चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेटफ्लिक्स वर मोतिचुर चकन्नचुर बघितला, बरा आहे , नॉट गुड नॉट बॅड केटेगरी, अथिया शेट्टी अभिनयात अगदी टाकावु नाहिये बरा करते. नवाजउद्दिनला फार काही विषेश करायला नाहिये, तो फार प्रौढही दिसतो यात. बिहारी मधे मुलाला मोडा आणि मुलिला मोडी म्हणतात , सारख ते मोडा-मोडी एकुन मात्र कान किटले.

मला बाला चित्रपट म्हणजे ते बाला ओ बाला गाणं असलेला असेच वाटत होते, चुकून आम्ही त्या चित्रटाला गेलो होतो हे गाणं सुरू होई पर्यंत कसा बसा तग घरला आणि ते गाणं पाहून मात्र पळून आलो.
त्यामुळे ते बाला डोक्यात इतके फिट बसले होते की बाला नाव ऐकून तोच चित्रपट असे वाटत होते.

इथले प्रतिसाद वाचून लक्षात आलं, हा वेगळा.
बघावा म्हणतो.

मोतिचुर चक्नाचुर पाहिला, सिनेमा ओकेच होता पण ती अथेया शेट्टी चांगलीये कि, एकदम प्रॉमिसिंग वाटली!
वशिल्याचं तट्टु कॅटॅगरी डंब अजिबातच नाही वाटत, दिसायला सुंदर आहेच, अ‍ॅक्टींगही चांगलं केलय , तिची इतर स्टारकिड्झ सारखी हवा का नाहीये ? यापेक्षा मोठ्या बॅनरचा ब्रेक का नाही मिळाला तिला आश्चर्य वाटलं !
जान्हवी/अनन्या वगैरे स्टारकिड्स पेक्षा ‘अ‍ॅक्टिंग’ मधे खूप चांगली वाटली !
सिनेमात नवझुद्दिन मात्रं अगदीच तिचा बाप वाटतो, तो ३४ वर्षाचा म्हणून दाखवायचाय पण फारच जास्तं मोठा दिसतो ! राकजुमार राव वगैरे चालला असता !

जान्हवी/अनन्या वगैरे स्टारकिड्स पेक्षा ‘अ‍ॅक्टिंग’ मधे खूप चांगली वाटली !... Mhanoonach hava nahiye kadachit!!

झीमवर ' तुम्बाड' लागणार आहे २६ जानेवारीला. मराठी डबिन्ग आहे. इच्छुकान्नी लाभ घ्यावा. >>> तो नंतर झी ५ वर येतो का. मी झी मराठी काढलं कधीच.

अंजु prime वर तुंबाड आहे कधीचाच. हिंदीतून आहे, मराठीतून पाहायला मजा येईल पण नक्कीच.

"ह्यातला pun unintended होता का?>>>>कळलं नाही." - 'बाला' विषयी डिसक्लेमर टाकायचं 'डोक्यात' आलं नाही असं लिहीलत म्हणून म्हटलं.

मला पण मोतीचूर चकनाचूर पाहिला. हलका फुलका आहे.
आथिया चांगलं काम करते. पण तिला काहीच मिडिया अटेन्शन नाही.
नवाजुद्दीन उगाच घेतला, शोभत पण नाही. बुटकं वांग.. जरी त्या स्टोरी मध्ये फिट( वय झालेला, दिसायला साधारण) तरी मिसफिट वाटला.

हिरोच्या रिमेक्मधे होती , मुबारकामधे होति पन सगळेच फ्लोप गेले वाटात
अन्यन्या, जान्व्हवी चे पिआर जोरदारअसत्तिल शिवाय करन जोहर आहेच

हे राहिलच लिहायचं ,
मोतीचूर चकनाचूर मध्ये, त्या अथिया शेट्टीला दिलेल्या बनारसी, चंदेरी साड्या आणि बनारसी शाली( खास करून जामावर तनचोई) सॉलिड होत्या...

अन्यन्या, जान्व्हवी चे पिआर जोरदारअसत्तिल शिवाय करन जोहर आहेच>>>

सगळे त्यावरच चालते. जान्हवी दर दिवशी जिमला काय कपडे घालून जाते हेही कुठल्यातरी वेबसाईटवर भक्तिभावाने
प्रसिद्ध केले जाते. (I m not interested in janhavi kapoor असे टिक करूनही गुगल मला अधून मधून असले अपडेट देत राहते). तिचे जिमव्यतिरिक्त अन्यत्रचे काही कपडे अतिशय सुंदर असतात. तीही सुंदर दिसतेच.

ललिता-प्रीती... स्पॉयलरसाठी मनापासून सॉरी. 'बाला' नेटवर आता फुकट आल्यावर (इतक्या उशीरा) मी बघितला. त्यामुळे कोणाचा बघायचा राहिला असेल असं वाटलंच नाही. __/\__

'दे दे प्यार दे' बघितला. मला ट्रेलर बघून एकदम थिल्लर असेल असं वाटलं होतं. प्रत्यक्षात खूप प्रॅक्टिकल / सॉरटेड आणि चांगल्या मुद्द्यांना हात घालणारा आहे. सरप्राईज ट्रीट !!!

दिसायला सुंदर आहेच, अ‍ॅक्टींगही चांगलं केलय , तिची इतर स्टारकिड्झ सारखी हवा का नाहीये ? यापेक्षा मोठ्या बॅनरचा ब्रेक का नाही मिळाला तिला आश्चर्य वाटलं ! >>>>>>>>>> 'हिरो' च्या रिमेकचा निर्माता सलमान खान आहे. त्याने तिला ब्रेक दिला. तो तिचा पहिला चित्रपट. सो तो मोठया बॅनरचाच सिनेमा झाला. मला त्यात ती ठोकळा वाटली आणि सुरज पान्चोली प्रॉमिझिन्ग वाटलेला.

मला जान्हवीपेक्षा सारा अली खान आवडते. डाऊन टु अर्थ आहे ही मुलगी.

मी पण पाहिला मोतिचूर. वन टाईम वॉच आहे. त्या स्टाईलची हिंदी थोडी समजयला वेळ लागला.
अथेयाने खरच चांगले काम केलेय. सुंदर नाही वाटली पण कसली उंच आहे ती!
नवाजुद्दीन भूमिकेसाठी म्हणून योग्य वाटला. सामान्य रंगरुपाचा, ३८ वर्शांचा दाखवलाय.

मीसुद्धा मोतीचूर पाहिला, मलासुद्धा आथिया आवडली. तिची मावशी झालेली सुद्धा मस्त आहे. सगळे कास्टिंग मस्त आहे.

मस्त आहे सिनेमा, आथिया आवडली. मारण्याचा प्रसंग खटकला. शेवट जरा गुंडाळला असं वाटलं. मोडा-मोडी खरंच वात! एरवी सिनेमात मोडा-मोडी ऐवजी काय वापरतात?

आला आणि गेला
त्याच वेळी त्याच स्टोरीवर व तसेच संवाद असलेला उजडा चमन म्हणून एक येऊन गेला,

दोघांची कोर्ट केस सुरू होती तर तोवर कळले की एक कन्नड पिक्चर ओरिजिनल आहे, ह्यातला एक कुणीतरी ऑफिशियल रिमेक आहे
तोवर गॉन केश म्हणून अजून एकाची चर्चा सुरू झाली.

नुसते केस केस केस झाले,

https://youtu.be/-5EJXab2x_s

इथली चर्चा वाचून मोतीचूर पहिला...
अथिया प्रॉमिसिंग वाटली आहे.. तरी जान्हवी कपूर लेवल ऍक्टिंग नाहीय.. पण बेटर than सारा..

- 'बाला' विषयी डिसक्लेमर टाकायचं 'डोक्यात' आलं नाही असं लिहीलत म्हणून म्हटलं.> >>> ओह ओके. गूड वन Happy
पण खरंच माझ्या डोक्यात नव्हतं. डिस्क्लेमर पण आणि pun पण Happy

स्ट्रीट डान्सर पाहिला नाय काय कोणी. बरा आहे. मी प्रभुदेवा मुक्काला मुकाबला बघायला गेल्ते . पण पूर्ण बघितला. नोरा फतेही एकदम हॉट आहे. व छान नाचते. श्रद्धा कपूर ने पण मस्त काम केले आहे. नाचाचे भाग कापून इमिग्रंट ची स्टोरी चांगली आहे एका शॉर्ट फिल्म चा बाज आहे.

Pages