वर्णद्वेष आणि पोलिसांकडून होणारी हिंसा

Submitted by maitreyee on 2 June, 2020 - 11:02

अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्‍या जाणार्‍या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्‍या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.

**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.

Group content visibility: 
Use group defaults

आमच्या बे एरियात अनेकदा गंमतशीर गोष्टी घडत असतात. जॉर्ज फ्लोईडच्या हत्येबद्दल ओकलंड शहरात मोठा निषेध केला गेला. हा प्रकार यथावकाश अत्यंत हिंसक बनला. आणि एका केंद्र सरकारच्या नोकरीत असणार्‍या एका काळ्या माणसाला मोर्चातील काही लोकांनी गोळ्या घालून ठार मारले! आता एका निरपराध काळ्या माणसाला मा रले म्हणून निषेध आणि निषेध करणार्याने एका निरपराध काऴ्या माणसाला मारायचे? हे काय तर्कशास्त्र आहे हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.
https://www.nbcnews.com/news/us-news/authorities-identify-federal-office...

>>> आधी काय घडले आणि प्रतिक्रिया कुठली
माझ्या माहितीनुसार जॉर्ज फ्लॉइडची हत्या आधी झाली. तुमच्याकडे काही निराळी माहिती आहे का? शिवाय त्याचा काय संबंध? ते (वपु-स्टाइल) वाक्य दृष्टीकोनाबद्दल आहे - घटनाक्रमाबद्दल नाही.

दुसरं म्हणजे वर्णद्वेष आणि पोलीस ब्रुटॅलिटीबाबतच्या चर्चेत तुम्हाला फक्त राजकारण्यांबद्द्लच का बोलायचं आहे? ते समाजाचाच प्रातिनिधिक भाग नाहीत का?

असामी, धन्यवाद. क्रिस रॉकचा उल्लेख नव्हता मी वाचलं तिथे. खरंच विचार करायला लावणारं आहे.

तिकडे पोलिसांत सगळे गोरेच आहेत का? एखाद्या काळ्या पोलिसाच्या हातून गोरा अशाच रीतीने मारला गेला तर काय प्रतिक्रिया होतील?

तिकडे अमेरिकेत आजही वर्णभेद दिसावा याचे मला कायम आश्चर्य वाटत आलेय. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता देश असा का वागतो?

>>राज तो कोट कधी वापरले गेलेले हे माहित आहे ना ?<<
हे आहे ट्रंपचं ट्विट, इन वर्बेटम -
"These THUGS are dishonoring the memory of George Floyd, and I won't let that happen. Just spoke to Governor Tim Walz and told him that the Military is with him all the way. Any difficulty and we will assume control but, when the looting starts, the shooting starts. Thank you!" Trump wrote on Twitter.

दंगल, लुटालुटिची सुरुवात देशभरात होत असताना त्या संदर्भात केलेलं ट्विट आहे ते. ऑब्वियस्ली ते विरुद्ध कांटेक्स्ट मधे घेउन त्याला सिविल राइट्स प्रोटेस्टचा रंग देण्यात आला. मिडिया इज ट्विस्टिंग दि फॅक्टस, अँड पिपल आर जंपिंग टु ड्रिंक द एफिंग कुलेड...

>>माझ्या माहितीनुसार जॉर्ज फ्लॉइडची हत्या आधी झाली. तुमच्याकडे काही निराळी माहिती आहे का? शिवाय त्याचा काय संबंध?

जर तो काळा माणूस मारला गेलाच नसता तर लुटालुट जाळपोळ झालीच नसती. त्यामुळे माझ्या मते असे म्हटले पाहिजे की पोलिसांनी कितीही दुष्टपणा केला तरी त्याची शिक्षा उद्योगधंद्यांना मिळता कामा नये. ज्यांनी वाईट काम केले आहे त्यांनाच जास्तीत जास्त शिक्षा व्हावी.

निषेधाच्या नावाखाली महागडी उपकरणे, कपडे, बूट लुटणे, अलिशान दुकानांची नासधूस करणे हा संतापजनक संधीसाधूपणा आहे. त्याच्यावर पांघरूण घालून उलट तो अन्यायाविरुद्ध फोडलेला टाहोबिहो आहे असा आव आणणे म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र वाला प्रकार आहे.

दंगल, लुटालुटिची सुरुवात देशभरात होत असताना त्या संदर्भात केलेलं ट्विट आहे ते. ऑब्वियस्ली ते विरुद्ध कांटेक्स्ट मधे घेउन त्याला सिविल राइट्स प्रोटेस्टचा रंग देण्यात आला. मिडिया इज ट्विस्टिंग दि फॅक्टस, अँड पिपल आर जंपिंग टु ड्रिंक द एफिंग कुलेड... >> अर्थात तुम्हाला त्या वाक्याचा संदर्भ माहित नाही हे उघड आहे. ट्वीट गूगल करण्यापेक्षा वाक्य गूगल केले असते तर ...

शेंडॅ आज सकाळी फॉक्स वर आलेली बातमी होती कि काही ठिकाणी प्रोटेस्ट मधे लूटालूट करणारे गोरे लोक होते नि संतापजनक संधीसाधूपणा करणारे वेगळेच होते. just saying

सिव्हील राईट्स इतिहासाचा संदर्भ न घेता देखील हे विधान अत्यंत निषेधार्ह आहे. एखाद्या चोरी किंवा तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला/जमावाला पकडायचं सोडून गोळी घालणे हे कोणत्या नियमात बसतं? इतर देशात अशावेळी पोलीस पाण्याचे फवारे, अश्रुधूर, लाठीचार्ज किंवा वेळप्रसंगी हवेत गोळीबार करतात. इथे थेट प्रेसिडेंटच शूटींग करा म्हणतात Sad

आधी प्रेसिडेन्टने लोकांच्या प्रक्षोभाची आणि त्यामागच्या कारणपरंपरेची दखल घेऊन सह-अनुभूती व्यक्त करायला हवी, शांतवन करायला हवं, घडलेल्या घटनेबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट करायला हवी, पुढच्या कारवाईची कल्पना द्यायला हवी आणि मग नासधूस/जाळपोळ इत्यादी कठोरपणे रोखली जाईल हेही बोलायला हवं. मग त्याची अंमलबजावणीही. यापैकी कायकाय आणि कुठल्याकुठल्या क्रमाने झालं?

असो. हा(ही) धागा ट्र्म्पभोवती गोल गोल फिरायला नको आहे खरंतर. मुद्दा शीर्षकात आहे तोच आहे.

>>र्थात तुम्हाला त्या वाक्याचा संदर्भ माहित नाही हे उघड आहे. <<
अरेच्च्या, ते इन्फेमस वाक्य सिक्स्टीज मधे कुठल्या संदर्भात म्हटलं गेलं ते लिहिलंय मी. तुम्हाला कुठला संदर्भ मिळाला गुगल केल्यावर? सिविल राइट्सचा कि सिविल वॉरचा. बाय्दवे, हे दोन्हि वेगळे आहेत, जस्ट तुमच्या माहिती करता...

त्याच्यावर पांघरूण घालून उलट तो अन्यायाविरुद्ध फोडलेला टाहोबिहो आहे असा आव आणणे म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र वाला प्रकार आहे. >>> इथे विषय ती लुटालूट कशी योग्य आहे हा चालू आहे काय? बहुतांश लोकांनी इथे त्याचे समर्थन केलेले आहे काय?

एका व्यक्तीचा जीव कारण नसताना तब्बल आठ मिनीटे मानेवर पाय दाबून ठेवून घेतला गेलेला असताना बार्ट मधल्या विनातिकिट प्रवाशांचा संदर्भ देउन नक्की काय सुचवायचे आहे?

सगळे डेमोक्रॅट लीडर्स एक नं करप्ट आहेत असे धरा एक मिनीट. त्यामुळे रिपब्लिकन्स, कॉन्झर्वेटिव्ह्ज, "फेथ अ‍ॅण्ड फॅमिली व्हॅल्यूज", "फ्रीडम्स" वगैरे वाले, अमकी अमेण्डमेण्ट, तमकी अमेण्डमेण्ट चा घोषा लावणारे यांचा त्याच्याशी काही संबंध नाही का?

>>
शेंडॅ आज सकाळी फॉक्स वर आलेली बातमी होती कि काही ठिकाणी प्रोटेस्ट मधे लूटालूट करणारे गोरे लोक होते नि संतापजनक संधीसाधूपणा करणारे वेगळेच होते. just saying
<<
हो अगदी "फॉक्स" वर आली तरी असेच म्हटले आहे की काही ठिकाणी लुटारू श्वेतवर्णी होते. सगळ्या नाही. आणि लुटारूंच्या त्वचेच्या वर्णाविषयी अधिकृत आकडेवारी आहे का? मी पाहिलेल्या बहुतेक दृश्यात मला काळे लोक दुकाने, गाड्या फोडताना दिसले. आता मी फॉक्सचे खरे मानू का मी ज्या क्लिप आमच्या स्थानिक बातम्यात दाखवल्या त्या खर्या समजू?
अर्थातच ज्यांनी विध्वंस केला, लूट केली त्यांना चांगली अद्दल घडवावी असे माझे मत आहे. मग त्वचेचा रंग कुठला का असेना.

>>
सिव्हील राईट्स इतिहासाचा संदर्भ न घेता देखील हे विधान अत्यंत निषेधार्ह आहे. एखाद्या चोरी किंवा तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला/जमावाला पकडायचं सोडून गोळी घालणे हे कोणत्या नियमात बसतं?
<<
दंगलखोरांवर गोळीबार हा जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच होतो आहे का? दंगलखोर लोक अत्यंत हिंसक असतात. लाठीमार, अश्रूधूर ह्या प्रकारांनी दंगल आटोक्यात येत नसेल तर गोळीबार करावाच लागतो. उगाच ट्रंपचे सगळे चुकीचेच कसे असते ह्या अट्टाहासापायी ह्या व्यावाहारिक गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये.
तमाम डेमोक्रॅटिक राज्यपाल (उदा. आमचा कॅलिफोर्नियाचा न्युसन्स) हे ह्या विध्वंसाला उत्तर म्हणून लोकांनी आपापल्या थोबाडीत मारुन घ्याव्यात असे सांगत आहेत. कारण म्हणे ह्या लुटालुटीला काळे लोक नसून उरलेले सगळे जास्त जबाबदार आहेत. अशा नंपुसक प्रतिसादाला ठणकावणे आवश्यक आहे नाहीतर सामान्य लोकांचे जगणे कठिण होईल.

वर्णद्वेष नाहीच म्हणत डिनायलमध्ये जाणार्‍यांना ओहायोमधली लहान मुलाला मारल्याची घटना माहिती नसेलच. अशा अनेक बातम्या खोदून लिन्क देता येतील पण वर्णद्वेष नाहीच असं आधीच ठरवलं असल्यामुळे त्याचा काही उपयोग होइल असं वाटत नाही.

> ज्यांच्या हृदयात काळ्या लोकांविषयी अपार कणव आहे ते डेमॉक्रॅटिक नेते ह्या अशा गरीबीत खितपत पडलेल्या काळ्या लोकांच्या उत्थानाकरता दिवसरात्र काय प्रयत्न करत आहेत? ( shendenaxatra on 2 June, 2020 - 08:53)

स्वत: काही न करता इतरांनी काही करावे असे वाटणे यात बरेच काही आले.

डेमोक्रॅटीक नेत्यांनी पुरेसे केले नाही आणि तेच ते मान्यही करताहेत.

पण ज्यांना काही प्रॉब्लेम आहे हेच मान्य नाही त्यांचे मत बदलणे सगळ्यात कठीण. आणि इथे सर्वात मोठा विजय काळ्यांचे आयुष्य इतरांइतकेच महत्वाचे आहे हे सगळ्यांना जाणवण्यातच आहे,

Ask yourself if you have a solution, or are you part of the problem.

खालची एक कमेंट आणि मैत्रेयीची हेल्प हे दोन वाचून मी इकडची ओरिजिनल कमेंट काढतेय. इतकंही काही महत्वाचं नाही इथे "ते" लिहिणं. इथली चर्चा इथे ज्या स्टाइलने व्हायला पाहिजे त्यानेच होऊदे. मला माझ्या पद्धतीने जे काही माहित करून त्याने काय शिकता येईल ते मी नेहमीच करते. दरवेळेला थ्रेड मिळतात म्हणून केलं जातं असं नाही.
शिवाय मग अशा नेगेटिव्ह आय डि विरोधात अ‍ॅडमीन करे जा वगैरे करायला वेळ्/लक्ष द्यावं लागतं ते खर्या कामावर द्यावं. पण नुस्तं टिंब कशाला द्या?

मी कधीही मी अशा साईट्सवर काय लिहिलं याचा एक म्हणजे बॅक अप ठेवत नाही. ते काम जे आय डी करतात त्यांना विचारलं तर मिळेल मी काय लिहिलं होतं; पण मग उत्तर पण त्यांनाच द्या. खालची कमेंट मात्र मी ठेवणार आहे. ती योग्य जागी नाही तरीही. त्याची कारणं निदान मला माहित आहेत.
इथे पण नीट वाचून वेळ मिळेल तसं कंट्रिब्युट करेन. मला माझ्या प्रायोरिटिज पाहिल्या तर एनर्जी योग्य जागी खर्च करायची बुद्धी या कमेंटमुळे झाली त्याबद्द्ल मी स्वतःचेच आभार मानते. शेवटी लेसन्स लर्न्ड करून पुढं जाणं महत्वाचं.

धन्यवाद. Happy

इतरांना विचारून, त्यांच्या कल्पना घेऊन ऑफिस मध्ये स्वतःच्या नावावर खपवून स्वतःचा रुबाब वाढवून मी किती भारी मी किती भारी हे दाखवण्याची सवय भारतीय कधी सोडणार??

वेका पहिल्यांदाच या प्रकारचे काम करते आहेस का? तसे असेल तर फु.स. देईन की फार बदल घडवण्याच्या अपेक्षा ठेवू नकोस. Happy
माझा आतापर्यन्त चा अनुभव असा की साधारणतः कंपनी गव्हर्नमेन्ट चे काम घेत असेल तर कम्प्लायन्स म्हणून हे डायवर्सिटी आणि इन्क्लुजन चे एफर्ट्स "दाखवावे" लागतात. म्हणजे असे की आमची कंपनी डायवर्स वर्क फोर्स बनवण्यासाठी "पुरेसे प्रयत्न करतेय" हे दाखवणे. बहुतेक वेळा त्या ग्रुप ना डेटा कलेक्शन, एम्प्लॉयी सर्वे , ट्रेनिंग, हायरिंग पॉलिसीज बनवणे, त्यांचे रिजल्ट्स डॉक्युमेन्टेशन करणे हेच काम असते. पण हा ग्रुप कम्प्लायन्स टिकवणे याव्यतिरिक्त काहीही बदल वगैरे घडवताना दिसल्याचे लक्षात नाही. थोडेफार अवेअरनेस व्हिडिओज, हायरिंग च्या वेळी फक्त " रीजेक्शन चे कोणते कारण पोलिटिकली करेक्ट नाही" याबद्दल मॅनेजर्स ना एजुकेट करणे इतकाच इन्फ्लुएन्स करू शकतात. कारण हायरिंग ची पावर ज्यांच्या हातात असते ते लोक या ग्रुप ला कुठले जुमानतायत.

>>स्वत: काही न करता इतरांनी काही करावे असे वाटणे यात बरेच काही आले

म्हणजे काय? इथे ट्रंप कसा वाईट्ट आहे. तो कसा वर्णद्वेष्टा आहे ह्यावर बरेच खरेखोटे चर्वितचर्वण झाले. त्यामुळे मुख्यतः जे असे आरोप करत आहेत त्यांचे रेकॉर्ड तपासले पाहिजे. त्याकरता डेमोक्रॅट्स चा उल्लेख केला.

याबद्दल मी काय करतो? एक सामान्य माणूस म्हणून जे काही करणे शक्य आहे ते. मी वंशावर आधारित भेदभाव करत नाही. भेदभावाचे समर्थन करत नाही. माझे काही पूर्वग्रह असतील तर ते दूर करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतो. मी किंवा माझ्या कुठल्याही ज्ञात पूर्वजाने काळे गुलाम ठेवलेले नव्हते.
मी पोलिस नाही त्यामुळे मी कुठल्या निरपराध काळ्या वा अन्य मनुष्याला गळा दाबून मारण्याची सुतराम शक्यता नाही.
मी कुठलेही दुकान फोडू इच्छित नाही. जाळपोळ करु इच्छित नाही. उलट कोणी लावली तर बादलीभर पाणी ओतून ते विझवायचा प्रयत्न करुन. दुकानातून कुठली वस्तू चोरू इच्छित नाही.
माझ्या मुलांना असा भेदभाव करु नये असेच शिकवतो.

जर असा कुठला भेदभाव सरकारी पातळीवर आढळला तर मी माझ्या लोकप्रतिनिधीला एमेल पाठवून निषेध करीन.
जर कुठला उमेदवार अशा प्रकारे वंशद्वेष्टा दृष्टीकोन बाळगत असेल तर मी त्याला मत देणार नाही.

आणखी काय करणे अपेक्षित आहे? गुडघा टेकणे? काळ्या फिती बांधणे? मोर्चात सहभागी होणे?

ओके मैत्रेयी गाॅट इट.

>> इतरांना विचारून, त्यांच्या कल्पना घेऊन ऑफिस मध्ये स्वतःच्या नावावर खपवून स्वतःचा रुबाब वाढवून मी किती भारी मी किती भारी हे दाखवण्याची सवय भारतीय कधी सोडणार??

कटप्पा माझं सध्याचं एक निरिXण आहे की माझ्या मागे तुम्ही तुमचा कुठला तरी अजेंडा घेऊन काहीतरी उसकावू पाहता. मला काही फरक पडत नाही. आजवर मी तुम्हाला समज दिली आणि कमेंट्स काढल्या आणि तुम्हालाही काढायला भाग पाडले. आता या विषयावर मात्र हद्द झाली. अहो तुम्हाला कदाचीत ठाऊक असेल मी तिथे किंवा कुठे काय करतें. I do not care a bit तुम्ही इथे किंवा या साइटच्या बाहेर काय करता I am least bothered. This is just not the topic and I have not even said that I am doing it for any credit

तुम्हाला कळणआर नाही. तुम्ही तुमचे ड्यु आय / ड्यु आय खेळ खेळा honestly go wherever you like I don’t care but please do not reach out on what I post or what I care for. Enough is enough. I am ignoring you and people with agendas like you. I am not obligated for sharing with you how and where I use the data. People who believe a voice count they will help me. We all go to some place to do our research before opening our mouth. Referring to books or online sites whichever way. I m not sure why I am writing it to you but honestly I m very annoyed and please do not try to deal with what I do.

Thanks. Good luck. grow up and learn to compare apples to apples and विरंगुळा to विरंगुळा.

असो खुप झालं. शुभेच्छा

जर कुठला उमेदवार अशा प्रकारे वंशद्वेष्टा दृष्टीकोन बाळगत असेल तर मी त्याला मत देणार नाही.>>> म्हणजे??? ट्रंपला तुमचं मत नाही की काय? Wink

>>
जर कुठला उमेदवार अशा प्रकारे वंशद्वेष्टा दृष्टीकोन बाळगत असेल तर मी त्याला मत देणार नाही.>>> म्हणजे??? ट्रंपला तुमचं मत नाही की काय?
<<
ह्यात एक मोठे गृहितक आहे की ट्रंप हा वर्णद्वेष्टा आहे. मला तसे आढळलेले नाही. याउलट बायडनच काळ्या लोकांवर मालकी हक्क गाजवू पहात होता. (If you don't vote for me you ain't black!) नंतर माफी मागितली पण जे पोटात होते ते ओठावर आले. त्यामुळे माझ्या मते बायडनच जास्त वर्णद्वेष्टा आहे. त्यामुळे कुणाला मत द्यावे ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही!

तुमच्याबाबत खरे नसेल पण जेनरली देसी करतात असे.
बाई दवे सुरुवात तुम्ही केलीत.
तुम्ही माझ्या धाग्यावर आलात - तुमचा आयडी देखील मला माहित नव्हता, तुम्हाला मी ओळखतही नाही आणि मला हि बोचरी कमेंट लिहिलीत. तेंव्हा मी अनोय झालो नसेन?

रिस्पेक्ट द्या. रिस्पेक्ट मिळेल. हि माझी शेवटची पोस्ट तुम्हाला - आय अश्युअर !
तुमच्या पोस्ट्स आधीही दिसत नव्हत्या. आता इग्नोर नक्की करेन.

हि तुमची कमेंट त्या धाग्यावरची -

-------------------------->>>>

चान्सेस आहेत तुमची कुठून तरी गच्छंती झाली असेल आणि तुम्,ही योग्य जागी पोहोचलाही असेल पण मग एकच करा सगळंच विरंगूळा मध्ये हलवा. थँकफुली तुमच्या अमकी मदत तमकी मदत मध्ये खास रिप्लाय करण्यासारखं तेव्हाही काही वाटलं नव्ह्तं त्यामुळे आताही वाटायचं काही कारण नाही. पण आज फार वेळ होता म्हणून ही छोटीशी प्रतिक्रिया.
एंजॉय करा तुमचा "विरंगूऊऊऊळा"
Submitted by वेका on 13 May, 2020 - 15:36

तिकडे अमेरिकेत आजही वर्णभेद दिसावा याचे मला कायम आश्चर्य वाटत आलेय. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता देश असा का वागतो? >>> अगदी अगदी.

काही नाही,हा सगळा ट्रंपला त्रास देउन गोत्यात आणण्याचा कट आहे.. माझी एक गोरी मैत्रिण. सो त्याला किंवा त्याच्या समर्थकांना शष्प फरक पडत नाहिये. मला आवडले ते सेलिब्रिटीझ ने घेतलेला स्ट्रॉंग स्टँड. भारतात आंबे कसे खाता ह्यापलिकडे मजल जात नाही.

तिकडे अमेरिकेत आजही वर्णभेद दिसावा याचे मला कायम आश्चर्य वाटत आलेय. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता देश असा का वागतो? >> मला वाटतं व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता देश असल्यामुळेच असं होतं. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे तसचं स्वतःच विकास स्वतः घडवून आणायची जबाबदारी पण त्याची/ तिची आहे अशी धारणा समाजात असल्याने, समाजातील एखादा घटक मागासलेला/ पुरेसा विकसित नसले तर उरलेल्या समाज घटकांनी त्याला मदत केली पाहिजे ही भावना पुरेशी निर्माण होत नाही. भारतात ती भावना लवकर निर्माण होते (पुर्वीच्या काळी तरी व्हायची).

मला वाटतं व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता देश असल्यामुळेच असं होतं. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे तसचं स्वतःच विकास स्वतः घडवून आणायची जबाबदारी पण त्याची/ तिची आहे अशी धारणा समाजात असल्याने, समाजातील एखादा घटक मागासलेला/ पुरेसा विकसित नसले तर उरलेल्या समाज घटकांनी त्याला मदत केली पाहिजे ही भावना पुरेशी निर्माण होत नाही. ////

सहमत नाही.
वर्णभेद म्हणजे मागासलेल्या लोकांना इतरांनी मदत न करणे ही व्याख्या योग्य वाटत नाही. अमेरिकेतील वर्णभेद हा अश्वेत लोकांना जगण्याचे मानवी हक्क व human dignity - respect नाकारणं, आपल्या former slaves ना माणूस म्हणून बरोबरीचा हक्क देण्याची तयारी नसणं, तसेच व्हाईट राष्ट्र म्हणजे गोरे लोक सोडून बाकी इतरांनी अमेरिकेतून त्यांच्या मूळ देशात परत जावं असे प्रयत्न करणं- अशा स्वरूपाचा आहे.
मिशेल ओबामासारख्या उच्चभ्रू सुशिक्षित स्त्रीला कोणा गोऱ्याने 'मदत' करायची गरज नाही. पण तरीही वर्णभेद तिच्याही वाट्याला सर्व प्रकारे आला आणि येतो.

ओ जे सिम्प्सन प्रकरण कुणाला आठवत आहे का? फार जुनी केस आहे त्यामुळे इंटरनेटवर फारशी माहिती किंवा त्या काळचे वर्तमानपत्रांचे दुवे मिळणे कठीण आहे.

अमेरिका दंगल वरून बोध घेवून काही डाव्या विचारवंतांनी " भारतात सुध्दा पोलीस बळाच्या वापराला असेच उत्तर दिले पाहिजे " अशी विचारसरणी पसरवली जात आहे .
आणि त्यात ' द वायर ' चा विचारमंच अग्रणी आहे .
थोडक्यात ट्विटर वरील काही अकाउंट जे सतत हिंदू विरोधी आघाडीत सामील असतात त्यांनीच वातावरण नेहमीप्रमाणे दूषित करायला सुर वात केली आहे .

ओ जे सिम्प्सन प्रकरण कुणाला आठवत आहे का? >> हो! मी ती सोप पाहिल्यासारखी पूर्ण फॉलो केली होती. ट्रायल पण काही महिने चालली होती. त्याचं कोर्टातून थेट प्रक्षेपण होत होतं.

>>ओ जे सिम्प्सन प्रकरण कुणाला आठवत आहे का?<<
"ते वर्णद्वेषाचं दूसरं टोक होतं..." असा कोपर्‍यातुन क्षीण आवाज येइपर्यंत मी माझं मत राखुन ठेवतो...

Pages