मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डीजे बाप्पांबद्दल छान आणि योग्य लिहिलंस.

पराग रुपाली एकत्र खरोखर पहिल्यापासून बोअर करतायेत.

किती बोलते वीणा. कंटाळा आला पॅ पॅ पॅ पॅ ऐकायचा. प्रत्येकवेळी सगळे मुद्दे बरोबरच असतात असं नाही.
आणि यावेळी वीकेंड च्या डाव मद्धे पराग ला कॉर्नर करणे एवढा एकच अ‍ॅजेंडा होता असं वाटलं.
मांजरेकर वीणा ला सरळ सरळ फेवर करत होते आणि पराग ला उगीच झापत होते असं वाटलं.
शिवानी गेली म्हणुन आता ममां ची नवीन लाडकी स्पर्धक वीणा दिसतेय Happy
नेहा दिसलीच नाही आज.पराग आणि वीणा वरच सगळा फोकस. पराग ला खुप हिंट दिल्या म मां नी . त्याने शहाणे व्हावे असं वाटतय.

किती बोलते वीणा. कंटाळा आला पॅ पॅ पॅ पॅ ऐकायचा. प्रत्येकवेळी सगळे मुद्दे बरोबरच असतात असं नाही.
आणि यावेळी वीकेंड च्या डाव मद्धे पराग ला कॉर्नर करणे एवढा एकच अ‍ॅजेंडा होता असं वाटलं.
मांजरेकर वीणा ला सरळ सरळ फेवर करत होते आणि पराग ला उगीच झापत होते असं वाटलं.>> +1 हो वीणा सगळ्यांच्या मध्ये बोलतच असते .

पराग कसाही असला तरिही त्याने दुसर्याच्या बद्दल बोललेले लगेच कबूल करतो इतरांसारखी घुमवून फ़िरुन उत्तरे देत नाही . रुपालीला मी लाइक करतो हे त्याने सरळ सरळ सांगितले . Friendship आहे असे खोटे उत्तर नाही दिले. वीणा आणी शिव वागतात एका couple सारखे आणी कुणी विचारले की बोलायचे friendship आहे . शिव चे सारखे वीणा च्या मागे मागे करण्याचा कंटाळा येतो .

मला तर शिव अन वीणा अजिबात आवडत नाहि... शिवचा दांडगटपणा न वीणाची पिटपिट.. कंटाळा येतो ते पाहताना..
काल बाप्पांच घरातुन जाणं... खुप वाईट वाटलं..सगळेच रडले.. वीणाला शिव जेव्हा समजावत होता तेव्हा मागे बाप्पा बसले होते.. त्यांनी २ गाणी म्हटली अगदि सुचक होती .. खुप हसु आलं तेव्हा Happy

बाप्पा किती गोड माणुस..खरच सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं जाताना त्याने.
कोणाला अनसेफ पण नाही करुन गेला जाता जाता ....

काल सुरेखा ताई खुप गोड दिसत होत्या त्या जांभळ्या साडीत .

वीणा किती जास्त आणि लांबलांब हातवारे करते. सारखंच डोकं फिरलेलं असतं तिचं. सतत तिरस्कार करत असते कोणाचा तरी. पराग तिचं बोलणं चालू असतं तेव्हा शांत बसतो, वागतो, बोलतो. ती स्वतःच्या वेळी अन् त्याच्या वेळातही बडबड करते. महा माजोरडी आहे. स्वतःला मोठी अॅक्टरेस समजते. अत्यंत फालतू नटी आहे. तिला कंटाळूनच मी राधा सिरीअल बघणं बंद केलं होतं.

हो ती सतत दुसर्याला कमी लेखत असते . मधुनच तिने किशोरी ताईचा makeup वाला काय मुद्दा काढला ते समजलेच नाही . तरीपण मला यावेळी बिग्ग बॉस विनर वीणा होइल असेच वाटते. आणी टॉप 5मध्ये वीणा पराग नेहा शिव वैशाली असतिल असे वाटते.
यावेळीच nominations रद्द करतील असे वाटते.

काल सुरेखा ताई खुप गोड दिसत होत्या त्या जांभळ्या साडीत . >>> हो हो त्या छान दिसत होत्या. राहीलं लिहायचं.

वीणा भोचकपणा, अति बडबड करते हे मान्यच. पण ती उत्तम खेळली माझ्यामते, परागला खरंच मामा बनवलं. पराग पकवत होता आणि किशोरीताई, रुपाली मनोभावे ऐकत होत्या तेव्हा जो काही स्टँड घेतला तेव्हा मला आवडली. कधी नव्हे ते यावेळी मी वीणा, शिव दोघांना वोटस दिली. फार नाही वीणाला एक, शिवला दोन.

अगदी शिवानी, नेहा, रुपालीपासून सर्व अ बिच्या मागे मागे करायचे. वीणा कधीच नाही. त्यामुळे तिचं कौतुक केलं ते योग्यच होतं. तिने त्यावरुन चढून जाऊ नये मात्र.

यावेळी कौतुक करा वीणाचं हे कलर्स मराठीनेच सांगितलं असणार कारण परागने आठवडाभर तिला सतत नावं ठेवली. त्याचा पचका करायचा होता कलर्सला बहुतेक Lol

वीणाला शिव जेव्हा समजावत होता तेव्हा मागे बाप्पा बसले होते.. त्यांनी २ गाणी म्हटली अगदि सुचक होती .. खुप हसु आलं तेव्हा >>>>>>> अगदी अगदी. मस्त होत ते. अच्छा जी मै हारी......... Lol

बाप्पा गेले तेव्हा सगळे रडले ते जेन्युईन होत. Happy

पराग च बनवून देतो त्याला हार्ट शेप चे सगळे तो फक्त घेउन जातो . आणी चपाती पराठे असतिल तर भाजतो. आणी मग वीणा ला देतो. >>>>>> ओ, अस आहे तर. धन्स स्वरुप आणि अमुपरी. Happy

हो ना पराग करून देतो सर्व, हे शिवसाहेब आयतं नेऊन दाखवतात फक्त आणि impression पाडतात. >>>>>>>>>> परागने रुपालीला करुन दिल असेल का असल काही? Wink

http://www.lokmat.com/television/bigg-boss-marathi-2-contestant-parag-ka...
बिग बॉस मराठी २ मधील स्‍पर्धक एकमेकांसोबतच नव्हे तर कॅमेऱ्यासमोर देखील प्रांजळपणे त्‍यांच्‍या कथा शेअर करत आहेत. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये पराग कान्हेरे त्याच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेविषयी बोलताना दिसत आहे. किशोरी शहाणे यांना परागने सांगितलेली त्याच्या आयुष्यातील एक घटना ऐकून त्यांना प्रचंड धक्का बसला.

पराग आणि किशोरी लिव्हिंग एरियामध्ये आराम करत बसलेले असताना परागने किशोरी यांना सांगितले की, माझ्या भाच्याला लहानपणापासूनच किडनीमध्ये काहीतरी प्रोब्लेम होता. त्याला मेडिकल टर्ममध्ये काय म्हटले जाते हे मला माहीत नाही. पण त्या आजारामुळे त्याची एक किडनी फेल झाली होती आणि केवळ एकच किडनी काम करत होती. परागचे हे ऐकल्यानंतर किशोरी यांनी परागला त्याच्या भाच्याचे वय किती आहे हे विचारले. त्यावर त्याने सांगितले की, आता तो १२ वर्षांचा आहे. तो अगदी लहान असल्यापासूनच त्याची ट्रीटमेंट सुरू होती. तो दिसायला अतिशय स्मार्ट असल्याने त्याने आमच्या एका प्रोजेक्टसाठी मॉडलिंगदेखील केले होते. पण गेल्या काही वर्षांपासून त्याचे आजारपण वाढत गेल्याने त्याला अंथरुणावरून हलता देखील येत नव्हते. दिवसेंदिवस त्याची प्रकृती अतिशय गंभीर होत होती. परागने त्याच्या भाच्याच्या तब्येतीविषयी पुढे सांगितले की, मी जेव्हा त्याला आयसीयुमध्ये त्याला बघायला गेलो तेव्हा त्याची ती अवस्था पाहून मीच माझ्या मावस भावाला सांगितले की, माझे नाव किडनी डॉनरमध्ये लिही... त्यानंतर डॉनर लीस्टमधील सगळ्यांचे रक्तगट तसेच किडनी मॅच होतेय का हे रुग्णालयाकडून तपासण्यात आले तर त्यावर माझी किडनी मॅच झाली. त्यामुळे मी माझी किडनी त्याला डोनेट केली.

कलर्स मराठीच्या फेसबुक पेज वर बाप्पा जोशी live आले होते.... मस्त बोलले
त्यांच्या मते अभिजीत, नेहा, पराग, वीणा आणि वैशाली फायनल पाचात असतील
वैशाली आणि शिव बद्द्ल खुप छान बोलले ते!
सगळ्याच सहस्पर्धकांबद्दल मोकळेपणाने बोलले ते.
एकूण त्यांच्या मुलाखतीचे सार असे:
शिव: एक गोड आणि good at heart मुलगा आहे
नेहा: ती खुप छान खेळतीय पण तिने तिचा स्वभाव थोडा बदलला तर ती घरात लोकप्रिय होउ शकेल
वीणा: स्वताला जितकी स्मार्ट समजते तितकी ती नाहीये...
ती बोलताना फार फाफटपसारा लावते
पराग: तो शहाणा वाटतो कारण त्याच्या आजुबाजूचे मुर्खासारखे वागतात
सुरेखा ताईंबद्दल ही चांगले बोलले
माधव: अजुन तितकासा परिपक्व नाही
मांजरेकर: चांगले होस्टींग करतात.... presence of mind खुप चांगला आहे..... कधी कधी काहीजणांना फेव्हर करतात!

<<<किती बोलते वीणा. कंटाळा आला पॅ पॅ पॅ पॅ ऐकायचा. प्रत्येकवेळी सगळे मुद्दे बरोबरच असतात असं नाही.>>>
<<<वीणा किती जास्त आणि लांबलांब हातवारे करते. सारखंच डोकं फिरलेलं असतं तिचं. सतत तिरस्कार करत असते कोणाचा तरी>>>
<<वीणा इरिटेट करतेय फार. दुसरी शिवानी.>> मला तरी तिचं इरिटेट करणं मागच्या सिझनमधल्या जुई सारखं वाटतं..कायम एक तक्रारीचा सूर व फाजील आत्मविश्वास. ती हुशार आहे मात्र व सध्या तरी तिचे आडाखे बरोबर होतायेत. त्यामुळे हवेत असते..पण हिला परागप्रमाणे रिअ‍ॅलिटी चेक मिळण्याची गरज आहे.

बाकी दीपांजलीचा बाप्पाबद्दलच्या पूर्ण पोष्टीशी सहमत. माणूस म्हणून ऑलरेडी विनर ठरला तो या शो चा.

इथे लिहाव का नको या विचारात होते, पण वरच्या काही पोस्ट बघून राहवलं नाही.
पराग हा माझा अगदी जवळचा मित्र जरी नसला, तरी एक मित्र मी त्याला नक्कीच म्हणू शकते. प्रचंड स्ट्रेट फॉरवर्ड आणि शिष्टपणाकडे झुकणारा स्वभाव, मात्र त्याच्या त्या शिष्टपणात एक अदब असते, एक मार्दव असतं.
हा माणूस एक उत्तम शेफ जरी असला, मात्र त्याचे टेबल मॅनर्स प्रचंड बघण्यासारखे असतात. त्याला काहीही खाताना बघितलं तरीही हा माणूस एक लयबद्ध जेवण कसं करावं याच प्रात्यक्षिक दाखवतो. बऱ्याचदा 'तू नुसतं मला
खाताना करताना बघणार आहेस, की खाणार आहेस?' अशी बोलणीही ऐकलीत. बरेच दिवस झालेत, त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट नव्हता, आणि तो सरळ बिग बॉस मध्ये दिसला.
त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये जात नाहीये, पण मध्यंतरी खूप खचला होता. हेल्थ, मनी, फॅमिली सगळ्याच बाबतीत, आणि तिथूनच प्रचंड arrogant, अरे ला कारे करणारा पराग पूर्ण बदलला. आज जुना पराग असता, तर दररोज भांडण झालीच असती घरात. पण हळूहळू त्याच्यातला जुना स्पार्क दिसायला लागलाय, याचाच आनंद आहे.
बाहेर आल्यावर जमलं तर नक्की त्याच्याबरोबर एक सेल्फी शेयर करेन Happy

महश्वेता छान पोस्ट.

वरती परागने भाच्याला किडनी दिली ते वाचून डोळ्यातून पाणी आलं, hats off त्याला.

त्याने फक्त स्वतःची स्ट्रॅटेजी सतत लादू नये, grp चे पण ऐकावं, मिळून निर्णय घ्यावा.

शिव झाला कॅप्टन. नेहाने त्यालाच सपोर्ट केला, surprised. मागच्यावेळी त्यांच्यामुळे कॅप्टन होऊ शकली नव्हती तेव्हा किशोरीताईंनी शिवला नॉमिनेशन शिक्षेत हात वर करून नेहाला साथ दिलेली. तरीही तिने असं केलं, smart player
नेक्स्ट विक नॉमीनेट करणार नाही तो तिला, हे वचन घेतलं.

वीणाने मात्र सपोर्ट केला किशोरीताईंना, मनातून शिवला करायचा होता तरीही.

परागने रुपालीला करुन दिल असेल का असल काही? >>> दिलं ना हार्टशेप कटलेट करुन.

ती बोलताना फार फाफटपसारा लावते >>> अ‍ॅग्रीड. पुढच्यावेळी तिला उतरवतील, आत्ता चढवलं असलं तरी. पण अशीच छान खेळली तर ती जिंकेल कारण चॅनेलचं मत तिच्या पारड्यात जास्त असणार, हे नक्की.

पण हिला परागप्रमाणे रिअ‍ॅलिटी चेक मिळण्याची गरज आहे. >>> देतील येत्या शनिवारी, काही सांगता येत नाही.

फक्त बोलण्यात वीणा आणी जुईची थोडिफार तुलना करता येइल पण जुई जनरलच अनहॅपी होती घरात आणि गेम वैगरे तिला काही जमत नव्हत तेवढ त्यामानाने वीणाला गेम वैगरे थोडा कळलाय... इथे मात्र कुठलेही ठाम २ ग्रुप नाहित त्याने गेम सारखा ट्विस्ट होत असतो.
बाप्पा अगदी सन्मानाने( सगळ्याना रडवुन )बाहेर गेला पण त्याला जनरलच फार रस नव्हता या सगळ्यात अस दिसल.

>>पण त्याला जनरलच फार रस नव्हता या सगळ्यात अस दिसल.<<
नाहि, बाप्पाला हि गेम समजला होता पण त्याची खेळायची स्टाइल वेगळी होती. त्याच्या सारखी, सरळ मार्गाने चालणारी माणसं दुनियादारीत मागे रहातात; बिबॉ सुद्धा त्याला अपवाद नाहि...

वर उल्लेख केलेली परागची स्टोरी इज आउटस्टॅंडिंग. नो वंडर हि अर्न्ड रिस्पेक्ट फ्रॉम किशोरी/रुपाली. हि इज ऑलरेडी ए विनर...

हि इज ऑलरेडी ए विनर... >>> true.

बिचुकलेच्या विरोधातली खंडणी केस मागे घेतली फिर्यांदिने, तो येणार म्हणे परत bb त Sad as per news channel.

नको यायला तो परत. Trp साठी अशा माणसाला परत आणणे चूक आहे.

Trp साठी अशा माणसाला परत आणणे चूक आहे.>> खरय!
दुसर कुणी तयार नाही का यायला बिबॉ मधे? एन्ड्मॉल टिमला सान्गायला पाहिजे इथे विचारुन बघा "माबोकर एका पायावर येतिल आणी गेम पण जिन्कतिल"

आज सकाळी आलेल्या बातमीनुसार तक्रार मागे घेतली तक्रारदाराने (खंडणी प्रकरण). आता कधी सुटका होणार आणि त्यानंतर पण बिबॉच्या घरात परत येईल का माहित नाही..

https://www.loksatta.com/maharashtra-news/complaint-withdrawn-against-bi...

Pages