रामनाम लेखन जपयज्ञ वही

Submitted by सामो on 29 December, 2019 - 23:58

डिसक्लेमर - लेखिका ज्योतिषावरती विश्वास ठेवते. या धाग्याचा स्कोप, तो विश्वास योग्य आहे की अयोग्य हा नाही.

भारतवारीत जशा मी भेटवस्तू दिल्या, तशाच मला भेटवस्तू मिळाल्यासुद्धा. या सर्व भेटवस्तूंमध्ये मला एक कुतूहलपूर्ण अशी लहानशी भेट मिळाली. एका मैत्रिणीच्या, ७६ वर्षिय आईकडून. ती म्हणजे 'रामनाम मंत्र जप यज्ञ वही' व २ लाल रंगाची बॉलपेने. या वहीत १००-२०० पाने असतील प्रत्येक पानावरती एकूण ३९ बाय १३ अशा ५०७ रिकाम्या चौकटी आखलेल्या असून, प्रत्येक चौकटीमध्ये तुम्ही लहान अक्षरात हवे ते लिहू शकता . प्रत्येक चौकटीं मध्ये 'श्रीराम' हा शब्द लिहावयाच्या उद्देश्याने, जेमतेम त्या आकाराची प्रत्येक चौकट आहे. लाल रंग शुभ असल्या कारणाने लाल रंगात लिहीण्याचे सुचविलेले आहे. या वह्या नंतर देवळांमार्फत हरीद्वारला जातात व मंदीरांच्या पायाभरणीमध्ये त्या पुरल्या जातात.
मला काही प्रश्न पडलेले आहेत -
(१) असे रामनाम लिहीणे, जप करणे हा रिकामटेकडा विरंगुळा आहे का?
- माझ्या मैत्रिणीच्या आई विधवा असून, निवॄत्तीपरान्त, शांत व निवांत आयुष्य जगत असून , खाण्यापीण्याची अतोनात कडक बंधने त्यांनी स्वतःला घालून घेतलेली आहेत. मन भरकटू नये - उदा अमके खावे/तमके ल्यावे अशा सहजसुलभ वासना, या वहीचा उपयोग होत असावा असा कयास.
(२) मी स्वतः ४ पाने भरुन पाहीली. सलग एक पान अ‍ॅट अ टाइम पूर्ण केले. संमिश्र अनुभव आला.
- ३ वेळेला, मला जाणवले की मनात सकारात्मक व मन निवळवणारे विचार येतात. चांगलेच विचार येतात. एका वेळेला मात्र संमिश्र विचार आले - गॉसिपी, सकारात्मक, mundane तीन्ही प्रकारचे. मात्र चारही वेळेला एक संवेग अर्थात फ्लो व सहजता साधत असल्याचे अनुभवास आले. एक पर्पझ ड्रिव्हन अ‍ॅक्टिव्हीटी असल्याचा अनुभव आला. की हे पान आपल्याला पूर्ण भरायचे आहे, हा तो पर्पझ. त्यातून एक आनंद मिळाला.
(३) सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे
- सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे, यामध्ये तत्वतः फरक आहे हे मान्य आहे. सुडोकूमध्ये मेंदूला चालना मिळते, तल्लखता जाणवते. याउलट रामनाम लिहीण्यामध्ये (मनात जप करत करत) एक शांत सहज संवेगाचा अनुभव येतो. या दोन्हीमध्ये क्वालिटेटिव्ह फरक काय? उदा - डिप्रेशन/अवसादात सुडोकू चा वापर करावा ज्यायोगे, मेंदू अ‍ॅक्टिव्हेट करणारी रसायने अधिक निर्माण होतील याउलट उन्मादामध्ये, रामनामामुळे शांत वाटेल - वगैरे प्रकारचा काहीही रिसर्च माझ्यातरी पहाण्यात आलेला नाही. पण ते तसे नसेलच अशी गॅरंटी नाही. अर्थात हा माझा अंदाज आहे. कोणी विदा जमविल्यास, विश्लेषण केल्यास, पूर्ण संशोधनांती काही हाती लागू शकेल.
सुडोकू खेळणे किंवा तत्सम मेंदूस चालना देणारी अ‍ॅक्टीव्हीटी व रामनाम लेखन जपयज्ञ या म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह अ‍ॅक्टिवीटीज आहेत असे मला म्हणायचे नसून, मी फक्त तुलनात्मक दृष्टीकोनामधून दोन्हींकडे पहात आहे.
(४) कोणी हा लेखन यज्ञ 'कन्सिस्टंटली ( चिकाटीने )' केलेला असल्यास, तुमचा अनुभव काय आहे?
मला स्वतःला स्तोत्रे म्हटल्याने फार बरे वाटते. पण त्या मागे शब्दप्रेम, नादाची भुरळ या बाबी आहेत हे मान्य आहे. रामनाम लेखनाचा अनुभव नाही. एक दोन वेळा मनाचे श्लोक लिहून काढलेले आहेत. मनाचे श्लोक वेगळे. ते लिहीताना, मनात रुजू लागतात. पण हे जे 'रीपीटीटिव्ह' श्रीराम-श्रीराम-श्रीराम लिहीणे आहे, तो नक्की वेगळ्य प्रकारचा अनुभव आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अजुन एक मुद्दा- प्रत्येक व्यक्ती तिच्या कलानुसार, आकलनानुसार, दिवसभरातील घटनांची संगती लावण्याचा प्रयत्न करीत असते मीही अपवाद नाही. ही वही मला मिळाली ती तारीख व वेळ याची कुंडली मांडली असता पुढील नीरीक्षण दिसले.

ही कुंडली माझ्या कुंडलीशी (लग्न=मिथुन) मोठ्या प्रमाणात, रेझोनेट होते (निदानपक्षी तसे मला माझ्या अर्धवट ज्ञानामधुन वाटते तरी. असो.) सातवे घर हे गुरुचे घर असते कारण तुमचे गुरु तुमच्या समोरासमोर आसनस्थ असतात. जर कुंडलीतील, लग्नस्थान म्हणजे तुम्ही असाल तर, अर्थात बरोब्बर तुमच्या समोरचे स्थान हे गुरुचे असते. सातव्या घरात या विशिष्ठ वेळी बरीच घडामोड असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मला या लेखनाच्या बाबतीत खरच जाणून घ्यायचे आहे. मूळ नक्षत्रामध्ये गुरु व सूर्य असून, काहीतरी 'आमूलाग्र बदलाचे निदर्शक' किंवा एखाद्या बाबीच्या मूळाशी जाउन तपास करण्याचे हे नक्षत्र निदर्शक आहे. थोडक्यात,जिगसॉ पझलचे बरेच तुकडे माझ्याकरता, फिट बसताना मला तरी दिसत आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या एक अनुभव असा आहे की मी 2018मध्ये व्यंकटेश स्तोत्र देवा समोर बसून वाचन करत होते पण अचानक मला कसा तीर वेगळाच अनुभव येत होता आणि खूप भीती ही वाटत होती कोणती तीरी शक्ती माझा जवळ येत आहे अस वाटत होता 2रात्री मी झोपले ही नाही आणि जेवण पण केले नाही icu मध्य होते 8 दिवस खूप जास्त आजारी पण बरी झाली काही दिवसात. मला ना वेगळे वेगळे आवाज येत होते शंकानाद, घंटानाद, आणि मंत्र उचार अस सगळे ऐकू येत होत सलग 2दिवस आता पण जास्त काही कळत नाही की काय झाल होत ते पण खरच खूप विचित्र अनुभव होता तो.

YouTube वर regression therapy hypnosis चे बरेच videos आहेत. मी त्यातला एक try केला. एक विशिष्ट ring असते या आवाजांना. It’s a bit not only compelling but also bothersome. तुम्हाला बाहेर आल्यावरही त्रास होत रहातो. मला तरी झाला.
मी काळजीत पडले व रामाचे नामस्मरण चालू केले. It broke the spell immediately. असा अनुभव आला. लगेच YouTube वरील , बाबा बेलसरे यांच्या प्रवचनांच्या channel वर गेले. Can you believe कोणता video समोर ठाकला - अंतर्मनामधे नाम.

हा खचितच योगायोग नाही.

Pages