आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याच विषयावर कश्यपचा 'पांच' चित्रपट आहे. मराठीतल्या माफीच्या साक्षीदार पेक्षा बराच चांगला आहे.>>> हिंदी फारच अतिरंजित केला आहे. अनुराग कश्यप साठी पाहिला होता, पण माफीचा साक्षीदारची सर त्याला नाहीच. नाना पाटेकर काय ताकदीचा अभिनेता आहे हे त्या सिनेमापासुन खऱ्या अर्थाने कळले होते. ह्या हत्याकांडाबद्दल खूप काही वाचलेले आहे. क्राईम पेट्रोल मध्ये पण एपिसोड आहे. पण "माफीचा साक्षीदार" मधल्या नानाची तुलना फक्त "दंडुपल्या" (कन्नड) मधल्या क्रिष्णा - मकरंद देशपांडे सोबत होऊ शकते.
अंजनाबाई- म्हणजे गावित भगिनींची आई ना, भयंकर प्रकरण होतं ते संपूर्ण कुटुंब! या विषयावर वाचताना हि अंगावर भयंकर काटा आलेला. यांच्यावर पोषम पा नावाची सिरीज आलेली आहे.

"दंडुपल्या" देखील एका सत्य घटनेवर आधारित आहे. यातल्या मकरंदच्या कॅरेक्टरला खून करण्याची आवड असते. त्याला विचारल्यावर तो म्हणो कि गळा चिरल्यावर रक्त बाहेर पडताना जो आवाज येतो तो मला आवडतो, आणि तो ऐकण्यासाठी मी खून करतो. आणि हे प्रसंग देखील सिनेमात दाखवले आहेत. नाजूक हृदयाचे असाल तर या चित्रपटाच्या वाटी न जाणेच बरे!

बाकी लहान वयातच या सर्व विकृत गुन्हेगारांचे मानसशास्त्र तसे घडले म्हणून ते सिरीयल किलर झाले असावेत. फार अवांतर झाले, सॉरी!

लहानपणी पेशवे पार्कात जायचो. तिथे एक छोट्टेसे तळे आहे, त्यावर तसाच छोटा पूल. त्या तिथेच आसपास जक्कल वगैरे यायचे हे मला जेव्हा मोठे झाल्यावर मुन्न्वर चे येस आइ एम गिल्टी वाचल्यावर कळले, तेव्हा जाम धस्स झाले होते. हत्याकांड घडायच्या काही दिवस आधीच आम्ही पुण्यात येऊन गेलो होतो. जाम भितीचे दिवस होते ते.

बाकी बर्‍यापैकी पुणे पालथे घातल्यावर आता काय काय राहीले आहे याची उजळणी चालू असतांना हा धागा नजरेत आल्याने खूप बरे वाटले, धन्यवाद चिनुक्स व इतर माबोकर्स !

चंपा मुन्नवर शहाचं मी मराठीतच वाचलंय, टायटल इंग्लिशच आहे. मूळ इंग्लिश असेल तर अनुवाद केलेला असावा, मला आता नीट आठवत नाही.

येस आय एम गिल्टी हे मुनव्वर शाहचे पुस्तक आणि बहुदा दक्षताच्या अंका त ही सर्व story वाचली होती.मुनव्वर शहाचे पुस्तक बहुतेक मराठीत आहे.
कदाचित त्यामुळेही असेल पण
7- 8 दिवसांपूर्वी यू ट्यूबवर माफीचा साक्षीदार सिनेमा एकावेळी पाहू शकले नाही.नाना पाटेकर तसाच कोल्ड ब्लडेड मर्डर र वाटतो.

त्याच चित्रप टा खालील एक कॉमेंट वाचून हतबुद्ध झाले.
" त्यावेळी बाफना आणि इतर खूनपण झाले ना,मग जोशी अभ्यंकर खू न प्रकरण म्हणून का ओळखले जाते?" या मध्ये ही जात विसरत नाहीत लोक.

माफीचा साक्षीदारची सर त्याला नाहीच-> +१ ... नाना बद्दल काय बोलायचे .एकदम बेष्ट काम केलाय त्याने . एक काळ गाजवलाय या चित्रपटाने. पेशवे पार्क मधल्या त्या तळ्यातल्या सीन ने खूप लोकांची टरकलेली . मर्डर मिस्टरी वरून हॉरर होता होता राहिला हा चित्रपट

मी पण 'जोशी-अभ्यंकर खून प्रकरण' दक्षता मधेच वाचल्याचे आठवते आहे बहुदा दिवाळी अंक होता. हे नक्की आठवते की मी दिवाळीचा फराळ खाताना ते वाचायला घेतले होते अभ्यंकर आजोबा खूप म्हातारे म्हणजे ८०-९०वर्षांचे होते त्यांच्या तोंडात बोळा कोंबून हातपाय वगैरे बांधलेले असे वर्णन अंधूक आठवते आणि ते वाचल्यावर मला दिवाळीचा फराळ अजीबात घशाखाली उतरला नव्हता. हे असं काहीही कारण नसताना, कोणी आणि का करू शकतं असं वाटून खूप भिती वाटलेली.

अवांतर- भारतातले सीरिअल किलिंग गुन्हे कोणकोणते आहेत? रमण राघव, ऑटो शंकर, गवित, निठारीतले घरमालक-नोकर (काय बरं नाव त्यांचं?) आठवताहेत. अजूनकोणी?
यांच्या व्हिक्टीमची नावं आठवताहेत का कोणाला?

तपास पूर्ण झाल्यानंतर सीरिअल किलिंगला मीडियात नाव कसं देतात? एकट्याने केलं असेल तर खून करणार्याचं? टोळीने केलं असेल तर म्होरक्याच? खून झालेल्यांचं?

" त्यावेळी बाफना आणि इतर खूनपण झाले ना,मग जोशी अभ्यंकर खू न प्रकरण म्हणून का ओळखले जाते?" या मध्ये ही जात विसरत नाहीत लोक.>>> तसे नसावे. कृपया जातीच्या अँगलने बघणे टाळावे.

यशोमती बाफनाच्या बंगल्यात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हा त्या आणि त्यांच्या दोन नोकरांनी जोरदार प्रतिकार केला व त्यांनी या चौघांना पळवून लावले होते.
जोशींच्या घरात आई-वडिल आणि त्यांचा टिनेजर मुलगा या तिघांचा खून झाला तर अभ्यंकर कुटुंबातल्या एकूण ५ जणांचा खून झाला. एकूण १०पैकी ८ जाणांचे खून या दोन कुटुंबातले होते आणि तेही एका महिन्याच्या अंतरात म्हणून ते नाव जास्त ठळकपणे लक्षात राहिले असावे.

देवकी,बाफना कुटूंबीयांचा खून झालेला नव्हता. हल्ला झाला होता व त्यांनी प्रतिकार केला.
फक्त जोशी अभयकर या दोनच कुटूंबाचे खून झाले ते पण सेम पध्द्तीने म्हणून तसं नाव पडले.
इतर दोन तरुणांचे खून झाले होते. पण त्यांचे मृतदेह नंतर मिळाले, तोपर्यंत जोशी अभ्यकर हेच नाव प्रचलित झालं होतं.

गळा चिरल्यावर रक्त बाहेर पडताना जो आवाज येतो तो मला आवडतो>>>>>>>>>>> ईईई हा डायलॉग बहुतेक मी कोणत्या तरी वेब सिरीज मधे ऐकलाय. बहुधा मिर्झापूर??

बापरे भयंकर आहे हे सगळं. मला वाटतं १५-२० वर्षांपूर्वी सागर स्वीट मार्टच्या मालकांच्या कुटुंबातील लोकांचीही हत्या झाली होती. अगदी लहान मुलांनाही सोडलं नव्हतं. राठी नाव बहुतेक. कोथरूडमधे राहात होते. नोकराने साथीदारांच्या मदतीने हे केलं होतं.

हो. २५-२६ वर्षंपुर्वी.. मी शाळेत होते तेव्हा.
खून्याला फाशीची शिक्षा सुनावली होती पण दयेच्या अर्जांवर तारीख पे तारीख करत बरीच वर्षे गेली, आणि फाशी रद्द होऊन जन्मठेप झाली.

कृपया जातीच्या अँगलने बघणे टाळावे,------ मी फक्त कॉमेंट काय होती ते लिहिलंय.असे निर्घृण खून zalé असताना प्रतिसाद देणारा त्या adnavarun का ओळखले जाते म्हतल्यावर चीड / हताश पणा आ ला.

त्या सगळ्या प्रकरणानतर 'अभिनव ' सारख्या नावाजलेल्या सन्स्थेच नाव इतक खराब झाल होत की तिथे शिकणार्‍या मुलाना होस्टेल मिळण, भाडेकरू म्हणून जागा मिळन दुरापास्त झाल होत.

जोशी अभ्यंकर यांपैकी वाचलेले कोणीतरी रिटायर्ड आर्मी ऑफिसर होते. त्यांनी कोर्टात चिडून यांना फाशी झाली नाही तर मी स्वतः त्यांन्ना गोळ्या घालेन असे काहीतरी सांगितले होते. साहाजिकच आहे. उगाच कोणाचे तरी विकॄत थ्रील म्हणून इतक्या जीवांचा हकनाक बळी गेला. Sad

भूतकर आणि जक्कल इराण्याकडे बसलेले असताना एक मुलगा पत्ता विचारतो तेव्हा जक्कल त्यांना म्हणतो की असा कुठलाही कागद हातात घ्यायचा नसतो याचा संदर्भ काय. काय असतं त्या कागदावर.
भूतकर मला फारच धाडसी वाटले, पोलिसांच्या गाडीत बसलेल्या मित्राशी जाऊन बोलले वगैरे. आपण छोटया छोटया गोष्टींचा किती विचार करतो आणि मनाला खात राहतो. यांच्या बाबतीत एवढी मोठी घटना घडली त्याचे त्यांच्या मनावर काय आघात झाले असतील आणि ते किती विचार करत असतील.

माफीचा साक्षीदार बघितला. बरेच संवाद कळले नाहीत. किती खरे आणि किती अतिशयोक्ती हे माहित नाही कारण मूळ घटना कशी घडली ते माहित नाही. स्टारकास्ट पण दिलेली नाही. अविनाश खर्शीकर असा लांबून टेहळणी करताना दाखवलाय ते कसं शक्य आहे. एक प्रकारे त्याचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता (चांडक) हेच ठसवलंय. सुनील म्हणजे दिलीप सुतार आहे की जयंत गोखले. बाकीचे ताकदवान पण डोकं न चालवणारे दाखवलेत. क्लायमॅक्स तर अतिरंजित. नाना प्रत्यक्ष जीवनातही जेजेला होता हा योगायोग. नाना शेवटपर्यंत विकृत आहे चित्रपटात. मी फाशी जाईन पण शेवटची इच्छा म्हणून बाकीचे तिघे फाशी गेले पाहिजेत हा संवाद काटा आणणारा आहे. बाकी पोलीस व्हॅन मधली मारामारी वगैरे अनाठायी आहे. सुरुवातीला एक गाणं चांगलं आहे, जीवन मी आई ये नशा है, हिंदी-मराठी मिक्स.

जोशी अभ्यंकर ह्या भयंकर प्रकरणाच्या आठवणी, उत्सुकता आजही टिकून आहे. ह्या प्रकरणावर बी पी बाम ह्या पोलिस अधिकार्‍याने अत्यंत सखोल लेख लिहिला होता. १९८२ च्या दक्षता दिवाळी अंकात तो आला होता. पण अनेक प्रयत्न करूनही तो नेटवर मिळू शकला नाही. तो अत्यंत वाचनीय आणि भीतीदायकही आहे.
जक्कल आणि त्याची गँग हे sociopath प्रकारातले लोक असावेत. एकेकटे कदाचित एवढे हत्याकांड करू शकले नसते पण चौघे एकत्र आल्यामुळे ते एकमेकांना पूरक ठरले आणि घातक बनले. जक्कल तर नक्कीच घरातल्या दुर्लक्ष आणि मारहाणीमुळे तसा झाला असेल. शाम भुतकरांच्या लेखावरून असे वाटते की अगदी मित्र असणार्‍या सज्जन लोकांशी वागताना आपल्या खलवृत्तीबद्दल काहीही समजू द्यायचे नाही असे कम्पार्टमेटलायझेशन त्याला उत्तम जमले होते.
बहुतेक दुष्कृत्यांमधे निव्वळ पैसे मिळवणे हा उद्देश असता तर खून न करता तोंडावर फडकी वगैरे बांधून ते करता आले असते. कारण जोशी, अभ्यंकरांच्या घरात काहीही प्रतिकार झाला नव्हता. पण चोरीबरोबर खून करण्याची एक विकृत उर्मी होती आणि ती भागवयची होती.
मुनव्वर शाहच्या पुस्तकाची काही पाने गूगल बुक्सवर उपलब्ध आहेत. तेही वाचनीय आहे. पण कितपत खरे आहे सांगता येत नाही.

हा खटला चालू असताना एक विचित्र घटना म्हणजे अनेक तरूण, विशेषतः तरूण मुली ह्या आरोपींना बघायला गर्दी करायच्या. चीअर करायच्या. हाय हॅलो (किंवा १९७७-८० च्या काळात जे काही असेल ते) करायच्या. ते आरोपीही मोठे हिरो असल्यासारखे ते कौतुक एन्जॉय करायचे. सर्वसामान्य लोकांना हे अनाकलनीय वाट्ले असेल. अनेक पत्रकार व अन्य लोकांनी ह्या आठवणी लिहिलेल्या आहेत.

हर्पेन,खूप मस्त लिंक दिली तुम्ही ... रस्ते बदलून आम्ही या प्रभात रोड आणि जिमखानाच्या गल्ल्यां मधून जातो आणि मनातल्या मनात हंत हंत म्हणतो Happy
जिमखान्याजवळ अमिताभ/जॉन च्या 'विरुद्ध' च शूटिंग झालेला बंगला आहे, आणि त्याच्या शेजारी पण एक सुंदर असा बंगला आहे..

हर्पेन मस्त लिंक.
अंधा धुन मधला बंगलापण टिपिकल प्रभात रोड/भांडारकर रोडचा वाटतो

धन्यवाद फा, मै, ए श्रद्धा , वावे साजिर्‍या
जुन्या चिरेबंदी घरांबाबत सध्या, एकेक पान गळावया चालले आहे. त्यामुळे हे दस्ताऐवजीकरण खूप मोलाचे आहे.

आणि मै, मलाही तो ब्लॉग पाहताना अरेच्चा ही घरे तर आपल्या ओळखीची आहेत असेच मनात आले. त्या घरांना स्वतःचे असे एक व्यक्तीमत्व आहे.

अवांतर - मध्यंतरी वर्षा दोन वर्षामागे मैत्री तर्फे रद्दी जमा करण्याच्या कामाकरता स्वयंसेवक म्हणून काम करताना हा भाग वाट्याला आला होता. इतर उपनगरातल्या सोसायट्यांच्या मानाने काम जरा जास्त पडलं रद्दीही तशी कमीच जमा झाली पण मी ह्या घरांना भेटी देता आल्या म्हणून खूप म्हणजे खूप खूष होतो.

Pages