे. त्यांच्याकडे ही सर्व संगणकीय चौकटरूपात तयार आहेत.
त्यामुळे आपलेच आपण परीक्षक होऊ शकतो. उत्तरे बरोबर किंवा चूक आल्यास अक्षरांचे रंग वेगळे असतात.

३ तासात फडशा पाडला कोड्यांचा >>>> रचायला किती वेळ लागला असेल. शब्द, अक्षरांची फोड, त्यावरून कळेल असे पण पिळदार शोधसूत्र.....
मजा आली......आता पुढचे कोण देणार?

@ भरत ---
शांता शेळके ---- वासवदत्ता ---- नाटककार श्री वसु भगत (नेटवर मिळाले.)

लोकसत्त / लोकमानस / शनिवार, २२ मे २०१० --- गजानन तांडेल, पेडर रोड, मुंबई हे लिहीतात :
‘जंगली कबुतर’च्या लेखनामुळे वसु भगत यांच्याबद्दलच्या रंगकर्मी व प्रेक्षक यांच्या उंचावलेल्या अपेक्षा त्यांच्या ‘वासवदत्ता’, ‘नियती’ व ‘मृत्युछाया’ नाटकं पुरी करू शकल्या नाहीत.
कवी भासाच्या मूळ नाटकाचं वसु भगत यांनी रूपांतर केल्यानंतर ‘वासवदत्ता’ला नटश्रेष्ठ दाजी भाटवडेकरांचं दिग्दर्शन लाभलं होतं. या नाटकाचा पहिला प्रयोग गिरगावच्या ब्राह्मणसभेनं त्यांच्या प्रतिथयश कलावंतसंचात दिल्लीच्या तालकटोरा गार्डन खुल्या रंगमंचावर ६ एप्रिल १९६१ रोजी केला. चेटी, विदूषक, राणी पद्मावती, वसंतक, उदयन व वासवदत्ता अशी पात्रं असलेलं भगतांचं मराठी रूपांतरित ‘वासवदत्ता’ मात्र सपशेल आपटलं होतं!

शोघगंगावरील एका प्रबंधातही हाच उल्लेख आहे. प्रबंधाचा नाव-लेखक तपशील नाही मिळाला.
http://14.139.116.20:8080/jspui/bitstream/10603/144482/13/13_chapter%201...

वा वा.
धन्यवाद.
प्रबंधाच्या लिंकसाठी खास वेगळे धन्यवाद.

गूढ शब्दांच्या नंतर आता घेऊया शब्दमिसळ !
‘पर्यावरण’ हा विषय.

खाली ८ निरर्थक वाक्ये दिलेली आहेत. त्यातील शब्दांचा क्रमही विस्कटलेला आहे. प्रत्येक वाक्यात दिलेल्या विषयाचा एक शब्द दडलेला आहे. योग्य ती अक्षरे उचलल्यावर तो तयार होईल. अशा प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या वाक्यापुढील कंसात दिली आहे. ती संबंधित वाक्याच्या शब्दसंख्येइतकी नाही. त्यामुळे अक्षरे कशी उचलायची हे तुम्ही ठरवा. दिलेला प्रत्येक शब्द उपयुक्त आहे.

असे विषयाशी संबंधित ८ शब्द तयार करा. ते झाल्यावर आणि खालीलप्रमाणे मांडल्यावर असे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल :
(१ २ ३ ४ ) असल्यामुळे ( ५ ६ ७ ८ ).

शब्दांची एकेक उत्तरे देत असताना तुम्ही अपेक्षितपेक्षा वेगळा (पण विषयाशी संबंधित) शब्द काढल्यास तो प्रलंबित ठेवला जाईल. शेवटचे वाक्य तयार होताना त्याचा निकाल लागेल.
...............................
१. स्वपरिचित ढापाढापीतून चिरंजीवाने चिकटवले. ( ५ अक्षरी शब्द )

२. विपरित चंद्रकोरीच्या आधारभूत पळत्याच्या दिसाकडे ( ६)

३. दर्जाहीनतेने शस्त्रोपवित उगवलेले.( ४)

४. अश्मयुगीन धन्यकलेस निजधामास कांजीवाल्याने (५)

५. स्वर्गसुखाच्या पादत्राणाने उत्तरदायित्व निरलसपणे (५)

६.. वजनदार दर्यावर्दीसाठीच्या म्हणावयाचा अपहरणकर्त्याने (६)

७. उमजतोय कलकलाटाने भुसभुशीत (४)

८. संतोषमय निबिडतम घनमंडळात (५) .
...........................................

१. पारंपारिक --- पण २ पा नाहीयेत. एकच अक्षर रिपीट चालेल का?
की पारंपरिक असा शब्द योग्य आहे?

Parampaarik असा योग्य शब्द आहे.पहिला प नंतर पा.मोबल्यावरून लिहिताना चुका होत आहेत.

देवकी, नाही. हे पाहा:
पारंपरिक pāramparika a S Successional, consecutive, continuous, traditional.

मोल्सवर्थ शब्दकोश

6.पर्यावरणाचा

मानव यांच्यामुळे आले.अर्थात बरोबर असेल तर.

पारंपरिक २ ऊर्जास्त्रोत जीवाश्मजन्य असल्याने निसर्गदत्त पर्यावरणाचा समतोल ८.
असे वाक्य झाले ना...
२ कोळसाधारित
8. बिघडतोय

पारंपरिक कोळसाधारित ऊर्जास्त्रोत जीवाश्मजन्य असल्याने पर्यावरणाचा निसर्गदत्त समतोल बिघडतोय -- लागतोय अर्थ वाक्याचा....

Pages