बालभारतीचे मराठी संख्यावाचनाचे नवे नियम

Submitted by अभि_नव on 18 June, 2019 - 09:29

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.

हा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का? त्यांचे मत विचारले होते का?
काही सर्वेक्षण केले होते का? त्याचा सँपल साईझ किती?

या प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची?

मोडी लिपीला कालबाह्य करण्यापासून सुरु झालेला हा प्रवास, मराठी भाषाच नको इथे जाऊन संपायला किती अवधी लागेल?

मराठी शाळांची अवस्था आधीच दयनीय आहे. नवीन शाळेला परवानगी नाही. त्यात हे दिवे लावले जात आहेत.

हे असे निर्णय घेणारे कोण असतात? त्यांच्या वर बसलेले त्यांना जाब विचारत नाहीत का?

https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-balbharti-made-changes-in-ma...

https://abpmajha.abplive.in/mumbai/balbharati-changes-numeracy-for-secon...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणाकोणाला इंग्लिशसारखे संख्यावाचन पाहिजे?

So I ordered a package to be sent to my house, number 20-3.
The online shop confirmed they would send it to 20-3.
The postal service confirmed they would send it to 20-3.
The postal service then confirmed they actually delivered it at 203. The street ends at 179
https://twitter.com/Research_Tim/status/1159096528751005697

भरत भाऊ फडके यांनी सुचविले ले नव्वेवीस , नव्वेतीस सारखं पाहून गोंधळात भरच टाकली असं वाटलं. एकोणावीस ची फोड एक उणा वीस म्हणजेच वीसाला एक कमी ही अगदी योग्य आहे.
आम्ही शाळेत पाढे/ संख्या शिकताना विस अन् एक एकवीस, वीस अन् दोन बावीस असेच शिकलो.
जोडाक्षरे उच्चारायला कोणतीच अडचण येत नाही कारण माणूस सहज असे उच्चार करु शकतो.

Pages