अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओये !! Angry क्यु धागा बंद करना? अमानवीय पें अमानवीय, अमानवीय पें अमानवीय ऐसे धागे निकलते रहेंगे और हम हसते और डरते रहेंगे. जिसको बाचना नही हय वो नही बाचेंगे, लेकीन हम इस धागे के लिए लढते आये है और लढते रहेंगे. और तुम कहेते हो के धागा बंद करो ?

माझ्या खऱ्या गोष्टी तुम्हाला खोट्या का वाटतात बरे??? :विचार करणारी बाहुली:
तुमच्यासाठी खास कविता सादर करतो कवितेचं नाव आहे 'दहशत'

बोकलतची दहशत काय असते हे कोणालाही विचारा,
झपाटलेल्या झाडांना विचारा, पछाडलेल्या वाडयांना विचारा.

मध्यरात्री दोन कानाखाली खाणाऱ्या पिंपळावरच्या मुंज्याला विचारा,
स्वतःच्याच चकव्यात गुरफटून गेलेल्या जंगलातल्या चकव्याला विचारा.

'सो जा वरना बोकलत आयेगा' बोलून पोराला झोपवणाऱ्या हडळीला विचारा,
नसता शहाणपणा करून पोकळ बांबूचे फटके खाणाऱ्या वडावरच्या वेताळाला विचारा.

उलटे पाय सरळ झाल्याने घाबरून गेलेल्या जखीणीला विचारा,
विनाकारण छेड काढल्याने घरी पाणी भरायला लागलेल्या खविसाला विचारा.

बोकलतची दहशत काय असते हे कोणालाही विचारा,
पछाडलेल्या विहिरींना विचारा, जमलंच तर झपाटलेल्या माळरानांनाही विचारा.

मी बोकलत बोकलत
बोकलत भुतांचा राजा
बसतो पिंपळावर
सगळी भुतं माझी प्रजा
अमानवीय धागा पछाडला
दुरुन बघतोय मजा
>> असं काही तरी गाणं लिवा बरं

जय देव जय देव जय देवा बोकलत
भूत प्रेत मुंजा सगळ्यांना ठोकलत, जय देव जय देव

अमावस्येच्या रात्री भूत गण येति
माळावरून जाणाऱ्या जनांसी छळती
दीन दुर्बलांचे रक्षण तू करिसी
बोकलत यांचा महिमा वर्णावा किती जय देव जय देव

@व्यत्यय>>> Lol
सार्वपित्री जवळ आली आहे त्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना माझ्या रंजक आणि साहसी गोष्टी सांगणार आहे.

हे भुतनाथा बोकलता ह्या धाग्याला सोडण्याचे काय घेशील. हा धागा तूला इतका का आवडला याचं कारण कळू दे. धागाप्रेमींना तुझी फार दहशत बसली आहे. धागा उघडायला सुध्दा घाबरतात बिचारे.

माझी मुलगी ( वय- ३वर्षे) ४ दिवसांपूर्वी आजारी होती. म्हणजे नुसताच ताप भरत होता ६-७ तासांनी. बाकी काहीच लक्षणं नव्हती. त्यामुळे तापाचं औषध सोडून बाकी काही चालू केलं नाही. २ दिवसांत बरी झाली ती.

पण त्या २ दिवसात ती फ्रॉक घालायचाच हट्ट करत होती. तिला घरी घालण्यासाठी म्हणून नुकतेच नवीन टी-शर्ट आणले होते आणि ते ती खूप आवडीने घालते. पण २ दिवस ते टी-शर्ट नकोच होते तिला. गळ्यात सतत माळ घालून ठेवली होती. काढूनच देत नव्हती.
तापाच्या दुसऱ्या दिवशी, आम्ही दोघीच हॉलमध्ये होतो. दार उघडंच होतं. दुपारी ३-४ ची वेळ. तिला तहान लागली म्हणून मी तिला सोफ्यावर बसवून पाणी आणायला आत गेले. त्या २ मिनिटात ती जोरात रडायला लागली. मी जाऊन लगेच विचारलं तिला काय झालं? तर समोरच्या भिंतीकडे बोट दाखवून "ती", "ती", असं म्हणून रडत होती. बाकी काही सांगत नव्हती. मी फार प्रश्न न विचारता शांत केलं तिला. थोड्यावेळाने लक्षात आलं की तिने तेव्हा सोफ्यावर सू देखील केली होती. तिचे कपडे बदलताना मी परत आधीचा विषय काढला. पण ती काहीच नाही बोलली.

परवापासून ताप नाहीये. आणि ती एकदम व्यवस्थित आहे. तशी आजारी असतानाही, या दोन गोष्टी सोडून बाकी सगळं नॉर्मल होतं. आता फ्रॉकचा हट्ट नाहीये.

त्या २ दिवसात, मात्र गडबडले होते मी. अशा गोष्टींंवर अजिबात विश्वास नाही माझा. कदाचित योगायोगही असेल. म्हणून घरी कोणालाही काही बोलले नाही. नाहीतर, साबांनी नक्कीच त्यांच्या डॉक्टरला बोलवून अंगारा घेतला असता.

हा धागा अमावास्या असल्याने वर आलाय, म्हणून टाकली इथे शंका........ ते नक्की काय होतं?

या दिवसात आपले पूर्वज आपल्याला भेटायला येतात असं ऐकून आहे. तसं कोणीतरी आलं असेल. सार्वपित्रीची गोष्ट आहे, मी त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो, प्रॅक्टिकल लिहिता लिहिता रात्रीचे दीड दोन वाजले असतील, मी खिडकीजवळ बसलो होतो. खिडकीला मच्छर आत येऊ नयेत म्हणून जाळी बसवली होती त्यामुळे बाहेरच काही दिसत न्हवतं. लिहिता लिहिता अचानक खिडकीबाहेर कोणाच्यातरी श्वासोच्छ्वासाचा आवाज येऊ लागला. आवाज चांगलाच मोठा होता, कोणीतरी खिडकीतून आपल्याकडे पाहतय असं वाटत होतं. बाकीचे सगळे झोपले होते. बाहेर कोणी आहे का हे पाहण्यासाठी मी लाईट घालवला तसा आवाज यायचा बंद झाला. बाहेर कोणी दिसत न्हवतं. लाईट लावला तर पुन्हा तोच आवाज सुरू झाला. मी मग लाईट घालवला आणि झोपायला गेलो, सकाळी घरी आजीला सांगितलं तर बोलली असेल कोणीतरी पूर्वज, या काळात येतात आपल्याला भेटायला

नमस्कार
मी मालवणकर
अनेक वर्षे तुमचा हा धागा वाचतोय
खूपदा लिहावेसे पण वाटते पण वेळ नसायचा
आज पाहू किती जमते ते
आम्ही पूर्वी वरळी मधील बी डी डी चाळीत रहायचो
तिथे लहानपणा पासून भूतांचे खूप किस्से ऐकलेत
जसे आठवतील तसे पाठवीन इथे
हा किस्सा माझ्या आजोबांकडून ऐकला आहे खूप वेळा
खरा खोटा तुम्ही ठरवा
त्या चाळीमध्ये एका मजल्यावर 20 बिऱ्हाडे राहतात आणि तसर्व गिरणी कामगारांची वस्ती असल्यामुळे लवकर झोपणे आणि पाण्यासाठी लवकर उठणे हा प्रकार असायचाच
एके रात्री मजल्यावर अचानक जोरदार आरडाओरडा झाल्यामुळे सर्वजण बाहेर आले आणि पाहतात तर लाड नावाचे गृहस्थ हातामध्ये चप्पल घेऊन कुणालातरी मारहाण करत होते पण समोर कोणीच नव्हते त्यांच्या.
पण सर्वात अजब गोष्ट म्हणजे जसे त्यांच्या हातून फटके पडत होते तसे एका बाईच्या रडण्याचा विव्हळत असल्याचा आवाज येत होता
हा असला प्रकार पाहून खूप बायका घाबरून घरी पळाल्या नसती आफत नको म्हणून आणि काही धीट पुरुष मंडळी लाड काकांच्या बाजूला उभे राहून त्यांना आवरत राहिली.
काका कोणाचेही न ऐकता चप्पल ने मारहाण चालू ठेवली आणि आपण एखाद्याला पळवून मारतो तसे पळत पळत मारत गेले थेट महिलांच्या टॉयलेट मध्ये. भरमसाठ घाणेरड्या शिव्या देत राहिले आणि काही वेळाने बाहेर येऊन सर्वाना जाण्यास सांगितले पण कोण ऐकतायत त्यांचे??
सर्वाना जागेवर स्पष्टीकरण हवे असते असल्या घटनांचे
तेव्हा शेवटी लाडकाका बोलले की "जखीण होती ती.
2 रात्री मी घराबाहेर झोपलो असताना येऊन माझी चादर ओढायची आज तिचा निकाल लावायचाच असे ठरवून मी कोल्हापुरी चप्पल उशाशी घेऊन झोपलो खोलीबाहेर.
जशी तिने माझी चादर ओढली तसे फटके देने चालू केले मी आणि तिच्या किंकाळ्या ऐकून तुम्ही सर्व बाहेर आलात"
या घटने नंतर चाळींमधील बायकाच काय
पुरुष मंडळी सुद्धा एकट्याने रात्रीचे शौचालयात जाणे टाळू लागली काही आठवडे.

साधारण 2010-11 सालची गोष्ट असेल. नोकरीनिमित्त मी पुण्याला होतो तेव्हा एक लॅपटॉप घ्यायचं ठरवलं. रविवारी डेक्कनला गेलो. मार्केटमध्ये फिरत असताना एक लॅपटॉप दुकानात गेलो. ते दुकान जरा विचित्र वाटत होतं, गेल्या गेल्या एकदम अस्वस्थ वाटायला लागलं, बाहेरच्या जगाशी जणू काही संबंधच न्हवता त्या दुकानाचा. माणसं पण विचित्र होती, त्यांची नजर बोलणं वैगरे गूढ होतं. मी लॅपटॉप घेतला आणि बाहेर आलो तसं बरं वाटलं. रूमवर आलो विचित्र घटनांना सुरवात झाली, रात्री अपरात्री लॅपटॉप अचानक चालू व्हायचा. गाणी व्हिडिओ लागायचे. रूमेंट्स सुरू ठेऊन जात असतील म्हणून सुरवातीला दुर्लक्ष केलं पण नन्तर प्रकार खूपच वाढला. रुममेट्स बोलायला लागले लॅपटॉप झपाटलेला आहे अचानक चालू होतो. एकदा रात्री उशिरा रूमवर आलो, लॉक उघडला तर चक्क एक बाई मोकळे केस सोडून लॅपटॉपवर गाणी ऐकत होती, मी पुढे जाऊन बघणार तोच हवेत विरून गेली. दुसऱ्या दिवशी मी परत लॅपटॉप घेऊन त्या दुकानात गेलो तर ते बंद होतं. आजूबाजूला चौकशी केली तर समजलं की ते दुकान 1 वर्षांपासून तसंच बंद आहे, हे ऐकून मी चक्रावून गेलो. तो लॅपटॉप मी लकडी पुलावरुन नदीत फेकला तेव्हा कुठे सगळा त्रास बंद झाला.

आम्हाला असा लॅपटॉप मिळाला असता तर आम्ही फेकून न देता सरळ क्विकहिल एंटीवायरस सोबत बोकलत एंटीभूतरस सॉफ्टवेअर्स घालून त्याच लॅपटॉपवरुन मायबोली लॉगिन करत हां धागा वाचत बसलो असतो.

इम्रान खान ची तिसरी बायको हडळ आहे, तिचं प्रतिबिंब आरशात दिसत नाही अशा वावड्या पाकिस्तान मध्ये उठत आहेत.

Pages