रामनाम लेखन जपयज्ञ वही

Submitted by सामो on 29 December, 2019 - 23:58

डिसक्लेमर - लेखिका ज्योतिषावरती विश्वास ठेवते. या धाग्याचा स्कोप, तो विश्वास योग्य आहे की अयोग्य हा नाही.

भारतवारीत जशा मी भेटवस्तू दिल्या, तशाच मला भेटवस्तू मिळाल्यासुद्धा. या सर्व भेटवस्तूंमध्ये मला एक कुतूहलपूर्ण अशी लहानशी भेट मिळाली. एका मैत्रिणीच्या, ७६ वर्षिय आईकडून. ती म्हणजे 'रामनाम मंत्र जप यज्ञ वही' व २ लाल रंगाची बॉलपेने. या वहीत १००-२०० पाने असतील प्रत्येक पानावरती एकूण ३९ बाय १३ अशा ५०७ रिकाम्या चौकटी आखलेल्या असून, प्रत्येक चौकटीमध्ये तुम्ही लहान अक्षरात हवे ते लिहू शकता . प्रत्येक चौकटीं मध्ये 'श्रीराम' हा शब्द लिहावयाच्या उद्देश्याने, जेमतेम त्या आकाराची प्रत्येक चौकट आहे. लाल रंग शुभ असल्या कारणाने लाल रंगात लिहीण्याचे सुचविलेले आहे. या वह्या नंतर देवळांमार्फत हरीद्वारला जातात व मंदीरांच्या पायाभरणीमध्ये त्या पुरल्या जातात.
मला काही प्रश्न पडलेले आहेत -
(१) असे रामनाम लिहीणे, जप करणे हा रिकामटेकडा विरंगुळा आहे का?
- माझ्या मैत्रिणीच्या आई विधवा असून, निवॄत्तीपरान्त, शांत व निवांत आयुष्य जगत असून , खाण्यापीण्याची अतोनात कडक बंधने त्यांनी स्वतःला घालून घेतलेली आहेत. मन भरकटू नये - उदा अमके खावे/तमके ल्यावे अशा सहजसुलभ वासना, या वहीचा उपयोग होत असावा असा कयास.
(२) मी स्वतः ४ पाने भरुन पाहीली. सलग एक पान अ‍ॅट अ टाइम पूर्ण केले. संमिश्र अनुभव आला.
- ३ वेळेला, मला जाणवले की मनात सकारात्मक व मन निवळवणारे विचार येतात. चांगलेच विचार येतात. एका वेळेला मात्र संमिश्र विचार आले - गॉसिपी, सकारात्मक, mundane तीन्ही प्रकारचे. मात्र चारही वेळेला एक संवेग अर्थात फ्लो व सहजता साधत असल्याचे अनुभवास आले. एक पर्पझ ड्रिव्हन अ‍ॅक्टिव्हीटी असल्याचा अनुभव आला. की हे पान आपल्याला पूर्ण भरायचे आहे, हा तो पर्पझ. त्यातून एक आनंद मिळाला.
(३) सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे
- सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे, यामध्ये तत्वतः फरक आहे हे मान्य आहे. सुडोकूमध्ये मेंदूला चालना मिळते, तल्लखता जाणवते. याउलट रामनाम लिहीण्यामध्ये (मनात जप करत करत) एक शांत सहज संवेगाचा अनुभव येतो. या दोन्हीमध्ये क्वालिटेटिव्ह फरक काय? उदा - डिप्रेशन/अवसादात सुडोकू चा वापर करावा ज्यायोगे, मेंदू अ‍ॅक्टिव्हेट करणारी रसायने अधिक निर्माण होतील याउलट उन्मादामध्ये, रामनामामुळे शांत वाटेल - वगैरे प्रकारचा काहीही रिसर्च माझ्यातरी पहाण्यात आलेला नाही. पण ते तसे नसेलच अशी गॅरंटी नाही. अर्थात हा माझा अंदाज आहे. कोणी विदा जमविल्यास, विश्लेषण केल्यास, पूर्ण संशोधनांती काही हाती लागू शकेल.
सुडोकू खेळणे किंवा तत्सम मेंदूस चालना देणारी अ‍ॅक्टीव्हीटी व रामनाम लेखन जपयज्ञ या म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह अ‍ॅक्टिवीटीज आहेत असे मला म्हणायचे नसून, मी फक्त तुलनात्मक दृष्टीकोनामधून दोन्हींकडे पहात आहे.
(४) कोणी हा लेखन यज्ञ 'कन्सिस्टंटली ( चिकाटीने )' केलेला असल्यास, तुमचा अनुभव काय आहे?
मला स्वतःला स्तोत्रे म्हटल्याने फार बरे वाटते. पण त्या मागे शब्दप्रेम, नादाची भुरळ या बाबी आहेत हे मान्य आहे. रामनाम लेखनाचा अनुभव नाही. एक दोन वेळा मनाचे श्लोक लिहून काढलेले आहेत. मनाचे श्लोक वेगळे. ते लिहीताना, मनात रुजू लागतात. पण हे जे 'रीपीटीटिव्ह' श्रीराम-श्रीराम-श्रीराम लिहीणे आहे, तो नक्की वेगळ्य प्रकारचा अनुभव आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अजुन एक मुद्दा- प्रत्येक व्यक्ती तिच्या कलानुसार, आकलनानुसार, दिवसभरातील घटनांची संगती लावण्याचा प्रयत्न करीत असते मीही अपवाद नाही. ही वही मला मिळाली ती तारीख व वेळ याची कुंडली मांडली असता पुढील नीरीक्षण दिसले.

ही कुंडली माझ्या कुंडलीशी (लग्न=मिथुन) मोठ्या प्रमाणात, रेझोनेट होते (निदानपक्षी तसे मला माझ्या अर्धवट ज्ञानामधुन वाटते तरी. असो.) सातवे घर हे गुरुचे घर असते कारण तुमचे गुरु तुमच्या समोरासमोर आसनस्थ असतात. जर कुंडलीतील, लग्नस्थान म्हणजे तुम्ही असाल तर, अर्थात बरोब्बर तुमच्या समोरचे स्थान हे गुरुचे असते. सातव्या घरात या विशिष्ठ वेळी बरीच घडामोड असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मला या लेखनाच्या बाबतीत खरच जाणून घ्यायचे आहे. मूळ नक्षत्रामध्ये गुरु व सूर्य असून, काहीतरी 'आमूलाग्र बदलाचे निदर्शक' किंवा एखाद्या बाबीच्या मूळाशी जाउन तपास करण्याचे हे नक्षत्र निदर्शक आहे. थोडक्यात,जिगसॉ पझलचे बरेच तुकडे माझ्याकरता, फिट बसताना मला तरी दिसत आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकार खूप सूक्ष्म आहेत. त्यांचेवर मात करायला जो उपाय शोधायचा तो तसाच सूक्ष्म असायला हवा. नाम हे विकारांहून सूक्ष्म आहे. त्यामुळे ते विकारांपर्यंत पोहोचू शकते व मातही करू शकते. आपल्याला नामाची फक्त सतत धार धरता आली पाहिजे.

हेही गोंदवलेकर महाराजांचेच आहे. फक्त शब्द असेच असतील असे नाही. अनेक वर्षांपूर्वीचं वाचलेलं आहे.
_/\_

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे |
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानन ||

( श्रीराम कृपेने जानेवारी महिन्यांत प्रथम अपत्य कन्यारत्न प्राप्त झाले, तिचे नाव रमा ठेवले आहे Happy हा श्लोक तिला सतत म्हणून दाखवते, आता ती ह्या श्लोकाला छान प्रतिसाद देऊ लागली आहे, गोड हसून Happy )

जय श्रीराम ||

आशा करते कोणी माझी मस्करी करणार नाही. पण जेव्हा जेव्हा मी रामनाम घ्यायला सुरुवात केली, त्या त्या रात्री, मला रात्रभर खूप वाईट, त्रासदायक स्वप्ने पडली.>> फक्त राम म्हणु नका श्रीराम असे उच्चारण करा. >> धन्यवाद सामो. Happy प्रयत्न करून बघते.>>
"श्रीराम जयराम जय जय राम" नाही का म्हणत?

श्रीराम कृपेने जानेवारी महिन्यांत प्रथम अपत्य कन्यारत्न प्राप्त झाले, तिचे नाव रमा ठेवले आहे >> अभिनंदन किल्ली

@नानबा, आज रात्री (१२:४० मध्यरात्री) मी १३ वेळा 'मराठी व्यंकटेश स्तोत्र' म्हटले. मला २॑१ वेळा म्हणायचे होते पण खूप झोप आली. बरोब्बर आत्ता पहाटे मला खराब स्वप्नाने जाग आली.
नक्की काहीतरी कारण आहे. योगायोग नाही.
-------------------------------------------
कोरावरती हाच प्रश्न लोकांनीही विचारलेला आहे - https://www.quora.com/Why-do-I-get-nightmares-everytime-I-pray
कोरावरती, एक उत्तर आहे - स्वप्ने सांकेतिक असतात.
एक उत्तर आहे - अँग्झायटी इश्युज असतात.

मला दुसरे उत्तर पटते. अगदी अँग्झायटी नाही परंतु आज माझे पाय फार दुखतायत त्यामुळे ते स्वप्न पडलेले असण्याची दाट (९९%) शक्यत आहे.

मला वाटते कोहंसोहं१० यांना पाहिजे असावे ----> शामजी लिंक बद्दल धन्यवाद. मी हे पुस्तक scribd वरूनच वाचले होते आधी. मी या पुस्तकाचा पहिला भाग 'नामजपाचे महत्व' हे पुस्तक शोधत होतो. ते मिळाल्यास नक्की कळवा.

किल्ली!
अभिनंदन! नावही सुरेख आहे.तुझ्या बाळंतपणाच्या धाग्या वरून शंका आली होती.

नामजपाने कधीकधी वाईट स्वप्ने पडू लागलास सुरुवातीला नामजप विधिपूर्वक करायचा प्रयत्न करा. सर्वात प्रथम जपला सुरुवात करण्याआधी त्या देवाची देव्हाऱ्यात मूर्ती/फोटो समोर बसून हळद कुंकू वाहून नामजपाला सुरुवात करत आहे तेंव्हा रक्षण करावे असे सांगूनच सुरुवात करून बघा. सुरुवातीचे काही दिवस तरी जमिनीवर आसन (आसन शक्यतो लोकरीचे किंवा रेशमी वस्त्राचे असावे त्यामुळे शरीरातील पॉसिटीव्ह करंटचे अर्थिंग होत नाही) अंथरून जपमाळेने ठरलेल्या वेळी ठराविक माळा जप करा. शक्यतो गादीवर बसून किंवा झोपून जप करणे काही दिवस तरी अव्हॉइड करा असे सुचवेन.

मला अगदीच किळसवाणी (इथे सांगू शकत नाही) किंवा खूप भीतीदायक स्वप्ने पडतात. कधी कधी गुदमरल्यासारखे जाणवते. सामोंनी सांगीतल्याप्रमाणे फक्त राम न म्हणता "श्रीराम जय राम जय जय राम" असं नामस्मरण सुरू केले आहे तेव्हापासून त्रास नाही जाणवला.

नामजप विधिपूर्वक करायचा प्रयत्न करा. >>

असे नाही जमत आजकाल. ध्यान, मंत्रोच्चार, किंवा इतर मंत्रजप करताना मणक्यातून एकदम करंट बसल्यासारखे वाटते. जास्त करून मानेतून वर माथ्यापर्यंत झटके बसतात. आवाज एकदम चढतो. असे वाटते कोणीतरी ताबा घेईल शरीराचा. मी लगेच उठतेच त्या जागेवरून. काही न जाणवणाऱ्या मानसिक तणावामुळे होत असेल का??? येता जाता नामस्मरण करताना असा त्रास जाणवत नाही. म्हणून मी होता होईल तो नामस्मरण करते.

सामोंनी सांगीतल्याप्रमाणे फक्त राम न म्हणता "श्रीराम जय राम जय जय राम" असं नामस्मरण सुरू केले आहे तेव्हापासून त्रास नाही जाणवला. >>> वा मस्त अनुभव.

ध्यान, मंत्रोच्चार, किंवा इतर मंत्रजप करताना मणक्यातून एकदम करंट बसल्यासारखे वाटते. जास्त करून मानेतून वर माथ्यापर्यंत झटके बसतात. आवाज एकदम चढतो. >> कुंडलिनीशी संबंधीत असू शकते का? जाणकारांना विचारा.

ध्यान, मंत्रोच्चार, किंवा इतर मंत्रजप करताना मणक्यातून एकदम करंट बसल्यासारखे वाटते. जास्त करून मानेतून वर माथ्यापर्यंत झटके बसतात. आवाज एकदम चढतो. >> कुंडलिनीशी संबंधीत असू शकते का? जाणकारांना विचारा.>>>
भूताबितानं पकडलेलं असेल पूर्वी कधीतरी नाहीतर एखाद्या उग्र दैवताचा संचार होणार असेल. यातील जाणकारांना दाखवा.

भूताबितानं पकडलेलं असेल पूर्वी कधीतरी नाहीतर एखाद्या उग्र दैवताचा संचार होणार असेल. यातील जाणकारांना दाखवा. >> हाडळीचा आशिक >> खरतर आयडी बघता तुम्हीच जाणकार असाल असे वाटलेले. (दिवे)

भूताबितानं पकडलेलं असेल पूर्वी कधीतरी नाहीतर एखाद्या उग्र दैवताचा संचार होणार असेल. यातील जाणकारांना दाखवा. >> तुमच्या आयडी नुसार तुमचा या गोष्टींवर विश्वास असेल. माझा नाही.

कुंडलिनीशी संबंधीत असू शकते का? जाणकारांना विचारा. >> असू शकेल. नसेलही. मानसिक सुद्धा असू शकेल. या बाबतीतला सखोल अभ्यासक भेटला पाहिजे. त्याला नशीब पाहिजे. भोंदूगिरी करणारे सुद्धा कमी नाहीत.

हम्म्.
सूक्ष्म देह पाहू शकणारा अधिकारी पुरूष सांगू शकेल. त्यात परत तो नामस्मरणातला अधिकारी पाहिजे. पण ती लोकं कधीही कारण सांगणार नाहीत. फक्त काय करायचे ते सांगतील.
असो.

हा धागा रामजपाविषयी आहे. पण माझा प्रश्न कुठे विचारावा माहित नाही म्हणून इथेच विचारते.
गुरुमंत्राच्या ( गुरूने जपासाठी दिलेला मंत्र) जपाबद्दल कोणाला काही माहिती आहे का? किंवा वाचनासाठी कृपया काही पुस्तके सुचवू शकाल का?

अजून एक शंका. जर स्वप्नात कोणी येऊन दोन तीन वेळा एखादा मंत्र सांगत असेल तर आपल्याला त्या मंत्राचा उपदेश झाला असे समजावे का

>>>>>>>मला अगदीच किळसवाणी (इथे सांगू शकत नाही) किंवा खूप भीतीदायक स्वप्ने पडतात. कधी कधी गुदमरल्यासारखे जाणवते.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

@नौटंकी, देवाचे केले की दुप्पट शक्तीने ही स्वप्ने पडतात हे मी आज कन्फर्म करते. परत परत हाच प्रकार घडतो आहे.
यावरुन मला एवढेच दिसते की कशाला तरी ईश्वरी साधनेचा, स्तोत्र आदि, त्रास होतोय. तेव्हा उपासना दुपटीने करण्याची गरज आहे.

मला 'अमोघ शिवकवच' एक प्र-ह-चं-ड आवडते. खूपच ताकद आहे त्यात असा अनुभव आहे. मिळाल्यास जरुर जरुर वाचा. मी शांत स्वरात बरेचदा म्हणते. जवळ जवळ पाठ आहे.

Pages