अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारण १९९८ ची घटना आहे. आमचा कॉलेज मित्रांचा ६ जणांचा ट्रेकिंग ग्रुप होता. वेळ मिळेल तसे आम्ही भटकंती करायला जात असू. असेच एकदा ट्रेक करून परतत असतांना मित्राने टूम काढली कि जात जाता वाटेवरच दमण बीच आहे तो पाहून मग पुढे जाऊ. google मॅप्स वगरे भानगडी नसल्याने तिथे पोहचायला वेळ लागला परंतु पोहचलो एकदाचे आणि मग बीचवर धमाल सुरु झाली. सगळे उरकून निघतांना संध्याकाळ चे ६:३० - ७:00 कधी वाजले कळलेच नाही. तिथे हॉटेल मध्ये राहणे खिशाला परवडणारे नसल्याने रात्रीचा प्रवास करण्याचा निर्णय झाला. रात्री वाटेवरच धाब्यावर खाऊन निघालो.
पुढे जव्हारचं जंगलाचा पट्टा होता, तिथे रात्रीचे १२:३० - १:०० झाले असतील. समोर फक्त मी आणि ड्राइवर जागा, बाकीची मंडळी मागे ब्रह्मानंदी टाळी लागून ढाराढूर झोपलेली. सगळीकडे किर्र अंधार, गाडीच्या दिव्यांचाच काय तो प्रकाश. तेव्हा तिथे रात्रीत गाड्या थांबून लूटमार होत असे, म्हणून ड्रायव्हरला गाडी कुठेहि गाडी थांबवू नकोस म्हणून सांगितले होते. परंतु एका वळणावर त्याने गाडी एकदम थांबवली, त्याच्याकडे पाहत कारण विचारले तर म्हणाला समोर बघ, पाहिले तर एक मोठा नाग फणा काढून उभा. थोडी गाडी पुढे मागे केली आणि हॉर्न वाजवला तेव्हा तो नाग एकदम झाडीत निघून गेला. मग परत प्रवास सुरु, झोप येऊ नये म्हणून आम्ही दोघं काहीतरी खात गप्पा मारत होतो.
त्याने गप्पा मारता मारता गाडी परत थोडी हळू केली. मी त्याला विचारले कि का हळू केलीस झोप येतेय का? तर तो म्हणाला, पुढे रस्त्याच्या कडे कोणीतरी उभे आहे. लुटमारीचा प्रसंग ऐकून होतो म्हणून थोडी भीती वाटली, जरा वाकून पुढे पाहिले तर मला कोणीच दिसेना. त्याला म्हणालो कि कोणीच नाहीये तुला भास झाला असेल आणि नसेल तरी गाडी थांबवायची नाही म्हणून. थोड्यावेळाने माझ्या लक्षात आले कि हा परत गाडी हळू करतोय, परत त्याला विचारले तर परत तेच उत्तर कोणीतरी कडेला उभे आहे. मला काहीच दिसत नव्हते परंतु त्याला घाम फुटलेला. शेवटी मागच्या २ मित्रांना उठवले आणि ड्रायव्हरला धीर देऊन गाडी चालवत राहायला सांगितले. परत ५- १० मि. गेले तर हा गडी पूर्ण घामेजलेला, माझा एक मित्र पण म्हणायला लागला आरे गाडी थांबवा मागे एक बाई उभी आहे आपल्याला हात देते आहे. मला आणि माझ्या दुसऱ्या मित्राला मात्र काहीही दिसत नव्हते. मी त्याला सांगितले कि आम्हाला कोणीही उभे वगरे दिसत नाहीये तर तो घाबरून म्हणाला कि बरेच आहे दिसत नाही ते. हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे आणि मी काही गाडी थांबवणार नाही. माझ्या ज्या मित्राला ती बाई दिसत होती तो तर म्हणत होता कि ती बाई मागे येत आहे गाडी थांबवा. ड्रायव्हरने काही गाडी थांबली नाही, शेवटी आम्ही एकदा धाब्यावर आलो तिथे फक्त चहा मिळत होता तिथे थांबलो. ड्राइवर आणि मित्र दोघे हि घाबरले होते. मला तर काही कळले नाही परंतु ढाबेवाला म्हणत होता कि आम्ही एक मोठ्या संकटातून वाचलो होतो.
बरं ड्रायव्हरला भास होत होता असे गृहीत धरले तर मग तोच भास माझ्या मित्राला कसा काय होत होता आणि आम्हाला दोघांना काहीच कसे दिसले नाही? फक्त वातावरणात गारवा जाणवला होता.

नक्की काय होते ते आजवर कळलेले नाही .....

असतात असे अतृप्त आत्मे. एखादी पराकोटीची इच्छा अपूर्ण असतानाच मरण आल्यास प्रेतयोनीत अडकून पडतात. ज्यात साधारणपणे खून झालेले, तरुणपणीच मरण आलेले, अपघातामुळे अचानक मरण पावलेले, आत्महत्या केलेल्या व्यक्ती असतात. ज्यांची मने सूक्ष्माचा ठाव घेण्यास संवेदनशील आणि समर्थ असतात त्यांना ती दिसतात. आपल्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्थूल शरीर शोधत असतात. साधारणपणे जेथे त्यांना मृत्यू आलेला असतो त्या ठिकाणी काही अंतरात रात्री ते घुटमळतात परंतु एका कक्षेबाहेर ते येऊ शकत नाहीत. असे कोणी दिसल्यास शक्य तेवढे इग्नोर मारानेच श्रेयस्कर

बरं ड्रायव्हरला भास होत होता असे गृहीत धरले तर मग तोच भास माझ्या मित्राला कसा काय होत होता आणि आम्हाला दोघांना काहीच कसे दिसले नाही? फक्त वातावरणात गारवा जाणवला होता.
नक्की काय होते ते आजवर कळलेले नाही .....
Submitted by उनाडटप्पू on 19 August, 2019 - 23:16

त्या ड्रायव्हरचा आणि तुमच्या मित्राचा (ज्याला भास होत होता) 'मनुष्यगण' असावा. आपल्या जन्मपत्रिकेत 'गण' काय दिला आहे ते पहा. 'देवगण' (अजय नव्हे!), 'मनुष्यगण' आणि 'राक्षसगण' असे तीन प्रकारचे गण असतात. त्यापैकी 'राक्षसगण' असलेल्या व्यक्तींना भुते वगैरे दिसतही नाहीत आणि त्रासही देत नाहीत. 'देवगण' असलेल्या व्यक्तींना भूत केवळ दिसते असे म्हणतात पण त्रास देत नाही. 'मनुष्यगण' असलेल्या व्यक्तींना मात्र भूत दिसते आणि त्रासही देते असे म्हणतात.

माझा 'राक्षसगण' आहे, ज्यामुळे मला प्रयत्न करूनही काहीही (भूत वगैरे) दिसत नाही. कित्येकदा गावी जाताना रात्रभर गाडी चालवली आहे. आंगणेवाडीच्या जत्रेवरून माझ्या गावी परतताना रात्री ०१:३०-२:०० वाजता सुद्धा गावच्या हद्दीजवळ आल्यावर स्मशानाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे (मुद्दाम) मान वळवून बघितले आहे, परंतु मला काहीही दिसले नाही. मात्र माझा भाचा (जो आता केवळ ३.५ महिन्यांचा आहे) रात्री ११.३० ते १२.१५ पर्यंत जवळपास दररोज रडारड करत असतो, अगदी दूध वगैरे प्याला असेल तरीही. मग दृष्ट काढल्यावर शांत झोपतो. त्याच्या पत्रिकेत त्याचा 'मनुष्यगण' दिला आहे.

अंधारात बऱ्याचदा ( अगोदरच घाबरलेल्या) माणसाला झुडुप, दगड हे मानवी आकाराप्रमाणे भासतात. थांबून खात्री करायला हवी होती.

अंधारात बऱ्याचदा ( अगोदरच घाबरलेल्या) माणसाला झुडुप, दगड हे मानवी आकाराप्रमाणे भासतात. >>> अंधारात कशाला अगदी दिवसा देखिल असे भास होऊ शकतात अन घाबरलेले असले तर अजुनच होत असावेत.

माझा एक किस्सा आहे असा, लहान असताना सुट्टीत गावी गेले होते, तेव्हा एके दिवशी दुपारी मावशीच्या शेतात गेली फिरायला. मे महिना असल्याने सगळीकडे खुप ऊन होते अन त्यामुळे काही झाडांची पाने चमकत होती. मावशीच्या वरच्या शेतात होते मी अन बाबा खालच्या शेतात, मला त्यांच्याकडे जायचे होते पण मध्ये अंतर बरेच होते त्यामुळे एका शेतातुन दुसर्या शेतात असे मला एकटीने पाठवायला दादा तयार नव्हता, तरी मी एकटीच हट्टाने निघाले. थोडे अंतर चालल्यावर मला एका झाडाखाली बाबा बसल्याचा भास झाला. सेम त्यांच्या फेट्यासारखा फेटाही दिसला अन मी तिकडे जावु लागले. खरेतर तो अगदी विरुद्ध रस्ता होता, पण मी तिकडे नविन असल्याने मला माहीत नव्हते. थोडेसेच चालले असेल लगेच मागुन येवुन दादाने थांबवले मला अन सांगीतले की मी चुकीच्या बाजुला चाललीये, तेव्हा परत बघीतले तर खरेच त्या झाडाखाली काहीच नव्हते. नंतर दादा मला बाबांकडे घेऊन गेला अन सगळे सांगीतले तर लगेच त्यांनी मला तिकडुन घरी नेले अन काहीतरी ऊतरवले होते माझ्यावरुन, त्यानंतर परत कधीच तिकडे शेतात जायला मला बंदी घातली , अजुनही मला तिकडे कोणी जावु देत नाहीत.

अरेरे एका अमानवीय अनुभवाला मुकलात तुम्ही. बहुतेक तुमच्या दादाला तिथला प्रकार माहीत असावा.
बरेचदा बसला हात करताना मला जायच्या गावाची पाटी दिसते. पण नीट जवळ आली की ती वेगळीच बस आहे हे कळतं.

१९९४ सालची गोष्ट आहे. मला माझ्या एका मित्राने कर्णपिशाच्च प्रसन्न असलेल्या एका बाबा विषयी सांगितले. मला त्या बाबाकडे जावेसे वाटायला लागले. तेवढ्यात आमच्या एका नातेवाईकाने दुसऱ्या एका गडगंज श्रीमंत वृद्ध माणसाची संपत्ती बळकावली. कायद्याप्रमाणे माझं कुटुंब त्या वृद्ध व्यक्तीचे वारस होते. व ज्याने संपत्ती बळकावली तो आमचा दुरचा नातेवाईक होता ‌ व बराच तरूण होता. आजोबा लागत होते माझे. तर या तरूणाने एक दिवस तार करून ते वारल्याचे कळवले. अंतिम विधी वगैरे गोष्टी झाल्यावर तरूणाने सर्व संपत्ती आजोबांनी माझ्या नावावर केली आहे असे कागदपत्रे दाखवून सांगितले. मला डाऊट आला की याने आजोबांना फसवून सह्या घेतल्या व नंतर त्यांना मारून टाकले असावे. कारण माझे कुटुंब तिकडं पोहोचेपर्यंत मृतदेह त्याने स्मशानभूमीत नेऊन ठेवलेला होता.त्यावेळी कुणाला शंका आली नाही.
कर्णपिशाच्च वाल्या बाबाला खरं काय आहे ते विचारावं म्हणून मी नगरला गेलो. जिल्हा परिषदेच्या बाजूला एका गाळ्यात बाबा थांबत असे. मी शोधत तिकडे गेलो. गाळा बंद होता व बरेच लोक वाट पहात उभे होते. थोड्या वेळाने बाबा आला. बराच वृद्ध व आंधळा होता. गाळा उघडल्यावर आतमध्ये शेंदूर लावलेले पाच पंचवीस दगडी देव होते. बाबा भवऱ्यासारखा गुं..गुं.. करत एका एका दगडाला हात लावत होता. प्रश्न विचारणे चालू झाले. अगोदर पैसे जमा केले. कोणी पाच रुपये तर कोणी दहा रुपये देत होता. मी वीस रुपये दिले. माझा नंबर आला. माझ्या आधीच्या लोकांचा पोरगा पळून गेला होता. बाबाने तो ठिक असून ठावठिकाणा सांगितला. मला विचारले अमर तुझं काय काम आहे. मी विचारले माझे आजोबा अमुक अमुक , अमुक दिवशी अमुक ठिकाणी वारले आहेत. तर ते आजाराने वारले का त्यांचा खून झाला?
बाबाने बराच वेळ गुं.. गुं... केले व एकदमच माझ्यावर भडकला. पैशांमधून माझी वीस रुपयांची नोट बरोबर काढून मला दिली व म्हणाला. मुर्खासारखे काहीही विचारतो? आम्हाला असे सांगता येत नाही. चल नीघ इथून.
मी गुपचूप तेथून निघालो. बाबाचा अवतार पाहून बाबा एखादेवेळी शापबिप द्यायचा म्हणून परत बस पकडून गावाला आलो.

सगळ्यांना नमस्कार, खरं सांगायचं तर आमचं गाव एका भयंकर संकटात सापडलं आहे. मी वेगळा धागा काढणार होतो पण सगळी जाणकार मंडळी इथे वाचत असतात म्हणून इथेच लिहितो. आमच्या गावाच्या आजूबाजूला चकवा, हडळ, खविस, वेताळ, झोटिंग, जखीण अशा अनेक भयानक भूतानी बस्तान बसवलं आहे. गावकरी जीव मुठीत धरून जगताहेत, रात्री अपरात्री कोणी बाहेर पडला कि गायब झालाच म्हणून समजा. तरुण मुलांना एक सुंदर स्त्री भुलवून चिंचेच्या झाडाखाली नेते, तिथे गेल्यावर ती स्त्री बोलते पाय बघा माझे, सरळ आहेत कि उलटे ते सांगा. अचानक चेहरा विद्रुप होऊन ती जखीणीचं रूप घेते. म्हाताऱ्या माणसांजवळ तंबाखू मागणारा भूत भेटणे, रात्री अपरात्री दूर परदेशी गेलेल्या माणसाच्या आवाजात दार ठोठावणे असले भयानक प्रकार घडत आहेत. गावकऱ्यांचा मला निरोप आला होता कि यातून वाचव, पण मी एका महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याने गावी जाऊ शकत नाही. गावकर्यांनी तात्पुरती सोय म्हणून गावाच्या वेशीवर माझ्या मुखवट्याचे बुजगावणे उभे केलेत त्यामुळे थोडा त्रास कमी झालाय. तर या समस्येवर तुमच्याकडे काही जालीम उपाय असेल तर सुचवा. धन्यवाद.

मला कधी रात्री भूत वगैरे दिसले तर मी सरळ दगडी धोंडी खा आणि परत जा, बोकलत ची शपथ आहे तुला असे म्हणते, भूत हमखास गायब

मुखवट्याचे बुजगावणे>>>हेच चुकले,
याने त्रास फारतर कमी होईल,पण बंदच करायचा असेल थोडा खर्च करावा लागेल,आधी तुमच्या सारखा सेम टू सेम एक व्यवस्थित पुतळा बनवायला सांगा,त्याच्या कानाला होल असू द्या,नंतर तुम्ही तुमचे मंत्र वगैरे मोबाईल फोन द्वारे त्याला ऐकवण्यास सांगा गावकर्यांना, त्रास बघा कसा चटकन कमी होईल

बोकलतची समाधी तिथं बांधली तर गावचा राखणदार बनून सगळ्या भुतांना हाकलून देईल. पण जिवंत समाधी घ्यावी लागेल हं.

गावकऱ्यांना सांगायचं की कुठल्याही घरात अजिबात भात शिजवायचा नाही. भाकर / पोळी भाजी, पिठलं करायचं.

भात फक्त सरपंच्याच्या घरात त्यांच्या देखत मातीच्या मडक्यात शिजवायचा, अजिबात सांडलवण होऊ न देता. सांडलाच तर सगळा प्रत्येक कणासह वेचून परत मडक्यात टाकायचा.
मग सरपंचांनी ते मडकं घेऊन चेहऱ्यावर तुमचा मुखवटा लावून वेशीच्या बरच लांबवर आडरस्त्याला जाऊन ते मडकं वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली आपटून फोडायचं आणि गेल्या पावली परत यायचं.
रोज हे करायचं.

तुम्हाला माहीतच आहे "असतील शीतं तिथं नाचतील भूतं."

गावात आणि आसपास एकही शीत आता नसल्याने, आणि गावाबाहेर लांब आडवटेला त्या झाडाखाली रोज भरपूर शीतं उपलब्ध होत असल्याने सगळी भूतं तिथं जाऊन नाचतील, गावकऱ्यांना त्रास होणार नाही.

सोबत एक डीजे अपॉइंट करावा लागेल त्या झाडाखाली !
नाचताना प्रत्येक भुताला वरायटी म्युझिक कोण पुरवेल नाहीतर !!

तुमच्या सगळ्यांचे उपाय वाचून माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. लवकरच त्या सगळ्यांचा बंदोबस्त करतो.
@भरत, हो, ही समस्या भरपूरच गंभीर आहे, खासकरून सासू महिलांना याचा जास्त त्रास होताना दिसतो आहे. सून आपल्या मुलावर मूठ मारून त्याला वश करते अशी त्यांची खात्री आहे.

मुठीच्या सुद्धा ग्रेड्स असतील ना !

महम्मद अली मुठ
माइक टायसन मुठ
त्याला काउंटर अटॅक म्हणून एवेण्डर हॉलीफिल्ड मुठ ...

एक भाबडा प्रश्न
ह्यात पण चायना माल असतो का
डुप्लीकेट मुठ Proud

चार पाच वर्षांपूर्वी मी कामानिमित्त पुण्याला गेलो होतो. तिथे साधारण एक महिनाभर राहावं लागणार होतं. माझ्या एका मित्राने त्याच्या नवीन फ्लॅटवर माझी राहण्याची सोय केली होती. मी पुण्याला त्याने दिलेल्या पत्त्यावर गेलो.इमारत चांगली 12 मजली होती. इमारतीत अजून कोणीही राहायला आलेलं न्हवत. मी जिन्याने चढत चढत नवव्या मजल्यावर मित्राच्या रूमवर पोहचलो. संध्याकाळ झाली आणि वातावरण गूढ व्हायला लागलं. हॉरर सिनेमाला शोभेल असं आजूबाजूचं वातावरण होतं. रात्र झाली आणि हवेत गारवा वाढू लागला, टिटवीचं ओरडणं मला अस्वस्थ करत होतं, डबा घरूनच आणला असल्याने जेऊन 11च्या सुमारास झोपी गेलो. रात्री अडीच वाजले असतील दरवाज्यावर कोणी ठोठावलं, आणि माझी झोपमोड झाली, साधारण दोन तीन मिनिटे शांतता होती. मलाच भास झाला असेल म्हणून मी पुन्हा झोपायला जाणार तर दरवाजा पुन्हा वाजला.मी आतूनच कोण आहे विचारलं पण काही उत्तर मिळालं नाही. नाईलाजाने मी दरवाजा उघडला तर बाहेर कोणीच न्हवतं. दरवाजा लावणार इतक्यात माझं लक्ष उंबरठ्याकडे गेलं तर तिथे चक्क ऍनाबेली बाहुली पडली होती. ती बाहुली झपाटलेली आहे हे ओळखून मी लगेच तिला नवव्या मजल्यावरून खाली फेकून दिली. दरवाजा लावून बेडवर झोपायला जाणार तर खुर्चीत चक्क खाली फेकून दिलेली ऍनाबेली बसली होती. ऍनाबेलीची मानगूट पकडून दोन मुस्काटात मारायची इच्छा झालेली पण मी प्रवास करून दमलो होतो त्यामुळे दुर्लक्ष करून झोपायला गेलो. जर ऍनाबेलीने त्रास दिला तर बघून घेऊ असा विचार करत मी ती काय करते हे पाहू लागलो. ऍनाबेली हळूहळू हालचाल करायला लागली. तिला बहुतेक भूक लागली असणार कारण माझ्या बॅगमधला पार्ले बिस्किटचा पुडा तिने खाल्ला आणि बाटलीतलं घोटभर पाणी प्यायली. नंतर झोपाळ्यावर जाऊन मंद झोके घेत गाणं गुणगुणायला लागली. ते गाणं ऐकता ऐकता कधी झोप लागली समजलंच नाही. सकाळी उठलो तेव्हा ऍनाबेली त्याच खुर्चीवर शांत बसली होती. अनेक दिवस का दिनक्रम सुरु होता. तिने मला कधी त्रास दिला नाही. मी बाहेर जाताना मुद्दाम तिच्यासाठी पार्ले बिस्कीट टेबलवर ठेऊन द्यायचो. शेवटी माझं पुण्यातलं काम पूर्ण झालो. निघताना ऍनाबेलीला बोललो मी निघतो काळजी घे, तसं तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी दरवाजा लावून जिना उतरायला लागलो.पाठीमागे पहिले तर अपेक्षेप्रमाणे ऍनाबेली जिन्यात उभी होती.माझ्या पाठीवर ती पण जिना उतरत होती. बिल्डिंगच्या बाहेर आल्यावर मात्र ती पाठीमागे यायची थांबली, कदाचित बिल्डिंग तिची हद्द असावी. मी जड अंतःकरणाने तिला निरोप दिला आणि घरच्या मार्गाला लागलो.

बोकलत एनाबेलीसाठी जुडवा मुवीतलं गाणं म्हणत जिने चढले असतील.

ऊँची है बिल्डिंग
लिफ्ट तेरी बंद है
कैसे मैं आऊ
जिया बेकरार है। Wink Rofl

Biggrin Biggrin पण अनाबेल तर इंग्लिश आहे ना तिला कसं कळेल हिंदी गाणं.

Pages