बालभारतीचे मराठी संख्यावाचनाचे नवे नियम

Submitted by अभि_नव on 18 June, 2019 - 09:29

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.

हा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का? त्यांचे मत विचारले होते का?
काही सर्वेक्षण केले होते का? त्याचा सँपल साईझ किती?

या प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची?

मोडी लिपीला कालबाह्य करण्यापासून सुरु झालेला हा प्रवास, मराठी भाषाच नको इथे जाऊन संपायला किती अवधी लागेल?

मराठी शाळांची अवस्था आधीच दयनीय आहे. नवीन शाळेला परवानगी नाही. त्यात हे दिवे लावले जात आहेत.

हे असे निर्णय घेणारे कोण असतात? त्यांच्या वर बसलेले त्यांना जाब विचारत नाहीत का?

https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-balbharti-made-changes-in-ma...

https://abpmajha.abplive.in/mumbai/balbharati-changes-numeracy-for-secon...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमितव,
माहीत नसलेल्या गोष्टींबाबत बोलू नये.
या अगोदर का प्रस्ताव कधी आला, त्यावर कुठे चर्चा झाल्या, ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धत राबवताना आकडेमोजणीची ही पद्धत लागू करावी की न करावी, या बाबत विस्तृत माहिती अनेकांना आहे. वेळोवेळी बहुमताने विरोधच नोंदवला गेला आहे. आणि ही आजची गोष्ट नाही. वर्ध्याला जी शिक्षकांची बैठक झाली होती, ती २०१० साली. (त्यावेळी मायबोलीवर या शिक्षकांना रंगीबेरंगी पान देऊन या सर्व चर्चा इथे घडाव्या, याबद्दलही बोलणी झाली होती.)

आता हे सगळं डावलून केवळ या दांपत्याच्या म्हनण्यानुसार सर्व केलं जात आहे. आणि असं होताना राजकीय विचारसरणी महत्त्वाचीच ठरते.

मी सातवीपर्यंत मराठी माध्यमात होतो. आठवी ते दहावी math आणि science इंग्लिश मध्ये. आणि सायन्स मधून ११ वी १२ वी करतानाही मराठी विषय होता.
गणित सोडवताना bracket पेक्षा कंस मस्त वाटायचं. कंचेभागुबेव चा फॉर्म्युला तर अजूनही कितीही किचकट गणित सोडवताना कामात येतो.
माझी तीन वर्षांची पुतणी बोबड्या आवाजात आता तेवीस चोवीस म्हणते.
सांगायचा मुद्दा असा की हे वीस दोन म्हणजे ट्वेंटी टू च सरळ रुपकरण वाटतं. मराठी भाषेची जी स्वतःची सृजनशीलता आहे, त्यावरच हा सरळ घाला वाटतो. चौरेचाळीस वरून खाल्लेला मार अजून आठवतोय.
असो, व्यवहारात हा गोंधळ अजून वाढेल. एखाद्याला एकवीस मोदक आणायला पाठवलं, तर तो दहा अकरा मोदक द्या म्हणेन, आणि दुकानदार तेवढेच देईन.
बबल्या जा रे, दोन तीन नारळ घेऊन ये, तर बबल्या तेवीस नारळ आणून किराण्याला दिलेले सगळे पैसे नारळ आणण्यातच संपवेन Proud

प्रयोग मुलांवर कशाला? पुढे कोटी आणि लाख/ लक्ष काढून टाकणार असावेत. ससहजार /हहजार/?
------
आणखी एक evm चाही घोळ आहे म्हणे.
---------
तमिळमध्ये अगोदरच आहे. पण थोडे मिश्र शब्द आहेत.
-------
अधिक महिन्याच्या जावयाला देण्याच्या वाणाला कसारा भागात तेहतीसला तीस-तीन म्हणतात. "काय दिलं तीसतीन यंदा?"

अतिशय महत्त्वाचं -

हा बदल केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित नाही, हा भाषाबदल आहे. असा बदल करण्याचा अधिकार कोणा एका मंत्र्याला, शास्त्रज्ञाला व त्याच्या पत्नीला व पाठ्यपुस्तक मंडळाला असता कामा नये. दुसरीतून तिसरीत गेलेली मुलं पुन्हा जुन्या पद्धतीनं आकडेमोजणी करणार नाहीत. त्यामुळे हा निर्णय कोणी, कसा, का घेतला, हे जाहीर करून समिती नेमण्यात यावी.

मी डिलीट केलेली पोस्ट.... कारण माझीच चिडचिड होते. आता त्यावर तुझा रिप्लाय आल्यने परत पेस्ट करतो.

सदर दांपत्य फ्रांस मध्ये राहिल्याने त्याचा परिणाम झालेला बघणे फक्त आणि फक्त रोचकच ठरणारे, पण ते हिंदू राष्ट्राची स्वप्ने बघतात आणि सदर सरकारचा त्या विचारसरणी पाठिंबा आहे आणि त्या दांपत्यांचं आडनाव मोठं आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेतला आहे याची मात्र खात्री आहे!
हे क्लासिक ट्रोलिंगचं उदाहरण आहे. विषयाशी अर्थाअर्थी संबंध नाही, पण तर्क खेचला तर संबंध जोडता येतो आणि ते वाचल्याने समोरच्याच्या भावना उद्दिपीत होतात.
ते दांपत्य हिंदूराष्ट्राची स्वप्नं बघतं का संभोगदृष्यांची स्वप्न बघतं आणि त्यांचे भाषा बदलाचे विचार ... आणि सरकारचे हिंदू राष्ट्र स्वप्न... त्याचं कॉजल रिलेशल असलंच पाहिजे!

लोकंना माहित नसलेल्या गोष्टी नीट माहित करुन न देता, मधले दुवे गाळून डायरेक्ट कन्क्लुजन लिहिणे... ज्याने भावना परत उद्दिपीत (पी ह्र्स्व का? ) होतील. वन मोअर ट्रोलिंग बॉक्स चेक्ड!

हा प्रस्ताव ज्या थोर दांपत्याच्या आग्रहाला बळी पडून मंजुरीपर्यंत पोहोचला आहे, ते दांपत्य हल्ली हिंदुराष्ट्राची स्वप्नं बघतं.>>>>

कोण हे दाम्पत्य? त्यांना नाव असेल ना?

>>हा बदल केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित नाही, हा भाषाबदल आहे. असा बदल करण्याचा अधिकार कोणा एका मंत्र्याला, शास्त्रज्ञाला व त्याच्या पत्नीला व पाठ्यपुस्तक मंडळाला असता कामा नये. दुसरीतून तिसरीत गेलेली मुलं पुन्हा जुन्या पद्धतीनं आकडेमोजणी करणार नाहीत. त्यामुळे हा निर्णय कोणी, कसा, का घेतला, हे जाहीर करून समिती नेमण्यात यावी. >> +१

हे कोण आहेत शास्त्रज्ञ? आणि त्यांची पत्नी?

बाकी नारळीकर पती पत्नी हिंदूराष्ट्राचं स्वप्न बघत असतील हे एकवेळ मान्य केलं तरी भाषा विषयक सुधारणा आणि हिंदुत्त्ववाद याची ते सांगड घालत असतील हे कसं पटवुन घेऊ?
हिंदुराष्ट्राचं स्वप्न बघणारे माठ लोक भारतात खोर्‍याने आहेत, अशा जहाल लोकांचे विचार अंगिकारले तर त्यांना फॉलो करुन मतं देणारे गणंग ह्या सरकारला मतं ही देतील. मग अशा माथेफिरू लोकांचे 'ते हिंदुत्त्ववादी आहेत' या एका सर्टिफिकेटवर विचार फॉलो करुन निर्णय घ्याचयं सोडून ... हिंदुत्त्ववादी आहेत... चला नारळीकरांच्या मागे लागून त्यांचे विचार निर्णयात बदलू... असं सरकार करेल हे पटवुन घेणे आणखी कर्म कठिण आहे.
नारळीकरांचे विचार ऐकले नाहीत तर त्यांना फॉलो करणारा कोणी मतदार आहे का? ते हिंदुत्त्ववादी आहेत, हिंदू राष्ट्राची स्वप्ने बघतात हे इथे आणखीकोणा कोणाला माहित होते?

सुलभीकरण - सपाटीकरण यापुढे वाढत जाणार अशी चिन्हं आहेत.
आयआयटी मद्रासच्या काही लोकांनी भारती स्क्रिप्ट नावाची लिपी तयार केली आहे. एक देश - एक लिपी यावर या लोकांचा विश्वास आहे. ही लिपी वापरूनच सर्व भाषा लिहाव्यात, असा त्यांचा प्रस्ताव आहे.
आता हे लोक आयआयटीत असले, तरी या संस्थेचा प्रकल्पाशी काही संबंध नव्हता. मात्र संस्थेच्या नावाचा फायदा या प्रकल्पाला झालाच. त्यामुळे आता सरकारदरबारी या लिपीची भलावण करणारे अर्ज गेले आहेत. ही लिपी शाळेत शिकवावी, अशी मागणीही आता झाली आहे.
एवढ्यात जरी या लिपीला उज्ज्वल भविष्य दिसत नसलं, तरी मुळात असे प्रस्ताव सरकारनं विचारासाठी दाखल करून घेणं मला धोकादायक वाटतं.

<अशा माथेफिरू लोकांचे 'ते हिंदुत्त्ववादी आहेत' या एका सर्टिफिकेटवर विचार फॉलो करुन निर्णय घ्याचयं सोडून ... हिंदुत्त्ववादी आहेत... चला नारळीकरांच्या मागे लागून त्यांचे विचार निर्णयात बदलू... असं सरकार करेल हे पटवुन घेणे आणखी कर्म कठिण आहे.>

तुला पटवून देण्याचं काम माझं नाही.
२०१४ सालानंतर पाठ्यपुस्तक मंडळावर आलेले अनेक लोक हे केवळ राजकीय विचारसरणीमुळे आलेले आहेत. खासकरून इतिहास या विषयात. फेसबूकवरच्या ग्रुपांमध्ये किंवा फेसबुकावर पोस्टी लिहून लोकप्रिय झालेले पण इतिहासात शिक्षण नसलेले मंडळावर घेतले गेले आहेत.

<नारळीकरांचे विचार ऐकले नाहीत तर त्यांना फॉलो करणारा कोणी मतदार आहे का? ते हिंदुत्त्ववादी आहेत, हिंदू राष्ट्राची स्वप्ने बघतात हे इथे आणखीकोणा कोणाला माहित होते?>

याचा सदर प्रस्तावाशी संबंध नाही. हा निर्णय / बदल मतदारांना सांगूनविचारून झालेला नाही. विरोधकांची मतंही डावलली गेली आहेत. ते हिण्दुत्ववादी आहेत, याचा मायबोलीवर किती लोकांना माहीत आहे, याच्याशी संबंध नसून सरकारदरबारी माहीत आहे, याच्याशी आहे.

*
ग्यान संगम, प्रज्ञा प्रवाह वगैरे गूगल केल्यास बर्‍याच गमती वाचायला मिळतील.
https://indianexpress.com/article/india/india-others/sunday-story-sangham/ - ही तशी जुनी बातमी आहे.
अजून एक बातमी शोधतोय. स्मृती इराणी मंत्री झाल्यावर 'आम्ही संघाचे आहोत, आम्हाला व्हीसी / डीन करा, यूजीसीवर घ्या' या अर्थाची शेकडो पत्रं त्यांना लिहिली गेली होती, अशी बातमी होती. त्यातून अनेक नेमणुकाही झाल्या.
या सार्‍याचा सामान्य मतदाराशी कधीच संबंध येत नाही. त्याच्या परवानगीने हे घडत नसतं.

पटवून देण्याचं काम माझं नाही. >> वन मोअर चेक मार्क! Sad
इतिहासाची मोडतोड करण्याला विरोध आहेच... त्याचं एका बाजुने लिहिणे हे ही अश्लाघ्यच आहे. सध्या ते होतंय यातही काही वाद नाही.... पण नारळीकर हिंदुत्त्ववादी आहेत आणि ते त्याची स्वप्नं बघतात म्हणून हा निर्णय घेतला याच्या बद्दल जाणुन घ्यायचं आहे.

>> ते हिण्दुत्ववादी आहेत, याचा मायबोलीवर किती लोकांना माहीत आहे >> मला जाणून घ्यायचं आहे. इथे एकाला तरी ते हिंदुत्त्ववादी आहेत ते माहित आहे का ते.
कॉन्झर्वेटिव्ह लोकं भाषेच्या प्युरिटीला प्राणपणाने जपतात असं वाटत होतं.

‘संख्यानामे बदलण्यात आलेली नाहीत. जुन्या पद्धतीने बावीस, बत्तीस, सत्त्याऐंशी ही नामे कायमच राहणार आहेत. विद्यार्थ्यांना सत्त्याऐंशी म्हटल्यावर ऐंशी आणि दोन हे कळले पाहिजे. त्यासाठी आठ दशक दोन, ऐंशी दोन असे पर्याय देण्यात आले आहेत. याचा अर्थ जुनी संख्यानामे रद्द केली अथवा बदलली असे होत नाही. ज्या मुलांना जी संख्यानामे कळू शकतील ती शिकवावीत जेणेकरून गणिती संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल. पुढील इयत्तांमध्ये मुलांची भाषिक जाण वाढेल तेव्हा ती प्रचलित संख्या नामे वापरू शकतील. मात्र, संख्यानाम कळले नाही म्हणून गणित कळत नाही असे होऊ नये यासाठी हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १९४७ ही संख्या एकोणीसशे सत्तेचाळीस अशीही वाचता येते आणि एक हजार नऊशे सत्तेचाळीस अशीही वाचता येते. या संख्येच्या वाचनासाठी हे पर्याय आहेत तसाच पर्याय दोन अंकी संख्येसाठी सुचवण्यात आला आहे.’

– डॉ. मंगला नारळीकर
https://www.loksatta.com/mumbai-news/new-layout-to-visualize-concepts-19...
८७ चं उदाहरण लोकसत्ताची टायपो असावी! Rofl

जोडाक्षरं समजत नाहीत म्हणून नाही तर संकल्पना समजायला सोपं जावं म्हणून एक पर्याय दिला आहे, विच मेक्स सेन्स. हा गणितात फक्त एकम दशम स्थान समजायला एक पर्याय आहे. संख्या वाचनाची नामे कोणी बदलत नाहीये.
एकोणचाळीस, एकोणसत्तर लिहिताना सहावर नऊ का सातावर नऊ यात गोंधळ झाल्याने तिसरीतल्या मुलाला बाईंनी पट्ट्या मारलेल्या, आणि त्याचा जाहीर दुसर्‍यावर्गात नेऊन अपमान केलेला मी प्रत्यक्ष बघितला आहेत. तो कन्सेप्ट सोपा करायला ही आणखी एक युक्ती इतकंच आहे हे.

ह्याचा उपयोग मुलांच्या आकलनात होतोय का नाही, हे क्वांटिफाएबलरित्या समजणे सहज शक्य आहे. हे फक्त दुसरीतच करणार आहेत... तिसरीत नेहेमीप्रमाणे शिकतील, पण संख्येतील एकम दशम स्थाने आणि त्याची स्थान किंमत हा कन्सेंप्ट समजायला हे एक सुटसुटीत रुप अनेकांना फायदेशीर ठरू ही शकेल.

हिंदुत्त्ववादीची ट्रोलिंग किनार यात अजिबातच दिसत नाहीये.

<<<<हिंदुत्त्ववादीची ट्रोलिंग किनार यात अजिबातच दिसत नाहीये>>>
ती फक्त मायबोलीवरच दिसते.
मायबोलीवरील लोकांना कुठल्याहि विषयात गांधी सावरकर वाद. भाजप्/काँग्रेस वाद दिसतो त्यामुळे कुठल्याहि विषयावर ते हे वाद मधे आणतात नि "तू किडा आहेस, गटारात जा" असे बोलून आपल्या मुद्द्याचे समर्थन करतात!
मायबोलीवरचे लोक म्हणजे लै भन्नाट भारी राव! कुठेहि गेले तरी धुळवड, राडा!!

निवडणुकीच्या वेळी बडबड करणार्या व मराठी विषयी प्रेम दाखवणार्या राज ठाकरे यान्चे याविषयी काय मत आहे? सध्या कोठे आहेत ते?

नेहमी अत्यंत संतुलित, अभ्यासू लेखन/प्रतिक्रिया देणार्या चिनूक्स चा जयंत नारळीकरांविषयीचा प्रतिसाद अपवादात्मक वाटला.

Mazi mulagi marathi madhyamat shikate.
Mala ha badal paTalela nahi.
Jar tyanni 8 varshanni roll back karayache tharavale tar tine ka sosave?

नानबा, लोकसत्तेची बातमी वाचा. ज्यांना कठीण जातं त्याच्या साठी ही आणखी एक पद्धत आहे. बदलायचा प्रश्नच नाही कारण न वापरणे तुमच्यावर आहे.

राजीव तांबेनी डाॕक्टर मंगला नारळीकरांशी संपर्क साधला . त्या सध्या बालभारतीच्या गणित विषयाच्या प्रमुख आहेत . त्यांच्या मते

गणिताला स्वतःच्या सोयीसाठी चिन्हांची भाषा आहे, तिथे त्यांनी आवश्यक त्या सुधारणा जरूर कराव्या. पण गणिती अर्थासाठी सर्वांच्या नेहमी वापरात असणाऱ्या शब्दांना हद्दपार करणे, त्यांच्या अर्थाला मर्यादा घालणे व्यावहारिक नाही.
या संदर्भात गणिताच्या एका हस्तपुस्तिकेतील एक वाक्य आठवते -- 'आपण व्यवहारात बांगडी गोल आहे असे म्हणतो, पण ते चूक आहे, हे लक्षात ठेवावे.'
यात काय चूक आहे असे सामान्य माणसाला वाटेल. पण गणितात गोल म्हणजे sphere. त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा की सर्वांनी नेहमी 'बांगडी वर्तुळाकार आहे' असे म्हणावे.
भाषेचे नियम गणितासारखे कडक नसतात, लवचिक असतात ही भाषेची ताकद आहे हे गणितज्ज्ञांनी मान्य केले पाहिजे.
मागील वर्षी चौदाखडीचॆ सर्वांनी स्वागत कॆलॆ होतॆच.

कोणतॆही नविन प्रयोग हॆ धाडसाचॆ असतात. कारण तॆ सवयीचॆ वा रूढ नसतात. पण तॆ चिरकाल टिकायचॆ असतील तर त्याला इत्यंभूत अभ्यास, अनुभव, यशस्विता आणि लोकाश्रयाची गरज लाभावी लागतॆ.

प्रयोग यशस्वी झालॆ की तॆ काळाच्या कसोटीवर टिकतात आणि फॆल झाल्यास नवं काहीतरी त्याची जागा व्यापतं.
प्रथमच हे स्पष्ट करते की दुसरीच्या पुस्तकात दोन अंकी संख्यांच्या 'वीस-एक' इत्यादी नावांची जी एक पायरी दिली आहे, ती उपयोगी आहे असेच मला वाटते. मी त्याच्या विरोधात नाही.
पण मराठीतील संख्यानामांची पूर्ण पद्धत कायमस्वरूपी बदलण्याचा आग्रह धरू नये असेही वाटते. तसा तो समितीने धरला नसेल, तर या मुद्द्यावर उगाच गदारोळ करणे योग्य नाही. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नवी तंत्रे देण्याचा समितीला अधिकार आहे, नव्हे त्यांचे ते कामच आहे.

ओके बराच खुलासा झाला.'हेच करा' ऐवजी 'जर नेहमीचं झेपत नसेल तर या पद्धतीनेही शिकता येईल' असं काही.
फक्त हे 'हेच करा' नाहीये हे सर्व ग्रामीण शहरी रिमोट आदिवासी भागातल्या शाळा आणि टीचरांना माहीत हवं.(माझं मूल cbse मध्ये जातं.यात कोणताही भाषाविषयक पवित्रा नसून या भागात चांगल्या मराठी शाळा नाहीत आणि असल्या तरी त्यांना बस नाहीत इतकाच विचार आहे.)

भरत, धन्यवाद.

म्हणजे आपण सुरूवातीला संख्या शिकताना ....

एकावर एक अकरा
तिनावर चार चौतीस
सातावर नऊ एकोणऐशी

अश्या पद्धतीने शिकलो. त्यानंतर तसं म्हणायची गरज उरली नाही व आपण डायरेक्ट आकडे म्हणू लागलो. तसंच काहिसं आहे का हे? म्हणजे कळण्यापुरतच असेल व संख्येचा पूर्वापार चालत आलेला उच्चार बदलला जाणार नसेल तर ठिक आहे.

१. हा मुद्दा जोडाक्षरांचा आहे, की अमितव म्हणतात तसं एकोणचाळीस इ.तल्या गोंधळाचा? मला वाटतं - दुसरा. जो डाक्षरांचा मुद्दा असेल तर संख्यानामाव्यतिरिक्त अन्यत्र येणार्‍या जोडाक्षरांचं काय करणार?
२. मी trained and qualiied शिक्षक नाही. पण इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवलंय. पाचवी सहावीच्या पुस्तकांत पान क्रमांक आकड्यांसो बत अक्षरांतही असत, त्यापलीकडे मराठी संख्यानामे शिकवण्याची दुसरी व्यवस्था दिसली नाही. मी ही संख्यानामे शिकवायचा प्रयत्न केला , तो पूर्ण झाला नाही. नववी दहावीतल्या मुलांनाही मराठीच्या पाठ्यपुस्तकातले सनांचे आकडे वाचता येत नाहीत , असे दिसले. त्यांची मातृभाषा मराठी किंवा प्रमाण मराठी नव्हती.
३. मराठीतली संख्यानामे लक्षात ठेवायला कठीण आहेत, असे मला वाटते. त्यांत युनिफॉर्मिटी नाही. पहा -तेवीस, तेहतीस, त्रेचाळीस, त्र्याहत्तर.
सत्तरमधल्या स चा ह झालाय.
हिंदीतही तसंच. पिच त्तीस म्हटल्याबद्दल राहुल गांधींना मायबोलीवरच पस्तीस वेळा ट्रोल केलं गेलं असेल. ८९ ला हिंदीत काय म्हणतात, हे मला चटकन आठवत नाही. ते उ नह्त्तर, उन्यासी सारखं उन्नब्बे तोंडात येतं. ते नवासी आहे. चौरेचाळीस म्हणणारे को णी कोणी पाहिलेत?

४. <आठ दशक दोन, ऐंशी दोन असे पर्याय देण्यात आले आहेत.> पर्याय देण्यात आले आहेत, म्हणजे काय ? पर्याय कोणी निवडायचा? विद्यार्थ्याने की शिक्षकाने? विद्यार्थ्याच्या क्षमतेवर असेल तर एकाच वर्गात दोन विद्यार्थी दोन वेगळी संख्यानामे वापरणार का? की पु ढे जाऊन त्यातल्या एका विद्यार्थ्याने ती संख्यानामे पुन्हा शिकायची आहेत?
५ <पुढील इयत्तांमध्ये मुलांची भाषिक जाण वाढेल तेव्हा ती प्रचलित संख्या नामे वापरू शकतील. मात्र, संख्यानाम कळले नाही म्हणून गणित कळत नाही असे होऊ नये यासाठी हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. > इथे शकतील म्हटलंय, म्हणजे ते अनिवार्य आहे की नाही?

गणित शिकताना आपण संख्या अक्षरांत लिहितो की आकड्यांत? आकड्यांत लिहिलेल्या संख्या समजणे कठीण असते?
या कारणांमुळे मला मंगला नारळीकरांनी दिलेले स्पष्टीकरण पटले नाही. बदलाच्या मागे ठामपणे उभ्या नाहीत, असं वाटतंय.

६. हा मुद्दा गणितापेक्षा भाषेचा आहे असं मला वाटतं. चिनूक्स म्हणतात, तसं जर संख्यानामे बदलायची असतील, तर त्याचा निर्णय भाषाविषयक तज्ज्ञांनी घ्यायला हवा.
ती बदलावीत की नाहीत, ते सुलभीकरण की सपाटीकरण हा वेगळा मुद्दा. पावत्यांशिवाय अन्यत्र संख्या मराठीत अक्षरांत क्वचित लिहिल्या जात असतील. माझं मत सुलभीकरणाच्या बाजूने.
७. अकरा ते वीस हे आकडे आहेत तसेच असावेत, असा अंदाज. नवं पाठ्यपुस्तक पाहायला मिळालेलं नाही. ऑनलाइन मिळालं नाही.
वीस एक लिहिताना २०१ लिहिलं जाईल ही शंका twentyone साठीही पडावी. तिथे ते होत नाही, मराठीतही ही सवय झाली की होऊ नये.
८. मात्र चिनूक्स यांनी एकंदरितच पाठ्यपुस्तकांतल्याबदलांबद्दल व्यक्त केलेल्या भावनेशी सहमत. विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकांत अगदी उच्च स्तरापर्यंत आख्यायिकांचा समावेश होत असल्याचं दिसतंय.

ज्याला जे झेपतं, ते करू द्यावं असं म्हणणार्‍यांनी गेल्या वर्षापासून सामान्य गणिताचा पर्याय बंद केला गेला आहे, हे नोंदवणे आवश्यक आहे.

भरत, माझा मुलगा दुसरीत आहे आणि त्याला दोन अंकी संख्यांची बेरीज करायला किमान सहा सात पद्धती शिकवलेल्या. त्यातली आलटून पालटून कधी कुठली वापरायची ते मुलं फार भारी पद्धतीने शिकली.
चॉईस दिले की शिकण्यात नक्कीच मदत होते. भाषा येणे ही गणिताची पहिली पायरी आहे, पण भाषा कठीण पडत असेल तर ती सोपी करायला मदत करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे.
मला तरी माझ्या शाळेत फक्त व्हर्टिकल फॉर्म मध्ये अंक लिहून हातचे घेत बेरीज शिजवलेली. जी बरोबर येते पण त्यातल्या आकड्यांची गम्मत संपून जाते.

१. आपल्याकडे एका वर्गात असलेली विद्यार्थ्यांची संख्या, उपलब्ध वेळ इत्यादी लक्षात घेता 'ज्याला जे समजेल ते शिकवावं' हे शक्य नसतं. आकडे वाचता आले की बेरजावजाबाक्या यांच्या वेगवेगळ्या पद्धती शिकणं वेगळं आणि मुळात आकडे वाचायचे कसे, हे शिकणं वेगळं.

२. दुसरीत मुलांसमोर दोन वेगवेगळ्या पद्धती ठेवल्या तर ते गोंधळतील. या पद्धतीला विरोध करणार्‍यांचा हा प्रमुख आक्षेप आहे.

३. मुलांच्या भाषिक जाणिवा विकसित झाल्या की ते प्रचलित पद्धत वापरतील, हा भाबडा आशावाद आहे. असा सांधेबदल करणं हे अनेकांना कठीण होईल, हाही शिक्षकांचा एक प्रमुख आक्षेप आहे.

४. सध्या प्रचलित असलेली संख्यावाचनाची पद्धत रद्द केलेली नाही / करणार नाही, हे मूळ प्रस्तावात सुरुवातीपासून असलं, तरी एकदा 'सुलभ' वाचनाची सवय लागली की मुलं प्रचलित पद्धतीकडे वळणार नाहीत.

*

हा निर्णय हिंदुत्ववादी नसून हा निर्णय घेण्यामागे असणार्‍या व्यक्तींची विचारसरणी तशी असल्यानं अनेक वर्षं विरोध होत असलेला प्रस्ताव आता शून्य चर्चा करून अंमलात येतोय, हा मुद्दा आहे. असे निर्णय तज्ज्ञांशी अजिबात चर्चा न करता यापूर्वीही घेतले गेले आहेत.

भाषिक आकलनशक्ती का महत्त्वाची आहे, हे वरच्या काही प्रतिसादांमधून दिसतं. असो.

* लोकसत्तेतल्या बातमीत नवीन काहीही नाही. (मुद्दा माहीत नसतानाच चर्चा होत होती का?) मूळ प्रस्ताव हाच होता, ज्याचा थेट संबंध भाषाबदलाशी आहे. 'पर्याय उपलब्ध करून दिला आहे' असं म्हणण्याला अर्थ नाही.

Pages