रामनाम लेखन जपयज्ञ वही

Submitted by सामो on 29 December, 2019 - 23:58

डिसक्लेमर - लेखिका ज्योतिषावरती विश्वास ठेवते. या धाग्याचा स्कोप, तो विश्वास योग्य आहे की अयोग्य हा नाही.

भारतवारीत जशा मी भेटवस्तू दिल्या, तशाच मला भेटवस्तू मिळाल्यासुद्धा. या सर्व भेटवस्तूंमध्ये मला एक कुतूहलपूर्ण अशी लहानशी भेट मिळाली. एका मैत्रिणीच्या, ७६ वर्षिय आईकडून. ती म्हणजे 'रामनाम मंत्र जप यज्ञ वही' व २ लाल रंगाची बॉलपेने. या वहीत १००-२०० पाने असतील प्रत्येक पानावरती एकूण ३९ बाय १३ अशा ५०७ रिकाम्या चौकटी आखलेल्या असून, प्रत्येक चौकटीमध्ये तुम्ही लहान अक्षरात हवे ते लिहू शकता . प्रत्येक चौकटीं मध्ये 'श्रीराम' हा शब्द लिहावयाच्या उद्देश्याने, जेमतेम त्या आकाराची प्रत्येक चौकट आहे. लाल रंग शुभ असल्या कारणाने लाल रंगात लिहीण्याचे सुचविलेले आहे. या वह्या नंतर देवळांमार्फत हरीद्वारला जातात व मंदीरांच्या पायाभरणीमध्ये त्या पुरल्या जातात.
मला काही प्रश्न पडलेले आहेत -
(१) असे रामनाम लिहीणे, जप करणे हा रिकामटेकडा विरंगुळा आहे का?
- माझ्या मैत्रिणीच्या आई विधवा असून, निवॄत्तीपरान्त, शांत व निवांत आयुष्य जगत असून , खाण्यापीण्याची अतोनात कडक बंधने त्यांनी स्वतःला घालून घेतलेली आहेत. मन भरकटू नये - उदा अमके खावे/तमके ल्यावे अशा सहजसुलभ वासना, या वहीचा उपयोग होत असावा असा कयास.
(२) मी स्वतः ४ पाने भरुन पाहीली. सलग एक पान अ‍ॅट अ टाइम पूर्ण केले. संमिश्र अनुभव आला.
- ३ वेळेला, मला जाणवले की मनात सकारात्मक व मन निवळवणारे विचार येतात. चांगलेच विचार येतात. एका वेळेला मात्र संमिश्र विचार आले - गॉसिपी, सकारात्मक, mundane तीन्ही प्रकारचे. मात्र चारही वेळेला एक संवेग अर्थात फ्लो व सहजता साधत असल्याचे अनुभवास आले. एक पर्पझ ड्रिव्हन अ‍ॅक्टिव्हीटी असल्याचा अनुभव आला. की हे पान आपल्याला पूर्ण भरायचे आहे, हा तो पर्पझ. त्यातून एक आनंद मिळाला.
(३) सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे
- सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे, यामध्ये तत्वतः फरक आहे हे मान्य आहे. सुडोकूमध्ये मेंदूला चालना मिळते, तल्लखता जाणवते. याउलट रामनाम लिहीण्यामध्ये (मनात जप करत करत) एक शांत सहज संवेगाचा अनुभव येतो. या दोन्हीमध्ये क्वालिटेटिव्ह फरक काय? उदा - डिप्रेशन/अवसादात सुडोकू चा वापर करावा ज्यायोगे, मेंदू अ‍ॅक्टिव्हेट करणारी रसायने अधिक निर्माण होतील याउलट उन्मादामध्ये, रामनामामुळे शांत वाटेल - वगैरे प्रकारचा काहीही रिसर्च माझ्यातरी पहाण्यात आलेला नाही. पण ते तसे नसेलच अशी गॅरंटी नाही. अर्थात हा माझा अंदाज आहे. कोणी विदा जमविल्यास, विश्लेषण केल्यास, पूर्ण संशोधनांती काही हाती लागू शकेल.
सुडोकू खेळणे किंवा तत्सम मेंदूस चालना देणारी अ‍ॅक्टीव्हीटी व रामनाम लेखन जपयज्ञ या म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह अ‍ॅक्टिवीटीज आहेत असे मला म्हणायचे नसून, मी फक्त तुलनात्मक दृष्टीकोनामधून दोन्हींकडे पहात आहे.
(४) कोणी हा लेखन यज्ञ 'कन्सिस्टंटली ( चिकाटीने )' केलेला असल्यास, तुमचा अनुभव काय आहे?
मला स्वतःला स्तोत्रे म्हटल्याने फार बरे वाटते. पण त्या मागे शब्दप्रेम, नादाची भुरळ या बाबी आहेत हे मान्य आहे. रामनाम लेखनाचा अनुभव नाही. एक दोन वेळा मनाचे श्लोक लिहून काढलेले आहेत. मनाचे श्लोक वेगळे. ते लिहीताना, मनात रुजू लागतात. पण हे जे 'रीपीटीटिव्ह' श्रीराम-श्रीराम-श्रीराम लिहीणे आहे, तो नक्की वेगळ्य प्रकारचा अनुभव आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अजुन एक मुद्दा- प्रत्येक व्यक्ती तिच्या कलानुसार, आकलनानुसार, दिवसभरातील घटनांची संगती लावण्याचा प्रयत्न करीत असते मीही अपवाद नाही. ही वही मला मिळाली ती तारीख व वेळ याची कुंडली मांडली असता पुढील नीरीक्षण दिसले.

ही कुंडली माझ्या कुंडलीशी (लग्न=मिथुन) मोठ्या प्रमाणात, रेझोनेट होते (निदानपक्षी तसे मला माझ्या अर्धवट ज्ञानामधुन वाटते तरी. असो.) सातवे घर हे गुरुचे घर असते कारण तुमचे गुरु तुमच्या समोरासमोर आसनस्थ असतात. जर कुंडलीतील, लग्नस्थान म्हणजे तुम्ही असाल तर, अर्थात बरोब्बर तुमच्या समोरचे स्थान हे गुरुचे असते. सातव्या घरात या विशिष्ठ वेळी बरीच घडामोड असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मला या लेखनाच्या बाबतीत खरच जाणून घ्यायचे आहे. मूळ नक्षत्रामध्ये गुरु व सूर्य असून, काहीतरी 'आमूलाग्र बदलाचे निदर्शक' किंवा एखाद्या बाबीच्या मूळाशी जाउन तपास करण्याचे हे नक्षत्र निदर्शक आहे. थोडक्यात,जिगसॉ पझलचे बरेच तुकडे माझ्याकरता, फिट बसताना मला तरी दिसत आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक औषध प्रत्येक रुग्णाला लागू पडेल असे नाही
तद्वत एक उपासनेचा मार्ग दुसऱ्याला लागू पडेल असे नाही.
नामस्मरण हा उपासनेचा एक मार्ग आहे ज्याला रुचेल त्याने तो करावा.
नामस्मरण केले नाही म्हणून एखाद्याची प्रगती होणार नाही असेहो नाही किंवा एखाद्याने नामस्मरण केले तर त्याला अगणित फायदाही होऊ शकतो मग तो मानसिक का होईना?
ब्रम्हविद्या ध्यान धारणा प्राणायाम योग् हे सर्व शेवटी तुमच्या आत्मिक विकासाचे मार्ग आहेत.जसे वस्त्र विकत घेण्याचा अगोदर आपल्याला ते "फिट" होते की नहो हे आपण घालून पाहतो तद्वत ज्याला ज्याने फायदा होतो ते त्याने स्वतः: चोखाळून पाहणे आवश्यक आहे.
एकाच कपडा सर्वांना बरोबर बसेल असे नाही तसेच उपासना मार्गाचे आहे.

https://neurosciencenews.com/cognition-meditation-breathing-9026/
Meditation and Breathing Exercises Can Sharpen Your Mind

How Breath-Control Can Change Your Life: A Systematic Review on Psycho-Physiological Correlates of Slow Breathing
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6137615/

Meditation and Yoga can Modulate Brain Mechanisms that affect Behavior and Anxiety-A Modern Scientific Perspective
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4769029/

सामो, माझी आई रामनाम लिहायची सतत. मी लहान असल्यापासून बघितलं आहे, बरेच वर्ष लिहायची. आमच्याकडे होत्या वह्या त्याच्या, फक्त राम राम लिहायची. तिने अजून ठेवल्यात का त्या वह्या विचारायला हवं.

मला स्वतः ला कुंडलिनी जागृत/क्रियाशील झाल्याचा अनुभव आहे. Near death experience..।। हजारो सूर्य तारे माझ्या समोर दिसले..मिटले तरी..उघडले तरी. श्वास कुणी तरी नियंत्रीत करत होते... बेशुध्द पडायला झाले....It took me 3 days to realise what actually happened....कोणीही गुरू नाही.. सदेह गुरुंंवर विश्वास नव्हता... कसलीही माहिती नव्हती... साधना करावी वाटली बस्...खूप लवकर अनुभव आले...आपोआपच क्रिया होतात...फक्त बसायला लागते... झोपेत सुद्धा ज्ञानमुद्रेत बोट चुंबकीय शक्तीने जोडली जातात... एक ऊर्जेचा प्रवाह जाणवतो... चक्र जागृत झाले की विविध प्रकारची सुचक स्वप्ने पडतात... डमरू ऐकला की रोमांच येऊन...काही सुचेनासे होते....अगदी सुरुवातीला मी ब्रह्मांडात तरंगत आहे ...सगळीकडून पण तरीही कुठूनही नाही असा गंभीर ओमकार ऐकू येत आहे ...नंतर मी माझ्या मनक्यामधुन श्वास रुपाने वरवर जाते आहे.. तो मनका मीच आहे श्वास मी आहे... ते शरीर मीच आहे...असे स्वप्न... मी ढगांच्या वर ऊभी आहे आणि त्रिमुखी बाळ ज्याचा रंग गुलाबी कमळासारखा आहे... ते रांगत आले आणि हसले...माझ्या गळ्यात headboard वरुन सरपटत नाग येऊन बसला आहे...खूप अनुभव आहेत...पण कुणी विश्वास ठेवणार नाही म्हणून सांगावे वाटले नाही...सहा प्रकारचा अनाहत नाद ऐकला आहे.. ध्यानात नेहमीच वेगवेगळ्या प्रकाशाचे दर्शन होते... आता तर कधीही होते...आपली कुंडलिनी आपली गुरू आहे...ती प्रत्येकाला आहे...
Having no guru is better than having a wrong one...ही एकच ओळ श्री एमनी मला माझ्या प्रश्नावर ऊत्तर म्हणून पाठवली होती...कारण मला माझ्यासोबत काय चाललंय कळत नव्हते....क्रुपया कुंडलिनी ला घाबरु नका ती विश्वाची माता आहे... Our nervous system has to be really fit and prepared for it otherwise it won't happen ...It cannot be an accident. सामो हे माझे खरे अनुभव आहेत.
जिद्दू तुम्ही please लिहीता का मला वाचायला आवडेल.

आदिश्री my god, मी नि:शब्द.

तुमची अध्यात्मिक प्रगती सॉलिड दिसतेय. मला कुंडलिनी प्रकारची भीती वाटते मात्र. तुमचे अनुभव वाचून मला तुम्ही कोणीतरी योगी आत्माच आहात असं वाटतंय पण कशामुळे तरी तुम्ही एवढ्या त्रासातून जाताय.

श्री एम नी तुम्हाला reply दिला, ग्रेट. मी त्यांचं पुस्तक वाचलंय. नवरा माझा क्रियायोग साधक आहे.

वा आदिश्री तुम्ही बॉर्न गिफ़्टेड आहात. तुमचे अनुभव सहजावस्थेत आलेले नैसर्गिक अनुभव आहेत. अशी माणसे आता फार दुर्मिळ झालीत. माझा रोख विविध मार्गाने बळजबरीने केल्या जाणाऱ्या कुंडलीजागृतीकडे आहे. कोणत्या विषयावर लिहु म्हणता ? मोकळा वेळ असला तर सविस्तर लिहिता येतं आणि मुद्दे अर्धवट राहत नाहीत.

सामो अनुभव ऐकले दोन भाग. सुरेखच. ही परिक्रमा करायलाच हवी. प्रत्येक पावलाला नामस्मरण. यज्ञ पाऊलो पाऊली. आहा हा!

>>>>>>>>लेखन जपयज्ञ का बोलतात ? जप लिहून झाला की ती वही यज्ञ कुंडात टाकतात का ?>>> माहीत नाही माझ्या वहीचे नाव तसे आहे.

>>>>>>>>लेखन जपयज्ञ का बोलतात ? जप लिहून झाला की ती वही यज्ञ कुंडात टाकतात का ?>>> माहीत नाही माझ्या वहीचे नाव तसे आहे.

>>>> या वह्या नंतर देवळांमार्फत हरीद्वारला जातात >>>Iमी टाकून देणार आहे.

सामो वही टाकून नका देउ.. घरातच ठेवा.. कधी ना कधी उपयोगी पडेल. ह्या अश्या वह्या घरातील निगेटीविटीला बॅलन्स करतात असे म्हणतात.
बाकी सगळे प्रतिसाद रोचक आहेत

धन्यवाद विश्वास ठेवल्या बद्दल.....जिद्दू तुम्ही कुंडलिनी वर एक वेगळा लेख लिहू शकता का...तुम्हाला बरीच माहिती आहे.
मी याकरिता लिहिले की माझा प्रवास पण जप आणि नामस्मरण यांनीच सुरू झाला होता. मलाही कुंडलिनी जाग्रुती सर्वसंगपरित्याग केलेल्या हिमालयातल्या साधुंचीच होते असे वाटत होते... मी त्याबाबत जाणून घेतले नाही कारण मी संसारी ..पण ते काही खरे नाही..... परमेश्वरावर प्रेम आणि मी कोण हे जाणून घ्यायची प्रामाणिक तळमळ... या दोन गोष्टी तीव्रतेने असल्याकी झाले..
मी गिफ्टेड आहे का माहिती नाही..पण मी फारच अनियमीत होते सुरुवातीला साधने बाबतीत... सगळी कर्तव्य करून मग बसायचे...रागही आहे... निरीच्छ नाही पूर्णपणे... तरीही माझ्या वर क्रुपा झाली... तर कुणावरही होऊ शकते....
कुंडलिनी ही आपला spiritual DNA and literally like a black box of our Karma...जप नामस्मरण हे सगळे ती करून घेऊन आपली प्रारब्धशुद्धी करून आपल्याला मुक्त करते. हळूहळू पण निश्चित असा हा प्रवास जन्मोजन्मी चालू असतो. तो कुठल्याही धर्माच्या किंवा स्थानाच्या लिंगाच्या ...संसारी किंवा सन्यासी असण्याच्या ....अगदी कशाच्याही अंकीत नाही.
मला स्वप्नात गुरु नानक यांनी सुद्धा तीर्थ मस्तकावर टाकून एक मंत्र सांगितला. मला त्याचा ओघळ कपाळावर ...मग नाकावर व हनुवटीवर जाणवून जाग आली...तो मंत्रही मुखात होता....मी कधीही त्यांची भक्ती केलेली नाही... आदर आहे.
काहीही करून भगवंताची आठवण ठेवावी. एकेक दिवस मोलाचा मानून नामस्मरणात भर घालावी.

>>>एकेक दिवस मोलाचा मानून नामस्मरणात भर घालावी.>>>>
बळे लागला काळ हा पाठीलागी - हेच सत्य आहे. हेच सत्य आहे.

आदिश्री,
कुंडलिनी उत्थानानंतरचे तुमचे अनुभव भावविश्व समृद्ध करणारे आहेत.
एक कुतूहल म्हणून तुमच्याशी हसलेल्या त्या त्रिमुखी बाळाशी संवाद साधण्याचा कधी प्रयत्न केलात का ? वर तुम्ही लिहिलंय की 'कोणी गुरू नाही', तुमचा पुढील प्रवास त्याच्यासोबत असेल असं वाटतं.

राम हृदय में हैं मेरे, राम ही धड़कन में हैं
राम मेरी आत्मा में, राम ही जीवन में हैं
राम हर पल में हैं मेरे, राम हैं हर श्वास में
राम हर आशा में मेरी, राम ही हर आस में

राम ही तो करुणा में हैं, शान्ति में राम हैं
राम ही हैं एकता में, प्रगती में राम हैं
राम बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में हैं
देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं

राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं
मन से रावण जो निकाले, राम उसके मन मे है Happy

- शाहरूख खान, स्वदेस

ते नॅशनल जिओग्राफिक चॅनलमध्ये दाखवतात ना की कोणतेतरी अत्यंत प्रिमिटिव्ह जीवजंतू समुद्रात किंवा कुठेतरी नाल्यात तडफडतात. पुढे अतिशय स्वकष्टांनी १ पाउल पुढे टाकले न टाकले तोच लाटांच्या तडाख्याने, १० पावले मागे जातात. कोसळतात, लडखडतात. काहीजण मरतात, जखमी होतात. एखाद जगतो-वाचतो किनार्‍याला लागतो.
तसे माझे झालेले आहे. नामस्मरण करा एक माळ आणिक परनिंदेत, वासनेत. लोभात व अन्य जीवांना नकळत दु:ख देण्यात ती एक जपमाळ तर गमवाच पण अजुनही पुण्यसंचय वेठीस धरा.
गंमत म्हणजे हा साक्षात्कारही गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने होउ शकतो आहे. सतत त्यांच्याबद्दल वाचल्याने, त्यांची शिकवण (जप करा) आठवल्याने, मग वरील दोष लक्षात येउ लागला. महाराज म्हणतात = परद्रव्याची अभिलाषा धरू नका. त्याला विष्ठेसमान माना. परस्त्री, परद्रव्य, यांच्याप्रमाणेच परनिंदा ही अत्यंत त्याज्य आहे. पण रहावतं कुठे आपल्याला? कोणतही इमॅजिनरी/काल्पनिक दुखावल्याचे निमित्त घेउन मनातल्या मनात का होइना, किंवा उघडपणे आपण (मी) परनिंदा करतो. एका माळेने काय होणार जर रोगाची मूळेच खोलवर गेलेली असतील.
__________________________
अजुन एक लक्षात आलेली बाब म्हणजे, कुंडलीनुसारच घडत गेले. माझे दोष, कर्मे ही स्थूल रुपात प्रकट झाल्यावरच मग महाराजांची ओढ मनात सुरु झाली. आता याला 'सौ चूहे खा के बिल्ली चली हज' टाइपची उपरती म्हणेल कोणी तर म्हणो बापडे. पण वाल्याचाच, वाल्मिकी होतो. महाराजच सांगतत की त्यांना व्यसनी, दुर्गुणी , लोक (याचा मी अर्थ घेतला तमव रज गुण प्रधान लोक ) फार आवडतात कारण एकदा का या लोकांना नामाची गोडी लागली की नंतर ते त्याच झीलने (zeal), पॅशनने, नाम घेऊ लागतात. मग ते पहीला मार्ग जितक्या कडवेपणे चोखाळला तितक्याच उर्जेने दुसरा (=नाम) मार्गही चोखाळतात.

छान.

आपल्या चुका मनापासून कबूल करता येण्यासारखे भाग्य नाही.
ते जमले की उत्थान सुरू होते.
मला वाटते तुम्हाला मार्ग सापडायला लागलाय.
प्रथम संख्या वाढवत रहा.
दर्जा आपोआप वाढत राहील.

भगवंताच्या नामात भगवंत स्वत: असतो. सत्गुरूही त्या नामातच असतात. हा भाव ठेऊन साधना करा. बाकी काही करायला लागत नाही.
भावबळे आकळे येरवी नाकळे ।
करतळी आवळे तैसा हरी ।।हरिपाठ १२.२।।

असं माऊलींनी सांगीतल आहे. तेव्हा भाव धरणे महत्वाचे. नामाला स्वत:ची गोडी नसते. भाव धरला की गोडी येते.

नाम कसं काम करते हे तर्काने समजून घेणे जवळपास अशक्य आहे. नाम कळीकाळावरही मात कशी करू शकते, त्याचे आकलन वेदांनाही झाले नाही. मग आपल्यासारख्या सामान्यांना चर्चा करून ते कसे बरे कळेल.
त्यापेक्षा नामस्मरण करून स्वत: पडताळा घेणे त्यामानाने खूपच सोपे आहे.

तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
तें जीवजंतूसी केंवी कळे।।हरिपाठ २५.३।।

करत राहणे हेच खरे.
असो.

आहा हा!
शाम भागवत सुरेख प्रतिसाद.
हरिपाठातली प्रत्येक ओळ भारी.
माबोवर फक्त आजच लिहिणार आहे म्हणून लिहून घेतोय.

_/\_

मग मी पण तुम्हाला आजच नमस्कार करून घेतो.
Happy

Pages