तू....तूच ती!! S२ भाग १२

Submitted by किल्ली on 8 June, 2019 - 05:59

आधीचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा:
भाग १ : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ : https://www.maayboli.com/node/66880
भाग ३ : https://www.maayboli.com/node/67283
भाग ४ : https://www.maayboli.com/node/67712
भाग ५ : https://www.maayboli.com/node/68160
भाग ६ : https://www.maayboli.com/node/68226
भाग ७ : https://www.maayboli.com/node/68459
भाग ८ : https://www.maayboli.com/node/68631
भाग ९: https://www.maayboli.com/node/69117
भाग १०: https://www.maayboli.com/node/69316
भाग ११: https://www.maayboli.com/node/70193
-------------------------------------------------------------------------------------
शांतपणे दोघांनी जेवण केलं. कुणीच कोणाशी काही बोललं नाही.
सगळ्या घटनांचा अर्थ हळूहळू श्रुतीला समजू लागला होता. आदित्य आणि सुनंदा मावशी ह्या दोघांचच घरात राहणं, सुनंदा मावशीचं स्वतःला कामात आणि व्याखानांमध्ये बुडवून घेणं, मध्येच हळवं होणं, कधीकधी एकटीनेच खोलीत तासनतास बसणं, जास्त कार्यक्रमांना कुठे बाहेर न जाणं वगैरे. तिने एकदोनदा सुनंदा मावशीच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहिलं होतं. पण घरात आदित्यच्या बाबांचा एकही फोटो कसा नाही ह्याचं तिला आश्चर्य वाटलं.

श्रुती विचारात हरवली होती. तिला असं विचारात गढलेलं पाहून आदित्यला जणू काही ती पुढे काय विचारणार ह्याची कल्पना आली होती. तरीही तो शांत होता. एकदम बाबांचा विषय निघाल्यामुळे भावना अनावर होतील, रडू कोसळेल ह्या भीतीने त्याला आता त्याची स्वतःची space हवी होती. पण असं एकदम उठून गेलो तर तिचा गैरसमज होईल म्हणून तो हातातील पाण्याच्या पेल्याशी चाळा करत चुळबुळत एकाच जागी बसून राहिला.

दारावरची बेल वाजली. श्रुती उठलीच होती पण तिच्या आधी आदित्यने दार उघडले. सुनंदा मावशी आली होती.
"कसं झालं गेट-टुगेदर आई? मजा आली का?"
"हो रे, धमाल केली आम्ही! किती दिवसांनी भेटलो सगळ्याजणी! खूप गप्पा झाल्या."
हातातली पर्स समोरच्या सेंटर टेबलवर ठेवून सुनंदा मावशी किचन मध्ये पाणी प्यायला गेली. आदित्य तिच्या मागोमाग गेला.
"मी चहा करू तुझ्यासाठी? की कॉफी घेणारेस ?"
पाण्याचा एक घोट घेऊन आदित्यची आई म्हणाली,
"काहीही नको रे. मी आता मस्त ताणून देणार आहे. अरे, तिथे निरनिराळे खेळ खेळलो आम्ही. दंगा घातला. ह्या वयात शोभत नसला तरी! त्यामुळे दमायला झालंय. पण शरीर दमलं असलं तरी मनाला ताजंतवानं वाटतंय."
सोफयावर बसत श्रुतीकडे बघून सुनंदा मावशी पुढे म्हणाली,
"मला ना श्रुती, खूप हलकं फुलकं वाटत आहे. मनावरचा ताण गेल्यासारखं.
खरंच आपले मित्रमैत्रिणी स्ट्रेसबस्टर असतात आपल्यासाठी! भेटत राहिलं पाहिजे. बोलत राहिलं पाहिजे. हो ना?"
"हो मावशी, खरंय तुझं. भेटलो, बोललो नाही तर एकमेकांच्या आयुष्यात काय चालूये हे कसं समजणार?"

श्रुतीचे वाक्यातील विरोधाभास जाणवून जरासं चिडून आदित्य म्हणाला, "अगदी बरोबर.
पण आई मला सांग, तुझ्या मित्रमंडळात अशी लोकं आहेत का, जी कोणाला न सांगता सवरता अचानक गायब होतात, संपर्क ठेवत नाहीत आणि मित्र म्हणवतात ? अशा लोकांपासून सावध राहा बरं.. नुसत्या बडबडीचे धनी असतात असे लोक."

"असं कोणी करत नाही रे आणि जरी असं झालं तर आपण त्रास नाही करून घ्यायचा. वेद, तू का चिडतोयस पण? काय झालंय ?
"कुठे काय, काही नाही" असे म्हणून आदित्य तडक त्याच्या खोलीत निघून गेला.
"हल्ली जरा जास्तच चिडचिड करतो. ऑफिसचं कामही खूप वाढलंय ना त्यामुळे असेल. पण आज जरा वेगळाच वागला.काय झालंय असेल गं ह्याला?" आदित्यच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत सुनंदा मावशी म्हणाली.

"जाऊ दे गं मावशी. चहा हवा असेल तेव्हा येईल परत तो. तूही आराम करणार होतीस ना. आत जाऊन झोप, मीही एक assignment पूर्ण करते. खूप दिवसांपासून अपूर्ण राहिलीये आणि आता मला ती पूर्ण केलीच पाहिजे."
असं म्हणून श्रुतीने तिथले पाण्याचे ग्लास उचलले. जागेवर नेऊन ठेवले. एक तांब्या पाण्याने भरून पेल्यासहीत सुनंदा मावशीच्या खोलीत नेऊन ठेवला.
तिला आजवर कधीच न दिसलेला एक छोटासा फॅमिली फोटो मावशीच्या बेडशेजारी लॅम्पजवळ ठेवलेला होता. त्यात सुनंदा मावशी, आदित्य आणि त्याचे बाबा ह्या तिघांची बागेतली प्रसन्न छबी टिपली होती.

श्रुती चटकन तिथून निघून स्वतःच्या खोलीत गेली आणि पुन्हा एकदा पश्चातापाच्या आगीत होरपळू लागली. जेव्हा जवळची मैत्रीण म्हणून आदित्यला सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा मी त्याची साथ देऊ शकले नाही, ह्या गोष्टीमुळे खूप अपराधी वाटत होतं. विमनस्क अवस्थेत ती खुर्चीवर बसली. assignment तर पूर्ण करावीच लागणार होती. तिने लॅपटॉप उघडला, on केला. जरा फ्रेश वाटावं आणि assignment करण्यात लक्ष लागावं म्हणून शांत स्वरातली गाणी लावली. हार्डडिस्क मधला काही डेटा लागणार होता. म्हणून तीही तिने लॅपटॉपला जोडली.

आवश्यक तो डेटा कॉपी केल्यानंतर तिची नजर हार्डडिस्क मधल्या एका फोल्डरवर पडली. त्या फोल्डरचं नाव होतं, "मिशन आदित्य ".
श्रुतीला वाटलं आदित्यने हार्डडिस्क वापरली व तो त्याचा डेटा डिलीट करायला विसरला. असू देत, आपणच डीलीट करूया असं म्हणून तिने फोल्डर आयकॉन वर right क्लिक केलं. पण त्या फोल्डर मध्ये काय डेटा असेल ह्याची उत्सुकता तिला स्वस्थ बसु देत नव्हती.काही महत्वाचं असू शकतं असा विचार करत तिने तो फोल्डर उघडण्यासाठी enter मारला. पण हाय रे किस्मत! फोल्डरला पासवर्ड होता. बरीच खटपट केल्यानंतर श्रुतीला तो फोल्डर उघडण्यात यश मिळालं.

त्यातल्या फाइल्स ती वाचू लागली. सुमारे ४-५ तास ब्रेक न घेता अतीव उत्साहाने श्रुती त्या फोल्डर मधल्या माहितीचा अभ्यास करत होती. नोट्स काढत होती. जेव्हा सगळं मनाप्रमाणे झालं तेव्हा ती खोलीच्या बाहेर आली. आदित्य आणि सुनंदा मावशी जेवून झोपायला गेले होते. बाहेर रात्र झाली होती पण तिला मात्र आशेचा किरण दिसू लागला होता. "मिशन आदित्य" काय आहे हे तिला समजलं होतं आणि आदित्य उर्फ वेदला आता ती एक मैत्रीण आणि त्यावर प्रेम करणारी प्रेयसी ह्या दोन्ही नात्यांनी मदत करणार होती.

रुतीने ठरवलं होतं की आता आपण स्वतःहून आदित्यला प्रपोझ करायचं. तो अजूनही प्रेम करतो का हे स्पष्टपणे विचारायचं. हि बैचैनी, अस्वस्थता तिला आता नकोशी झाली होती. प्रेमात हिशोब नसले तरी आव्हान असतेच. एकमेकांसाठी खूप काही कारवाई लागते, तेही निरपेक्षपणे! शिवाय प्रेमाची वाट सरळ साधी नसते. प्रेम मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. मन जिंकावे लागते. प्रेम टिकवावे लागते, निभवावे लागते. ह्या गोष्टींची श्रुतीला जाणीव होत होती. तिचे प्रेम ती परत मिळवणार होतीच. at any cost !!

पण श्रुतीला कुठे माहित होतं ती मिळवण्यापुरते प्रयत्न करून थांबणार नव्हतीच मुळी! कारण नशीब तिला पुन्हा एका नवीन वळणावर आणणार होतं. तिलाच नाही तर आदित्यला सुद्धा! शेवटी ह्या जन्मी केलेल्या कर्माची फळं ह्या जन्मीच भोगावी लागतात नाही का? सगळे हिशोब चुकते करावे लागतात.
--------------------------------------------------------------

आज आदित्यला ऑफिसला पोचायला जरा उशिरच झाला होता. गेले ४-५ दिवस कामाचा लोड उपसून आणि रात्रीपर्यंत ऑफिसमध्ये थांबून तो थकून गेला होता. त्यामुळे आज उठायला उशीर झाला. वीकएंड ला श्रुतीबरोबर झालेल्या गप्पा, त्यानंतर अचानक बाबांचा निघालेला विषय ह्यामुळे त्याच्या मनात मिश्र विचारांचं वादळ उठलं होतं. त्याला मानसिकरीत्या ताण आला होता. त्यात हे कामाचं टेन्शन! आदित्य पुरता वैतागून गेला होता. भरीस भर म्हणजे श्रुती 'त्या' दिवसानंतर त्याला भेटलीच नव्हती. ती गावाला गेली असं त्याला आईकडून समजलं. त्यामुळे थोडाफार विरंगुळा किंवा आनंद सुद्धा मिळत नव्हता. तो आतुरतेने तिची वाट पाहत होता. ह्यावेळेस त्रोटक msg पाठवून श्रुती गायब झाली होती. मैत्रीणीच्या लग्नासाठी बाहेरगावी जातेय एवढाच तिने त्यात लिहिलं होतं. कधी परत येणार वगैरे काहीच उल्लेख नव्हता. आदित्य ने न राहवून कॉल केला तर महत्वाचं काम आहे ते पण करायचं आहे असं फोन वर म्हणाली आणि जास्त न बोलता कॉल कट केला. त्यामुळे आदित्य तिच्यावर जरा चिडलाच होता. "नीट सांगता येत नाहीच हिला काही. सतत सस्पेन्स create करते. मी मात्र अंदाज लावत बसायचं." असं स्वतःशी पुटपुटत त्याने लॅपटॉप on केला. भराभर मेल्स पाहिल्या, त्यांना उत्तरे दिली. एक मेल पाहून तो चरकलाच!

अखिलेश काका म्हणजे त्याच्या कंपनीचे संयुक्त व्यवस्थापक, संचालक हयांनी ती मेल पाठवली होती. त्यात असं स्पष्ट लिहिलं होत की आदित्य ह्यापुढे research lab आणि product engineering हे युनिट संभाळणार नाही. त्याच्याऐवजी एक नवीन व्यक्ती हे काम बघणार आहे. हा निर्णय काकांनी परस्पर कसा घेतला ह्याचं त्याला आश्चर्य वाटलं. बाबा गेल्यापासून पहिल्यांदाच काकांनी त्याला न कळवता निर्णय घेतला होता. महत्वाचं म्हणजे research lab आणि product engineering मध्ये त्याला विशेष रस होता. त्याने त्यावर खूप मेहनत घेतली होती. पण त्याला आतापर्यंत म्हणावे तसे यश आले नव्हते. कदाचित हेच कारण असावे काकांनी मला पदावरून दूर करण्याचे! पण असं कसं होईल? नवीन recruitment मला न विचारात किंवा विश्वासात न घेता झालीच कशी? आदित्य चं डोकं काम करेनासं झालं. ह्या बाबतीत त्यांनी काकांशी बोलायचं ठरवलं. त्यांना कॉल केला. त्यांना आदित्यचा कॉल अपेक्षित होताच असं म्हणून त्यांनी प्रत्यक्ष भेटून सगळी explanations देईन. तू काळजी करू नको असं सांगितलं. काका अजून १० दिवसांनी पुण्यात उरणार होते तोपर्यंत आदित्यच्या डोक्यात हा गुंता कायम राहणार होता. वैतागून तो डेस्क वरून उठला आणि कॉफी घ्यायला कॅफेटेरिया मध्ये गेला. कॉफीचे घोट घेताना विचारचक्र सुरु होतंच. शेवटी आपल्याला ब्रेक हवा आहे हे त्याला प्रकर्षाने जाणवू लागले. काकांनी केलं ते योग्यच असेल अशी मनाची समजूत घालून तो डेस्क वर परतला आणि यांत्रिकपणे कामं उरकू लागला. आवडतं काम हातातून गेल्यामुळे तो दुःखी झाला होता. कसाबसा त्याने आज ऑफिसमध्ये दिवसाचा वेळ काढला. आज मनस्थिती ठीक नव्हती. फोन पाहण्याची पण त्याची इच्छा होत नव्हती. शेवटी कंटाळून तो घरी निघून गेला.

घरी जाऊन सहज फोन पाहतो तर काय!
४ missed calls होते!
त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. पुन्हा कॉल येऊ लागला. स्क्रीन वर फ्लॅश होणारं नाव पाहून आदित्यचा मूड एकदम गुलाबी झाला. त्याने कॉल उचलला आणि म्हणाला, "Hi श्रुती "
......................................................................................................

(क्रमशः )
----------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
---------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झालेत नवीन २न्ही भाग..

इकडे एक टाइपो झालाय बहुतेक --
काका अजून १० दिवसांनी पुण्यात उरणार (उतरणार) होते

किती छान लिहिले आहेत आताचे दोन्ही भाग. पण प्लिज पुढचे भाग लवकर टाका ना. वाट बघून कधी कधी कथा विसरायला होते. पुभाप्र.

पुढे काही लिहायचं नसेल तर स्पष्ट सांगा तरी की ही कथा या पुढे स्थगित केलीय, वाचक विचारायचं आणि वाट पहायचं बंद करतील... रोज वाट पाहून हिरमोड होतो...