रामनाम लेखन जपयज्ञ वही

Submitted by सामो on 29 December, 2019 - 23:58

डिसक्लेमर - लेखिका ज्योतिषावरती विश्वास ठेवते. या धाग्याचा स्कोप, तो विश्वास योग्य आहे की अयोग्य हा नाही.

भारतवारीत जशा मी भेटवस्तू दिल्या, तशाच मला भेटवस्तू मिळाल्यासुद्धा. या सर्व भेटवस्तूंमध्ये मला एक कुतूहलपूर्ण अशी लहानशी भेट मिळाली. एका मैत्रिणीच्या, ७६ वर्षिय आईकडून. ती म्हणजे 'रामनाम मंत्र जप यज्ञ वही' व २ लाल रंगाची बॉलपेने. या वहीत १००-२०० पाने असतील प्रत्येक पानावरती एकूण ३९ बाय १३ अशा ५०७ रिकाम्या चौकटी आखलेल्या असून, प्रत्येक चौकटीमध्ये तुम्ही लहान अक्षरात हवे ते लिहू शकता . प्रत्येक चौकटीं मध्ये 'श्रीराम' हा शब्द लिहावयाच्या उद्देश्याने, जेमतेम त्या आकाराची प्रत्येक चौकट आहे. लाल रंग शुभ असल्या कारणाने लाल रंगात लिहीण्याचे सुचविलेले आहे. या वह्या नंतर देवळांमार्फत हरीद्वारला जातात व मंदीरांच्या पायाभरणीमध्ये त्या पुरल्या जातात.
मला काही प्रश्न पडलेले आहेत -
(१) असे रामनाम लिहीणे, जप करणे हा रिकामटेकडा विरंगुळा आहे का?
- माझ्या मैत्रिणीच्या आई विधवा असून, निवॄत्तीपरान्त, शांत व निवांत आयुष्य जगत असून , खाण्यापीण्याची अतोनात कडक बंधने त्यांनी स्वतःला घालून घेतलेली आहेत. मन भरकटू नये - उदा अमके खावे/तमके ल्यावे अशा सहजसुलभ वासना, या वहीचा उपयोग होत असावा असा कयास.
(२) मी स्वतः ४ पाने भरुन पाहीली. सलग एक पान अ‍ॅट अ टाइम पूर्ण केले. संमिश्र अनुभव आला.
- ३ वेळेला, मला जाणवले की मनात सकारात्मक व मन निवळवणारे विचार येतात. चांगलेच विचार येतात. एका वेळेला मात्र संमिश्र विचार आले - गॉसिपी, सकारात्मक, mundane तीन्ही प्रकारचे. मात्र चारही वेळेला एक संवेग अर्थात फ्लो व सहजता साधत असल्याचे अनुभवास आले. एक पर्पझ ड्रिव्हन अ‍ॅक्टिव्हीटी असल्याचा अनुभव आला. की हे पान आपल्याला पूर्ण भरायचे आहे, हा तो पर्पझ. त्यातून एक आनंद मिळाला.
(३) सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे
- सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे, यामध्ये तत्वतः फरक आहे हे मान्य आहे. सुडोकूमध्ये मेंदूला चालना मिळते, तल्लखता जाणवते. याउलट रामनाम लिहीण्यामध्ये (मनात जप करत करत) एक शांत सहज संवेगाचा अनुभव येतो. या दोन्हीमध्ये क्वालिटेटिव्ह फरक काय? उदा - डिप्रेशन/अवसादात सुडोकू चा वापर करावा ज्यायोगे, मेंदू अ‍ॅक्टिव्हेट करणारी रसायने अधिक निर्माण होतील याउलट उन्मादामध्ये, रामनामामुळे शांत वाटेल - वगैरे प्रकारचा काहीही रिसर्च माझ्यातरी पहाण्यात आलेला नाही. पण ते तसे नसेलच अशी गॅरंटी नाही. अर्थात हा माझा अंदाज आहे. कोणी विदा जमविल्यास, विश्लेषण केल्यास, पूर्ण संशोधनांती काही हाती लागू शकेल.
सुडोकू खेळणे किंवा तत्सम मेंदूस चालना देणारी अ‍ॅक्टीव्हीटी व रामनाम लेखन जपयज्ञ या म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह अ‍ॅक्टिवीटीज आहेत असे मला म्हणायचे नसून, मी फक्त तुलनात्मक दृष्टीकोनामधून दोन्हींकडे पहात आहे.
(४) कोणी हा लेखन यज्ञ 'कन्सिस्टंटली ( चिकाटीने )' केलेला असल्यास, तुमचा अनुभव काय आहे?
मला स्वतःला स्तोत्रे म्हटल्याने फार बरे वाटते. पण त्या मागे शब्दप्रेम, नादाची भुरळ या बाबी आहेत हे मान्य आहे. रामनाम लेखनाचा अनुभव नाही. एक दोन वेळा मनाचे श्लोक लिहून काढलेले आहेत. मनाचे श्लोक वेगळे. ते लिहीताना, मनात रुजू लागतात. पण हे जे 'रीपीटीटिव्ह' श्रीराम-श्रीराम-श्रीराम लिहीणे आहे, तो नक्की वेगळ्य प्रकारचा अनुभव आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अजुन एक मुद्दा- प्रत्येक व्यक्ती तिच्या कलानुसार, आकलनानुसार, दिवसभरातील घटनांची संगती लावण्याचा प्रयत्न करीत असते मीही अपवाद नाही. ही वही मला मिळाली ती तारीख व वेळ याची कुंडली मांडली असता पुढील नीरीक्षण दिसले.

ही कुंडली माझ्या कुंडलीशी (लग्न=मिथुन) मोठ्या प्रमाणात, रेझोनेट होते (निदानपक्षी तसे मला माझ्या अर्धवट ज्ञानामधुन वाटते तरी. असो.) सातवे घर हे गुरुचे घर असते कारण तुमचे गुरु तुमच्या समोरासमोर आसनस्थ असतात. जर कुंडलीतील, लग्नस्थान म्हणजे तुम्ही असाल तर, अर्थात बरोब्बर तुमच्या समोरचे स्थान हे गुरुचे असते. सातव्या घरात या विशिष्ठ वेळी बरीच घडामोड असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मला या लेखनाच्या बाबतीत खरच जाणून घ्यायचे आहे. मूळ नक्षत्रामध्ये गुरु व सूर्य असून, काहीतरी 'आमूलाग्र बदलाचे निदर्शक' किंवा एखाद्या बाबीच्या मूळाशी जाउन तपास करण्याचे हे नक्षत्र निदर्शक आहे. थोडक्यात,जिगसॉ पझलचे बरेच तुकडे माझ्याकरता, फिट बसताना मला तरी दिसत आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजनबी तुम्ही प्रि-कंडिशन्ड रिस्पॉन्स म्हणुन लिहीतत, असे वरील प्रतिसादावरुन जाणवले. पण सारासार विचार केला असता तुम्हाला काय फायदे व तोटे जाणवले- ते कृपया, विशद कराल का?

ते लिहायचे होते का ????? असे असते तर लहानपणापासून काय काय फायदे झाले हे लिहून ठेवले असते. बाकी खरं सांगायचे तर मनाला समाधान मिळते, याउपर काहीच नाही अदरवाईज मी हा प्रतिसाद डिलीट करते.

रामनामच लिहायला हवं असं का!
कॉलेजला असताना रटाळवाण्या लेक्चर्सला पलीकडच्या बेंचवर बसलेल्या आपल्या आवडत्या मुलीची नावे लिहिलेली वह्यांची पाठीमागील असंख्य पाने आजही संग्रही आहेत. ती आमच्या संसाराची पायाभरणी होती हे आज हा धागा वाचून उमगलं.
फक्त त्या चौकटी चौकोनी नसून बदामी होत्या. Proud

मस्त वाटतं लिहिले की Happy
माझ्या ओळखीत आहेत अश्या आजी नामजप लिहून दान करणाऱ्या.

@राजसी - आपल्या प्रतिसादाबद्दल, आभार. होय मलाही लिहील्यावर मस्त वाटले होते. एक आनंद मिळालेला आहे. आणि तसे का याचे तर्कशुद्ध कारण शोधण्याचा प्रयत्न करते आहे Happy

ध्यान किंवा चिंतन (meditation) यामुळे काय फायदे होतात याबद्दल सध्या f - MRI (functional MRI) या अत्याधुनिक तंत्राने मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे. जितके जास्त सखोल ध्यान तितके होणारे फायदे जास्त असे प्राथमिक् संशोधनात आढळून आले आहे. या वर अनेक संशोधनपर निबंध उपलब्ध आहेत. यातीलच एक खाली देत आहे.

नामस्मरण हि अशा ध्यान धारणेची पहिली पायरी समजली जाते (असे माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार आहे) आणि बाकी काहीही झाले नाही तरी मनातील भावनांचा आणि विचारांचा कल्लोळ कमी करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो असे मानसशास्त्र सांगते.

meditation might have different effects on the structure and activity of the brain. The study revealed significant activation in the right prefrontal regions of the brain during the visual and auditory-fixation meditation phases. The prefrontal cortex is a vital area of the brain that is associated with higher order brain functions such as concentration, decision-making and awareness. The selective activation of prefrontal cortex during meditation aids in stress free lifestyle. The decision-making capacity of the individuals improves dramatically and prevents wrongdoings. This in turn has a positive effect not only on the individual himself but also the society. Individuals are more focused in their tasks and able to concentrate better than their counterparts. The attention span improves intensely and they become more productive in day to day tasks. This creates a sense of awareness in the individual. They are able to plan their chores better and create a stress-free environment around them. This prefrontal cortex of the brain has also been implicated in modulating pain. With selective activation of prefrontal cortex, there is improved pain tolerance.
The centers of stress that are activated as a result of pain are selectively reorganized with the help of meditation. This in turn results in boosting the emotional state of the mind and the body.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6153914/

मी मानसशास्त्र किंवा मनोविकाराचा तज्ज्ञ नाही ,परंतु f MRI हे तंत्र माझ्या विषयातील( radiodiagnosis) विकिरण शास्त्र यात येते. आणि त्यामुळे असे अनेक निबंध संदर्भात येत असतात

छान माहिती सुबोध सर.
नामस्मरण हि अशा ध्यान धारणेची पहिली पायरी समजली जाते (असे माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार आहे) आणि बाकी काहीही झाले नाही तरी मनातील भावनांचा आणि विचारांचा कल्लोळ कमी करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो >>>>> स ह म त.

वहीमध्ये नामलेखन !
वह्यांचा बिजनेस आणि वेळेचा अपव्यय ! Lol

कुठली कुठली संस्थानं आणि बाबा, महाराज, माई, बापूंच्या वह्या मिळतात याची माहीती जमवा पाहू.

घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर नामजप सहज शक्य असताना, ते न करता वरीलप्रमाणे काहीतरी प्रथा निर्माण करण्यामागचे हेतू उघड आहेत.
हे म्हणजे भोळ्या भाबड्या भक्तपरीवाराला नादाला लावून आपली आर्थिक पायाभरणी करणं याशिवाय दुसरं काहीही नाही. Happy

Submitted by हाडळीचा आशिक on 30 December, 2019 - 11:32>>>>+७८६
Lol हे आम्हीही करायचो पण ते संग्रही ठेवणं जमलं नाही ! Sad Happy

>>>> प्रत्येक श्वासाबरोबर नामजप सहज शक्य असताना,>>>> पण मन विचलित होउन, ताबडतोब अन्य विचार येतात व नामाचे विस्मरण घडते.
लिहीताना, माणूस गुंतला जातो हेसुद्धा खरे आहे.
अर्थात आर्थिक पायाभरणी हा उद्देश असूही शकतो. पण मैत्रिणीच्या आईला फुकटात वही मिळे. मात्र एका व्यक्तीला एक वही अशी मर्यादा होती.

आवडत्या मुलीची नावे लिहिलेली वह्यांची पाठीमागील असंख्य पाने आजही संग्रही आहेत. ती आमच्या संसाराची पायाभरणी होती हे आज हा धागा वाचून उमगलं.>>
आता बॉसच्या नावाने वह्या भरा. प्रमोशनची पायाभरणी होऊन जाईल. Proud

काही नावं पोरींनीही लिहून ठेवली असतील आशिकांची?>>>
असतीलही Lol

आता बॉसच्या नावाने वह्या भरा. प्रमोशनची पायाभरणी होऊन जाईल.>>>
Biggrin वीरू, तुम्ही सगळं वाचा हो! मुलीचं नाव बदामात लिहिल्याने पायाभरणी झाली.
आता बॉसचं नाव बदामात लिहिणं म्हणजे.........

हो अशा वह्या नामलेखनासाठी मिळतात. नामलेखन करायची नावे वेगवेगळी असतात. माझ्या नात्यातील आजोबांनी अशी एक वही दिली होती गायत्री मंत्र लेखनासाठी.

मी रफ पेपर ज्याची एक साइड वापरून झाली आहे किंवा रफ वह्या जुन्या डायऱ्या यांवर केवळ रामनाम (जय श्री राम) लिहिते. कुठली कुठली संस्थानं आणि बाबा, महाराज, माई, बापूंच्या वह्या कधी जमवाव्या नाही वाटल्या.

छान,
सुरू करा अन पूर्ण करा,
सुरू करून शंका घेत बसले तर जास्त त्रास होईल

Dharmik madhe taka. Ajun uttare yeu shakatat.
Fwd as received:
हातात माळ आहे म्हणून आम्ही नाम घेतो असे लोक समजतात. नामस्मरण करणारा मनुष्य माळेशिवाय ओळखता आला पाहिजे. नामाचा वृत्तीवर परिणाम व्हायला हवा. तुमच्या एकंदर वागण्यावरुन तुम्ही नामात रहाता असे लोकांना वाटले पाहिजे. तुमचे बोलणे, चालणे, पहाणे, तुमच्या मुखावरील समाधान बघून तुम्ही नामात आहात ही जाणीव लोकांना व्हायला हवी. तुमच्या डोळ्यात सुद्धा प्रेम असावे , बोलण्यात गोडवा असावा व वृत्ती आनंदी असावी.
Few of d impacts of namsmaran.
There are multiple things that happen.

श्री मनाचे श्लोक ८६...चितंन

II श्रीराम समर्थ ||
मुखी राम विश्राम तेथेचि आहे।
सदानंद आनंद सेवोनि आहे॥
तयावीण तो शीण संदेहकारी।
निजधाम हे नाम शोकापहारी॥८६॥

मुखाने राम नाम घेतले की रामाचे रूप डोळ्यासमोर उभे राहते .रामाने केलेला पराक्रम ,श्रीरामांचे गुण आठवतात त्यांचे एकपत्नीव्रत ,त्यांचा एकवचनी ,एकबाणीपणा ,लक्षात येतो .त्यांचे नाम ही आनंद्कारी असल्यामुळे चित्तात समाधान निर्माण होते . सर्व प्रकारचे ताप श्रीरामांची ईच्छा म्हणून स्वीकारायची मनाची तयारी होते .एक प्रकारचे समाधान प्राप्त होते .एक प्रकारचे तेज निर्माण होते .चित्त शुध्द होते .रामकृपा होते .आपल्या सुखाचा ठेवा श्रीरामच आहेत याची खात्री पटते .
अशी एक अवस्था येते की श्रीरामांचे नाम घेतल्या शिवाय जीवाला चैन पडत नाही ,श्रीरामांच्या नामाशिवाय सर्व गोष्टी संदेह निर्माण करणा-या असतात .,अशांती देणा-या असतात याची जाणीव होते .असे हे शोक ,दु:ख नाहीसे होते...

जय जय रघुवीर समर्थ

*!! श्रीराम समर्थ !!*

*"मनुष्य नाम घेऊ लागला की त्याची स्वतःच्या हृदयात उतरण्याची प्रक्रिया सुरू झाली असे समजावे. म्हणजे अगदी थोडे तरी अंतर्मुख झाल्याविना माणूस नाम घेऊच शकत नाही.*

*नाम घेणे म्हणजे भगवंताचे स्मरण करणे. ते स्मरण* *कितीही क्षीण असू दे पण त्याने पापाचा नाश होऊ लागतो यात शंका नाही.*
*त्यातल्या त्यात ते नाम सद्गुरूकडून जर आलेले असेल तर महापापांचे देखील स्थान भ्रष्ट केल्याशिवाय राहात नाही."*

परमपूज्य बाबा बेलसरे

*हातात माळ आहे म्हणून आम्ही नाम घेतो असे लोक समजतात.* *नामस्मरण करणारा मनुष्य माळेशिवाय ओळखता आला पाहिजे. नामाचा वृत्तीवर परिणाम व्हायला हवा. तुमच्या एकंदर वागण्यावरुन तुम्ही नामात रहाता असे लोकांना वाटले पाहिजे. तुमचे बोलणे, चालणे, पहाणे, तुमच्या मुखावरील समाधान बघून तुम्ही नामात आहात ही जाणीव लोकांना व्हायला हवी. तुमच्या डोळ्यात सुद्धा प्रेम असावे , बोलण्यात गोडवा असावा व वृत्ती आनंदी असावी. माझ्या लक्षात राहण्यासारखी अशी व्यक्ती म्हणजे प. पू. ती. तात्यासाहेब केतकर.*
*जपमाळ ही श्रीमहाराजांचे प्रतीक समजावी. माळेकडे पाहिले किंवा माळ हातात घेतली की लगेच श्रीमहाराजांची आठवण व्हावी. श्रीमहाराजांचा जास्तीत जास्त सहवास हवा असेल तर जास्तीत जास्त माळेचा सहवास ठेवावा म्हणजेच जास्तीत जास्त नाम घ्यावे.*
*- श्री प्र.ना.वटीॅकर ( अण्णा )*
*( अण्णानी सांगितल्याप्रमाणे, प. पू. ती.* *तात्यासाहेबांप्रमाणेच आनंदी व समाधानी वृत्तीचे , सदा सर्वकाळ लक्षात राहण्यासारखे , आणखी एक प्रसन्न व्यक्तीमत्व म्हणजे आदरणीय प. पू. श्री बेलसरे बाबा. ज्यांचा परमपूज्य श्री बाबांशी भेटीचा योग आला आहे , असे गृपमधील अनेक जण माझ्याशी नक्कीच सहमत होतील.)*
*॥श्रीराम जय राम जय जय राम॥*

> प्रत्येक श्वासाबरोबर नामजप सहज शक्य असताना,>>>> पण मन विचलित होउन, ताबडतोब अन्य विचार येतात व नामाचे विस्मरण घडते.
लिहीताना, माणूस गुंतला जातो हेसुद्धा खरे आहे>>>>
सामो, अगदी सुरूवातीला मन विचलीत होऊन विस्मरण घडतं हे खरं असलं तरी प्रयत्नपूर्वक आणि सरावानं नंतर विशेष लक्ष न देता नामस्मरण चालू रहातं, आपल्याही नकळत !

Pages