अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्या जाणार्या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.
**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.
रेसिज्म "धडधडीत" दिसते म्हणजे
रेसिज्म "धडधडीत" दिसते म्हणजे काय? कसे दिसते म्हणे रेसिज्म? >> अरे ये पी एस पी ओ नहीं जानता?
गोर्या पक्षी व्हाइट अमेरिकन माणसाने २०$ खोटी तथाकथित नोट बिल भरताना दिली तर त्याला वॉर्निन्ग देउन सोडतात. इथे आ ठ मिनिटे ३३ सेकंद
गळ्यावर असा दाब दिला की जीवच गेला. गोर्या साठी हा फक्त एक किस्सा आहे सांगून सोडून द्यायचा तर आफ्रिकन अमेरिकन चा जीवच गेला.
हा तो फरक म्हणजे रेसिझम . बता देना अपने सुप्रीम लीडरको.
अ देशातल्या ब रंगाच्या
अ देशातल्या ब रंगाच्या माणसाने क रंगाच्या माणसाला मारलं. तिघांत एकही भारतीय नाही. मग भारतीय माणसाला त्याचं का एवढं काही वाटायला हवंय, असं म्हणून भारत लवकरच विश्वगुरू होणार आणि अखिल वि श्वाला (स्वतःच्या उदाहरणाने) शांतता, सौहार्द, बंधुता इ.इ. चे धडे देणार.
पण अ देशात भारतीय राहत आहेत
पण अ देशात भारतीय राहत आहेत ना .
जरी भारतीय अ देशात असले तरी
जरी भारतीय अ देशात असले तरी जोवर भारतीयांना काही होत नाही, तोवर त्यांनी उगाच कळवळु नये. आणि जेव्हा भारतीयांना काही होतं तेव्हा ब आणि क रंगाचे लोक कळवळत नाहीतच, हे भारतीयही कळवळत नाहीत. उदा: देवयानी खोब्रागडे की कोणीतरी आणि दोन महायुद्धांत ब्रिटिशांकडून लढताना मारले गेलेले भारतीय सैनिक.
देवयानी खोब्रागडे ह्यांच्या
देवयानी खोब्रागडे ह्यांच्या वर अन्याय झाला नाही त्यांनी गरीब मोलकरणीवर अत्याचार केला होता.
दंगे , लुटालूट वगैरे
दंगे , लुटालूट वगैरे निरुपद्रवी असतात असे म्हणून किंवा काहीही न म्हणून ह्या दंग्याचे समर्थन करणारे ह्या मृत्यूंचे कसे स्पष्टीकरण देतात ह्याची उत्सुकता आहे. >>> पुन्हा एकदा कायच्या काय. अहो लोक अजूनही मूळ घटनेबद्दल बोलत आहेत. प्रतिक्रियेपर्यंत पोहोचलेले नाहीत. तेव्हा आधीच स्ट्रॉ मॅन लावू नका.
फारेण्ड , त्यांन मूळ
फारेण्ड , त्यांन मूळ घटनेबद्दल काहीही लिहिलेलं मला दिसलं नाही. मला आठवतंय त्यानुसार 'हत्या' ऐवजी 'अटक' म्हटलंय .
मैत्रेयी - धागा सुरु
मैत्रेयी - धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद.
छान चर्चा सुरु आहे.
<< फ्लॉयडच्या मृत्यूचा निषेध
<< फ्लॉयडच्या मृत्यूचा निषेध म्हणून इतका दंगा उफाळला आहे. आजवर किमान तीन लोक (सगळे काळे) हे ह्या निषेधाच्या निमित्ताने मारले गेले आहेत. हे सगळे धडधडीत खून आहेत. एका काळ्या व्यक्तीला मारण्याचे उत्तर देताना तीन काळे सकृतदर्शनी निरपराध लोक मारणे हा हिशेब कसा जुळवायचा? >>
------- प्रत्येक मानावाची हत्या वाईटच...
जॉर्ज फ्लॉयडची हत्या तो काळा आहे म्हणून झाली. त्याच्या जागेवर गोरा असता तर निव्वळ समजावर निभावले जाण्याची शक्यता होती.
<< दंगे , लुटालूट वगैरे निरुपद्रवी असतात असे म्हणून किंवा काहीही न म्हणून ह्या दंग्याचे समर्थन करणारे ह्या मृत्यूंचे कसे स्पष्टीकरण देतात ह्याची उत्सुकता आहे. >>
-----
दंग्या धोप्याचे समर्थन कुणीही केलेले नाही.
दंग्याचे समर्थन केले आहे अशी एक पोस्ट दाखवा...
<< अमक्या पद्धतीने गळा दाबला
<< अमक्या पद्धतीने गळा दाबला तर रेसिज्म असा काही फॉर्मुला आहे का? >>
------ होय फॉर्म्युला आहे. आठ मिनिटे आणि ३२ सेकंद या पेक्षा जास्त काळ पोलिसाने काळ्या व्यक्तीचा (तो काळा आहे म्हणून) गळा दाबला तर तो रेसिझम ठरतो. त्याने ८ मिनिटे ३३ सेकंद त्याच्या गळ्यावर पाय ठेवला होता...
तब्बल ९ मि. गळा दाबला होता तरी त्याला रेसिझम म्हणवत नाही आणि दंग्यांचे समर्थन कुणी केले नसतांना ते तसे केले आहे असे म्हणून दिशाभूल कर ण्याचा उद्देश काय ?
सर्व प्रकार ची माणसं.
सर्व प्रकार ची माणसं.
काळी, गोरी, सावळी
गरीब,श्रीमंत,मध्यम वर्ग
हिंदू,मुस्लिम,ख्रिस्त. Etc
अशी विविध प्रकारच्या माणसातील भेदभाव जावून फक्त माणुसकी च असेल असे वातावरण निर्माण होणे शक्य आहे का?
सत्य परिस्थिती वर आधारित ह्याचे उत्तर हो आहे की नाही.
ऊर्जेचे रूपांतर एका प्रकारात तून दुसऱ्या प्रकारात होते पण ती नष्ट होत नाही.
आणि असेच भेद भावाचे फक्त स्वरूप बदलत आहे पण भेदभाव अजुन पण कायम आहे.
ऊर्जेचे रूपांतर एका प्रकारात
ऊर्जेचे रूपांतर एका प्रकारात तून दुसऱ्या प्रकारात होते पण ती नष्ट होत नाही.
आणि असेच भेद भावाचे फक्त स्वरूप बदलत आहे पण भेदभाव अजुन पण कायम आहे.>>>>
तो कायम रहायची शक्यता जास्त आहे. पुर्ण भेदभावरहीत समाज कदाचित कधीच बघायला मिळणार नाही. मानवी स्वभावच तसा आहे.
Race, caste, creed, religion, gender, sexuality, region, economic status एक ना अनेक कारणे आहेत भेदभाव करायला.
पण आपण भेदभाव कमी करायचा प्रयत्न करत रहायचा. १०० वर्षापुर्वी भेदभाव १००% असेल आणि आता ५०% असेल तर ते पण यशच. समाज आणि समाजाची मानसिकता एका रात्रीत बदलत नाही.
आपण आपले विचार आचार योग्य ठेवणे, जिथे जिथे भेदभाव दिसत आहे तिथे शक्य त्या पद्धतीने विरोध करत राहणे, स्वतः कधी भेदभाव न करणे, स्वतः सोबत भेदभाव झाल्यावर शक्य तिथे विरोध करणे हे प्रत्येकाने करायला हवे.
,,आपण आपले विचार आचार योग्य
,,आपण आपले विचार आचार योग्य ठेवणे, जिथे जिथे भेदभाव दिसत आहे तिथे शक्य त्या पद्धतीने विरोध करत राहणे, स्वतः कधी भेदभाव न करणे, स्वतः सोबत भेदभाव झाल्यावर शक्य तिथे विरोध करणे हे प्रत्येकाने करायला हवे."
पूर्ण सहमती.
भेदभाव करण्याची मानसिकता लहान
भेदभाव करण्याची मानसिकता लहान लहान प्रसंगातून मनावर ठसली जाते.
कायदे करून ती नष्ट होणार नाही .
मनातून नष्ट झाली पाहिजे.
आरोपी ला जेरबंद करण्याची अमेरिकेतील पद्धत खूपच अमानवीय आहे.
पण जो आरोपी धोकादायक आहे पोलिस ना धोका पोचवू शकतो तेव्हा किती ही अमानवीय पद्धत असली तरी तिचा प्रयोग करण्या शिवाय पर्याय पण नाही.
जसा आरोपी ला जगण्याचा अधिकार आहे तसा पोलिस ला पण आहे.
स्व रक्षणाचा पोलिस चां अधिकार नाकारता येणार नाही.
पण आरोपी जर सहकार्य करत असेल तर
ती पद्धत अवलंबण्यात काहीच अर्थ नाही.
Race, caste, creed, religion,
Race, caste, creed, religion, gender, sexuality, region, economic status एक ना अनेक कारणे आहेत भेदभाव करायला.
हो
पण समाजात कोणा एकाचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे दोन तट पडतात.
आणि ह्या मध्ये सत्य हरवून जाते.
एकाच कोणाची बाजू सर्वांनी घेणे अपेक्षित आहे जी सत्य बाजू आहे.
धाग्याच्या विषयाबद्दल...
धाग्याच्या विषयाबद्दल...
हसन मिनाज (minhaj) चा Patriot act मधील The broken Policing system चा भाग पाहीला होता त्यामुळे Police Brutality/ assault वर अतिशय बेसिक का होईना काही कळलं होतं.
काल भरत यांनी टाकलेला व्हिडीओ पाहिला. Police Brutality/ assault तर सरळ दिसत आहे. एका निशस्त्र, बेड्या घातलेल्या माणसाला पोलिसांनी ज्या प्रकारे दाबून ठेवले होते ते अतिशय चूक होते. आता त्यात वर्णद्वेष होता की नाही हे कसे कळणार आणि कोर्टात तरी कसे सिद्ध करणार? पण ज्या पोलिसांनी त्याला तो "मला श्वास घेता येत नाही" असे म्हणत असताना आणि आजूबाजूला जमलेले लोक पण सांगत असताना अशा प्रकारे दाबून ठेवले त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन शिक्षा व्हायलाच हवी.
शिवाय ईतकी Police Brutality/ assault च्या केसेस असलेल्या ऑफिसर्सवर काही तरी अंकुश हवा. त्यांना पोलिस युनियन मुळे कामावरुन कमी करता येत नसेल तर त्यांना ऑफिस वर्क देणे किंवा दुसरे काम देणे शक्य असते का? अशी assault history असलेले सशस्त्र ऑफिसर्स फिल्ड ड्युटीवर घातक आहेत.
फ्लॉईडचा ज्या तर्हेने खून
फ्लॉईडचा ज्या तर्हेने खून केला गेला ते पाहून अस्वस्थ वाटत होते.त्यात परत तो भारतीय नव्हता मग काय फरक पडतो अशी विचारसरणी वाचून उद्वेग आला.
मुळात बेड्या घालायला पाठीवर
मुळात बेड्या घालायला पाठीवर दाब देऊन हात मागे ओढता येत असतील ना?तो दाब गळ्यावरच, माणूस गुदमरेल अश्या प्रकारे, इतर लोक सांगत असतानाही चालू ठेवणे यातून द्वेष किंवा काही आधीचे वैर किंवा डोक्याने स्टेबल नसणे अशी शक्यता दिसतेच.
जे सर्व चालू आहे ते संतापजनक आहे.
फारेण्ड , त्यांन मूळ
फारेण्ड , त्यांन मूळ घटनेबद्दल काहीही लिहिलेलं मला दिसलं नाही. >>> भरत - हो मलाही तसेच वाटले होते पण प्रत्येक पोस्ट वाचून तसे लिहीण्याइतका वेळ ( आणि इण्टरेस्ट
) नव्हता.
>>आपण आपले विचार आचार योग्य
>>आपण आपले विचार आचार योग्य ठेवणे, जिथे जिथे भेदभाव दिसत आहे तिथे शक्य त्या पद्धतीने विरोध करत राहणे, स्वतः कधी भेदभाव न करणे, स्वतः सोबत भेदभाव झाल्यावर शक्य तिथे विरोध करणे हे प्रत्येकाने करायला हवे
बरोब्बर लिहिलं आहे. इथे ज्यांना या घटनेला का विरोध करावासा हा प्रश्न पडलाय त्यांनी हे कुठलेही किंतु मनात न बाळगता शांतपणे वाचून पटलं तर पहा. मग ही चर्चा निदान आपण काय करू शकतो या मार्गावरही जाऊ शकते.
मुळात "त्यात काय झालं?" हा अॅटिट्युड काही लोकं दाखवताहेत तो फार दुर्दैवी आहे. जसं शिवाजी दुसर्ञांच्या घरात जन्माला यावा वाटतं ही ती मनोवृत्ती आहे ही. आज जॉर्ज आहे उद्या कुणीही असू शकतो आणि तो आपला मुलगाही असू शकतो असा विचार करून पाहिला तरी अंगावर काटा येईल. तो असू शकेल का वगैरे पुढचा भाग झाला.
मी मागे एका रेस्टॉ. ओनरसोबत बोलत होते कशावरुन तर मला ते म्हणाले की मला काही कारणासाठी पोलिस बोलवावा लागला आणि मी किंवा माझ्या बायकोने फोन केला तर पोलिस तासंतास येत नाहीत. पण माझ्या मुलाने फोन केला (तो अमेरिकन इंग्लिशमध्ये बोलतो) तर मात्र लगेच पोलिस येतात. आम्ही कंप्लेंट केली तर ते ढीम दाद देत नाहीत पण एकदा एका अमेरिकेन (गोरा असेल काळा असेल भारतीय तर नक्कीच नव्हता) कस्टमरने कंप्लेट केली तर रेस्तॉ. मध्ये तर कॉप आलेच पण घरीसुद्धा अलमोस्ट त्त्याच वेळेला कॉप पाठवुन मुलाने दार उघडलं तर काहि प्रश्न विचारुन गेले, ज्याची त्या उल्लेखलेल्या प्रसंगात गरजही नव्हती. हे प्रोटोकॉलमध्ये बसणारं नव्हतं. मी यापेक्षा घटनेचे डिटेल्स देणं उचित समजत नाही. हे फक्त एक उदा. आहे. हे भारतीय ओनर्स आहेत आणि निदान दहाएक वर्षे त्यांची रेस्तॉ. इंडस्ट्रीमध्ये कामं चालतात. कॉप्स त्यांना जी वागणूक देताहेत याला रेसिझम म्हणतात असं मलातरी वाटतं. त्यांना हे असं ट्रेनिंग नक्कीच देत नसतील की मालक भारतीय रेसचा आहे तर असं वागा आणि अमेरिकन रेसचा असेल तर तसं..ही तशी जुनी घटना आहे. अर्थात म्हणून ते ओनर्स काही त्यांच्या मुलांना तुम्ही पण खुन्नस ठेऊन वागा हे शिकवत नाहीत. पण पुढचं पाऊल तुमचं आयुष्य धोक्यात येणार असेल तर ही मनोवृत्ती बदलण्यासाठी अशा प्रकारची निदर्शनं होणं आवश्यक आहे. म्हणजे कुठच्याही रेसच्या पालकांना त्यांच्या पुढच्या पिढीची ती काळजी करायची गरज राहिली नाही पाहिजे. सिस्टिम नीड्स टु बि चेंज्ड आणि मनोवृत्ती बदलल्या पाहिजेत त्यासाठी ही निदर्शनं आवश्यक आहेत. इथे दुर्दैवाने समाजकंटक (किंवा करोनामुळे असेल कामं गेलेल फ्रस्टेटेड लोकंही असतील) मध्ये आल्यामुळे जी लुटालुट झाली त्याचं कुणीही समर्थकांनी समर्थन केलं नाही.
मला तर असं वाटतं त्यासाठी हीच घटना उलट म्हणजे अश्वेत जॉर्ज विरुद्ध श्वेत पोलिस घडली असती तरीही मी निषेधच केला असता. दुर्दैवाने श्वेतव्य्क्तींवर असे हल्ले जास्त होताहेत म्हणून इथे ते तसं मांडलं गेलंय. याला राजकीय रंग द्यायची काहीच गरज नाही. कुठच्याही रंगाच्या लिडरशीपने काही बदल केले नाहीत असं सकृतदर्शनी वाटत. त्यांनी प्रयत्न केलेत का आणि त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश आलं म्हणजे एखादा कायदा बदल असं काही झालं आहे का, हे जाणून घ्यायला आवडेल पण लीडरशीपने अशा प्रसंगात आपले राजकीय stands बाजुला ठेऊन आपण बळाचं की शांत निदर्शनांचं समर्थन करतो हा संदेश स्पष्ट करावा लागतो. दुर्दैवाने इथे बळाचं समर्थन होताना दिसलं तर अशा राजकारण्यांना पाठिंबा देता येणार नाही. जर राजकारण मध्ये आणायचंच असेल तर.
अनेक ठिकाणी शाळा/कामाच्या जागा अशा ठिकाणी आम्ही रेसिझमला सपोर्ट करत नाही हे संदेश गेले ते या कारणासाठी. त्या त्या जागेच्या लीडर्सनी आम्ही रेसिस्ट नाही (किंवा असाल तर हो) हे सांगणं जरूरीचं आहे. तुम्ही घटनेचा निवाडा करत नाहीच आहात. तुम्ही फक्त तुमचा in general stand clear करता आहात. जेव्हा सगळीकडून काहीतरी रेसिस्ट सुरु आहे असा आवाज होतो तेव्हा हे क्लियर करणं आवश्यक आहे. म्हणून शाळा, वेगवेगळे गव्हर्नर्स त्या लोकल लीडर्सनी आपापल्या लोकांना ही हाक दिली आणि आपला stand clear केला त्यात काहीच गैर नाही आहे. शेवटी केस न्यायालयात जाईल. पण म्हणून आम्ही रेसिस्ट नाही हे आता म्हणणं चुकीचं कसं ठरेल. रेसिझम असतो/आहे हे मान्य केलं की मग जी लोकं नाही म्हणतात त्याचं म्हणणं आपोआप क्लियर होईल.
Othering नावाची एक संकल्पना
Othering नावाची एक संकल्पना समाजशास्त्रात आहे. समाजाच्या एका घटकाचे पद्धतशीरपणे Othering करून त्यांना dehumanize केले की मग त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे काहीच वाटेनासे होते. ज्यू लोक अव्वाच्या सव्व व्याज आकारून श्रीमंत होतात, बहुसंख्या काळ्या लोकांच्या घरात बाप नसतात, अशी मिथकेही Othering च्या समर्थनार्थ पसरवली जातात. एखाद्या घटकाचे असे Othering झाले की मग पोलीस, न्याय यंत्रणा वगैरे सारेच भेदभाव करू लागतात. सवयच होते. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झालाच तर त्या व्यक्तीचेच काही चुकले असेल असे मानले जाते.
भारतात मुस्लीम, दलित व इतर वंचितांचेही असेच Othering होते. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे सफूरा झरगर. सी ए ए विरोधी आंदोलनात भाग घेतलेली जे एन यू ची ही विद्यार्थिनी गरोदर आहे (अर्थात ती अविवाहित आहे अशा अफवा राईट विंग कडून पसरवल्या गेल्या, नो सरप्रायजेस देअर).
कोणत्याही हिंसेत तिचा सहभाग असल्याचा पुरावा नसतानाही तिला UAPA सारख्या भयानक कायद्याने अटक झाली. गेले कित्येक आठवडे ती तुरुंगात आहे. भारतात बहुतेक सर्व तुरुंग खचाखच भरले आहेत व त्यात कोरोना चा शिरकाव झाला आहे. तिथे कोणाचेही रहाणे धोक्याचे आहे, गरोदर महिलेचे तर जास्तच. त्यामुळे बर्याच कैद्यांना सोडले आहे, अगदी जेसिका लाल च्या खुन्यालाही. दिल्ली दंगलीत बंदुका पुरवण्याच्या संशयावरून अटक झालेल्या माणसालाही. एका विद्यापीठात शिकत असताना दुसर्या विद्यापीठात जाऊन मुलांना मारहाण करणार्या मुलीला तर अटकही झाली नाही. जेन एन यू आंदोलकांवर पिस्तूल झाडणाराही बेल वर आहे.
पण सफूराचा बेल नाकारण्यत आला.
अनेक ठिकाणी शाळा/कामाच्या
अनेक ठिकाणी शाळा/कामाच्या जागा अशा ठिकाणी आम्ही रेसिझमला सपोर्ट करत नाही हे संदेश गेले ते या कारणासाठी. त्या त्या जागेच्या लीडर्सनी आम्ही रेसिस्ट नाही (किंवा असाल तर हो) हे सांगणं जरूरीचं आहे. तुम्ही घटनेचा निवाडा करत नाहीच आहात. तुम्ही फक्त तुमचा in general stand clear करता आहात. > you nailed it. हे मला मांडता येत नव्हता. आमच्या क्लायेंट लीडशीपकडुन मेल व्हेंडरला सुध्द्दा गेल्या तेव्हा मस्त वाटले. उद्या सरकार काही तरी कारवाइ करेल,इनकम टॅक्स चे छापे पडतील ही भीती कुठे दिसली नाही,कदाचित हीच खर्या अर्थाने मुरलेली लोकशाही असावी.नो वंडर जगभरातले लोक या देशाचे नागरीकत्व घ्यायला तडफडत असतात.
I am not really aware of
I am not really aware of police recism but have seen kids saying browny to Indian kids in California.....and somehow my impression is that Indian tells their children to ignore it....I havent stayed long in USA but this is an impression.......
For me the scary racism is something that has shown in amazing movie called 'Green book'.....
>>>>>समाजाच्या एका घटकाचे
>>>>>समाजाच्या एका घटकाचे पद्धतशीरपणे Othering करून त्यांना dehumanize केले की मग त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे काहीच वाटेनासे होते. >>>>>> किती खरे आहे.
उत्तम पोस्ट
उत्तम पोस्ट
>>>समाजाच्या एका घटकाचे
>>>समाजाच्या एका घटकाचे पद्धतशीरपणे Othering करून त्यांना dehumanize केले की मग त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे काहीच वाटेनासे होते
ही सर्व वाक्य भेदभावाची मुळ कशी तयार होतात हे दर्शवित आहे त.
पण हे सर्व ठरवून कोण करते .
समाजातील कोणता घटक समजतील कोणत्या घटकाला वेगळे पाडतो.
का वेगळे पाडतो.
त्याच्या स्टेप्स कोणत्या आहेत.
वेका, "मला तर असं वाटतं ..."
वेका, "मला तर असं वाटतं ..." या शब्दांनी सुरू होणाऱ्या परिच्छेदान श्वेत, अश्वेत यांत गडबड झाली आहे.
_----------
अमेरिकेत मूळ भारतीय लोकांनाही वर्णद्वेषाचा धोका आहे , म्हणून आता या प्रकरणात बोलतोय, असं म्हणणं म्हणजे भारतीयांना त्रास नसता , तर बोललो नसतो , असं आहे का ? हे तपासून पहा.
Othering नावाची एक संकल्पना
Othering नावाची एक संकल्पना समाजशास्त्रात आहे. समाजाच्या एका घटकाचे पद्धतशीरपणे Othering करून त्यांना dehumanize केले की मग त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे काहीच वाटेनासे होते. ज्यू लोक अव्वाच्या सव्व व्याज आकारून श्रीमंत होतात, बहुसंख्या काळ्या लोकांच्या घरात बाप नसतात, अशी मिथकेही Othering च्या समर्थनार्थ पसरवली जातात. एखाद्या घटकाचे असे Othering झाले की मग पोलीस, न्याय यंत्रणा वगैरे सारेच भेदभाव करू लागतात. सवयच होते. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झालाच तर त्या व्यक्तीचेच काही चुकले असेल असे मानले जाते.>>>>>>
कित्येक ऊदाहरणे डोळ्यासमोर आली. सविस्तर वाचून पाहतो.
आर्थिक स्वार्थ, सत्ता लालसा
आर्थिक स्वार्थ, सत्ता लालसा या पोटी केला जाणारा छळ, हिंसा यावर पांघरुण घालण्यासठी असे dehumanize केले जाते. जे वर्तन नैतिक दृष्ट्या चुकीचे आहे ते योग्यच आहे हे दाखवण्यासाठी व्यक्तीचे/ समुहाचे माणूसपण नाकारले जाते. एखादी निगेटिव गोष्ट त्या व्यक्तीला/समुहाला चिटकटवून त्यांना मिळणारी वागणूक कशी योग्यच आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असतो. या जोडीला विक्टिम ब्लेमिंग, कायद्यामधल्या त्रुटी याचीही मदत घेतली जाते. पुरेसे पाठबळ मिळाले की नैतिक दृष्ट्या अयोग्य कायदे करुन या भेदभावाचे समर्थन करणे अधिकृतपणे सुरु होते.
एक सुचना, तुमचे विचार फक्त
एक सुचना, तुमचे विचार फक्त मायबोली पुरते न ठेवता, तुमच्या स्थानीक लोकप्रतिनीधींना कळवा... स्टेट हाऊस रेपरेझेंटेटीव, स्टेट सिनेटर, युएस हाऊस रेपरेझेंटेटीव, युएस सिनेटर यांच्या ऑफीस ला फोन करुन तुमची मतं नोंदवा. त्यांच्या स्टाफ्ला येणार्या फोन कॉलचा डेटा ठेवावा लागतो. एखाद्या बिलाचा नंबर माहिती असेल तर अजून उत्तम. त्या बिलाला हो किंवा नाही मत द्यायची विनंती करा. येणार्या फोन कॉल्स्च्या संख्येनुसार ते मतं बदलतात.
बाकी चर्चा चालू द्या...
Pages