वर्णद्वेष आणि पोलिसांकडून होणारी हिंसा

Submitted by maitreyee on 2 June, 2020 - 11:02

अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्‍या जाणार्‍या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्‍या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.

**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.

Group content visibility: 
Use group defaults

असा कोपर्‍यातुन क्षीण आवाज येइपर्यंत मी माझं मत राखुन ठेवतो... > > हरकत नाही पण "ह्यात एक मोठे गृहितक आहे की ट्रंप हा वर्णद्वेष्टा आहे. मला तसे आढळलेले नाही. " ह्या आवाजावर तुझे मत ऐकायला आवडेल.

"ते वर्णद्वेषाचं दूसरं टोक होतं..." असा कोपर्‍यातुन क्षीण आवाज येइपर्यंत मी माझं मत राखुन ठेवतो...
नवीन Submitted by राज on 3 June, 2020 - 21:34

हत्याकांड वर्णद्वेषातून घडलं असं मी म्हणणार नाही. ते घडलं ते फक्त गुन्हेगाराच्या हलकट मनोवृत्तीमुळेच ... पण पुढे न्याययंत्रणेनं जनता व मीडीयाच्या दबावामुळे आपल्यावर वर्णद्वेषाचा शिक्का बसू नये याकरिता गुन्हेगाराला प्रचंड झुकतं माप दिलं असं माझं ठाम मत आहे.

>>ह्या आवाजावर तुझे मत ऐकायला आवडेल.<<
यावर माझं मत वेगळं ते काय असणार? झाडुन सगळे पास्ट प्रेसिडेंट्स, हो ओबामा धरुन वर्णद्वेष्टे होते. आणि याला ट्रंप देखील अपवाद नाहि...

यावर माझं मत वेगळं ते काय असणार? झाडुन सगळे पास्ट प्रेसिडेंट्स, हो ओबामा धरुन वर्णद्वेष्टे होते. आणि याला ट्रंप देखील अपवाद नाहि... >> अरे ट्रंप नाही असे मत वाचले म्हणून विचारले. ओबामा कसा काय होता हे लिहीशील का ?

पॉलिटिकल करेक्टनेसच्या हव्यासापायी बिगर काळ्या लोकांना कायम अपराधाची टोचणी लावलेली असते. आयुष्यात कुणाला गुलाम न केलेले लोक ह्यांच्याही मनावर अगदी शाळेपासून हेच ठसवले जाते की तुम्ही वंशद्वेष्टे, वर्णद्वेष्टे आहात. मग त्यातून अनेकदा काळ्या लोकांना नको इतके डोक्यावर घेतले जाते. उदा. काही काळ्या गायकांचे रॅपच्या गाण्याचे शब्द ऐकलेत तर अंगावर शहारे येतील इतके हिडीस आणि क्रूर असतात. पण त्यांचे "कलेचा अद्भूत अविष्कार" म्हणून कौतुक करायचे!
N वर्ड नामक एक शब्द आहे जो कुण्या गोर्‍याने उच्चारला तरी त्याचे राजकीय, व्यावसायिक, सामाजिक आयुष्य संपते. पण काळे लोक आपापसात तो शब्द अगदी सर्र्रास गंमतीत वापरतात.
६०-७० वर्षे पूर्वी काळ्यांवर अत्याचार केले गेले म्हणून आता तो लंबक विरुद्ध दिशेला ढकलून त्याचे प्रायश्चित्त करण्याचा प्रकार चालू आहे असे वाटते.
मधे मधे काळ्या लोकांना गुलाम केले म्हणून मोबदला म्हणून अब्जावधी डॉलर त्यांना वाटा अशी मागणी डोके वर काढते. आता हे कसे ठरवायचे? अशा प्रकारे पैशाचा अपव्यय करणे हे मूर्खपणाचे आहे. ज्या अमेरिकेत गुलामगिरी होती तेव्हा इतक्या मोठ्या संख्येने चिनी, व्हिएटनामी, भारतीय, मेक्सिकन, युरोपियन, अफ्रिकन लोक होते का? मग त्यांना भुर्दंड का? अशा प्रकारे प्रचंड पैसा लॉटरीसारखा सामान्य काळ्या लोकांना मिळाल्यास ते नको तसा खर्च करण्याचीच शक्यता. एकंदरीत अत्यंत अव्यवहार्य मागणी. पण पोलिटिकल करेकटनेसच्या हव्यासामुळे ते होते.

आणि हो, मिशेल ओबामा जे करते ते ढोंग आहे. त्यांनी कमावलेली संपत्ती, त्यांना मिळणारा मानमरातब (ओबामाला राष्ट्रपती बनला म्हणून
आधीच नोबेलचे शांतता पारितोषिक दिले. नंतर जागतिक शांततेसाठी ८ वर्षे शष्प काही न करता!) हे बघता आपल्याला वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो अशी ओरड करणे म्हणजे खोटा कांगावा आहे.

>>ओबामा कसा काय होता हे लिहीशील का<<
व्हाय रिइंन्वेंट द व्हिल? गुगल कर - रेशलायझेशन इन ओबामा एरा. आय अंडरस्टँड इट्स ए बिटर पिल फॉर यु गाय्ज टु स्वॉलो, बट इट कुड बी वर्दि ऑफ योर टाइम...

>>मधे मधे काळ्या लोकांना गुलाम केले म्हणून मोबदला म्हणून अब्जावधी डॉलर त्यांना वाटा अशी मागणी डोके वर काढते. <<
अरे हे तर कायच्या काय आहे? ट्रंपची रिअ‍ॅक्शन अजुन बघितली नाहि पण बाय्डन विहमंटली शॉट्डाउन धिस अय्डिया. ते सदग्रहस्थ बिइटि चे संस्थापक आहेत...

व्हाय रिइंन्वेंट द व्हिल? गुगल कर - > >अरे मला तुझे मत हवय . टीपीकल रेडनेक मूर्खपणा नकोय.

एकंदरीत अत्यंत अव्यवहार्य मागणी. >> अव्यवहार्य म्हटले होय, चूक, अन एथिकल, ईमोरल वगैरे नाही म्हटले. interesting.

>>> पॉलिटिकल करेक्टनेसच्या हव्यासापायी बिगर काळ्या लोकांना कायम अपराधाची टोचणी लावलेली असते. आयुष्यात कुणाला गुलाम न केलेले लोक ह्यांच्याही मनावर अगदी शाळेपासून हेच ठसवले जाते की तुम्ही वंशद्वेष्टे, वर्णद्वेष्टे आहात. मग त्यातून अनेकदा काळ्या लोकांना नको इतके डोक्यावर घेतले जाते.
हे 'अनेकदा' म्हणजे नक्की काय? 'नको इतके' म्हणजे नक्की किती? काळ्या पोलिसाने गोर्‍या माणसाच्या (जो अजून गुन्हेगार ठरलेलाही नाही) मानेवर गुडघा दाबल्याच्या किती केसेस तुम्हाला माहीत आहेत? कुठल्या शाळेत बिगर कृष्णवर्णीयांच्या मनावर ते वर्णद्वेष्टे असल्याचं शिकवलं जातं? कुठल्या राज्यात? कितव्या इयत्तेत?

>>
हे 'अनेकदा' म्हणजे नक्की काय? 'नको इतके' म्हणजे नक्की किती? काळ्या पोलिसाने गोर्‍या माणसाच्या (जो अजून गुन्हेगार ठरलेलाही नाही) मानेवर गुडघा दाबल्याच्या किती केसेस तुम्हाला माहीत आहेत? कुठल्या शाळेत बिगर कृष्णवर्णीयांच्या मनावर ते वर्णद्वेष्टे असल्याचं शिकवलं जातं? कुठल्या राज्यात? कितव्या इयत्तेत?
<<
अनेकदा म्हणजे शिक्षणात. अनेकदा म्हणजे राजकारणात. समाजकारणात.
काळ्या पोलिसाने गोर्या महिलेला काही कारण नसताना गोळी घालून मारले आहे. हे इथे पहा
https://en.wikipedia.org/wiki/Shooting_of_Justine_Damond
हे चालेल का? की काळ्याने गुडघ्याने गळा दाबला तरच ते उदाहरण चालते? योगायोगाने हे मिनेसोटातच घडले आहे.

गंमत म्हणून ही बातमी पहा. गोर्या माणसाला पोलिसांनी असेच मारले. पण दंगली नाही की चौकशी नाही.
https://www.dallasnews.com/news/investigations/2019/07/31/you-re-gonna-kill-me-dallas-police-body-cam-footage-reveals-the-final-minutes-of-tony-timpa-s-life/

>>
कुठल्या शाळेत बिगर कृष्णवर्णीयांच्या मनावर ते वर्णद्वेष्टे असल्याचं शिकवलं जातं? कुठल्या राज्यात? कितव्या इयत्तेत?
<<
कॅलिफोर्नियात. जेव्हा जेव्हा इतिहास वा अन्य समाज शास्त्रे शिकवतात तेव्हा. स्लो पॉइजन म्हणता येईल. काळ्या लोकांचे उदात्तीकरण. काळ्या लोकांनी कायदे मोडले तरी त्यांना शिक्षा न होणे हे वारंवार दिसते. उदा. बार्ट. पालो अल्टो इथे पोलिसांना सूचना आहेत की संशयित काळा असेल तर वर्णनात काळा असा शब्द नको.

ट्रंप अध्यक्ष झाल्यावर ओकलंड वगैरे जागी लुटालूट, जाळपोळ वगैरे कार्यक्रम झाले. मोठे हायवे ब्लॉक केले गेले. पण कारवाई शून्य. कारण काय? हे कार्यक्रम करणारे बहुसंख्य काळे लोक होते.

कॅलिफोर्नियात. जेव्हा जेव्हा इतिहास वा अन्य समाज शास्त्रे शिकवतात तेव्हा. स्लो पॉइजन म्हणता येईल. काळ्या लोकांचे उदात्तीकरण. >> काही उदाहरणे द्याल ? तुमच्या परीच्छेदातील पुढची वाक्ये शाळे संदर्भात नाहीत.

पण दंगली नाही की चौकशी नाही. >> ही केस वाचली होती म्हणून फक्त विचारतो कि चौकशी नाही हे कसे ठरवलेत ? अगदी तुम्ही दिलेल्या लिंकमधे सुद्धा कोर्ट केस बद्दल लिहिलय. डॅलस मधेच गेल्या वर्शी एका श्वेत वर्णीय पोलीसाने चुकून दुसर्‍या घरात शिरून एका कृष्णवर्णिय व्यक्तीला मारले होते. तेंव्हा दंगली झाल्या नाहीत, चौकशीही झाली. मोर्चे झाले. इतर वर्णांच्या व्यक्तींबाबत अशा घटना होत नाहीत असे कोणीही म्हणत नाही पण विशीष्ट वर्णाबाबत अधिक होतात ह्याबद्दल तुम्हाला ही शंका नसावी. बरोबर ?

शिक्षण हे निव्वळ शाळेत होते का? आजूबाजूला जे दिसते, राजकीय नेते जी वक्तव्ये करतात त्यावरून होत नाही का?
जेव्हा जेव्हा असे काही प्रसंग होतात आणि मुले त्यावर बोलतात त्यावर शाळेच्या प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया जी असते त्यावरून एक विशिष्ट टोन व्यक्त होत असतो.
आत्ताही जेव्हा फ्लोय्ड प्रकरण झाले तेव्हा शाळेच्या प्रिन्सिपॉलचे पत्र सर्व पालकांना गेले आहे त्यात केवळ रेसिझ्म चा उल्लेख आहे. जाळपोळ होते आहे. लुटालूट होते आहे. कर्फ्यू लावला आहे आणि हे असे होऊ नये अशी कुठली भावना व्यक्त केली नाही.

एक केस? त्यामुळे वर्षानुवर्षांचा इतिहास जस्टिफाय होतो?
निदान ते एक स्पष्ट उदाहरणतरी दिलंत - बाकी सगळे जे घडतं त्याबद्दलचे तुमचे ओपिनिअन्स आहेत. सॉरी.

>>एक केस? त्यामुळे वर्षानुवर्षांचा इतिहास जस्टिफाय होतो?

एक केस केवळ उदाहरण होते. ह्याचा अर्थ असा नाही की अमेरिकेच्या इतिहासात केवळ अशी एकच केस आहे. पटकन आठवले म्हणून उदाहरण दिले. अमेरिकन माध्यमांचा दुटप्पीपणा सिद्ध करण्याकरता. इतिहास जस्टिफाय वगैरे काही नाही.
काळ्याच्या हत्येवर प्रतिक्रिया म्हणून शेकडो मैल दूर शहरात लुटालुट, दंगली, गोळीबार, जाळपोळ केल्याने इतिहासातील प्रायश्चित्तांचे परिमार्जन वगैरे होते का? कसे?

शिक्षण हे निव्वळ शाळेत होते का? >> शालेय अभ्यासक्रमातील उदाहरणे देत नसाल तर ह्या "कॅलिफोर्नियात. जेव्हा जेव्हा इतिहास वा अन्य समाज शास्त्रे शिकवतात तेव्हा. स्लो पॉइजन म्हणता येईल. काळ्या लोकांचे उदात्तीकरण. " विधानांना काडीचाही अर्थ नाही. "आजूबाजूला जे दिसते, राजकीय नेते जी वक्तव्ये करतात त्यावरून होत नाही का?" ह्या गोष्टी दोन्ही बाजूंना लागू होतात.

केवळ रेसिझ्म चा उल्लेख आहे. जाळपोळ होते आहे. लुटालूट होते आहे. कर्फ्यू लावला आहे आणि हे असे होऊ नये अशी कुठली भावना व्यक्त केली नाही. >> तशी भावना व्यक्त केली नसेल तर रेसिझ्म झाला नाही असे कसे होते नक्की ?

>>
शिक्षण हे निव्वळ शाळेत होते का? >> शालेय अभ्यासक्रमातील उदाहरणे देत नसाल तर ह्या "कॅलिफोर्नियात. जेव्हा जेव्हा इतिहास वा अन्य समाज शास्त्रे शिकवतात तेव्हा. स्लो पॉइजन म्हणता येईल. काळ्या लोकांचे उदात्तीकरण. " विधानांना काडीचाही अर्थ नाही. "आजूबाजूला जे दिसते, राजकीय नेते जी वक्तव्ये करतात त्यावरून होत नाही का?" ह्या गोष्टी दोन्ही बाजूंना लागू होतात.
<<
माझ्याकडे पाठ्यपुस्तके नाहीत. पण मुले जे बोलतात त्यावरून काढलेला निष्कर्ष आहे. तुम्हाला मान्य नसेल तर हरकत नाही.

<<
केवळ रेसिझ्म चा उल्लेख आहे. जाळपोळ होते आहे. लुटालूट होते आहे. कर्फ्यू लावला आहे आणि हे असे होऊ नये अशी कुठली भावना व्यक्त केली नाही. >> तशी भावना व्यक्त केली नसेल तर रेसिझ्म झाला नाही असे कसे होते नक्की ?
<<
जे अगदी जवळपास घडते आहे त्याकडे दुर्लक्ष करून जे मिनेसोटात घडले ते रेसिझ्मच होते हे ठासून सांगणे हे सेलेक्टिव्ह औटरेज आहे. सोयीचे आहे, जे कॅलिफोर्निया सारख्या पुरोगामी राज्याचे धोरण आहे त्यात रेसिझ्मचा निषेध करणे अनिवार्य आहे. लुटालुट जाळपोळ हे करणारे अल्पसंख्य असतील तर त्याविषयी न बोलणे हेच योग्य असे धोरण त्यातून दिसते.
वास्तविक आमच्या जवळचे मॉल फोडले, आगी लावल्या, माल लुटला. ह्या गोष्टी गावात रहाणार्‍या मुलांच्या जास्त जवळ आहेत. त्याबद्दल काही भावना व्यक्त करणे. काळजी घ्या म्हणून सांगणे हे जास्त समयोचित आहे. पण त्याने काही अल्पसंख्य दुखावले जातील असा संशय येतो. म्हणून मग अनुल्लेखाने मारणे.

एखाद्याचा वर्णद्वेषातून खून करणे आणि मॉल जाळणे किंवा लुटणे या सेम गोष्टी नाहीत. गेलेला जीव परत येऊ शकत नाही. Property damage ही वेगळी केस झाली. Murder is different.
2016 नंतर भारतीयांचेही वर्णद्वेषातून खून पडले आहेत. भविष्यात त्याचं प्रमाण वाढू शकतं. ट्रम्प समर्थकांच्या सोशल मीडिया कमेंट वाचल्या तर लक्षात येईल की त्यांच्या मनात भारतीयांबद्दलही भरपूर द्वेष आहे.
So this really isn't even just about African Americans.

माझ्याकडे पाठ्यपुस्तके नाहीत. पण मुले जे बोलतात त्यावरून काढलेला निष्कर्ष आहे. >> मुलांशी हे बोलून बघा कि "तुम्ही वंशद्वेष्टे, वर्णद्वेष्टे आहात" कि "काय बोलल्या चालल्याने वंशद्वेष्ट, वर्णद्वेष्ट धरला जाईल". दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.

दंगलीत आणि जाळपोळीत अनेक लोक मेले सुद्धा आहेत. ओकलंडमधे निषेध चालू असताना एका काळ्या माणसाला गोळ्या घालून मारले. लास व्हेगास, सेंट लुईस इथेही असेच लोक मारले गेले आहेत.

https://www.stltoday.com/news/local/crime-and-courts/retired-police-capt...

https://sanfrancisco.cbslocal.com/2020/06/02/family-friends-mourn-federa...

https://www.fox5vegas.com/news/suspect-in-shooting-of-las-vegas-police-o...

दंगली म्हणजे काही लोकांचा जीव पवित्र मानणारे कार्यक्रम नाहीत. अत्यंत हिंसक जमाव काहीतरी सबब शोधून कुणाला तरी ठार मारायला शिवशिवत असतो.

दुकानातील माल लुटणे, आगी लावणे हे आपणास तुलनेने निरुपद्रवी उपक्रम वाटतात हे वाचून गंमत वाटली. एखादा मध्यमवर्गीय उद्योजक आपली सगळी संपत्ती एखाद्या दुकानात गुंतवतो, कर्जे काढतो, भाडी भरतो. अशा प्रकारे सुरू केलेला उद्योग कुणी डोकेफिरू लोक येऊन राखरांगोळी करतात आणि हे काय अगदीच निरुपद्रवी आहे असे बघे लोक म्हणतात तेव्हा जखमेवर मीठ चोळणे ह्या वाक्प्रचाराचे अत्यंत चपखल उदाहरण मिळाल्यासारखे वाटते.

आयुष्यात कुणाला गुलाम न केलेले लोक ह्यांच्याही मनावर अगदी शाळेपासून हेच ठसवले जाते की तुम्ही वंशद्वेष्टे, वर्णद्वेष्टे आहात >>> काहीही लिहीताय राव. असले काही शिकवत ठसवत वगैरे नाहीत. मीही कॅलिफोर्नियाची स्कूल सिस्टीम अनेक वर्षे जवळून पाहिली आहे. (एकतर कॅलिफोर्नियाच्या देसी स्कूल डिस्ट्रिक्ट मधे काळे अक्षरशः शोधावे लागतात)

आणि काही लोक लंबक थोडा दुसर्‍या बाजूला नेत असतील, तरी मूळ प्रॉब्लेम ची तीव्रता त्यामुळे कमी होत नाही. त्यामुळे असल्या पोस्ट्स मधे आणून हे सगळे डायल्यूट करायचा प्रयत्न करताय.

>>
काहीही लिहीताय राव. असले काही शिकवत ठसवत वगैरे नाहीत. मीही कॅलिफोर्नियाची स्कूल सिस्टीम अनेक वर्षे जवळून पाहिली आहे. (एकतर कॅलिफोर्नियाच्या देसी स्कूल डिस्ट्रिक्ट मधे काळे अक्षरशः शोधावे लागतात)
<<
काळे लोक असायची काय गरज आहे? एक म्हणजे थेट पाठ्यपुस्तकातील धडे असे सांगत नाहीत. मान्य. पण बाकी शाळेतील वातावरण. प्रोजेक्टचे विषय. जेव्हा अशा काही घटना घडतात तेव्हा शाळेचे प्रशासन ज्या प्रकारे संवाद साधते ते, ज्या प्रकारचे इमेल वगैरे पाठवले जातात त्यातील मथितार्थ.
ह्यातून एक ब्रेनवॉशिंग होते आहे असे मला जाणवते. मुख्यतः स्थलांतरित लोक शाळेत आहेत. त्यांचा काळ्यांच्या गुलामगिरीशी संबंध आलेला नाही. तरी हे ब्रेनवॉशिंग मोठ्या प्रमाणात चालते. शिक्षण हे निव्वळ पाठ्यपुस्तकातील धडे वाचून होत नसते. जिथे विद्यार्थी दिवसाचे इतके तास घालवतो तिथले शिक्षक, प्रिन्सिपॉल जे बोलतात त्याचा मुलांच्या विचारांवर परिणाम होत नाही का? माझ्या मते होतो.

जॉर्ज फ्लोईड प्रकरण ह्यामागे वंशद्वेषच होता का हे अजून सिद्ध झालेले नाही. शक्यता आहे एवढेच. पण शाळेच्या सर्व अधिकृत प्रतिक्रियेत असे जाहीर केले गेले आहे की हे रेसिज्म आहे. आणि आपण सगळे मिळून रेसिज्मचा निषेध करु या वगैरे. पण आपण शांतता पाळू. लुटालुट, दंगली, जाळपोळ करु नये असे कुणी का म्हणू धजत नाही? कारण एक लिबरल अजेंडा!

अतिरेकी लिबरल विचार ज्यात काळ्या लोकांची, बेकायदा घुसखोरांची, समलैंगिक आणि अन्य लैंगिक गटांची अतिरेकी भलावण होते ते शाळेत होताना वारंवार होताना दिसते आणि ते मला खटकते.

जाता जाता: हिंदू संस्कृती ह्या विषयाकडे कॅलिफोर्नियातील पाठ्यपुस्तके अत्यंत हीणकस दृष्टीने बघतात. हिंदू संस्कृती म्हणजे जातीव्यवस्था, दलितांवर अत्याचर, सती परंपरा वगैरे. त्यातल्या त्यात बरा भाग म्हणजे मुगल राजवट. हेही अतिरेकी लिबरल विचारसारणीचाच भाग आहे असे मला वाटते.

मला वाटतं व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता देश असल्यामुळेच असं होतं. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे तसचं स्वतःच विकास स्वतः घडवून आणायची जबाबदारी पण त्याची/ तिची आहे अशी धारणा समाजात असल्याने, समाजातील एखादा घटक मागासलेला/ पुरेसा विकसित नसले तर उरलेल्या समाज घटकांनी त्याला मदत केली पाहिजे ही भावना पुरेशी निर्माण होत नाही. ////

सहमत नाही.
वर्णभेद म्हणजे मागासलेल्या लोकांना इतरांनी मदत न करणे ही व्याख्या योग्य वाटत नाही. अमेरिकेतील वर्णभेद हा अश्वेत लोकांना जगण्याचे मानवी हक्क व human dignity - respect नाकारणं, आपल्या former slaves ना माणूस म्हणून बरोबरीचा हक्क देण्याची तयारी नसणं, //// इथेपर्यंत @सनव +1

जॉर्ज फ्लोईड प्रकरण ह्यामागे वंशद्वेषच होता का हे अजून सिद्ध झालेले नाही. शक्यता आहे एवढेच. पण शाळेच्या सर्व अधिकृत प्रतिक्रियेत असे जाहीर केले गेले आहे की हे रेसिज्म आहे. आणि आपण सगळे मिळून रेसिज्मचा निषेध करु या वगैरे. पण आपण शांतता पाळू. लुटालुट, दंगली, जाळपोळ करु नये असे कुणी का म्हणू धजत नाही? कारण एक लिबरल अजेंडा!

>>> ते रेसिझम होते की नाही ते लीगल बाजूने सिद्ध व्हायचे तेव्हा होईल. पण एकूण पॅटर्न तोच आहे आणि शाळेत मुलांना समजवाण्याकरता तसे सांगणे यात काहीच चूक नाही. बाकी लुटालूट वगैरे ऑलरेडी गृहीत आहे की चुकीचे आहे. ते शाळेत कशाला सांगायला हवे. पण शाळेत रेसिझम बद्दल सांगणे आवश्यक आहे - एकतर शाळा/डिस्ट्रिक्ट हे चालू देणार नाही हे सांगण्याकरता व दुसरे म्हणजे सिस्टीमिक रेसिझम संपवायचा असेल तर मुले मोठी होतानाच याची कल्पना देणे आवश्यक आहे. जेव्हा आजूबाजूला असे प्रसंग घडतात त्याचा संदर्भ देउन असे समजावणे बरोबरच आहे.

मुळात इथे बहुतांश लोकांनी लुटालूट वगैरेंचे समर्थन केलेच नसताना पुन्हा पुन्हा तेच विषय काढायचे कारण काय.

जॉर्ज फ्लोईड प्रकरण ह्यामागे वंशद्वेषच होता का हे अजून सिद्ध झालेले नाही. शक्यता आहे एवढेच. पण शाळेच्या सर्व अधिकृत प्रतिक्रियेत असे जाहीर केले गेले आहे की हे रेसिज्म आहे. आणि आपण सगळे मिळून रेसिज्मचा निषेध करु या वगैरे. पण आपण शांतता पाळू. लुटालुट, दंगली, जाळपोळ करु नये असे कुणी का म्हणू धजत नाही? कारण एक लिबरल अजेंडा! >> लिबरल अजेंडा मधे "लुटालुट, दंगली, जाळपोळ" ह्याचा निशेढ नसतो असे का वाटते ? " रेसिज्मचा निषेध करु या" ह्यात खटकण्यासारखे काय आहे नक्कि ? पुढचे शेपूट असले नसले तरी किमान वंशद्वेष हा कधीही निर्विवादपणे निषेध करण्यासारखी गोष्ट आहे हे मान्य असायल हरकत नसावी इतर कुठल्याही if, but, else शिवाय ?

>>> रेसिज्मचा निषेध करु या" ह्यात खटकण्यासारखे काय आहे नक्कि ? पुढचे शेपूट असले नसले तरी किमान वंशद्वेष हा कधीही निर्विवादपणे निषेध करण्यासारखी गोष्ट आहे हे मान्य असायल हरकत नसावी इतर कुठल्याही if, but, else शिवाय ?
अनुमोदन.

>>> मुळात इथे बहुतांश लोकांनी लुटालूट वगैरेंचे समर्थन केलेच नसताना पुन्हा पुन्हा तेच विषय काढायचे कारण काय.
इथे कोणीही राजकारणाचा आणि राजकारण्यांचा विषय काढलेला नसताना तो काढावासा वाटण्याचं जे कारण आहे तेच.

"पोलिसांच्याकडून घडणार्‍या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचीही ही पहिली घटना नाही" असं चर्चाप्रस्तावात स्पष्ट लिहिलेलं असताना गोर्‍या माणसाला पोलिसांनी मारल्याची बातमी 'गंमत म्हणून' द्यावीशी वाटण्याचं जे कारण आहे तेच.

वर शेंडेनक्षत्रांनी दिलेली मिनेसोटात काळ्या पोलिस अधिकार्‍याने गोर्‍या महिलेला गोळी घातल्याच्या घटनेची माहिती अर्धवट आहे.
एकतर मोहम्मद नूर हा सोमाली अमेरिकन आहे. टेक्निकली तो अफ्रिकन अमेरिकन असला तरी मिनेसोटात सोमाली हे ९२नंतर आले.

महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर लगेच कार्यवाही होवून मोहम्मद नूरला शिक्षा झाली. मिनेसोटात पोलिस अधिकार्‍याला ड्युटीवर असताना हातून घडलेल्या गुन्ह्यामुळे थर्ड डिग्री मर्डरच्या चार्जखाली झालेली ही पहिली शिक्षा.
याच्या तुलनेत कितीतरी राज्यात अधिक सबळ पुरावे असताना सुटलेले गोरे अधिकारी अधिक दिसतील.

>>एकंदरीत अत्यंत अव्यवहार्य मागणी. >> अव्यवहार्य म्हटले होय, चूक, अन एथिकल, ईमोरल वगैरे नाही म्हटले. interesting.<<
म्हणजे रॉबर्ट जॉन्सनच्या मागणीला पाठिंबा देणारे या प्रपोजलचा पाठपुरावा एथिकल आणि मॉरल ग्राउंडस्वर करणार कि काय? त्याने कितीचा टॅग लावलेला आहे माहिती आहे? $१४ ट्रिल्यन, विथ ए बिग टि.

आता भारताने पण जोर लावुन इंग्लंड कडुन रेपरेशनची मागणी करायला हरकत नाहि. येनकेन प्रकारे भारतीयांच्या खात्यात १५ लाख जमा होतील...

अमानुष, दुर्दैवी, संतापजनक घटना.
खुद्द त्या पोलीसानेच खुद्द 'हा तो वर्णद्वेषच होता' सांगितल्याशिवाय आपण सिद्ध करु शकत नाही पण घटनेचे स्वरुप व मिन्यापोलीसचा याबाबत इतिहास पहाता हा वर्णद्वेषच असणार याची शक्यता खुप जास्त. म्हणुनच इतका उद्रेक झालाय साठुन राहिलेला.
आशा आहे त्या पोलिसाला चपराक शिक्षा होईल.

तसेच शांतपणे निदर्शने करणार्‍या गटाचा फायदा घेऊन निदर्शनाच्या नावावर जी लूटालूट केली गेली ते देखील किती संतापजनक आहे.

$१४ ट्रिल्यन, विथ ए बिग टि. >> १००० ट्रिल्यन असली तरी अन एथिकल, ईमोरल मागणी म्हणत नाही आहात ह्यातच सगळे आले रे.

चर्चेच्या अनुषंगाने आणखी एक वाचनीय लिंक.
Bias and discrimination can be difficult subjects to discuss. But there are very good reasons to get past our discomfort and talk about these important issues. We talked to Gwendolyn Keita, PhD, executive director of APA’s Public Interest Directorate, about how and why to put discrimination conversations on the agenda. Her responses are drawn, in part, from the APA report

https://www.apa.org/topics/keita-discussing-discrimination

Pages