वर्णद्वेष आणि पोलिसांकडून होणारी हिंसा

Submitted by maitreyee on 2 June, 2020 - 11:02

अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्‍या जाणार्‍या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्‍या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.

**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.

Group content visibility: 
Use group defaults

काळा माणूस बळी गेला की ते रेसिज्म असणारच असे छातीठोकपणे सांगणे आणि कांगावा करणे ही एक फॅशन बनली आहे.
ज्या पोलिसाने ह्या काळ्या माणसाला क्रूरपणे मारले असे दिसते आहे त्याची बायको (जी आता घटस्फोट घेत आहे) ती एशियन महिला आहे. म्हणजे श्वेतवर्णी नाही. चार पोलिस जे ह्या कारवाईत होते त्यातला एक एशियन आहे. त्यामुळे ह्या घटनेला पुरेसे पुरावे नसताना रेसिस्ट असल्याचे प्रमाणपत्र देणे चूक आहे. आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसक, विध्वंसक दंगलींना बुळबुळीत निषेध करुन एक प्रकारे समर्थन देणे हे त्याहून चूक आहे.
अमेरिकेत न्यायव्यवस्था अस्तित्वातच नाही आणि आम्ही कायदा हातात घेऊन हवा तसा धुडगूस घालणार ही वृत्ती जास्त घातक आहे. मूळ घटनेपेक्षा जास्त गंभीर आहे. कारण दंगलीत हजारो लोक भाग घेत आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. उलट डेमोक्रॅटिक पक्षाचे दिग्गज अशा लोकांना पटकन जामीन मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणात पैसा जमवत आहेत. म्हणजे एका गुन्ह्याला उत्तर म्हणून हजारो गुन्हे करणे आणि त्या गुन्हेगारांना पाठिशी घालणे. अशा प्रकारे जामीन मिळालेले गुन्हेगार, पुन्हा तसेच गुन्हे करत आहेत. पोलिसांना पकडलेल्या गुन्हेगारांना सोडून द्यावे लागते आणि दोन दिवसांनी पुन्हा पकडावे लागले आहे. अशा प्रकारे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय चालू आहे. ह्यामुळे खरोखर रेसिज्म कमी होणार आहे का?

राज, तुम्ही मला अजून मी मागितलेला डेटासेट दिला नाहीये!
आणि तुम्ही तरी कुठे कन्व्हिन्स झाला आहात एवढ्या पोस्ट्स पडल्या तरी! मी फक्त विषयाला धरून प्रतिसाद देण्याविषयी बोलते आहे.

एशियन लोक रेसिस्ट नाहीत हा शोध कधी लागला? व्हाइटच इतकेच तेही आहेत. भारतीयही आहेत. भारतात जशी रेसिझम हायरार्की आहे तशीच इथेही आहे.

बाकी तुमची तीच टेप परत सुरू आहे. रेसिझम ची शंका आल्याने खबरदारी म्हणून शाळेने ते सांगितले असे समजा.

ज्या पोलिसाने ह्या काळ्या माणसाला क्रूरपणे मारले असे दिसते आहे त्याची बायको (जी आता घटस्फोट घेत आहे) ती एशियन महिला आहे. म्हणजे श्वेतवर्णी नाही. चार पोलिस जे ह्या कारवाईत होते त्यातला एक एशियन आहे. >>कॉकेशियन व्यक्तीने एशियन व्यक्तीशी लग्न केले होते म्हणून ती आफ्रिकन अमेरिकन व्यक्तीशी वर्णद्वेशाने वागणार नाही असे थोडेच आहे? आणि एशियन मंडळी आफ्रिकन अमेरिकन लोकांशी रेसिस्ट वागतच नाहीत का? स्वतःच्या कॉकेशियस सुना-जावयाचे कौतुक करणारे आणि आफ्रिकन अमेरीकन लोकांना तुच्छतेने वागवणारे एशियन बघण्यात आहेत.
भारतात लोकं स्वतःपुरते सिलेक्टिव जात-पात न पाळणारे असतात तसेच हे असते. सध्याचे माहित नाही पण माझ्यासाठी स्थळे बघत होतो तेव्हा ब्राह्मण, सीकेपी, सारस्वत चालेल पण इतर नको असे म्हणणारी मंडळी असत आणि आजच्या काळात कुठे हो भेदभाव करायचा असे मोठेपणाने सांगत.

>>
ज्या पोलिसाने ह्या काळ्या माणसाला क्रूरपणे मारले असे दिसते आहे त्याची बायको (जी आता घटस्फोट घेत आहे) ती एशियन महिला आहे. म्हणजे श्वेतवर्णी नाही. चार पोलिस जे ह्या कारवाईत होते त्यातला एक एशियन आहे. >>कॉकेशियन व्यक्तीने एशियन व्यक्तीशी लग्न केले होते म्हणून ती आफ्रिकन अमेरिकन व्यक्तीशी वर्णद्वेशाने वागणार नाही असे थोडेच आहे?
<<
मी असा कुठलाही दावा केलेला नाही. ही माहिती माध्यमे देत नाहीत कारण त्यांच्या narrative शी सुसंगत नाही. परंतु आपल्यासारखे अती जाणकार इथे रेसिज्म आहेच असा छातीठोक दावा करतात त्यांना काही पुरावे वगैरे द्यायची गरज भासत नाही.

>>बाकी तुमची तीच टेप परत सुरू आहे. रेसिझम ची शंका आल्याने खबरदारी म्हणून शाळेने ते सांगितले असे समजा.

आणि तुमचीही रेसिज्मची रेकॉर्ड पिन अडक्ल्याप्रमाणे चालूच. अहो कुठलाही पुरावा नसताना उगाच रेसिज्मचा कांगावा अशा शाळेने का करायचा ज्या शाळेत गोरे आणि काळे हे लोक नगण्य संख्येने आहेत.
आणि ज्याची झळ सगळ्या जनतेला जाणवते त्या जवळ होणार्‍या दंगलीकडे दुर्लक्ष करून हजारो मैल दूर घडलेल्या घटनेचे कुठलाही पुरावा नसताना स्तोम माजवणे सयुक्तिक नाही.

You are really scaring me! --- घाबरू नका, मला इथे बीबी निघाला म्हणून काळजी वाटली आपल्याशी (भारतीय - देशी विदेशी) बरोबर अन्याय झाला का असं! पण आपल्यासाठी स्वतःसाठी रडायला/भांडायला/ आवाज करायला इथे कोणालाही वेळ नाही.

आपण काळया लोकांसाठी गळा काढू, ते आपल्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त डार्क shade आहेत. त्यांचा problem संपला तर आपण तर गोरेच की Happy - हे उपरोधिक ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी

राजसी, तुम्हाला चर्चा irrelevant वाटत असल्यास तुम्ही धागा इग्नोअर मारा की! --- हो

Uhoh काळे नगण्य संख्येने असतील तर मग जे बहुसंख्येने आहेत त्यांना या मुलांशी कसे वागावे /वागू नये हा अवेअरनेस शिकवला तर त्यात काय चूक ?

>>राज, तुम्ही मला अजून मी मागितलेला डेटासेट दिला नाहीये!<<
तुम्ही परत परत तेच लावुन धरत आहात तर बी माय गेस्ट. तुम्हाला हवा तसा डेटा (सस्पेक्ट्स तुमच्या भिंगातुन दिसले नाहित बहुतेक) एफबिआयच्या किंवा इतर आथेंटिक साइट वर शोधा आणि माझा मुद्दा खोडुन काढा. ढळढळीत सत्य डेटाचा संदर्भा सहित दिलेलं असतानाहि तुम्हाला ते "कंन्विंसिंग" वाटत नाहि, याला माझा नाईलाज आहे. आता प्लीज, काहि सेंसिबल पॉइंट असल्या शिवाय मला यांत ओढु नका...

भारतीय (किंवा इतर ब्राऊन ना) थोड्याफार कामात रेसिझम चा सामना वगैरे हे आफ्रिकन वंशाच्या लोकांना अनेक शेकडो वर्षं ज्या प्रकारे वागवलं गेलं त्या तुलनेत काहीच नाही.टॉम सॉयर ची हकलबरी फिन वाचली, ती विनोदी इत्यादी असली तरी त्या काळात काय प्रकारचा माईंडसेट होता, त्या काळातले 'दयाळू मालक' म्हणजे पण काय दर्जाचे 'दयाळू' होते हे कळतं.
भारतातल्या कास्टिझम बद्दल तावातावाने एखाद्या आदिवासी मुलखाबद्दल कुतूहलाने लिहावं तसे बीबीसी सीएनएन वर एकतर्फी चित्र तयार करणारे त्यांच्या स्वतःच्या पाश्चिमात्य मुलखात काय दर्जाचे वायझेड आहेत हेही जगापासून लपलेलं नाही.

कॉकेशियन व्यक्तीने एशियन व्यक्तीशी लग्न केले होते म्हणून ती आफ्रिकन अमेरिकन व्यक्तीशी वर्णद्वेशाने वागणार नाही असे थोडेच आहे? आणि एशियन मंडळी आफ्रिकन अमेरिकन लोकांशी रेसिस्ट वागतच नाहीत का? स्वतःच्या कॉकेशियस सुना-जावयाचे कौतुक करणारे आणि आफ्रिकन अमेरीकन लोकांना तुच्छतेने वागवणारे एशियन बघण्यात आहेत.
<<
हे तर अगदी स्वतःच्या डोळ्याने पाहिलय.
भारतीय पंजाबी फॅमिली, लग्नाचं फंक्शन होतं, होणारी सून व्हाइट अमेरिकन , एक जावई कोरियन ओरिजिनचा आणि सर्वात मोठा जावई अफ्रिकन अमेरिकन, त्याला अक्षरशः सावत्र ट्रिटमेन्ट देत होते फॅमिली आणि पाहुणे, अ‍ॅज इफ हि वॉज नॉट पार्ट ऑफ फॅमिली.
फॅमिली फोटोज, कोणाशी ओळख करून देणे, गप्पा सगळ्यापासून लांब ठेवले होते त्याला.
बाकी सर्व मंडळी गप्पा मारत होते आणि ब्लॅक जावई शब्द्शः ओझे उचलायचे , मांडव लावायचे, घर स्वच्छ् करायचे काम करत होता.सलग ४ -५ तास.
अर्थत ओझे उचलण्यात किंवा साफसफाईत काही गैर नाही पण वेगळी ट्रिटमेन्ट , दुजाभाव भयंकर खटकला मला.

असो, बाकी वरच्या चर्चेत काही इतक्या इन्सेन्सिटिव पोस्ट्स आहेत कि काही बोलण्यात समजावण्यात अर्थ नाही !

एशियन लोक रेसिस्ट नाहीत हा शोध कधी लागला? व्हाइटच इतकेच तेही आहेत. भारतीयही आहेत. भारतात जशी रेसिझम हायरार्की आहे तशीच इथेही आहे. +१

ज्या हिरिरीने पोलिसांच्या क्रूरतेचा निषेध होतोय त्या हिरिरिने जाळपोळ वगैरेचा निषेध होत नाही हा मुद्दा इथे गैरलागू असला तरीही निदान समजण्यासारखा आहे. पण फ्लॉईड चा मृत्यू ( हत्याच खरे तर) रेसिझम मधून आलेली आहे हे धडधडीत दिसत असतानाही एकाची बायको एशिअन आहे व दुसरा स्वतः एशियन आहे अशा सबबी देऊन याच्या मुळाशी असलेला रेसिझम नाकारण्यात काय अर्थ आहे ? शिवाय जाळपोळीचे कुणीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन केलेले नाही.

मी अतिजाणकार आहे असा कुठेही दावा केला नाहिये आणि हिंसाचाराचे समर्थनही केले नाहीये. मला कुठलाच भेदभाव मान्य नाही. देशाचे नागरीक म्हणून सिस्टिमने भेदभाव न करतात सर्वांनाच न्यायाने वागवावे. वरती बर्‍याच आफ्रिकन अमेरीकन घरात बाप नसतो अशा प्रकारची पोस्ट वाचली तर त्याबद्द्ल एवढेच म्हणेन , मी जिथे रहाते तिथे बहुसंख्य लोकं कॉकेशियस आहेत आणि बर्‍याच घरातून बाप नाही अशीच परीस्थिती आहे. त्याही स्त्रीयांची मुले अ‍ॅट रिस्क आहेत, पब्लिक हाउसिंग, चाईल्ड सपोर्ट मिळवणे तितकेच दुरापास्त आहे.

"इथे कितीजण छातीठोकपणे सांगू शकतात की...." - मी सांगतो. कुठलाही अभिनिवेश न बाळगता सांगतो, की मला सुदैवानं कधीही रेसिझम चा अनुभव आलेला नाही.

शेंडेनक्षत्रः आमच्या गावात शांततामय निषेध चालू होता. कॉकेशियन्स ची संख्या सुद्धा लक्षणीय होती. व्हाईट सुप्रमिस्ट्स नी आधी धमकी देत आणी नंतर प्रत्यक्ष दंगा करून दंगल उसळवली. जसा दहशतवादाला धर्म नसतो, तसंच हे दंगल घडवणारे, मानवतेचे गुन्हेगार आहेत.

तुम्ही कुठल्याही राजकीय / धार्मिक विचारसरणीचे समर्थक असाल तरी ह्या घटनेचा, डिस्क्रिमिनेशन चा आणी हत्येचा, एक सुजाण नागरिक म्हणून निषेधच व्हायला हवा. मला समाजवादी विचार पटत नाहीत. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला माझा पाठिंबा आहे. पण म्हणून, गोरे-काळे, सवर्ण-दलित, स्त्री-पुरूष अशा कुठल्याही डिस्क्रिमिनेशन ला शक्य तिथे, शक्य त्या मार्गानं विरोध / निषेध करण्यात आणी जर असा विरोध करण्यात उजव्या विचारसरणीचं नेतृत्व कमी पडत असेल, किंबहूना अशा नेत्यांचा अशा डिस्क्रिमिनेशन ला सपोर्ट असेल, किंवा प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रित्या सहभाग असेल, तर अशा नेतृत्वाचा सुद्धा विरोध करण्यात मला काहीच अडचण नाही.

मी इथे दुर्लक्ष करता करता confuse होते आहे. वरच्या चर्चेवरून White अमेरिकन, Asians, इथे (रेसिझम च्या विरोधात ) न लिहिणारे सगळे Indians रेसिस्ट असतात, भारतात तर indigenous जातीव्यवस्था म्हणजे वेगळ्या प्रकारचा रेसिझम आहेच, क्रॉस-marrige केली म्हणून रेसिझम गेलाच असं नाही हे पण दिसतंय, मग ठरवणार कसं कोण रेसिस्ट नाहीये? सगळं जगच रेसिस्ट दिसतंय मग निषेध कोणाचा कोणाविरुद्ध? खरंच रेसिझम आहे का? का फक्त क्रौर्य माणूस दुसऱ्याशी करतो ते?
Btw, भारतात एखाद्याला /दिला पांढरा /पांढऱ्या (पायाची-कपाळाची- अजून कोणता अवयव राहिला असेल तर ते रेसिझम का कसं?

राजसी, तुम्ही मुळातून बातम्या वाचल्यात तर कदाचित कन्फ्यूजन कमी होईल का?
तुमचं कन्फ्यूजन घालवणं ही इथे चर्चा करणार्‍यांची जबाबदारी आहे का?

बहुतेक धार्मिक आणि जातीयवादी कारण फक्त भारतात, तिथे रंग. जिथे जे विकेल ते! ग्लोबल मार्केट असलं तरी सगळीकडे सगळा माल कसा खपेल?
दुपारी ज्यू विकिपीडियावर वाचत होते. Out of the blue मुंबईतील बँकेतल्या ज्यू कलीग ची आठवण आली म्हणून असेल. तिचं नाव christian type होतं म्हणून मला ती कित्येक दिवस ख्रिस्तीण वाटायची. अस्खलित मराठी बोलायची, पैठणी वैगेरे चर्चा करायची. मग एकदा तिनेच विषय निघाला म्हणून ज्यू आहोत असं सांगितलं. तर ज्यू - आपले भारतीय bene ज्यू म्हणे इस्रायलमधे पवित्र समजले जात नाहीत Happy त्यांना लढा द्यावा लागलाय आणि आता थोडं-थोडं म्हणे वातावरण निवळले आहे पण त्यांना तसं अजून जातीबाहेरच ठेवलंय Happy

मला असं वाटतं अल्पमति, अल्पवाचन, सध्या अल्प बातम्या, overall सगळंच अल्प Happy गृहीत धरून आपण भारतीय पुर्वापार सहिष्णु आहोत. कित्येक शतकांपासून आपली परकीयांना आपलं म्हणायची आणि त्याप्रमाणे वागायची आपली संस्कृती, परंपरा आहे (अर्थातच थोर!) उदा - पारशी, ज्यू, इराणी, मुसलमान - ह्यांना तर आता परकीय म्हणायची पण चोरी. .... तर जर आपण आपल्यावरच्या म्हणजे भारतीयांच्या वर झालेल्या अन्यायबद्दल जागरूकता दाखवली, व्यवस्थित आवाज केला - मनापासून , जगाला आपल्या way ऑफ life ची महती पटवली तर आंतराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाला आणि नागरिकांना वजन येईल. आपल्याला जर सगळ्या लहान-मोठ्या decisions मधे आंतरराष्ट्रीय पातळीवर say मिळाला तर पूर्ण जग खरोखर सहिष्णु होईल. जे कदाचित मुळात सगळ्यांना हवंय. Too much wishful thinking Happy

हजारो वर्षांपासुन चातुर्वर्ण्य व्यवस्था पाळणारे भारतीय कोणत्या तोंडाने जगाला सहिष्णुता शिकवणार? Too much wishful thinking!

राजसी तुम्ही ते सार्कॅस्टीक लिहिलय. बरोबर ना ? कारण फक्त 'परीनगरीत ' रहाणारा माणुस अस काही तरी लिहू शकतो किंवा टकीला जास्त झाल्यावर.

Lol

आता मनोरंजन सुरु झाले आहेच तर आमचे दोन पैसे... ट्रेव्हर नोआचा एक जुनाच व्हिडिओ आहे. त्यात नंबर्स पण आहेत थोडे फार आणि मज्जा पण.

https://www.facebook.com/watch/?v=641340136460407

बापरे! बरीच चर्चा होतेय इथे... आता आमच्याकडे लंबसप्ताह* आहे तेव्हा वाचते.
*सोमवारी राणीच्या वाढदिवसानिमित्त सुट्टी आहे Lol

>मुसलमान - ह्यांना तर आता परकीय म्हणायची पण चोरी.
अत्यंत आक्षेपार्ह विधान. या धग्यात हे दुसर्‍यांदा झालेय.

बापरे काय प्रतिसाद आहेत. माझा बी एल एम ला पाठिंबा आहे. अर्थात आमच्या घराची वैचारिक बैठक डेमोक्रॅटिक लेफ्ट लीनिन्ग आहे सर्व समा वेशक आहे. भारातातील जाती व्यवस्थेविरुद्ध विचार असतात व हा प्रश्न समजावुन घेण्यासाठी कांचा इलॅया , डाँ. आंबेड कर ह्यांच्या पुस्तकांचे शेअर्ड वाचन चालू आहे.

प्यु रि टी, रेशिअल वर्चस्व ह्या घातक व चुकीच्या कल्पना आहेत. त्या कशा ते समजण्यासाठी मानव वंश शास्त्राचे वाचन वाढवले पाहिजे.
धागा काढल्या बद्दल मैत्रेयी ह्यांचे धन्यवाद. फारच अस्वस्थ वाटत होते घडामोडी वाचून. ( बातमी स्वरूपात)
त्यात नेतृत्वाचा अभाव... इट इज अ परफेक्ट स्टॉर्म.

ही घटना म्हणजे व्हाइट सुप्रीमसिस्ट लोकांना केकेके वगैरे एकत्र यायची सूचना आहे अशी एक थिअरी ट्विट र वर घरंगळते आहे.

भारतात कित्येक पिढ्याने राहणारे पारशी, ज्यू, इराणी, मुसलमान हेदेखील भारतीय नागरिकच आहेत .
तुमची कमेंट सरकास्टिक जरी असली तरी बरोबर नाहीय .

>>
ज्या हिरिरीने पोलिसांच्या क्रूरतेचा निषेध होतोय त्या हिरिरिने जाळपोळ वगैरेचा निषेध होत नाही हा मुद्दा इथे गैरलागू असला तरीही निदान समजण्यासारखा आहे. पण फ्लॉईड चा मृत्यू ( हत्याच खरे तर) रेसिझम मधून आलेली आहे हे धडधडीत दिसत असतानाही एकाची बायको एशिअन आहे व दुसरा स्वतः एशियन आहे अशा सबबी देऊन याच्या मुळाशी असलेला रेसिझम नाकारण्यात काय अर्थ आहे ? शिवाय जाळपोळीचे कुणीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन केलेले नाही.
<<
रेसिज्म "धडधडीत" दिसते म्हणजे काय? कसे दिसते म्हणे रेसिज्म? अमक्या पद्धतीने गळा दाबला तर रेसिज्म असा काही फॉर्मुला आहे का?
अनेक कारणे संभवतात. जसे त्या पोलिसाचे मानसिक विकृती असणे, पोलिसाचे त्या खून झालेल्या काळ्या माणसाशी काही वैयक्तिक वाकडे असणे, त्या काळ्या माणसाने मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सेवन केले होते, त्यामुळे पोलिसाच्या ह्या कृतीचे पर्यावसान मृत्यूत झाले. अशी कितीतरी कारणे असू शकतात. तुम्ही जज, ज्युरी आणि एक्जिक्युशनर बनू पहात आहात हे अजब आहे. साक्षी, पुरावे, फोरेन्सिक चाचण्या सगळे काही होऊ द्या आणि मग आपले मत मांडा. आधीच आपला न्यायनिवाडा करून मोकळे!
तो पोलिस के के के वगैरे चा सदस्य आहे का? एशियन बायको असण्याचा उल्लेख अशा साठी की निव्वळ श्वेतवर्णीय लोकांशीच संबंध ठेवा बाकी कुणाशी नको म्हणणारे काही हार्डकोर रेसिस्ट, व्हाईट सुप्रिमसिस्ट असतात त्यातला तरी हा नसावा इतपत म्हणता येईल. पुढचे साक्षी पुराव्यात कळेलच.

फ्लॉयडच्या मृत्यूचा निषेध म्हणून इतका दंगा उफाळला आहे. आजवर किमान तीन लोक (सगळे काळे) हे ह्या निषेधाच्या निमित्ताने मारले गेले आहेत. हे सगळे धडधडीत खून आहेत. एका काळ्या व्यक्तीला मारण्याचे उत्तर देताना तीन काळे सकृतदर्शनी निरपराध लोक मारणे हा हिशेब कसा जुळवायचा?
दंगे , लुटालूट वगैरे निरुपद्रवी असतात असे म्हणून किंवा काहीही न म्हणून ह्या दंग्याचे समर्थन करणारे ह्या मृत्यूंचे कसे स्पष्टीकरण देतात ह्याची उत्सुकता आहे.
अशा बळी जाणार्‍या लोकांच्या फ्युनरलला बडे काळे नेते जाऊन श्रद्धांजली का वाहत नाहीत? निव्वळ पोलिसांनी मारले तरच तो काळा माणूस श्रद्धांजली योग्य असतो का?

Pages