बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अहो स्पॉन्सोर्स असतात, आणि वेटिंग लिस्ट मध्ये पण भरपूर कंपन्या असतील. लाख दोन लाख म्हणजे हाताचा मळ आहे colors ला.
करोडो चा प्रॉफिट असणार.
परवडायला वगैरे काय Happy

ममां चांगले बोलले काल.पण तरी ते भाकरी चा मुद्दा फार वेळ खेचला असे वाटले. खूप तेच तेच झाले. वीणा ला झापले ते बरे वाटले. वीणा जरा मनावर घेते असे तरी वाटते पण रुपाली, वैशाली काहीही बोला अगदी निर्विकार असतात. वैशालीचा अ‍ॅटिट्युड क्लिअर असतो की या ओरडण्याला काही अर्थ नाहीये , या बोलण्याने तिचे काहीही वाकडे होणार नाहीये असे भाव चेहर्‍यावर असतात.
शिवानी घरात होती तेव्हा याहून खूप जास्त माजोरडी, निगेटिव होती त्या मानाने काल खूपच टोन्ड डाउन वाटली. आता बिबॉ ने तिची थोडी इमेज सुधरवण्याच्या बदल्यात स्वतःला हवे ते तिच्याकडून वदवून घ्यायला पाठवले असावे. शिवाय बाहेर झालेले ट्रोलीम्ग बघून जमिनीवर आली असू शकते.

शिवानी वीणावर सूड उगवायला आल्यासारखी करतेय. तिच्या जोडीला शिवलापण टार्गेट करतेय.

मांजरेकर अभिजीतला व्यवस्थित टोचताहेत.

ममां चांगले बोलले काल.पण तरी ते भाकरी चा मुद्दा फार वेळ खेचला असे वाटले. >>> आजपण तेच तेच होतं भाकरी जास्त.

शिवानी वीणावर सूड उगवायला आल्यासारखी करतेय. तिच्या जोडीला शिवलापण टार्गेट करतेय. >>> दोघांचा फोकस खेळावरुन हलतोय असं वाटत असणार bb ना. तिच्या थ्रू warning देतायेत.

सारखं बिचुकले बिचुकले पण करतायेत मग त्यालाही आतून काढून आणणार का.

शिवानी प्रचंड निगेटिव्ह attitude दाखवतेय, शिवने तिला योग्य उत्तरं दिली, पब्लिकने शिवच्या बाजूने टाळ्या वाजवल्या.

नेहाची साडी छान होती. हिनाचा ड्रेसही आवडला पण दिसत चांगली किशोरीताईच होती.

एक दाखवलं मात्र bb ने हीनापेक्षा त्यांना वीणा महत्वाची आहे. भले voting lines बंद होत्या.

करोडो चा प्रॉफिट असणार. >>> हो बरोबर पण trp कमी झालाय म्हणतायेत बरेच जण, ख खो काय माहिती.

एकीकडे जिओ वर match बघत होतो, ते बघणे जास्त worthy होतं. मस्त झाली match. प्रेक्षकांचे पैसे वसूल. इंग्लंड जिंकलं तरी NZ हरले नाही.

मांजरेकर अभिजीतला व्यवस्थित टोचताहेत. >>> हो आणि शिवानीकरवी तो असेल फायनलला का जिंकेल असंपण वदवून घेतलं ना bb ने.

शिवानी आल्याने बरेच प्रेक्षक नाखूष आहेत. आत्ता काही कमेंट्स वाचल्या bb fb वर.

वीणा जरा मनावर घेते असे तरी वाटते पण रुपाली, वैशाली काहीही बोला अगदी निर्विकार असतात. >>> हो आजपण जाणवलं वीणा मनावर घेतेय असं.

अभिजीत वैशालीला माहिती असते म्हणजे अंदाज आज कोणीच जाणार नाही. शिव बोलता बोलता शिवानीला म्हणाला तू एक विक असशील. तिचे आणि त्याचे वाजत होतं, वीणा शांत झालेली. पण करेक्ट आहे शिवचं गेस्ट म्हणून ती आठ पंधरा दिवस असेलना ह खा सारखी.

काही जणांनी शिवानी वीणा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत लिहिलं आहे तर काही जणांना वीणाला शिवानी बोलली ते आवडलं. काहींनी शिवानी स्वत: किशोरीताईला किती वाईट बोलत होती तेही लिहिलं पण एकंदरीत शिवानी आलेली आवडलं नाहीये बऱ्याच जणांना.

म मां लंडनमध्ये होते आणि भाखरी ह्या दोन गोष्टी हायलाईट होत्या.

वैशालीने फोनवर सुनावलं तेव्हा म मां नी लंडनहून बघितलं. ताई तू तर बोलूच नकोस हा वीणाने केलेला अपमान पण लंडनहून बघितला बहुतेक, नंतर अनेक वेळा लंडनचा उल्लेख. अहो तुमचं ते काम आहे लंडनमध्ये असा नाहीतर कुठेही, होस्ट आहात तर bb खरंतर बघितलंच पाहिजे तुम्ही Lol

पण सार हे कि ते लंडनमध्ये होते. पुष्कर आठवला लंडन लंडन करायचा पण तो एका मूवीची indirectly add करत होता. त्याने शुटींग केलेलं तिथे आणि त्याला आवडलं होतं ते शहर.

शिवानी वीणावर आरोप करत होती ना, तशी काहीतरी क्लिप फिरतेय असं bollywood spy मध्ये बघितलं. पराग वीणा बोलतायेत ते खालून जातंय, बोलताना कळत नाहीये. ते खरं असेल तर दोघांच्या कमेंटस worst आहेत. मला जास्त वाचवलं नाही, मी व्हिडीओ थांबवला मधेच.

बाहेर गेल्यावर दोघांवर केस वगैरे कशी नाही केली शिवानीने. बिग बॉस या प्रकरणाला हवा देणार नाहीत कारण ते charactor च्या बाबत वगैरे मागच्यावर्षी पण बोलले गेलं होतं. मेघा आणि सईने रेशमबाबत काही वक्तव्ये केलेली पण मग ते प्रकरण काही फार पुढे गेलं नाही. त्यामुळे bb मध्ये personal comments कोणी करत असेल तर पुढे काही जाऊन त्याविरोधात करता येत नसेल, bb च्या परवानगीशिवाय, contract असेल काहीतरी.

टास्कमध्ये पण वैशाली आणि हीना charactor वर उतरलेल्या. पण पराग वीणा बोलत होते तो टास्क नव्हता. कदाचित वीणाला माफी मागायला लाऊन प्रकरण थंड करतील. तसंही शिवानीही वाटेल ते सर्वांबद्दल बोलत होतीच. वीणाला काय स्वतः जे चुकीचं बोलते ते कधी आठवतंच नसतं.

त्याचे म्हणणे असे आहे कि त्याला फीड मिळत नाही तर तो स्वतः सगळे एपिसोड बघतो भले मग भारतात असो किंवा लंडन

रूपालीला शिवानीमध्ये कुठल्या अँगलने पॉझिटिव्हिटी दिसली?

काल मांजरेकरांनी वैशाली आणि नेहाला त्यांच्या फोन टास्कमधल्या पातळी सोडून बोलन्यावरून टोकलं. म्हणजे ते पण वरणभात बहुतेक.

वीणा किव्वा सगळेच इतकं काय काय बोलत असतात कि फक्त वीकेण्ड शनिवारच्या आधीच्या आठवड्यातल आठवलं तरी खूप झालं . पण त्याच्या कितीतरी आधीच्या आठवड्यातला आठवण मुश्कीलच आहे . कोणालाही . मला तिथे वीणाच पटल आणि शिवानी तरी सगळे तिचे मागचे मुद्दे उकरून काढून फक्त शनिवारी मांजरेकरणासमोर तिच्याशी भांडायला आली आहे का ? आधी तिला विचार ना . आठवून बघ म्हणून सांग . आल्या आल्या दिवशी मांजरेकरांसमोर जुने कुठले तरी मुद्दे उकरून काढण्याची काय गरज ? शिवनीचा थोबडा बघितला तरी दोन ठेऊन द्याव्याशा वाटतात बिग बॉस तरी इतके का लाचार झाले ? कोणीच मिळत नाही वाटत वाईल्ड कार्ड एंट्री साठी . चिक्कार जणांना विचारलेले असत ना म्हणे ? त्याच काय झालं ?

आता असही वाटतंय परागच नाव खराब करण्यासाठीच बिग बाॅसने शिवानीला आत पाठवलय. आत गेल्या गेल्या पराग आणि वीणाच्या व्हिडिओचा उल्लेख का करतेय ती? . सोशल मीडियावर परागची झालेली लोकप्रियता बघवली नाही वाटत बिग बॉसना . ज्याला आपण बाहेर काढला तो इतका लोकप्रिय ? म्हणून त्याची बदनामी करण्यासाठी बिग बाॅसचीच ही खेळी आहे असं वाटायला लागलाय . नाहीतर तो आणि वीणा काय बोलत होते किव्वा याच्या आधी कोण काय बोलत होते याचा जाब विचारण्यासाठी या पूर्वी कोणत्या स्पर्धकाला पुन्हा एण्ट्री दिल्येय बिग बाॅसने ? परागची मानहानी करायला शिवानीचे पाय पुन्हा चाटायला गेला का बिग बाॅस.? कुठेतरी पाणी मुरतंय नक्की खासच .....

वीणा किव्वा सगळेच इतकं काय काय बोलत असतात कि फक्त वीकेण्ड शनिवारच्या आधीच्या आठवड्यातल आठवलं तरी खूप झालं . पण त्याच्या कितीतरी आधीच्या आठवड्यातला आठवण मुश्कीलच आहे . कोणालाही . मला तिथे वीणाच पटल >>>>>हो ना, शिवानी व्यवस्थित बघून आलीये, आणि इथे राहणाऱ्या contestants ना कसं काय मागचा रिव्यू मिळणार? ते बरेच पुढे गेलेत गेम बरोबर, आणि जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो कितपत खरा आहे काय माहित? वाईट बोलण्यावरुन शिवानी ने तरी अशी ओरड करु नये कारण ती स्वतः बाकीच्यांना कायकाय बोललीये
मला तर तिची एन्ट्री बघून घाडगे &सून मधली कियाराची घरातली रिएन्ट्री आठवतेय

जिने बिगबॉस ला एवढं अपमानित केलं,गेम चे नियम पायदळी तुडवले तिला हाकलून दिले तिलाच बिग बॉसने पाहुणी म्हणून तरी का बोलवावे??

कुठेतरी पाणी मुरतंय नक्की खासच >>> मलाही असं वाटतंय. आधीच म मां तो असताना विकेंडच्या डावात जाब विचारु शकले असतेना.

शिवानी अजून जास्त डोक्यात जातेय.

शिवानि विणला ज्या बद्दल बोलत होती ते पराग आणी विणा चे बोलणे शिवानि ज्या दिवशी गेली त्या दिवशीच्या एपिसोड मध्ये सुरवातीला होते. म्हणजे Saturday च्या वीकेंड च्या वार च्या एपिसोड च्या सुरुवातीला. मी आधी ही पहिले होते ते पण ते दोघे हळू बोलत होते सो इतके लक्ष देऊन नाही एकले नव्हते.त्यावेळी मला पराग असा का बोलतोय कळले नाही. कारण या आधी शिवानिने जेंव्हा त्याची माफी मागितली होती त्यावेळी तिला यू कॉल मी दादा वगेरे बोललेला.
शिवानी च्या जाण्यामुळे आणी हिना पंचाल च्या entry मुळे एपिसोड मधल्या त्या भागावर कुठेही चर्चा झाली नाही.
शिवानि ने बाहेर जाऊन ते बघितले असेल सो तिने विचारले असेल. पण विणा च्या ते लक्षात राहिले नसणार तसेही चुगली बॉक्स मध्ये तिच्या विषयी आलेल्या साध्या चुगल्या ती मान्य नाही करत तर ही गोष्ट ती कोठे मान्य करनार.
जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो कितपत खरा आहे काय माहित>>>
तो आहे एपिसोड मध्ये.

आत्ता जो व्हिडीओ फिरतोय, त्यात जे जातंय समोरून ते असं इतकं worst बोलणे झालेलं दोघांत हे मला तरी आठवत नाहीये. बरेचदा त्यावेळी जेवायची वेळ असते त्यामुळे एका जागी बसून बघता येत नाही, आत बाहेर सुरु असते.

अन्जू वूट वर बघा आहे ते एपिसोड मध्ये पण खुप लक्ष देऊन एकवे लागते 15जून च्या एपिसोड मध्ये सुरुवातीला आहे. 19.20 मीनीट ला आहे.

खरंतर हा व्हिडीओ खरा असेल तर नक्कीच निषेध पण शिवानीने आत येऊन हे बोलण्यापेक्षा बाहेर केस टाकायला हवी होती, जे तिला वाईट पद्धतीने बोलले त्यावर . ते जास्त योग्य असते ना. बिग बॉसना लीगल धमकी देत होती तर मग इथे का शांत राहिली बाहेर इतके दिवस.

हे सगळे खरंच scripted वाटतंय.

मी पाहिलं व्हूटवर जाऊन. पराग म्हणतोय, मी नाही शिवानीला माझ्या नादाला लावलं तर बघ.
वीणा दोन तीन वे ळा विचारते की पण ती आहे का तशी?
मग पुढे म्हणते मी ऐकलंय तिच्याबद्दल काय काय.
मग पराग त्यावर अजून काय काय बोललाय.

Not in good taste.

शिवानी आणि पराग दोघेही बाहेरच होते. तिने परागला का नाही यावरून टार्गेट केलं? कारण बाहेरून दोघांचं व्हिडियो युद्ध चाललंच आहे.
त्यात लिगल अ‍ॅक्शन घेण्यासारखं काही नसावं. आणि अशा बोलण्यावर लिगल अ‍ॅक्शन घ्यायची तर अ‍ॅक्टर लोकांना वकिलांची फौज बाळगावी लागेल.

त्यात लिगल अ‍ॅक्शन घेण्यासारखं काही नसावं. >>> चारित्र्यहनन वगैरे दावा करता येत असेल ना.

मला त्यावेळी पण मला पराग असे का बोलतोय ते समजले नव्हते कारण पराग आणी रुपाली ची मैत्री होती. आणी शिवानि आणी पराग चे बिलकूल पटत नव्हते. हे पाहिल्यावर मला पराग ने रुपाली ला ठेवलेला juice शिवानि ला का दिला ते समजले . शिवानिला ज्यूस दिला म्हणून रुपाली आणी त्याच्यात वाद झालेला.

शिवानीचे लग्न झालेय का? झाले असेल तर तिच्या नवऱ्याचे कसे असेल? कसा राहत असेल अशा निगेटिव्ह बाईबरोबर?
तिचे बिबॉमधले वागणे scripted आहे की बाहेरही अशीच आहे कळत नाही. तिने आधी ज्या सीरिअल केल्या होत्या त्या वेळेलाही तिला निगेटिव्ह वागली म्हणून सोडाव्या लागल्या असं वाचले होते.

शिवानीचे लग्न झालेय का? झाले असेल तर तिच्या नवऱ्याचे कसे असेल? कसा राहत असेल अशा निगेटिव्ह बाईबरोबर?
>>> तीचे लग्न नाही झाले . पण तिचा boyfriend आहे . ज्या लोकां वर आपले प्रेम असते त्यांच्या सगळ्या चुका माफ करतो. नेगेटिव लोकां बरोबर कोणी रहात नसते तर जगतील सगळी नेगेटिव लोके एकटी असती.
सगळ्यामध्ये काहीना काही निगटीव असतेच.

Pages