रामनाम लेखन जपयज्ञ वही

Submitted by सामो on 29 December, 2019 - 23:58

डिसक्लेमर - लेखिका ज्योतिषावरती विश्वास ठेवते. या धाग्याचा स्कोप, तो विश्वास योग्य आहे की अयोग्य हा नाही.

भारतवारीत जशा मी भेटवस्तू दिल्या, तशाच मला भेटवस्तू मिळाल्यासुद्धा. या सर्व भेटवस्तूंमध्ये मला एक कुतूहलपूर्ण अशी लहानशी भेट मिळाली. एका मैत्रिणीच्या, ७६ वर्षिय आईकडून. ती म्हणजे 'रामनाम मंत्र जप यज्ञ वही' व २ लाल रंगाची बॉलपेने. या वहीत १००-२०० पाने असतील प्रत्येक पानावरती एकूण ३९ बाय १३ अशा ५०७ रिकाम्या चौकटी आखलेल्या असून, प्रत्येक चौकटीमध्ये तुम्ही लहान अक्षरात हवे ते लिहू शकता . प्रत्येक चौकटीं मध्ये 'श्रीराम' हा शब्द लिहावयाच्या उद्देश्याने, जेमतेम त्या आकाराची प्रत्येक चौकट आहे. लाल रंग शुभ असल्या कारणाने लाल रंगात लिहीण्याचे सुचविलेले आहे. या वह्या नंतर देवळांमार्फत हरीद्वारला जातात व मंदीरांच्या पायाभरणीमध्ये त्या पुरल्या जातात.
मला काही प्रश्न पडलेले आहेत -
(१) असे रामनाम लिहीणे, जप करणे हा रिकामटेकडा विरंगुळा आहे का?
- माझ्या मैत्रिणीच्या आई विधवा असून, निवॄत्तीपरान्त, शांत व निवांत आयुष्य जगत असून , खाण्यापीण्याची अतोनात कडक बंधने त्यांनी स्वतःला घालून घेतलेली आहेत. मन भरकटू नये - उदा अमके खावे/तमके ल्यावे अशा सहजसुलभ वासना, या वहीचा उपयोग होत असावा असा कयास.
(२) मी स्वतः ४ पाने भरुन पाहीली. सलग एक पान अ‍ॅट अ टाइम पूर्ण केले. संमिश्र अनुभव आला.
- ३ वेळेला, मला जाणवले की मनात सकारात्मक व मन निवळवणारे विचार येतात. चांगलेच विचार येतात. एका वेळेला मात्र संमिश्र विचार आले - गॉसिपी, सकारात्मक, mundane तीन्ही प्रकारचे. मात्र चारही वेळेला एक संवेग अर्थात फ्लो व सहजता साधत असल्याचे अनुभवास आले. एक पर्पझ ड्रिव्हन अ‍ॅक्टिव्हीटी असल्याचा अनुभव आला. की हे पान आपल्याला पूर्ण भरायचे आहे, हा तो पर्पझ. त्यातून एक आनंद मिळाला.
(३) सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे
- सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे, यामध्ये तत्वतः फरक आहे हे मान्य आहे. सुडोकूमध्ये मेंदूला चालना मिळते, तल्लखता जाणवते. याउलट रामनाम लिहीण्यामध्ये (मनात जप करत करत) एक शांत सहज संवेगाचा अनुभव येतो. या दोन्हीमध्ये क्वालिटेटिव्ह फरक काय? उदा - डिप्रेशन/अवसादात सुडोकू चा वापर करावा ज्यायोगे, मेंदू अ‍ॅक्टिव्हेट करणारी रसायने अधिक निर्माण होतील याउलट उन्मादामध्ये, रामनामामुळे शांत वाटेल - वगैरे प्रकारचा काहीही रिसर्च माझ्यातरी पहाण्यात आलेला नाही. पण ते तसे नसेलच अशी गॅरंटी नाही. अर्थात हा माझा अंदाज आहे. कोणी विदा जमविल्यास, विश्लेषण केल्यास, पूर्ण संशोधनांती काही हाती लागू शकेल.
सुडोकू खेळणे किंवा तत्सम मेंदूस चालना देणारी अ‍ॅक्टीव्हीटी व रामनाम लेखन जपयज्ञ या म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह अ‍ॅक्टिवीटीज आहेत असे मला म्हणायचे नसून, मी फक्त तुलनात्मक दृष्टीकोनामधून दोन्हींकडे पहात आहे.
(४) कोणी हा लेखन यज्ञ 'कन्सिस्टंटली ( चिकाटीने )' केलेला असल्यास, तुमचा अनुभव काय आहे?
मला स्वतःला स्तोत्रे म्हटल्याने फार बरे वाटते. पण त्या मागे शब्दप्रेम, नादाची भुरळ या बाबी आहेत हे मान्य आहे. रामनाम लेखनाचा अनुभव नाही. एक दोन वेळा मनाचे श्लोक लिहून काढलेले आहेत. मनाचे श्लोक वेगळे. ते लिहीताना, मनात रुजू लागतात. पण हे जे 'रीपीटीटिव्ह' श्रीराम-श्रीराम-श्रीराम लिहीणे आहे, तो नक्की वेगळ्य प्रकारचा अनुभव आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अजुन एक मुद्दा- प्रत्येक व्यक्ती तिच्या कलानुसार, आकलनानुसार, दिवसभरातील घटनांची संगती लावण्याचा प्रयत्न करीत असते मीही अपवाद नाही. ही वही मला मिळाली ती तारीख व वेळ याची कुंडली मांडली असता पुढील नीरीक्षण दिसले.

ही कुंडली माझ्या कुंडलीशी (लग्न=मिथुन) मोठ्या प्रमाणात, रेझोनेट होते (निदानपक्षी तसे मला माझ्या अर्धवट ज्ञानामधुन वाटते तरी. असो.) सातवे घर हे गुरुचे घर असते कारण तुमचे गुरु तुमच्या समोरासमोर आसनस्थ असतात. जर कुंडलीतील, लग्नस्थान म्हणजे तुम्ही असाल तर, अर्थात बरोब्बर तुमच्या समोरचे स्थान हे गुरुचे असते. सातव्या घरात या विशिष्ठ वेळी बरीच घडामोड असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मला या लेखनाच्या बाबतीत खरच जाणून घ्यायचे आहे. मूळ नक्षत्रामध्ये गुरु व सूर्य असून, काहीतरी 'आमूलाग्र बदलाचे निदर्शक' किंवा एखाद्या बाबीच्या मूळाशी जाउन तपास करण्याचे हे नक्षत्र निदर्शक आहे. थोडक्यात,जिगसॉ पझलचे बरेच तुकडे माझ्याकरता, फिट बसताना मला तरी दिसत आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

छान.

@अन्जू क्रियायोगाची दीक्षा घ्यायची खूप इच्छा होती पण जमलेच नाही. तुम्हीही साधक आहात असे आतून वाटते .
@आनंद मी संवाद साधन्याचा प्रयत्न केला नाही ..संमोहित
झाल्यासारखे झाले....ते स्वप्न आहे हे मात्र स्वप्नात लक्षात आले होते...मी आपल्या लोकात नाही...हे बाळ असाधारण आहे...हेहि कळले... मला दुसऱ्या दिवशी ध्यानात लक्षात आले की ते दत्त गुरू होते. कदाचित तुम्ही म्हणता तसे असेल.
@शाम भागवत ..प्रतिसाद आवडले.
@सामो.....परमेश्वर आपल्या ह्रदयात आहे... पण पुन्हा पुन्हा जन्माला येऊन आपण ते विसरलो ....आणि कलीयुगात तर आपण काय विसरलो तेही विसरलो...नामस्मरण म्हणून तारक आहे.

क्रियायोगाची दीक्षा घ्यायची खूप इच्छा होती पण जमलेच नाही>>>>>>>>>आदिश्री तुम्ही US मध्ये असाल आणि अजूनही क्रियादीक्षा द्यायची इच्छा असेल तर तुम्ही लॉस एंजिलिस ला जेथे SRF चे हेडक्वार्टर आहे तेथे संपर्क साधून दीक्षेविषयी माहिती घेऊ शकता. दर वर्षी ऑगस्ट च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लॉस एंजिलिस ला World Convocation असते जेथे जगभरातून लोक येतात. या काळात हमखास दीक्षा विधी असतो. हे वर्ष तर स्पेशल आहे कारण या वर्षी SRF ला १०० वर्षे पूर्ण होत आहेत (परमहंस योगानंदांनी १९२० साली अमेरिकेत SRF ची स्थापना केली होती).
तिथे जाणे जर जमत नसेल तर वर्षभरात त्यांचे बरेच ठिकाणी दीक्षा प्रोग्रॅम असतात. तुम्ही राहता तेथे जवळच दीक्षा विधी कधी होणार आहे याची माहितीही तुम्हाला मिळू शकेल. भारतात असाल तर हीच माहिती तुम्हाला YSS च्या रांची येथील हेडक्वार्टर मधून मिळेल.

आदीश्री मी साधक नाही. तुम्हाला आतून वाटलं, काय बोलू मी पण साधना नाही फार करू शकत, तो पिंड नाही माझा बहुतेक. जेव्हा मी 10 वीत असताना साईबाबा स्वप्नात आले तेव्हापासून मी त्यांनाच गुरुस्थानी मानते. मी प्रचंड वळवळ करणारी आहे, स्थिर बसणे, एखाद्या साधनेसाठी मन एकाग्र करणे, हे माझ्या कुवतीबाहेर आहे, पाच मिनिटं प्रयत्न केला तरी मन एकाग्र होत नाही, मला भाऊ किंवा नवरा खूप सांगतो, ओमकार वगैरे सुरुवात करते, नाहीच जमत. माझा आपला जमेल तेव्हा येता जाता नामस्मरण करणे, 5 मिनिटे एखादे वाचन करणे आणि लेकराला देव समजून त्याचं करणं, इतपत जास्त करून असते, बाकी मी लिहिलंय आधी कुठल्या दिवशी काय वाचते ते.

क्रियायोगात ध्यानधारणा वगैरे रोजचे खूप, नवऱ्याला पण नेहेमी जमतंच असं नाही, कधी लेकरू त्यालापण उठवतो ध्यानातून, बरेचदा करायला देतोही.

मी पोथी वगैरे वाचन करतानाही कधी कधी असंख्य दुसरेच विचार डोक्यात येत असतात, मन अस्थिर असतं.

बाकी परमहंस योगानंद यांचं योगी कथामृत माझ्या मनाच्या फार जवळचे पुस्तक आहे, अतिशय आवडतं पुस्तक पण तरीही क्रियायोग शिकावा असं मला आतुन वाटलं नाही, नवऱ्याला वाटत होतं पण पुस्तक वाचल्यावर अनेक वर्षाने तो त्या मार्गावर गेला, त्याआधी त्याने योगदा सत्संगशी पत्रव्यवहार पण केलेला पण आत्ता काही वर्षांपूर्वी माझ्या शाळेतल्या दोघी मैत्रिणी साधक आहेत समजल्यावर, शिबिर असेल तेव्हा कळवा अस मी सांगितलं आणि मग नवऱ्याला सांगितलं, असा तो गेला त्या मार्गावर आणि आता साधक आहे, indirectly माझ्याकडून मदत झाली, नंतर 40 दिवस compulsory जी ध्यानधारणा व्ह्यायला हवी त्यासाठी मदत केली म्हणजे मुलाला त्याला disturbe करू दिलं नाही. एका साधकाला मदत करणे जमेल तेव्हा ही माझी साधना म्हणाल तर काही अंशी आहे, कारण मुलगा पझेसिव्ह आहे बाबाबाबतीत, बाबा आला की त्याने फक्त त्याला महत्व द्यायचे, तो म्हणेल ते करायचे त्यामुळे त्याला सांभाळून बाबाला करू देणं ही कसोटी मी पार पाडली, पाडत असते जमेल तशी.

नाही जमलं मला तर नवरासुद्धा आधी मुलाला प्राधान्य देतो, त्याला वेळ देतो. तो एक अतिशय चांगला बाबा आहे.

@अन्जू समजू शकते... तुम्हाला दोघांनाही आपापल्या मार्गासाठी सदिच्छा..ते पुस्तक मलाही जवळचे वाटते. ते पुस्तक माझ्या आयुष्यात आल्यापासुनच माझ्या आध्यात्मिक प्रगतीची तीव्रता वाढली असेही कुठेतरी वाटते.
लेकराला देव समजून त्याचं करणं. }}}}अगदी अगदी.... मी तर एकदा म्हणाले मुलीला ...मुक्ती द्यायला आली आहेस तू मला...अस्तित्वाचा कस लागतो काही वेळा...
@सामो तुम्हालाही जपयज्ञासाठी सदिच्छा
@कोहंसोहं आता साधनेत आपोआपच क्रिया होतात म्हणून गरजच वाटेनाशी झाली आहे. पण आभार तुमचे.. कधी वाटले दीक्षा घ्यावे तर म्हणून लक्षात ठेवीन. Lake Shrine ला खूपदा जायचे Californiaमध्ये असताना अपूर्व शांती आहे तिथे..

मी संवाद साधन्याचा प्रयत्न केला नाही ..संमोहित
झाल्यासारखे झाले....ते स्वप्न आहे हे मात्र स्वप्नात लक्षात आले होते...मी आपल्या लोकात नाही...हे बाळ असाधारण आहे...हेहि कळले... मला दुसऱ्या दिवशी ध्यानात लक्षात आले की ते दत्त गुरू होते.>>>
हम्म !
मी विचारताना 'कधी' हा शब्द लिहिला होता. मला नंतर कधी असं म्हणायचं होतं. Happy

>>>कोहंसोहं आता साधनेत आपोआपच क्रिया होतात म्हणून गरजच वाटेनाशी झाली आहे..>>>+१
कोहंसोहं यांनी लिहिलेल्या प्रतिसादाचा आदर करून,
तुम्ही लिहिलेल्या अनुभवांना लक्षात घेऊन मला वाटतं आता ही अशी काही दिक्षा घेणं म्हणजे वरच्या वर्गातून पुन्हा... Happy
असो.
तुम्हाला भरपूर शुभेच्छा !

मोबाईल मध्ये रामनामाचे लेखन केले तर चालेल काय?
कि कागदावरच लिहायला हवे?>>>>
मोबाईल देवळांच्या पायाभरणीसाठी द्यावा लागेन. Wink

मोबाईल देवळांच्या पायाभरणीसाठी द्यावा लागेन.>>>>

इ-मेल केले तर चालणार नाही का?

मला वाटते आधी आपण लिहायला सुरुवात करा, पुढे काय करायचं तो नंतरचा विचार. इच्छा तिथे मार्ग, योग्य वेळ आली की मार्ग सापडेलच. लिहिल्यामुळे जी पोसिटीव्ह energy निर्माण होते त्याचा अनुभव घ्या. सुरुवात digital devices करायला काहीच हरकत नसावी. शेवटी हे सगळं आपण स्वतः साठी करतो, जास्त जर-तर मध्ये वेळ घालवायला नको.
नामजप शक्यतो random असू नये असं मला सांगितलं होतं. रोज जागा, वेळ, कितीवेळा हे ठराविक आणि शिस्तीने करायचं.

नामजप शक्यतो random असू नये असं मला सांगितलं होतं. रोज जागा, वेळ, कितीवेळा हे ठराविक आणि शिस्तीने करायचं.>>>>> आपण त्यातच अडकून पडू ना .... म्हणजे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अशक्य नाहा पण अवघड आहे.

संपूर्ण आतापर्यंतचे आयुष्य प्रत्येक चांगल्या मूडवर/घटनेवर मीठाचा खडा टाकणारा विचार मला त्रास देत राहीला. ना कधी थेरपीत त्याचेवर उत्तर सापडले न माझ्या जीवास शांती लाभली. ९८% लोक हे चांगले असताना, २% लोक वाईट का निघतात? व्हाय द इव्हिल एग्झिस्ट्स? मला हा प्रश्न पडण्याचे कारण सांगता येणार नाही ते फार व्यक्तीगत आहे पण एक सांगता येईल, This unanswered question has caused a nagging unrest & literally sickness in my life. ग्रंथालयात तर ख्रिश्चन लेखकांनी पुस्तके च्या पुस्तके या विषयास .'सुष्ट-दुष्ट हे आदिम द्वंद्व' वाहीलेली आढळतात. I always believed that someday I will get an answer. पण तसेही मी फार तत्वज्ञानी अथवा ज्ञानमार्गाचा साधक नसल्या कारणाने, मला हे माहीत आहे की मला उत्तर नको आहे, मला हवीये शांती.

मला आज हे सांगण्यास अतिशय आनंद होतो की या प्रश्नाचा निकालच नामस्मरणाने लागला. महाराज सांगतात = 'तुम्ही फक्त नामस्मरण करा,तुमची काळजी, दु:ख मी वाहीन.' इतके साधे-सोपे गणित असताना, मला मेंदू शीणवायचे, अति विचारांनी आजारी पडून घेण्याचे कारणच नाही. मला काय गरज आहे सुष्ट - दुष्ट आणि अन्य द्वंद्वाच्या जोड्या व गूढ उकलत बसायची? माझे काम आहे, अनन्यभावे म्हणजे, तन्मयतेने व चिकाटीने नामस्मरण करणे.

जी शांती, मला ना थेरपी देउ शकली, जी शांती फक्त औषधांनी तीही अपूर्ण मिळाली. ती फक्त काही चुटपूट तासांच्या नामस्मरणाने मिळत असेल, तर माझा नामस्मरणावरती विश्वास बसणे साहजिकच आहे. बरे कोणाला वाटेल अरे त्यात काय किती सोपा उपाय होता हा तर सहज प्राप्य व अंमलात आणण्यास अतिशय सुलभ होता. तर मी एवढेच सांगेन की इट टुक माय लाईफ सो फार टु फाईंड इट.

कसं असतं ना पेरुची बी दाढेत अडकून बसते किंवा एखाद्या गाण्याची ट्युन / धून आपल्याला आठवत असते परंतु गाणे काही केल्या आठवत नसते - जीव कासाविस होतो, तगमग वाढते त्याच त्याच गोष्टीवर आपण झिरो डाउन होतो की कधी ही बी निघणार, कधी गाणे आठवणार. पण काही केल्या त्यातून मार्ग निघत नाही तसे माझे झालेले होते. ज्या क्षणी मला हे उमगले की थेरपिस्ट जी तगमग शांतवु शकले नाहीत ती तगमग महाराजांच्या एका वाक्याने थांबणार होती. ती सापडायचा योग मात्र येत नव्हता तो आला. अक्षरक्षः तापल्या वाळूवरती जलधारा बरसल्यासारखे मला वाटले. विचाररुपी सैतानाच्या तावडीतून सुटल्याचा आनंद मला झाला.

कोणा कोणाला हे escapism वाटू शकते, हे म्हणजे वास्तवापासून दूर पळणे झाले. तर वाटो बापडे. तसही मन कुरतडण्याशिवाय आणखी कोणतीही कृती या त्रासातून घडत नव्हती. तेव्हा असे escapism मला पुन्हापुन्हा मान्य आहे.

||श्रीराम जय राम जयजयराम||

छान.

 आपण त्यातच अडकून पडू ना .... म्हणजे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अशक्य नाहा पण अवघड आहे. ---- सुट्टीच्या दिवशी थोडं adjustment करावी लागते नाहीतर ऑफिसला जायची वेळ fixed असेल तर त्यानुसार manage होतं. संख्या आपणच ठरवायची किती जमेल ते. दिवसभरात एकतरी अशी गोष्ट असतेच बहुधा जी आपण काहीही झालं तरी वेळेवर करतो, त्याबरोबर हे पण करायचं.

कधी वाटले दीक्षा घ्यावे तर म्हणून लक्षात ठेवीन. Lake Shrine ला खूपदा जायचे Californiaमध्ये असताना अपूर्व शांती आहे तिथे.. >>>>>>> हो. Lake Shrine माझे सुद्धा आवडते ठिकाण आहे. कॅलिफोर्निया ला जायचा योग आला की माझी visit असतेच तिथे आणि Mother Center ला. तुम्हाला पुढील साधनेसाठी शुभेच्छा.
---------------
तुम्ही लिहिलेल्या अनुभवांना लक्षात घेऊन मला वाटतं आता ही अशी काही दिक्षा घेणं म्हणजे वरच्या वर्गातून पुन्हा...असो >>>>> आनंदजी, दीक्षा किंवा अनुग्रह हा वरच्या वर्गातून खाली जाण्यासाठी नाही तर कोणत्याही वर्गातून अजून पुढे वरच्या वरच्या वर्गात जाण्यासाठी असतो. गुरूशिवाय मुक्ती नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अनेकदा परमेश्वर स्वतः गुरु वेगवेगळ्या मार्गाने म्हणून मार्गदर्शन करतो. परंतु असे खूप थोडे लोक असतात. बरेचदा जीवन्मुक्त झालेली किंवा ब्रह्मपदाला पोहोचलेली थोर माणसे साधकांसाठी पुन्हा देह धारण करतात आणि गुरु होतात. थोडेसे technical होईल तरी सांगतो. कुंडलिनी शक्ती आज्ञा चक्रातून (जर तिथपर्यंत आली असेल तर) सहस्रार चक्रात नेण्यासाठी गुरुची आवश्यकता असते कारण आज्ञा ते सहस्रार हा मार्ग बंद असतो आणि तो उघडण्याचा मार्ग केवळ गुरूच सांगू शकतात. साधकाच्या स्वसामर्थ्याच्या बाहेरचे आहे. तेंव्हा परमेश्वर शक्ती गुरु म्हणून आवश्यक असते. कुंडलिनी सहस्रार चक्रात पोहोचल्याशिवाय मुक्ती नाही किंवा परमानंद प्राप्त होत नाही.
दीक्षा किंवा अनुग्रहाच्या माध्यमातून आपण गुरूशी आणि गुरु आपल्याशी अध्यात्मिक पद्धतीने जोडले जातात. एकदा हा संबंध प्रस्थापित झाल्यानंतर पुढील अध्यात्मिक प्रगतीची बरीचशी जबाबदारी गुरूंवर असते. यात अगदी प्रारब्धाची तीव्रता कमी करण्यापासुन ते वेळ आलीच तर प्रारब्ध बदलण्यापर्यंत खऱ्या गुरूला मुभा असते. आपल्याला साधनेसाठी योग्य परिस्थिती निर्माण करून देणे, वेळोवेळी डायरेक्ट किंवा कोणत्यातरी माध्यमातून मार्गदर्शन करणे आणि मार्ग भटकला तर योग्य मार्गावर आणणे, साधनेसाठी प्रोत्साहन देणे हे सर्व गुरु आपल्या कळत नकळत करत असतात. अर्थात यासाठी गुरु स्वतः ब्रह्मज्ञानी हवा हे वेगळे सांगायला नकोच. त्यामुळे दीक्षा किंवा अनुग्रहाच्या माध्यमातून साधकाची प्रगतीच होते अधोगती नाही.

सत्गुरूंच्या आवश्यकतेबद्दल मस्तच लिहिलंय.

अर्थात यासाठी गुरु स्वतः ब्रह्मज्ञानी हवा हे वेगळे सांगायला नकोच.

ब्रह्मज्ञानी असण्याबरोबर शाब्दे परेच निष्णात असायला हवा.

दिवसभरात एकतरी अशी गोष्ट असतेच बहुधा जी आपण काहीही झालं तरी वेळेवर करतो, त्याबरोबर हे पण करायचं.- बरोबर आहे राजसी.
कोहंसोहं, सद्गुरु का हवा हे तुम्ही अगदी योग्य शब्दात सांगितलं आहे.

Samo, tumacha bipolar varacha lekh vachala hota aisi var. Itar dhagehi baghat hote ithale.
Kuthalyatari pratisadat tumhee maharajana follow karata he janawale ani mee sutakecha nishwas takala. Karan ekada tyanni hatat ghetal ki kuthalach tension nasat. Happy
Malach hasayala aal. Mee nakalat tumacha bhar shiri vahat hote. Mala mahitahi navhate.
Kharatar kunacha bhar shiri vhayachi mazi layaki nahi! Mhanun janavalyavar far gammat vatali!

Ata yogya thikani pochala ahat, tar shanka nakot. Kalji nako! Happy

नानबा प्रतिसाद अतिशय आवडला. आपले अनंत आभार. खरच महाराज बरोबर आहेत. कोणते पूर्व सुकृत फळास आले असेल की त्यांची मेहेरनजर व्हावी.

@कोहंसोहं.. तुमचा प्रतिसाद बघून विचारात पडले. तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे असेल तर वेळ आली आहे म्हणता येईल.
पण अंतरीची ओळख पटल्याशिवाय कुणालाही गुरु मानू शकत नाही. माझ्या द्रुष्टीने सुक्ष्म रुपात दीक्षा झाली आहे.. आणि स्थूल रुपातील गुरू साठी वाट पहायची तयारी आहे. सगळीकडे भोंदू गुरू असताना ब्रह्मज्ञानी ओळखने कठीण आहे. प्रतिसाद आवडला आहे.
@नानबा... गोड प्रतिसाद
@सामो...अभिनंदन... परमेश्वराची क्रुपा तुमच्यावर नित्य राहो..

Pages