Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जाऊ दे. आपण त्यांच्या पर्सनल
जाऊ दे. आपण त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल न बोललेलं बरं.
मांजरेकरपण सतत सांगत असतातच.>> >> हो बरोबर आहे.
पर्सनल कमेंट खरंच नको. तिचा
पर्सनल कमेंट खरंच नको. तिचा bf अजिंक्य ननावरे आहे, youtube बघितलं. सध्या तो एका मराठी नाटकात बहुतेक हे मृत्युंजय नाव त्याचं, सावरकरांची भूमिका करतोय. तो चांगला actor आहे, सिरीयलमध्ये बघितलाय. नाटकात नाही. तो सुयश टिळक डबल रोलमध्ये होता त्या सिरीयलमध्ये त्याचा मित्र होता.
ह्यावेळी टोटल फेल गेलाय शो. कंटाळा आलाय. सवयीने लावला जातोय.
एक वक्ती बिग्ग बॉस मध्ये वाईट
एक वक्ती बिग्ग बॉस मध्ये वाईट वागत आहे म्हणजे ती बाहेरच्या आयुष्यात ही तशिच असेल असा समज पुर्ण पने चुकीचा आहे. बिग्ग बॉस आणी बाहेरचे जग पुर्ण पने वेगळे आहे. बिग्ग बॉस मध्ये एका घरात 12लोकां बरोबर कुठल्याही इतर गोष्टी जसे टीवी फ़ोन पुस्तके शिवाय रहायचे असते . बाहेरचा काही सम्बध नाही .सगळे लोक वेगळे असतात.
वर घरात राहण्या साठी स्पर्धा असते . सो एखाद्याचे वागणे त्या परिस्थीतीनुसार बदलू शकते . पण बाहेरच्या जगात आपली माणसे असतात. घरात टिकून राहण्यासाठी स्पर्धा नसते. एखाद्या वर चिडलो तर दुसर्या गोष्टीत मन रमवू शकतो. ह्या गोष्टी चा ही वागण्यवर परिणाम होतो.
अमुपरी अगदी बरोबर. पण
अमुपरी अगदी बरोबर. पण देवयानी सिरीयलच्या वेळी चर्चा होती की शिवानीच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे तिला काढून टाकलं होतं.
तरी मी पर्सनल कमेंट करण्याच्या विरुद्धच आहे. पण bb त निगेटिव्ह वाटतेय त्याबद्दल लिहिणार नक्की. अर्थात मला तरी वाटतं की ती bb ची पपेट म्हणून आलीय त्यामुळे जे बोलेल ते सांगितलं असेल.
हो अन्जू बीबी त नेगेटिव जात
हो अन्जू बीबी त नेगेटिव जात असली तर त्याविषयी आपले मत मांडायालाच हवे.
मला नाही माहिती तिने देवयानी सेरियल का सोडलेली.
पण ती त्यानंतर सोनी टीवी वरच्या एका सेरीयल मध्ये लिड म्हणून होती सो मला त्यावेळी वाटलेले हिन्दी सीरीयल मिळाली म्हणुन तिने मराठी सोडली.
सोडले नव्हतं काढलं होतं तिला.
सोडली नव्हती काढलं होतं तिला. तिची आणि त्या संग्रामची जोडी आवडायची मला.
मग कदाचित हिंदी मिळत होती म्हणून मुद्दाम वागली असेल असं.
सोडले नव्हतं काढलं होतं तिला.
सोडले नव्हतं काढलं होतं तिला...> >>
असेल ही पण त्या नंतर ती लगेच त्या हिन्दी सीरियल मध्ये आली होती.
मी ती हिन्दी सेरीयल पहायचे अनामिका नावाची होती. सोनी वर . त्या मधे पण आधी एक वेगळी हिरॉईन होती आणी ती मेल्यावर हिची entry झाली . हिला त्या आधिच्या हिरॉईनचा आत्मा दिसायचा असे काही तरी होते.
मी देवयानी नाही पहिली कधी. पण त्याचे प्रोमो वगैरे पहिले होते. सो ही मराठी तिल आहे हे कळले मला.
शिवानी स्वत: सुद्धा bb त घाण
शिवानी स्वत: सुद्धा bb त घाण शिव्या देणे, हात उचलणे, bb ना धमकी देणं हेच करत होतीना. त्यामुळे तिचेही बाहेर येईल सर्व म्हणून कदाचित केस करायची नाही ती.
पण आत्ता जे बोलतेय ते bb चं वदवून घेतायेत असंच असणार. अर्थात वाईट कमेंट्स केल्याबद्दल पराग वीणाचा निषेधच. पण ती शिवानी जे वागून गेली आधी त्याबद्दल तिचाही निषेध.
मी ती हिन्दी सेरीयल पहायचे
मी ती हिन्दी सेरीयल पहायचे अनामिका नावाची होती. सोनी वर . त्या मधे पण आधी एक वेगळी हिरॉईन होती आणी ती मेल्यावर हिची entry झाली . हिला त्या आधिच्या हिरॉईनचा आत्मा दिसायचा असे काही तरी होते. >>> मी काही भाग बघितले होते याचे.
पण शिवानि ने काल तो मुद्दा
पण शिवानि ने काल तो मुद्दा काढुन काहीही उपयोग नव्हता कारण एकतर एक महिना झाला आहे त्या गोष्टीला . आणी पराग ही नाही आहे घरात . विणा च्या लक्षात जरी आले तरी ती ते कबूल करुन वाईटपणा कशाला घेईल. ती विसरले म्हणुनच सांगणार. हीना ला हिन्ग नाव तिने ठेवलेले ही साधी गोष्ट तिने कबूल नाही केली .नेहाला बेडुक बोललेली तेही कबूल केले नाही.
वीणा ला शीव आणी स्वत: च्या
वीणा ला शीव आणी स्वत: च्या मैत्री बद्दल काही वेगळे बोलले तर लगेच राग येतो. किशोरी ताई त्यांच्यातील गोष्टीला टाईमपास बोलली तर तिला इतका राग आला. तर ती दुसर्या मुली विषयी असे कसे बोलू शकते.
विणाला टाईमपास सारख्या साध्या शब्दांचा राग आला. तर शिवानि विषयी विणा जे बोलली ते बघुन शिवानिला वीणाचा राग येणे साहजिक आहे.
बाय द वे शो ला काल 50दिवस पुर्ण झाले. अजुन 50दिवस बाकी आहेत.
काल पहिल्यांदाच शिव चा अ
काल पहिल्यांदाच शिव चा अॅटीट्युड मला अजिबात आवडला नाही. या आधीपण ममां त्याला वळू वगैरे बरेचदा बोललेत , त्याला खुप टोमणे पण मारलेत पण तेव्हा त्याने ते छान स्पोर्टींगली घेतलं होतं निदान काही रीअॅक्ट पण नव्हतं केलं पण काल काय झालं कोणास ठावुक, की वीणा ला बोललेलं त्याला नाही आवडलं ? खरच वीणा आवडते आहे की काय त्याला... की शिवानी आल्यामुळे तो खुप जरा इनसेक्युअर झालाय ?
काल त्याला ममां चा आणि शिवानी चा पण खुप राग आलेला हे स्पष्ट दिसुन येत होतं. आणी नेहा चं ताई दादा ला विचार बोललेलं पण झोंबलं त्याला. शिव खरतर नेहेमीच त्यांचं ऐकतो असं नाही पण सगळं जाउन त्यांना सांगतो हे नक्की. निदान एवढ तरी त्याला कळावं की बाहेर लोकांना ते आवडत नाहिये. आणी वीणा च्या नादानं त्याचा स्वतः चा गेम गंडतोय हे पण त्याला कळावं आता.
वीणा ची शाळा घेतली हे तीला अज्जीबात आवडलं नाही हे तिच्या तोंडावर स्पष्ट लिहिलं होतं.
नेहा खुश आहे शिवानी आली म्हणुन पण म्हणून तीने परत सगळ्यांशी पंगे घेउ नये. शिवानी गेली की लोकं वाट लावतील तिची मग.
वैशाली न केळ्या ला काल ममां मस्त टोमणे मारत होते.
एकदा सेलेब्रिटी झाले की लोक
एकदा सेलेब्रिटी झाले की लोक पर्सनल गोष्टी बघणारच.
बिबॉ हा रिअलिटी शो आहे असे प्रसिद्ध केले. मग त्यातले लोक आत जसे वागतात तसेच बाहेरही आहेत असे लोक समजणार. सोशल मीडियावर म्हणून नाराजी आहे. केळकर, माडे, शिवानी, बिचुकले यांच्या पर्सनल गोष्टींचा उल्लेख तिथे गेल्या दीड महिन्यांपासून चालू आहे. बिबॉ शो खूप निगेटीव, barbaric आहे, एकमेकांशी मुद्दाम भांडखोरपणा करायला सांगणारा आहे हे हिंदी, मराठी भाग १ वरून दिसतंच आहे. बाहेरच्या जगात छान छान दाखवणारे स्वतःचे कृत्रिम मुखवटे अशा स्थितीतच गळून पडतात. ती घाण दिसावी यासाठीच तसे restricted environment ठेवले आहे. जे आतून तसे आहेत त्यांची घाण येते बाहेर. जसे बिचुकले.
बाप्पा किंवा जुन्या जमान्यातल्या प्राण सारखे काही लोक अपवाद असतात.
हा शो sadistic, savage प्रकारचा विकृत शो आहे. तसे आठ दहा भागच बघितले. ती घाण बघून मन नाराज झाले. इथून पुढे बघणे नाही.
मांजरेकर पण म्हणाले ना शिव ला
मांजरेकर पण म्हणाले ना शिव ला कि तू पहिल्यांदाच तुझा संयम घालवलाएस (अशा अर्थाचं काहीतरी वाक्य होतं)
या शोमागची कल्पनाही ही आहे की
या शोमागची कल्पनाही ही आहे की जगाशी संपर्क नसताना लोक कसे वागतात ते बघायचे. त्यांचे खरे वाईट चेहरे दिसायला लागतात. बाहेर मुखवटे असतात. content म्हणून त्यांची भांडणे लावायची, गलिच्छ वागायचे, फालतू बडबड करायची व viewers ने मजेने पहायचे It's totally sadistic & devilish.
(माफी असावी. कोणाला दुखवायचे नाही.)
काल अभिजित प्रत्येक गोष्टीला
काल अभिजित प्रत्येक गोष्टीला नेहाच उत्तर देत होता. रेमोट पण नेहा खेळने पण नेहा चमचा पण नेहा
शिवानी जेव्हा कन्टेस्टन्ट
शिवानी जेव्हा कन्टेस्टन्ट होती ती खरी शिवानी. आत्त्ता जे काही म्हणून बोलतीय ते सर्व चॅनल चा फीड आहे. त्यातले काहीही तिचे मानणार नाही मी तरी. तसेही त्या पहिल्या ३ आठवड्यांच्या मानाने आत्ता खूपच जमिनीवर आलेली वाटतेय.
शिवानी आल्या आल्या, "तिला
शिवानी आल्या आल्या, "तिला मुद्दाम काड्या टाकायला आणि आग लावायला पाठवलाय" अश्या अर्थाचं काहीतरी शिव /वैशाली बोलत होते आणि त्या अर्थाचं गाणं म्हणत होते . ती आल्या आल्या वीणा चा चेहरा एकदम उतरला आणि खरं तर रुपाली चा पण .. ती फक्त तोंडदेखलं वरवर हसत होती .
केळकर त्यातलेत्यात बरोब्बर चॅप्टर , लग्गेच विचारलं तुझी पाटी कुठाय नावाची !? अंदाज काढायला; कारण पाटी नसेल तर हि जस्ट गेस्ट आलीये ..
वीणा ची य्येवढी खरडपट्टी काढून पण तिला त्याच काही वाटत असावं असं वाटलं नाही .. वरवर सॉरी सर सॉरी सर चाल्लेल
रवीराव चा भाग अपलोड नव्हता झालेला काल .. त्यामुळे केळ्या च एलिमिनेशन नाही म्हंटल्यावर उतरलेला चेहरा नाही पाहिला .. पोपट झाला असेल त्याचा
केळकरचा चेहेरा नाही एवढा
केळकरचा चेहेरा नाही एवढा उतरला, उलट रुपाली जाणार बघितल्यावर तो आणि वैशाली नाही जाणार ना ती सर, खरं सांगा असं म्हणाले. मग त्यालाच कॅप्टन म्हणून तिला थांबवायला आत पाठवले. कदाचित हिना किंवा नेहा असत्या शेवटी तर त्याला आतून आनंद झाला असता.
यावेळेचे नॉमिनेटेड लोकं आपल्या बॅग्ज भरुन ठेवत नाहीत का, मागच्यावेळी अगदी तयारीत असायचे.
शिवानीतर्फे केळकरला अजून चढवलं, तो जिंकेल असं वाटतं का फायनलमधे असेल असं शिवानीने उत्तर दिलं म मांनी विचारलं तेव्हा.
नवीन प्रोमोत वीणाला टिप्स
नवीन प्रोमोत वीणाला टिप्स देतेय. तू बोलतेस तेव्हा आम्ही tv mute करतो किंवा रिपीट करतेस एखादी गोष्ट. हे सईने पण सांगितलेलं वीणाला असं म्हणाली वीणा, तरी ऐकलं नाही वीणाने ह्याचं आश्चर्य वाटतं.
Btw bb नी पढवून पाठवलं आहे सर्वाना टिप्स द्यायला. त्यांचा गेम सुधारावा म्हणून.
शिवानीही जेव्हा शोत तमाशा करायची तेव्हाही, tv mute ठेवायला लागायचा तसंच आता वीणा, नेहा, वैशाली जेव्हा आरडाओरडा करतात तेव्हा tv mute ठेवलेलाच बरा असतो.
काल पुर्ण एपिसोड भर शीव आणी
काल पुर्ण एपिसोड भर शीव आणी वीणा दोघ ही तोंड पाडून बसलेले . त्यामानांने वैशाली केळकरला कितिही ओरडले तरी त्यांचा चेहरा बरा असतो.
सुलु नाही पहिली नेहा बाद झाली
सुलु नाही पहिली नेहा बाद झाली. नंतर माधव. >>>>>>>> धन्स अन्जू. मला उलटया क्रमाने आठवत होत.
शिवानीच ' गिरे तो भी टान्ग उपर' अस झालय. रात्री माधव आणि नेहाशी बोलताना इतर स्पर्धकान्विषयी कित्ती वाईट बोलत होती. तिचा खुनशी अॅटिटयूड अजून तसाच आहे. हिच्या येण्याने घरात पॉझिटिव्हिटी आलीये म्हणे. आता ती बदलली आहे हा दुसरा बिग जोक!
काल ती ममासमोर शिवला जे बोलली ते आवडल नाही.
खरच वीणा आवडते आहे की काय त्याला. >>>>>>>> शिवानीने काल विणाचा ऑलरेडी बॉफ्रे आहे अस सान्गितल. विणा त्याला कुकी बोलते.
तिची आणि त्या संग्रामची जोडी आवडायची मला. >>>>>>>> मलाही. बाकी ती सिरियल MCP होती, मी फक्त संग्राम आणि शिवानीसाठी ती सिरियल बघायची. ति गेल्यावर तिची रिप्लेसमेण्ट मात्र मुळीच आवडली नाही. ( सध्या ती किसान जॅमच्या अॅडमध्ये दिसते.) खुपच गुळमुळीत होती ती. नन्तर सिरियल भरकटायला लागल्यामुळे सोडून दिली बघायची.
>>शिवानी जेव्हा कन्टेस्टन्ट
>>शिवानी जेव्हा कन्टेस्टन्ट होती ती खरी शिवानी.<<
आत्ता हि तशीच आहे - द वे शी केम आउट स्विंगिंग...
शिवानी दुसर्या सिझनची हर्षदा खानविलकर आहे. पहिल्या सिझनमध्ये रेशम+राजेशचे जे माकडचाळे चालले होते त्यावर कडक शब्दांत भाष्य करायला हर्षदाची एंट्री झाली होती. यावेळेला शिव+वीणाच्या चाळ्यां करता शिवानी आलेली आहे. फरक इतकाच आहे कि हर्षदा, रेशमची मैत्रीण होती आणि शिवानी, वीणा या दोघींमधुन विस्तव सुद्धा जात नाहि. शिवानीच्या एंट्री नंतर शिव+वीणा हलले/बिथरले आहेत एव्हढं मात्र नक्कि...
>>विणा त्याला कुकी बोलते.<<
>>विणा त्याला कुकी बोलते.<<
शिवानीचा त्या संदर्भातला डायलॉग एपिक होता...
जबरदस्त टीका चाललीय शिवानीला
जबरदस्त टीका चाललीय शिवानीला आणले म्हणून. मीही लिहून आले bb fbवर
Sorry to say पण ज्या रीतीने शिवानी घरात वावरली आणि तिच्या आजारपणामुळे असेल पण जशी ती react होत होती, धमक्या देत होती bb ना आणि ज्या पद्धतीने तिचा insult करून बाहेर काढलं गेलं, तिलाच गेस्ट म्हणून टिप्स द्यायला का बोलावलं. दुसरं कोणी मिळालं नाही का यांना. एवढे bbनी तिच्यापुढे लोटांगण घालण्याइतकं काय घडले.
हे मी लिहून आले.
काल पुर्ण एपिसोड भर शीव आणी
काल पुर्ण एपिसोड भर शीव आणी वीणा दोघ ही तोंड पाडून बसलेले . त्यामानांने वैशाली केळकरला कितिही ओरडले तरी त्यांचा चेहरा बरा असतो.>>>कारण शिव आणि वीणाला त्यांच्या चुकांची जाणीव झाली असे वाटले... वैशाली आणि केळकर त्याबाबतीत बरेच बरे आहेत... वैशालीला तर कुठल्याच चुकीचा 1% ही guilt वाटत नाही..
खरं आहे मोक्षू.
खरं आहे मोक्षू.
आज कैप्टन च्या निवडीसाठी
आज कैप्टन च्या निवडीसाठी त्यांच्या समर्थकांपैकी एकाने परमनंट tattoo गोंदण काढायचे आहे . वीणा साठी शीव तयार झालाय आणी रुपाली साठी हीना झालीये तयार.
>>नेहा खुश आहे शिवानी आली
>>नेहा खुश आहे शिवानी आली म्हणुन पण म्हणून तीने परत सगळ्यांशी पंगे घेउ नये. शिवानी गेली की लोकं वाट लावतील तिची मग.
हो ना!
शिवानी आली म्हणून हीना-माधवला दूर केले आणि शिवानी गेली परत आठवड्याभरात तर एकदमच एकटी पडेल ती घरात!
शिवानी फुल्ल सुटलीय आणि वीणा
शिवानी फुल्ल सुटलीय आणि वीणा शिव तिचे टारगेट आहेत
नेहा परत फॉर्मात आली आहे पण उस्से थोडा संभलके खेलना होगा
माधवचे कंफ्यूजन काही केल्या दूर होत नाहीये
हीना अब रंग लाने लगी है.... भरपूर फुटेज घेतल तिने
नवी आणि ठाम किशोरी बघायला मिळेल का?
रुपाली अतिशय संधीसाधू आणि केळ्या-वैशाली निर्लज्ज आहेत यावर परत एकदा शिक्कामोर्तब झाले
वीणा आता या आठवड्यात जरा सावध खेळेल पण ती शिवची साथ सोडणार नाही कारण शिवानीविरुद्ध लढायला तिला लागेल त्याचा सपोर्ट
शिव पण फारसा बदलेल असे वाटत नाही.... तो ताई दादा वाला बाण अगदी अचूक बसला असला तरी तो ताई दादांची संगत इतक्यात सोडणार नाही..... तो फारसा वाईटपणा न घेता सेफ खेळत राहील अजुन काही दिवस!
हेच या वीकेंडच्या डावाचे सार!
Pages