Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497
तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी काल एक व्हिडीओ टाकलेला
मी काल एक व्हिडीओ टाकलेला त्यात ठाण्यातपण अ बि वर गुन्हा दाखल केलाय, असं होतं. तो इथे घरात अपशब्द काढले स्त्रियांबद्दल म्हणून, प्लस हा वरचा गुन्हा, प्लस माजी नगरसेविका मुख्यमंत्र्यांना भेटली आणि निवेदन दिलं. त्यामुळे उसको तो जाना पडेगा. त्याला अटक झाली हे tv news मध्ये पण सांगितलं.
कुठून कुठून शोधून bb आणतात अशा लोकांना
राडे करायला.
पराग आणि वीणा मध्ये वीणाने
पराग आणि वीणा मध्ये वीणा smart ठरली. पण पराग क्रेडीट स्वतःकडे घेणार कोणी जिंकलं तरी कारण त्याची टीम जिंकली तर तो म्हणेल, बघा मी कसं उत्तम डील केलं. समोरची टीम जिंकली तर नंतर जाऊन रुपाली आणि किशोरीताईन्ना सांगेल की मी हे मुद्दाम केलं
मीच तुम्हाला जिंकून दिलं.
पण actually काल वीणा शिव rocked. नेहा पण manager म्हणून पुचाट ठरली बाप्पा छान वाटले जास्त.
वरची बातमी जर खरी असेल आणि
वरची बातमी जर खरी असेल आणि त्यामागे बिबॉ किव्वा चॅनेल असेल तर मान गये! बिबॉ- कलर्स खेळले! बर झाल, सुन्ठीवाचून खोकला गेला.
प्रोमोमध्ये ते साम- दाम- दन्ड- भेद भयानक वाटत होत, पण काल तेच विनोदी वाटत होत बघताना. टिव्हीचा व्हॉल्यूम कमी करायची गरज वाटली नाही.
बाकी विणा छान खेळली काल.
शाकाल दमला की हो.... >>>>>>>>> बेम्बीच्या देठापासून ' साम- दाम, दण्ड, भेद कोकलल तर असच होणार ना. परागला पहिल्यान्दाच एवढ ओरडताना बघितल.
अ बि कडे आता बघवत नाही आणि ती हीना पण काय. ह्याबाबतीत शिवानी योग्य stand घ्यायची. अ बि च्या घरचे आता बघत नाहीत का, मुलांची आठवण येत नाही का. किळस वाटते बघायला, तिच्या मागे मागे सतत. >>>>>>>>> सहमत बाहेर आयटम गर्ल असलो म्हणजे कसही वागा असा काही नियम नाही. तिने सुपु कडून आदर्श घ्यावा. त्या डिसेण्ट वागतात घरात.
काल अ बि हिनाबरोबर बसला होता तेव्हा फोटोतली त्याची आई त्यान्च्याकडे डोळे वटारुन बघतेय असा भास झाला.
तिथे पण शिवने हिना ला बाजूला करून मजा आणली >>> ++++++++११११११११११११
असले नेक्स्ट राउंड चे डील कशाला केले? ( की मुद्दाम त्यांना जिंकवतोय! पण दॅट डझ नॉट मेक सेन्स) >>>>> कालच्या त्याच्या डिल्सवरुन, साम- दाम- दण्ड- भेद किन्चाळण्यावरुन तरी मला असाच डाउट येतोय की त्याला दुसर्या टिमला जिन्कवायचय.
काल पराग काय भयानक दिसत होता,व्हिलनचा रोल आरामात मिळेल. >>>>>>>>> अगदी अगदी ग्रुप सोडण्याआधी बिचकुले हिना समोर स्विमिन्ग पुलाकडे केलेली त्याने एक्टिन्ग टोटली व्हिलनिश वाटली. त्याचे डायलॉग्ज पण भारी होते. पाण्यात तळपाय सोडले तर रक्त मेन्दूकडे सर्क्युलेट होत वै वै.
कालच्या मॉर्निग सॉन्गमध्ये रेशम टिपणिस होती. तिच्यावेळी हे गाण कधीच वाजल नाही.
पराग च बोलणं बरोबर ठरलं ..
पराग च बोलणं बरोबर ठरलं ...2आठवड्याच्या आत बिग बॉस च्या सेट वर बिचुकलेना कंदी पेढे खायला घातले आणि आता पोलीस स्टेशन मध्ये धम्मकलाडू खायला मिळतील. शो मध्ये हिनाने पाठ रगडून दिली आता पोलीस रगडून देतील . कायमची पाठदुखी बंद
रूपालीच्या आईची मुलाखत स्फोटक
रूपालीच्या आईची मुलाखत स्फोटक आहे. आज त्या काकी खुश झाल्या असतील.
>>चांगले पोटेनशीयल आहे तुम्हा
>>चांगले पोटेनशीयल आहे तुम्हा दोघांनमध्ये बिग बॉस 3 मध्ये जाण्यासाठी <<
म्हणजे आजतोवर माबो बिबॉच्या घरासारखी नाहि असं समजताय? अहो इथेहि शाब्दिक मारामार्या, राडे होतात. निरनिराळ्या उपक्रमात (टास्क) घरचे मेंबर्स भाग घेतात, उदासीन रहातात. गैरवर्तुणिकिमुळे इविक्ट होतात, वाइल्ड कार्ड (डु/फेक आय्डी) ने परत येतात. बिबॉकडे कॅमेरासमोर (अॅडमिनची विपु) चुगल्या, तक्रारी करतात. इतकेच काय तर बिबॉच्या शोवर (माबोवर) लिगल अॅक्शन घ्यायची धमकिहि देतात...
आता मी voting बद्दल सांगते.
आता मी voting बद्दल सांगते. मागच्या वेळी सोपी voting पद्धत होती आणि मी desktop वरून voot वर जायचे आणि voting करायचे. ह्यावेळी अजिबात नाही सोपं, मोबाईलवर app डालो करा मग मराठी जत्रा मध्ये रजिष्टर करा मग voting. मला ह्यावेळी शिवसाठी करायचे होते म्हणून एवढे उद्योग केले. ९९ वोट्स देऊ शकतो, मी दोनच दिली शिवला, नवरा म्हणाला तुला नको असेल त्याला सोडून हवी तर divide करून दे ९९ तर मी म्हणाले बिचुकले नकोय मला
पण तो गेला आता. मी काही voting कडे गेले नाही परत.
अ बि ला परत जामिनावर सोडवून एन्ट्री नाही दिली तर सुजा म्हणते तसं परागचं म्हणणे खरं होईल.
बाप रे डेन्जर च आहे बिचुकले.
बाप रे डेन्जर च आहे बिचुकले. त्या वकील बाईचे पोस्ट वाचून वाटले, नक्की असे केले असेल त्याने. बिबॉ मधल्या वावरावरून तरी.
चांगले हाणले पाहिजे याला पोलिस स्टेशनात. बिबॉ आता सगळ्या प्रकाराचे कसे स्पष्टीकरण देतायत बघण्यासारखे असेल.
अ बि ला परत जामिनावर सोडवून
अ बि ला परत जामिनावर सोडवून एन्ट्री नाही दिली तर सुजा म्हणते तसं परागचं म्हणणे खरं होईल>>> एकदा बाहेर पडलं की परत येण्याचा ऑपशन नसतो बहुधा बिग बॉस च्या घरात..
बिग बॉस मध्ये एन्ट्री देताना क्रिमिनल रेकॉर्ड चेक करत नसावेत हे शॉकिंग आहे. किमान pending cases चा तरी criteria असायला पाहिजे होता
क्रिमिनल असलेल्यांना आणतात
क्रिमिनल असलेल्यांना आणतात राडे करायला असं वाटतं. झाला फुल टू राडा अ बि कडून, मिळाला trp. बरंच झालं गेला डोक्यावर बसण्यापेक्षा असं म्हणेल आता bb.
ह्यावेळी बहुतेक कोणाला काढणार
ह्यावेळी बहुतेक कोणाला काढणार नाहीत. शिवानी आणि अ बि दोन गेलेना बाहेर पण हेच voting पुढे गृहीत धरतील म्हणजे नवीन कोणी nomination मध्ये नाही येणार.
त्याचे डायलॉग्ज पण भारी होते.
त्याचे डायलॉग्ज पण भारी होते. पाण्यात तळपाय सोडले तर रक्त मेन्दूकडे सर्क्युलेट होत वै वै.>> हो... that was epic
तुम्हाला मी कधी या section मध्ये दिसतो का..मला जेव्हा फार गहन विचार करायचा असतो तेव्हा मी पाण्यात पाय टाकुन बसतो.. ते circulation चा फंडा संगितला आणि लास्ट ला टकलावर पाण्याने अभिषेक केला..
फुल स्टाइल ..सीन ऐंड.. dialogue कसे सुचतात काय माहीत.. नविन माणसावर स्वताच impression पाडू शकतो पराग..पण नंतर नंतर मला पहा आणि फुले वहा मोड मध्ये गेल्यावर लोक कलटी देत असतिल त्याला..
Bdw नेहा अशी कधीच गप्पा मारताना दिसत नाही..एकतर भांडताना दिसते नाहितर टास्क मध्ये
हा सिझन अजीबातच फारसा बघितला
हा सिझन अजीबातच फारसा बघितला नाहीये... पण अधून मधून डोकावले आणि ईथले वाचले की असे वाटते यावेळी बिबॉ चं घर म्हणजे अत्रे कट्टा किंव्वा एखाद्या गल्लीतील टिपी नाका झाले आहे. ज्येष्ट नागरीक संघाचे तीन सदस्य, मिड लाइफ क्रायसिस वाले चार (यांना आधी कुठेही पाहिलेले नाही!), एक गायिका आणि एक आयटम गर्ल.. अगदीच लुटुपुटु चे खेळ आणि कुणालाच कसलेच मोटीवेशन नाही.

आणि वर ममां चे ते शिऊ शिऊ...
मला वाटते या सिझन मध्ये आत राहण्या पेक्षा बाहेर जायची स्पर्धा जास्त आहे...
रच्याकने: माधव, केळ्या, पराग यांच्यामूळे तर हा सिझन जरा जास्तच मिळमिळीत झालाय.. पेक्षा पहिल्या सिझन वाल्यांना परत बोलवा ऊर्वरीत दिवस खेळायला.. जरा बघणेबल होईल.
वैशालीबद्दल - पूर्वीपेक्षा
वैशालीबद्दल - पूर्वीपेक्षा आता बरीच फुटेज मिळवत आहे. आता जरा ती जरा पर्सनेबल वाटतेय आणि तिची स्वतःची काहीतरी पर्सनॅलिटी दिसतेय घरात.
) केला त्यापेक्षा ती जशी आहे तशी पाहणे लोकांना आवडेल.
एकूण तिने सुरुवातीला जो नाटकीपणा ("ओ आय लव स्विमिंग" वगैरे
https://m.facebook.com/story
https://m.facebook.com/story.php?story_fbid=865288887169199&id=55436896972
बघाsssss बिचूची गिरफ्तारी
व्हेरी गुड!
व्हेरी गुड!
बायदवे काय माणूस आहे! त्याच्या चेहर्यावर काहीही चिंता, भिती इ. दिसत नाहीये!
आता तो सोमवार शिवाय बाहेर
आता तो सोमवार शिवाय बाहेर नाही येऊ शकणार बहुतेक....
ये दुनिया एक नम्बरी तो में दस
ये दुनिया एक नम्बरी तो में दस नम्बरी :p
नाहीतरी बिचुकले आहेच
नाहीतरी बिचुकले आहेच नॉमिनेटेड , चॅनलने सरळ सर्वात कमी वोट्स मिळाली सांगून त्याला एलिमिनेट करावं !
हे सगळ ज्यानी घडवून आणलं , त्याच्यासाठी टाळ्या !
बिबॉला आता नवा एंटरटेनर कोण याची मात्रं सोय करावी लागेल, कसाही होता तरी मॅक्स कन्टेन्ट , जोक्स, गॉसिप, राग सगळं बिचुकलेमुळेच घडायचं घरात!
हिनाची गंमत वाटतेय, जिने गेम प्लॅनच बिचुकलेच्या जोरावर ठरवला, ती आता कोणाच्या मागे जाईल? माधव, शिव कि पराग ?
वैशाली टास्क सोडला तर
वैशाली टास्क सोडला तर घरामध्ये दिसतच नाही . ती मला वाटत सतत पांघरून घेऊन सारखी झोपलेली च असते आणि जे कोण तिच्याजवळ बोलायला येतील . तिघचं येताच . (बिचुकले -केळकर नाहीतर शिव ) शिव नसेल तर शिव आणि वीणाच कस गुटुरगु चाललंय आणि बिचुकुले नसतील तर हिना आणि बिचुकलेचं कस गुटुरगु चाललंय एवढ्या एकाच विषयावर बोलताना दिसते .
सुरेखा ताई कशा बोलल्या तो बाप्पा मला आई म्हणतो आणि बिचुकल्या . एवढी मोठी आहे का त्या दोघांपेक्षा . काय हसलोय घरात . पण बरोबर आहे . तिथे बाहेरच्या जगात कशाला आई- मावशी नाती जोडायला जातात देव जाणे . किशोरी आणि केळकर च पटत नाही ती त्यावर बोलत होती केळकर जवळ येऊन आई आणि मावशीच नातं जोडतो . शिवलाच परत कॅप्टन पदासाठी का निवडल ते समजलंच नाही . पण ठीक आहे केळकरने फक्त त्याच्याच नावासाठी संमती दिली म्हणून असेल
शिवलाच परत कॅप्टन पदासाठी का
शिवलाच परत कॅप्टन पदासाठी का निवडल ते समजलंच नाही >>काल जरा बरी खेळली वीणा तर आज परत माती खाल्ली.. माझी काहिच हरकत नाही म्हणे..हिची.सई होतेय.. रुपाली ने बरोबर फायदा उठवला त्या गोष्टीचा.. वीणा च्या मनात संशय निर्माण केला की शिव ने तुझ का नाही नाव घेतल captaincy साठी जस तू त्याच नाव घेतल..!!आता ती भांडतेय..तिला नंतर समजल आपला निर्णय चुकला.. किशोरी पण समजावत होती तर expression रागाचेच होते की का समजावत आहात..
बाकी काल पेक्षा आज चा एपिसोड बरा होता..टीम पराग हरली तरी आता केळ्या ला वाटतय की मुद्दाम पराग ने जिंकू दिल कारण इकडे त्याचे जास्त लोक आहेत..इसको बोलतेगीरे तो भी टांग उपर..आता पराग किती ही वेड्या सारख वागला तरी opponent टिम ला असच वाटणार यात काहितरी strategy आहे
आज चा भाग बघताना वाटल की बिचुकले एवढा उडतोय मी captian झालो तर अस करेन न तस करेन..वीणा ला गेट च्या बाहेर सोडायच आहे...स्टोर रूम मधला ड्रामा..मी विनर..सगळ गेल की राव..नेसत्या वस्त्रावर नेल ना..
सुरेखा ताई कशा बोलल्या तो
सुरेखा ताई कशा बोलल्या तो बाप्पा मला आई म्हणतो आणि बिचुकल्या . एवढी मोठी आहे का त्या दोघांपेक्षा . काय हसलोय घरात . >>
छान.वाटतात त्यांच्या गप्पा..अगदी घरेलू..काल.पण छान बोलत होत्या वैशाली सोबत.. तेव्हाच वैशाली जरा बरी वाटली..
वीणा बावळट आहे. परागला एवढं
वीणा बावळट आहे. परागला एवढं नामोहरम करून, कॅप्टनपदासाठी मीच योग्य आहे ह्यावर ठाम राहायला हवं होतं.
परागचा इगो चांगलाच दुखावला, वीणाने धोबीपछाड मस्त घातला त्याला. किती निगेटिव्ह बोलत होता ती टस का मस नाही झाली नंतर मात्र माती खाल्ली तिने कॅप्टनशीप मध्ये.
सुरेखाताईंच्या गप्पा
सुरेखाताईंच्या गप्पा इंटरेस्टिंग असतात. पराग, शिव वीणा बद्दल बोलत होता पण स्वतःचं आणि रूपालीचे काय मग. वीणाने स्वतःची सई होऊ देऊ नये.
आज चा भाग बघताना वाटल की
आज चा भाग बघताना वाटल की बिचुकले एवढा उडतोय मी captian झालो तर अस करेन न तस करेन..वीणा ला गेट च्या बाहेर सोडायच आहे...स्टोर रूम मधला ड्रामा..मी विनर..सगळ गेल की राव..नेसत्या वस्त्रावर नेल ना.. >>> हो ना. तो गेला जेलात आणि trophy राहिली घरात.
Channel कसं दाखवते ते बघायला
Channel कसं दाखवते ते बघायला हवं नाहीतर trp साठी live अटक पण दाखवतील पण तसं करतील असं वाटत नाही.
त्यांना खरं सांगायला लागेल, सर्वांनी tv वर बघितलं आहे.
ती वैशाली काल बिग बॉसला
ती वैशाली काल बिग बॉसला तिसऱ्या फेरीचा निकाल सांगताना धोबीपछाड कार्याच्या तिसऱ्या "पर्वात" म्हणाली
सारेगमप इफेक्ट!
यावेळी स्पर्धकांचं
यावेळी स्पर्धकांचं बॅक्ग्राउंड चेक, मेंटल हेल्थ वगैरे दुर्लक्ष झालेलं दिसतय बिबॉ टिमचं !
शिवानी आणि बिचुकले पहिले २ आठवडे फक्त दोघांची चर्चा होती, दोघेही मॅक्स कन्टेन्ट, सनसनी देणारे अशा प्रकारे आउट झाले अजुन महिनाही नाही झाला शो ला !
>>म्हणजे आजतोवर माबो बिबॉच्या
>>म्हणजे आजतोवर माबो बिबॉच्या घरासारखी नाहि असं समजताय? अहो इथेहि शाब्दिक मारामार्या, राडे होतात.…
Submitted by राज on 21 June, 2019 - 17:12
अगदी अगदी!
विकेंड च्या डावाचा काहीच
विकेंड च्या डावाचा काहीच प्रोमो नाही,रिशूट करतात की काय?
Pages