ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - २ - महाराष्ट्रातील गावे

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:49

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.

उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी

उत्तर: सातारा

कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.

आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?

पहीला क्ल्यू आहे:

सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकेकाळची राजधानी पण आता जिल्ह्याचे ठिकाण आहे
अजंठा च्या गुफा तयार करण्यात येथील राजांचा हात आहे
वत्स ऋषींनी येथे केले तप आहे, इतक्यातच एक डमी मोनोरेल सुरु केली येथे आहे

एकदम सोपं :
संत ज्ञानेश्वर महाराज यांचं जन्मगाव

पे

विकि जन्म व समाधी दोन्ही आळंदी दाखवतो>> चूक आहे, ४ थ्या च्या इतिहासाच्य पुस्तकात आपेगाव आहे जन्मगाव
आपेगाव माऊलींच (विठ्ठल्पंत कुलकर्णी, त्यांचे वडील) खरं गाव आहे, आळंदी आजोळ आहे

विकि जन्म व समाधी दोन्ही आळंदी दाखवतो

Submitted by कुमार१ on 5 September, 2019 - 15:25>>> नाही, पैठण जवळील आपगाव असेच दिसतेय मला तरी

विकिपीडियावर बाहेर आळंदी व क्लिक करून आत गेल्यावर आपेगाव आहे !

Pages