वर्णद्वेष आणि पोलिसांकडून होणारी हिंसा

Submitted by maitreyee on 2 June, 2020 - 11:02

अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्‍या जाणार्‍या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्‍या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.

**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.

Group content visibility: 
Use group defaults

आधीची चर्चा :
रच्याकने, अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या वंश/वर्णभेदविरोधी चळवळी/ riots संदर्भात एखादा धागा आहे का?
Submitted by वत्सला on 1 June, 2020 - 10:04

ओह, मी अमेरिकेतील वंशभेदाची काही बातमी वाचली नाही. वंशभेद म्हटलं तर आधी ऑस्ट्रेलिया आठवते दुर्दैवाने! काय माहीत का?
Submitted by राजसी on 1 June, 2020 - 07:54

राजसी, ऑस्ट्रेलीयालादेखील येथील मूळ रहिवास्यांच्या कत्तलीचा काळा इतिहास आहे. त्यावर इथल्या सरकारने बरच काम केलं आहे आणि करत आहेत. मध्यंतरी भारतातील मीडियाने भारतीय लोकांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल वस्तुस्थिती जाणून न घेता रंजकपणे बातम्या पसरवल्या होत्या. याशिवाय तुम्हाला काही अधिक माहिती आहे का? तुमचा काही खास अनुभव आहे का
अमेरिकेत सध्या सुरु असलेल्या हिसाचाराबद्दल गुगल करून बघा.
Submitted by वत्सला on 1 June, 2020 - 10:06

>>मध्यंतरी भारतातील मीडियाने भारतीय लोकांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल वस्तुस्थिती जाणून न घेता रंजकपणे बातम्या पसरवल्या होत्या. <<
यावर वाचायला आवडेल. नविन धागा काढा, प्लिज...
Submitted by राज on 1 June, 2020 - 11:37

ऑस्ट्रेलीयालादेखील येथील मूळ रहिवास्यांच्या कत्तलीचा काळा इतिहास आहे. --- हो. Rabbit fence नावाचा भयानक सिनेमा बघितला होता Sad बाकी कधी फिरायला गेलो तर म्हणून माहिती गोळा करायची सवय आहे मग त्यानिमित्ताने इतिहास वाचन होतं. कित्येक वर्षांपूर्वी Andrew Symonds वेगळा का दिसतो इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंपेक्षा असा प्रश्न पडला होताच.

भारतातील मीडियाने भारतीय लोकांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल वस्तुस्थिती जाणून न घेता रंजकपणे बातम्या पसरवल्या होत्या --- त्या बातम्या आणि स्पेसिफिक लक्षात नाही पण त्यादरम्यान मनांत एक प्रतिमा तयार झाली असावी.
इथे सगळीकडे फिरलेले भेटत असतात त्यामुळे त्यांची मत पण फॅक्टर आहे.
अमेरिकेत सध्या सुरु असलेल्या हिसाचाराबद्दल गुगल करून बघा. --ओके. (सध्या बातम्या बंद Sad )

Submitted by राजसी on 1 June, 2020 - 11:51
>>अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या वंश/वर्णभेदविरोधी चळवळी/ riots संदर्भात एखादा धागा आहे का?<<
सध्या वादग्रस्त असलेला टॉपिक पुलिस ब्रुटॅलिटि हा आहे; त्याला वर्णद्वेशाचा कंगोरा असण्याची शक्यता हि नाकारता येणार नाहि. परंतु मूळात असे प्रकार वारंवार का घडतात याला कारण वर्णद्वेश नसुन अमेरिकेतला सोश्यो-पोलिटिकल सेटप हा आहे. विषय खुप गुंतागुंतीचा आणि तितकाच सेंसिटिव असल्याने सगळे पोलिटिशियन (अपवाद ट्रंप, Wink ) पोलिटिकली करेक्ट बोलत/वागत असतात. थोडक्यात, हा इशु सहजा-सहजी मिटणारा नाहि...
Submitted by राज on 1 June, 2020 - 12:15

>>त्याला वर्णद्वेशाचा कंगोरा असण्याची शक्यता हि नाकारता येणार नाहि. >> हलकटपणाची हद्द आहे. तुमच्याशी काहीही बोलण्यात अर्थ नाही. बरे व्हा! बाय!
Submitted by अमितव on 1 June, 2020 - 14:36

अमित +१
मलाही धक्का बसला ती पोस्ट वाचून.
एरवी राजकारणाबाबतचे मतभेद समजू शकतात, पण here I am disappointed in you, राज.
Submitted by स्वाती_आंबोळे on 1 June, 2020 - 14:59

Seriously!!!!
Submitted by अंजली on 1 June, 2020 - 15:17

Submitted by राज on 1 June, 2020 - 12:15
>> या पोस्ट्स बाबत मी निषेध नोंदवत आहे.
पोलिस ब्रुटालिटी जेव्हा वारंवार विशिष्ठ वंशाच्या लोकांच्याच वाट्याला येत रहाते तेव्हा त्यात उघड उघड वर्णद्वेश असतो. देव करो आणि असा वर्णद्वेश कधी तुमच्या वाटयाला न येवो.
Submitted by स्वाती२ on 1 June, 2020 - 16:39

>>मलाही धक्का बसला ती पोस्ट वाचून.<<
ओके. तो सगळा प्रसंग वर्णद्वेशातुन उद्बवला असं तुमचं मत आहे का? कारण, तेच ध्वनीत होतंय तुमच्या प्रतिसादावरुन. माझं तसं मत नाहि. इट्स ए केस ऑफ पुलिस ब्रुटॅलिटि "एकेए" एक्सेसिव फोर्स. आता त्यात वर्णद्वेश आणतंच आहात तर त्या चौघांपैकि एक एशियन आहे; त्यातल्या दोघांची पास्ट हिस्टरी आहे पुलिस ब्रुटॅलिटिची. हाउ डु यु एक्स्प्लेन दॅट? झालं ते अतिशय चूक याबाबत दूमत अजिबात नाहि, आणि गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी. पण त्या घटनेला वर्णद्वेशाचा रंग देणं मला तरी पटत नाहि. हा गेल्या तीन वर्षांचा पुलिस ब्रुटॅलिटि डेटा, तुमच्या माहिती करता...
सो, मला आता आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलंच आहे, तर बर्डन ऑफ प्रुफ लाइज ऑन यु स्वाती_आंबोळे. हि घटना वर्णद्वेशातुनंच कशी ट्रांस्पायर झाली हे जरा एक्स्प्लेन करा. लागल्यास अंजलींची हि मदत घ्या...
Submitted by राज on 1 June, 2020 - 17:19
>> देव करो आणि असा वर्णद्वेश कधी तुमच्या वाटयाला न येवो.
नवीन Submitted by स्वाती२ on 1 June, 2020 - 16:39<<
धिस इज दि मोस्ट पथेटिक अँड डिज्गस्टिंग कामेंट एव्हर.. गॉड ब्लेस यु, स्वाती२...
Submitted by राज on 1 June, 2020 - 17:24

माझ्या मताने काही फरक पडेल वाटत नाही तरीपण मलादेखील हे पोलीस ब्रुटॅलिटी आहे असे वाटते. त्याला वर्णद्वेषाचा रंग देऊन उगाचच केऑस घडवला जात आहे .
Submitted by कटप्पा on 1 June, 2020 - 17:53

राज की बात Proud
Submitted by Filmy on 1 June, 2020 - 18:36

राज, त्या साईटच्या graph वर एक महत्वाचा factor दाखविलेला नाहीये. The total population for that particular race in the US. हे पण त्या graph मध्ये हवंय तरंच पूर्ण चित्र कळायला मदत होईल.
Submitted by anudon on 1 June, 2020 - 18:37

शिवाय हकनाक मारले गेलेले आणि वीस डॉलर साठी/नुसता संशय आला पण प्रत्यक्षात खिशात बंदूक काय चाकू पण नाही अशा किती केसेस विरुद्ध पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवायसाठी बंदूक चालवली असेल तर ते विश्लेषण पण हवं. (मला स्वतःला अजूनही कमरेखाली गोळी मारणे बगैरे पर्याय असायला हवे असं किती वाटलं तरी हा देश फर्स्ट अमेंडमेंट वाल्यांचा आहे आणि त्यांना हे कसं शिकवतात हे माहित नाही पण तेही बाजुला ठेऊयात. Sad )
हा विषय निव्वळ रेसिझमसाठी नसावा असं तात्पुरतं जरी मान्य केले तरी वर्षानुवर्षे अशा घटना होत राहतात आणि कुणीच याचं रुट कॉज आणि रिलेटेड ट्रेनिंग यावर काम करत नाही याचा उद्वेग नाही का? इतर वेळी सगळ्या प्रोटोकॉल/ प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे फंडे उगाळून प्यालेल्या देशात हा पोलिसांना त्यांच्या अधिकाराच्या जबाबदारीची जाणीव न करू द्यायचा निष्काळजीपणा कसा काय चालतो आणि किती वर्षे चालू द्यायचा.
Sad
Submitted by वेका on 1 June, 2020 - 18:59

कुठल्याही अर्थाने पोलिस ब्रुटालिटी म्हणता येणार नाही. त्याने जो काही गुन्हा केला होता, किंवा पुढे काही करायची शक्यता होती त्या कामापासून त्याला परावृत्त करण्यासाठी जे किमान आवश्यक बळ होते त्यापेक्षा थोडे जास्तच बळ वापरले असे व्हिडिओ बघितल्यावर आणि तब्बल ९ मिनिटे गळा दाबल्यावर नाही म्हणता येत.

अनेक मिनिटे त्याच्या मानगुटीवर बसण्याचा उद्देश कायदेशीर हेतू साध्य करणे हा होता का ? नक्कीच नाही.
सोबत अनेक पोलिस मदतीला होते, पकडलेला आरोपी काहीच प्रतिकार करत नव्हता, निशस्त्र होता... आय कॅनॉट ब्रिद म्हटल्यावरही अनेक मिनिटे त्याला मोकळे सोडले नाही... Sad
Submitted by उदय on 1 June, 2020 - 21:10

राज, तुम्ही फार लिमिटेड डेटासेट दिला आहे. You must also look at the frequency of how many times African Americans are pulled over by the police, followed by the security at places like malls, arrested without evidence etc. The police behavior track records show very much biased behavior. I am sure that surveys with statistical data that support the assumption exist already. So there is an inherent bias that exists and such homicides are just tip of the iceberg. So don't look at it as a single case.
जसे आपल्याकडे पारधी समाजाच्या बाबतीत होते त्या स्वरूपाचा प्रश्न आहे हा. तेव्हा ही घटना वर्णद्वेषाची आहे हे उघड आहे. जर एरवी पोलिस विनाकारण आफ्रिकन अमेरिकन लोकांना दुजाभावाने आणि संशयाने वागवत नसते तर एवढे प्रोटेस्ट्स झाले नसते.
Submitted by जिज्ञासा on 1 June, 2020 - 21:51

अमेरिकेत कोरोना ग्रस्तांची संख्या १९ लाखाच्या जवळ पोहोचली आहे... हजारो लोक निषेध मोर्चात सामिल होत आहेत, अशावेळी सोशल डिस्टंसिंग पाळणे अशक्यच आहे. नजिकच्या काळात याचे गंभिर दुष्परिणाम दिसतील. Sad
(गोर्‍यांच्या तुलनेने ) काळ्या लोकांमधे कोरोनाचे प्रमाण ३ ते ४ पटीने जास्त आहे.
Submitted by उदय on 2 June, 2020 - 00:25

>> हे पण त्या graph मध्ये हवंय तरंच पूर्ण चित्र कळायला मदत होईल.<<
तुमचा मुद्दा कळला, फेर इनफ. कंन्क्लुझिव डेटा अनॅलिसिस करायचंच असेल तर संपुर्ण पॉप्युलेशनच्या डेटा ऐवजी फक्त क्रिमिनल डेटा विचारात घ्यायला हवा. गुन्हा घडल्याशिवाय पुलिस येत नाहि, अणि पुलिस असल्याशिवाय पुलिस ब्रुटॅलिटि होत नाहि. होप यु गेट माय पॉइंट...
हा अ‍ॅप्रोच घेतला तर ब्रुटॅलिटि रेट (विथ रिस्पेक्ट टु क्राइम रेट), आफ्रिकन अमेरिकन्सचा ०.०१० येतो आणि व्हाइट अमेरिकन्स्चा ०.००८ येतो. आता या ०.००२ च्या फरकावरुन तुम्ही वर्णद्वेशाचा निष्कर्ष काढाल का?..

त.टि.:
१. डेटा २०१७ चा आहे, जो रेडिली सापडला.
२. व्हाइट अमेरिकन्स ब्रुटॅलिटि = व्हाइट्स किल्ड / व्हाइट्स क्रिमिनल्स * १०० --> ४५७ / ५६२६१४० * १०० = ०.००८
३. आफ्रिकन अमेरिकन ब्रुटॅलिटि = आअ किल्ड / आअ क्रिमिनल्स * १०० --> २२३ / २२२१६९७ * १०० = ०.०१०
४. ब्रुटॅलिटि रेटचा डेटा सोर्स
५. क्रिमिनल रेटचा डेटा सोर्स
Submitted by राज on 2 June, 2020 - 09:20

>>राज, तुम्ही फार लिमिटेड डेटासेट दिला आहे.<<
वरच्या प्रतिसादात तुम्हाला उत्तर सपडलं असेल अशी आशा करतो...
उदयशेठ, तुमचा मुद्दा कळला नाहि. पुलिस ब्रुटॅलिटी हि ब्रुटॅलिटीच असते. त्यात टि शर्ट साइझ नसतो...
Submitted by राज on 2 June, 2020 - 09:25

एकुणात अमेरिकेत वर्णद्वेष भयंकर आहे तर! माझा असा (गैर)समज होता की अमेरिकेत कोणत्याही वर्ण/वंशाचे लोक मजेत एकत्र रहातात. आ अ हे इतर देशातील आ migrants पेक्षा खुप पुढारलेले, चांगल्या हुद्द्यावर काम करणारे आहेत... ओबामा प्रेसिडेंट असतानाही हे सगळे असेच अत्याचार होत होते का? ट्रम्प कारभाराबद्दल खुप माहिती नाही पण एकूण फार काही आशादायक वाटत नाही ते नेतृत्व...
ही धक्कादायक माहिती आहे माझ्यासाठी. आज बघितलेल्या दंगलीच्या बातम्या तर खुपच भयंकर होत्या...
Submitted by वत्सला on 2 June, 2020 - 09:33

वत्सला तुमच्यासाठी ही लिंक. आणखी नेटवर शोधल्यास उत्तर /विडिओ सापडतील. जमल्यास बिकमिंग हे मिशेल ओबामाचं पुस्तक वाचा. काही संदर्भ आहेत. प्रे. ओबामाचा उल्लेख आला म्हणून हा संदर्भ देतेय. गैरसमज नसावा
https://www.nytimes.com/2020/05/30/us/politics/george-floyd-trump-obama-...
Submitted by वेका on 2 June, 2020 - 10:21

https://twitter.com/ericabuddington/status/1266531249914601472
This #thread is for those of you struggling to comprehend that the recent murders are just a fraction of racial violence in the United States We are protesting for #GeorgeFloyd #BreonnaTaylor, #AhmaudArbery AND hundreds of years of oppression.
Let's begin your history lesson.
Submitted by भरत. on 2 June, 2020 - 10:29

>>>>बिकमिंग हे मिशेल ओबामाचं पुस्तक वाचा. >>>> माझ्याही 'टु रीड' यादीत आहे हे पुस्तक. वरचा लेख माहीतीपूर्ण दिसतोय. वाचते वेळ मिळाला की. दुव्याकरता धन्यवाद. काही लोकं निव्वळ आकसातून 'शूटिंग फ्रॉम हिप' करताना दिसतात. वेस्ट ऑफ टाइम. त्यापेक्षा अशा लिंका शेअर कराव्यात. जेणेकरुन काहीतरी भरीव मिळतं सदस्यांना.
Submitted by सामो on 2 June, 2020 - 10:30

वाईट वाटलं ही बातमी वाचून
पोलिसाची मानसिक स्थिती किंवा काही पूर्व ग्रज मुळे प्रकार केला का तपासायला हवं
रेसिस्ट द्वेषापायी कोणत्याही डिफेन्स ची संधी न देता मारून टाकणं अत्यंत निराशाजनक आहे.पोलिसाचं लग्न मोडलं.त्याला जास्तीत जास्त शिक्षाही व्हावी.

स्वतंत्र धागा काढलास ते बरं झालं.

आणखी बातम्या किंवा स्टॅटिस्टिक्स देत नाही, कारण नुसते आकडे पाहून त्यातली भयावहता जाणवतेच असं नाही - पण ही परवा एका माबोमैत्रिणीने शेअर केलेली क्लिप इथे देते आहे : द टॉक

मला ही क्लिप पाहताना आमच्या पूर्वीच्या घराचं रिनोव्हेशन करणार्‍या कॉन्ट्रॅक्टर बिलची आठवण झाली होती. तो म्हणाला होता आम्ही अफ्रिकन अमेरिकन्स मुलांना पिठीसाखर पेरलेले डोनट्ससुद्धा घेऊन द्यायला बिचकतो. कृष्णवर्णीय व्यक्तीच्या कारमध्ये कुठे पांढरी पावडर सांडलेली दिसली की पोलीस ते ड्र्ग्जच आहेत असंच प्रथम गृहित धरतात. वी आर गिल्टी अनलेस - अ‍ॅन्ड समटाइम्स ईव्हन आफ्टर - प्रूव्हन अदरवाइज!
हे न्यू जर्सीमध्ये! मग बाकी ठिकाणी काय होत असेल!

'गुन्हा झाला तरच पोलीस येतात आणि पोलीस आले तरच ब्रूटालिटी होऊ शकते' असं समजणार्‍यांना ही बाजू दिसत असेल का?

मी पूर्वी वाचलेललेकी - कृष्णवर्णिय लोक हे दुकानात पैसे दिल्यानंतर, पावती घेतातच कारण त्यांना हटकले जातेच जाते. आपण कसे क्वचित पावती घेतही नाही. ते लोक तसे करत नाहीत. बापरे तेव्हापासून मीही पावती हटकून घ्यायलाच लागले.

मलाही असंच वाटतं की वर्णद्वेष वगैरे काही नाही त्या घटनेत. पोलीस brutality च आहे. असं बिचाऱ्या गोऱ्या लोकांबरोबर जास्त होतं. काळे लोक एखादं काही कारण शोधत असतात दंगल करायला. पण आता बघितलं का कसं सगळ्यांना सरळ केलं फोर्स वापरून. When the looting starts, the shooting starts.
शिवाय आपण भारतीय आहोत. आपल्याला काय देणं घेणं आहे?
असो. आता वेळ नाहीये, ट्रम्पजींच्या फोटोची दृष्ट काढायची आहे. शिवाय बंकरमध्ये उतरून जरा साफसफाई, कोरडे स्नॅक्स भरून ठेवायचेत. वेळ काय सांगून येत नाही.

(ब्लॅक) मुलांना किती लहानपणा पासून पोलिसांशी कसं वागायचं याची पालकांना चर्चा करावी लागते वाचलं आणि फार वाईट वाटलं. अगदी तसंच, जेव्हा माझा तीन वर्षाचा मुलगा अमेरिकेत प्रिस्कूल मध्ये अ‍ॅक्टिव्ह शूटर ड्रिल झाल्यावर मला समजावत होता तेव्हा वाटलेलं. Sad पहिल्याकेस मध्ये मला प्रिव्हलेज्ड असल्याचं (वाईट) फिलींग ही आलं.

काल इकडी सीबीसी वर सँटा क्रूझ, सीए मधल्या पुलिस चीफची मुलाखत ऐकली. फार चांगलं आणि स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांत बोलला. त्याचं ट्रानस्किप्ट शोधुन टाकतो.
ट्रान्सस्क्रिप्ट नाही मिळालं पण इंटरव्हू इकडे ऐकता येईल. https://www.cbc.ca/radio/asithappens/as-it-happens-monday-edition-1.5593101
लिसन टू फुल एपिसोडला क्लिक करुन २६.५५ मिनिटापासून पुढे ऐका.

बर्‍याच ठिकाणी पोलिसही निदर्शकांबरोबर रस्त्यावर उतरुन प्रार्थनेत, 'keel down' मध्ये सहभागी होताहेत अशी बातमी आहे.

राज ला When the looting starts, the shooting starts. मागचा संदर्भ माहिती असेल अशी आशा धरूया.

'गुन्हा झाला तरच पोलीस येतात आणि पोलीस आले तरच ब्रूटालिटी होऊ शकते' हे अत्यंत अज्ञानमूलक ( खरे तर खोडसाळ) विधान आहे. खालील केसेस पहा.
एक कृष्णवर्णीय माणूस आपल्याच फ्लॅट मध्ये आरामात आईसक्रीम खात बसला आहे. त्याच इमारतीत रहाणारी पोलिस महिला आपली ड्यूटी संपवून परत येते. लिफ्ट मधून चुकून वेगळ्या मजल्यावर उतरते. हा कोण आपल्या घरात घुसला आहे असे समजून दोन गोळ्या झाडते. कृष्णवर्णीय माणूस मरतो.
एक कृष्णवर्णीय माणूस एका महिले सोबत कार मध्ये जात आहे. पोलिस त्याला थांबवतात. माझ्याकडे ग्लोव्ह कंपार्तामेंट मध्ये लायसेन्स वाले पिस्तूल आहे असे तो सांगतो. पोलिस तात्काळ गोळी घालून मारतात. हा सर्व प्रकार ती महिला फोन वर शूट करते.

डेव्ह चॅपेल चे व्हिडिओ पहा !

हा प्रकार झाला तो भाग माझ्या पूर्वीच्या कामाच्या ठिकाणापासून फार लांब नाही. एके काळी मी कारपूल करत असे तेव्हा शिकागो आणि 38thच्या जवळच मीटिंग पॉईंट होता. तेव्हा ही घटना अजून जवळ झाल्यासारखी वाटली.

मिनेसोटासारख्या राज्यात जिथे 3.5%हून कमी आफ्रिकन अमेरिकन राहतात तिथे एव्हड्या मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली व त्यात सर्व वंशीय सहभागी झाले ही स्वागतार्ह बाब आहे.

दंगली झाल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया ही आता ट्रम्प समर्थकांच्या हाती कोलीत अशीच होती. ट्रेवर नोवाने अतिशय सुंदर स्पष्टीकरण दिले आहे या दंगलीच्या मागचे. सर्वांनी आवर्जून तो व्हिडीओ बघावा.

https://youtu.be/v4amCfVbA_c

वंशद्वेष वाईट आहे ह्यात शंकाच नाही. पण प्रत्येक वेळी काळ्या माणसाला गोर्‍या पोलिसाने अटक केली तर तो वर्णद्वेष असतोच असे गृहित धरणेही चूक.
काळे लोक काळ्या लोकांना मारतात त्याचे काय? शिकागो, ओकलंड, डेट्रॉईट इथे काळ्या लोकांच्या गँग आहेत ते शेकडो लोक दरवर्षी मारत असतात. बहुसंख्य काळ्या लोकांत शिक्षणाचा अभाव असतो. कुटुंबात बाप बर्‍याचदा नसतो. त्यामुळे सिंगल पेरंट (बहुधा फक्त आई) कुटुंब चालवत असते. त्यामुळे गरीबी, दुर्लक्ष हे पाचवीला पुजलेले असते.
आठ वर्षे काळ्या ओबामाने राष्ट्रपतीपद भूषवले. त्याने ही परिस्थिती बदलायला काय निर्णय घेतले? ट्रंप अर्थातच एक वर्णद्वेष्टा वगैरे आहे. त्यामुळे तो काही काही करणार नाही. पण मग जिथे काळे लोक बहुसंख्य आहेत त्या कॅलिफोर्निया, इलिनॉय, न्यू यॉर्क आणि अन्य राज्यात काळे लोक का नाडलेले आहेत? ज्यांच्या हृदयात काळ्या लोकांविषयी अपार कणव आहे ते डेमॉक्रॅटिक नेते ह्या अशा गरीबीत खितपत पडलेल्या काळ्या लोकांच्या उत्थानाकरता दिवसरात्र काय प्रयत्न करत आहेत?

आणि, असे काही फ्लॉईड प्रकरण घडले की लगेच तिथे व हजारो मैल दूर अनेक शहरात वॉलमार्ट, बेस्ट बाय, टारगेट आणि अन्य महागडी दुकाने फोडून ती लुटण्यामागे काय कारण? गोरे लोक वर्णद्वेष्टे आहेत म्हणून अशा घटनांना काळ्यांनी मागितलेला न्याय असे बघायचे का?

राज, तुम्ही दिलेल्या डेटावरून एवढेच कळते की कृष्णवर्णीय लोक हे श्वेतवर्णीय लोकांइतकेच पोलिस चकमकीत मारले जातात. आता यात हे गृहीत धरले आहे की जे लोक मारले गेले ते खरोखरच गुन्हेगार होते. Your data only give the number of criminals rightfully (?) arrested or killed for the crimes they committed.
We should rather look for data where police arrested/interrogated the person on mere suspicion and could never prove the charges. That will tell the real picture.
Number of people killed by the police can't be a measure of brutality! When the police do their job, it's not brutality. I think your understanding of brutality needs to be changed.

काळे लोकांवर गोरे नेहमीच अन्याय करतात ,प्रतेक प्रसंगात हाच न्याय कसा काय लावला जातो.
सवर्ण जाती नेहमीच खालच्या जातीतील लोकांवर अन्याय करतात हे प्रतेक प्रसंगात हाच न्याय का लावला जातो
भिन्न कारण सुद्धा असू शकतात किंवा उलटे सुद्धा घडलेले असू शकत.

पण प्रत्येक वेळी काळ्या माणसाला गोर्‍या पोलिसाने अटक केली तर >>> अहो शेंडे हे फक्त कुणाच्या अटकेचे प्रकरण आहे का? हे पोलिसांनी एका व्यक्तीला ठार मारल्याची घटना आहे ही.
काळे लोक काळ्या लोकांना मारतात त्याचे काय? >>> तेच तर. त्याचे काय इथे आता?

आफ्रिकन अमेरीकन लोकांना इथे बर्‍याच त्रासाला सामोरे जावे लागते, त्याची काही उदाहरणे.
काहीही कारण नसताना गाडी चालवत असताना पुलओवर करणे
स्वतःच्या महागड्या घराच्या ड्राईव वे मधे असताना आणि रस्त्यावरुन जाणार्‍या पोलीस कारने थांबूब तुम्ही ट्रेसपासिंग करत नाही ना हे बघण्यासठी तुमचा आयडी मागणे. बरेच जण हे टाळण्यासाठी चक्क पोलीस स्टेशनला जावून आम्ही असे असे आता इथे रहाणार आहोत असे सांगतात.
केवळ अंदाज पंचे दिलेले वर्णन जुळते म्हणून पाठलाग आणि अटक
खोटे आरोप आणि खोटे पुरावे वापरुन जेल टाईम
ड्राईव करणार्‍या गोर्‍या टीनएजरला फक्त वॉर्निंग देवून सोडणे आणि सोबतच्या आफ्रिकन अमेरिकन टिन्सची झडती घेणे .
कामा निमित्त ( यार्ड वर्क, बेबी सिटिंग, अप्लायन्स डिलीवरी, डोअर टू डोअर कँपेन) सबडिविजनमधे आलेल्या आफ्रिकन अमेरीकन व्यक्तीवर संशय घेवून पोलीस बोलावणे.

जिज्ञासा - अन्फॉर्चुनेटली ओन्ली यु (अँड अनुडॉन) कॅन रीड अँड अंडर्स्टंअ‍ॅड डेटा, म्हणुन तुम्हालाच उत्तर देतोय. मी दिलेल्या एफ्बीआयच्या लिंकमध्ये "सस्पेक्ट्स" म्हणुन कॅटगोरी आहे. थोडी तळाला आहे, ते नंबर्स बघा.

असामी - लुटिंग, अँड डिस्ट्रक्शन ऑफ प्रॉपर्टि इज ए न्यु फॉर्म ऑफ प्रोटेस्ट्स, आय गेस...

विजयकुलकर्णी - ते वाक्य कुठल्या डेटा संदर्भात आहे ते जाणुन घेण्याचे कष्ट घ्या...

भावना, एंपथी एकिकडे, आणि फॅक्च्युअल नंबर्स एकिकडे. पिपल ऑफ्टन गेट ब्लाइंडसाइडेड बाय इमोशन्स, बट नंबर्स डोंट लाय...

शेंडेनक्षत्रांच्या पोस्टचा सारांश

"वंशद्वेष वाईटच, पण
१. अनेक घटना मुळातच वंशद्वेषाच्या सदरात येत नाहीत
२. आल्या तरी काय झालं? काळे काळ्यांना मारतातच की! (मग इतरांनी मारलं तर बिघडलं कुठे?!)
३. डेमोक्रॅट्स परिस्थिती सुधारण्यासाठी काही करतायत का? ओबामाने काही केलं का? (मग रिपब्लिकन्सनी आणि सद्य प्रेसिडेन्टनेतरी का करायचं?
४. प्रोटेस्टर्सच लूटर्सच आहेतच हे सिद्ध झालेलंच आहेच, तेव्हा त्यांना का सहानुभूती दाखवायची?"

असाच आहे ना? की मी काही चुकीचं वाचते आहे?

लुटिंग, अँड डिस्ट्रक्शन ऑफ प्रॉपर्टि इज ए न्यु फॉर्म ऑफ प्रोटेस्ट्स, आय गेस... >> राज तो कोट कधी वापरले गेलेले हे माहित आहे ना ? लुटिंग, अँड डिस्ट्रक्शन ऑफ प्रॉपर्टि ह्याचे कोणीही सुजाण व्यक्ती समर्थन करणार नाही. फ्लॉईड बद्दल झालेली घटना वादापुरती वर्णद्वेषाशी १००% संबंधित नव्हती असे धरूया पण अशा घटना एका विशिष्ट वर्गातईल लोकांबाबातच अधिक होतात, त्या बाबती मधे अधिक ब्रूटॅलिटि असते हे मान्य आहे का ? तसे असेल तर वर्णद्वेष हे मुख्य कारण असू शकते हे मान्य असेल तर त्या घटनेनंतर वॉल्व्ह उघडल्यासारखी लोकांची प्रतीक्रिया काय असणार हे समजणे फार अवघड नसावे.

भारतात ही मुस्लीम /दलित/ पारधी अशा लोकांना institutional discrimination ला सामोरे जावे लागते.

पोलिसांच्या वर्णद्वेषी वर्तनाचा निषेध करणारे सारेच लूटालुटीचे समर्थक असतात असा गैरसमज का परसरवला जातोय ?
कृष्णवर्णीय कुटुंबात बाप नसतो हे स्तिरिओ टायपिंग आहे व प्रस्तूत प्रसंगात गैरलागू आहे.

आमच्या बे एरियात बार्ट नामक ट्रेन चालते. ह्या भागातील दूरदुरची शहरे मुख्यतः सॅन फ्रॅन्सिस्कोला जोडणारे हे ट्रेनचे जाळे आहे. हल्ली ह्या गाड्यांमधे बिनातिकिट प्रवाशांचा सुळसुळाट झाला आहे. आता ह्याला उपाय म्हणजे जास्तीत जास्त सुरक्षा कर्मचारी, तिकिट तपासनीस नेमणे आणि चुकार प्रवाशांना दंड, तुरुंग वगैरे शिक्षा देणे. पण उलट ह्या ट्रेनच्या व्यवस्थापकांनी पकडले जाणार्‍या लोकांमधे अल्पसंख्य (म्हणजे काळे) जास्त का ह्यावर चिंता व्यक्त केली. आणि गाडी भलत्याच रुळावर गेली. मग असे का होते ह्यावर एक समिती नेमणार. त्याचा अहवाल. मग त्यावर उपाय काय ह्यावर उहापोह, नवी चर्चा वगैरे वगैरे घोंगडे भिजत ठेवायचे. दरम्यान हे तिकिट चुकवे निवांत बिनातिकिट प्रवास करणार.

तिकिट न घेणारा/री कुठल्या रंगाचे आहेत हे महत्त्वाचे का त्यांना दंड व शिक्षा देऊन पुन्हा तसे होणार नाही हे महत्त्वाचे?
ह्याला मी रिव्हर्स रेसिज्म म्हणतो (उलटा वर्णद्वेष).

You keep saying "It's horrible that an innocent black man was killed, but destroying property has to stop."
Try saying "It's horrible that property is being destroyed, but killing innocent black men has to stop!"

- फेसबुकवरून साभार

राज, I am not sure what the term suspect entails but perhaps these are the people who were held due to some sort of prima facie evidence.
I am looking for data wherein all the other incidences of holding up someone without any reason or evidence (which everyone is referring to) are quantified. Has someone surveyed 1000 American Whites and 1000 African Americans who are otherwise comparable and researched how they are treated by the police?
Also, I will again say that you are limiting the definition of the word brutality. If I don't trust the police and rather fear them then something is wrong.

>>Try saying "It's horrible that property is being destroyed, but killing innocent black men has to stop!"

आधी काय घडले आणि प्रतिक्रिया कुठली? उगाच काही तरी वपु काळे स्टाईलची वाक्ये फेकू नयेत. These statements are not commutative!

भावी राष्ट्राध्यक्ष जो बायडन ह्यांचे विधान लक्षात घेण्याजोगे आहे. "If you are still thinking of whom to vote for, you ain't black".
पूर्वी प्लँटेशनवर काळे गुलाम काम करायचे. त्या शेतांचे मालक हेच त्या गुलामांचे सर्वेसर्वा होते. त्यांची मूळ अफ्रिकन नावेही विसरून त्यांना मालकाचेच नाव दिले जात होते. बायडनचे विधान हे त्या पठडीतले आहे. त्याचा पक्ष हा काळ्या लोकांचा मालक आहे. आणि काळ्या लोकांना आपण मत कुणाला द्यायचे हे ठरवायचा हक्क नाही असे ह्या विधानातून सुचवायचे आहे. ह्यातून हे दिसते की वर्णेद्वेषाचा द्वेष करणारे अती पुरोगामी डेमोक्रॅट्स काही कमी वर्णद्वेष्टे नाहीत.

Pages