बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काल वीणा ला मांजरेकर You was my fav contestant बोलल्याचे
इतके का वाईट वाटले .हे ती चुगली बॉक्स मध्ये सांगत होती आणि बोलली की नेक्स्ट टाईम तुम्ही मला you Are my one and only fav contenstant बोलले पाहिजे .
का पण बकिचे ही स्पर्धक आवडते असू शकतात ना? वीणा चे असे सांगणे म्हणजे काहीच्या काय वाटले .

त्या ताई दादांच्या टोमण्यामुळे नेहा माझ्या फेवरेट कॅटेगरीत गेली एकदम Happy
वीणा खरंच लाडावलेली प्रिन्सेस कॅटेगरी आहे. ममां तिला शी "वॉज " माय फेवरेट असे म्हटले तर सहन झाले नाही तिला. रडून नाटके करून अटेन्शन घेतलेच तिने. सगळ्यांनी माझे कौतुक केलेच पाहिजे असा हट्ट.

सगळ्यांनी माझे कौतुक केलेच पाहिजे असा हट्ट.. >> होना पुढच्या वेळेला मी एकटीच आवडती असली पाहिजे असे सांगणे म्हणजे टू मच सुरेखा ताईंच्या स्टाईलने बाकी चे म काय गोट्या खेळणार का Biggrin

काल मांजरेकारानी प्रत्येक गोष्टीत भाखरी आणुन फार बोअर केले.
तो खेळण रेमोट गेम तर बोअरच होता उगाचच द्यायची म्हणून काही जण उत्तरे देत होते. आणी तो मेथीचे आणी बेसन चे लाडू खायचा ही पकाऊ होता . सगळ्यांनी एकदमच लाडु उचलले कोण कुठला खातोय कळतच न्हवते.वीणा तर दोन लाडू हातात घेउन बसलेली कोणताच खात नव्हती.

कालचा वीकेंड चा डाव चांगला होता, मांजरेकर खरंखुरं ओरडले हे नशीब...
शिवानीमुळे थोडा ट्विस्ट आलाय खरा, नेहा आणि हिनाचं का वाजलंय पण?? आधी तर चांगल्या होत्या एकमेकांशी.. आजपण किचनमध्ये भांडत होत्या, आणि रुपाली बाहेर चालली तेव्हा नेहा तिला थांब म्हणाली, शिवानी ने हिनाला आत का पाठवलंय ते माहित्ये म्हणली, मला कारण कळलं नाही नीट!

आजचा साष्टांग नमस्कार आणि टॅटू चा टास्क भारी होता, पण खरंच permanant काढायचा होता टॅटू तर आवडीचा तरी काढू द्यायचा समर्थकांच्या, उगाच बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असं झालंय. उद्या शिव विणाचं फाटलं तर शिव ला दीपिका पदुकोण सारखी कलाकुसर करून झाकावा लागेल की टॅटू ;)आणि हिना काय करेल बाहेर गेल्यावर रुपालीचा टॅटू मिरवून?

हिना काय करेल बाहेर गेल्यावर रुपालीचा टॅटू मिरवून?>>>
रुपाली म्हणाली ना, मी बाहेर गेल्यावर erase करून देईन..

वीणा जिंकली असे वाचले. >>> अजूनतरी नाही दाखवलं. उद्याही टास्क असणार.

हॅटस ऑफ खरं तर हिनाला, तिने रुपालीसाठी टॅटू काढून घेतला. हे करणं खरंच कठीण होतं. नेहाने पण छान सांष्टांग नमस्कार घातले. शिवने वीणासाठी काढला टॅटू त्यात विशेष काही वाटलं नाही पण हिना ग्रेट खरंच.

शिवानी होल्ड घेऊन सर्व strategy सांगायला लागली रुपाली आणि किशोरीताईला पण बरोबर घेऊन, तेव्हा नेहाला ते फारसं आवडलं नाही, ती माधवला म्हणाली आता सर्व बदलले आहे, आपण दोघांनी मेन असायला हवं आणि काय ते ठरवायला हवं.

शिवानी आल्यावर हिनाला फारसे विचारत नाही नेहा माधव. नेहा जास्त त्यामुळे ती भडकली आहे एकीकडे.

केळकरला पण शिवानीने मस्त पिन मारली. वीणाला तिच्या सुरात टिप्स दिल्या, त्या दोघीत समेट झाला. सगळं bb ना हवं तसं चाललंय.

सगळ्यांनीच task मस्त केला पण शिवला थोडा समजला नाही पहिला task किंवा सगळेच confused झाले तिथले. त्यात नेहाने बाजी मारली.

चिखल खेळत चतुराई दाखवा bb सांगत होते, ते कोणाला समजलंच नाही. थंडी वाजत होती दोघांना तर बर्फ आणून टाकायला हवा होता oposite टीमच्या चिखलात. शिवानीने कचरा टाकला तेव्हा bbनी काही विरोध केला नाही म्हणजे बर्फ चालला असता. हीना डोकं चालवत होती काहीना काही पण नेहाला पसंत नव्हतं कारण बहुतेक रुपालीसाठी माधवला त्रास देणं तिला बरोबर वाटत नव्हतं म्हणून नेहा हीनाचे वाजलं एकदा. चिखल जास्त अंगाला लावायला हवा जिंकण्यासाठी याबाबत संवाद सुरु होता त्याचं वादात रुपांतर झालं.

आणी तो मेथीचे आणी बेसन चे लाडू खायचा ही पकाऊ होता . >>> हे कधी खाल्ले, मी नाही बघितलं. मधेच dd sports वर match दाखवतायेत का बघत होते. मी लिमिटेड channels घेतली आहेत. त्यामुळे match जिओवर मोबाईलमध्ये लावून ठेवलेली पण dd वर दाखवतायेत का बघायला गेलेले. एकीकडे टेनिसपण सुरु होतं मोबाईलवर. धमाल चालू होती खरंतर दोन ठिकाणी अगदी इंटरेस्टिंग. मी उगाच bb लावून ठेवलेलं खरंतर Lol

शिवानीने अभिजीत केळकरला स्वतः +नेहा+ माधवचा पाठिंबा दिलाय. त्याच वेळी बाकी सगळ्यांची एक मोटही बांधतेय.

वीणा काल आणखी खाली उतरली. आधी शिवला सांगितलं की मी शिवानीला उत्तर देणारच नाही. बाहेर गेल्यावर काय ते बघू.
मग तिच्याशी बोलली. त्या वाक्याला नेहमीप्रमाणे दुसरे अर्थ देण्याचा प्रयत्न केला. पण शिवानी बधली नाही. सॉरी वसूल केलंच.

वीणा लाडावलेली, बेजबाबदार, डोक्यात हवा गेलेली आहे.
हे मी आधी लिहिलंय का आठवत नाही. पण शिवला कमिट करताना, मी बाहेर कोणाला तरी आन्सरेबल आहे, तेही मी ठरवलं तर, असं म्हणाली. तिचा कायम हाच अ‍ॅटिट्युड राहिला आहे.
आता उद्या कॅप्टनसीसाठी वीणा आणि रूपालीला आपापल्या ग्रुपमधल्या एकेकाला नॉमिनेशनसाठी तयार करायचं आहे.
म्हणजे आता टास्क्स आणखी आणखी खडतर होत जाणार आहेत. टॅटू, चिखल यांतून झलक मिळालीच.

हे मी आधी लिहिलंय का आठवत नाही. पण शिवला कमिट करताना, मी बाहेर कोणाला तरी आन्सरेबल आहे, तेही मी ठरवलं तर, असं म्हणाली. तिचा कायम हाच अ‍ॅटिट्युड राहिला आहे. >>> काहीतरी भूषण नाव घेत होती मागे, रुपालीशी बोलताना, टॅटू पण केलेला त्याचा. शिवची पण gf आहे म्हणतात बाहेर, youtubeवर कधीच आलेलं, अमराठी आहे. हीनापण म्हणाली शिव तुझं बाहेर मला माहितेय. येडे आहेत सर्व Lol

जाउदे आपण ह्यात बोलतायेत म्हणून पर्सनलवर आलो. मीन्स bb मधेच आणि त्यासंदर्भात youtubeवर समजलं ते लिहिलं.

आता scripted असेल तर overacting करतायेत किंवा खरं असेल तर दोघांचे liking बदललं असू शकते. काल शिवानीला तेच म्हणाली ना वीणा. पण एक आहे married नाहीये कोणी बहुतेक, मागच्यावर्षी राजेश आणि पुष्कर होते आणि मुलंही होती त्याना.

BB पण chapterगिरी करतात, त्यांची जोडी आवडतेय असं प्रेक्षकांना सांगायला लावतात, फोन येतात तसे आणि तेच तेच दाखवतात आणि लोकांनी बोंबाबोंब केली कि मग कोणालातरी डोस द्यायला पाठवतात. मिसगाईड केलं आहे त्यांना, काल माधव म्हणाला ना शिवानीला की बाहेर जोडी आवडतेय म्हणून फोन येतात म्हणून अति चाललंय.

हो, टब मध्ये बर्फ टाकायला हवा होता, infact शिवानीने कचरा टाकायला आणला तेव्हा ती पिशवी उपडी करण्यापूर्वी मला वाटलपण की हिने डोकं लावून बर्फ आणला असावा पण ती फोलपटं आणि इतर सुका कचरा निघाला Sad
शिवानी काड्या करण्यात माहीर आहे, तिच्याकडून बर्फाची आयडिया expected होती Happy

पण मला एक कळत नाही..आपल्या उमेदवाराचा विजय होण्यासाठी समर्थकांना कशाला वेठीस धरल आहे.. जो तो आपल्या हिमतीने व्ह्यायला पाहिजे कप्तान. हे म्हणजे 'बेगानी.शादी मे अब्दुला दिवाना' असं झाल... उमेदवाराच काहिच नाही गेल पर इसमे समर्थकांचा घाटा.. ते कशाला हीना ने रुपाली च नाव tatto केल..ती काय तिची मैत्रीण नाही.. वीणा च तरी 2 अक्षरी नाव होत.. एवढ करुन रुपाली परत हीना ला टांग देणार नाही कशावरून

बर्फ मला पण वाटलेलं, टाकतील, आपल्याला सुचलं ते नेहा हिना शिवानीला सूचू नये? आश्चर्य आहे, खरं म्हणजे अशा टास्कमध्ये त्यांचं डोकं सुपरफास्ट चालतं, आधीच थंडी वाजत होती त्या दोघांना.

काल नेहाने केलेली कविता छान होती...एकुण नेहाचं मराठी वर चांगलं प्रभुत्व दिसतय. बिबॉ च्या सुचना पण बरेचदा तीच वाचत असते.
तिने अभिजीत ला पण कविता ऐकायला बोलावलं होतं ते आवडलं मला. असे छान छान प्रसंग खुप कमी वेळा दाखवतात बिबॉ.

टॅटु टास्क काईच्या काई....
चिखल टास्क मद्धे भांडणे लावायचा प्रयत्न केला बीबॉ ने पण गंडला तो पार. बिबॉ ने वारंवार हिंट्स देउनही कोणीही काही आयडीया लावल्या नाही.
पराग प्रकरणामुळे पब्लीक घाबरलेले दिसले Wink
नाहितर हा खुर्चीसम्राट प्रकारातलाच टास्क होता. फक्त खुर्ची ऐवजी टब बाथ. चिखलात लाल तिखट वगैरे टाकलं असतं तर अंगाची आग होउन उठले असते लोक. पण आता सगळेच सावध खेळत आहेत त्यामुळे काही वादावादी न होता बोअर होत आहे टास्क .
शिवानी येउनही फार काही मजा नाही आली काल.
पण तिने डाव टाकायचा प्रयत्न केला केळ्या वर.
शिव काल पण खुप चिडलेला दिसला जेव्हा शिवानी वीणा शी बोलत होती. गडी खरच प्रेमात पडला का काय ?
वैशाली म्हणाली पण त्याला की तिचं तिला पाहुन घेउदेतत, तु नको मधे पडु.
शिव चं असच चालु राहिलं तर त्याची सई होणार यावेळी.

कविता चांगली होती.>>+११
कागद पेन कुठून मिळालं तिला लिहायला?>> कागद कुठून मिळाला माहित नाही .. पण पेन ऐवजी कदाचित काजळ पेन्सिल वापरली असावी आणि कागद म्हणून टिशू पेपर , पण तो कागद टिशू पेपर इतका पात्तळ नव्हता वाटत
पण एक आहे married नाहीये कोणी बहुतेक, मागच्यावर्षी राजेश आणि पुष्कर होते आणि मुलंही होती त्याना>> तुम्हाला शिव आणि वीणा पैकी कोणाचं लग्न झालेलं नाही असं म्हणायचंय का ?! नाहीतर केळकर ,नेहा, माधव , किशोरी यांची लग्न झालीयेत कि आणि टिकलीयेत .. बाकी वैशाली रुपाली चा डिवोर्स आहे ना ?

हीना ने टॅटू काढून शीव चे टॅटू काढून घेतल्याचे महत्व कमी केले. तिच्या साठी खरोखर कठिण होते . एक तर रुपाली आणी तिचे चांगले बॉन्डींग नव्हते. वर आणी रुपालीचे नाव 3अक्षरी आहे .
शीव ला टॅटू काढणे भाग होते कारण नाहितर लोकानी त्याच्यातील आणी वीणातिल मैत्रीला फ़ेक बोलले असते. शिवाय तो रोडिज मधुन आलय सो कोणतेही टास्क करायची त्याची मानसिक तयारी असेलच. कारण तिथेही टास्क खुप कठिण असतात.
हीना ने टॅटू नसते केले तर शीव भाव खाऊन गेला असता पूर्ण.

हिना चा स्वभाव पहिल्यापासुनच चांगला आहे पण तिला दोन्हीकडच्या गृपने आपल्यात समाऊन नाहि घेतलं अजुन पर्यंत त्यामुळे तिला एकटं पडल्यासारखं वाटतं.. रविवारी ती म्ह्टली सुद्धा माझे दोन मित्र मी मॅडी अन नेहात बघते म्हणुन मला ते दोघं आवडतात पण ती दोघहि मला किनारा करतात.. वाईट वाटलं त्यावेळचं तिचं रडु पाहुन.
नेहा चतुरस्त्र व्यक्तीमत्वाची आहे.. खुप हुषार.

नेहा हुषार आहे. जरा थोडी अजून पॉजिटिविटी दाखवता आली तर शी विल बी द विनर! रुपाली संधीसाधूपणे शिवानी ने दिलेल्या आयडियेवर लगेच ग्रुप करायला तयार झाली. आता वीणा बिणा गेले उडत! वीणा किंवा ती कोणीच कॅप्टन होऊ नये असे वाटत होते. रुपाली जिंकली आहे वाटते पण.
शिवानी एकेकांची समोर बसवून शाळा घेतेय. लवकरच ती पाहुणी असल्याचे लोकांच्या लक्षात येईल असे वाटते. ती परत आत आल्याने पराग फारच अपसेट झाला आहे असा व्हिडिओ कुठल्यातरी यूट्यूब चॅनल वर दिसत होता Happy डिल्यूजनल असतात लोक.

तुम्हाला शिव आणि वीणा पैकी कोणाचं लग्न झालेलं नाही असं म्हणायचंय का ?! >>> हो त्या दोघांचाच विषय सुरु होता ना. त्या अनुषंगाने लिहीलं. मागच्यावेळी राजेश रेशम आणि पुष्कर सई यांची तुलना करत.

हिना चा स्वभाव पहिल्यापासुनच चांगला आहे पण तिला दोन्हीकडच्या गृपने आपल्यात समाऊन नाहि घेतलं अजुन पर्यंत त्यामुळे तिला एकटं पडल्यासारखं वाटतं. >>> तिच्यासारख्यांना पहील्यापासून आणायला हवं होतं खरंतर, टास्कपण चांगला करते ती. सर्व करुन घेणार आणि तिला काही पहील्या तिघांत घेतील असं वाटत नाही.

https://www.youtube.com/watch?v=-LkhyzYxomU

रुपाली झाली कॅप्टन. खरंतर कालंच रुपाली २-१ ने पुढे होती. अजून टास्क कशाला करायला लावायचे. काल तिला विनर घोषित करायला हवं होतं.

पण मला एक कळत नाही..आपल्या उमेदवाराचा विजय होण्यासाठी समर्थकांना कशाला वेठीस धरल आहे.. जो तो आपल्या हिमतीने व्ह्यायला पाहिजे कप्तान. हे म्हणजे 'बेगानी.शादी मे अब्दुला दिवाना' असं झाल... >>> हो ना. मागचा वीणा माधवच्यावेळेचा टास्क मस्त होता, टफ होता. फोन task पेक्षा तो छान होता, दोघांनी जबरदस्त केला. नंतर नेहाने येऊन कबूल केलं वीणा माधव बोलत असताना की मी खूप त्रास दिला वीणाला पण तिने छान केला. नेहा आणि वीणाचं जमतं मात्र चांगलं.

नेहा हुषार आहे. जरा थोडी अजून पॉजिटिविटी दाखवता आली तर शी विल बी द विनर! >>> नेहाच होईल. शिव वीणाचा फोकस हललेला आहे, ते सुधारणार नाहीत. नाहीतर नेहापेक्षा शिव जास्त चांगला आहे. पण त्याला म मां नी सांगूनही डोक्यात प्रकाश पडत नसेल तर काय करणार.

नेहात क्वालिटी आहेच पण नशीबही उत्तम साथ देतंय तिला त्यामुळे तिच्या मार्गातले दोन अडथळे दूर झाले शिवानी, पराग आणि आता शिव वीणा पण आपल्या कर्माने दूर होतील.

फक्त नेहा मेघासारखी लोकप्रिय नाहीये त्यामुळे अगदी प्रचंड बहुमताने वगैरे होणार नाही. तिच्या बाजूने पोस्टस येत असल्या तरी विरुद्धही येतात.

शिव आता वीणाला साथ देतोय तो टास्कचाही भाग आहेच की. त्यात काही चुकीचं वाटत नाही. टास्क संपल्यावर काय करतात ते पाहू.
बरं गेल्या सीझनला पण असे जे कोणी लव्हबर्ड्स होते, त्यांच्याबद्दल मांजरेकर असंच बोलले होते का?

आजचा साष्टांग नमस्कार आणि टॅटू चा टास्क भारी होता >>>>>>+++++++१११११११११

Shiv has nominated himself for Veena, Lol ,not suprising at all ! >>>>>>>>> अगदी अगदी बाथटब टास्क सोडून इतर टास्कसमध्ये शिवचा बळीचा बकरा बनवला जात होता. बिचारा शिव.

कविता चांगली होती.>> हम्म.

Pages