अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी पंतप्रधान होण्याच्या सहा महिन्यांपूर्वी आध्यात्मिक गुरू बुशरा मानेक यांच्यासोबत विवाह केला आहे. बुशरा मानेक यांच्याबाबत पाकिस्तानमध्ये बरंच काही विचित्र बोललं जात आहे. सध्या इमरान खान यांच्या घरातील काही कर्मचाऱ्यांनी बुशरा यांच्याबाबत काही भयंकर दावे केले आहेत. बुशरा यांचे प्रतिबिंब आरशात दिसत नसल्याचा दावा त्यांच्या घरातील कर्मचाऱ्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या या दाव्यानंतर पाकिस्तानात इमरान खान यांची पत्नी हडळ तर नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.

ANI Digital

@ani_digital
Pakistan's first lady Bushra Bibi's image does not appear in mirrors: PM House staff

Read @ANI story | https://www.aninews.in/news/world/asia/pakistans-first-ladys-image-does-...

2,552
8:12 AM - Sep 29, 2019
Twitter Ads info and privacy
2,858 people are talking about this
काही दिवसांपूर्वी देखील बुशरा यांच्याबाबत पाकिस्तानात विचित्र गोष्टी पसरल्या होत्या. मानेक यांनी स्वत:ला ‘जिन्न’मध्ये बदलले असून त्या कधी प्राण्यांचे रूप घेतात तर कधी स्वत:ला मानवाच्या रुपात बदलतात. तसेच त्या लोकांना वश करण्यात देखील कुशल असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच बुशरा या हडळ आहेत की काय असा प्रश्न लोकांमध्ये निर्माण झाला आहे.

इम्रान खान यांनी 2018 मध्ये बुशरा मानेक यांच्यासोबत लग्न केले. इम्रान खान यांनी तिसरे लग्न केले तर ते पंतप्रधान होतील असे भाकित बुशरा मानेक यांनी केले होते. त्यांच्या या भाकितानुसार बुशरा यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी इमरान पंतप्रधान झाले. आतापर्यंत बुशरा यांचा चेहरा कुणीच पाहिलेला नसून त्या कायम बुरख्यात स्वत:ला बंद ठेवतात. त्यांचे तसे राहणे देखील त्यांच्याबाबत गूढ निर्माण करते.

आतापर्यंत बुशरा यांचा चेहरा कुणीच पाहिलेला नसून त्या कायम बुरख्यात स्वत:ला बंद ठेवतात ---> तिने स्वतः तरी पाहिलाय का स्वतःचा चेहरा? कि हडळ असूनपण घाबरते चेहरा पाहायला?

>>>१९००!!!
आता 1०० उरले फक्त.
Submitted by जावेद_खान on 4 October, 2019 >>>> हे कुठे समजते ... अॅप वर दिसत नाही ना

उमानु यांना अमानवीय २ धागा प्रेमी क्र. १ हा सन्मान देण्यात यावा. नेहमी नवीन काही आले का हे लक्ष ठेवून असतात.
बोकलत यांना अमानवीय २ धाग्याचे शत्रू क्र. १ हा सन्मान देण्यात यावा.
दोन हजार प्रतिसाद झाले की धागा मालक दक्षिणाजी यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात यावे.

धन्यवाद श्रद्धा Happy
@सोमा... प्रत्येक बाबतीत बोललेच पाहिजे असा काही नियम घालून घेतलाय का तुम्ही स्वतः ला.. मला हा धागा फार आवडतं होता त्यामुळे आता धाग्याची पूर्ण वाट लागले तरी सुटत नाही ..म्हणून अधे मध्ये येवून जुने लेखक कोणी लिहितात का हे पाहत राहते..पूर्वी खरेच थरारक अनुभव (ते खरे असो वा नसो थरारक तर होतेच ना) वाचायला छान वाटायचे आता नुसताच फालतूपणा चाललेला असतो..सगळेजूने लेखक कंटाळून गेले धागा सोडून Sad

काही लोकांनी वाट लावली या धाग्याची म्हणून कोणी येत नाही इथे लिहून उपयोग नाही आता. मी पण दोन वेळा लिहून delete केलंय.
फक्त या धाग्यासाठी यायची मी माबो वर सदस्यत्व घ्यायच्या आधीपासून 3 वर्षे.

साधारण चार पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कंपनीच्या कामानिमित्त मी एका दुर्गम भागात गेलो होतो. हॉटेलच्या पत्त्यावर गेलो. हॉटेल चांगलं चार मजली ऐसपैस होतं पण वस्तीपासून लांब होतं. माझी रूम तिसऱ्या मजल्यावर होती. माझ्या रूमच्या बाजूला दोन खोल्या होत्या आणि एक कॉमन पॅसेज होता. तिसऱ्या मजल्यावर बहुतेक मी एकटाच होतो. माझा मुक्काम साधारण चार दिवसांचा असणार होता. संध्याकाळ झाली होती, मी रूमवर बॅग ठेवली आणि फ्रेश होऊन बाहेर जायला निघालो. लिफ्टकडे जाणार इतक्यात मला पाठीमागून कोणीतरी शुक शुक केलं. पाठीमागे वळून पाहिलं तर कोणीच न्हवतं. मी दुर्लक्ष करून पुढे जायला निघणार इतक्यात परत तोच आवाज. आवाज मधल्या बंद खोलीतून आला होता. मी जास्त लक्ष न देता बाहेर पडलो. रात्री परतलो तेव्हा खूप दमलो होतो त्यामुळे लागलीच ताणून दिली. रात्री दरवाजाबाहेर कोणीतरी रांगत असल्याचा भास झाला. सकाळी उठून ऑफिसमध्ये गेलो. संध्याकाळी जरा लवकरच परत आलो. वेळ जावा म्हणून पॅसेजमध्ये फेऱ्या मारत होतो. मधल्या बंद खोलीच्या खिडकीतून कोणीतरी माझ्याकडे लक्ष ठेवून आहे असं वाटत होतं. साधारण पाच मिनिटे झाली असतील, मधल्या खोलीतून अचानक बाईच्या घुमण्याचा आवाज येऊ लागला. त्या मधल्या खोलीत नक्कीच काहीतरी होतं. मी त्या खोलीजवळ गेलो आणि दरवाजा ठोठावला तसा आवाज बंद झाला, पण पुढच्या क्षणात तो आवाज पुन्हा येऊ लागला. आता तो आवाज स्पष्ट आणि मोठा होता. त्या बंद खोलीत जे काही होतं त्याची मी घेतलेली दखल त्याला जाणवली. ते जे काही अभद्र होतं ते जास्तच चेकाळून गेलं. रात्री मी झोपलो होतो तेव्हा सोसाट्याचा वारा सुटला, डोळे उघडले तर खिडकीत एक बाई उभी होती केस मोकळे सोडलेली, तिने तिचा रक्ताळलेला हात खिडकीवर ठेवला आणि दुसरा हात माझ्याकडे माझा गळा दाबायला येत होता, ती गळा दाबणार इतक्यात मी जागा झालो, त्या स्वप्नाने मला दरदरून घाम फुटला होता. मी पाणी प्यायलो आणि बेडवर, झोपायला जाणार इतक्यात मला खिडकीवर खरोखरच रक्ताचा हात उमटलेला दिसला......
(क्रमशः)

बोकलत, या ग्रुपवरच्या लोकांना प्लिज करायला त्यांच्या कळपात सामील झालाच तर.

तुमच्या आधीच्या पोस्ट्सची फॅन होते मी. आता नाही. पण आताच तुमचं फॅन फॉलोईंग जबरदस्त असेल.

बोकलत तुमचे 'लांडगा आल्या रे आला' मधल्या मुलासारखे झाले आहे. तुम्ही आधीच हा धागा इतका बिघडवला आहे की तुमचे सत्य अनुभव (असतील तर) जरी लिहिले तरी ते कोणालाच खरे वाटणार नाहीत.

बोकलत - सगळेच पुड्या सोडतात इथे धाग्यावर पण तुमच्या पुड्या लक्षात येतात. जरा अजून कल्पनाशक्ती वापरा आणि चांगल्या पोस्ट येऊ द्या ... वाचणाऱ्याला वाटू तरी दे खरा अनुभव आहे.

पुड्या जरी सोडत असतील तरी, छातीठोक पणे खऱ्या आहेत अशा विश्वासाने सोडत होते, वाचणारे विश्वासाने, जीव मुठीत धरून वाचल्यासारखे प्रतिसाद देत होते, त्याची मजा यायची.

Pages