बालभारतीचे मराठी संख्यावाचनाचे नवे नियम

Submitted by अभि_नव on 18 June, 2019 - 09:29

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.

हा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का? त्यांचे मत विचारले होते का?
काही सर्वेक्षण केले होते का? त्याचा सँपल साईझ किती?

या प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची?

मोडी लिपीला कालबाह्य करण्यापासून सुरु झालेला हा प्रवास, मराठी भाषाच नको इथे जाऊन संपायला किती अवधी लागेल?

मराठी शाळांची अवस्था आधीच दयनीय आहे. नवीन शाळेला परवानगी नाही. त्यात हे दिवे लावले जात आहेत.

हे असे निर्णय घेणारे कोण असतात? त्यांच्या वर बसलेले त्यांना जाब विचारत नाहीत का?

https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-balbharti-made-changes-in-ma...

https://abpmajha.abplive.in/mumbai/balbharati-changes-numeracy-for-secon...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स यांच्या वरच्या चारही मुद्द्यांशी सहमत. पर्याय देणं धोक्याचं आहे.

एकत आहे ती संख्यानामे प्रथम फक्त बोलायला शिकणं आणि वरच्या वर्गांत त्याचं लेखन ; किंवा ती सरळ सरळ बदलणे, हा निर्णय घ्यायला हवा.

इथे जोडाक्षर हा मुद्दा नक्की आहे का, याबद्दल मी साशंक आहे. संख्यानामे समजायला जास्त मेहनत घ्यायची गरज पडते, हे दिसते आहे. ती केव्हा आणि कशी घ्यायची, प्रथम फक्त बोलणे आणि मग लिहिणे हे ठरायला हवं. शिवाय मराठी दुसरी किंवा तिसरी भाषा असणार्‍यांनी ती शिकायला हवीत की नकोत, हेही. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याचा ओघ थांबण्याची चिन्हं नाहीत.


Submitted by अमितव on 19 June, 2019 - 04:55
>> असं आहे तर. Happy
हे चांगलेच आहे की.
उगाच नक्की काय बाब आहे हे माहीत करून न घेता ओरडा सुरु होता इथे.

http://epaperlokmat.in/main-editions/Pune%20Main%20/-1/2#Article/LOK_PUL...

आज लोकमतमध्ये मंगळा नारळीकरांची मुलाखत प्रकाशित झाली आहे, ती वाचा.
हा भाषाबदल कसा नाही, हे नारळीकरांनी सांगावे. त्या म्हणतात भाषाबदल नाही, पण तो आहेच.
दुसरीतल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणती पद्धत आवडते, हे ठरवावं, असंही त्या सांगतात.
दोन वेगवेगळ्या पद्धतींमुळे अजिबात गोंधळ उडणार नाही, असा त्यांचा दावा आहे.
मोठ्या संख्या आपण आपल्यातच वाचतो, तिथे कोणती पद्धत वापरतो याचा संबंध नाही, असं एक एलोएल वाक्यही मुलाखतीत आहे.

http://www.lokmat.com/maharashtra/wrong-decision-mathematical-calculatio... - इथली रमेश पानसे यांची प्रतिक्रिया वाचा. महाराष्ट्रात ज्ञानरचनावादाचा पुरस्कार सरकारी पातळीवर केला गेला, तो यांच्यामुळे. मी सतत ज्या शिक्षकांचा व त्यांच्या बैठकींचा उल्लेख करतोय, त्यांचाही संबंध या ज्ञानरचनावादी पद्धतीशी आहे. या सर्वांना डावलून हा निर्णय घेतला गेला आहे.
आता पुन्हा मी राजकीय विचारसरणीचा उल्लेख केला, तर ट्रोलिंगचा आरोप होईल, पण आहे ते आहे.

चिनूक्सचे सर्व प्रतिसाद आणि भरत यांचा आठकलमी प्रतिसाद, दोन्हीशीही सहमत.
योग्य तो आदर ठेवून मला असा मूळ प्रश्न पडला आहे की मंगला नारळीकर गणितशिक्षणाच्या सर्वोच्च तज्ज्ञ कधीपासून झाल्या? त्या गणित शिकल्या आहेत आणि त्यांनी कुठलीही औपचारिक शिक्षणाची व संशोधनाची बांधिलकी क्षमता असूनही वैयक्तिक कारणांमुळे स्वीकारली नाही हेच मला माहित आहे. त्या कुठल्या निकषांवर बालभारती समितीच्या प्रमुख (का काय नक्की पद आहे ते) झाल्या हे माझ्या अल्पज्ञाना पल्याड आहे, त्यावर कुणी प्रकाश टाकू शकेल का?
त्यांच्याविषयी कितीही आदर असला (लोकांचा आदर हा मूलतः त्यांच्या आडनावामुळेच आहे हे नजरेआड करू शकत नाहीये). तरीही आदर निकषांवर अशा निवडी होत नसतात. म्हणून मुद्दाम विचारावेसे वाटले.
आपल्याकडे काय आहे ना, आदरणीय कुणी असेल तर त्यांच्या विषयी शंका घेणे किंवा प्रश्न उपस्थित करणे हा बहुतांशी बेअक्कलपणा/मूर्खपणा समजतात हे मला माहित आहे. मला म्हणलात तरी हरकत नाही. मी गणितात माठ होते शाळेत पण अंकगणितात नव्हते. आणि गणिताची भीती ही अयोग्य शिक्षकांमुळे होती. जोडाक्षरयुक्त अंकांशी संबंध नाही. मराठी अंक शिकून मग हिंदी इंग्लिश (आता बंगालीही) अंक मी सुमडीत शिकले.

आणखी एक - मुदलात एक ते दहा हे आकडे पण 'आर्बिट्ररी' (मला मराठी प्रतिशब्द द्या कुणीतरी) संख्यानाम असलेले आहेत. कुणा मुलाला जर त्याचीच अडचण असेल तर मग काय करणार? त्याची फोड कशी करतील याविषयी उत्सुकता आहे.

हे नारळीकर म्हणजे तेच प्रसिद्ध मराठी शास्त्रज्ञ नारळीकर आहेत का? तसे असेल तर चिनूक्स यांच्या बोलण्यात थोडेसे का होईना तथ्य वाटते आहे. कारण या नारळीकरांची एक मुलाखत की पुस्तक फार पुर्वी वाचले होते. त्यात त्यांनी कसे आपल्या मुलांना हिंदी माध्यमात शिकवले व त्याचा कसा अभिमान आहे हे सांगितले होते. त्यांच्या मताप्रमाणे हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे सगळ्यांनी असेच करावे असे काहीसे अंधुकसे आठवते आहे. चिनूक्स यांचा प्रतिसाद वाचल्यानंतर हे हिंदीचे खूळ त्या विशिष्ट संस्थेच्या प्रभावामुळे असावे असे आता लक्षात येते आहे. त्या संस्थेचे संस्थापक व नंतरचे अध्यक्ष मराठी असुनही ते सतत "फक्त" हिंदीचा प्रचार व आग्रह करत असतात.

लोकमतमधल्या मुलाखतीतली विधानं सबगोलंकार आहेत.
हा निर्णय घेताना संशोधन झालं का, आकडेवारी काय आहे, याचे उल्लेख नाहीत. उदाहरण दिलं आहे, ते आपल्या घरी काम करणार्‍या स्त्रीचं.
आपण सुचवलेली पद्धत मुळात नव्या भाषेकडे जाते, हेच त्यांना कळत नाहीये, किंवा त्यांचा तोच उद्देश आहे, आणि त्यांना हे मान्य करायचं नाहीये.
'संख्यावाचनाची पद्धत सोपी करत आहोत' हे सांगताना त्या भाषेबद्दलच बोलतात. आणि हे बोलताना त्या या निर्णयामागच्या अभ्यासाबद्दल अवाक्षर उच्चारत नाहीत.

हा बदल योग्य आहे हे कळायला काही पायलट प्रकल्प राबवले होते का? असा प्रकल्प राबवणे ही सामाजिक/शिक्षण शास्त्र संशोधनातील अत्यंत बेसिक पायरी नाही का? की हे बदल योग्य आहेत असे सांगणाऱ्या व्यक्ती थोर आहेत हे गृहित धरून त्यांची चूक होणारच नाही असा अत्यंत अवैज्ञानिक ' काकू वाक्यं प्रमाणम् ' प्रकार आहे? इतका मोठा आणि मूलभूत बदल असा सरळ थोपवणे हे या आधीच्या तुघलकी निर्णयांची आठवण करून देणारे आहे.

मानव, अमितव,
तीस अधिक दोन म्हणजे बत्तीस असे शिकवणे वेगळे, आणि बत्तीसला - तीस दोन - असा "पर्याय" अधिकृतपणे थेट शिक्षण विभागानेच देणे वेगळे.
गणित, शास्त्र विषयातल्या अनेक संकल्पना शिकवताना जर एखाद्याला समजत नसेल तर असे सोपे करुनच शिकवले जाते.
शिक्षण क्षेत्रात अनेक नवे संशोधन होत असते. त्यांचा उपयोग करुन शिक्षण सोपे केले जाऊ शकते. पण म्हणुन नवे पर्याय देऊन भाषा बदलली जाऊ शकत नाही.

अनेक शिक्षक / संस्था 'तीन दशक दोन' म्हणजे बत्तीस हे शिकवतात. विद्यार्थ्यांना हे समजतं असा अनुभव आहे.
आता 'तीस दोन' असा 'पर्याय' देण्यात आला आहे. काही मुलं 'तीस दोन' ही संख्या ३०२ अशी लिहितात, असा अनुभव आहे.
हा बदल कशासाठी? गणिताने भाषाशास्त्रात पडू नये. जोडाक्षरं शिकवण्याची जबाबदारी भाषेच्या शिक्षकांची आहे, गणिताच्या नव्हे.
३२ म्हणजे तीन दशकं अधिक दोन हे मुलांना कळेल, याची काळजी गणिताच्या शिक्षकांनी करावी. 'तीस दोन' लिहून प्रश्न सुटणार नाही. उलट एकाचं दुसर्‍याला कळणार नाही.

*
हा बदल करताना पालक-शिक्षक यांना विश्वासात घेतलं नाही, आधीच्या विरोधाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं.

अमितव, चिनुक्स, भरत आणि वरदा यांच्यामधली चर्चा आवडतेय. मी स्वतः याबाबत सध्या न्युट्रल आहे.
बाकी ७९ ला एकोणसत्तर म्हणणारा माझा इंग्रजी माध्यमातला मुलगा या बदलावर खुश आहे. त्याच्या आईला त्रास देण्यासाठी कालपासुन या नविन पद्धतीनेच सगळे आकडे म्हणतोय Lol पण ७०९ ला तो सत्तर-नउ वाचणार नाही याची खात्री नाही. Happy

छान चर्चा चालू आहे. भरत आणि चिनूक्स यांचे म्हणणे पटतंय. मुलांना अंकओळख व्हावी म्हणून जरी हा बदल आहे असे सांगत असले तरी याचा त्यांच्या भाषेवर नक्कीच प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळी आम्ही शाळेत शिकत होतो तेव्हा एकावर एक अकरा किंवा दहा अधिक एक अकरा असे शिक्षक तोंडी शिकवत असत पण ते फक्त अक्षर ओळख होण्यापुरते. पुस्तकात अकराची फोड कधीच अशी लिखीत स्वरूपात नव्हती. माझ्या मते मुले जे वाचतील त्याचे आकलन त्याच पध्दतीने करतील. त्यामुळे पुढे अनेक मुले अकरा, बारा ऐवजी दहाएक, दहादोन अश्या स्वरूपातच त्या संख्यांचा उच्चार करतील जे भाषेसाठी अत्यंत घातक आहे.

बाकी लेखाच शिर्षक काही प्रतिसाद वाचल्यानंतरच कळलं. Bw

बाकी लेखाच शिर्षक काही प्रतिसाद वाचल्यानंतरच कळलं.
Submitted by नरेश माने on 19 June, 2019 - 11:48
>>
नव्या पिढीला जोडाक्षर कठीण जातात. म्हणुन स्वर व व्यंजन आणि संख्या फोड करुन दिले आहेत. हा फक्त एक पर्याय आहे.
तुम्ही पुढच्या यत्तेत गेलात की ते सगळे जोडून वाचा.
अजून पुढची पिढी येईल त्यांच्यासाठी - ट + ह = ठ असे सोपे करुन देऊ. मग तर आणखीनच सोपे होईल मराठी व मराठीत व्यवहार करणे.

जयंत नारळीकरांचा हिंदुत्ववादाशी / हिंदू राष्ट्राशी संबंध जोडणार्‍यांकरिता खास बातमी -

https://www.loksatta.com/lekh-news/fathers-day-2018-jayant-narlikar-1697...

माझी दुसरी कन्या गिरिजा हिने पण गीता प्रमाणेच स्वत:च्या हिमतीवर आय.आय.टी.ची प्रवेश परीक्षा उच्च श्रेणीत सर केली. पुढे तेथे कम्प्युटर सायन्सची पदवी घेऊन तिने कार्नेगी मेलन विद्यापीठात डॉक्टरेट मिळवली. ती आता ‘गुगल’ कंपनीत संशोधनाच्या उच्च दर्जात आहे. गिरिजा ज्युनियर कॉलेजमध्ये असताना मला तिच्यावर रागवायचा एक (आणि एकमेव!) प्रसंग आला तो प्रसंग असा. दक्षिण मुंबईतील काही कॉलेज कुठल्यातरी धर्मार्थ कामासाठी पैसे गोळा करत होती. त्यात महाविद्यालयाचे विद्यार्थी जाणाऱ्या-येणाऱ्या मोटरकार्स थांबवून त्यांना स्टिकर लावून पैसे घ्यायचे. एकंदर पद्धत मला आक्रमक वाटली आणि त्यात गिरिजाने भाग घेऊ नये असे वाटत होते.

स्कूटर खरेदीमध्ये लीलावतीला एक अनपेक्षित फायदा झाला. मंगला तिला घेऊन स्कूटरच्या दुकानात गेली. तिथे काही स्कूटर विकायला ठेवलेल्या होत्या. पण प्रत्यक्ष विकत घेणे शक्य नव्हते. मोठी प्रतीक्षा यादी होती. ‘‘या सर्व दुचाक्या पूर्वी ऑर्डर केलेल्या आहेत.’’ दुकानदार म्हणाला. ‘‘मग या सगळ्या इथे का?’’ लीलावतीने विचारले. विक्रेता म्हणाला, ‘‘पितृपक्ष चालू असल्याने तो संपेपर्यंत ग्राहक त्या विकत घेणार नाहीत.’’ त्यावर मंगलाने म्हटले, ‘‘मग आम्ही आज पैसे भरून यापैकी एक दुचाकी घेतली तर पितृपक्ष संपेपर्यंत तुम्ही फॅक्टरीतून मागवू शकता.’’ दुकानदाराला ते पटले, पण त्याला आश्चर्य वाटले की पितृपक्षात खरेदी करणारे काही लोक असतात तर! घरी जाताना मंगलाने लीलावतीला पितृपक्षाचा महिमा सांगितला आणि तिच्या माहितीच्या भांडारात आणखी एका अंधश्रद्धेची भर टाकली.

सहज लक्षात राहणार पर्याय दिला असेल तर त्याने भाषाबदल होईल असे वाटत नाही. पुढे जाऊन प्रचलीत शब्दच वापरात येतात. याचं उदाहरण म्हणजे आपण शिकलेलो काही पाढे.
बे चा पाढा - पण आपण म्हणतो दोनच.
सतरा सकम दुवोदरसे
सतरा साती एकोणिसासे
छत्तीसासे, त्रेपन्नासे
पाचोदरसे, पंधरोदरसे
वगैरे वगैरे. पण आपण वापरतो प्रचलीत शब्दच.

बाकी या प्रकारात चिनूक्स म्हणतात तसे हिंदुत्ववादी राजकारण कसे आहे वगैरे अजिबात कल्पना नाही.
एकंदरीत इतिहास वगैरे अभ्यासक्रम बदलणे, वैदीकगणीत शिकवणे हा वेगळा विषय ठरेल, इथे त्याचा संबंध आहे असे अद्यापतरी वाटत नाही.

मानव,
तुम्ही दिलेले उदाहरण अधिकृत "पर्याय" म्हणुन कधी होते?
मला तर ते फक्त पाढे तालासुरात रंजक करुन म्हणण्याची पद्धत वाटते आहे. तो काही "अधिकृत पर्याय" नाही.

छान चर्चा.
आपण एकावर पुज्य दहा, सातावर दोन बहात्तर असं मोठमोठ्याने घोकत शिकलोच ना? मग हा नवा उद्योग कशासाठी हे अगम्य आहे. पण हा प्रकार फक्त शिकवण्यापुरता असणार, प्रत्यक्षात उच्चार किंवा अक्षरी लिहिताना बहात्तर असेच असणार. कुणीही “मला सत्तर दोन टक्के मार्क मिळाले” असे म्हणायला सांगत नाहीए असं वाटतं.

शिक्षण खातं अनेक प्रयोग दर वर्षी करतं.मध्ये एकदा 10वी ला रिझल्ट न देता ग्रेड द्यायची वगैरे काही चालू होतं.
तसाच हा एक प्रयोग असेल.फ्लॉप झाला तर आपोआप जाईल.
(या शिवाय शाळांचे काही चक्रम निर्णय आम्ही झेलत असतोच.पहिलीत जाईपर्यंत मुलांना करसिव्ह इंग्लिश लिहायला लावायचे.बंपटी आणि लंपटी चा(म्हणजे विजेच्या साइन वेव्ह असतात सायन्स मध्ये तश्या उलट सुलट लाटा) पानं पानं सराव करून घ्यायचा, आणि पहिली ला सर्व बोर्ड आणि सर्व शाळांची मुलं येतात म्हणून आम्हा मराठी मिडीयम वाल्यांसारखं नॉर्मल लिपीत इंग्लिश.शेवटी करसिव्ह आणि सरळ चं मिश्रण करून मुलं डायरीत जे लिहितात ते वाचताना मोडी लिपी डिकोड केल्याचा भास होतो.अश्या लिपीत लिहिलेल्या वह्या तपासाव्या लागत असतील तर टीचर ना खूप चांगला पगार मिळायला हवा.)
(तात्पर्य: शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या प्रयोगांवर आणि आपण नेमके त्यावर्षी शिकत असण्यावर आपला कंट्रोल नाही.)

हे दोन चाळीस केल असत तर जास्त सोप झाल असत ना ? ही जर्मन पद्धत आहे. जी आपल्या बेचाळीसला जास्त जवळची आहे
चाळीस दोन अगदीच फोर्टी टू आहे Happy

एकोणसत्तर, एकोणऐंशी हे शब्द एक उणे ऐंशी, एक उणे सत्तर असे शिकवले होते आणि उणे म्हणजे कमी हे मराठी भाषेतली अनेक उदाहरणे देऊन समजावले होते. पुणे तेथे काय उणे ही म्हणही सांगितलेली आठवते. बेरीज वजाबाकी शिकण्याची वेळ एक इयत्तेनंतर आली तरी त्या आधी उणे म्हणजे कमी हे डोक्यात बसले होते आणि आकडेओळख झाली होती.

संपल्या विना ही वर्षे दशोत्तरी चार
अयोध्येत नाही येणे सत्य हे त्रिवार.

हा प्रयोग पूर्वीच केला गेला आहे. यात जोडाक्षरे किती आहेत, असे विचारू नये

The problem is that if you try to change counting system in a language just to simplify it , it is not good for that language . Asking a child is not a solution to this . Similarly a child will be happy to pronounce CUT PUT in same way or might feel it is easy to spell Wednesday as WENSDE (its actual pronounciation), are you allowing it ? When you learn a language , it is with its Pros and Cons . Now if you don't want to learn it , it is a different case .

स्वरुप यांनी दिलेल्या लिंकेमधला शेवटचा परिच्छेद महत्त्वाचा आहे.
समितीच्या अध्यक्षा अशा दूरगामी परिणामांना लपवून ठेवत आहेत. एकाही मुलाखतीत त्यांनी होणार्‍या परिणामांची चर्चा तर केली नाहीच, पण वर केवळ 'मुलांना गणिताची गोडी लागावी' अशी मखलाशी सुरू आहे.

निमकर यांनी राजकीय इच्छाशक्तीचा उल्लेख केला आहे. आपल्या विचारसरणीची माणसं आपल्या बाजूला असली की हवे ते निर्णय हवे तसे राबवता येतात.

श्री. रमेश पानसे यांची भूमिका त्यांच्या परवानगीने इथे चिकटवतो आहे -

मराठी संख्या वाचनात जोडाक्षरांचा अडथळा येतो, विद्यार्थ्यांना जोडाक्षरे उच्चारण्यात समस्या येते असा दावा करून शालेय विद्यार्थ्यांना संख्या वाचनाची नवी आणि वेगळी पद्धत शिकवावी, असा सल्ला महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीशी संबंधित गणित अभ्यास मंडळातील तज्ञांनी दिल्याचे समजते. या निर्णयाची समाजात कोणती व्यापक चर्चा झाली, ती कोणत्या पातळीवर झाली सदर चर्चेत शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षण खात्यातील अधिकारी सहभागी होते याची माहिती प्रसिद्ध झालेली नाहि. संख्या वाचनातील ही नवी पद्धत थेट पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून जाहीर करण्यात आली आहे. या नव्या पद्धतीनुसार ६३ त्रेसष्ठ, ७३ त्र्याहत्तर किंवा ३२ बत्तीस या संख्यांचे वाचन अनुक्रमे साठ तीन, सत्तर तीन किंवा तीस दोन असे करावे हे इयत्ता दुसरीच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात म्हटले आहे.

जोडाक्षरे उच्चारणे विद्यार्थ्यांना जमत नाही हे या बदलासाठी दिलेले कारण फारच तकलादू आहे आणि समर्पक नाही. महाराष्ट्र शासनाने पुढील मुद्यांचा विचार करून सदर नवी पद्धत तातडीने मागे घ्यावी अशी मागणी मी संबंधित शासकीय यंत्रणेकडे केली आहे. माझ्या मागणीच्या पुष्ट्यर्थ मी पुढील मुद्दे मांडत आहे.

मुद्दा क्र. १ - जोडाक्षरे नको व जोडाक्षर विरहित अक्षरांसह संख्या वाचन केले जावे असे सुचवणाऱ्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील पानावर ज्या टिपणात हे सुचवले आहे त्या टिपणातच भरपूर जोडाक्षरे आहेत. महाराष्ट्र, राज, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, अभ्यासक्रम, गुणोत्तर, संख्या, स्पर्शिका, वर्तुळ, क्रम, प्रश्न, उत्तर, चक्रीय चौकोन, वक्रपृष्ठभाग, वक्रपृष्ठफळ, क्षेत्रफळ, त्रिकोणमिती या गणिताशी संबंधित सर्व शब्दांमध्ये भरपूर जोडाक्षरे आहेत. केवळ गणित नव्हे तर सर्व विषयांच्या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये मिळून हजारो जोडाक्षरे आहेत. ती सर्व जोडाक्षरे उच्चारण्याचे शिक्षण सर्व शाळांमध्ये देतात आणि बहुसंख्य विद्यार्थी त्या सर्व जोडाक्षरांचा उच्चार व्यवस्थित करतात. जोडाक्षरे हा सर्वच भारतीय भाषांचा आत्मा आहे. जोडाक्षरे हद्दपार करायची असतील तर सर्व भारतीय भाषांमधून शिक्षणच नव्हे तर भारतीय भाषांमधून सर्व व्यवहार थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. भारतातून भारतीय भाषा हद्दपार करण्याचा निर्णय अजून तरी महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारने घेतलेला नाही. असा दुर्दैवी निर्णय घेतल्यानंतर आपोआपच संख्या वाचनातील जोडाक्षरे हद्दपार होतील.

मुद्दा क्र. २ - संख्या वाचनातील जोडाक्षरांचे प्रमाण शालेय अभ्यासक्रमातील व पाठ्यपुस्तकातील एकूण जोडाक्षरांच्या तुलनेत लाखात एक या प्रमाणाहून कमी आहे. असे असताना जोडाक्षरे अवघड जातात या किंचितही संयुक्तिक नसलेल्या युक्तिवादाच्या आधारे संख्या वाचनातून जोडाक्षरे वगळण्याचा निर्णय सर्वथैव अयोग्य आहे.

मुद्दा क्र. ३ - संख्यावाचन सोपे करावे असा उपरोक्त प्रस्तावित बदलांचा हेतू आहे असे सदर बदल सुचवत असलेल्या इ. २ रीच्या पाठ्यपुस्तकातील टिपणात नमूद आहे. प्रत्यक्षात, या प्रस्तावित बदलानुसार संख्यावाचन अतिशय गुंतागुंतीचे आणि अवघडच होणार आहे. ६३ ला साठ तीन म्हणायचे असेल तर ६३४५ चे वाचन कसे करायचे ? साठ तीन चाळीस पाच की सहा हजार तीनशे चाळीस पाच ? याचा उलगडा सदर टिपणात नाही.

मुद्दा क्र. ४ - जोडाक्षर विरहित अक्षरांसह संख्या वाचन केले जावे असे सुचवणाऱ्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील पानावर ज्या टिपणात अशी सुचवलेली पद्धत केवळ पन्नास ( याला काय म्हणावे ? कारण या पन्नास मध्ये देखील जोडाक्षर आहे.) या संख्येपर्यंतच वापरावी असे म्हणले आहे, पण प्रस्तावित संख्या वाचन पद्धत सुचवण्यासाठी ६३ त्रेसष्ठ, ७३ त्र्याहत्तर यातील उच्चार अवघड जातात अशी अडचण मांडली आहे.

मुद्दा क्र. ५ - सुचवलेली नवी पद्धत अधिक गुंतागुंतीची, अवघड व अधिक वेळखाऊ आहे. ११ +१/४ सव्वा अकराचे वाचन कसे करावे याबाबत काहीही सुचवलेले नाही. त्याचे शालेतील कोवळ्या, अजाण बालकांनी ११.२५ हे रूपांतर करून मग त्याचे वाचन दहा एक पूर्णांक वीस पाच करावे असे गणित अभ्यास मंडळाचे मत आहे का ?

मुद्दा क्र. ६ - ९. ३१४५६ या संख्येचे वाचन पुढील वरच्याइयत्तेतील मुलांनी कसे करावे याबाबात गणित गणित अभ्यास मंडळाचे काय मत आहे ?

मुद्दा क्र. ७ - महाराष्ट्र शासनाने ६ नोव्हेंबर २००९ या दिवशी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला असून या शासन निर्णयात मराठी वर्ण चिन्हे, मराठी अक्षरे, मराठी जोडाक्षरे, मराठी वाक्यरचना, मराठी अंक, अंकातील मराठी संख्या, अक्षरी मराठी संख्या आणि या दोन्ही प्रकारे संख्या कागदावर कशा लिहाव्यात किंवा उमटवाव्यात याविषयी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन सविस्तर आणि पुरेसे मार्गदर्शन केलेले आहे. महाराष्ट्र या शासनाच्या शासन निर्णयात यात नमूद केलेल्या प्रकारे संख्या वाचन न करता अन्य पद्धतीने करावे असा निर्णय घेण्याचा सल्ला देण्याबाबतचे अधिकार गणित अभ्यास मंडळाला आहेत का ? याचा प्राथमिक आढावा घेतला असता उपरोक्त गणित अभ्यास मंडळाला असा अधिकार दिलेला नसावा असे अनेक शासकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.

वरील सर्व मुद्दे लक्षात घेता मराठी संख्यांचे वाचन करण्याची नवी, अशास्त्रीय पद्धत केवळ अनुकरणाच्या हौसेने आणि “ आली लहर, केला कहर “ या तत्वावर सुचवलेली असावी, असे मला वाटते.

शासनाच्या ६ नोव्हेंबर २००९ या दिवशीच्या शासन निर्णयाशी पूर्णपणे विसंगत आणि संख्या वाचन आत्ताच्या पद्धतीपेक्षा प्रचंड प्रमाणात अधिक गुंतागुंतीचे करणारी ही नवीन पद्धत पाठ्यपुस्तकातून काढून टाकावी आणि ती वापरण्याचा जो सल्ला शिक्षकांना दिला आहे तो स्वतंत्र परिपत्रकाद्वारे मागे घ्यावा अशी मागणी मी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाकडे केली आहे.

मुद्दा क्र. ८ - जोडाक्षरे हे मराठी तसेच सर्व भारतीय भाषांचे महत्वाचे वैशिष्ट्य असून जगातील इतर भाषा आणि लिप्यांच्या तुलनेत जोडाक्षरांमुळेच मराठी तसेच सर्व भारतीय भाषांतून अधिक वेगाने लेखन, वाचन, बोलणे करता येते. जोडाक्षरे हा भारतीय भाषाच्या तसेच मराठीच्या मूलभूत रचनेशी जोडलेले जगात दुर्मीळ असे एकमेव वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र शासनाच्या गणित अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी नेमलेल्या गणित अभ्यास मंडळाला भारतीय भाषांच्या आणि विशेषत: मराठीच्या मूलभूत रचनेतच बदल करण्याचा अधिकार आहे का ? या मुद्द्यावर देखील शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही मी शासनाकडे केली आहे. गणित अभ्यास मंडळाची नेमणूक करताना त्यांनी पाठ्यपुस्तकाचा आराखडा अथवा संपूर्ण पाठ्यपुस्तकाचे प्रारूप तयार करून देताना भाषेच्या मूलभूत रचनेतील बदल भाषा तज्ज्ञांशी विचारविनिमय करून समाविष्ट केले की भाषा तज्ज्ञांशी विचारविनिमय न करता केले आहेत याचा आढावा शासनाने घ्यावा आणि मगच व्यपक विचरविनिमय झाल्यावरच इतका मूलभूत बदल लागू करावा, अशी मागणी मी शासनाकडे केली आहे. भाषा तज्ज्ञांशी असा औपचारिक विचारविनिमय न करताच इतका मूलभूत बदल केला असेल तर तो बदल तातडीने स्थगित कारावा आणि या संबंधीचा आशय पाठ्यपुस्तकातून वगळण्याचे परिपत्रक ( शुद्धिपत्रक ) तातडीने काढावे, अशी मागणीही मी शासनाकडे केली आहे.

वर उल्लेखित मुद्द्यांचा विचार करून अधिकाधिक विद्यार्थी, पालक, समाजसेवक, शिक्षक, विचारवंत, मराठी लेखक, गणिताचे शिक्षक, विविध शाळांचे मुख्याध्यापक यांनी याबाबत सदर नवीन पद्धत तातडीने रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे शिक्षण संचालकांकडे समक्ष पत्राने करावी असे मी सर्वांना आवाहन करतो.

Whatsap forward
नीट समजावून घ्या ....

'बालभारती'च्या इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात नवीन पद्धतीनं अंकांचं शब्दलेखन दिलेलं आहे, त्याबद्दल -

१) मुलांना एक, दोन, तीन, चार असे बेसिक अंक आणि दहा, वीस, तीस, चाळीस असे युनिट अंक पटकन कळतात. त्यापुढं पुन्हा एक, दोन, तीन जोडून आकड्यांची रचना समजणं खरंच खूप सोपं जातं.

२) दुसरीच्या पुस्तकात, एकवीसच्या 'ऐवजी' वीस एक, बावीसच्या 'ऐवजी' वीस दोन, असं दिलेलं नाही. उलट, वीस एक 'म्हणजे' एकवीस आणि वीस दोन 'म्हणजे' बावीस असं स्पष्ट करुन मांडलेलं आहे. यामुळं मुलांना एकवीस म्हणजे नक्की किती आणि बावीस म्हणजे नक्की किती हे चांगलं कळेल. तिसरीच्या पुढं वीस एक, वीस दोन नसेल. हे फक्त सुरुवातीला समजावून देण्यासाठी आहे.

३) दुसरीच्या मुलांना 'जोडाक्षरांचा खूप त्रास नको' असं एक कारण या बदलासाठी दिलेलं आहे. पण जोडाक्षरं नको 'म्हणूनच' आकडे लिहायची पद्धत बदलली असा विरोधकांनी अर्थाचा अनर्थ केलेला आहे. त्याकडं दुर्लक्ष केलेलंच बरं.

४) नवीन पद्धतीनं 'मराठीचा गळा आवळला' वगैरे म्हणणाऱ्यांसाठी प्रश्न - एकोणसाठ आणि एकोणसत्तर हे आकड्यात लिहिताना तुमचा स्वतःचा गोंधळ व्हायचा की नाही. अनेकांचा आजही होतो. त्यापेक्षा पन्नास नऊ आणि साठ नऊ जास्त लॉजिकल नाही का ? (माझ्या मोबाईल नंबरमध्ये शेवटी शेहेचाळीस - ४६ आहे. संपूर्ण नंबर मराठीत सांगितला तरी शेवटचं शेहेचाळीस म्हणजे 'फोर सिक्स' हे मी गेली सतरा वर्षं सांगत आलोय !)

५) आधीच्या पिढीला शाळेत पावकी, दिडकीचे पाढे शिकवले जायचे. ती पद्धत बंद झाल्यावर तेव्हाच्या लोकांनी असेच गळे काढले होते. आपण शाळेत पावकी, दिडकी शिकलो नाही, मग काय नुकसान झालं ? किंवा शिकून काय फायदा झाला असता कुणी सांगू शकेल काय ? आता आपल्या मुलांसाठी काहीतरी सोपी पद्धत येतीय म्हटल्यावर आपण स्वागत करण्याऐवजी विरोध का करतोय ?

६) मोबाईलमुळं फोन नंबर लक्षात ठेवायची शक्ती नष्ट झाली, कॅल्क्युलेटरमुळं आकडेमोड करायची ताकद संपली, कॉम्प्युटरमुळं हातानं लिहायची सवय मोडली, अशा तक्रारी करणाऱ्यांनी मोबाईल, कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटरवर बहिष्कार का नाही टाकला ? ही दांभिकता मुलांच्या फायद्याच्या आड का आणतोय आपण ?

७) दुसरीच्या पुस्तकात आकडे अक्षरांत लिहायची पद्धत बदलली, याला राजकीय रंग देणं तर महादुर्दैवी आहे. गणिताचं पुस्तक तयार करणाऱ्या समितीवर कोण आहे, तेवढी तरी माहिती घेऊन मगच त्यावर कॉमेंट करावी, ही विनंती.

८) मराठीतून आकडे सोपे करुन लिहिल्याबद्दल सोशल मिडीयावर 'बालभारती'ची अक्क्ल काढणाऱ्यांपैकी खरोखर किती जणांची मुलं मराठी मिडीयमच्या शाळेत शिकतात ?

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही नवीन पद्धत एकदा आपल्या मुलांना दाखवा आणि त्यांचं मत विचारा. मला अशा पद्धतीनं गणित शिकवलं असतं तर कदाचित मलाही तो विषय आवडला असता. असो.

मुलांच्या मनाचा विचार करुन, भाषेच्या खोट्या अस्मितेकडं दुर्लक्ष करुन, अभ्यासक्रमात आणि शिकवण्याच्या पद्धतीत धाडसी प्रयोग करणाऱ्या 'बालभारती'चे आणि विशेषतः डॉ. मंगला नारळीकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

बोकलत , ते लिहिणारा माझा मित्र आहे , त्या पानावरही माझी त्याच्याशी चर्चा सुरू आहे .
मंदार शिंदे त्याच नाव , किमान त्याच क्रेडिट तर त्याला द्या Happy

Pages