रामनाम लेखन जपयज्ञ वही

Submitted by धनश्री- on 29 December, 2019 - 23:58

डिसक्लेमर - लेखिका ज्योतिषावरती विश्वास ठेवते. या धाग्याचा स्कोप, तो विश्वास योग्य आहे की अयोग्य हा नाही.

भारतवारीत जशा मी भेटवस्तू दिल्या, तशाच मला भेटवस्तू मिळाल्यासुद्धा. या सर्व भेटवस्तूंमध्ये मला एक कुतूहलपूर्ण अशी लहानशी भेट मिळाली. एका मैत्रिणीच्या, ७६ वर्षिय आईकडून. ती म्हणजे 'रामनाम मंत्र जप यज्ञ वही' व २ लाल रंगाची बॉलपेने. या वहीत १००-२०० पाने असतील प्रत्येक पानावरती एकूण ३९ बाय १३ अशा ५०७ रिकाम्या चौकटी आखलेल्या असून, प्रत्येक चौकटीमध्ये तुम्ही लहान अक्षरात हवे ते लिहू शकता . प्रत्येक चौकटीं मध्ये 'श्रीराम' हा शब्द लिहावयाच्या उद्देश्याने, जेमतेम त्या आकाराची प्रत्येक चौकट आहे. लाल रंग शुभ असल्या कारणाने लाल रंगात लिहीण्याचे सुचविलेले आहे. या वह्या नंतर देवळांमार्फत हरीद्वारला जातात व मंदीरांच्या पायाभरणीमध्ये त्या पुरल्या जातात.
मला काही प्रश्न पडलेले आहेत -
(१) असे रामनाम लिहीणे, जप करणे हा रिकामटेकडा विरंगुळा आहे का?
- माझ्या मैत्रिणीच्या आई विधवा असून, निवॄत्तीपरान्त, शांत व निवांत आयुष्य जगत असून , खाण्यापीण्याची अतोनात कडक बंधने त्यांनी स्वतःला घालून घेतलेली आहेत. मन भरकटू नये - उदा अमके खावे/तमके ल्यावे अशा सहजसुलभ वासना, या वहीचा उपयोग होत असावा असा कयास.
(२) मी स्वतः ४ पाने भरुन पाहीली. सलग एक पान अ‍ॅट अ टाइम पूर्ण केले. संमिश्र अनुभव आला.
- ३ वेळेला, मला जाणवले की मनात सकारात्मक व मन निवळवणारे विचार येतात. चांगलेच विचार येतात. एका वेळेला मात्र संमिश्र विचार आले - गॉसिपी, सकारात्मक, mundane तीन्ही प्रकारचे. मात्र चारही वेळेला एक संवेग अर्थात फ्लो व सहजता साधत असल्याचे अनुभवास आले. एक पर्पझ ड्रिव्हन अ‍ॅक्टिव्हीटी असल्याचा अनुभव आला. की हे पान आपल्याला पूर्ण भरायचे आहे, हा तो पर्पझ. त्यातून एक आनंद मिळाला.
(३) सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे
- सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे, यामध्ये तत्वतः फरक आहे हे मान्य आहे. सुडोकूमध्ये मेंदूला चालना मिळते, तल्लखता जाणवते. याउलट रामनाम लिहीण्यामध्ये (मनात जप करत करत) एक शांत सहज संवेगाचा अनुभव येतो. या दोन्हीमध्ये क्वालिटेटिव्ह फरक काय? उदा - डिप्रेशन/अवसादात सुडोकू चा वापर करावा ज्यायोगे, मेंदू अ‍ॅक्टिव्हेट करणारी रसायने अधिक निर्माण होतील याउलट उन्मादामध्ये, रामनामामुळे शांत वाटेल - वगैरे प्रकारचा काहीही रिसर्च माझ्यातरी पहाण्यात आलेला नाही. पण ते तसे नसेलच अशी गॅरंटी नाही. अर्थात हा माझा अंदाज आहे. कोणी विदा जमविल्यास, विश्लेषण केल्यास, पूर्ण संशोधनांती काही हाती लागू शकेल.
सुडोकू खेळणे किंवा तत्सम मेंदूस चालना देणारी अ‍ॅक्टीव्हीटी व रामनाम लेखन जपयज्ञ या म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह अ‍ॅक्टिवीटीज आहेत असे मला म्हणायचे नसून, मी फक्त तुलनात्मक दृष्टीकोनामधून दोन्हींकडे पहात आहे.
(४) कोणी हा लेखन यज्ञ 'कन्सिस्टंटली ( चिकाटीने )' केलेला असल्यास, तुमचा अनुभव काय आहे?
मला स्वतःला स्तोत्रे म्हटल्याने फार बरे वाटते. पण त्या मागे शब्दप्रेम, नादाची भुरळ या बाबी आहेत हे मान्य आहे. रामनाम लेखनाचा अनुभव नाही. एक दोन वेळा मनाचे श्लोक लिहून काढलेले आहेत. मनाचे श्लोक वेगळे. ते लिहीताना, मनात रुजू लागतात. पण हे जे 'रीपीटीटिव्ह' श्रीराम-श्रीराम-श्रीराम लिहीणे आहे, तो नक्की वेगळ्य प्रकारचा अनुभव आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अजुन एक मुद्दा- प्रत्येक व्यक्ती तिच्या कलानुसार, आकलनानुसार, दिवसभरातील घटनांची संगती लावण्याचा प्रयत्न करीत असते मीही अपवाद नाही. ही वही मला मिळाली ती तारीख व वेळ याची कुंडली मांडली असता पुढील नीरीक्षण दिसले.

ही कुंडली माझ्या कुंडलीशी (लग्न=मिथुन) मोठ्या प्रमाणात, रेझोनेट होते (निदानपक्षी तसे मला माझ्या अर्धवट ज्ञानामधुन वाटते तरी. असो.) सातवे घर हे गुरुचे घर असते कारण तुमचे गुरु तुमच्या समोरासमोर आसनस्थ असतात. जर कुंडलीतील, लग्नस्थान म्हणजे तुम्ही असाल तर, अर्थात बरोब्बर तुमच्या समोरचे स्थान हे गुरुचे असते. सातव्या घरात या विशिष्ठ वेळी बरीच घडामोड असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मला या लेखनाच्या बाबतीत खरच जाणून घ्यायचे आहे. मूळ नक्षत्रामध्ये गुरु व सूर्य असून, काहीतरी 'आमूलाग्र बदलाचे निदर्शक' किंवा एखाद्या बाबीच्या मूळाशी जाउन तपास करण्याचे हे नक्षत्र निदर्शक आहे. थोडक्यात,जिगसॉ पझलचे बरेच तुकडे माझ्याकरता, फिट बसताना मला तरी दिसत आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>आपला ओढा कुठे आहे हे एकदा पारखून त्याच मार्गाने चाललेले सर्वात उत्तम.>>>>> करेक्ट! मला कुंडलिनी मार्गात गम्य नाही.

Proud

हे लोक जे डिस्कशन करत आहेत , त्या शक्तीवर आपला कंट्रोल राहिला तर तो नाग असतो , अन्यथा त्याचा अजगर होतो आणि तो स्वाहा करतो.

तज्ज्ञ खुलासा करतीलच.

हिंदू ग्रंथात त्याचा उल्लेख कुंडलिनी , वेटोळेधारी नाग असा आहे, बायबलमध्ये त्याचा उल्लेख Jacob's ladder असा केला आहे, म्हणजे शिडी असे प्रतीक वापरले आहे. कुराणातही याचा उल्लेख मेराज ( म्हणजे शिडी ) असा केलेला आहे.

हे सगळे उल्लेख ह्या एकाच मानवी अवयवाबद्दल आहेत: पाठीचा कणा

unnamed_0.png

हिंदू धर्मग्रंथात , प्रत्येका एकेका स्टेपला एक चक्र असते अशी कल्पना आहे, प्रत्येक चक्राचे एका फुलाप्रमाणे वर्णन आहे, त्याला स्वतःचा एक रंग आहे, बीजमंत्र आहे, एक वाद्य आहे, आणि एक देवताही आहे, उदा सर्वात खालचे चक्र मूलाधारचक्र गणपतीचे , तिथे लाल रंग आहे, जासवंदीचा( त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम, असे अथर्वशीर्षात आहे. ते त्यासाठीच)

वरच्या चित्रात वर मोरपंखी रंग दिसत आहे , कुंडलिनी तिथे म्हणजे आज्ञाचक्रात आली की मोरपंखी रंगाचा अनुभव येतो , बासरीचा नाद ऐकू येतो , वैरभाव नष्ट होतो, ( काही आठवले का ? भानुदासाचे वृन्दावनी वेणू हे गाणे !)

अशी वर्णने आहेत

>>>हिंदू ग्रंथात त्याचा उल्लेख कुंडलिनी , वेटोळेधारी नाग असा आहे, बायबलमध्ये त्याचा उल्लेख Jacob's ladder असे केले आहे, म्हणजे शिडी असे प्रतीक वापरले आहे. कुराणातही याचा उल्लेख मेराज ( म्हणजे शिडी ) असा केलेला आहे.>>>>>> उत्तम माहीती

आज एक नेटवरती, नामस्मरणाबद्दल, पुस्तक सापडले. वाचते आहे. आवडते आहे.

Simple chanting illuminates all planes of consciousness, like a single switch which can bring about flood lights illuminating every nook and corner. - NAMASMARAN AND SUPERLIVING (श्रीनिवास जनार्दन कशळीकर)

राग मानू नका. धागा वर आणण्यासाठी टंकण्यापेक्षा अगोदर ती वही रामनाम लिहून पुर्ण करा हो.

धन्यवाद आदिश्री पहाते.
आज एका मैत्रिणीसमवेत गुरुद्वाराला जाण्याचा योग आला. आम्ही,हात-पाय धुवून प्रवेश केला, तख्त ज्यावर गुरु ग्रंथसाहीब स्थानापन्न असतो त्याचे दर्शन घेतले, वयोवृद्ध बाबाजी चौरी (चवरी) ढाळीत होते. प्रदक्षिणा घातली व बसलो. प्रसन्न वातावरण, मोठठं झुंबर,गायन वादन झाल्या नंतर आम्ही लंगरचा प्रसाद खाण्यास गेलो. जेवणास सुरुवात करतो तोच मैत्रीण म्हणाली तिला अतिशय तहान लागली आहे. ती उठून पाणी घेउन येणार तोच एक सरदारजी पाणी वाढत वाढत आमच्यापर्यंत येउन, पाणी हवे का विचारु लागले. आम्ही थक्क झालो. जेवणानंतर शेवटी ती म्हणाली म्हटलं घेऊ म्हटलं ठीके उठुन त्या पिंपातला चहा घ्यायचा. इतक्यात तेच सरदारजी चहा घेउन हजर.
मलाच लाज वाटली की प्रतिभाताईंच्या त्या व्हिडीओत, कशाला खोड्या काढल्या मी Sad मी लिहीले होते मनात इच्छा यायचा अवकाश की त्यांच्या इच्छा पूर्ण होत होत्या - हे काही पटले नाही.
इथे अगदी तोच अगदी तोच अनुभव आम्हाला दोघींना आज आला. काय प्रॉबेबिलिटी होती!
उगाच परत खोड्या काढायच्या नाहीत - हा निश्चय केलेला आहे.

इथे अगदी तोच अगदी तोच अनुभव आम्हाला दोघींना आज आला. >> होतच होत्या इच्छा पूर्ण तर पाणी आणि चहा मागितलं ... यहीं मार खा जाती है इंडिया!!! Wink Happy
आता गुरूद्वाराला जाऊन आल्यावर दोघींच्या मोठ्या (किंवा पूर्ती दृष्टीपथात नसलेल्या) इच्छा ही पूर्ण होवोत ही शुभेच्छा!

> होतच होत्या इच्छा पूर्ण तर पाणी आणि चहा मागितलं ... यहीं मार खा जाती है इंडिया!!! > हा हा हा
एकदा दुपारी दशभुजा मंदिरात गेले होते. गर्दी नव्हती. देवासमोर हात जोडून उभं असताना शेजारी एक मुलगी येऊन थांबली. तिच्या हातात मोठ्ठा मिठाईचा बॉक्स होता. डोळे बंद करताकरता माझ्या मनात विचार आला "त्या बॉक्समधे जे काही आहे ते मला खायला मिळेल का?"
अन् नंतर त्या मुलीने खरंच बॉक्स उघडून मिठाई लोकांना वाटायला चालू केली की! मलापण मिळाली Proud Proud

योगविचार
पाच कोषांचे कार्य खालील प्रमाणे असते
१)अन्नमय कोष -शारीरिक क्रिया करणे .
२)प्राणमय कोष - प्राणांच्या क्रिया करणे .
३)मनोमय कोष -बर् या वाईट भावना उत्पन्न करणार् या मनोमय क्रिया करणे .
४विज्ञानमय कोष- बौध्दिक विचार करणारी विज्ञानमय क्रिया करणे .
५)आनंदमय कोष - ईश्वराचा अनुभव देणारी आनंदमय क्रिया करणे .
सर्वव्यापी शुध्द चैतन्य हेच फक्त आपले सत्य स्वरूप आहे हे न समजल्याने आपण अलग अलग प्रकृती कोषाशी जेव्हा तादात्म्य पावत असतो तेव्हा आपल्यापैकी प्रत्येक जण क्षणाक्षणाला आपण आपल्यामधील संमिश्र व्यक्तीत्व आहेत असे समजून वागत असतो
ध्यानसाधनेनेच परमोच्च सत्य तत्वाची अनुभूती प्राप्त होते . परंतु ध्यानसाधनेपर्यंत पोहोचणारी नौका जपाद्वारेच भक्तीच्या अभायासाने सुसज्ज केली जाते .
जपामध्ये भक्तीमार्ग , कर्ममार्ग आणि ज्ञानयोग या सर्वांचे एकत्रित कार्य होत असते ,
जप हे असे संस्करण आहे की ज्यायोगे सतत नृत्य करणार् या
मनातील विचार शलाका ह्यांना एका विशिष्ट क्रमात आणि तालात वागावे लागते आणि त्यांच्या सहकारी प्रयत्नातून होणार् या सतत मंत्रोच्चाराचे एक ध्वनिमाधूर्य निर्माण केले जाते .
मनाला एकाच विचारधारेत गुंतविण्याकरिता जप हे मनाचे संस्करण ठरते .
जपकर्म हे यज्ञकर्मच आहे असे समजा . मन स्वत:च्या अज्ञानी आसक्तीने स्वत:लाच विषय वस्तू व सजीव प्राणी, घटना व परिस्थिती यांच्याबरोबर कशाप्रकारे घट्ट जखडून टाकते यावर लक्ष ठेवा .
सर्व अतिरेकापासून मनाचे रक्षण करा .

आपल्याला येणारे अनुभव हे रस्त्यांत लागणाऱ्या मैलांच्या दगडासारखे असतात असे गोंदवलेकर महाराज म्हणतात. आपला रस्ता चुकलेला नाही याची ती खूण असते.

मात्र इतरांना न येणारा अनुभव, आपल्याला आला म्हणजे आपण कोणी विशेष आहोत अशी समजूत व्हायची शक्यता असते. ती चूक टाळायची असते.

नामदेव महाराजांना लहानपणातच देव भेटला होता. त्यामुळे आपण विशेष कोणितरी आहोत असे त्यांना वाटे. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटली होती. शेवटी मुक्ताबाईंना हातात थापटणे घेऊन मडकं अजून कच्चे असल्याचे सांगायला लागले होते.

मी फक्त मनांत आलेले विचार मांडले. इथे आपले अनुभव लिहिणाऱ्यांची काही चूक होते आहे असे मला अजिबात सुचवायचे नाहीये. अध्यात्मात प्रगती करत असलेल्यांना ही सावधगिरी नेहमीच बाळगायला लागते.

कृपया गैरसमज टाळावा.
_/\_

तीन वेळा सुगंध आलेले आहेत. कसे माहीते! लहानपणी, अगदी बालपणी कधी तरी झुळकेसरशी आलेला फ्लीटिंग सुवास. कसल्याशा स्मॄतीबरोबर निगडीत पण इतका फ्लीटिंग की काहीतरी विसरलेले आअठवते न आठवते तो च विसरले जाते. असा.
पण ते तसे येउ नयेत असे वाटते मला. कारण माझा या रुप-रंग-गंधावरती विश्वास नाही. मला तो केमिकल लोचा वाटतो. हे मी माझ्यापुरते बोलत आहे. तेव्हा हे रंग व गंध न आलेलेच बरे अशी माझी पक्की धारणा आहे.

रंग , गंध , आवाज हे त्या त्या चक्राबाबत असतात म्हणे
ह्यात तुम्ही काही ठरवून होत नाही

मला वाटते कोहंसोहं१० यांना पाहिजे असावे.
कोहंसोहं आठवत होतं. पण १० आकडा आठवत नव्हता.

लहानपणी नागपंचमीला गारूडी नाग घेऊन घरी यायचा. १० चा आकडा दाखवला तरच नागाची पूजा व्हायची. त्याची एकदम आठवण झाली. Happy

कोहंसोहं तुम्हाला काही म्हणत नाहीये. गैरसमज नसावा.

के अश्विनी यांनी छान सांगितलंय.
रामनाम सिध्दच आहे.

प्रथम ते श्रद्धेय नसेलही. पण सहवासाने प्रेम येते. त्यामुळे ते नंतर श्रद्धेय बनू शकते. अनुभव यायला लागल्यावर श्रध्दा दृठ होते.

“ॐ” या जपाचा काही सांसारिकांना त्रास होऊ शकतो असे म्हणतात. कारण त्याच्या जपामुळे उष्णता निर्माण होते. ही थर्मामीटरमधे मोजता येते की नाही ते माहीत नाही. यास्तव त्याचे स्वरूप सौम्य केले तेच रामनाम होय.

हे नक्की कुठे वाचले ते आठवत नाही. १९९४ सालच्या अगोदर कधीतरी वाचले असावे. असो.

आशा करते कोणी माझी मस्करी करणार नाही. पण जेव्हा जेव्हा मी रामनाम घ्यायला सुरुवात केली, त्या त्या रात्री, मला रात्रभर खूप वाईट, त्रासदायक स्वप्ने पडली. अगदी मध्ये आदिश्रींचा सुद्धा गीतरामायणावर एक धागा आला होता. त्यादिवशी पण मी थोडा वेळ रामनाम घेतले. तेव्हाही रात्री प्रचंड त्रास झाला. खूप भीतीदायक, खराब स्वप्ने पडली. मला इतर मंत्रांचा असा त्रास जाणवला नाही. फक्त रामनाम घेतले की मगच असा त्रास जाणवला. तेव्हापासून इच्छा असूनही मी रामनाम घ्यायचं टाळते. Sad

मी पण हे वाचले आहे ओम बाबत आणि रम् बाबत.
स्वामी दत्तावधूत यांच्या मानवी जीवनाची गूढ रहस्ये भाग १-६ , आणि विहंगम मार्ग या पैकी एका पुस्तकात.
रम् चे राम केले नाही तर अग्नी वाढतो जो सामान्य माणसाला सहन होत नाही असे त्यांनी सांगितले आहे.
Sorry नौटंकी Sad !

>>>जेव्हा जेव्हा मी रामनाम घ्यायला सुरुवात केली....>>
नौटंकी मलाही पहील्यांदा त्रास होत असे. खरच टँजिएबल त्रास. पण नंतर मी फक्त राम ऐवजी श्रीराम म्हणु लागले व 'रा' लांबवु लागले. त्रास थांबला. बालाजी तांबे म्हणतात एका युट्युब व्हिडीओत की फक्त राम म्हणु नका श्रीराम असे उच्चारण करा.

वारूळात काठी घातली की, आपल्या अस्तित्वावरच संकट आले आहे असे वाटून, मुंग्या त्वेषाने बाहेर येतात. तसेच भगवंताचे नाम घ्यायला लागले की, आपले आता काही खरे नाही असे वाटून विकार सर्वशक्तिनीशी बाहेर यायला लागतात.

विकारांना नामाची आच (धग) लागल्यामुळे असे होते. मला वाटते गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात याबद्दलचा उल्लेख आहे.

वारूळात काठी घातली की, आपल्या अस्तित्वावरच संकट आले आहे असे वाटून, मुंग्या त्वेषाने बाहेर येतात. तसेच भगवंताचे नाम घ्यायला लागले की, आपले आता काही खरे नाही असे वाटून विकार सर्वशक्तिनीशी बाहेर यायला लागतात.

विकारांना नामाची आच (धग) लागल्यामुळे असे होते. मला वाटते गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात याबद्दलचा उल्लेख आहे.

>> असंही होत असेल.

Pages