बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मी काल फा फॉ करत पाहिलं त्यामुळे नीटसं कळलं नाही पण वीणा आणि शीव काय बोलत होते ?!
शीव काहीतरी म्हणाला , आता तू काय सांगणार आई ला ?
वीणा : तसं ती कूल आहे पण माहित नाही काय वाटेल तिला , मी सांगेन पण .. कि आहे माझं /आमचं etc
म्हणजे खरंच हे प्रेमात पडलेत कि काय ?!
वीकएंड ला केळकर चा पोपट झालेला बघायला मला पण आवडेल Proud
कालच्या गेम मध्ये वैशाली नाही जाऊ शकली ना भुतांच्या सेफ झोन मध्ये ..
तो सारखं म्हणत होता उद्या नेहाला अजिबात सांगायचं नाही कुठे लपवलीये भावली etc ..
आज नेहाची भावली एकदम उंचावर लपवणारेत .. ती काठी ने काढतेय असं दाखवलं .. बिचारी

पण वीणाचा टोन असतो ना तो खटकतो. शांतपणे सांगता बोलता येतं. तिने नीट सांगायचं आणि समोरच्याचे पहिले ऐकून घ्यायचं. वीणा ऐकत नाही कोणाचे शिव सोडून, बाकी ऐकवत मात्र असते.
@अन्जू.....।अगदी बरोबर आहे.तिची च 2तास शाळा घेतली पाहिजे.
पण इथे प्रॉब्लेम असा झाला की आता सोमिवर जी काही चर्चा आहे त्याचे कर्ते करविते वीणा,वैशाली,केळकर आहेत,आता यांनाच जर गप्प केल तर उरलेल्या कुठल्या कंटेस्टंट मध्ये कंटेंट देण्याची ताकद आहे नेहा कंप्लिटली बँकफूटवर गेली आहे.मग त्यासाठी शिवानी आणि परागलाच बोलवाव लागेल.
ममां नी वीणाला झापायला हवच आहे,पण तिला एकदम गप्प नाही करणार,त्याऐवजी किशोरीलाच काढतील बिबॉस.
त्यामुळे बिबॉस हे चालवून देत असतील

कणकिचे गुलाबजाम इतके ओढुन ताणून करायची काय गरज होती त्या एवजी दुध साखरेचे मिक्स करायचे.
ज्यानी कुणी ते गुलाबजाम खाल्ले ते खरोखर धन्य.

कणकेचे फुलके कि भाकरी कि कणकेचा शिरा कि पांचट कणकेचे रसगुल्ले बघताना पहिला अर्धा तास मलाही फक्तं कणकेची भाकरी ? तेल घालून ?तीही चहाबरोबर Uhoh वगैरे अचाट आणि अतर्क्य प्रश्नं पडले.
नंतर कळलं भाकरी नाही ‘भाखरी’ म्हणजे गुज्जु पादार्थ, कणकेची ढोली स्लो रोस्टेड पोळी असे समजलं युटूबवर पाहून Proud
बाकी ना हिनाला भाखरी ना वीणाला शिरा पण या सगळ्या घोळात किशोरीला मात्रं पॉझिटिव फुटेज आणि वाढते फॅन फॉलॉइंग मिळाले.
वेस्टर्न कपड्यावर कुंकु लाऊन , झुमके घालून विचित्रं मेकप करणार्या टपरट वीणाला मात्रं हेट्रेड !

गोड करण्यापेक्षा भाकरी करायला हिना ला पिठ मोठ्या मनाने दिले असते तर दान कारण्याचे पुण्य लागले असते. वाढदिवसाला आपण दान पण करु शकतो. लोकाना खाऊ घालू शकतो.फक्त गोड करने impotant नसते.

‘भाखरी’ म्हणजे गुज्जु पादार्थ, कणकेची ढोली स्लो रोस्टेड पोळी >>> हो अशीच करतात, जाडी. मला ऐकून माहितेय म्हणून मी लिहिलं की भाखरी असेल.

वीणाला मात्रं हेट्रेड ! >>> ती त्यातही खुश होईल, माझ्याबाबत चर्चा तर होते म्हणेल. असच म्हणते ना ती. निर्लज्जम सदा सुखी.

अर्थात bb ना वाटलं अति होतंय तर म मां ना तिची शाळा घ्यायला लावतील.

हो नेहाचे मराठी बऱ्यापैकी चांगले आहे.... तिलाच बऱ्याच वेळा टास्क आणि महत्वाच्या सूचना वाचायला देतात!

काल केळ्या अगदीच पार्शल वागला.... जर घरात शिधा कमी आहे तर वीणाच्या आईच्या वाढदिवसानिमित्त वेगळा पदार्थ का बनला? नेहमीची नेहा असती तर लै भांडली असती या मुद्द्याला घेऊन!
वीणा मारे अगदी प्रश्न तत्वांचा आणि चुकीचे पायंडे पाडण्याचा आहे म्हणत होती तर ते गुलाबजाम कसे चालले.... भले त्याला अगदीच कमी कणीक आणि दोन थेंब तेल का लागेना? प्रश्न adjustment चा आहे ना? मग तिने का नाही केली adjustment?
या सगळ्यात रुपाली शिव्या खाणार आहे वीकेंडला! हीना ने सांगितलेले ती सोयीस्कर विसरली हे एक आणि त्याउपर ते गुलाबजाम केले हे दुसरे!

केळ्याची पात्रता नाहीये कॅप्टन व्हायची..... जरा काही विचारले की "घ्या मिटींग"..... अरे तुझ्यात नाहीये का निर्णयक्षमता? मग कशाला झालास तू कॅप्ट्न?
त्याला कुठलाही ब्लेम अंगावर घ्यायचा नाहीये.... तो जेंव्हा सगळ्यांच्या वतीने हीनाला निर्णय सांगत होता तेंव्हा नेहा त्याला म्हणाली सुद्धा की आमच्या वतीने नको..... तुला कॅप्टन म्हणून काय द्यायचा तो निर्णय दे!

केळ्याची पात्रता नाहीये कॅप्टन व्हायची..... जरा काही विचारले की "घ्या मिटींग" >>> Lol हे मस्त आहे.

हो नेहाचे मराठी बऱ्यापैकी चांगले आहे.... तिलाच बऱ्याच वेळा टास्क आणि महत्वाच्या सूचना वाचायला देतात! >>> चांगलं आहे तिचे मराठी.

वेस्टर्न कपड्यावर कुंकु लाऊन , झुमके घालून विचित्रं मेकप करणार्या टपरट वीणाला मात्रं हेट्रेड ! >>> जंप सूट वर कुंकू कोण लावते. आणी साइड वेणी इतके विचित्र दिसत होते.

केळ्याची पात्रता नाहीये कॅप्टन व्हायची..... जरा काही विचारले की "घ्या मिटींग" >> Lol कारण तो "सर्वसमावेश / सर्वसमावेशकता" यावर अडून बसलेला असतो कायम .. म्हणून सगळयांना विचारून निर्णय Wink
रुपाली बोलत असते तेव्हा तिचा कसला आवाज असतो .. एखादा मुद्दा पटवून देताना .. डोक्यात जाते माझ्या ती बऱ्याचदा .. काल वीणा आणि रुपाली मिळून किशोरी ला किती बोलत होत्या .. बिचारी वाटली मला किशोरी तेव्हा

जंप सूट वर कुंकू कोण लावते. आणी साइड वेणी इतके विचित्र दिसत होते. >>> काल नाही आवडली पण आदरवाईज आवडते मला ती.

मेकअप मला काल वाटला विचित्र, एरवी नाही वाटत याउलट मला हीना आणि रुपाली अति डार्क लिपस्टिक लावतात आणि दोघींच्या कधी कधी ती ओठाबाहेरही आलेली असते ते प्रचंड खटकते.

>>रुपाली बोलत असते तेव्हा तिचा कसला आवाज असतो

तिची अजुन एक लकब म्हणजे ती एखाद्या शब्दातले एखादे अक्षर अगदी जोर देवून लांबवते!

किशोरी ताईं चा मुद्दा बरोबर होता एक वाटी च पिठ उरलेले त्याच्यात बाकी च्यांचे काहीच होणार नव्हते. तर हिना ला त्याच्यात भाकरी करु द्या आणी वीणा लाही कणकेचा शीरा करु दयाला त्याना प्रॉब्लम नव्हता.
पण त्यांचे बोलने कुणी समजून घेतले नाही.
कणकेचा शीरा बिना तुपाचा वेलची चा कसा करनार होते.
फक्त नावपुरते एखादी गोष्ट बनवण्यात काय अर्थ आहे . त्यापेक्षा जे त्या पिठाचे नीट बनू शकते अशाच गोष्टी बनवण्या साठी त्याचा वापर करावा.जसे की चपाती फुलके भाकरी.
नावापुरते गुलाबजाम शिरा कशाला करायचा.
कणकेचे गुलाबजाम बनवून उगीच आपण काहीतरी वेगळेकरु शकतो असे रुपालिला दाखवयाचे होते.

https://www.youtube.com/watch?v=tHk4t0rMmIE

शिवानी सुर्वे येतेय वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून. नेहाला सपोर्ट म्हणून आणणार असतील . पण दुसरं कोणी मिळालं नाहीका. ती तरी कशी येतेय, लिगल काही धमकी दिली असेल म्हणून का.

हिना ने मुद्दाम भाखरी (का भाकरी) चा मुद्दा ताणुन धरला आणि मस्त फुटेज मिळवलं. ( बाकी मी नेट वर जाउन नक्की ही भाकरी कशी करतात बघुन घेतलं Happy Happy Happy
पण वीणा च्या शिर्या पेक्षा हिना ला भाकरी करु देणं केव्हापण योग्य होतं. आणि तेल वापरुन शिरा कसं बनवणार ?
आणि त्या घरात नसलेल्या व्यक्ती साठी शिरा बनवण्यात काय पॉईंट ?
(बाकी काल ते "कढा प्रशाद" असा शब्द का बर म्युट करत होते ? त्यामुळे कोणाच्या भावना दुखावणार आहेत आता ?)
हिना ने अडवुन धरलं ते पटलं मला. का प्रत्येक वेळी वीणा न रुपाली ला घाबरायचं. त्यात नेहा सध्या घाबरुन असल्याने शांत आहे नाहितर तिने पण वीणा च्या विरुद्ध आवाज उठवला असता. बरेच दिवसानी काल भाकरी मुळे टाइमपास झाला पण Happy
केळ्या कॅप्टन म्हणुन एकदम फेल.
कालचा टास्क जरा हाथापाई चा असुनही लोक नीट खेळले. पराग च्या वेळच्या टास्क मुळे घाबरलेले दिसले.आज काय होतं बघु.
शिवानी ला नेहा चं मॉरल वाढवण्यासाठी पाठवत असतील कींवा टीआर्पी सावरण्यासाठी. पण आता बाहेरुन सगळं बघुन परत त्या घरात जाणं योग्य नाहिये तिने.
एकुण बिबॉ ला कोणीच मिळेना या वेळी असं दिसतय.
पुढचा बिबॉ मराठी सिझन होतो का नाही असं राहिलं तर.

शिवानी येणार, पराग येणार असे बरेच व्हिडिओ येत आहेत बरेच दिवसापासून त्यामुळे काही खात्री वाटत नाही आता. पुन्हा पराग किंवा शिवानीला आणणे डझण्ट मेक सेन्स असे माझे मत.
काल मूर्खपणा चालू होता सगळा. उरलेल्या वाटीभर पिठाचे काय करावे यावर २ -२ गोलमेज परिषदा घेण्याइतके काय होते. पिक युअर बॅटल्स. तसेही कणकेचे गोळे तेलात परतून पाण्यात टाकले होते गुलाबजामच्या नावाखाली!! आगागा!! Uhoh
वीणा भयाण दिसत होती खरंच. काय ते लाल आयशॅडोज, कॅज्युअल कपड्यांवर डार्क इव्हिनिंग आय मेकप, टिकली, झुमके!!
तिने आता पुढचा डाव खेळला आहे किंवा ती म्हणते ते खरे असेल तर खड्ड्यात एक पाऊल पुढे टाकले आहे - शिव मला खरोखरच आवडू लागला आहे , आई काय म्हणेल, बहीण समजून घेईल वगैरे.
भुताच्या खेळात किशोरीला संचालक केल्यामुळे तीच नेक्स्ट एलिमिनेट होणार असे वाटू लागले आहे. या आठवड्यात लाइन्स बंद असल्या तरी पुढच्या आठवड्यात तिचा नंबर लागू शकतो. सुपु ला पण असंच संचालक करत होते शेवटी.

अरररर खरच यार, काय शीळ्या कढीला उत आणताएत? एकदा बाहेर गेलेल्या लोकांना परत आणून काय साध्य होणार? पण तरी मला असं गट फिलींग आहे की नाही आणणार अशा बाहेर गेलेल्या लोकांना परत. शिवानी, पराग . नाही येणार , रादर त्यांना नाही आणनार.

घरातील सगळ्या व्यक्तींनसाठी विना आणि शिवच कस आहेना विना झोपली की शिव घालतो वारा मग हिनाचा चढतो पारा रूपाली म्हणते परागच होता बरा नेहाच्या डोळ्यात पाण्याच्या धारा माधव खेळतो बरा हाच अभिजितचा प्रोब्लेम खरा किशोरीला नाही कोणाचा सहारा वैशाली घालते पसारा असा आहे सगळ्यांचा नारा विकेंडच्या दिवशी वाजतात मग सगळ्यांचे बारा (what's up c/p )

या वेळेस बिबॉ खरच फसल आहे. कोणीच खेळ नीट समजून घेत नाही. बजरच्या आधिच खेळाला सुरूवात करतात. यात खर तर नियम मोडला म्हणून बिबॉनेच त्या संघातील खेळाडू कॅप्टन्साठी उभा राहू नये असे घोषित करावे. म्हणजे पुढच्यावेळी अशी चुक कोणी करणार नाही.
शिरा, भाकरी हे सगळ फक्त सगळ्यांना घरात थांबवण्यासाठी होत. कारण बाहेर सेट उभा करायचा होता. पण खाण्यावरून जरा जास्तच भांडण करतायत हे लोक.
तसेच शिवचे कपडे खरच बिबॉ पुरवत असणार कारण गेम कुठतरी हरवत चाललय. निदान शिव विणा मुळे कही जण बघतील असे त्यांना वाटत असणार. ह्या सगळ्यांची खेळातील खरी ताकद बघायची असेल तर प्रत्येकाला स्वताहला खेळायला द्यायला हवे. मग कळेल कोणात किती ताकद आहे ते. उदा.. गार्डन एरियात सिसॉ सारखा हालणारा एक लाकडी ओंडका उभा करायचा, त्यावर खेळाडू उभा राहणार आणि त्याचे दोन्ही हात वर एक आडवा बांबू टाकून त्यात दोरीत आडकवून ठेवायचे. खेळाडूने आपला तोल सांभाळत त्यावर उभे रहायचे.यात वेळेचे बंधन नाही. जे दोन खेळाडू शेवटर्यन्त उभे राहतील ते कॅप्ट्न पदासाठी योग्य. मग त्यांच्यात परत लढत.
तसेच अजून खेळ म्हणजे ट्रकचा मोठा टायर तो ओढुन एका ठराविक अंतरापर्यन्त आणायचा ठराविक वेळेत. जे करतील ते नॉमिनेशनपासून वाचतील.
अजुन एक खेळ जो विणा आणी वैशालीत व्हावा असे मला वाटते, तो म्हणजे... पझल सोडवणे. एक मोठ समान चित्र पझलचे तुकडे वापरून पुर्ण करायच. यात दोघींचे पझलचे तुकडे एकत्र करून ठेवायचे. ठराविक वेळेत हे चित्र पुर्ण करायच.

घरातील सगळ्या व्यक्तींनसाठी विना आणि शिवच कस आहेना विना झोपली की शिव घालतो वारा मग हिनाचा चढतो पारा रूपाली म्हणते परागच होता बरा नेहाच्या डोळ्यात पाण्याच्या धारा माधव खेळतो बरा हाच अभिजितचा प्रोब्लेम खरा किशोरीला नाही कोणाचा सहारा वैशाली घालते पसारा असा आहे सगळ्यांचा नारा विकेंडच्या दिवशी वाजतात मग सगळ्यांचे बारा
जाम भारी लिहलय. एकच नंबर.

घरातील सगळ्या व्यक्तींनसाठी विना आणि शिवच कस आहेना विना झोपली की शिव घालतो वारा मग हिनाचा चढतो पारा रूपाली म्हणते परागच होता बरा नेहाच्या डोळ्यात पाण्याच्या धारा माधव खेळतो बरा हाच अभिजितचा प्रोब्लेम खरा किशोरीला नाही कोणाचा सहारा वैशाली घालते पसारा असा आहे सगळ्यांचा नारा विकेंडच्या दिवशी वाजतात मग सगळ्यांचे बारा (what's up c/p )
टाळ्या वाजवणारी बाहुली असेल तर ती .मस्त.भारी
पण खरच, भांडण झाल्यानंतर लगेच रेशन आल,भांडण लावण्यात आणि लोकांना बघायला लावण्यात बिबॉसलि काय आनंद मिळतो?
@धनुडी....मलाही अस वाटत आहे की नाही आणणार आणि समजा शिवानीला आणल तरी परागसा.रखी माफी मागायला आणतील बिबॉसची.

नेहा छान बोलते मराठी.. >>>>>>>>>> ++++++++१११११११११

वोटिंग लाईन्स बंद ठेवण्यामागच कारण अजूनही कळलेल नाही. >>>>>>>>> वाईल्ड कार्डस येणार असतील विक एण्डला.

निर्झरा, तुम्ही दिलेले टास्कस मस्त! असे टास्क व्ह्ययला हवेत बिबॉमध्ये

घरातील सगळ्या व्यक्तींनसाठी विना आणि शिवच कस आहेना विना झोपली की शिव घालतो वारा मग हिनाचा चढतो पारा रूपाली म्हणते परागच होता बरा नेहाच्या डोळ्यात पाण्याच्या धारा माधव खेळतो बरा हाच अभिजितचा प्रोब्लेम खरा किशोरीला नाही कोणाचा सहारा वैशाली घालते पसारा असा आहे सगळ्यांचा नारा विकेंडच्या दिवशी वाजतात मग सगळ्यांचे बारा (what's up c/p )
टाळ्या वाजवणारी बाहुली असेल तर ती .मस्त.भारी >>>>>>>>>>> अगदी अगदी

कालच्या मॉर्निन्ग सॉन्गचा ( हि दुनिया माया जाल) आणि टास्कचा सम्बन्ध काय होता तेच कळत नाही अजून. गुप्तच टायटल सॉन्ग किव्वा 'भूत हु मै" तरी लावायच होत.

एक मात्र नक्की की यावेळच्या बिबॉ स्पर्धकान्ना पाहून खरी भूते पळून जातील.

Pages