Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497
तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Voot वर वोटींग कुठे करायचे
Voot वर वोटींग कुठे करायचे कोणी सांगेल का ? मागच्या सीझनसारखे वोटींग ऑप्शन्स दिसत नाहीयेत. >> +१११
ऑनलाईन वोटिंग नाहीये का?
>>मेघा सारखं मनापासुन कोणीच
>>मेघा सारखं मनापासुन कोणीच नाही आवडत अजुन.. तिच्या सारख्या आयडीया कोणाला सुचत पण नाहियेत Wink
मेघाने एक बेंचमार्क सेट केलाय..... आता प्रत्येक टास्क बघताना इथे मेघाने काय केल असत किंवा मेघाने काय केल होत हाच विचार येतो डोक्यात!
पण मी कुठल्याही प्रतिसादात
पण मी कुठल्याही प्रतिसादात तुमच्याबद्दल काहीच लिहलेले नाहीये >> असं मी कुठे म्हटलं ? माझ्याबद्दल काही लिहिता असं म्हटलं आहे का ? चुकीचे अर्थ लावत बसता आणि उत्तर देता. तुम्हीच थंड घेण्याची आवश्यकता आहे
>>Voot वर वोटींग कुठे करायचे
>>Voot वर वोटींग कुठे करायचे कोणी सांगेल का ? मागच्या सीझनसारखे वोटींग ऑप्शन्स दिसत नाहीयेत.
Voot वर आहे की वॉटींग:


>>चुकीचे अर्थ लावत बसता आणि
>>चुकीचे अर्थ लावत बसता आणि उत्तर देता.
घ्या फुटेज
बाकी काही लोकांच्या आवडीनिवडी
बाकी काही लोकांच्या आवडीनिवडी इतक्या झपाट्याने बदलत चालल्यात ते बघून एक शेर आठवला
#शायरी मोड ऑन
अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है, उधर के हम हैं |
- निदा फाजली
#शायरी मोड ऑफ
>>चुकीचे अर्थ लावत बसता आणि
>>चुकीचे अर्थ लावत बसता आणि उत्तर देता.घ्या फुटेज >> कशाला देता?नकोय अहो मला .
मी खेळतेय का बिग बॉस मध्ये ? नको अहो प्लिज . प्लिज च
आत्ताच हाती आलेल्या
आत्ताच हाती आलेल्या सुत्रांनुसार,
Marathi News > टीव्ही-नाटक >
BIG BOSS MARATHI 2 | अभिजीत बिचुकलेला अटक, सातारा पोलिसांची कारवाई
अभिजीत बिचुकले हा 'बिग बॉस मराठी'च्या घरात असलेला एकमेव राजकीय नेता आहे.
By: गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई | Last Updated: 21 Jun 2019 02:36 PM
BIG BOSS MARATHI 2 | अभिजीत बिचुकलेला अटक, सातारा पोलिसांची कारवाई
मुंबई : 'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेला अटक करण्यात आली आहे. सातारा पोलिसांनी अभिजीत बिचुकलेला सेटवरुन त्याला अटक केली. साताऱ्यातील एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजेच अटकेच्या वेळी बिचुकलेने कोणताही विरोध केला नाही.
चेक बाऊन्स प्रकरणात सातारा कोर्टाने बिचुकलेविरोधात वॉरंट जारी केलं आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सातारा पोलिस मुंबईत दाखल झाले. बिग बॉस मराठीचा सेट मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आहे. त्यामुळे सातारा पोलिसांनी अटकेच्या कारवाईसाठी मुंबई पोलिसांची मदत मागितली होती.
अटक केल्यानंतर बिचुकलेला उद्या सातारा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे अभिजीत बिचुकले स्पर्धेत कायम राहणार की इथेच त्याचा घरातील प्रवास संपणार, तसंच यावर कलर्स मराठी वाहिनी काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
दरम्यान, अभिजीत बिचुकलेने बिग बॉसच्या घरातील सहस्पर्धक आणि अभिनेत्री रुपाली भोसलेला शिवीगाळ केली होती. कलर्स वाहिनीवरील बिग बॉस मराठीच्या 24 व्या भागात हा प्रकार घडला होता. त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेला शोमधून हकालपट्टी करा, अशी मागणी केली होती.
अभिजीत बिचुकले हे 'बिग बॉस मराठी'च्या घरात असलेला एकमेव राजकीय नेता आहे. अभिजीत बिचुकले घरातील वादामुळे कायमच चर्चेत असतो, आता या नव्या वादाची त्यात भर पडली आहे.
बिचुकले साहेबांना जुन्या चेक
बिचुकले साहेबांना जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात bb च्या घरातून अटक झाली आहे हे आत्ताच महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाचण्यात आले. खखोदेजा
बिग बॉस: अभिजीत बिचुकलेला अटक
http://mtonline.in/RG57ya?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
https://maharashtratimes
https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/marathi-bigg-boss/...
बिचुकले ला अटक केली आहे म्हणे.
बिबॉ च्या घरातुन बिचुकले ला
बिबॉ च्या घरातुन बिचुकले ला बाहेर काढाण्याचा हा काहीतरी ठरवुन केलेला प्लॅन तर नाई ना.
अचानकच हे जुनं चेक बाउन्स प्रकरण आत्ता कसं काय बाहेर आलं असेल ?
बिचुकले ला अटक..अरे यार.
बिचुकले ला अटक..अरे यार..शनिवार पर्यंत तरी ठेवायच शिव्यान्चा आहेर देऊन मग काढायचं होत....आता हीनाच्या स्वप्नाच काय... एक बाजू बिचुकले न एक बाजू पराग तिला escort करणार होते 100 व्या दिवशी..
म्हणे मुलाकडे 25 हजारची गाडी खेळायला...
बिचुकले जाणार? बरंच झालं.
बिचुकले जाणार? बरंच झालं. सुरवातीला आवडलेला पण आता किळस वाटत होती त्याची. आता हिनाची मज्जा येईल, सोमीवर बिचुकले फेमस होता तेव्हा ती घरात गेली म्हणून तिने घरात त्याला पकडला असणार.
अश्या क्रिमिनल बॅकग्राऊंड
अश्या क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेल्या व्यक्तीची या फेमस शो मध्ये निवड झालीच कशी? कुठल्या निकष? कोणता आधार? हा चरित्रहीन माणूस कसा काय निवडला?
बिचारा बिचू
बिचारा बिचू
खरी बातमी असेल तर चांगलंच
खरी बातमी असेल तर चांगलंच झालं. किळसवाण्या मनोवृत्ती ची जातीयवादी घाण होती.
वीकेंडचा डाव होऊ द्यायचा होता
वीकेंडचा डाव होऊ द्यायचा होता. ममा त्याला ओरडतात की नाही हे बघायचं होतं.
आता पोलिसच अटक करून घेऊन गेले म्हटल्यावर कोण काय बोलनार!
मग आता या वीकला कोणी बाहेर जाणार की नाही? वाईल्ड कार्डचं काय?
बातमी खरी आहे. लोकसत्ता आणि
बातमी खरी आहे. लोकसत्ता आणि मटा मध्ये आली आहे.
मला काय वाटतंय आता विधानसभा
मला काय वाटतंय आता विधानसभा निवडणुक तोंडावर आल्या आहेत...आणि पूर्वी साताऱ्यात अभि बिचुकले एवढा फेमस नव्हता...तो आता प्रसिद्ध झाला आहे. ...तो जर निवडणुकीत उभा राहिला तर तो सहज मतं खाऊ शकतो...आणि जर त्याने मतं जर खाल्ली तर सातारा मतदारसंघात मोठा उलटफेर होऊ शकतो..म्हणून त्याला असा अडचणीत आणला असेल..असे मला वाटतय
Voot वर आहे की वॉटींग: >>
Voot वर आहे की वॉटींग: >> Thanks स्वरूप. माझ्याकडे voot app जुने होते, त्यामुळे दिसत नव्हते.
@ चैत्रगंधा - तुम्हाला voot update करावे लागेल play store मधून , मग वोटींग ऑप्शन दिसेल.
दर आठवड्याला ९९ मते आहेत यंदा
दर आठवड्याला ९९ मते आहेत यंदा!
बिचुकलेंची उचलबांगडी झाली असेल तर जोशी अन पुणेकरांना अजुन एक आठवडा मिळेल खेळायला!
ड्रामा तर नाही ना हा? सिक्रेट
ड्रामा तर नाही ना हा? सिक्रेट रूम वगैरे? कळेलच म्हणा आता, काहीतरी अनाउन्स करतीलच ऑफिशियली. तोवर काही सांगता येत नाही.
लोक्सत्ता काय मटावाले काय काहीही छापतात. त्यातल्यात एका पेपर मधे शिवानी पुन्हा बिबॉ मधे!अशी बातमी होती. कंटेन्ट मधे इतकेच होते की तिला पुन्हा यायला आवडेल.
जर बिचुकले खरंच गेला असेल तर कदाचित बाप्पा आणि सुपु ना एक जीवदान मिळू शकेल. आरोप काहीतरी मायनर आहे पण, ३५००० चा चेक बाउन्स झाला म्हणे. तसे पाहिले तर त्यावर जामीन मिळू शकेल की. अर्थात कोणी ही अटक करविली आहे आणि का त्यावर बरंच अवलंबून आहे.
३५००० चा चेक बाउन्स झाला
३५००० चा चेक बाउन्स झाला म्हणे. तसे पाहिले तर त्यावर जामीन मिळू शकेल की. अर्थात कोणी ही अटक करविली आहे आणि का त्यावर बरंच अवलंबून आहे. >>
तेच ना....त्यांना वीकेंड च्या डावापुर्वी घराबाहेर काढायचं असावं. आणि त्यामुळे काही ना काही कारण काढुन बाहेर काढलं गेलं असेल.
चॅनेल ला नको असेल काही लीगल प्रॉब्लेम्स...
यावेळचे स्पर्धक महानच आहेत.. ती शिवानी तशी गेली...हे असे जातील असं वाटतय. एलिमिनेशन ची गरजच नाही
दर आठवड्याला ९९ मते आहेत यंदा
दर आठवड्याला ९९ मते आहेत यंदा!
??
मला वाटले एकूण शो संपेपर्यंत ९९ मते अहेत
सुजा, स्वरूप - चांगले
सुजा, स्वरूप - चांगले पोटेनशीयल आहे तुम्हा दोघांनमध्ये बिग बॉस 3 मध्ये जाण्यासाठी
बिचुकलेला घेऊन पोलिस
बिचुकलेला घेऊन पोलिस साताऱ्याला रवाना.source - ibn लोकमत.त्यावरच रुपालीच्या आई अस म्हटली की मी जर अाता घरात जाऊ शकले असते तर त्याच्या दोन आणि रुपालीच्या दोन कानाखाली दिल्या असत्या.तिला माफी मागायची काहीच गरज नव्हती.बिग बॉसच पण ह्यात चुकल म्हणे.कशाला दिलगिरी व्यक्त करायला लावली.
पराग ची वाणी सत्य ठरली..
पराग ची वाणी सत्य ठरली...2आठवड्या मध्ये नेते कंदी पेढे खायला गेले..पण पोलिस स्टेशनला..
>>मला वाटले एकूण शो
>>मला वाटले एकूण शो संपेपर्यंत ९९ मते अहेत
मला पण आधी असेच वाटलेले म्हणून पहील्या आठवड्यात जरा जपूनच ३-४ मते दिली तर पुढच्या आठवड्यात परत reset होउन ९९ मते होती
फेसबूक वर मराठी बिग बॉस
फेसबूक वर मराठी बिग बॉस नावाचा ग्रुप आहे ..तिथे एका वकील महिलेची पोस्ट खालील प्रमाणे:
'कलर्स मराठी' वरील 'बिग बाॅस' शो मधील अभिजीत बिचुकले ही एक नंबरची खोटी व्यक्ती आहे. हे मी अधिकाराने सांगू शकते, कारण मी अनुभव घेतला आहे. आम्ही त्याला मदत करुन खूप मोठ्ठी फसवणूक करुन घेतली आहे.
तो शो मध्यू छातीठोकपणे सांगतो की त्याच्याकडे ३ कोटी रूपये आहेत ! तर मग त्याच्यावर चेक बाउन्स च्या cases कश्या आहेत त्याच्यावर??? Warrant सुद्धा आहे त्याच्यावर सातारा district court मध्ये.
एवढेच पैसे असतील तर त्याच्याकडे, तो जर एवढा खरा असेल, तर आमची फसवणूक का चालू आहे??
स्वतःचं घर नाही म्हणून आम्ही मदत केली, त्याचा गैरफायदा घेऊन बिचुकले ने आम्हाला फसवलं आहे. आमच्या फ्लॅटमध्ये फुकट राहतोय. फ्लॅट पण सोडत नाही. त्याच्याशी बोलणी करायला गेलो की फ्लॅटला बाहेरून कुलूप लावून आत लपून बसतो फॅमिली बरोबर.. ही पात्रता आहे बिचुकलेची ! गरीब, गरजवंत म्हणून मदत केली तर आमचीच फसवणूक केली.
कलर्स मराठीने अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला बिग बाॅस शो मध्ये स्पर्धक म्हणून घेतलेच कसे????
जे लोक यां बिचुकलेला पाठिंबा देत आहेत त्यांना समजू दे माझी कशी फसवणूक केली या माणसाने.. फ्लॅट चे भाडे मागितले कि आम्हालाच धमक्या आणि त्रास देत होता. मी आणि माझी फॅमिली प्रचंड तणावाखाली अाहोत.
आम्हाला कुणी न्याय मिळवून देईल का?
- वंदना आणि संदीप संकपाळ, सातारा.
Case papers attached
त्यांना नक्की अटक झाली आहे .
त्यांना नक्की अटक झाली आहे . त्यातून त्यांनी बऱ्याच जणांना फसवलं आहे . ते लोक आम्हाला कस फसवलं ते सांगायला पुढे येत आहेत. आर्थिक फसवणूक खूप जणांची केली आहे . एक मॅडम म्हणताहेत आमच्या फ्लॅट मध्ये फुकट राहतोय पण फ्लॅट सोडता सोडत नाही . खूप लोक त्रस्त आहेत त्याच्या मुळे. थोडक्यात या आठवड्यात बाप्पाना जीवदान .
सुजा, स्वरूप - चांगले पोटेनशीयल आहे तुम्हा दोघांनमध्ये बिग बॉस 3 मध्ये जाण्यासाठी >>
Pages