Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकीकडे मला वाटतंय म मांनी
एकीकडे मला वाटतंय म मांनी परागबद्दल सर्व सांगून, त्याला सावध केलंय की तुझी strategy workout होत नाहीये. तुझ्या खेळात बदल कर, गरज आहे त्याची. पराग हुशार आहे तो डोकं लढवेल. अतिशहाणा असला तरी चाणाक्ष आहे, तो विचार करेल यावर.
आज म्हणजे चोर सोडुन सन्याशाला
आज म्हणजे चोर सोडुन सन्याशाला फाशी!
बिचुकले तर गेला , तो होता तेव्हा ममानी कधी सुनावल त्याला? तेव्हाच जस आज सगळ्याना ओरडले त्यातल ५० % जरी त्याला सुनावल असत तर त्याची काय हिम्मत होती बोलायची?
रुपालीने पण कशाला एबीला माफ केल वर भाजी-पोळीचे लाड पण, ममाचा हा मुद्दा पटला की त्याला गिल्ट मधे येवु द्यायच कि
शिव तर नेहमिच टारगेट असतो ममाचा, त्याला वळु काय म्हणत होते सारख किती विचित्र वाटत होत ते, अन्डरलाइन त्याला तु तुझ्यासाठी खेळ, केळ्या साठी खेळू नको हे सान्गायच असाव.
सगळ्यात मजा परागची आली, ममानी शाळा घेतली तरी ह्याच काहितरी स्टॅटर्जी , प्लॅनिन्ग, टेन्जट चालुच होत, तो तेव्हाही जमिनिच्या २ बोट वरच चालत होता.
तो होता तेव्हा ममानी कधी
तो होता तेव्हा ममानी कधी सुनावल त्याला? तेव्हाच जस आज सगळ्याना ओरडले त्यातल ५० % जरी त्याला सुनावल असत तर त्याची काय हिम्मत होती बोलायची? >>> खरं आहे.
शिव तर नेहमिच टारगेट असतो ममाचा, त्याला वळु काय म्हणत होते सारख किती विचित्र वाटत होत ते >>> अगदी अगदी.
बिचुकले याला चेक बाऊन्स
बिचुकले याला चेक बाऊन्स प्रकरणी जामीन मिळाला. मात्र यावेळी पोलिसांनी आणखी एका खंडणीच्या गुन्ह्यात त्याला न्यायालयापुढे हजर केले. या गुन्ह्यात बिचुकले याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बिचुकले याच्यावर २०१२ मध्ये सातारा पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला ताब्यात देण्याची आणि पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी न्यायालयाला केली. त्याला जमीन द्यावा, अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली. यावर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
वा, मांजरेकरांनी जामच ठोकलय
वा, मांजरेकरांनी जामच ठोकलय आज घरवाल्यांना , प्रत्येकाची थोबाडं बघण्यासारखी , वीणा आणि नेहा सोडून !
मांजरेकरचे बरेचसे पॉइंट्स बरोबर होते, शिवला दिलेले कमेंट्स मात्रं थोडे हार्श वाटले, स्त्रीदाक्षिण्य वगैरे मुद्देही नाही पटले, सगळ्या मुली टफ आहेत, इक्वल आहेत !
तरी पराग सकट सगळ्यांना रिअॅलिटी चेक दिलं मांजरेकरने हे चांगलच झालं.
बाप्पा बिचारा जेन्युइन माणुस आहे, नॉट मेड फॉर बिगबॉस , अगदी होतकरु उत्तरं दिली त्यानी, त्याचे पॉइंट्सही बरोबर होते, ’का आलोय इथे, कोणाचं ऐकावं लागतय‘ अगदी पोचलं, ग्लॅड हि इज आउट !
मामा अबी ला बोलालयला घाबरत
मामा अबी ला बोलालयला घाबरत होते, राजकारणाचा भरोसा काय? उद्या खरच मुखमंत्री झाला अबी तर?
दिपान्जलीच्या पोस्टशी सहमत.
दिपान्जलीच्या पोस्टशी सहमत.
बिचकुले गेला तरीही काल ज्याच्या त्याच्या तोन्डी बिचकुलेचच नाव होत. हा वीकएण्ड वार त्यानेच गाजवला.
ते बटाटयावरुन भाण्डण झाल तेव्हा बिचकुले शेवटचा दिसला. त्यानन्तर त्याला अटक केली असावी.
शिव काहीतरी करतो sorry म्हणण्यासाठी ते कालच्या एपिसोडमध्ये छान वाटलं. >>>>>>> अगदी अगदी. त्याच्यात एक आर्टिस्ट दडलेला आहे. ममाने त्याच्या ह्या टॅलेण्टची तारीफ करायला हवी होती. तो कुठल्याही पदार्थाच हार्ट शेप चान्गल करतो.
परागने त्याच्याकडून ही कला शिकून घ्यावी.
>>बाप्पा बिचारा जेन्युइन
>>बाप्पा बिचारा जेन्युइन माणुस आहे, नॉट मेड फॉर बिगबॉस , अगदी होतकरु उत्तरं दिली त्यानी, त्याचे पॉइंट्सही बरोबर होते, ’का आलोय इथे, कोणाचं ऐकावं लागतय‘ अगदी पोचलं, ग्लॅड हि इज आउट !
अगदी अगदी!
'कोणाचं ऐकावं लागतय' तर एकदमच भारी!
मस्त झाला एपिसोड.
नेहा आख्खा एपिसोड दोन चार वाक्ये सोडली तर काहीच बोलली नाही.... तिचा का मुड ऑफ झालाय?
तिच तर कौतुकच केल की मांजरेकरांनी!
परागची मस्त तासली.... तुला सगळे खेळवतायत म्हणून मस्त किडा सोडून दिला त्याच्या डोक्यात!
पण त्याचे ते मी गेम शी लॉयल आहे हे उत्तर आवडले
रुपाली वर सगळ्यांनीच रेशन घेतल बिचुकले ला बटाट्याची भाजी करुन वाढली म्हणून आणि तिने पण त्या वादात वीणा आणि पराग ला ओढून अजुन पायावर कुऱ्हाड मारुन घेतली.... मग वीणाने ही सोडले नाही तिला
वीणा वीकेंड का वार मध्ये फुल्ल सुटेश असते
वैशालीला मांजरेकर तू बायस्ड होतीस म्हंटल्यावर तिची रिॲक्शन बघितली का? 'जाउदे... काय बोलायलाच नको' वाली?
शिव तर मांजरेकरांची पंचींग बॅग च आहे.... त्याला पण नीट explanetion देता येत नाही काही..... गोल गोल बोलत बसतो.
माधव उगीच वाढीव आहे!
हीना ला पहीला आठवडा आहे म्हणून काही बोलले नसावेत विशेष!
>>तो कुठल्याही पदार्थाच हार्ट
>>तो कुठल्याही पदार्थाच हार्ट शेप चान्गल करतो. Happy परागने त्याच्याकडून ही कला शिकून घ्यावी.
मला वाटतय की ते बहुतेक परागनेच करुन दिले होते!
बाय द वे.... कटलेट ला लोक रवा बटाटा का म्हणत होते?
परागने त्याच्याकडून ही कला
परागने त्याच्याकडून ही कला शिकून घ्यावी.>> पराग च बनवून देतो त्याला हार्ट शेप चे सगळे तो फक्त घेउन जातो . आणी चपाती पराठे असतिल तर भाजतो. आणी मग वीणा ला देतो.
वैशाली ( आणि बाकीचे पण)
वैशाली ( आणि बाकीचे पण) ममांना अजिबात घाबरत नाही. बरं जाऊ द्या, तुमचंच खरं म्हणून सोडुन दिल्यासारखी रिएक्शन दिली तिने
त्यांना माहिती आहे या रागावण्याला काही अर्थ नसतो.
ममां बिचुकले असताना त्याच्यावर तर असे कधी वस्स्कन ओरडले नव्हते. असे सिलेक्टिवली ओरडत असल्यामुळे जेव्हा अॅक्चुअली ओरडतात तेव्हा- जसे काल ओरडले ते लुटुपुटीचे वाटते!
बिचुकले कुठे गेला का गेला त्याबद्दल घरातल्यांना कळलेय की नाही, काहीच दाखवले नाही. चॅनल ने त्याच्या घरवापसीचा ऑप्शन ओपन ठेवलाय असे वाटले.
वीणाचे पॉइन्ट्स बहुतेक बरोबर होते. त्यात रुपालीलाही सोडले नाही तिने. बिचुकले ला ताजी भाजी पोळी करून खाऊ घालणे हे कहर होते पण. बिचुकले ची मजा होती एकूण. घरच्यांना बहुतेक वाटत असावे तो फार पॉप्युलर आहे बाहेर मग एक तर त्याच्याशी पंगा घेऊन किंवा त्याचे लाड करून लाइम लाइट घेण्याचा प्रयत्न करताहेत!! या सगळ्यात बिचुकलेला शिव्या , अपमान इ. सगळं झालं पण आयटम गर्ल कडून मसाज, किशोरी शहाणे च्या हातचे आयते इस्त्रीचे कपडे, घरात कामे नाहीत, आणि वर खायचे चोचले हे ही पर्क्स एंजॉय केले त्याने!
बाप्पा बीबॉ घराबाहेर गेला हे
बाप्पा बीबॉ घराबाहेर गेला हे कधी दाखवलंय? आज रविवारी रात्री साडेनऊला एलिमेनेशन राउंड असतोय ना? इथे लोकांना अगोदरच कसं समजलंय? एक उत्सुकता!
>>शिव तर मांजरेकरांची पंचींग
>>शिव तर मांजरेकरांची पंचींग बॅग च आहे<<. +१
मांजरेकरांना सांगा कोणितरी कि तुमचे टास्कचं असे असतात कि तिथे बळाचा वापर करणं भाग पडते. साम-दाम-दंड-भेद मधल्या दंडात बळाचा वापर गृहित आहे याची कल्पना तुम्हाला आहे का? एक बाप्पा सोडुन कोणिहि मांजरेकरांना काउंटर-आर्ग्यु करत नाहि. काल ब्रेक मधला बाप्पाचा मोनलाग - "मी काय करतोय इथे, कुणा-कुणाचं ऐकुन घ्यावं लागतंय..." मांजरेकरांना झोंबला बहुतेक. अर्थात, त्यात तथ्य आहेच...
बप्पा करेक्ट बोलत होते. या
बप्पा करेक्ट बोलत होते. या लोकांना मी काय समजावू? ते माझ्याहून हुषार आहेत, हवं तेव्हा भांडतात आणि दुसर्या दिवशी गुलू गुलू करतात. खरं काय समजायचं?! त्यांच्या साठी बरे झाले ते बाहेर आले ते पण माणूस मस्त वाटतो बाप्पा. आवडला होता मला त्यांचा वावर.
मैत्रेयी +१
मैत्रेयी +१
खरेच मागच्या वेळी ज्या सदस्यांचे एकमेकांशी पटायचे नाही ते कधीच जास्त वेळ गप्पा मारत बसायचे नाहीत. इथे नुसताच आरडाओरडा करतात मग सॉरी बोलून गोड होतात. म्हणजे ममां ओरडल्यावर त्यांना सांगायला बरे कि मी माफी मागितली आहे. तसेच जरा काही झाले की लगेच शाळेत असल्यासारखे बिबॉला सांगायला येतात कि बघा हा असा असा करतो, तुम्हीच सांगा काय करायचे ते.
जाउद्या मांजरेकरच्या
शिवला मात्रं विनाकारण अपमनाअस्पद बोलतात मांजरेकर, खेकसतात म्हणून राग आला.
वीणा -शिवानीच्या मारामारीत तू मधे आलास म्हणजे ?? नसतं कोणी आलं तर तिथूनही म्हंटले असती मागच्या वर्षीसारखे कि एका बाईला फरफटत नेत असताना एकही पुरुष समोर आला नाही, बांगड्या भरल्यायेत का वगैरे !
एकट्या शिव मधे शिवानी-नेहा ची दादाच्या दादागिरीला उत्तर द्यायची हिंमत आहे, टास्क उत्तम खेळला पण बेस्ट परफॉर्मर अर्धाच गेम खेळलेला पराग ? शिवने चोर पोलिस टास्कशिवाय नॉमिनेशन टास्कचे संचालनही छान केले होते पण शिवचा उल्लेखही नाही , वर खेकसत होते त्याच्यावर ? सिरीयस्स्ली ? Uhoh
Submitted by दीपांजली on 9 June, 2019 - 10:33
<<<

घ्या, माझी ९ जूनच्या वीकेन्डच्या डावानंतरची पोस्ट, अगदी अस्सच झालं काल
कुठाय मांजरेकर, घ्यायला हवी त्यांचीही शाळा , 'दाखवुका फुटेज' धमकी देऊन
परवाच्या एपिसोडला परत मजा
परवाच्या एपिसोडला परत मजा आणली ती सुरेखा ताईंनी. "अरे ए बिचुकल्या" अशा स्टॅयलीने ओरडल्या मग लुटूपुटू बिचुकल्याला चपल्ल मारायला धावल्या. ह्याची मजा आली.
बाप्पाने नेहाला safe केलंय
बाप्पाने नेहाला safe केलंय जाता जाता.
सगळ्ञात बेस्ट आतातरी नेहाच
सगळ्ञात बेस्ट आतातरी नेहाच खेळतेय पण तीला कूठल्याच ग्रुपने आपल म्हणलेल नाही त्यामुले सगळेच तिला टारगेट करत असतात.
काल वैशाली ला ममा बाय्स्ड बोलले तर तिच डोक पार गुडघ्यात गेल होते, बाप्पाची ये कहा आ गया हु मै टाइप कॉमेन्ट सगळ्यात भारि.
गेले ३ विकेन्ड ममा एक्दम आवेशात येतात त्याच म्हणण असत " अरे घाबरा मला चिडलोय ना मी" पण सगळे ब्लॅन्क चेहरा करुन ब्सतात.
बाप्पा अगदी नावाला जागला....
बाप्पा अगदी नावाला जागला.... डोळे पाणावले त्याला निरोप देताना!
बाप्पाने कोणाला unsafe केलं
बाप्पाने कोणाला unsafe केलं का? की फक्त सेव्ह केलं?
बिचकुलेचं काहीच सांगितलं नाही का?
शिव खरं तर मस्त खेळतो. खूप
शिव खरं तर मस्त खेळतो. खूप इनोसंट आहे .
वीणा मस्त पर्फेकट हाणते एकेकाला. मला आवडते वीणा मस्त आहे
बाप्पा जाताना वाईट वाटलं खरंच
बाप्पा जाताना वाईट वाटलं खरंच, घरातल्या सर्वानाही वाटलं. ते मस्त बोलत होते, का आलोय इथे, का ऐकतोय.
वीणा आणि शिवला जास्त votes होती असं वाटतंय, नसतील तरी चॅनेलला दाखवायचं असेल तरी योग्य strategy चॅनेलची. परागचा माज आता तरी उतरावा. जरी तो नसेल सेकंडलास्ट तरी चॅनेलने ठेवलं आहे त्याला.
वीणाचे कौतुक योग्यच होतं, नेहापेक्षा पण ती उत्तम खेळली, अ बि च्या कधिच मागे नसायची, त्याला योग्य बोलायची. पराग समोर पण योग्य स्टँड घेते.
तरी मी सांगेन या कौतुकाने हुरळून जाऊ नये तिने, पाय जमिनीवर ठेवावे, स्वतः च्या गेमकडे लक्ष द्यावं, अति बडबड ज्यात त्यात करू नये, नाहीतर पुढच्यावेळी ताशेरे ओढले जातील. ती छान ग्रेसफुल दिसत होती. वैशालीचे कानातले छान दिसत होते तिला. हिना साडीत छान दिसत होती. परागचा झब्बा त्याला मस्त शोभून दिसत होता.
बाकी शिवला कायम शिव्या मिळतात जास्त, मागचयावेळी स्मिताला मिळायच्या, शेवटचे दोन तीन आठवडे फक्त कौतुक झालं तिचं.
सचिन काळे यांनी वर विचारलं
सचिन काळे यांनी वर विचारलं आहे की बाप्पा गेले बाहेर ते कसं समजलं आधी.
उत्तर असं की शूटिंग सर्व शनिवारी होतं, live टेलिकास्ट नसतो त्यामुळे youtube वर शनिवारीच समजतं कोण बाहेर पडलेय.
सनव बिचुकलेबाबत एका वाक्यात सांगितलं शो सुरू झाला तेव्हा म मांनी की bb मध्ये यायच्या आधीच्या एका केसमध्ये, त्याला अटक झाली.
शंकानिरसन केल्याबद्दल अन्जू
शंकानिरसन केल्याबद्दल अन्जू आपले आभार! मग असे गुपित अगोदरच फुटल्याने कार्यक्रमाची गंमत कमी होतेय असं वाटतं. मग बाहेर पडणाऱ्या सभासदाला शनिवारच्या ऐवजी एकदिवस अजून बाहेर कुठेतरी थांबवून रविवारी रात्रीचा कार्यक्रम झाल्यावर सोडावयास हवे. म्हणजे बातमी फुटणार नाही.
आणि तुम्ही पाहिलं का? बीबॉच्या घराबाहेर पडण्याकरिता बाप्पाचं नांव जाहीर झाल्याबरोबर रुपालीने अत्यानंदाने धावत जाऊन परागला मिठी मारली. तिने कमीतकमी बाप्पासमोर तरी असं करायला नको होतं. आपल्या जाण्याने कोणीतरी खुश होतंय ही जाणीव फार वाईट आहे.
मला खटकलं ते टोटली. पराग
मला खटकलं ते टोटली. पराग तिच्यामागे अ बि शी काय बोलला हेही सांगितलं होतं ममांनी. बाप्पाला निरोप देऊन मग आनंद व्यक्त करायला हवा होता पराग वाचल्याचा. परागच्या म्हणण्यात पण ती अति असते. किशोरी ताई पण.
बाकी सर्वांनी बाप्पाला छान निरोप दिला, वाईट वाटत होतं हे दिसत होतं, अगदी वीणाचा टोकाचा वाद झालेला त्यांच्याशी पण तिलाही मनापासून वाईट वाटलं.
एकटी वीणा ऐकत नाही परागचं. रुपाली आणि किशोरीताई स्वतंत्र गेम खेळत नाहीयेत पराग पराग फक्त.
शंकानिरसन केल्याबद्दल अन्जू
शंकानिरसन केल्याबद्दल अन्जू आपले आभार! मग असे गुपित अगोदरच फुटल्याने कार्यक्रमाची गंमत कमी होतेय असं वाटतं. मग बाहेर पडणाऱ्या सभासदाला शनिवारच्या ऐवजी एकदिवस अजून बाहेर कुठेतरी थांबवून रविवारी रात्रीचा कार्यक्रम झाल्यावर सोडावयास हवे. म्हणजे बातमी फुटणार नाही.
ही बातमी तिकडे असणार्या प्रेक्षकांकडून फुटते बर्याच वेळा. म्हणून फायनल एपिसोड बर्याचदा लाईव्ह असतो किंवा २-४ तास आधी शुट करतात.
बाकी रुपालीचे परागला मिठी मारणे अतिशय खटकले. जेव्हा मिठी सोडली तेव्हा तिला बहूतेक परागला किस करायचे होते असे वाटले. पराग विषयी सुरूवातीला चांगले मत झाले होते पण तो आता पार मनातून उतरलाय. स्वतःला फार अतिशहाणा समजतोय. आश्चर्य वाटतेय की किशोरी आणि रुपाली कसे काय याचे ऐकतात ते.
आता किशोरीताई, रुपाली
आता किशोरीताई, रुपाली स्वतंत्र गेम खेळल्या नाहीत तर बाहेर जातील, परागमधून बाहेर पडावं आता त्यांनी. वीणाचा स्टँड योग्य आहे त्याच्याबाबतीतला.
जेव्हा मिठी सोडली तेव्हा तिला
जेव्हा मिठी सोडली तेव्हा तिला बहूतेक परागला किस करायचे होते असे वाटले. >>> परागने जेव्हा ममांसमोर कबुली दिली की 'रुपाली मला आवडते' तेव्हा रुपालीच्या मनाचे सर्व बांध सुटून पडल्याचे वाटतात. म्हणून ती धावत जाऊन परागच्या मिठीत विसावली. आखिर खेल खेलमें शायद प्यार हो गया।
बाप्पा !!
बाप्पा !!
किती ग्रेसफुली बाहेर पडला, जाणार आहे माहित असून वाईट वाटून गेलं त्याला जाताना पहाणे !
बिगबॉसच्या घरातला एकमेव माणुस ज्याच्या इमोशन्स रिलेट करता यायच्या, एकमेव इंटेलॅक्चुअल माणुस जो फेक नव्हता, अतिशय टॅलेंटेड , ट्रान्स्परन्ट, कधीही मिनिंगलेस न बोलणारा, अजिबात डबल स्टँडर्ड्स न दाखवणारा जेन्युइन माणुस !
जातानाही किती छान बोलला, “सगळ्याच बसेस पकडायच्या नसतात ग नेहा, काही सुटल्या तरी चालतात“, अरे जेवताना तरी भांडु नका !
त्यांना जास्तं स्क्रीन स्पेस मिळाली नसेल पण खूप आवडला त्यांचा वावर, फॅन्स आर गोइंग टु मिस यु बाप्पा !
आज बाकी काही झालं नाही फार, नाचगाणी आणि चुगल्या !
सुरेखाताई, वैशाली आणि मधवचही अॅक्ट आवडलं, माधवला अॅग्रेसिवली खेळताना पहायला आअव्डेल, कधीची वाट पहातय पब्लिक !
पराग आणि रुपाली आणि त्यांचे प्रेमळ चाळे फार डोक्यात जातात, रुपालीला काढा आता , जाम बोअर करतेय आणि काहीच डोकं नाही स्वतःचं !
Pages