बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मग आता वीणा-रुपाली कॅप्टनशिप करता पहले आप, पहले आप करत रहाणार काय?..>>>>>असं केळ्या आणि वैशाली एकमेकांशी समोर आले पाहिजे होते

वेस्टर्न ड्रेसवर टिकली लावू नये किंवा झुमके घालू नये असं काही नाहीये.
मी अनेक मुली असं करताना पाहिल्या आहेत आणि त्या फार छान दिसतात सुद्धा.
वीणा मला आवडली अशा वेशभूषेत. तिला शोभतं ते असं माझं मत.
वेस्टर्न ड्रेसवर भारतीय टिकली, कानातले मुळीच चालत नाहीत असा काल्पनिक अपसमज नको.
वीणा निळ्या पांढऱ्या सलवार कुर्तामध्ये फार सुंदर दिसत होती.

मला बरेचदा वीणा नजरेला सुंदर दिसते, त्यामुळे बाकी फार विचार मी करत नाही. कधी कधी नाही दिसत चांगली पण हे कमी वेळा होतं.

ती विचित्र तोंड, हातवारे करते तेव्हाही नाही आवडत, पण गोड हासते तेव्हा आवडते. वीणा बाबत 50 -50 आहे माझं.

यावेळी शिव जास्त आवडतोय आणि माधव आवडायला लागलाय.

मग आता वीणा-रुपाली कॅप्टनशिप करता पहले आप, पहले आप करत रहाणार काय?..>>>नाही होणार असं... काही bonding वगैरे नाहिये दोघींमधे... बर्‍यापैकी स्वार्थी आहेत दोघी पण. ..

हो, ते अति हातवारे करणं आणि इतरांचं फारसं ऐकून न घेणं कमी केलं पाहिजे वीणाने. बाकी तिचं दिसणं, हसणं छान आहे.

पण मेकअप काढल्यानंतर सगळ्या किती खराब दिसतात.
हीना कुपोषित वाटते. गाल आत गेलेले आणि हातही बारीक दिसतात. जरा अधिक खाल्लं पाहिजे तिने.

सॉरी टू से हिना चेहेऱ्याने खप्पड वाटते, तिचे दात आणि ओठ विचित्र आहेत पण तिची पर्सनॅलिटी छान आहे. मला असं body shaming करायचं नव्हतं त्यासाठी सॉरी.

वीणा त्या राधा मध्ये कधी कधी आवडायची, कधी नाही, सेम आत्तासारखं, तिचे हास्य कधी कधी कृत्रिम वाटायचं, इथे वाटत नाही. तिची हनुवटीखालची जखम बरेचदा दिसायची, तेव्हा फार विचित्र दिसायची. इथे फारशी ती दिसत नाही. अर्थात मी सिरीयल फार नव्हती बघितली, अति व्हिलनीशपणा होता.

हिनाला पहिल्यापासून आणायला हवं होतं, ती चांगली खेळाडू वाटते.

हीना नसेल छान दिसत ,आहे ती अति स्लिम पण वीणा तर कुठल्याच angle ने छान नाही दिसत आणि 90% तरी कृत्रिम वाटत तिचा ते cuteness दाखवणं म nd ol

Guest म्हणून at least मेघाला तरी आणायला हवं होतं.. शिवानीला आणल्यामुळे bigg boss लाच self respect नाहिये हे सिद्ध झालं...आणि थोडंफार show scripted आहे असंही वाटतंय.. पण जर scripted असेल तर किशोरी सारखे image conscious(in a good sense) लोकं आलेच नसते

मला वीणा राधा प्रेम रंगी रंगली च्या टायटल सॉन्ग मध्ये आवडली होती. पण प्रत्यक्षात सेरीयल मद्ये नाही इतकी चांगली वाटली. बिग्ग बॉस मध्ये ही कधी कधी छान दिसते कधीतरी नाही.
वेस्टर्न ड्रेस वर पण ज़ुमके किन्वा इंडियन accessories घालू शकतो . पण योग्या रितिने styling करायला हव. विणा चे styling मला नाही आवडत. आणी मेकअप ही. वेस्टर्न ड्रेस वर टिकली लावलेली मला नाही आवडत.

विणाला झाप झाप झापले, गरज होतीच याची, बरं झालं. शिवला पण झापले, तेही बरं केलं.

पण टास्क बाबत वीणाला बोलले ते चूक होतं. अतिशय worst task शिव परागच्या वेळी केलेल्यांना पण नव्हते बोलले एवढे.

वेस्टर्न ड्रेसवर टिकली लावू नये किंवा झुमके घालू नये असं काही नाहीये.
मी अनेक मुली असं करताना पाहिल्या आहेत आणि त्या फार छान दिसतात सुद्धा.
वीणा मला आवडली अशा वेशभूषेत. तिला शोभतं ते असं माझं मत.
वेस्टर्न ड्रेसवर भारतीय टिकली, कानातले मुळीच चालत नाहीत असा काल्पनिक अपसमज नको.
वीणा निळ्या पांढऱ्या सलवार कुर्तामध्ये फार सुंदर दिसत होती.

<<
Biggrin

हीना कुपोषित वाटते. गाल आत गेलेले आणि हातही बारीक दिसतात. जरा अधिक खाल्लं पाहिजे तिने.
<<
प्रत्येक मुलीनी गुबगुबीत,खातेपिते घरकी, वाढत्या अंगाचं दिसलच पाहिजे असं नाही, राहु देत तिला अ‍ॅथलेटीक Wink

वैशालीला पण झापले रुपालीला worst बोलली त्यासाठी आणि हिनाला झापले नाही पण केळकरला वाटेल ते बोलली त्याबद्दल सुनावलं.

भाखरी प्रकरणात हिनाच्या बाजूने म मां नी वीणा आणि सर्वांना सुनावलं, ते मस्त केलं पण मेन रुपालीला जितकं बोलायला हवं तितके नाही बोलले.

तिला नाही द्यायचं ही कोणाची इच्छा होती तर प्रामाणिकपणे एकट्या वीणाने हात वर केला, बाकी कोणी नाही.

Btw आमच्या शेजारच्या भाभी रात्री घट्ट कणिक भिजवून , जाडसर भाखरी करून ठेवायच्या आणि सकाळी चहाबरोबर खायचे सगळे, त्यामुळे ते हिना म्हणाली ते बरोबर होतं की सकाळी चहाबरोबर भाखरी खाते ते.

मांजरेकर इथे लिहिलेलंच सगळं बोलताहेत.
वैशालीचं फोन टास्क, तिचं तुसडं सॉरी, सगळंच.
अंजू, तुमची इच्छा पूर्ण झाली. - वीणा शिव.

भरत Lol

हो आपल्या सर्व मायबोलीकरांचे योगदान आहे, हेच पॉइंटस वाचून मोबाईलमध्ये लिहीत असतील.

शिवानी जे जे बोलेल, सांगेल ते bb ने सांगितलेलं असणार.

तो आगाऊपणा करून स्वतःच त्या खोलीत थोडा वेळ बंद झाला.
त्याची शिक्षा म्हणून त्याला परत तिथे टाकलं.
---
मांजरेकरांनी मग clarify केलं की मला कोणी feedback देत नाही, सगळे पॉइंट्स मी क ढतो
माबोकर क्रेडिट्स नाही मागणार हो. Lol

आता तर वीणा,शिव,वैशाली नक्कीच शेवटपर्यंत जाणार,जिंकणार नाहीत,पण जो काही राडा हवाय थोडाफार बिबॉसला तो यांच्याशिवाय उरलेल्या लोकांत द्यायची धमक नाही.
शिवानी मात्र उगाच आली अस वाटत आहे.कारण बिबॉसने तुम्हाला सदस्यत्व मिळणार नाही अस सांगितल्यावर तिचा चेहरा खरच रडवेला झाला होता.कशासाठी एवढा अट्टाहास.?

@ दीपांजली
हीनाने लठ्ठ जाड व्हावे असे नाही म्हटले. तर किमान मध्यम फिगर तरी हवी, घाडगे आणि सून मधल्या कियारासारखी. तीसुद्धा ॲथलेटिकच दिसते.
झिरो साईज हाडकुळे असणे म्हणजे ॲथलेटिक नव्हे.
आणि जीन्स व टॉप वर बारीक टिकली लावून, कानात रिंगा वगैरे घालून कॉलेजमध्ये, ऑफिसला जाणाऱ्या अनेक तरुणी दररोज पाहिल्या जातात. चटपटीत दिसतात. असो.

शिवानीला बॉस पूर्वीसारखं बेपर्वा वागू देणार नाही. तसा इशारा दिलाच असेल. शिवानीला आणण्याची गरज नव्हती. ती पुन्हा tantrums फेकणार नाही याची काय गॅरंटी? दुसरे कोणी गेस्ट मिळाले नाही हर्षदासारखे त्यांना.

भरत Lol

जिंकेल नेहाच, असं वाटतंय आजच्यावरून.

आज किशोरीताई छान दिसत होत्या, फक्त मेकअप नाही आवडला, वीणा आणि नेहा सर्वात worst. जाऊदे विकेंड डाव म्हटला की स्मिता आठवते आणि एरवीही, तिची सर नाही कोणाला .

नेहा आणि वीणाचं चांगलं जमतं म्हणून म मां म्हणाले नेहाने मागितली असती तर लगेच दिली असती.

माधव नेहाला पण बोलले ते हिनाची बाजू नाही घेतली म्हणून. माधव नीट बोलत नाही यावर पण कमेंट केली.

Excuse me, हिना खान अजिबात हडकुळी वगैरे नाही छान maintaned आहे तिची फिगर मॉडेलिंग ला suitable.

अरे हो की, thank u चरप्स. मोबाईलवर नाव नीट लिहिता येत नाहीये, सॉरी.

करते एडिट. हिना खानबद्दल त्यांनी लिहिलंय ते पण बरोबर आहे.

Pages