अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी जिन्याने का गेलो हा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिकच आहे. मी लिफ्टने न जाता मुद्दामूनच जिन्याने गेलो कारण प्रत्येक मजल्यावर अमानवीय शक्तींचे वास्तव्य आहे का ते मला पहायचे होते, असे वास्तव्य मला आढळून आले असते तर मी लगेच त्या शक्तीचा नायनाट करणार होतो जेणेकरून भविष्यात जी कुटुंबे तिथे राहायला येतील त्यांना त्रास नको.

फेम वाली भूतं स्पेशल असतात
ती लिफ्ट कशाला वापरतील !

स्काय इज द लिमिट का काय ते जणु त्यांच्यासाठीच असावे

बोकलत कँन डु अनथिंग.

Submitted by Akku320 on 29 August, 2019 - 16:45 >>>>

वो स्त्री है....वो कुछ भी कर सकती है...lol

एवढ्या मंदीत बोकलत ह्यांनी पारले जी बिस्कीट जवळ बालगळेत!!!
जपा हो स्वतःला. डाका पडायचा एखाद दिवशी.

पुर्वी म्हणजे ८,९ वर्षांपुर्वी माबोवर अशा चर्चा वाचायला मजा यायची,किस्से वाचायला आवडायचे .अलिकडे फक्त टिपी करणारे टुकार प्रतिसाद असतात.

बरोबरेय की
तेव्हा भूतं क्वचित भेटायची विकतच्या मसिकातून
आता रोज फुकट भेटतात नं
फेसबुक आणि व्हाट्सऐप मधून
मग आधीची मज्जा कशी राहील ...

<<<पुर्वी म्हणजे ८,९ वर्षांपुर्वी माबोवर अशा चर्चा वाचायला मजा यायची,किस्से वाचायला आवडायचे .अलिकडे फक्त टिपी करणारे टुकार प्रतिसाद असतात.>>> +१
१००% सहमत केशव. मागे एकदा मी बोकलतला दिलेल्या प्रतिसादांवरून काहींनी माझी पत वगैरे काढली होती, त्याच न्यायाने ज्याची जशी पत तसा प्रतिसाद. या धाग्याची पुरती वाट लागलीय हे नक्की.

चिल गाईज चिल, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तो. अमानवीय 3 रिलीज व्हायची वाट बघतोय
Disclaimer: माझ्या कथा सत्य घटनांवर आधारित असतात.

माबोवर बरेच धागे आहेत ज्याच्यावर आता चर्चा नाही होत. पण त्या धाग्यावर आधी झालेली चर्चा ही माहीतीपुर्ण असते ज्याचा सगळ्यांनाच उपयोग होतो.

हल्लीच्या भूतांचा प्रोसेसर आणि रैम चायना मेड असतोय म्हणून थोड़ा कमी इफेक्ट मिळतो हॉररपणात...
सर्वांनी मेक इन इंडियाचा नारा देऊ म्हणजे पुन्हा आधीसारखी देशी ओरिजिनल भूतांची मजा अनुभवता येईल !!

मध्यरात्रीची मुंबई अशा प्रमोद नवलकरांच्या एका पुस्तकात अशा काही अमानवीय गोष्टींची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे. असे पुसटसे स्मरते.

धागा झोपला होता म्हणून महिनाभर उघडला नाही ...आज खूप मेसेज दिसले म्हणून पाहिलं तर परत निराशाच हाती लागली Sad

फडके ( बहुदा वि.के.) यांनी थोडे अद्भुत थोडे गूढ नावाच्या पुस्तकात अनेक अमानवी घटनांचा उल्लेख केला आहे. यातील अनेक कथा भुतांच्या आहेत पण काही परमेश्वराच्या साक्षात्कार , ज्योतिष, काळी जादू याविषयावर आहेत. हे पुस्तक जरूर वाचावे.यातील काही कथा सांगण्याचा मोह आवरत नाही पण वाचकांची निराशा होऊ नये म्हणून तो टाळते.त्याऐवजी मी मागे उल्लेख केलेल्या काकांची एक कथा सांगते.ते पोलिस इन्स्पेक्टर होते आणि वकिलीचा अभ्यास करत होते. सगळा दिवस duty करावी लागायची.अभ्यासाला वेळ मिळायचा नाही म्हणून ते भल्या पहाटे २.३०/३ वाजता अभ्यासाला बसत.याचवेळी त्यांचा दरवाजा वाजला यावेळी कोण असावे याचे आश्चर्य करत त्यांनी दार उघडले. आपल्या अभ्यासाचा वेळ जाणार याची नाराजीही त्यात होतीच.सुरुवातीला त्यांना बाहेरची व्यक्ती खूप अस्पष्ट दिसली पण बाहेर अंधारच होता.ती व्यक्ती आत आली आणि त्यांनी ओळखले की, त्यांचे आधीचे पोस्टिंग ज्या गावी होते तेथील त्यांच्या हाताखाली असलेला आणि त्यांच्यावर निष्ठा असलेला तो पोलीस होता.अशा अवेळी आल्याबद्दल त्याने माफी मागितली आणि बोलता बोलता त्या गावात झालेल्या दंगलीची सगळी हकीकत सांगितली ती घडवून आणणाऱ्या व्यक्तींची नावे सांगितली आणि काही लोकांचा जीव त्यात गेला हे पण सांगितले. काकांनी वरिष्ठांना या गोष्टींची कल्पना द्यावी असा आग्रह तो करू लागला.काका कामावर गेल्यावर त्यांनी या गोष्टींची शहानिशा केली ती खरी असल्याचे त्यांना कळाले आणि त्या दंगलीत तो शहीद झाल्याचेही.

किती बकवास करून टाकलाय हा धागा, अजिबात रस वाटत नाही, फाल्तु बोललत फोकलत ची फाल्तुगीरी असते फक्त

मग उडवायला सांगा हा धागा. दुसरा धागा काढून पोस्ट खरंच अमानवीय असली तरच अप्रुव्ह करायची. भुत्याभाऊ सारख्या लोकांना थोपुवरील कॉपी पेस्ट गोष्टी टाकता येणार नाहीत मग.

Pages