शृंगार ४

Submitted by अनाहुत on 26 August, 2015 - 12:48

मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .

" अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर ती खाली लागेल . "

" असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "

" ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "

" चल ना मग अंघोळच करुया ना , तू पण ये बरोबर . "

" चला जा तुम्ही आधी हात-पाय धुवून या . उगाचच चावटपणा करु नका . "

तिलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण ती सटकली .

वा पाण्याने किती मस्त वाटत . मस्त फ्रेश होऊन बाहेर पडलो . बॅगमधून मघाशी आणलेला परफ्युम बाहेर काढला . मंजू येताच थोडा परफ्युम तिच्या अंगावर स्प्रे केला . तिलाही तो फार आवडला . तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरल होत . ती अधिकच सुंदर दिसु लागली होती . ओढून तिला जवळ घेतल . तिच्या मानेवर हळूवारपणे ओठ टेकवले . हळूहळू ओठ तिच्या मानेची चुंबन घेत तिच्या कानांपर्यंत पोहोचले . तिच्या कानाची पाळी दातांमधे पकडून एक हळूवार बाईट .....टिंग टाँग..... परत ओठ तिच्या मानेवरुन फिरत होते ....टिंग टाँग.... ती थोडी दूर होण्याचा प्रयत्न करत म्हणाली ,
" अहो बाहेर कुणीतरी आल आहे वाटत बेल वाजते आहे . दार उघडा ना . "

" जाऊदे कुणी नाही . थोडा वेळ वाजवेल आणि जाईल असल तरी ."

अस म्हणत मी आणि माझे ओठ आपल्या कामात परत गर्क होण्याचा प्रयत्न करु लागलो . परत परत बेल वाजत होती . डोक्यात जात होती पण तरीही मी माझ कॉन्संट्रेशन ढळू न देण्याचा प्रयत्न करत होतो . पण बेल काय थांबायच नाव घेत नव्हती . शेवटी वैतागून मंजू दूर झाली आणि म्हणाली

" अहो एकदा पाहून तरी या कोण आहे . म्हणजे एकदा जाईल तरी . "

शेवटी मी जाऊन वैतागाने दार उघडले . बाहेर साक्षात वैताग अगदी तशाच वैतागलेल्या चेहऱ्याने उभा होता , सेक्रेटरी .

" अहो किती वेळा बेल वाजवायची ? "

"काय झाल ? "

सोबत दोन - तीन मेंबर होते . काहीतरी सिरीयस असाव अस वाटल .

" अहो काही तक्रारी होत्या लोकांच्या त्यामुळे आज सगळे मेंबर्स एकत्रच आलो होतो . "

" आमच्याबद्दल तक्रार ? "

" अहो तुमच्या एकट्याबद्दलच अस नाही ब-याच जणांबद्दल होत्या तक्रारी एक एक मिटवत तुमच्याकडे आलो . "

मनात विचार चालला होता काय तक्रार असेल आणि हे आले तेव्हा यांना काही आवाज तर ऐकू आला नाही ना ? का जाता-जाता आवाज आला म्हणून तर नाही ना आले हे ?

माझा विचार चालला होता तेवढयात

" अहो तुमच्या कुंड्यामधे जे पाणी टाकता त्याचे सगळे ओघळ येत आहेत भिंतीवर आणि तुम्ही फ्रंटला आहे त्यामुळे ते चांगल दिसत नाही आणि खाली कोणी असल कि त्याच्या अंगावर पडू शकत चिखलाच पाणी . "

म्हणजे यांचा हा सगळा आटापिटा यासाठी चालला होता . यांना आमच ओघळणार सांडणार पाणी अडवायच होत . एव्हढ कुणाच्या अंगावर सांडल होत काय माहीत ?

" अहो एवढ्यासाठी सर्वांनी यायची काही गरज नव्हती , जाता येता जरी सांगितल असत तरी मी ठेवल्या असत्या कुंड्या काढून . "

" अहो तेव्हढच नाही तेवढा रंग ही घ्या ना मारुन थोडा ते ओघळ तसे चांगले दिसत नाहीत . "

मी या लोकांना लवकर कटवाव म्हणून त्यांच ऐकत होतो तर हि संधी साधून ते काहीही म्हणन रेटू पाहत होते .

तेव्हढ्यात मंजू आली आणि त्यांना विचारु लागली

" पण आमच्या एकट्याच्याच कुंड्या आहेत का ? बाकीच्यांच्यापण आहेत ना . आणि असे ओघळ तर त्यांच्या इथही आहेतच की तुम्ही सांगितल का सगळ्यांना ? "

" तुम्ही फ्रंटला आहात . त्यामुळ ते चांगल दिसत नाही . "

" अहो फ्रंट काय आणि दुसरीकडे काय चांगल नाही दिसत ते कुठही चांगल नाहीच ना दिसणार . त्यामुळे सगळ्यांनाच सांगा ना . एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा नियम कशाला ? "

आता यांच्या फ्रंट आणि बॅक मुळे आमच फ्रंट आणि बॅक आडल होत . आणि आता मंजूही ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हती .बराच वेळ याच्यावर काथ्याकुट करून झाल्यानंतर शेवटी त्या लोकांनाच मंजूच म्हणन मान्य कराव लागल . ते गेल्यानंतर पटकन दार बंद करून घेतल . चला आता कामाला लागुया तर मंजूला अजून त्याच्यावर बोलायच होत . शेवटी काय मग तिच बोलून होईपर्यंत ऐकून घ्याव लागल . तिच झाल्यावर तिला जवळ ओढून घेतल . तिची एक बट तिच्या चेहऱ्यावर आली होती ती हलकेच बाजूला केली . तिला स्वतः जवळ आणखी ओढली . तिची बट परत चेहऱ्यावर आली . आता हलकेच बोटांनी ती बट व्यवस्थित तिच्या कानाच्यामागे खोवली . किती सुंदर दिसते आहे मंजू , ओह् मार डाला . माझे ओठ तिच्या ओठांच्या दिशेने निघाले होते . ओठातील अंतर कमीकमी होत चालल होत . तेवढयात टिंग टाँग ... परत बेल वाजली आणि मंजूने अक्षरशः मला ढकलून दिल .

" अहो पहा ना ते परत आले असतील . त्यांना अजून काहीतरी मुद्दा भेटला असेल म्हणून परत आले असतील तुम्ही व्हा पुढे मी येतेच जरा आवरुन माझ . "

अरे काय चालल आहे ? गेलो तसाच बाहेर आणि उघडला दरवाजा . बाहेर वॉचमन उभा होता .

" पानी भरके रखना साहब . पानी काफी कम बाकी है टंकी में . "

तेवढयात मंजू बाहेर आली आणि तिच्या कानावर ही गोष्ट पडताच तिन आज्ञा केली

" चला हो लवकर पाणी भरून घेऊ या . "

चला आता काय करणार भरतो पाणी . आज काय याच पाण्याच बघुया . आमच पाणी नुसत साठूनच राहिल आहे ते कधी सोडायच काय माहित ?

" अहो "

" हो आलो आलो "

..... क्रमशः
भाग १ http://www.maayboli.com/node/55229
भाग २ http://www.maayboli.com/node/55239
भाग ३ http://www.maayboli.com/node/55264
भाग ४ http://www.maayboli.com/node/55293
भाग ५ http://www.maayboli.com/node/55354
भाग ६ http://www.maayboli.com/node/55545
भाग ७ http://www.maayboli.com/node/55591
भाग ८ http://www.maayboli.com/node/58057
भाग ९ http://www.maayboli.com/node/58315
भाग १० http://www.maayboli.com/node/58327
भाग ११ http://www.maayboli.com/node/58339
भाग १२ http://www.maayboli.com/node/58350

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हय!! सटायर/सार्कॅझम जावून मिडिओकर लाईनवर आली गोष्टं...त्यात काही मजा नाही बघा.
शेवटचं वाक्यच तेवढं मजेशीर वाटलं.

चांगलं लिहीलंय.मनातला रोमँटिकपणा प्रत्यक्षात उतरवण्याला खूप अडचणी येतात.
(अवांतरः सेक्रेटरी, दूधवाला, वॉचमन, कामवाली बाई,'बॉल तुमच्या गॅलरीत पडलाय तो देता का' वाली मुलं ही सर्व डिस्ट्रॅक्शन्स नको असतील तर तीन दिवस मोबाईलची रेंज नसलेल्या एखाद्या ठिकाणी सुट्टीला जाणे बेस्ट)

तीन दिवस मोबाईलची रेंज नसलेल्या एखाद्या ठिकाणी सुट्टीला जाणे बेस्ट++++++११११११११

...