अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्या जाणार्या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.
**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.
<आपण करतो का रेसिझम?>
<आपण करतो का रेसिझम?>
"आम्ही काळ्या रंगाच्या दक्षिण भारतीय लोकांसोबत राहतोच की. मग आम्ही कृष्णवर्णीयाचा द्वेष कसा करू?" ( हे अवतरणात आहे. म्हणजे कोणीतरी म्हटलंय. कोणी ते शोधा)
ईशान्येकडच्या राज्यातल्या लोकांना , भारतात शिकायला येणा र्या आफ्रिकन विद्यार्थ्यांना विचारायला हवं, तुम्हांला इथे रेसिजमचा अनुभव येतो का? northeast racism असं गुगल करून बघा. हवं तर सोबत बंगलोर जोडा.
तसंही भारतीयांना द्वेष करायला वंशाचा आधार घेण्याआधी इतर भरपूर कारणं असतात.
स्वाती-आंबोळे, कोणता प्रश्न?
स्वाती-आंबोळे, कोणता प्रश्न? मी खरं उत्तर देईन उपरोध का genuine.
जिज्ञासा, बहुतांश भारतीय लोक परदेशात (इथे अमेरिकेत) law abiding citizen / residents असतात. तरीही त्यांना रेसिझम चा सामना करावा लागतोच ना? कधीही इथे मोठी बातमी होत नाही. त्यावर धागा निघत नाही. कधी कोणी उघडपणे बोलल्याचे पण आठवत नाही.
इथे हा माणूस law abiding होता का ? पण आपण काहीही करत नसताना, वर स्वाती2 नी उदाहरण दिली आहे तशी जमेल तितकी मदत करत असताना, हा धागा ज्या प्रातांत हा प्रकार घडला तिथलं लोकल administration वाचतय का? कशाचा काही संबंध नसताना कशासाठी?
माझं डोकं चालत नाहीये- भारत, भारतीय, मराठी, अमेरिकन-भारतीय, अमेरिकन-मराठी आले कुठे? संबंध काय?
भारतीय म्हणून काय फरक पडतो? -
भारतीय म्हणून काय फरक पडतो? - हा विचार घातक आहे. इतिहासातून काही शिकायचे असेल तर जिथे वंशहत्येचा (जिनोसाईडस) इतिहास घडला आहे अशा देशात बघावे लागते. जर्मनीत अशाच पद्धतीने एक एक गटाला कमकुवत करून हुकूमशाही आली. त्याबद्दल "फर्स्ट दे केम" म्हणून एक कविताही आहे. इच्छुकांनी जरूर वाचावी.
सीमंतिनी, आपण 'दे' असू तर डर
सीमंतिनी, आपण 'दे' असू तर डर कैसा?
लोकल अॅडमिनिस्ट्रेशन वाचतंय का हा मुद्दा मस्त आहे.
चर्चा वाचायला मजा येते आहे.
चर्चा वाचायला मजा येते आहे. रथी-महारथी चर्चेत उतरलेले आहेत. आपला लंगडा युक्तीवादही कसा ठासून सांगावा त्याचेही शिक्षण मिळते आहे. एकंदरच उत्तम चर्चा.
northeast racism असं गुगल
northeast racism असं गुगल करून बघा. हवं तर सोबत बंगलोर जोडा.--- जरूर. मला तरी असं काही होताना दिसत नाही. बंगलोरमधली पूर्ण beauty parlour industry north ईस्ट भारतीय मंडळींच्या ताब्यात आहे. बरीच ठिकाणी कूक्स, nannies north ईस्ट मधल्या आहेत. Nannies बहुधा live-in असतात म्हणजे त्यांना स्वतःच्या घरात entry, अन्न, निवारा आहे.
हे पत्र अविश्वसनीय आहे
हे पत्र अविश्वसनीय आहे

भारतीय संस्कृतीत रेसिझम
भारतीय संस्कृतीत रेसिझम जात्याधारीत आहे रुजलेला. सफाई कामगार जे मुख्यतः दलित वर्गातले असतात त्यांना स्वतःच्या घरातल्या मलमूत्र विसर्जन करण्याच्या जागेचा देखील ऍक्सेस न देण्याची वृत्ती असणारा पराकोटीचा रेसिझम आपल्यात आहे.
सुरज एंगडे नावाचे एक अभ्यासक आहेत त्यांचे कास्ट मॅटर्स नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यात त्यांनी लिहिलेला स्वतःसोबत घडलेल्या एक प्रसंगाबद्दल वाचताना याची आठवण झाली. ते लहान असताना त्यांच्या आजीबरोबर ती घरकाम करायची त्या मालकाच्या घरी गेले. त्यांना शु लागली. लहान मूल असल्याने आजीसमोर पर्याय नव्हता तिने त्यांना पटकन आवरून घ्यायला सांगितले. घराबाहेरचा संडास! पण एक मिनिटाच्या आता सुरज बाहेर आला तरी मालकीणीच्या तीक्ष्ण नजरेतून ते सुटले नाही. तिने आजीवर भडाभडा आरडाओरडा केला. या घटनेची जखम सुरज यांच्या मनावर खोल झाली. संडासापेक्षा खालची आपली जागा!
तर जॉर्ज फ्लॉईड सारख्या घटनांबद्दल वाचल्याने आपल्या मनातले खोल रुतलेले गैरसमज, द्वेष, अज्ञान दूर व्हायची शक्यता असते, आपल्याला स्वतःची मते तपासून घेता येतात. इथे चर्चा करण्याचा तोही एक हेतू.
माझं डोकं चालत नाहीये- भारत,
माझं डोकं चालत नाहीये- भारत, भारतीय, मराठी, अमेरिकन-भारतीय, अमेरिकन-मराठी आले कुठे? संबंध काय? >> बरोबर. हा प्रश्न तसा गुंतागुंतीचा आहे. भारतीय म्हणून आपण कश्शाला मध्ये पडा हे वाटणे क्षणकालापुरते ठीकच आहे. पण ह्यात मूळ प्रश्न सामाजिक समरसतेचा आहे.
ज्या देशात रहातो तेथिल जवळपास १५% जनतेशी आपले काही घेणे देणे नसावे हे वागणे योग्य का हे तपासून बघण्याची वेळ आहे. जसे -
गेल्या १२ महिन्यात कुठल्या वंशाबरोबर कितीवेळा पार्टी केली/जेवण केले (उदा: आपल्या घरी/मंडळात गणपतीला चिनी, जपानी येतात/बोलावतो तसे कुणी कृष्णवर्णीय आले का) ?
गेल्या १२ महिन्यात कुठली पुस्तके वाचली त्यात कुणी कृष्णवर्णीय लेखक होते का? इ इ.
पोलिस ते राष्ट्रपती यांनी अमके ढमके वागावे हे बरोबरच. पण कुठेतरी ही बोच हवी की हे सगळे लोकप्रतिनीधी किंवा लोकप्रतिनीधी नियुक्त अधिकारी आहेत. भारतीय म्हणून आपली जबाबदारी झटकता येत नाही.
भारतीय म्हणून काय फरक पडतो? -
भारतीय म्हणून काय फरक पडतो? - हा विचार घातक आहे. इतिहासातून काही शिकायचे असेल तर जिथे वंशहत्येचा (जिनोसाईडस) इतिहास घडला आहे -----जिनोसाईड म्हंटल तर फक्त ज्यू नाहीतर आफ्रिकन का आठवतात सगळ्यांना? कोणी भारतीयांच्या जिनोसाईड बद्दल का बोलत नाही? जगभर भारतियांना पारतंत्र्यात असताना मरायला पाठवलं होतं त्याबद्दल कुठे media cry किंवा सोमी cry अजूनही दिसत नाही.
>>लोकल अॅडमिनिस्ट्रेशन
>>लोकल अॅडमिनिस्ट्रेशन वाचतंय का >>म्हणजे अमेरीकन? असतील वाचत. मायबोली अमेरीकेत रजिस्टर्ड आहे. जगभरातील मराठी मंडळी इथे गप्पा मारतात, चर्चा करतात. तेव्हा मराठी भाषेचे शिक्षण घेतलेले शासनातर्फे नजर ठेवत असल्यास मलातरी नवल वाटणार नाही. माहिती चाळायला अल्गोरिदम असेल की लावलेला.
मैत्रेयी, पटलं.
मैत्रेयी, पटलं.
राजसी, तुम्ही आधी जीनोसाइडचा अर्थ शोधा, तो शब्द इथे कोणी वापरला आहे का हे तपासा, मग पारतंत्र्यातल्या इत्यादी भारतियांसाठी स्वत: धागे काढा आणि ऑनलाइन चळवळ सुरू करा असं सुचवेन.
भारतीय म्हणून काय फरक पडतो? -
भारतीय म्हणून काय फरक पडतो? - हा विचार घातक आहे. इतिहासातून काही शिकायचे असेल तर जिथे वंशहत्येचा (जिनोसाईडस) इतिहास घडला आहे अशा देशात बघावे लागते. जर्मनीत अशाच पद्धतीने एक एक गटाला कमकुवत करून हुकूमशाही आली. त्याबद्दल "फर्स्ट दे केम" म्हणून एक कविताही आहे. इच्छुकांनी जरूर वाचावी.
Submitted by सीमंतिनी on 4 June, 2020 - 19
करेक्ट!
आमचा एक मित्र ब्लॅक लोकांबद्दल काहीही बोलत असे. त्याच्या ऑफिसात एक ब्लॅक माणूस होता. तो माणूस याला काही उपद्रव करत नसे पण याला त्याच्या अस्तित्वाचाच त्रास व्हायचा. त्याला 'तू रेसिस्ट आहेस' असं म्हटलं तरी काही वाटत नसे. कदाचित ती प्रशंसाच वाटत असावी.
एक दिवस यालाच रेसिझमचा प्रसाद गोऱ्या माणसाकडून मिळाला. तेव्हापासून बराच फरक पडलाय.
जिनोसाईड म्हंटल तर फक्त ज्यू
जिनोसाईड म्हंटल तर फक्त ज्यू नाहीतर आफ्रिकन का आठवतात सगळ्यांना? >> कारण ह्याबद्दल अधिक संशोधन उपलब्ध आहे.
भारत ७५ वर्षापूर्वी पारतंत्र्यात होता. त्याबद्दल जॉर्ज फ्लॉईड मृत्यूनंतर बोलण्यात काय हाशील. भारतीय वंशहत्या ही महत्त्वाचा विषय. तो ही कधी बोलू पण सध्या ते समयोचित नाही.
इथे कितीजण छातीठोकपणे सांगू
इथे कितीजण छातीठोकपणे सांगू शकतात की मी अमेरिकन नागरिक आहे, अमेरिकेन रहिवासी आहे, अमेरिकन taxpayer आहे म्हणून मला कधीही brown रेसिझम चा सामना करावा लागला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की I belong here, I have been accepted as their own/ I accept them as my own and I can make difference म्हणून मला असं वाटतं की जशी मला समान वागणूक मिळते आहे तशीच इतरांना पण मिळावी म्हणून हा माझा पण लढा आहे. मला पूर्ण खात्री आहे की तो दुर्दैवी माणूस फक्त काळा आहे म्हणून त्याची हत्या केली गेली आणि बाकी त्याची काहीही चूक नव्हती.
पारतंत्र्यातल्या इत्यादी
पारतंत्र्यातल्या इत्यादी भारतियांसाठी स्वत: धागे काढा आणि ऑनलाइन चळवळ सुरू करा असं सुचवेन ----

मी हे वर already लिहिलं होतं की शेवटी चर्चा मी धागा काढा वर येऊन थांबेल
वंशहत्या म्हणजे जिनोसाईड नाही का?
कारण ह्याबद्दल अधिक संशोधन
कारण ह्याबद्दल अधिक संशोधन उपलब्ध आहे.--- कारण श्रीमंत ज्यू आणि श्रीमंत डावे ह्यांनी ह्याला भरपूर funding, पब्लिसिटी करून सतत चर्चेत ठेवलंय.
भारत ७५ वर्षापूर्वी पारतंत्र्यात होता. त्याबद्दल जॉर्ज फ्लॉईड मृत्यूनंतर बोलण्यात काय हाशील. भारतीय वंशहत्या ही महत्त्वाचा विषय. ---कधीच, कुठेच,कोणीच बोलत नाही. अरेरे! दुसऱ्याबद्दल वाईट झालं बोलताना,आपण निदान आपल्यासाठी काहीतरी करायला पाहिजे
तो ही कधी बोलू पण सध्या ते समयोचित नाही --- मी धागा काढला की का
मी कधीच धागे काढत नाही.
टवणे सर, भरत - तुम्ही काय
टवणे सर, भरत - तुम्ही काय लिहिलंय, image टाकलीय ते नीट वाचून लिहीन.
आता हजारो मैल दूर कुणीतरी
आता हजारो मैल दूर कुणीतरी कदाचित वंशद्वेषाने काहीतरी केले ते जास्त महत्त्वाचे का २ मैलावर हिंसक जाळपोळ लुटालुट चालली आहे ते महत्त्वाचे? >> मुलांना दंगलीबद्दल सांगू नका असे कोण म्हणत आहे! पण ते पालकांचे काम आहे. रेसिझम बद्दल शाळेत सांगायची गरज का आहे
<<
आणि "हजारो मैल दूर कोणीतरी कदाचित" मधे जे तुम्हाला ट्रिव्हियलायझेशन करायचे आहे ते उघड आहे. हा बाफ रेसिझम च्या चर्चेबद्दल उघडला आहे. अमेरिकाभर रेसिझम अजूनही आहे हे उघड आहे (इव्हन बे एरियामधेही आहे). चार दोन लोकांना ते मान्य असल्या नसल्याने काही फरक पडत नाही. हा बाफ त्याच चर्चेबद्दल उघडला आहे. तेथे येउन तुम्ही दंगलीबद्दल तेच तेच पुन्हा सांगताय, जिचे मुळातच कोणी समर्थन केलेले नाही. (किमान बहुतांशानी. नाहीतर एखादी कोपच्यातली लाइन काढाल इथे प्रातिनिधिक म्हणून!)
<<
होय. हजार मैल दूर पोलिसाने वाईट काम केले. ते रेसिज्म होते का नाही हा निवाडा करण्याइतका पुरावा कुणाकडे आहे? तुमच्याकडे? माझ्यमते कुणाकडे नाही. पोलिसी माज, वैयक्तिक विकृती, वैयक्तिक हेवेदावे, ह्यातले काहीही असू शकते. रेसिज्म आणि रेसिज्म हेच ह्यामागची प्रेरणा आहे असे ठाम म्हणणे बिनबुडाचे आहे. रेसिज्म सिद्ध झालेले नसताना हा प्रसंग रेसिज्म आहे असे ठाम सांगणे आणि तुम्ही रेसिज्म करु नका असे लेक्चर देणे कितपत सयुक्तिक आहे?
पण त्याला रेसिज्म ठरवून सगळे सोशल डिस्टन्सिंग कायदे धाब्यावर बसवून लुटालूट करणे न्याय्य कसे आहे? तेही पूर्ण देशभर. एका हत्येचे हे उत्तर कसे असू शकते? माफ करा पण आपण लुटालुट, जाळपोळीला अत्यंत तोंडदेखला, निव्वळ नावापुरता विरोध करत आहात. मिनेसोटातील न्यायव्यवस्था, सरकार कुणीही काही करणार नाही अशी आगाऊ समजूत करून, त्यांना काही महिने देखील न देता सरळ दंगली करायला सुरवात करणे ज्यात एकाहून जास्त पोलिसांना आणि अन्य लोकांना ठार मारले जात आहे. ह्यात काहीतरी भयंकर घडते आहे असे आपणास वाटत नसेल तर आनंद आहे.
ह्या प्रसंगाची प्रतिक्रिया म्हणून कधी नव्हे ते आमच्या भागातही ह्या हिंसेचे लोण पसरले आहेत. त्याविषयी बोलण्याची जबाबदारी आईबापांवर पण रेसिज्म आहे असा संशय असणार्या प्रसंगाचा आधार घेऊन (जो हजार मैल दूर घडला) रेसिज्म कसे वाईट ह्यावर लेक्चर देण्याची जबाबदारी मात्र शाळेची हा काय प्रकार आहे? इथे होणारी दंगल, लुटालुट, भडकाऊ भाषणे ऐकून एखादा विद्यार्थी भडकून स्वतः जाऊन दंगलीत सहभागी होऊ शकतो. ती शक्यता कितीतरी जास्त आहे. आणि असे करू नका हे सांगणे शाळेला मान्य नाही का?
उलट गुंड व पिसाट लोकांनी कायदा हातात घेऊन ह्या प्रसंगाशी संबंध नसलेल्या लोकांची लुटालुट, मारहाण, नासधूस केली हे जास्त धोकादायक आहे. पण इथे बरेचसे लोक ह्या हिंसक प्रतिक्रियेला फारतर गुळमुळीत निषेध ह्या पलीकडे काही करत नाहीत हे दुर्दैव. कदाचित माध्यमे अशा प्रकारे ह्या हिंसक दंगलींचे शर्करावगुंठन करतात त्याचा हा परिणाम असावा.
Whites who dislike blacks
Whites who dislike blacks equally dislike others including Indians.
I had written it here once before.
One of my clients, on a previous project, always without fail, used to reply to my white boss.
I was assigned that project and I used to send him a direct email and he would reply to my boss, not me. This went on for the entire duration of the project.
This was indeed an exception and not the rule.
Most others have been professional in their conduct.
>>तर जॉर्ज फ्लॉईड सारख्या
>>तर जॉर्ज फ्लॉईड सारख्या घटनांबद्दल वाचल्याने आपल्या मनातले खोल रुतलेले गैरसमज, द्वेष, अज्ञान दूर व्हायची शक्यता असते, आपल्याला स्वतःची मते तपासून घेता येतात. इथे चर्चा करण्याचा तोही एक हेतू.<<
टवणे सर, आता तुम्ही हा पॉइंट काढलाच आहे तर. तुम्हाला खरंच वाटतं कि एव्हढि मचुरिटी, सर्वसमावेशकता लोकांच्यात येते? इथे वर्णद्वेषाच्या विरोधात +१ देणारे, तावातावाने भांडणारे, इतरत्र तेच करतात आणि त्या विरोधात मत मांडलं गेलं तर "घुमजाव" करायला सगळे हजर. आता बोला.
घटना ताजी आहे, करायचं का पोस्टमार्टम...
>>> इथे कितीजण छातीठोकपणे
>>> इथे कितीजण छातीठोकपणे सांगू शकतात की
मी माझ्या वैयक्तिक अनुभवाबाबत सांगू शकते.
काळ्या माणसाची काही चूक होती की नव्हती याची शहानिशादेखील करायची संधी कोणाला मिळाली नाही, अटक करताना पाळायचे काहीएक नियम असतात, गुन्हा असला तर तो कोर्टात सिद्ध व्हावा लागतो, शिक्षा करायचा अधिकार न्यायसंस्थेकडे आहे, गुन्हा सिद्ध होईपर्यंत आरोपीला गुन्हेगार समजण्यात येत नाही - यातलं काही घडण्याची शक्यताच जॉर्ज फ्लॉइडला जिवानिशी मारून नाहीशी केली गेली - याबद्दलचा निषेध व्यक्त होतो आहे.
जीनोसाइड म्हणजे एखाद्या वंशाचा नि: पात / निर्वंश करण्याचा प्रयत्न. जसा हिटलरने केला. तसा भारतियांचा कोणी केला का?
'ह्याबद्दल बोलता तर त्याबद्दल का नाही' याला व्हॉटअबाउटिझम म्हणतात - जो तुम्ही इथे करताहात. म्हणून त्याबद्दल तुम्हाला पुढाकार घेऊन काय कारवाई करता येईल ते सुचवत आहेत. 'मी कधीच धागे काढत नाही' हे काय उत्तर आहे का?
राजसी जे लोकं बातम्या न वाचता
राजसी जे लोकं बातम्या न वाचता काहीतरी विचारतात त्यांना सांगायला कुठून (आणि अर्थातच का) सुरुवात करावी हा मोठाच प्रश्न आहे.
>>इथे हा माणूस law abiding होता का ?
त्याने एक वीस डॉलरच्या नोटेसाठी अतिशय क्रुरतेचा सामना तर केलाच पण प्राणही गमवले आहेत. आता त्याला कोणाच्या फुटपट्या लावायच्या की हे चांगलं का ते वाईट हे ठरवायला तुम्ही बातमीच वाचली नाही म्हणता म्हणून आम्ही उत्तर दिलं की तुमचा काही तरी जुने कुठले तरी संदर्भ देता आहात.
कोविडच्या काळात आणखी एक काळा माणूस मारला गेला आहे ही बातमी तुम्हाला वाचायला आवडेल (?) का?
>>हा धागा ज्या प्रातांत हा प्रकार घडला तिथलं लोकल administration वाचतय का?
मायबोलीवर मरठीत कितीही गळे काढले म्हणून तिथलं लोकल मराठी administration वाचतय का?
आता मीच टोटली कंफ्युज्ड आहे
वेका, 'बातम्या' न वाचता
वेका, 'बातम्या' न वाचता 'फॉर्वर्डस'च्या नंदनवनात राहणार्या लोकांच्या जगात तुमचे स्वागत आहे.
लोकल अॅड वाचतं का म्हणजे तुम्ही इथे लिहून (आपटून)काय फरक पडणार आहे? तुम्हांला एवढंच वाटतंय, तर पुढल्या निवडणुकीला उभे रहा, निवडून या आणि काय हवं ते करा. ( निवडून आलं की काय हवं ते करता येतं. )
वर वर्षद्वेष लिहिलंय शीर्षकात
वर वर्षद्वेष लिहिलंय शीर्षकात म्हणून मी वाचायला आले. एका अमेरिकन नी दुसऱ्या अमेरिकन माणसाला क्रौर्याने मारले मी बहुधा लक्ष दिलं नसतं. Convenience stores किलिंग होतच असतात की सर्रास तिथे. झाल्याच तर शाळा-कॉलेजमध्ये मास-किलिंग पण. माझं दुर्लक्ष होत असेल ह्याबद्दल पण धागे निघतच असतील.
आपण दुसऱ्याचा वर्षद्वेषाबद्दल आणि त्रासाबद्दल बोलणं म्हणजे एका आंधळ्यानी दुसऱ्या आंधळ्याला रस्ता क्रॉस करायला मदत करण्यासारखं आहे. मला विरोधाभास वाटला.
वर वर्षद्वेष लिहिलंय शीर्षकात
वर वर्षद्वेष लिहिलंय शीर्षकात म्हणून मी वाचायला आले >> काय वाचण्यासाठी आला होतात नक्की? You are really scaring me!
असो, तुमच्यामुळे चर्चा भरकटते
असो, तुमच्यामुळे चर्चा भरकटते आहे.
राज आणि शेंडेनक्षत्र यांचे मुद्दे convincing नसले तरी विषयाशी संबंधित आहेत.
स्थानिक प्रशासनाचा मुद्दा
स्थानिक प्रशासनाचा मुद्दा समजून घ्यायला इच्छुकांनी ओबामा यांची दोन-तीन दिवसांपूर्वीची मिडीयम पोस्ट वाचावी. स्थानिक प्रशासन इथे मायबोलीवर लिहीलेलं वाचेल, किंवा वाचणार नाही. पण प्रशासनात बदल घडवायचा असेल तर मतदार बदलायला हवा. म्हणून हा धागा, ही चर्चा महत्त्वाची.
https://medium.com/@BarackObama/how-to-make-this-moment-the-turning-poin...
राजसी, तुम्हाला चर्चा
राजसी, तुम्हाला चर्चा irrelevant वाटत असल्यास तुम्ही धागा इग्नोअर मारा की!
असुफ +1
काही भारतीय अशा पद्धतीच्या white nationalism चे समर्थक असतात याची मला म्हणूनच गंमत वाटते. आपल्याला स्पेशल immunity pin दिली जाईल असं त्यांना वाटत असेल का? की colonial mindset असेल की गोरे लोक आपल्याला हिडीसफिडीस करणारच, त्यात काही चूक नाही, अमेरिकेत राहू दिलं म्हणजे झालं.
>>राज आणि शेंडेनक्षत्र यांचे
>>राज आणि शेंडेनक्षत्र यांचे मुद्दे convincing नसले तरी विषयाशी संबंधित आहेत.<<
अरेच्च्या! तुमचा चष्मा लावुन तुम्ही सगळं वाचणार, मुद्यात तथ्य आहे कि नाहि याची शहनिशा न करता निश्कर्ष काढणार, किंवा हेच नाहि, तेच नाहि अशी फुटकळ कारणं देत बसणार, आणि शेवटि कंन्विसिंग नाहि अशी बोंब ठोकणार. अहो अशा परिस्थित शेंडेनक्षत्र आणि राज कशाला, प्रत्यक्ष ब्रह्मदेवहि तुम्हाला इन्कंन्विसिंग वाटेल याची खात्री आहे...
Pages