आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा ते आले नाहीत म्हणून आजोबांनी मला वाचायला बसवले पण ते पुस्तक फारच 'जड' होते. मग एकदा रात्री जेवताना समजले की ते येणारे साठीचे गृहस्थ हे अभ्यंकर होते. >>> ओह्ह्ह बापरे !!! किती भयंकर असेल ना !! ते पुस्तक वाचलं होतं - यॅस आय अ‍ॅम गिल्टी , तेव्हाही अंगावर काटा आला होता वाचून.

@अतुल पाटील, तो लेख आधीही वाचनात आला होता. परत एकदा वाचला. आताही काटा आलाच. श्याम भूतकर सर आम्हाला गरवारे शाळेत चित्रकला शिकवायला होते. त्यावेळी त्यांच्या मनावर ह्या सगळ्याचे किती दडपण असावे असे आता वाटते.

रच्याकने 'सुखन' 'मुळशी पॅटर्न' मुळे प्रसिद्ध ओम भूतकर हा श्याम भूतकरांचा पुतण्या.

मला त्या लेखातलं ओव्हरऑल क्रूर वर्णन वाचून आत्ताही काटा आला! आणि घोरपडीचं वर्णन तर वाचूच शकले नाही, तो परिच्छेद स्किप केला कारण लिटरली पोटात ढवळलं! असह्य आहे!
पण त्या वेळी सगळ्यांची, लेखकाचीही अवस्था काय झाली असेल याची कल्पना आली. प्रचंड अवघड!

मी पण आधी वाचलेला आहे. शेअर केल्या बद्दल धन्यवाद. एकूण लेखन पण किती चांगले आहे. मी तेव्हा पाचवी-सहावीत. जक्कल ह्यास पकडल्यावर एकदा लकडी पूल पूर्ण बंद करून त्याला बुरखा घालून आमच्या साइडच्या फुट्पाथ वर आणले होते. नदीत काही हत्यारे टाकली होती ते ती बुरखाधारी व्यक्ती बोट दाखवून पोलिसांना सांगत होती. हे आम्ही गॅलरीत उभे राहून बघितले. डॅम स्केअरी इट वॉज.

भांडार कर रोड मला साने डेअरी परेन्त माहिती पुढचा अनोळखी वाट्तो. अजूनही तिथून रिक्षेने जाताना दडपण येते. ह्या लेखावर आधारित खरेतर एक चांगली नेटफ्लिक्स मालिका बनेल. कृर मनोरुग्ण किलर एकदम नेट् फ्लिक्स टेरिटरी.

मला अर्धाच लेख दिसला बाकीची पाने उघडत नाहीत पण जेवढा काही वाचला तेवढा अस्वस्थ करणारा आहे नक्कीच.
बाबा आजोबांकडून ही जक्कल सुतार नावं कधीतरी ऐकली होती. पण नक्की हे हत्याकांड कशाकरता झाले होते ? पैसा वैमनस्य? की अजून काही. ?

ह्या लेखावर आधारित खरेतर एक चांगली नेटफ्लिक्स मालिका बनेल. >>
याच विषयावर कश्यपचा 'पांच' चित्रपट आहे. मराठीतल्या माफीच्या साक्षीदार पेक्षा बराच चांगला आहे.

प्रचन्ड अस्वस्थ करणारा लेख, आपल्या मित्राच हे दुसरच स्वरुप उघड झाल्यावर होणारी घालमेल वाचुन पोटात गोळा आला.

मी दरवेळी, जोशी-अभ्यंकर खूनखटला वाचले की, तितकीच घाबरते. कित्येक वेळा वाचलीय त्या खटल्यांविषयी आलेले कुठले न कुठले लेख, संदर्भ.. भयानक आहे.
आमच्या घरी त्यावेळी खूप चर्चा/वाद झालेले आजीचे व बाबाचे.
बाबा नुकतेच पुण्याला कायम स्थिर होण्याविषयी विचार करत होते; पण ह्या प्रकाराने नक्की ठरत न्हवते कारण घरचे मान्य करत न्हवते , त्यात बाबांची फिरती असणार मग, आई कशी एकटी रहाणार म्हणून पुणे टाळलच काही वर्षे.
हि चर्चा बर्‍याच वेळा लहानपणापासून एकली की, पुणे किती भयानक दबावाखाली होते ती काही वर्षे जोवर त्यां खून्यांना फाशी दिली नाही. आम्ही त्यानंतर काही वर्षांनी तिथे स्थिरावलो बाबांनी घर बांधून.
प्रभात रोड , डेक्कन परीसए एरवी तसाही, भितीदायकच असायचा सायंकाळनंतर..
बंड गार्डन खू पच फेमस झाला त्यानंतर..

बाकी, आपल्या आजूबाजूलाच किती विकृत विचांराची व वागणूकीची माणसं असतात ते दिसलेच आहे;
आणि कला व कौर्य दोन्ही एकत्र नांदतात हे ह्या लेखामधले वाक्यही तितकेच खरे कारण ते सुद्धा पाहिलेय इथे.
कलाकार वा कवी संवेदनशील वगैरे अगदीच भंपक आणि वरवरचं रूप आहे. असो.

२१ मार्च १९७७ ला दोन ठळक घटना घडल्या.
१. जोशी आणि अभ्यंकर खूनाचा तपास लागला. जक्क्ल आणि मंडळींना अटक .
२. जनता पक्षाने आय काँग्रेसला धूळ चारली व केंद्रात पहिला बिगर काँग्रेसेतर पक्ष म्हणून सत्तेवर आला. पुण्यात मोहन धारीयांनी विठ्ठलराव गाडगीळांचा पराभव केला.

@अतुल पाटील, तो लेख वाचला, ...अशक्य आहे हे सगळं....काटा आला अंगावर वाचताना ....भयंकर अस्वस्थ व्हायला झालंय.....

माझी मावस बहीन वकिलिचा अभ्यास करत असताना त्यांना अभ्यासासाठी हे प्रकरण होते. ती घरी आली की एक एक गोष्टी सांगायची. ऐकताना अंगावर काटे यायचे.

हे काहीतरी एकुण खुप भयानक प्रकरण वाटतंय मला.
बाबांकडे फक्त राजेंद्र जक्कल कोण? एवढच विचारल. तर विचित्र किश्श्यांची रांग लागली. ऐकायला पण नको वाटत होत. Sad

काही वैमनस्य नाही. थ्रिल, मज्जा म्हणून झाले बहुतेक खून. पैसा हा बोनस होता. हाच तर सगळ्यात भितीदायक भाग होता तेव्हा. पुढचा खून आपलाही होऊ शकतो अशी भिती वाटत होती लोकांना.

हाच तर सगळ्यात भितीदायक भाग होता तेव्हा. पुढचा खून आपलाही होऊ शकतो अशी भिती वाटत होती लोकांना.>>>>>>>>> बापरे त्या काळात पुण्यासारख्या ठिकाणी हे खरंच किती भितीदायक असेल कल्पना करवत नाही.

Pdf वाचली. या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती. गुगल करून वाचते आता. घोरपड प्रकरण भयंकर आहे. जक्कलच्या बाबतीत घरातले वातावरण जबाबदार होते असे वाटते. आईचा दुस्वास आणि वडील विकृत. शहा म्हणून अजून एक होता तोही सुटला का. त्याने तर पुस्तकही लिहिलं होतं अशी माहिती आहे गूगलवर.

मी खूप लहान असताना हे घडत होतं, पेपरमधे यायचं. नुकतीच पेपर वाचायला शिकले होते, गोडी लागली होती, मोठ्या अक्षरातले वाचायचे पटकन, लहान अक्षर एकेक करत हळूहळू वाचायचे पण हे वाचून भीती वाटायची, पहिल्याच पानावर असायच्या बातम्या. जरा मोठी झाल्यावर मुन्नवर शेखचं 'येस आय am गिल्टी' वाचलं होतं. फार अंगावर आलं. अजुनही काटा येतो आठवलं की. सुहास चांडक माफीचा साक्षीदार झालेला ना. खूप गाजले त्यावेळी सर्व, तिच चर्चा घरोघरी. नाना पाटेकरचा पिक्चर पण आहे त्यावरचा, मी नाही बघितला आणि बघू नाही शकणार.

शहा म्हणून अजून एक होता तोही सुटला का >>> नाही तो नाही सुटला. त्याने जेलमधे पुस्तकं लिहिलं.

शाम भूतकर यांचा लेख मागे वाचला होता.

Pdf वाचल्यानंतर (खासकरून ते लुटीचे दीडशे रुपये लेखकाला न देण्याचा प्रसंग) जक्कल मुख्य सूत्रधार असेल यावर विश्वास ठेवणं कठीण जातंय. खरंतर ते सगळेच विकृत होते, पण इतर चार जणांच्या मानसिकतेचासुद्धा अभ्यास व्हायला हवा होता.

धागा वाचताना अनेक जुन्या आठवणी डोक वर काढून गेल्या. माझ्या आठवणीतल पुणं म्हणजे........कोथरूड्ची बाग थोरात उद्यान, बागेच्या बाहेर मिळणारा खत्रींचा वडापाव. संचेतिवाड्याजवळील गणेश भेळचे दुकान. सुतार चाळ्,मोहित्यांची बाग, म्हातोबा मंदिरातील जत्रा, चतुर्‍श्रूगीदेवीची जत्रा, गणेशोत्स्वाचे दहा दिवस. त्या वेळी पहाटे पर्यन्त मंडळे चालू असायची. खडकमाळ, बाबूगेनू,हिराबाग यांचे देखावे मस्त असायचे. गणपती विसर्जन मिरवणूक जी आम्ही आमच्या आत्याच्या बाल्कनित उभे राहून बघायचो. तिचे घर अगदी मेन चौकत होते, जिथे दहा दिवस दगदूशेठ गणपती बसवला जायचा. त्यामुळे चारही बाजुने येणार्‍या रांगा दिसायच्या.
शाळेत मिळणारा चटनीपाव आणि समोसा. एक दोन वेळा तो खायला पैसे जमवण्यासाठी म्हणून आम्ही शाळेत पायी गेलो होते. कोथरूड ते डेक्कन त्यावरून नंतर घरच्यांनी चांगलीच बोलणी दिली आणि मग महिन्यातून एकदा शाळेत खाऊ खायला म्हणून पैसे मिळू लागले. १४४ नंबरची बस जी शाळेत घेऊन जायची आणि तिचे कधी खडूस तर कधी चांगले असणारे बस ड्रायव्हर. कारण हा बसस्टॉप होता पोस्टॉफिस समोर. बस तिथेच सगळ्यांना उतरवायची आणि शिवाजी पुतळ्याला फेरी मारून स्टॉपवर यायची. तेवढच चालायच अंतर कमी व्हाव म्हणून आम्ही काकांना पुतळ्या जवळ गाडी थांबवण्यासाठी विनंती करायचो. कधी ती मान्य व्हायची तर कधी ऊतरा ईथेच असा दम मिळायचा.
नंतर आम्हाला कळाले की ७३ नंबरची बस ही अजून एक स्टॉप पुढे सोडते अगदी सुतारचाळिजवळ. मग आम्ही कधी कधी ही बस वापरायचो. पण तिला फारच गर्दी असायची.
अजून एक भयानक आठवण म्हणजे अंजनाबाई. (ही जावई आणि मुलीसोबत मिळून लहान मुलांना पळवून न्यायची आणि त्यांचा बळि द्यायची.) हिला आम्ही प्रत्यक्ष पाहिलेल. आमच्या चाळित भाड्याने घर घ्यायच जवळ जवळ ठरलच होत तेवढ्यात तिला पोलिसांनी पकडले आणि आम्ही सुटलो. आदल्याच दिवशी जिला आम्ही पाहिले तिचा दुसर्‍या दिवशी पेपर मधे फोटो होता. तो पाहिल्यावर चाळित सगळ्यांचेच चेहरे पाहण्यासारखे झाले होते. कारण घर शोधण्याच्या कारणाने अनेक वेळा तिची चाळिला भेट झालि होती.

धन्यवाद अंजू. शहाचं नाव आहे वर्तमानपत्रात त्या pdf मध्ये. तुरुंगात फक्त चांगली पुस्तके चांगले लोक (लोकमान्य, सावरकर) लिहितात हा गैरसमज दूर झाला.

जोशी-अभ्यंकर हत्याकांडात हातांचे ठसे मिळू नयेत म्हणून हातमोजे घालण्यात आले, कुत्र्यांना वास घेऊन शोध काढता येऊ नये म्हणून अत्तर पसरण्यात आले होते आणि दोरीच्या गाठी अशा मारण्यात आल्या होत्या की दोरी कापूनच काढावी लागेल. इतक्या अमानुषपणे हे खून झाले होते त्यामुळे संपूर्ण पुण्यात भितीचे वातावरण होते.

बापरे! जोशी-अभ्यंकर हत्याकांडाची मागच्या पानवरची लिंक वाचली. आजवर फक्त ऐकुन माहित होतं ह्याबद्दल. भयंकर आहे.
ही स्टोरी पुर्ण सविस्तर कुठे वाचता येइल? संपुर्ण घटनाक्रम, पोलिसांनी कसा तपास केला वैगेरे?

Pages