रामनाम लेखन जपयज्ञ वही

Submitted by धनश्री- on 29 December, 2019 - 23:58

डिसक्लेमर - लेखिका ज्योतिषावरती विश्वास ठेवते. या धाग्याचा स्कोप, तो विश्वास योग्य आहे की अयोग्य हा नाही.

भारतवारीत जशा मी भेटवस्तू दिल्या, तशाच मला भेटवस्तू मिळाल्यासुद्धा. या सर्व भेटवस्तूंमध्ये मला एक कुतूहलपूर्ण अशी लहानशी भेट मिळाली. एका मैत्रिणीच्या, ७६ वर्षिय आईकडून. ती म्हणजे 'रामनाम मंत्र जप यज्ञ वही' व २ लाल रंगाची बॉलपेने. या वहीत १००-२०० पाने असतील प्रत्येक पानावरती एकूण ३९ बाय १३ अशा ५०७ रिकाम्या चौकटी आखलेल्या असून, प्रत्येक चौकटीमध्ये तुम्ही लहान अक्षरात हवे ते लिहू शकता . प्रत्येक चौकटीं मध्ये 'श्रीराम' हा शब्द लिहावयाच्या उद्देश्याने, जेमतेम त्या आकाराची प्रत्येक चौकट आहे. लाल रंग शुभ असल्या कारणाने लाल रंगात लिहीण्याचे सुचविलेले आहे. या वह्या नंतर देवळांमार्फत हरीद्वारला जातात व मंदीरांच्या पायाभरणीमध्ये त्या पुरल्या जातात.
मला काही प्रश्न पडलेले आहेत -
(१) असे रामनाम लिहीणे, जप करणे हा रिकामटेकडा विरंगुळा आहे का?
- माझ्या मैत्रिणीच्या आई विधवा असून, निवॄत्तीपरान्त, शांत व निवांत आयुष्य जगत असून , खाण्यापीण्याची अतोनात कडक बंधने त्यांनी स्वतःला घालून घेतलेली आहेत. मन भरकटू नये - उदा अमके खावे/तमके ल्यावे अशा सहजसुलभ वासना, या वहीचा उपयोग होत असावा असा कयास.
(२) मी स्वतः ४ पाने भरुन पाहीली. सलग एक पान अ‍ॅट अ टाइम पूर्ण केले. संमिश्र अनुभव आला.
- ३ वेळेला, मला जाणवले की मनात सकारात्मक व मन निवळवणारे विचार येतात. चांगलेच विचार येतात. एका वेळेला मात्र संमिश्र विचार आले - गॉसिपी, सकारात्मक, mundane तीन्ही प्रकारचे. मात्र चारही वेळेला एक संवेग अर्थात फ्लो व सहजता साधत असल्याचे अनुभवास आले. एक पर्पझ ड्रिव्हन अ‍ॅक्टिव्हीटी असल्याचा अनुभव आला. की हे पान आपल्याला पूर्ण भरायचे आहे, हा तो पर्पझ. त्यातून एक आनंद मिळाला.
(३) सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे
- सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे, यामध्ये तत्वतः फरक आहे हे मान्य आहे. सुडोकूमध्ये मेंदूला चालना मिळते, तल्लखता जाणवते. याउलट रामनाम लिहीण्यामध्ये (मनात जप करत करत) एक शांत सहज संवेगाचा अनुभव येतो. या दोन्हीमध्ये क्वालिटेटिव्ह फरक काय? उदा - डिप्रेशन/अवसादात सुडोकू चा वापर करावा ज्यायोगे, मेंदू अ‍ॅक्टिव्हेट करणारी रसायने अधिक निर्माण होतील याउलट उन्मादामध्ये, रामनामामुळे शांत वाटेल - वगैरे प्रकारचा काहीही रिसर्च माझ्यातरी पहाण्यात आलेला नाही. पण ते तसे नसेलच अशी गॅरंटी नाही. अर्थात हा माझा अंदाज आहे. कोणी विदा जमविल्यास, विश्लेषण केल्यास, पूर्ण संशोधनांती काही हाती लागू शकेल.
सुडोकू खेळणे किंवा तत्सम मेंदूस चालना देणारी अ‍ॅक्टीव्हीटी व रामनाम लेखन जपयज्ञ या म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह अ‍ॅक्टिवीटीज आहेत असे मला म्हणायचे नसून, मी फक्त तुलनात्मक दृष्टीकोनामधून दोन्हींकडे पहात आहे.
(४) कोणी हा लेखन यज्ञ 'कन्सिस्टंटली ( चिकाटीने )' केलेला असल्यास, तुमचा अनुभव काय आहे?
मला स्वतःला स्तोत्रे म्हटल्याने फार बरे वाटते. पण त्या मागे शब्दप्रेम, नादाची भुरळ या बाबी आहेत हे मान्य आहे. रामनाम लेखनाचा अनुभव नाही. एक दोन वेळा मनाचे श्लोक लिहून काढलेले आहेत. मनाचे श्लोक वेगळे. ते लिहीताना, मनात रुजू लागतात. पण हे जे 'रीपीटीटिव्ह' श्रीराम-श्रीराम-श्रीराम लिहीणे आहे, तो नक्की वेगळ्य प्रकारचा अनुभव आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अजुन एक मुद्दा- प्रत्येक व्यक्ती तिच्या कलानुसार, आकलनानुसार, दिवसभरातील घटनांची संगती लावण्याचा प्रयत्न करीत असते मीही अपवाद नाही. ही वही मला मिळाली ती तारीख व वेळ याची कुंडली मांडली असता पुढील नीरीक्षण दिसले.

ही कुंडली माझ्या कुंडलीशी (लग्न=मिथुन) मोठ्या प्रमाणात, रेझोनेट होते (निदानपक्षी तसे मला माझ्या अर्धवट ज्ञानामधुन वाटते तरी. असो.) सातवे घर हे गुरुचे घर असते कारण तुमचे गुरु तुमच्या समोरासमोर आसनस्थ असतात. जर कुंडलीतील, लग्नस्थान म्हणजे तुम्ही असाल तर, अर्थात बरोब्बर तुमच्या समोरचे स्थान हे गुरुचे असते. सातव्या घरात या विशिष्ठ वेळी बरीच घडामोड असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मला या लेखनाच्या बाबतीत खरच जाणून घ्यायचे आहे. मूळ नक्षत्रामध्ये गुरु व सूर्य असून, काहीतरी 'आमूलाग्र बदलाचे निदर्शक' किंवा एखाद्या बाबीच्या मूळाशी जाउन तपास करण्याचे हे नक्षत्र निदर्शक आहे. थोडक्यात,जिगसॉ पझलचे बरेच तुकडे माझ्याकरता, फिट बसताना मला तरी दिसत आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोहंसोहं यांचा प्रतिसाद आवडला. हे काही माहीत नव्हते.
धन्यवाद आदिश्री. आपले स्वप्नानुभव अद्भुत वाटले. ऐकून छान वाटले.

कोहंसोहंजी,
गुरूचं महत्व आणि गरज स्पष्ट करणारा प्रतिसाद आवडला. आपण लिहिलंत ते ठाऊक आहे त्यामुळेच मी आदिश्री यांना उद्देशून लिहिलेल्या पहिल्या प्रतिसादात 'तुमचा पुढील प्रवास त्याच्या (दत्तात्रेय) सोबत होईल असं वाटतं' लिहिलं होतं.
दिक्षा-अनुग्रह यातनं अधोगती होते असं मला म्हणायचं नव्हतं. 'वरच्या वर्गातून आणि..' हे माझे शब्द कदाचित चुकले असतील त्याबद्दल दिलगीरी.
गुरूभेट हे पूर्वजन्मीचं सुकृत असतं म्हणतात. गुरूभेटीची आस असावी लागते, वाट बघावी लागते, वेळ यावी लागते. आदिश्री यांनी लिहिल्यानुसार कमी काळात त्यांची गुरूविना झालेली विलक्षण प्रगती बघता त्यांच्याबाबतीत विदेही गुरूची शक्यता मला अधिक वाटली.

कुछ दीखत नहिं महाराज, अँधेरी तिहारे महलन में।
ऐजी ऊँचो सो महल सुहावनो, जाको शोभा कहीं न जाय॥
तूने इन महलन में बैठ कै, सब बुध दी बिसराय॥
ऐजी नो दरवाजे महल के, और दशमी खिड़की बन्द।
ऐजी घोर अँधेरो ह्वै रह्यो, औ अस्त भये रबि-चन्द॥
ढूँढ़त डोलै महल मैं रे, कहूँ न पायो पार।
सतगुरु ने तारी दई रे, खुल गये कपट-किंवार॥
कोटि भानु परकाश है रे, जगमग जगमग होति।
बाहर भीतर एक सो रे, कृष्ण नाम की ज्योति॥
- गिरिराज कुवँरि

सगळीकडे भोंदू गुरू असताना>>>
काल श्री एम यांना मुद्दामहून शोधून बघितलं, ऐकलं. सध्याच्या सदगुरु, संत, जगद्गुरु, बाबा, महाराज वगैरे वगैरे म्हणवून घेऊन मिरवणाऱ्या सगळ्यांपेक्षा मला ते वेगळे वाटले.

@आनंद.... सहमत...म्हणूनच त्यांना ईमेल केला होता.
@सामो...तुम्ही परवानगी देत असाल तर काही पुस्तके आणि videos सुचवते.
https://youtu.be/Bw9zSMsKcwk
Samadhi Maya the illusion of self.
https://youtu.be/aXuTt7c3Jkg
Inner world outer world Akasha and
Part 2 and 3. Spiral and serpant power part 4 Beyond thinking.
https://youtu.be/ZIMoxXO0XvM
https://youtu.be/yNEruEsb5T4
https://youtu.be/qmL4CeTENtw
अत्यंत आवडते.पुन्हा पुन्हा पहा तर चांगले समजतील.
Samadhi part2 was not as good as 1 according to me. You may like it too. All of these are available in Hindi and English. I liked English better because it was original.
पुस्तके
योगी कथाम्रुत परमहंस योगानंद
हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन श्री एम
निरंतर सफर श्री एम
ऋषींचे प्रज्ञावैभव श्री एम
त्रुषार्त पथीक ( खालचा रू कसा टाईप करावा) राधा नाथ स्वामी
हे मी पुन्हा पुन्हा वाचते..
शिवाय नर्मदे हर कुंटे
दिव्यत्वाची जेथ प्रचिती प्रमोद केणे
हिमालयातील महात्म्याच्या सहवासात स्वामी राम
रामकृष्ण परमहंस आणि गुरुबंधू. .लेखक विसरले
हे कधीतरी वाचते.

श्री एम यांना काल गुगल केले. फोटोमध्ये फार प्रभावी पण आक्रमक असे व्यक्तीमत्व वाटले. आक्रमक कारण नजर भेदक वाटली. पण माझे इम्प्रेशन ठिकठाक झाले. नॉट टू इम्प्रेसड.

कदाचित मला वात्सल्यरुपी असाच गुरु आवडेल अशा काही निरगाठी मनात असल्याने तसे झाले असावे.

हेच आहेत ते सामो....मी ही त्यांना गुरू म्हणून नाही बघत... पण त्यांंचा प्रवास वाचून ते एक विश्वासार्ह योगी वाटतात. आजकाल सदेह योगी दुर्मिळ आहेत.

आदिश्री तुम्ही स्वामी मुक्तानंदांचे 'चितशक्तीविलास' पुस्तक वाचले आहे का? कुंडलिनीची लोकांना माहीत नसलेली अनेक अनेक रहस्ये त्यांनी या पुस्तकात उकलली आहेत. फार मस्त पुस्तक आहे. तुम्हाला मराठी/हिंदी/इंग्रजी सर्व भाषांत मिळेल. जरुर वाचा असे सुचवेन.

मी वाचत आहे pdf हिंदी चित्तशक्तीविलास ...पण download issues आहेत त्याला आणि मराठी हवे आहे. आता भारतभेटीत आणावे लागेल...कुणाला मराठी pdf मिळाले तर कृपया link द्या.
कुंटे यांच्या नित्य निरंजन मध्ये त्याचा उल्लेख केला आहे बहुतेक... म्हणून शोधले.

आध्यात्मिकदृष्ट्या Sri M मला बऱ्याच वरच्या लेव्हल चे वाटतात जरी त्यांची संभाषण शैली फार प्रभावी नसली तरी (हेमावैम). मुख्य म्हणजे ते धर्माने मुस्लिम आहेत परंतु त्यांचे भारतीय योग, उपनिषदे, आणि अध्यात्मावरचे ज्ञान अगाध आहे. त्यांच्या autobiography प्रमाणे ते पूर्वीच्या जन्मात एक मोठे योगी होते. त्याची कहाणी पण त्यांनी दिली आहे पुस्तकात. मध्ये एक विडिओ पहिला होता त्यांचा त्यात ते स्वतःच्या अध्यात्मिक ट्रेनिंग बद्दल बोलत होते. त्यांचे सध्याचे गुरु महेश्वरनाथ यांच्यासोबत ट्रेनिंग च्या काळातील महेश्वरनाथांनी केलेले चमत्कार, त्यांना आलेले अनुभव (जे पुस्तकात दिले नाहीत) असे सांगत होते.
संपूर्ण जीवनच त्यांनी क्रियायोग साधना आणि प्रसार याला वाहिले आहे.

@आदिश्री - तुम्ही वासुदेवानंदसरस्वती (टेंबे स्वामी) रचित योगरहस्यम हे पुस्तक वाचले आहे का? नसल्यास नक्की वाचा. खास करून गुळवणीमहाराज यांनी केलेले मराठीतून विवरण अप्रतिम आहे. त्यात कर्म, भक्ती, ज्ञान योगाविषयी माहिती आहे पण हठयोग आणि कुंडलिनी विषयीची अत्यन्त गहन माहिती दिली आहे.

सामो आदीश्रीनी लिहिलेलं श्री. एम. यांचं पहिलं पुस्तक जमलं तर जरूर वाचा. मी बरेच दिवस वाचायला घेतलं नाही, रस वाटेना पण एकदा सुरुवात केली आणि आवडलं चक्क मला. माझ्या चुलत मेव्हण्यांनी ते वाचायला दिलं होतं आम्हाला, ते वाचून काही दिवसांनी परत द्यायचं होतं, नवऱ्याने वाचलं पण मलाच आधी वाचावं असं वाटेना, नंतर रमले मात्र. ते आमचे नातेवाईक भेटले पण आहेत श्री. एम. ना.

बाकी मी त्यांचं काही वाचलं नाहीये. एबीपी माझ्यावर एकदा काही वेळ मुलाखत बघितली होती त्यांची, तेव्हा बघितलं होतं त्यांना.

आ दिश्री I am listening to your recommended YouTube videos. There is a mathematical concept called FRACTAL. It is such a beautiful concept.
This is getting immensely interesting. Thankkkk Youuu!!

काहीतरी अचाट सुंदर सापडतय.

https://youtu.be/xLgaoorsi9U

Alex Grey my favorite painter. Please read his wife Allison’s experience.
The ‘Indra Net’ is an example of fractals.

1976 during an LSD trip with my husband, Alex, I experienced my body turning into infinite strands of light that were both a fountain and a drain. As I lay meditating next to Alex, I could see that he too had been revealed as a fountain and drain, individual and distinct but connected to my 'energy unit.' I realized that all beings and things were 'blowing off' and 'sucking in' pure energy in an infinite field of confluent effluences. The energy was love, the unifying force. This changed both of our artwork as we felt that we had witnessed the most important thing: a revelation of the grid upon which the fabric of our material reality is draped. Sometime thereafter, I read a quote describing the Jewel Net of Indra. In the abode of Indra, the Hindu God of Space, there is a net that stretches infinitely in all directions. At every intersection of the net there is a jewel so highly polished and perfect that it reflects every other jewel in the net. This description related powerfully to the revelation that we had received while in our altered state. It has been my continuing intention to point to this experience in my artwork." -- Allyson Grey

माझ्नया नको वनाथ भक्तीसार पोथीमध्ये fractal चे आले ले वर्णन
तरी बा याचें ऐक कथन । कृत त्रेत द्वापार कलि पूर्ण ।
या चोहों युगांतें म्हणती निपुण । चौकडी एक ही असे ॥ ९० ॥
तरी बा ऐशा चौकड्या किती । तीनशे शहाण्णव बोलती मिती ।
तूतें मातें चोहों चौकड्यांप्रती । जन्मा येणें आहेचि ॥ ९१ ॥
मी नव्याण्णवावा राम क्षितीं । तूंही नव्याण्णवावा मारुती ।
आणि लंकाधीश याच नीतीं । नव्याण्णवावा असे तो ॥ ९२ ॥
यावरी चौदा चौकड्यांचे राज्य रावण । करील ऐसें बोलती वचन ।
परी चौदा अंकींचा आकडा मागोन । आंख नेला विधीनें तो ॥ ९३ ॥
मग उरला वरील एक चतुर्थ । तितुक्या चौकड्या राज्य करीत ।

श्री एम मला काय योगी वाटले नाही. डोळ्यांखाली काळी वर्तुळे कसंतरीच वाटते. योग्याला हेल्थ प्रॉब्लेम असू शकतो हे मान्य होणं अवघडच आहे.

@सामो...You are most welcome.. Actually I am glad someone liked it as much as I have.
श्रीएम चे पुस्तक वाचले नसल्यास videos विस्कळीत वाटू शकतात. Just a heads up. नवनाथ भक्तीसारातील fractal चे वर्णन बघून आनंद वाटला.. किती interesting...
@कोहंसोहं मला माहिती नव्हते हे पुस्तक... आता मागवीन .खूप खूप धन्यवाद.
श्री एम च्या निरंतर सफर या पुस्तकात ते सगळे चमत्कार आहेत जे त्यांनी आत्मकथना मधून वगळले होते. त्यामुळे मला पहिलेच जास्त आवडले. चमत्काराच्या गोष्टी कंटाळवाण्या वाटतात मला.

>>>>>>शरीर एक ज्वाला झाले होते>>>> काल काही लेख वाचताना सापडले की कुंडलिनी इडा (चंद्र नाडी) मधून गेली की थंड, डिप्रेस्ड, उदास असा मूड होतो.
याउलट पिंगलामधून जाताना, हे असे शरीर ज्वाला होणे आदि होते.
पण मूळात ती सुषुम्नामधुन जाणे आवश्यक असते.
_________________
हे सर्व माहीत नाही कितपत खरे आहे. कालच वाचले.

कुंडलिनी जागृती हे काही खायचं काम नव्हे. एवढ्या तेवढ्यानं कुंडलिनी जागृत झाली तर मग बोलायलाच नको. चालू द्या तूमचं.

इतक्या सगळ्या किचकट गोष्टींमध्ये वेळ व एनर्जी खर्च करण्यापेक्षा जे कुणी आवडीचे शुद्ध दैवत असेल त्याचे नामस्मरण/जप सुरू करा, नामीवर शुद्ध प्रेम करा लोकहो. ते सगळ्यात सोपे आहे आणि आपोआप योग्य वाटेवर नेणारे आहे. इतरमार्गांसारखं पतनभय भक्तीमार्गात नाही. परमार्थ साधताना भगवंतानेच दिलेल्या संसाराकडे दुर्लक्ष नको. त्यानेच दिलेले हे काम आहे ह्या भावनेने नेटकेपणाने करू लागा आणि जमेल तसे नाम घेवू लागा. इतर काही थोर थोर गोष्टी न करताही 'तो' भेटेल आणि अनुभवताही येईल. भक्तीचा अहंकार येवू लागला तर तो कळवळ्याने चुटकीसरशी उडवूनही लावेल. कारण भक्ती हे प्रेमाचे नाते आहे. भक्ती ही कच्च्या मातीचा प्रेम पाझरणारा घडा आहे. जो काही कारणाने भंगला, तिरळला तर त्यापासून परत घडा बनवला जाईल. इतर मार्ग हे अग्नीत भाजलेले घडे. ते नीट हाताळले गेले नाहीत आणि भंगले तर खापर हाती येईल.

एक तत्त्व नाम दृढ धरी मना ।
हरिसी करुणा येईल तूझी ॥ १ ॥
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्‍गद्‍ जपे आधी ॥ २ ॥
नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा ।
वाया आणिका पंथा जाशी झणी ॥ ३ ॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरि जपे सदा ॥ ४ ॥

इतका विनोदी लेख फार दिवसांनी पाहिला. पहिल्या असल्या लेखाने आपल्याला (मायबोलीला) केश्वीताई मिळाल्या होत्या. त्यावेळी बापूण्चे कवतिक होते. आता डायरेक राम! तेव्हा रामाचा सेवक होता, आता साक्षात रामभाऊ!
डायरेक्ट मोक्श.

मला एक कळत नाही, सगळ्यांना मोक्श मिळवायची इतकी घाई का असते?

हे सर्व माहीत नाही कितपत खरे आहे. कालच वाचले -----> सामो कुंडलिनी बद्दल जेवढे वाचाल तेवढे खरे तर कमी आहे....मला जेवढी माहिती आहे ती थोडक्यात सांगतो.
आपल्या शरीरात साधारण ७२००० नाड्या असतात त्यातला ३ प्रमुख- इडा पिंगला आणि सुषुम्ना. या ३ नद्या मणक्याच्या सुरुवातीपासून निघून थेट डोक्यापर्यंत जातात. इदा आणि पिंगला या इंग्रजी लेटर S प्रमाणे शरीरातल्या प्रत्येक चक्राला एकमेकांना क्रॉस होतात आणि मधून सुषुम्ना निघते. सुषुम्नेत पुन्हा ३ नाड्या निघतात पण त्या खोलात जात नाही. डाव्या नाडीला इडा, उजवीला पिंगला म्हणतात. याला सूर्यनाडी आणि चंद्रनाडी असेही म्हणले जाते. यातूनही चैतन्यप्रवाह वाहत असतात आणि सप्तचक्रद्वारे सर्व शरीभर प्राणाचा संचार करत असतात. जेंव्हा या मार्गात अडथळे निर्माण होतात तेंव्हा शरीरात रोग उत्पन्न होतात. असो. इथेही जास्त खोलात जात नाही.
साधारणपणे रात्री विश्रांतीच्या वेळी आपला श्वास डाव्या नाकपुडीतून म्हणजेच चंद्रनाडीतून चालू असतो आणि दिवसा कामाच्या वेळी उजव्या म्हणजेच सूर्यनाडीतून सुरु असतो. चंद्रनाडीतून वाहणारा प्रवाह थंड तर सूर्यनाडीतून वाहणारा प्रवाह उष्ण असतो. साधारणपण एका दिवसात ४ संधीकाळ असतात ते म्हणजे पहाट (रात्र आणि सकाळ मधील संधीकाळ), माध्यान्ह (सकाळ आणि दुपार मधील संधीकाळ), संध्याकाळ (दुपार आणि रात्र मधील संधीकाळ), आणि मध्यरात्र. या संधीकाळात शरीरातील ऊर्जेच्या प्रवाहात म्हणजेच इडा आणि पिंगला यातून वाहणाऱ्या प्रवाहात पण बदल होत असतात. असे बदल होताना संधीकाळात हे प्रवाह दोन्ही नाकपुड्यातून सम प्रमाणात वाहतात त्यामुळे या काळात आपल्या शरीरात आणि मनात एक स्थिरता येते. म्हणूनच संधीकाळात (खास करून पहाटे आणि संध्याकाळी) आपल्याला जास्त शांत वाटते आणि म्हणूनच हा काळ ध्यानासाठी उत्तम मानला गेला आहे. दीर्घकाळ संधीकाळात केलेल्या ध्यानाने कुंडलिनी लवकर जागृत होते म्हणजेच ती लवकर सुषुम्नेतून वर चढू लागते कारण प्रवाह अनायासे दोन्ही नाड्यात सम प्रमाणात वाहत असतात. योग्याचे उद्दिष्टच इडा आणि पिंगला यात वाहणाऱ्या ऊर्जाप्रवाहाला सुषुम्नेत वळवणे हे असते आणि ते साधण्यासाठी प्राणायाम केला जातो.
हे ज्ञान बरेच गूढ पण तेवढेच इंटरेस्टिंग आहे आणि ते अनुभवाच्या कसोटीवर पारखायचे असते. बाकी या सगळ्याची टिंगल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे हेच उत्तम.

वर अश्विनी के यांच्या मताशीही सहमत. योगमार्ग तास अवघडच आणि योग्य गुरुमार्फतच साधला जातो. आपला ओढा कुठे आहे हे एकदा पारखून त्याच मार्गाने चाललेले सर्वात उत्तम.

तरीही तुह्माला इंटरेस्ट असल्यास आणि याविषयी जास्त माहिती हवी असल्यास विवेकानंदांचे राजयोग हे पुस्तक वाचा त्यात बरीच माहिती मिळेल. त्यात पतंजली योगसूत्रांवर पण भाष्य आहे. इंग्रजी आवृत्ती नेटवर pdf रूपात मिळून जाईल पण मला मराठी आवृत्ती जास्त भावली.

Designed and explained by Swami Vivekananda in his own words: The wavy waters in the picture are symbolic of Karma; the lotus, of Bhakti; and the rising-sun, of Jnana.

Pages