मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वीणा बरीच खुनशी आहे व ती आव आणत असली तरी तिच्या स्पोर्टिग स्पिरीट नाही हे काल परत एकदा बघायला मिळालं. नेहाकडून हाड-तुड ऐकल्याचा व त्यातून टास्क हरल्याचा राग रात्री तिच्या अंगाचा वास, कॉन्टिपेटेड आवाज आहे वगैरे असल्या पर्सनल कमेंट्स करुन बाहेर काढत होती. चीप वाटल्या कमेंट्स.

ते युनिटी रिस्पेक्ट लव वगैरे नारे असले फेक आणि अनॉयिंग वाटतात!! कोणाला आवडतोय हा ग्रुप नक्की? सारखी ती किशोरी म्हणत असते "लोकांना जो फार आवडतोय त्या ग्रुप मधे मी आहे" अरे तुला कोण म्हटलं तसं! Happy
यावेळचे सगळे कन्टेस्टन्ट्स फेक वाटतायत जाम. अफेअर हे करायचे असते म्हणून करायचे. ग्रुप, मैत्री दाखवायला म्हणुन करायची. भांडणं पण अचानक ठरवून करायची. सगळेच खोटे. बाप्पा आणि सुपु काय ते खरे राग लोभ दाखवणारे.

ते टास्क ला कार्य म्हणतात त्याएवजी "आव्हान " म्हणायला हवं का? ...कार्य हा शब्द तितकासा चपखल नाही वाटत.

यावेळी बिग्ग बॉस मध्ये कोणच आवडत नाहिये. नेहा आवडली होती मध्ये एक दोन एपिसोड मध्ये . जे कार्य दिले असते ते फक्त ती मन लाऊन करते. प्रत्येक जण बीबी चे पहिले एपिसोड न पहाता बिग्ग बॉस मध्ये आला असता तर प्रेक्षकांना मजा आली असती.पण यावेळी सगळे बरेच एपिसोड पाहुन आलेतअसे वाटते.

अभिजीत बिचुकले याची खंडणी प्रकरणी आरोप निश्चिती उद्या व्हिडिओ कॉन्फरूनसने होणार.त्यासाठी ऍड .शिवराज धनावडे यांनी न्यायालयात केला होता विनंती अर्ज.#AbhijeetBichukle सध्या कळंबा कारागृहात आहे.

होना, १ महिना होऊन गेला कोणीही विनर क्वालिटी नाही!
शिव आवडला होता पण सारखा रुसलेल्या वीणाच्या मागे , आवडेनासा झालाय अगदीच Uhoh ती वीणा एक तर काकुबाई आहे, त्यांची पेअरही चांगली दिसत नाही !
नेहा बरेचदा आवडते पण विनर क्वालिटी काय माहित नाहीच दिसत, वीकेन्डच्या वाराला मुद्दे नाही मांडु शकत ती, गप्प असते , काही लाइमलाइट नाही घेता येत तिला !
तरीही चॅनलचे आवडते वीणा -पराग -नेहा -शिव हे नक्की अस्स्तील टॉप ५ मधे असं अत्ता तरी स्पष्ट दिसतय !
सर्वात फेक आणि पोकळ पराग वाटतो मला आणि रुपाली !

सर्वात फेक आणि पोकळ पराग वाटतो>>> +१११ वीकेन्ड च्या वार मधे लॉयल राहण्याबद्दल ममां बोलले तर लगेच नेहाच्या ग्रुप ला बाय बाय करून ओरिजिनल माठ ग्रुप जवळ केला! नवा ग्रुप काढण्याचा प्लॅन वर्क झाला नही म्हणून आधीच्या ग्रुप ला जाऊन ग्रुप हग दिली यातनं लॉयल्टी कशी दिसते बुवा? वर पुन्हा तीच पहिल्यापासून त्याची स्ट्रॅटेजी होती हे म्हटलेच - अ‍ॅज एक्सपेक्टेड!
कालचा कॅप्टन्सी टास्क मजेशीर होता. मागच्या अनुभवावरून यावेळी बिबॉ ने सदस्यांची एकमेकात हाथापाई होऊ नये असे नियम केले होते. पण ते ठोकळे फार जड असावेत, बॉल लागून सहजा सहजी पडत नव्हते!
शिव मला वाटते येडा बनके पेढा खात आहे. निरागस चेहरा करून दोन्ही ग्रुप मधे जाऊन येऊन ऊठ्बस करत असतो. ते वीणाला सॉरी म्हणणे हे उगीच फुटेज खायला.अशा "चुका" इतक्या वेळा काही होत नसतात. त्यांच्यात काही आहे किंवा तो तिची खरोखर केअर करतो असं अज्जिबात वाटत नाही. वेळ आली तेव्हा बरोब्बर वीणाला बाजूला करून स्वतः कॅप्टनशिप घेतली त्याने. तीही रागवायचं खोटंच नाटक करते म्हणा. सगळंच फेक!

परागच्या डोक्यावर ती शिंगे बघून मला ओनिडाची जाहिरात आठवली>>> same pinch... त्याला बघितल्यावर हेच आठवल मला पण Lol

डीजे खुश हो जा, शिव वीणा रुसवे फुगवे आता तुला बघायला लागणार नाहीत Lol

सुरेखाताईनी विणाला मस्त झापले. मजा आली बघायला.

शिवने विणाला सेफ करायला हवं होतं कारण तिने त्याचं नाव पुढे केलेलं, त्यामुळे एकीकडे वाईट वाटलं पण एकीकडे वीणाला उत्तम धडा मिळाला असं वाटलं, असा कॅप्टनशिपचा त्याग बिग करू नये.

बाकी प्रचंड बोअर एपिसोड, एकही जण आवडला नाही आज, शिव कायम दुसऱ्याचे ऐकतो. कधी केळकर, कधी वैशाली, कधी वीणा, कधी रुपाली तसं आज नेहाचे ऐकत होता फक्त.

पराग ओनिडा सहमत.

या आठवड्यात नॉमिनेशन प्रकिया होणार नाही हे टास्क संपल्यावर खाली दाखवत होते मग एवढा टास्क करून वेळ का घालवला

आज सुरेखाताईंनी वीणाला चिचुंदरी हे नाव ठेवल ते आवडल.पण काहीही असो,वीणात दम मात्र आहे,आज खरतर तिचे सगळेच मुद्दे बरोबर होते.
किती दिवसांपासून मला हाच प्रश्न पडला होता की सुरेखा ताईंना कोणीच कस बोलत नाही.आता कळल ममां वीणावर का मेहेरबान,त्यांची ही अवघड काम वीणाच करते......हा हा
पण आज वीणाला नॉमिनेट करताना शिवची तडफड पाहून मुलाने अभिनय क्षेत्रात यायला हरकत नाही,अस वाटल,.
पण हीनाला का लटकवल?ती बिचारी गप्टच बसली ना.
आज पराग पण छान बोलत होता.

हो आजचे वीणाचे काही मुद्दे बरोबर होते, विशेषतः हिनाला का स्वर्गात पाठवून मग नरकात पाठवलं हा, शिव निरुत्तर होता तेव्हा.

पराग केळकर मध्ये पराग मस्त मुद्दे मांडत होता.

डीजे खुश हो जा, शिव वीणा रुसवे फुगवे आता तुला बघायला लागणार नाहीत
<
का ? कोणी जागच्या जागी बाहेर पडलं का दोघांपैकी मारामारी करून ? Proud
एक कोणीतरी जात नाही तोवर (थोडक्यात शेवटपर्यन्त)हे होतच रहाणार , काकुबाईच्या मागे पुतण्या मनवायला Biggrin

या आठवड्यात नॉमिनेशन प्रकिया होणार नाही हे टास्क संपल्यावर खाली दाखवत होते मग एवढा टास्क करून वेळ का घालवला>>> कारण आता या टास्क मुळे सगळयांच्यात भांडण लागणार. सगळे एकमेकाला explaination देत बसणार त्याच्यात आठवडा जाणार.

Voting lines बंद आहेत हे मला नाही दिसलं खालून जाताना, vote करा पण नाही दिसलं.

Thank you अन्जू .
हो वीणा इतकिही काकूबाई नाही वाटत. पण शिव पेक्षा मोठी वाटते.

डीजे एवढी काही काकुबाई नाही वाटत मला पण आता शिव वीणा त भांडण होणार ........@अन्जु..........आजचा भाग त्यासाठीच तर होता.आणि रुसवेफुगवे कसे नाही होणार,चँनेल आहे ना.
आज वीणा आणि शिव एकमेकांशी बोललेही नव्हते,ते सुरुवातीच गाणही त्यांच्यासाठीच तर होत,मग हा असा टास्क,आता शिव परत जाईल ना वीणाला मनवायला.
कसली स्क्रिप्ट लिहित आहे ,चँनेल
पण हीनाला का लटकवल???????

रुपाली आणि वैशालीचा जो प्रोमो दाखवला होता ..ती वाक्य आज दाखवलीच नाहित.. त्यात वैशाली कडे बोलायला काही नव्हत तर रुपाली बोलत असताना ती "ए चल हट..ए हट" असं बोलत होती.. जे अशा वादविवाद च्या ठिकाणी अजिबातच योग्य नव्हतं..तेव्हा तिचा तो माजोरडा टोन लागला होता..

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2147196795391238&id=32262930...

UP तुम्हालां कसे माहिती होते पराग वीणा रुपाली किशोरी nominate आहेत ते . मला फक्त पराग किशोरी आणी रुपाली विषयी अंदाज होता .त्यात वैशाली कडे बोलायला काही नव्हत तर रुपाली बोलत असताना ती "ए चल हट..ए हट" असं बोलत होती.. +111 हो ते एकायला कसेतरीच वाटत होते .रुपालीचा ही argument करताना आवाज फार चढतो. आणी ती फार हायपर होते असे वाटते.

सल्लागार म्हणून ते तिघे दिसताच अंदाज आला आता पूर्ण पराग टीम नॉमिनेट करतील
पण आज मला फक्त किशोरीचे मुद्दे छान वाटले नाहीत बाकी पराग व वीणा मस्तच,रुपाली पण ठीक
खरंतर सेफ झालेल्या पैकी एकाचेही मुद्दे चांगले नव्हते
आणि सुरेखा बाबत अगदी बरोबर बोलली,खरच ती कधी काम करताना दिसत नाही,पण नेहाला का एवढा पुळका आला,तुम्ही म्हणे आता जागेवरच बसून खायचे आणि एक काम नाही करायचे,ह्याव नि त्याव,

शिव होता म्हणुन मला तो वीणालाच सेफ़ करेल असे वाटत होते.
सॉरी मला अमुपरी चं नाव आमपुरी च वाचलं जातंय.. हसणारी बाहुली
नाम मे क्या रखा है .

सुरेखा बाबत अगदी बरोबर बोलली,खरच ती कधी काम करताना दिसत नाही+11 खरच सुपो नाही करत जास्त काम आणि तास्कपण...किशोरी काय तरी 2 वर्ष लहान आहे तिच्या पेक्षा.. पण ती खरच काम करते आणि टास्क मध्ये पण आपल्या परिने खूपच करते... पण तरी जरा "ग ची बाधा" आहे किशोरी ला..आज तिचा aura कमी झाला.. Wink मनात म्हणत असेल मला कस काय nominate केल

Pages