रामनाम लेखन जपयज्ञ वही

Submitted by सामो on 29 December, 2019 - 23:58

डिसक्लेमर - लेखिका ज्योतिषावरती विश्वास ठेवते. या धाग्याचा स्कोप, तो विश्वास योग्य आहे की अयोग्य हा नाही.

भारतवारीत जशा मी भेटवस्तू दिल्या, तशाच मला भेटवस्तू मिळाल्यासुद्धा. या सर्व भेटवस्तूंमध्ये मला एक कुतूहलपूर्ण अशी लहानशी भेट मिळाली. एका मैत्रिणीच्या, ७६ वर्षिय आईकडून. ती म्हणजे 'रामनाम मंत्र जप यज्ञ वही' व २ लाल रंगाची बॉलपेने. या वहीत १००-२०० पाने असतील प्रत्येक पानावरती एकूण ३९ बाय १३ अशा ५०७ रिकाम्या चौकटी आखलेल्या असून, प्रत्येक चौकटीमध्ये तुम्ही लहान अक्षरात हवे ते लिहू शकता . प्रत्येक चौकटीं मध्ये 'श्रीराम' हा शब्द लिहावयाच्या उद्देश्याने, जेमतेम त्या आकाराची प्रत्येक चौकट आहे. लाल रंग शुभ असल्या कारणाने लाल रंगात लिहीण्याचे सुचविलेले आहे. या वह्या नंतर देवळांमार्फत हरीद्वारला जातात व मंदीरांच्या पायाभरणीमध्ये त्या पुरल्या जातात.
मला काही प्रश्न पडलेले आहेत -
(१) असे रामनाम लिहीणे, जप करणे हा रिकामटेकडा विरंगुळा आहे का?
- माझ्या मैत्रिणीच्या आई विधवा असून, निवॄत्तीपरान्त, शांत व निवांत आयुष्य जगत असून , खाण्यापीण्याची अतोनात कडक बंधने त्यांनी स्वतःला घालून घेतलेली आहेत. मन भरकटू नये - उदा अमके खावे/तमके ल्यावे अशा सहजसुलभ वासना, या वहीचा उपयोग होत असावा असा कयास.
(२) मी स्वतः ४ पाने भरुन पाहीली. सलग एक पान अ‍ॅट अ टाइम पूर्ण केले. संमिश्र अनुभव आला.
- ३ वेळेला, मला जाणवले की मनात सकारात्मक व मन निवळवणारे विचार येतात. चांगलेच विचार येतात. एका वेळेला मात्र संमिश्र विचार आले - गॉसिपी, सकारात्मक, mundane तीन्ही प्रकारचे. मात्र चारही वेळेला एक संवेग अर्थात फ्लो व सहजता साधत असल्याचे अनुभवास आले. एक पर्पझ ड्रिव्हन अ‍ॅक्टिव्हीटी असल्याचा अनुभव आला. की हे पान आपल्याला पूर्ण भरायचे आहे, हा तो पर्पझ. त्यातून एक आनंद मिळाला.
(३) सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे
- सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे, यामध्ये तत्वतः फरक आहे हे मान्य आहे. सुडोकूमध्ये मेंदूला चालना मिळते, तल्लखता जाणवते. याउलट रामनाम लिहीण्यामध्ये (मनात जप करत करत) एक शांत सहज संवेगाचा अनुभव येतो. या दोन्हीमध्ये क्वालिटेटिव्ह फरक काय? उदा - डिप्रेशन/अवसादात सुडोकू चा वापर करावा ज्यायोगे, मेंदू अ‍ॅक्टिव्हेट करणारी रसायने अधिक निर्माण होतील याउलट उन्मादामध्ये, रामनामामुळे शांत वाटेल - वगैरे प्रकारचा काहीही रिसर्च माझ्यातरी पहाण्यात आलेला नाही. पण ते तसे नसेलच अशी गॅरंटी नाही. अर्थात हा माझा अंदाज आहे. कोणी विदा जमविल्यास, विश्लेषण केल्यास, पूर्ण संशोधनांती काही हाती लागू शकेल.
सुडोकू खेळणे किंवा तत्सम मेंदूस चालना देणारी अ‍ॅक्टीव्हीटी व रामनाम लेखन जपयज्ञ या म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह अ‍ॅक्टिवीटीज आहेत असे मला म्हणायचे नसून, मी फक्त तुलनात्मक दृष्टीकोनामधून दोन्हींकडे पहात आहे.
(४) कोणी हा लेखन यज्ञ 'कन्सिस्टंटली ( चिकाटीने )' केलेला असल्यास, तुमचा अनुभव काय आहे?
मला स्वतःला स्तोत्रे म्हटल्याने फार बरे वाटते. पण त्या मागे शब्दप्रेम, नादाची भुरळ या बाबी आहेत हे मान्य आहे. रामनाम लेखनाचा अनुभव नाही. एक दोन वेळा मनाचे श्लोक लिहून काढलेले आहेत. मनाचे श्लोक वेगळे. ते लिहीताना, मनात रुजू लागतात. पण हे जे 'रीपीटीटिव्ह' श्रीराम-श्रीराम-श्रीराम लिहीणे आहे, तो नक्की वेगळ्य प्रकारचा अनुभव आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अजुन एक मुद्दा- प्रत्येक व्यक्ती तिच्या कलानुसार, आकलनानुसार, दिवसभरातील घटनांची संगती लावण्याचा प्रयत्न करीत असते मीही अपवाद नाही. ही वही मला मिळाली ती तारीख व वेळ याची कुंडली मांडली असता पुढील नीरीक्षण दिसले.

ही कुंडली माझ्या कुंडलीशी (लग्न=मिथुन) मोठ्या प्रमाणात, रेझोनेट होते (निदानपक्षी तसे मला माझ्या अर्धवट ज्ञानामधुन वाटते तरी. असो.) सातवे घर हे गुरुचे घर असते कारण तुमचे गुरु तुमच्या समोरासमोर आसनस्थ असतात. जर कुंडलीतील, लग्नस्थान म्हणजे तुम्ही असाल तर, अर्थात बरोब्बर तुमच्या समोरचे स्थान हे गुरुचे असते. सातव्या घरात या विशिष्ठ वेळी बरीच घडामोड असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मला या लेखनाच्या बाबतीत खरच जाणून घ्यायचे आहे. मूळ नक्षत्रामध्ये गुरु व सूर्य असून, काहीतरी 'आमूलाग्र बदलाचे निदर्शक' किंवा एखाद्या बाबीच्या मूळाशी जाउन तपास करण्याचे हे नक्षत्र निदर्शक आहे. थोडक्यात,जिगसॉ पझलचे बरेच तुकडे माझ्याकरता, फिट बसताना मला तरी दिसत आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति |
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मन: || गीता ४:४० ||

इथे तुम्हाला आस्तिक आणि नास्तिक दोन्ही प्रकारचे लोक मिळतील....त्यामुळे इथली मते ऐकून ठरवण्यापेक्षा (कारण संशयात्मा विनश्यति) काही दिवस आपण स्वतः सलगपणे करा आणि काय अनुभव येतो पहा. शेवटी देवाचे नाव आहे त्यामुळे वाया नक्कीच जाणार नाही.
सुडोकू चे म्हणाल तर त्यामुळे बुद्धी काही वर्षे थोडीफार तल्लख राहील परंतु शेवटी मेंदू काय किंवा शरीर काय शेवटी नाशवंतच....फार फार तर अगदी कमी कालावधीकरिता थोडा परिणाम करून संपून जाईल....घेतलेले नाम मात्र त्यापेक्षा अनेकपटीने उपयोगाला येईल (या जन्मात किंवा त्यापश्चात सुद्धा)
कृष्णाने म्हणलेलच आहे - स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्।।2.40।।

सामो, तुमच्या लेखाने सा बांच्या आठवणी जाग्या झाल्या.
माझ्या सा बा शेवटपर्यंत ( वय वर्षे अंदाजे ७०-७२ ) हिंडत्या- फिरत्या होत्या. त्याही जुन्या वह्या, डायऱ्यांमध्ये जप लिहित असत. त्यांचा ठरवलेला नेम असा नव्हता. पण जपमाळ वापरून जप करण्यापेक्षा लिहिल्यामुळे अधिक एकाग्रता साधते असे त्यांचे मत होते. वही संपली की एखाद्या देवळातल्या मूर्तीच्या पायी ती वहात असत. कोणी त्यांच्याकडे कसली तक्रार करू लागले, त्रागा करू लागले की त्या संबंधित व्यक्तीला जप लिहिण्याचा सल्ला देत असत.
प्रसंगानुरूप नातवंडांनाही एका जागी स्वस्थ बसवून त्यांच्या वयाप्रमाणे १०/१५/२१ वेळा जप लिहायला लावीत. वर त्यांच्या आवडीच्या खाऊचे आमिष असे Happy

माझा देवावर विश्वास नाही पण सायकोलॉजीवर आहे. त्यामुळे रामनाम लिहिल्याने फायदा होत असेलही.
फक्त एक शंका आहे. ज्याचा देवावर वा रामावर विश्वास नाही त्याला फायदा होत असेल का?

लिहिण्याचे माहीत नाही पण तोंडी जओअ करायचा एक अनुभव आहे. कोई मिल गया चित्रपट पाहिल्यावर मला "ओम ओम ओम ओम..." जप करायची सवय लागलेली.
त्या चित्रपटात एक डातलॉग होता - Om is Hindu religious word. Which has all the vibrations of the universe !
बस्स यावरही माझा तेव्हा विश्वास होता. मला फायदा जाणवलेला त्यामुळे ओम ओम जपण्याचा...

ऋन्मेSष भाऊ आपण गोंदवलेकर श्रीमहाराज यांचे चरित्र जरुर वाचावे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

नामजपाचे महत्व हे रामचंद्र कृष्ण कामत यांचे खूप प्रसिद्ध पुस्तक आहे परंतु सध्या बऱ्याच ठिकाणी खास करून online हे out of print दिसते. खूप शोधून पण मिळत नाहीये. कोणाकडे याची pdf आवृत्ती असेल तर कृपया शेअर कराल का प्लीज?

@ ऋन्मेऽऽष

कोणत्याही मंत्राचा नामाचा किंवा गीताचा मनावर परिणाम मानसिक घडणीवर( PRECONDITIONING) ठरत असतो.

जसा सुंदर भजनाचा परिणाम हिंदू माणसावर होतो तसाच परिणाम कुराणातील आयत पढल्यावर मुसलमानांवर होतो किंवा ख्रिसमसची कॅरल ऐकल्यावर एखाद्या कॅथॉलिक माणसावर होईल.

लाऊडस्पिकर वर मोठ्याने वाजवलेले भजन असो किंवा अजान त्रास दोघांना होईलच पण भजनाचा त्रास मुसलमानाला जास्त होईल आणि अजानचा गैर मुसलमान माणसाला.
हि मानसिक घडण साधारण बालपणापासून चालू होते.

काही विशिष्ट ध्वनी हे धर्मातीत असतात त्यासाठी मानसिक घडणीची( PRECONDITIONING) गरज नसते उदा गाणाऱ्या पक्षांची शीळ, लहान मुलांच्या हसण्याचा आवाज. यामुळे मनात उत्फुल्ल असे तरंग निर्माण होतात.

अशाच तर्हेचे उत्फुल्ल तरंग "ओम" हा ध्वनी ऐकल्याने होतो असे नवे संशोधन (f -MRI) सूचित करते

Neuro-cognitive aspects of “OM” sound/syllable perception: A functional neuroimaging study

https://www.tandfonline.com/doi/full/10.1080/02699931.2014.917609?scroll...

Directional brain networks underlying OM chanting

https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S1876201818302004

ज्याचा देवावर वा रामावर विश्वास नाही त्याला फायदा होत असेल का? >>>> हो. ते नाम सिद्ध आहे. वाल्यासारख्या दरोडेखोराने ते नाम उलटे घेतले तरी सलग म्हटल्याने सुलटे होवून त्याची उन्नती झाली. राम पतीतपावन आहेत.. त्यांचे नाम त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. प्रत्येकाच्या आत आत्माराम आहे आणि तुम्ही श्रद्धा नसतानाही घेतलेले नाम तो स्वीकारतो. श्रद्धेसह घेतल्यास अजूनच छान.

घेतल्यास अजूनच छान.
नवीन Submitted by अश्विनी के on 31 December, 2019 - 00:16
>>>_/\_ एकदम सत्य.

तुमच्या डोळ्यात सुद्धा प्रेम असावे , बोलण्यात गोडवा असावा व वृत्ती आनंदी असावी.>>>
Uhoh नामाशिवाय हे शक्य नाही का ?

रच्चाकने, सध्याचे सगळे स्वयंघोषित संत, सदगुरू (यांत बलात्काराच्या आरोपांखाली तुरूंगात गेलेले, देश सोडून पळालेलेही आलेच) यांच्या डोळ्यांतून ओसंडून वाहणारं प्रेम, बोलण्यातला गोडवा आणि आनंदी वृत्ती बघितली तर गहिवर दाटून येतो.
नाम लिहायची app बघण्यात आलीत. Biggrin

>>>>>>>नाम लिहायची app बघण्यात आलीत. Biggrin>>>> जप करण्याचे अ‍ॅप पाहीलेले आहे. नामस्मरणाचे अ‍ॅप कधी शोधले नाही.

हो. ते नाम सिद्ध आहे.>>>>खर तर ते श्रद्धेय आहे. तरच फायदा होत असला पाहिजे.>>>
हो, असे असावे. दुसरीकडे (नाम लिहिण्याकडे ) लक्ष केंद्रीत केल्याने मनात होत असलेल्या विचारांच्या घमासानाला आळा + ज्यावर कुणी श्रद्धा ठेवून आहे ते नाव असल्याने होणारा प्लासीबो इफेक्ट असा दुहेरी फायदा असावा.

हा अ ने लिहिल्याप्रमाणे मी सुद्धा वहीची शेवटची पान भरुन कॉलेजातल्या एका हॉट सिनिअर, जुजबी मित्र असणार्‍या, माझ्याकडे कधीही 'तसं' न बघणार्‍या, सहज कधी बघितलंच तर स्माईल करुन मला वेंधळ्यासारखं वागायला भाग पाडणर्या मुलाचं नाव लिहिलं होतं.
मग तो मित्र झाला मग पुढे प्रेमात पडला(माझ्याच) आणि मग बिचार्‍याने लग्नही केलं(माझ्याशीच)
म्हणजे हा जप सुफळ झाला म्हणायला हरकत नाही.

कुणा परदेशी व्यक्तिने 'रामनामात' अशी काय शक्ती आहे हे एका साधूला विचारले होते. त्या साधूने त्याला "रामनामात शक्ती नसुन नामस्मरणात शक्ती आहे" असे सांगितले होते. त्यावर त्या व्यक्तिने स्वतःच्याच नावाचा जप सुरु केला व नामस्मरणाने जे साधते, जे अनुभव येतात ते त्याला आले.
(ऐकलेला गोष्ट)

नामस्मरणाचा इफेक्ट म्हणजे हळूहळू मनात विचार येणं थांबणं. अविरतपणे चौखोर उधळणारं मन एकाग्र होत जाऊन शांत अवस्था प्राप्त होते.

मला वाटतं आपलं वर्तन आणि मनस्थिती यांचा परस्पर संबंध असल्याने काही अनुभव प्रस्थापित होत असावेत...एकाग्रतेने एखादी गोष्ट करतांना मन त्याच गोष्टीवर स्थिर ठेवता आले तर आपल्याला हवा असलेला भाव उत्पन्न होतो...नामस्मरणाचा अनुभव नाही पण शवासन करतांना चक्र जाग्रूत होऊन ते ते रंग दिसतात याचा काही वेळा अनुभव घेतला आहे.
लग्नी राहू गोंधळाची स्थिती उत्पन्न करतो का?

>>>>>शवासन करतांना चक्र जाग्रूत होऊन ते ते रंग दिसतात याचा काही वेळा अनुभव घेतला आहे.>>>>>> ओह!! रोचक!

>>>>>>>>gondawalekar maharaj mhanatat ki sakhar kunihi khalli tari godach lagate. Tasech namache ahe.>>>>> होय असे वाचलेले आहे.

रामनाम वहीत लिहिले तर मराठीत टंकलेखन करण्याची सिद्धी उपलब्ध होईल का? काहींना कित्येक वर्षे झाली तरी ही सिद्धी काही प्राप्त होईना!

मन:शांती मिळते.
अक्षर गिरवून मन एकाग्र होतं.
हस्ताक्षर सुंदर होण्यास मदत होऊ शकते.
लिखाणाचा वेग वाढू शकतो.
हाताला सराव राहतो व्यायामाचा.
तुम्ही परदेशात आहात तर हा उपक्रम तुम्हाला स्वगृही (भारतात) असल्यासारखे भासवण्यास मदत करेल.
लेखनाने श्रद्धा आणि विश्वास वाढला तर व्यक्तीमत्वालाही धार्मिक किनार येते.
तसे अजूनही बरेचसे फायदे असावेत..... पण मला इतकेच माहिती आहेत. Happy

रामनाम वहीत लिहिले तर मराठीत टंकलेखन करण्याची सिद्धी उपलब्ध होईल का? काहींना कित्येक वर्षे झाली तरी ही सिद्धी काही प्राप्त होईना! >>
Trolling karanyachi budhdhi nakki kami hou shakel mhanatat. Try Kelat tar nakki sanga. Happy

सुबोध खरे धन्यवाद
आणि हो, नॉईज म्हणजे शेवटी काय तर अनवॉन्टेड साऊण्ड. लोकलमध्ये बरेचदा भजनी म्ंडळाचा त्रास होत नाही पण एखादा गुज्जू कुटुंबाचा ग्रूप अंताक्षरी खेळत असेल तर डोके उठते हा अनुभव मी सुद्धा घेतला आहे.

वर एका पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे रामनामात नाही तर नामस्मरणात शक्ती असते. त्यात सुचवल्याप्रमाणे स्वत:चे नाव जपायचा प्रयोग करायला हवा. कोणी हे ऐकले तर नार्सिस् समजू शकते. पण मी त्याची पर्वा करणारा आहे असे वाटत नाही Happy

ओममध्ये मात्र खरेच वेगळेपण आहे. आणि ओम ओम जपताना आपण काहीतरी धार्मिक शब्द जपतोय असेही वाटत नाही. त्यामुळे नास्तिक असूनही त्याचा फायदा होतो.

टवण्या, भरत, काळबोक्या, ... असे काही आयढी हिंदू धर्म विरोधी आहेत. त्यांच्या कडून काय अपेक्षा ठेवणार? जस् इग्नोर.

Pages