वर्णद्वेष आणि पोलिसांकडून होणारी हिंसा

Submitted by maitreyee on 2 June, 2020 - 11:02

अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्‍या जाणार्‍या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्‍या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.

**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.

Group content visibility: 
Use group defaults

रेसिजम हा मनुष्यस्वभाव आहे, मनुष्याला रेसिजम करू नकोस,

आणि त्याला असे लेबल लावता येणार नाही.
गोरे resist असतात काळे नसतात.
अमेरिकन resist असतात भारतीय नसतात .
उच्च जाती वाले, ,बहुसंख्य resist असतात अल्प संख्यक नसतात.
Resist असणे किंवा नसणे प्रतेक व्यक्तीवर अवलंबून असते आणि प्रसंगावर.

आता इथे भारतात तर २ ऑक्टोबर ला बहुसंख्यांक लोकांनी तमाम अल्पसंख्याकांची गुढग्या वर बसून माफी मागावी या ट्रेण्ड ने हळूहळू जोर घ्यायला सू वात केली आहे . आणि त्या बद्दल अनुभव सिन्हा या डायरेक्टर तर खुल्लम खुल्ला ट्विट केले आहे .
पण प्रश्न असा आहे की माफी कोणी आणि कोणाची मागायची ?
सगळेच विषय चर्चेत आहेत .
सुर वात कोण करणार ?
१२०० वर्षापासून क्रूरपणे राज्य करणारे ,
दलितांना सतत हिन वागणूक देणारे ,
काश्मीर मधून पंडिता वर अमानवीय अत्याचार करून त्यांना हकलनारे ,
सिख दंगलीत नरसंहार करणारे ?

पोलिस बळाचा अतिरेक झाला का हे फक्त तेवढ्याच प्रसंगाचे चित्रण बघून ठरवता येणार नाही.
एकदा आरोपी अतिशय क्रूर असेल तर थोडी पण ढिलाई जीवावर बेतू शकते.
आणि आरोपी क्रूर नसेल तर पोलिस बळाचा अतिरेक झाला आहे हे स्पष्ट दिसत आहे ते नाकारता येत नाही.
वंशवाद हे कारण असेल तर फक्त त्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यला शिक्षा मिळालीच पाहिजे ती पण अत्यंत कठोर .
पण त्या साठी पूर्ण गोऱ्या लोकांना दोषी धरता येणार नाही.
अतिरेक्यांना धर्म नसतो हे जागतिक मान्य असलेले वाक्य आहे ना.
मग वंशवाद करणाऱ्या च पण कोणता वंश नसतो ती फक्त त्याच व्यक्तीची प्रवृत्ती असते.

पण प्रश्न असा आहे की माफी कोणी आणि कोणाची मागायची ?
सगळेच विषय चर्चेत आहेत .
सुर वात कोण करणार ?
१२०० वर्षापासून क्रूरपणे राज्य करणारे ,
दलितांना सतत हिन वागणूक देणारे ,
काश्मीर मधून पंडिता वर अमानवीय अत्याचार करून त्यांना हकलनारे ,
सिख दंगलीत नरसंहार करणारे ?>>>>>

हाहाहा..

रेसिजम हा मनुष्यस्वभाव आहे, मनुष्याला रेसिजम करू नकोस, नैतिकदृष्ट्या ते योग्य नाही असे कितीही शिकवले तरीही तो रेसिस्टच राहणार.

हे विधान चुकिचे आहे. मी रेसिस्ट नाही. रेसिस्ट नसलेले अनेक लोक माझ्या परिचयाचे आहेत. "प्रत्येक पुरुष बलात्कारीच असतो, ज्यांना संधी मिळते ते करतात" "प्रत्येक महिला चोरच असते, ज्यांना संधी मिळाते त्या चोरी करतात" ई.ई. विधानेही अशीच चुकिची आहेत.

समाजमनातला रेसिझम घालवणे सोपे नाही, पण प्रयत्नच केले नाहीत तर इतकीही प्रगती झाली नसती, नखे दर रविवारी कापली तरी वाढतातच म्हणून कुणी कापायचे थांबत नाहीत.

जॉर्ज फ्लॉईड च्या जागी इतर कोणत्याही वर्णाचा माणूस असता तरीही हेच घडले असते, असे असते तर मग ही घटना केवळ पोलीस ब्रूटॅलिटी म्हणून सोडून दिली असती. दुर्दैवाने ते खरे नाही.

हे विधान चुकिचे आहे. मी रेसिस्ट नाही. >>>

हे स्वतःबद्दलचे तुमचे मत आहे. तुम्हाला भेटणाऱ्या 100 पैकी एकाला जरी त्याच्यामते वेगळा अनुभव आला तरी तो तुम्हाला रेसिस्ट ठरवू शकतो.

हे स्वतःबद्दलचे तुमचे मत आहे. तुम्हाला भेटणाऱ्या 100 पैकी एकाला जरी त्याच्यामते वेगळा अनुभव आला तरी तो तुम्हाला रेसिस्ट ठरवू शकतो>>>>>>>
हा हा हा
काही ही !!

अमेरीकेत रेसिझम आहे. छुपे आहे, सटल आहे. अनुभवले आहे. ३ दा तीव्र रेसिझम, चीड आणणारे, हतबल करणारे अनुभवले आहे. सगळेच रेसिस्ट नाहीत पण काही हलकट लोक आहेत. २ रेडनेक बायका , अमेरीकेत कमावून , कॅनडात रहाणारा एक गे मनुष्य - यांच्या मार्फत वाईट अनुभव आलेला आहे.

पोलिसी अत्याचार म्हटलं रेसि झम म्हटलं नाही म्हणून आपला मुद्दा खरा ठरला असं वाटणार्‍यांना -
शेंडे नक्षत्रांना त्याच्या मुळाशी रेसिझम आहे हे पटलेल आहे, म्हणूनच आधी त्यांनी का ळ्या लोकां म धल्या दोषांची यादी वाचायला सुरुवात केली. ते दंगल करताहेत असा धोशा लावला. त्या घटनेला अनेकदा क्षुल्लक रूप दिलं. (यात मला अनपेक्षित असं काही नाही). न्युझीलंडमधल्या दहशतवाद्याला माथेफिरू म्हणणं, तो व्हाइट सुप्रिमसिस्ट आहे याकडे डोळेझाक करणं याचा चांगला अनुभव आहे.

इथे कोणालाही तो प्रकार रेसिझमचा आहे, हे पटवायची गरज मला वाटत नाही. ब्लॅक लाइव्ह्ज मॅटरचे पडसाद जगभर जिथे व्हाइट लोक राज्यकर्ते आहेत, बहुसंख्य आहेत तिथे उमटलेत . किमान दोन देशांच्या पंतप्रधानांनी रेसिज्मबद्दल वक्तव्य केलं आहे.
--------
ब्लॅक लाइव्ह्ज मॅटरला पाणी घालून पातळ करायला काही लोक ऑल ला इव्हज मॅटर असा साळसूद माणुसकीचा मुलामा लावताहेत.
---

असे प्रसंग नेहमीच येतात प्रतेक देशात.
तो संबंधित असे प्रसंग कसे हाताळायचे ह्या विषयी तरबेज आहेत.
ते काढणार मध्यम मार्ग .
आपण भारतात बसून ज्ञान वाटायची गरज नाही.
इथेच कोण गंभीर पने घेत नाही तर तिथे कोण घेणार.

>>
इथे कोणालाही तो प्रकार रेसिझमचा आहे, हे पटवायची गरज मला वाटत नाही. ब्लॅक लाइव्ह्ज मॅटरचे पडसाद जगभर जिथे व्हाइट लोक राज्यकर्ते आहेत, बहुसंख्य आहेत तिथे उमटलेत . किमान दोन देशांच्या पंतप्रधानांनी रेसिज्मबद्दल वक्तव्य केलं आहे.
--------
<<
हाच तो आंधळा द्वेष. ज्याला रिव्हर्स रेसिज्म म्हणता येईल. इतके दिवस रेसिस्ट होतात ना हरामखोरांनो? आता आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रसंगात रेसिस्ट ठरवणारच. पुरावा असो किंवा नसो. आणि आम्ही जाळपोळ करणार, लोकांना ठार मारणार. मग त्यात डेव्हिड डॉर्न सारखे प्रामाणिक, सच्चे पोलिस अधिकारी लुटारू लोकांना थांबवताना बळी गेले तरी चालेल. उलट अशा लोकांना बळी दिल्यानेच "रेसिस्ट गोरे लोक" जागे होतील.

फ्लॉईडला महात्मा ठरवण्याच्या आवेशात डेविड डॉर्नसारखा अनुकरणीय माणूस अनुल्लेखाने दुर्लक्षित केला जातो. ना त्याचे म्युरल बनते ना त्याच्या नावाने कोणी मोर्चा काढतो. कोण होता हा माणूस? ३८ वर्षे सेंट लुइस ह्या मिसोरी राज्यातील शहराच्या पोलिस खात्यात काम केले. अत्यंत प्रामाणिक अधिकारी. आणि हो काळा.
काही "निरुपद्रवी लोक" सेंट लुईसमधे दंगली, लुटालूट वगैरे वर्णभेद दूर होण्याकरता शांततापूर्ण निदर्शने करत होते. त्यांना एक pawn store लुटायचे होते. तिथे डेव्हिड डॉर्न सुरक्षा व्यवस्थेत होता. त्याने त्या "अत्यंत शांतताप्रेमी, निरुपद्रवी" आंदोलकांना थांबवायचा प्रयत्न केला. पण त्यांना वंशभेद दूर करण्याकरता ते दुकान फोडून लुटायचेच होते. मग अत्यंत नाईलाजाने त्यांनी ह्या काळ्या पोलिस अधिकार्‍यावर गोळ्या घालून त्याला ठार मारले. कारण त्यांना थोर थोर जॉर्ज फ्लॉईडला आदरांजली वहायचीच होती.

कुठे तो जॉर्ज फ्लॉईड, त्याच्या नावाने लुटालूट करणारे आणि कुठे डेव्हिड डॉर्नसारखे सच्चे, प्रामाणिक अधिकारी. ज्यांना आयुष्यात रेसिज्मचा अनुभव आलाही असेल पण त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाने त्यावर मात केली आणि कुठे हे लुटारू लोक ज्यांना पॉश दुकानांच्या काचा फोडणे, त्यातील किमती माल चोरणे, दुकानावर भेसूर ग्रफिटी रेखणे आणि शेवटी त्याला आगी लावणे, मधे येणार्‍या लोकांवर जीवघेणे हल्ले करणे हेच रेसिज्मवर उत्तर आहे असे वाटते. आणि सगळे पुरोगामी अशा दंगलींचे "रेसिज्मविरुद्ध फोडलेला आर्त टाहो" वगैरे विशेषणे लावून टाळ्या वाजवत असतात.

देजा वू.
एका काळ्या माणसाला शांत डोक्याने निर्घृणपणे मारायचं.
आंदोलनातल्या हिंसाचारासाठी काळ्या लोकांना जबाबदार ठरवायचं.
हिंसाचार करणारे आहेत कोण?
https://www.voanews.com/usa/whos-behind-violence-george-floyd-protests-us

एखाद्या हडकुळ्या, अल्पवयीन मुलाला किंवा मुलीला अटक करताना पोलिस किती हळूवारपणे वागतील आणि एका आडदांड, धिप्पाड, गुन्हेगारीचा लांबलचक बायोडेटा असणार्‍या फ्लॉईडसारख्या माणसाशी कसे वागतील ह्यात फरक असणारच. तो रेसिज्मच आहे असे मी पुराव्याशिवाय मानणार नाही. आता ड्रग्जच्या अती सेवनामुळे फ्लॉईडची तब्येत तितकीशी चांगली नव्हती आणि आडवे पाडून गुडघा गळ्यावर दाबल्यामुळे तो मेला असे असणे शक्य आहे. पण ह्यातली कुठलीही माहिती प्रस्थापित माध्यमे सहजासहजी देत नाहीत. खोट्या नोटा बनवणारे नोटांचे चलनात आणण्याकरता ड्रग डीलरचा वापर करतात ही वस्तुस्थिती आहे. आता फ्लॉईड हा अनेकदा कोकेन वगैरे बाळगल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगलेला माणूस आहे. त्याचा ह्या नोट प्रकरणात जास्त हात नसेलच असे म्हणवत नाही. पुरावे आल्यावर काय ते कळेलच.

एक गरीब, सरळ, संसारी काळा माणूस, चुकीने २० डॉलरची खोटी नोट दिली म्हणून पोलिसांनी गळ्यावर गुडघा दाबून क्रूरपणे ठार केले असेच सगळ्यांना वाटेल. पण ही पार्श्वभूमी जाणणे गरजेचे आहे. कोर्टाच्या प्रक्रियेत हे सगळे समोर येणार आहे आणि सोक्षमोक्ष होणार आहे. ज्यांचा कायदेशीर प्रक्रियेवर विश्वास आहे त्यांनी तरी संयम दाखवून ही प्रक्रिया होऊ दिली पाहिजे.

बलात्कार पीडितेचं चारित्र्यच वाईट होतं असं दाखवून बलात्कार्‍याला सोडवायच्या ट्रिक्स अजूनही चालतात.

तो माणूस कसलीही हालचाल करत नाहीए. मला श्वास घेता येत नाहीए, असं सांगतोय. त्या बिचार्‍या कोमलहृ दयी पोलिसाच्या जोडीला त्याचे तीन लाजाळू साथीदार आहेत. बाजूचे बघेही सांग तात त्याला सोड. त्याला श्वास घेता येत नाहीए. पण बिचार्‍या त्या पोलिसांच्या डोळ्यांसमोर फ्लॉइडच्या गुन्ह्यांची लांबलचक यादी त्या वेळी स्लो मोशनमध्ये सरकत होती त्यामुळे त्याला हे सगळं दिसलंच नाही.
त्या बिचार्‍या पोलिसाला झालेल्या मनस्तापाबद्दल सरकारने त्याला नुकसान भरपाई द्यावी . लग्नही मोडलं म्हणे त्याचं. हा पैसा ब्लॅक लाइव्हज मॅटर्सवाल्यांकडून वसूल करावा.

दुकाने लुटून आणि पोलिसांना गोळ्या घालून जॉर्ज ला श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या ढोंगी पुरोगामी ना साष्टांग नमस्कार !!
रस्त्यावर कार आडव्या लावून फोन , ज्वेलरी , इलेक्ट्रॉनिक्स ची दुकाने लुटून स्वतःच्या कार मध्ये बॉक्सेस भरणारे च ब्लॅकी नंतर रेसिजम बोर्ड घेवून रस्त्यावरच्या बोंबलत असतील .

आणि त्यांच्या साथीने जगभरातील पुरोगामी गळे काढायला लगेच एका पायावर तयार !
आपल्या इथले सुध्दा रेस लागल्या सारखे ट्विट करत आहेत .
रेसीजम विरोधात साथ देताना एका ही ज्ञानी पुर्रोगामी ला दुकानांच्या लूट वरून अ श्वेताचे डोळे उघडावासे वाटत नाही ?
बस ! पोलिसांना दोष द्यायचा आणि करा ट्विट !!!!

काळ्या अमेरिकन लोकांच्या हिंसेचे उत्तर गोऱ्यानी हिंसा करूनच दिला तर ते पुरोगामी सुत्रा नुसार योग्य समजले गेले पाहिजे.

आता फ्लॉईड हा अनेकदा कोकेन वगैरे बाळगल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगलेला माणूस आहे. त्याचा ह्या नोट प्रकरणात जास्त हात नसेलच असे म्हणवत नाही. पुरावे आल्यावर काय ते कळेलच. >>> होय. तोपर्यंत आधी मारून टाका. पुरावे वगैरे नंतर पाहू.

ती कालची एक लंबीचौडी कंसमिश्रित पोस्टही वाचली, त्या फ्लॉइडच्या आधीच्या गुन्ह्यांचा पाढा वाचणारी. त्या पोलिस अधिकार्‍याला बहुधा गाडीतून उतरता उतरता याची हिस्टरी सगळी समजली असावी, त्यामुळे हे एन्काउन्टर करून टाकले असावे.

बाकी अमेरिकेत गेली २००+ वर्षे दुकाने लुटायची साथ पसरली आहे व रेसिझम पेक्षाही आधी त्यावर सर्वांनी व्यक्त होणे गरजेचे आहे याची कल्पना नव्हती. तसेच दर काही दिवसांनी कोठे ना कोठेतरी बातमीत येणार्‍या रेसिझम ची चर्चा करणे म्हणजे दंगलींचे समर्थन हे ही लॉजिक नवीन आहे. कौन चक्की का पीसा आटा खाते है, तो आपणही खाल्ला पाहिजे.

प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार आणि मानसिक घडणीनुसार वेगवेगळ्या घटनांचा अन्वयार्थ लावतो.
प्रस्तुत घटनेमध्ये कोण कशावर जास्त लक्ष केंद्रित करतोय, त्याप्रमाणे प्रतिक्रिया आहेत.   
१००० प्रतिसाद आले तरी फार बदल होईल असं वाटत नाही.  

प्रक्षुब्ध जमाव हिंसक होणे ह्यात पराकोटीची निराशा दडलेली आहे. आज जवळपास ५० वर्षानंतरही मार्टीन किंग यांच्या ह्या दोन मुलाखती समयोचित (रेलेव्हंट) आहेत. आता ह्यात त्यांचे द्रष्टेपण म्हणायचे आणि एकूण समाजाचे अपयश म्हणायचे... (४ मिनीटाची एक क्लिप आहे, दुसरी २६ मि. आहे.)
https://www.youtube.com/watch?v=_K0BWXjJv5s
https://www.youtube.com/watch?v=2xsbt3a7K-8
दंगल उसळल्यावर अनेक शहरात आंदोलनकर्त्यांना तुमच्या निश्चित मागण्या सांगा असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या शुक्रवारी काही शहरात मागण्या सादर झाल्या आहेत. ह्यात 'चोकहोल्ड बंद करा' ते 'घरे माफक दरात उपलब्ध करा' पर्यंत विविध गोष्टी आहेत. (आपण ह्या आंदोलनाच्या कुठल्याही बाजूस असलो तरी दुसर्‍या बाजूची स्पेसिफीक मागणी/म्हणणे समजून घ्यायला काहीच हरकत नाही.)

वर भरत यांनी लिहिलेली पोस्ट उपरोधिक असली तरी ट्रम्प समर्थक सोशल मीडियावर याच अर्थाच्या पोस्ट्स अजिबात उपरोधाने नाही तर अतिशय गांभीर्याने लिहिलेल्या आहेत.

१. बिचारा पोलीस...He was doing just his job आणि आता त्याचे वरिष्ठ त्याची साथ देत नाहीयेत. या एका घटनेसाठी त्याला आयुष्यातून उठवायची तयारी चालू आहे. (हळहळ, चिडचिड वगैरे).
2. त्याची बायको त्याला सपोर्ट(!)ची गरज असताना त्याला टाकून देते आहे म्हणजे किती वाईट बाई आहे.
3. त्याच्या बायकोच्या शरीराबद्दल अश्लील कमेंट्स व तिच्या character बद्दल अश्लील कमेंट्स
4. काळ्याना इतकाच त्रास होत असेल तर आफ्रिकेला परत निघून जा म्हणावं.
5. हे सर्व खरंतर भारतीय लोकांमुळे झालं आहे. ते इथे गर्दी करतात, त्यांच्या मुलांमुळे आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून त्यांना हे प्रोटेस्ट वगैरे रिकामटेकडे धंदे सुचतात. भारतीयांना हाकलून द्या.
6. त्या फ्लॉईडच्या फ्युनरलला इतकी चांगली शवपेटी कशाला? लायकी होती का त्याची?

ही अशी मानसिकता आहे. याच पद्धतीच्या फोरमवर भारत-पाकिस्तान मध्ये तणाव अशी बातमी आल्यावर ट्रम्प समर्थकांनी 'पाकिस्तानने भारतावर एक अणुबॉम्ब टाकून द्यावा. म्हणजे ते सगळे डर्टी लोक मरतील आणि पृथ्वीवरचा भार कमी होईल' अशी 'आशा' व्यक्त केली होती (ही अनेकदा रिपीट होणारी कॉमन कमेंट होती.)

मी नेहमी वाचत असते. आज रहवत नाही म्हणून एक निरीक्षण लीहीते.
व्हाइटच्या जागी हिंदु/उच्चवर्णीय आणि ब्लॅकच्या जागी मुस्लीम/दलित घाला आणि वरचेच सगळे प्रतिसाद वाचा.
आपण व्हाइट-ब्लॅक संघर्षात कुठल्या बाजूने लिहीतो आणि भारतीय संदर्भात कुठल्या बाजुने ते लक्षात येईल.
शेंडेनक्षत्र, राज हे दोन्ही ठिकाणी राइटविंग च्या बाजूने बोलतात यावरून त्यांची ( कशी का असेना) कन्सिस्टंट विचारसरणी आहे हे लक्षात येते. भरत, विजयकुलकर्णी वगैरे कन्सिस्टंटली वंचितांच्या बाजूने बोलतात. बाकी बरेचजण ( प्रत्येकजण नाही) आयदर इग्नरंट किंवा स्वार्थी.

रेसिझम ची फक्त एकांगी चर्चा करणे म्हणजेच दंगलीला समर्थन यात काही वाद नाही.
आणि
दूर अमेरिकेत डोळा लावून बसणाऱ्या च्या डोळ्यातून इथल्या दंगली समर्थन बद्दल चर्चा सवयी प्रमाणे निसटल्या असतीलच यात काही शंका नाही ....

जॉर्ज बद्दल सर्वांना वाईट च वाटले होते आणि त्या गोऱ्या पोलिसांच्या दादागिरी बद्दल सगळी कडे चीड वाढली होती , पण दुसऱ्याच दिवसापासून जॉर्ज च्या समाज बांधवांनी अत्यंत दुःखी मनाने उद्योग व्यवसाय ना " हाथ भार " लावण्यास मदत करायला सुर वात केली !!!
पण एकाक्ष लोकांना ते दिसलेच नाही .

सनव, व्हाइटच्या जागी हिंदु, ब्लॅकच्या जागी मुसलीम आणि फ्लाॅयडच्या जागी अखलाक वगैरे होते तेव्हा तुम्ही/तुमच्यासारखे अनेक काय बोलत होते? अगदी तसेच जसे शेंडेनक्षत्र वरती बोलत आहेत. आता एकदम फ्लाॅयडवर दया येतेय कारण आपला फ्लाॅयड नको व्हायला अशी भिती. आपला अखलाख होणार नाही याची खात्री असल्यामुळेच मूळात तो कसा चोरच होता वगैरे कथा सांगितल्या जात होत्या. पण लिंचींग मानवताविरोधी आहे असा स्टॅड फक्त फुरोगामी लोकांनी घेतला. बाकी सगळे फुरोगामींची थट्टा, हेटाळणी करण्यात मशगुल. आता अमेरिकेत फुरोगामी व्हायला निघालेत.

पोलिटीकल प्रेफरन्स: अमेरिकेत लिबरल, भारतात अॅन्टी लिबरल अशी एक वेगळी कॅटेगरीच बनवायला हवी. खुपच लोक आहेत असे.

Pages