बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अवांतर: केळ्या बिग बॉस मध्ये आल्यापासून त्याची ती सपट लोशन ची जुनी जाहिरात परत TV वर यायला लागलीय)>> त्यात केळ्या फारच चपट दिसतोय Lol सपट ची चपट जाहिरात

कालच्या टास्क मध्ये काहीच दम नव्हता. रुपाली आणी अभिजित दोघेही स्ट्रांग असल्यामूळे कोणीच फोन ठेवनार नाही हे उघड होते. जास्त फायदा हा दुसर्यानदा खेळणार्या सदस्याला होता. अभिजित ने विचार करुनच रुपालिला पहले जायला संगितले असणार आणी तिने लगेच मान्य ही केले. तेंव्हा च ती हरलेली. सगळा आपला timepass चालला होता. पराग नसुन ही पराग चे नाव भरपुर वेळेला आले.

>>>स्पर्धक वरणभात, दुध भात झाल्यावर. प्रेक्षकांना वरण भात म्हणून नावं ठेवण्यात काय अर्थ आहे.+१११११<<<
+१११११११
आता असतो एखाद्याचा चॉईस चांगला वरण-भात मनाला बरा वाटतो. रोज जल्लाद तिखट खावून काय होणार दुसर्‍या दिवशी शेवटी. Wink हिंदी बिबॉ बघावा सरळ, मराठी बघू नये.

केळकर आणि वैशाली फारच धूर्त, रुपालीला पर्सनल मुद्यांवरून बोलले, मग नेहा आणि टीमनेपण तसंच करायला हवं होतं यार .. रुपालीची फॅमिली आणली ना मध्ये?? मग, जशास तसं करायचं ना!!
खरी मजा तेव्हा येईल जेव्हा केळकर विरोधात वैशाली, विनाविरुद्ध शिव असे सामने होतील, पण ते बिगबॉस ने होऊ दिलं तर म्हणा!!
बिचुकले, शिवानी , पराग, सुरेखा पुणेकर हे थोडे भांडखोर आणि वाचळवीर लौकर बाहेर पडल्याने शो spice up होत नाहीये, त्यात हिनाने पण शिवला सरळ ignore केल्याने काहीही रंगत येत नाहीये. म्हणून वीणा- रुपाली, वीणा- शिव ड्रामा जास्त दाखवावा लागतोय.

माझं वैशाला समर्थन आहे असं नाही पण टास्क मध्ये ती रुपाली बद्दल जे काही बोलली ते अगदी खरं होतं.. रुपाली महानाटकी आहे.. नात्यांची तिला किंमत नाहिये... In fact घरातून जर कोणी बाहेर गेलं तर तिला आनंदच होतो आणि विशेष म्हणजे ती ते दाखवते सुद्धा दिगंबर गेला तेव्हा आणि सुरेखा गेल्या तेव्हा सुद्धा तिला आनंद झाला असंच वाटले.. पराग गेल्यावर खोटी नाटकं केली आणि तो घरात आला तेव्हा खरा रंग दाखवला... आता वीणा वर नुसती जळत असते...मला सध्यातरी रुपाली अज्जिबात आवडत नाहिये... हळूहळू घरातल्यांना सुद्धा लक्षात येतंय... बाकी केळकर आणि वैशाली कसेही असले तरी game मस्त खेळतात.. Specially केळकर स्वतःच डोकं वापरून खेळतो.. मुद्देही perfect असतात त्याचे.... शिवने रुपाली ला emotionally torture केलं ते आवडलं मला...

बिचुकले, शिवानी , पराग, सुरेखा पुणेकर हे थोडे भांडखोर आणि वाचळवीर लौकर बाहेर पडल्याने शो spice up होत नाहीये, त्यात हिनाने पण शिवला सरळ ignore केल्याने काहीही रंगत येत नाहीये. म्हणून वीणा- रुपाली, वीणा- शिव ड्रामा जास्त दाखवावा लागतोय.
.....अगदी खर आहे.बिबॉस भांडण लावायचा प्रयत्न करत आहेत,होतही आहेत,पण किशोरी ,रुपाली अशा वेळी बँकफूटवर जातात,मग वीणाचाच आवाज यायला लागतो,जो अशक्य आहे सहन करण
आता जर वीणालाच बिबॉसने गप्प केल तर मग भांंडणार कोण,अस झाल आहे.

मला अस का वाटतय की विणा आणि शिवने इमोशनल ड्रामा केल्यामुळे रुपाली हरली टास्कमध्ये?

बिचुकले, शिवानी , पराग, सुरेखा पुणेकर हे थोडे भांडखोर आणि वाचळवीर लौकर बाहेर पडल्याने शो spice up होत नाहीये, त्यात हिनाने पण शिवला सरळ ignore केल्याने काहीही रंगत येत नाहीये. म्हणून वीणा- रुपाली, वीणा- शिव ड्रामा जास्त दाखवावा लागतोय. >>>>>>>>> सहमत आता तरी बिबॉने वाईल्ड कार्ड आणायला हवेत. अजून दिड एक महिने बाकी आहेत आणि नऊच स्पर्धक!

शिव वैशालीला काहीच बोलला नाही. >>>>>>>>>>+++++++++११११११११११

नेहा काल रडली, तेव्हा मला जाम वाईट वाटलं, ज्येन्यूईन वाटली. >>>>>>>> दोन दिवसापासून ती शान्त शान्त आहे.

वीणा छान दिसत होती >>>>>>> विणा आणि शिव दोन्हीही छान दिसत होते.

टास्क संपल्यावर शिवला , आपण कोणाच्या कॅरॅक्टरबद्दल खालच्या पातळीला उतरून बोलू नये, असं वाटायला लागलं. ते अर्थात हीनाने अभिजितबद्दल जो अँगल पकडला त्याबद्दल होतं. >>>>>>>> ती काय चुकीच बोलली? अभिजित वागतोच कधी कधी बायकान्सारखा.

शिव हिनाला ते सान्गत होता, वाटल आता पुन्हा भाण्डतात की काय कचाकचा. काल मात्र त्यान्नी सरप्राईझिन्गली चान्गलया पद्दतीने सॉर्ट आऊट केल.

आताच यूट्युबवर डीएसके टॉक्स पाहिल.
त्यांच अस म्हणण आहे की वीणा आणि शिव जे मँचिंग कपडे घालतात किंवा जे रुपाली वीणाच रुसवे फुगवे वैगरे आहेत ,ते इनपूट्स त्यांना आतून दिले जातात.
काचेच्या पलीकडे 100लोक मानिटर करत असतात,टास्कच्या तयारीच्या निमित्ताने किंवा,पँन्ट्रीजमध्ये जाण्याच्या निमित्ताने जे लोक येतात तते संदेश घेऊन येतात.काय करायच आहे.
एकंदरीत त्यांच अस म्हणण आहे की हा बर्यापैकी स्क्रिप्टेड शो आहे.
खरखोट माहित नाही. >>>>>>>> अस जर असत ना UP, तर जेव्हा पराग टिकेल तो टिकेल टास्कच्या आधी एविक्शनच्या भीतीने फ्रस्टेट झाला होता, तेव्हा बिबॉने त्याला इनपुटस दिले असते ना की ,'जस्ट चिल, वोटिन्ग लाईन्स बन्द आहेत. सो, कुणीही एव्हिक्ट होणार नाही ह्या आठवडयात. बिनधास्त खेळ.' मग पुढच रामायण घडल नसत.

आज नॉमिनेशन टास्क आहे.

कुणी ऑब्जर्व्ह केल का की, बिचकुलेच्या बेडशेजारी अजूनही त्यान्च्या आईबाबान्नाचा फोटो आहे. ह्याच सामान अजून बाहेर नेलच नाही बिबॉनी? Uhoh

जेव्हा पराग टिकेल तो टिकेल टास्कच्या आधी एविक्शनच्या भीतीने फ्रस्टेट झाला होता, तेव्हा बिबॉने त्याला इनपुटस दिले असते ना की ,'जस्ट चिल, वोटिन्ग लाईन्स बन्द आहेत. सो, कुणीही एव्हिक्ट होणार नाही ह्या आठवडयात. बिनधास्त खेळ.' मग पुढच रामायण घडल नसत.>>> रामायण-महाभारत सगळे घडायला हवे बिबॉला Wink त्यामुळे तसे इनपुटस ते कोणालाच देणार नाहीत.

{मला अस का वाटतय की विणा आणि शिवने इमोशनल ड्रामा केल्यामुळे रुपाली हरली टास्कमध्ये?}
कारण तुम्ही नीट किंवा अजिबातच पाहिलं नाही.

Match चा निकाल पहिली batting कोणाची यावरच ठरला. तिथे या लोकांनी डोकं वापरलं नाही. नियम समजून घेतले नाहीत.

बाकी वैशाली आणि अभिजीतला बिचिंग करण्याचा भरपूर सराव आहे.
नेट ऐवजी आज बिग बॉसनी त्यांना मेन पिचवर आणलं इतकंच.

तिचा बोलण्याचा टोन आणि पीच अशक्य आणि असहनीय आहे >>हो हे आहेच... ते वीणाच्या बाबतीत पण होतं माझं.. तिचे हातवारे करून बोलणं अगदीच डोक्यात जातं... पण रुपाली आत्तापर्यंत जे वागली आहे, बिचुकले जवळ खोटं रडणं, पराग गेल्यानंतर एक चेहरा अन्‌ तो परत आल्यावर दुसरा चेहरा, किशोरी शहाणे सोबत जे ती वागली ते बघून असं वाटतं की तिची अटॅचमेंट कोणासोबतच नाहिये.. जो weak दिसेल त्याला ती target करते.. त्यामुळे वीणाने तिच्यावर जीव ओवाळून टाकावा अशी अपेक्षा तिने मुळीच करू नये... वीणा शिवचं सगळे ऐकते, त्याला मनवते तर हिच्या पोटात का दुखत? Shiv deserves that treatment in their relationship...वीणाला जेव्हा बरं नव्हतं तेव्हा रुपालीने सुद्धा चौकशी केली नव्हती हेही आपण पाहिलंय. मग आता हिच्यावर उलटल्यावर इतका आकांडतांडव करायला काय झालं आणि अजुन एक गोष्ट अशी की रूपाली नेहमीच म्हणते आम्हाला एकमेकींच्या मनातलं न बोलता कळतं मग इतक्या साध्या गोष्टींवरुन या दोघी कशाला भांडतात??just because of immaturity..

यावेळी वैशाली अभिजित केळकर शीव सोडले तर युनीटी कुणा मध्येच नाही. वीणा त्या दिवशी अभिजित शीव वैशाली बरोबर नोमीनेशन डिसक्स करत होती . आणी ती काल बोलत होती मी कुणाबरोबर ही ग्रुप मध्ये नाहिये. ती खोटे का बोलत आहे.
रुपाली बिचुकले इतके बोलले तर जराही react झाली नाही उलट दुसर्या दिवशी त्यांची माफी मागितली.
आणी काल बझर झाल्यावर लगेच रडू लागली. वीणा रुपालिला काल contradiction ची राणी बोलत होती.

मागच्या सीज़न ला मेघा विनर होणार हे तिला असणारया सपोर्ट वरुन अधीच सामजलेले. पण यावेळी मात्र विनर कोण असणार याबाबत शेवट पर्यंत उत्सुकता असणार आहे.

बिग बॉस ने वीणा-शिव, माधव-नेहा, किशोरी -रुपाली, वैशाली-हीना अशा जोड्या ह्या टास्क साठी निवडायला पाहिजे होत्या Happy

केळ्या आणि वैशाली मैत्री म्हणजे दोन स्वार्थी लोकांची मैत्री स्वतःचे साध्य पुरी होइपर्यंत आणि त्यावरच फोकस आहे.. बाकीची पण स्वार्थी आहेत पण बालिश आहेत त्यामुळे लक्क्ष्य उडते आणि गोत्यात येतात.

शिव फार क्युट दिसत होता.

ही हिना प्रेमा बिमात आहे का शिवच्या, तिकीट देऊन टाकलं. डाळ अजूनतरी नाही शिजली तिची, आणि ती खूप मोठी वाटते त्याच्यासमोर. त्यांची जोडी फार काही चांगली दिसली नसती.

ती आणि रुपाली कशी विचित्र लिपस्टीक लावतात. नाही बघवत. पर्सनॅलिटी छान आहे दोघींची पण माझं लक्ष लिपस्टिककडेच जातं.

स्वतः च्या हाताने कोणी काही करून घेतलं नाही तर voting lines बंद आहेत. यावेळी सिक्रेट रुम असेल का. आतातरी वाईल्ड कार्ड एन्ट्री असेल का.

शिव वाचला त्याचा वीणाला कित्ती आनंद झाला, खात्री होती तिला. केळकर शिव दोघांची खेळी व्यर्थ.

शिव वीणा असते तर वीणानेच त्याग केला असता असं वाटतं.

वीणाने वैशालीची छान acting केली. तिला कोणाचीच फ़िकीर नाही, शिव सोडला तर. किशोरीताई अगदी एकटी पडलीय, दोघींनी एकटे पाडलं तिला.

एकंदरीत फार बोअर एपिसोड, ह्यांच्याकडे काही दाखवायलाच नाहीये.

मी जरा उशिरा लावलं, सोनीवर करोडपतीमध्ये एका शेतकरी काकांनी पंचवीस लाख जिंकले, ते बघत होते.

बिबॉ ला आता काही लीगल इश्यूज मुळे आता फिजिकल टास्क्स ठेवायला अडचण आहे का? कसली फडतूस टास्क्स आणताहेत आता!!
आजचे ही किती प्रेडिक्टेबल होते!! निदान जोड्या तरी इन्टरेस्टिंग करायच्या ना! आताच्या जोड्यांमधे कोणी कोणाला तिकिट देणार नव्हतेच. फा. फॉ केली सगळी कॉन्वर्सेशन्स. अति बोरिंग.
बाकी वैशाली म्हटली ते पटले मला, किशोरीला काहीही झेपत नाहीये. फार मंदपणा करतेय. घरी पाठवायला हवे आता तिला.

आणि टास्क संपल्यावर वैशाली आपल्याबद्दलच तिच्या ग्रूपला सांगतीय हे माहित असुनसुद्धा तिथेच जाउन उगाच खोट्याखोट्या हसऱ्या चेहऱ्याने स्वताचे चाललेले "गुणगान" ऐकत राहिली
काहीतरी सेल्फ एस्टीम ठेवा राव!

कालचा भागही नाही पाहिला,आपण हरल्यामुळे मूडच गेला,धोनीसाठी खूप वाईट वाटत होत.असो.
पण सध्या बिबॉ बघावस वाटत नाही हेच खर.
वाईल्ड कार्ड एंन्ट्री बघू कोण आहेत त्या.

नेहा शांत झाली अन बी बी मधली हवाच गेली Happy
विणा रुपाली एकमेकींच्या मैत्रिणी म्हणवतात पण विणा काल रुपालीच्या मागे तिची अ‍ॅक्टींग करत होती हे बर नाहि.
नॉमिनेशन टास्कमध्ये कुणालाच स्वतःबद्दल खात्री नाहि कि ते घरात कितपत टिकतील म्हणुन.
मॅडी म्हणतो आता आता त्याला गेम कळु लागलाय Happy

विणा काल रुपालीच्या मागे तिची अ‍ॅक्टींग करत होती >>> रुपाली केळकर झाला होता, वीणा वैशालीच्या समोर बसून वैशालीची करत होती. चांगली केली तिने तिची अ‍ॅक्टींग.

वीणा येडी आहे मात्र. तिला आता जमिनीवर आणायला हवं मात्र म मांनी.

नेहा बाकी डॅशिंग असते पण नॉमिनेट कोणी करु नये म्हणून फार विनवण्या, अजीजी करते अगदी पहील्यापासून. वीणा मात्र तिच्यासमोर काल उठून दिसली, फार विनवणी नाही की काही नाही, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होती. नेहाची विनवणी बघून कंटाळा आला. वीणा जबरदस्त बोलत होती की अशी नाही nominate होणार, खेळून होईन. स्वत:च्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही मारून घेणार.

नेहा शांत झालीय हे बरोबर. माधवने पण सांगितलं आहेना, हा आठवडा तू सुधारतेस का बघू. ती प्रयत्न करतेय.

मॅडी म्हणतो आता आता त्याला गेम कळु लागलाय >>> हो खरं आहे, तो मस्त खेळायला लागलाय.

पण काल वैशाली आणि किशोरी एकमेकींशी जे काही बोलत होत्या, त्याला कन्व्हिन्स करणं असं म्हणतात का? Lol
किशोरीला वैशाली कधीही झेपणार नाहीच डिबेटमध्ये, कारण किशोरीचे मुद्दे कितीही व्हॅलिड असले तरी वैशाली इतकी पक्की आहे की सरळ पॉइंट टु पॉइंट वाद घालणारच नाही ती. काल ती किशोरीलाच पटवत होती, की किशोरी किती इन्कॉम्पिटन्ट आहे आणि बिचार्‍या किशोरीला तिचे मुद्दे खोडताच आले नाहीत, कारण ती तशी साधी आहे, तोंडावर भांडू शकत नाही. मला किशोरीबद्दल वाईटच वाटलं जरा.

केळ्या कॅप्टन होऊनही त्याला नॉमिनेशनपासून वाचण्याचा काहीच फायदा होणार नाहीये याचंच फार छान वाटतंय! Lol

बाकी दिवसभर हे लोक काय करत असतील? बोल बोल किती बोलणार? काम काम किती करणार आणि स्वयंपाक तरी किती करणार? कालचा टास्क तर वेळखाऊही नव्हता.

खरच, किती रटाळ कॉन्व्हर्सेशन , फाफॉ करण्याच्या लायकीचीच होती.
किशोरी वैशाली जरा फनी होतं पण सगळे ऑपोझिट स्वभावाचे लोक, कोण कशाला होईल कन्व्हिन्स ?
वीणा-शिव, केळ्या-वैशाली, मॅडी-नेहा अशा पेअर हव्या होत्या, मग समजल असतं कोण किती त्याग करणारे मित्रं आहेत !कालही फोनवर अशाच अनयुज्वल पेअर हव्या होत्या.
केळ्या आणि वैशाली विरुध्द टिममध्द येतील, तेंव्हा पहायला हवं काय होतय !
या आठवड्यात एलिमिनेशन नाहीये तर वाइल्ड कार्ड एंट्री होणार कि परवडत नाहीये बिबॉच्या खिशाला ? Proud

मी काल फेडरर आणि राफा अनुक्रमे निशिकोरी आणि क्बेरी यांना आपणच उपान्त्य फेरीत जाण्यास कसे योग्य आहोत, हे कन्व्हिन्स करताना पाहत होतो.

ब्रेकमध्ये इकडे डोकावलो, किशोरी बिच्चारी वाटली. वीणा नेहाला दम मिळालेला दिसला.
नेहा टास्क व्यतिरिक्तही कायम जिंकायच्याच आवेशात असायची, तिलाच टास्क धड करत नाही, सीरियस नाही, म्हणून दम. आमूलाग्र बदल झाला तिच्यात. आणखी तीन दिवस आहेत या आठवड्याचे. तेवढ्यात आणखी किती बदलते ते पाहायचं.

Pages