ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - २ - महाराष्ट्रातील गावे

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:49

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.

उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी

उत्तर: सातारा

कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.

आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?

पहीला क्ल्यू आहे:

सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पर्यटकांची नेहमीच गर्दी,
साद घालती जुने दर्यावर्दी,
रत्नाकराच्या पोटातील मोती,
शत्रूलाही वाटे माझी भिती.

गाव आहे लहान राव
पण तोफांचा दराराच फार
मोठ्या रेल्वे जंक्शन जवळच

.... जेवणाच्या ताटाकडे बघा जरा
नाव येईल ओठावरती बघा .

ओझर.

म्हणू शकता उद्योगनगरी, पाय लागता पडती पुण्य पदरी,
तर्रीदार मिसळीवर मारा ताव, ओळखायला नाही कठीण माझे नाव.

पुढचे कोडे :

शिखांचे १० वे गुरु श्री गुरु गोविन्द सिग जी ह्यांची समाधी असलेले शहर
आता झपाट्याने बनत आहे महानगर
गोदावरी नदी इथली जीवन्दायिनी राणी
पन ह्यावर्षी पाउस नसल्यामुळे सर्वांच्य तोंडचे प ळा ले आहे पाणी

तालुक्याचे ठिकाण पण कायम दुष्काळ
इथला किल्ला ऐतिहासिक महत्वाचा
लढाई पण लढलो आम्ही इथे
आता शिक्षणात पण आहोत पुढे

कंधार?
तिथे किल्ला, दुष्काळ, लढाई असे सगळे आहे

मला नांदेड जिल्ह्यातील तालुके माहित आहेत फक्त

नाही ; लातूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे .

Pages