उरोज नितंब आणि तसलेच काही शब्द असलेल पुस्तक होत ते . शेजारी बसलेला मुलगा ते वाचत बसला होता . छे नुसत अस काही वाचुनही लोक एक्साईट होतात . नाही म्हणजे आपण एक्साईट व्हायला हव कि नको . काही हरकत नाही , पण आता आपले दिवस कर्तृत्व दाखवण्याचे , कृती वाचत बसण्याचे नाहीत . पण काय हरकत आहे अस वाचून स्फुरण चढणार असेल तर . हं किती दिवस झाले बायकोशी नीट बोलणही झाल नाही . चला आजचा दिवसच चांगला आहे आज चक्क बसायला जागा मिळाली आणि मग ते पुस्तक चांगलच स्फुरण चढल कि चला एकदा घरी पोहोचलो कि मग या उत्साहाचा खरा फायदा होईल . अशाच सुखस्वप्नात स्टेशन आल . चला आज कस मस्त वाटतय . तेच ऑफिस आज एकदम भारी वाटतय . त्याच उत्साहात कामाला सुरूवात केली . कायमस्वरुपी एक हास्य पसरून राहिल होत चेहऱ्यावर . बॉसच बोलावण आल . तशीच हास्य मुद्रा घेऊन बॉसच्या केबिनमधे प्रवेश केला . बॉसने कामातून नजर वर करून पाहिल . अरर चूक झाली . तिरडी बांधून ठेवली आहे आणि पुढच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे त्यात तुम्ही सुहास्य वदनाने गेला आहे तेव्हा लोक तुमच्याकडे जसे पाहतील तशी परिस्थिती निर्माण झाली . क्षणात सुतकी चेहरा करून त्या वातावरणात सामील झालो तेव्हा बॉस थोडा नॉर्मल झाला . पण मघाशी केलेल्या पापाचा बदला घेण्यासाठीच . दिवसभर कामाचा नुसता रतीब चालू होता . त्यात बॉसची कटकट वेगळीच . थोड लवकर निघायचा विचार होता पण बॉसने थोडा वेळ जास्तच थांबवल . शेवटी एकदाची सुटका झाली आणि स्टेशन गाठल .
          जो  थोडा  उशीर  झाला  होता  त्यामुळे  सगळच  बदलल  होत  , स्टेशनवर  फारच  गर्दी  झाली  होती  .  आता  अवघड  होत  पुढच . मग  कसतरी  लोंबकळत  पोहोचलो  आपल्या  इच्छित  स्टेशनवर  .  अगदीच  त्राण गेल्यासारख  वाटत  होत  . शेवटी  कसबस  घर गाठल   तिथ  पोहोचल्यावर आठवण  आली  अरे  मोकळ्या  हातानेच  आलो  आपण  .  निदान  गजरा  तरी  आणायला  हवा होता . जाऊदे  आता  परत  जाऊन  काही  आणण्याची  अजिबात  इच्छा  नाही  .  बायकोन  दार  उघडल . हं आज खरच  सुंदर  दिसते  आहे . हे विचार  क्षणभरच  मेंदूत तरळले असतील  तेवढयात  तिन  तोंड उघडल  ते  बंद  न  करण्याच्या  इराद्यानेच  .  सगळ्या  गोष्टींवर प्रेम  हाच  इलाज  असतो . थोड रोमँटिक  होत  तिच  तोंड स्वतःच्या  तोंडाने  बंद  केल.
=======================================
          आत  शिरायला  अजिबात  जागा  नव्हती  . तसाच  थोडा  जोर  लावून  एकदाचा आत  शिरलो  .  आज  काही  पर्याय  नसल्यामुळे  सगळा  प्रवास  लटकतच  करावा  लागला  .  विचार  विचार आणि  नुसते  विचार  होते  डोक्यात .
=======================================
          तिला  आज  बहुतेक  तोंड  बंद  तरी  करायच  नव्हत  तिने  स्वतःला  वेगळ  करत  परत  बोलायला  सुरूवात   केली   .  बराच  वेळ  बोलत होती  ती . रात्री  सगळ  आवरल्यावर  आली  ती  .  झाल  शेवटी  एकदाच  सगळ   काय  होत  ते  प्रेम  शारीरिक  गरज  का  नुसत  आपल  रुटीन   .
                    .....क्रमशः 
भाग २ http://www.maayboli.com/node/55239
भाग ३ http://www.maayboli.com/node/55264
भाग ४ http://www.maayboli.com/node/55293
भाग ५ http://www.maayboli.com/node/55354
भाग ६ http://www.maayboli.com/node/55545
भाग ७ http://www.maayboli.com/node/55591
भाग ८ http://www.maayboli.com/node/58057
भाग ९ http://www.maayboli.com/node/58315
भाग १० http://www.maayboli.com/node/58327
भाग ११ http://www.maayboli.com/node/58339
भाग १२ http://www.maayboli.com/node/58350
 
पॉर्न बॅन चा जमाना आहे. जरा
पॉर्न बॅन चा जमाना आहे.
जरा सांभाळुन.
शृंगार कथा .. २ च्या
शृंगार कथा .. २ च्या प्रतिक्षेत..
>>आत शिरायला अजिबात जागा
>>आत शिरायला अजिबात जागा नव्हती . तसाच थोडा जोर लावून एकदाचा आत शिरलो . आज काही पर्याय नसल्यामुळे सगळा प्रवास लटकतच करावा लागला . विचार विचार आणि नुसते विचार होते डोक्यात .>> ची जागा चुकली का हो?
चौकट राजा, मलाही तेच वाटले.
चुकीचे गैरसमज अशानेच होतात .
बाकी सुरूवात धमाल आहे . पहिला
बाकी सुरूवात धमाल आहे :). पहिला पॅरा आवडला. ऑफिस, बॉस च्या ऑफिसातील एण्ट्री वगैरे मस्त जमले आहे. पण पुढे विशेष खुलवलेले नाही.
नॉन लिनियर एडिटिंग मध्ये घोळ
नॉन लिनियर एडिटिंग मध्ये घोळ झाला. सुरुवात धमाल आहे पण नंतर जमले नाही. पुलेशु.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
>>आत शिरायला अजिबात जागा
>>आत शिरायला अजिबात जागा नव्हती . तसाच
थोडा जोर लावून एकदाचा आत शिरलो . आज काही
पर्याय नसल्यामुळे सगळा प्रवास लटकतच करावा
लागला . विचार विचार आणि नुसते विचार होते
डोक्यात .>> हे लोकलची गर्दी आणि लोकलमधे प्रवेश आणि प्रवास या संदर्भात लिहिले आहे . गैरसमज करून घेऊ नये .
नविनच सुरूवात केली आहे आणि
नविनच सुरूवात केली आहे आणि काही सेंन्सॉरचा प्रॉब्लेम नको म्हणून थोडा हात आखडता घेतला .
नविन सुरूवात असल्यामुळे
नविन सुरूवात असल्यामुळे एडिटिंग मधे थोडफार मागेपुढे होत आहे सरावाने बसेल व्यवस्थित .