अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे धागा का झोपला परत >>>>> कारण बोकलतनी जगातल्या सगळ्या भुतांचा नायनाट केला आहे. आता आत्मे भूत व्हायला सुद्धा घाबरतात.

आमच्या गावातील ही घटना आहे ही अमानवीय नक्कीच आहे पण भुताटकी किती याची कल्पना नाही, ही ७/८ वर्षापुर्वी ची घटणा आहे भरत नावाच्या मुलाची तो माझ्या पेक्षा दोन एक वर्षानी लहान होता. शिडशिडीत आंगकाठीचा कमीअधिक व्यसन करणारा सगळ्या शी चांगले वागणारा तो रंगाच्या कामासाठी हैदराबाद गोवा अशा ठीकाणी रंगकाम करण्यासाठी गावातील ईतर ५,६ लोकांबर जात असे.
तर घडले आसे ही सगळी लोकं हैदराबाद ईथे कामासाठी गेली होती त्याच्याबरोबर हा भरत सुद्धा होता.तिथे एका होटेल चे काम चालले होते
शेठ ने त्यांना राहण्यासाठी जवळच्या एका बंगल्यात रहाण्याची सोय करून दिली होती.
ही लोकं सकाळी ९ वाजता कामावर जात व संध्याकाळी पाच साडेपाच ला रूमवर येत.
पण एक दिवस भरत बाकीच्या लोकांना ११,१२ दरम्यान म्हणाला की माझे डोके दुखायला लागलय मी जरा घरी जातो, बाकीचे लोक म्हणाले ठिकाणी आहे जा.
संध्याकाळी जेव्हा बाकीचे घरी गेले बघतात तर काय भरत ने फास लाउन घेतलेला,
आता तुम्ही म्हणाल यात काय अमानवीय नाही यात काही च अमानवीय नाही पण चक्रावून टाकणारी गोष्ट तर पुढे आहे,
सगळ्या नी जेव्हा बघीतले की भरत ने साडी ने गळफास घेतला आहे तेव्हा कोणीच जवळ जाईना एक तर आपण घरापासून लांब आणि दुसर्याच्या पोराने ही अशी आत्महत्या केलीय उगाच आपल्यावर नाव यायचे शेवटी सर्वानुमते पोलीसांना बोलवायचं ठरवले
पोलीस आले पंचनामा केला भरत ने एक चिठ्ठी लिहली होती ती पोलीसांनी हस्तगत केली
व सगळ्याना चौकशीसाठी बोलवले व म्हणाले
तुमच्यातील आत्मा कोण, कोणीच नाही सगळे
म्हणाले. मग या चिट्ठी त आसे का लिहीलय.

मी आत्मा
तिने मला मारलय, तुम्ही पण नाही वाचणार आता बाळ्या तुजा नंबर आणि पप्या तुझा सुद्धा.
वाचायच आसेल तर लवकरात लवकर निघून जावा.
आत्मा

२०१६ मधील घटना आहे. माझे काका (मावशीचा नवरा) मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी Coimbatore येथे गेले होते. त्यांची सोय हॉटेल चेनथुर कि चिथानूर नावाच्या हॉटेल मध्ये करण्यात आली होती. त्याच हॉटेलमध्ये लग्न सोहळा होता. सर्वच रूमस मध्ये लग्नाची मंडळी उतरली होती. प्रत्येक कपलला स्वतंत्र रूम दिली होती. श्रीमंत पूजन विधी झाला , सुग्रास जेवण झाले . सकाळी लग्न असल्यामुळे सर्वजण आपआपल्या रूममद्धये झोपण्यासाठी गेले. साऊथ मध्ये लग्न एकदम सकाळी सकाळी असतात तसेच या लग्नाचा मुहूर्त पण सकाळी ६:४० चा होता. सकाळी आवरायचे म्हणून काका बाथरूम साधारण ५ - ५:३० च्या दरम्यान गेले. आंघोळी नंतर समोरच्या आरश्यामध्ये केस विंचरावेत म्हणून पाहिले तर तिथे आरश्याच्या वरील बाजूस जी खिड़की होती त्या खिडकीच्या गजाला धरुन एक मध्यमवयिन व्यक्ती विचित्रपणे त्यांच्याकडे डोकावून पहात होती. कोण आहे म्हणून जोरात ओरडताच ती व्यक्ती एका क्षणात दिसेनाशी झाली. काका तडक होटेलच्या मैनेजर कड़े गेले. त्याला ही घटना सांगितली व हॉटेल मध्ये चोर शिरला आहे असे सांगितले. तो म्हणाला हे शक्यच नाही. कारण तिथे कुणी येणेच शक्य नाही. तरी ते त्याला बाथरूममद्धये घेवून आले आणि ती खिडकी दाखवली. तेंव्हा तो मैनेजर म्हणाला ही रूम चौथ्या मजलावर आहे . बर ही रूम रोडफेसिंग आहे ..इकडे कुणी चढून येण्याची शक्यताही नाही .(त्यांनी हॉटेलच्या खाली जावूनही पहिले तेंव्हा खालून कुठला आधार घेवून वर चौथ्या मजल्यापर्यन्त कुणी चढून येऊ शकणार याची खात्री झाली) तुम्हाला काही भास झाला असेल. असे होटेल मॅनेजरने मला सांगीतले. परंतु काकांना तो भास नव्हता असेच वाटत होते. शेवटी त्यांनी काही वेटर मंडळींकडे चौकशी केली तेव्हा कळाले कि त्या खोलीत तसा माणूस बरेच लोकांना या आधीहि दिसला आहे. हॉटेल बांधकामाच्या वेळी एक मजूर चौथ्या मजल्यावरून पडून मेला होते प्लास्टरिंगचे काम करतांना. हे ऐकून काका दुसऱ्या हॉटेल मध्ये गेले कारण त्यांची ट्रेन दुसऱ्यादिवशी सकाळची होती व त्या रूम मध्ये थांबायची त्यांची अजिबात इच्छा नव्हती.

म्हातारी आजी आणि बाहुली बद्दल. उगाच प्रत्येक गोष्टीत भयानकता आणू नका. ती बाई एकटी रहातेय. त्या एक डोळ्याच्या बाहुलीशी काही आठवणी निगडीत असतील. भूतांपेक्षा म्हातारपण आणि त्यामुळे येणारा एकटेपणा भयानक. तिला त्या बाहुलीची सोबत वाटत असेल. शिवाय एकट्या असहाय बायकांना वाईट चेटकीण ठरवून त्यांचा छळ केला जातो या जगात. आपण तरी प्रगल्भता दाखवूया.

भुत्याभाऊ तुमच्या काकांची गोष्ट थोपुवर जशीच्या तशी मराठी भुताखेतांच्या गोष्टी ग्रुपमध्ये एका लेखकाने स्वानुभव म्हणुन लिहीलेली आहे. आपण तिचा शेवट वेगळा करून लिहिले आहे. आपणास असे करणे शोभत नाही. केवळ हे सांगण्यासाठी नवा अवतार घेतला.
वेताळ सहमत, पण ती बाहुली खूप डेंजर दिसत होती.

आहो शक्तिराम
त्यांचा तिकडे वेगळ्या नावाने आयडी असेल. असे उगीच कोणावर संशय घेत ह्या ठिकाणी आरोप करू नए. ही जागा अमानवीय आहे ते विसरला होय !! भुत झपाटेल की एखादे Wink

बरोबर अमावस्या किंवा पौर्णिमेला हा धागा आपोआप वर येतो. ३जून ला अमावस्या होती ना?

शक्तीराम Happy
अगदी मनातले लिहीलेत, भुत्याभाऊंना ईकडे किस्से टाकायला आवडतात ते ठिक, पण किमान त्याचे श्रेय योग्य त्या व्यक्तीला द्यायला हवेच.

मी मागेपण लिहिलं होतं की भुत्याभाऊ बरेचदा इतर ठिकाणच्या पोस्ट कॉपीपेस्ट करतात.
मागे मुंबईमधील झपाटलेल्या जागांबद्दल लिहिलेलं ते ही आंजावर बरेच ठिकाणी आधी वाचलेलं.

त्याना कर्णपिशाच्च वश असेल ओ ! ते सर्व ब्लॉग्स थोपु वडापाव भजीपाव वगैरे वगैरेच्या सर्व वार्ता कानात येवून सांगत असणार त्याप्रमाणे भाऊनी त्या सर्व पोस्टी इमानें इतबारे इकडे टंकल्या तो मैं बोलू क्या गलत किया !!
कशाला उगीच लेखन चोरीचा आरोप करायचा ?

Submitted by सस्मित on 6 June, 2019 - 12:42 >>> +११११

हो न, ज्यांना असे किस्से वाचायची आवड असते , त्यातिल बरेच जणांनी आधीच हे किस्से कुठे न कुठे वाचलेले असतात, मग ते म्हणजे सध्यापुरते भुत्याभाऊ (कारण अजुन कोणी असेल तर माहित नाही) असे का करत असतील असा प्रश्न पडतो Uhoh

तसेही माबोवर, लेखन / प्रतिसाद चोरी असो वा ड्यु आयडी लेखन असो माणसे अशी का वागत असावित असे बरेच प्रश्न पडतात जसे पुरुष आयडीला स्त्री आयडी का घ्यावासा वाटतो किंवा स्त्री आयडीला पुरुष आयडी का घ्यावासा वाटतो?? स्वत:च्या लेखनावर आपल्याच ड्यु आयडी ने प्रतिसाद का द्यावा वाटतो (ईथे भ. भा अन रुन्मेशचे प्रतिसाद एका धाग्यावर वाचले होते असे अजुन किती जण असतील काय माहीत?) . खुप सारे प्रश्न ....

माबोवर नविन होते तेव्हा अप्रुप वाटायचे या सार्याचे पण आता नाही...
सगळ्यात जास्त मजा तर जेव्हा एखाद्या विषयावर लोकं आपापसात भांडतात तेव्हा येते अन किवही. किव कारण माणसे या आभासी जगाच्या किती आहारी गेलीयेत हे जाणविते अन वाईट वाटते म्हणुन

असो, खुप अवांतर झाले

एक अनुभव टाकतोय, अमानवीय की भास माहिती नाही, पण अनुभव नक्कीच!

मागच्या आठवड्यात घरी एकटा होतो. रात्री बराच वेळ झोप लागत नव्हती. शेवटी १ १.३० च्या सुमारास झोप लागली. झोप लागून किती वेळ झाला माहिती नाही, पण अचानक कुणीतरी साखळ्या वाजवत पळत जातय असा आवाज येऊ लागला. मध्येच अक्षरशः शेजारी हा आवाज यायचा, तर मध्येच दूरवर कुठेतरी.
मला हालचाल सुद्धा करता येत नव्हती, शेवटी या आवाजातच केव्हा झोप लागली कळलं नाही.
सकाळी सगळं नॉर्मल होतं!

Submitted by अज्ञातवासी on 6 June, 2019 - 13:31 >>> तेव्हा एखादी भयकथा वगैरे वाचली होती का आठवा किंवा तसा एखादा विचार मनात होता , कारण आपण एखादी कथा वाचण्यात खुप जास्त गुंग झालो न तर होत असे कधी कधी. मी तर जेव्हा कधी हॉरर वाचते तेव्हा रात्री ऊशीखाली चाकु ठेवते, मग न भिती वाटते न वाईट स्वप्ने येतात, छान झोप लागते.

@VB - नाही, राजेश खन्नाच्या लाईफ वर पुस्तक वाचत होतो.
दुसऱ्या दिवशी आईनेही हाच सल्ला दिला, छोटी सुरी उशाखाली ठेवून झोपण्याचा.

छान. हा धागा कंटिन्यू झाला की माझा दिवस चांगला जातो.
मला भुत्याभाऊंचा राग नाही येत. पण नवीन किस्से वाचायला आवडतात.

छोटी मुले स्वप्न पाहून घाबरून झोपेतच अंथरुण ओले करतात आणि ते तसे होऊ नए म्हणून त्यांच्या उशाखाली चाक़ू ठेवतत्त

सुरी चे काय लॉजिक आहे, सांगेल का कोणी?

नवीन Submitted by च्रप्स on 7 June, 2019 - 02:494>>> अगदी सूरी किंवा चाकू असे नाही पण लोखंडी हत्यार अगदी दाभनसुद्धा चालते, त्याने निगेटिव्ह एनर्जी कमी होते, अन त्यामुळे आपल्या मनातील भीती सुद्धा असे माझी मम्मी सांगते. बाकी काही वेगळे कारण असेल तर माहीत नाही पण माझ्यासाठी हे वर्क करते. अन अजुन एक योगायोग, जेव्हा कधी मी स्वप्नात घाबरते (जेव्हा चाकू उशासी नसतो) तेव्हा त्याच स्वप्नात दत्तगुरु येतात अन भितीची तीव्रता कमी होते, मुख्य म्हणजे मी नास्तिक आहे तरी ते येतात स्वप्नात☺️

Pages