बालभारतीचे मराठी संख्यावाचनाचे नवे नियम

Submitted by अभि_नव on 18 June, 2019 - 09:29

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.

हा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का? त्यांचे मत विचारले होते का?
काही सर्वेक्षण केले होते का? त्याचा सँपल साईझ किती?

या प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची?

मोडी लिपीला कालबाह्य करण्यापासून सुरु झालेला हा प्रवास, मराठी भाषाच नको इथे जाऊन संपायला किती अवधी लागेल?

मराठी शाळांची अवस्था आधीच दयनीय आहे. नवीन शाळेला परवानगी नाही. त्यात हे दिवे लावले जात आहेत.

हे असे निर्णय घेणारे कोण असतात? त्यांच्या वर बसलेले त्यांना जाब विचारत नाहीत का?

https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-balbharti-made-changes-in-ma...

https://abpmajha.abplive.in/mumbai/balbharati-changes-numeracy-for-secon...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>२७ = ७ +२० = सत्तावीस >> स्वाती२, हो मध्ये + चिन्ह दिलं तर आणखी सुस्पष्ट होईल. तुम्ही आधी ७ आणि नंतर २० हे सत्ता- वीस अधोरेखित करायला लिहिलंय का? मला वाटतं पुढे करायला लागणार्‍या बेरजा वजाबाक्यात आधी २० आणि नंतर ७ लॉजिकल असेल.
>>इंग्रजी भाषेचा शब्दकोश म्हणजे इंग्रजीचे पाठ्यपुस्तक असू शकत नाही. हे उदाहरण चपखल कसे काय ते मला समजावून सांग. >> जिज्ञासा, जसं शब्दकोशात स्पेलिंगची योग्य उच्चार करण्यासाठी फोड करून ती फोड वाचली (वर स्वाती२ म्हणताहेत त्याप्रमाणे बर्‍याच लोकांना ती माहित नसते, पण माहित नाही म्हणून ते उपयुक्त नाही, किंवा बरोबर नाही असं नक्कीच नाही. एकदा समजलं की त्याचा बराच फायदा होतो) की तुम्हाला आपोआप बरोबर उच्चारण समजते. एकदा उच्चारण समजले की तुम्ही ती तशी फोड डोक्यात करता पण तो शब्द लिहिताना त्याचं जे काय स्पेलिंग असेल तेच लिहिता. फोनेटिक फोड की फक्त आणि फक्त वाचनाला उपयोगी येते... आणि ती ही एकदा अंगवळणी पडली की तुम्ही परत तिकडे फिरकत ही नाही.
तीच अ‍ॅनलॉजी (अ‍ॅनलॉजी आहे... हे लक्षात घ्या) इथे लागू पडते आहे. एकदा वीस - तीन/ वीस + तीन = तेवीस समजलं की झालं. एकदा डोक्यात ते वायरिंग झालं की आता कायम तेवीसच म्हणा. हा भाषेचा प्रश्न नाहीच आहे. कन्स्पेंप्टचा आहे.
गणित यायला भाषा न येणे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. तुम्ही सर्वांनी मुलांबरोबर हे अनुभवलं असेलच अर्थात. भाषा, नकारार्थी/ होकारार्थी वाक्ये, जोड वाक्ये/ उभयान्वयी अव्यये आणि त्याचे अर्थ आणि परस्पर संबंध हे जो पर्यंत तुम्हाला समजत नाही तो पर्यंत तुम्हाला गणित येणार नाही कारण तुम्हाला काय विचारलं आहे तेच समजणार नाही. सो भाषेवर प्रभुत्त्व ही नॉननिगोशिएबल रिक्वायरमेंट आहे.
त्यात आकडे समजायला एक सोपा पर्याय दिला तर अनेक मुलांना एक पाऊल पुढे टाकता येईल. ह्याची प्रगती/ परिणाम मात्र तेल घालून पहावे आणि उपयोग होत नाही आहे/ अपाय होतो आहे दिसलं तर करेक्टिव्ह स्टेप्स घ्याव्या हे सांगणे न लगे. आता भारतासारख्या खंडप्राय देशात हे शक्य नाही सारखा सबगोलंकार, कुठलीही जवाबदारी/ बदल/ कामं टाळायला घेतला जाणार टिपिकल भारतीय भोंगळ आक्षेप घेऊ नये.
(हे फक्त अनेकडॉटल अनुभवातुन आहे आणि यात शून्य रिसर्च झाला आहे इतकं स्पष्ट लिहिलेलं मी अजुन वाचलं नाहीये)

अमितव, मी इंग्रजी माध्यमातल्या मुलांना शिकवतो. मराठी संख्यानामे त्यांना जड जातात, माहीतही नसतात, असं मी म्हटलंय, ते मराठी भाषा या विषयाच्या संदर्भात.

माझ्याकडच्या इंग्रजी माध्यमातल्या मुलांना गणित जड जाण्याची कारणं अर्थातच वेगळी आहेत.

पहिलीचं जुन्या अभ्यासक्रमाचं ( शैक्षणिक वर्ष २०१७-१८ प र्यंतचं पुस्तक) पान ७१ बघा.
पहिलीचं २०१८-१९ पासूनचं पुस्तक
पान ५८ पहा.

हे दुसरीचं आता बाद झालेलं पुस्तक

पान ८ वर पर्यायांबाबत शिक्षकांसाठी सूचना दिली आहे. - वीस सात असं म्हणण्यात पाठांतर नाही. बोलणे आणि लिहिणे यांचा क्रम एकच आहे. दोनपैकी जे वाचन विद्यार्थ्याला सोपे वाटेल ते त्याने केले तरी चालेल.

जुन्या पुस्तकात सुद्धा २७ म्हणजे वीस अधिक सात हे अक्षरांत लिहून दाखवलंय. नव्या पुस्तकात फक्त सत्तावीस लक्षात ठेवायची किंवा शिकायचीही गरज नाही, असं म्हटलंय. दुसर्‍या सत्राचा बहुतांश भाग २१-१०० या संख्या शिकण्यासाठीच ठेवला आहे.

त्रेसष्ठ कठीण म्हणून सोडून दिलं तर चालणार असेल, तर पुढल्या वर्गांतल्या कठीण संकल्पनांचं काय करतील याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

अमितव,

महत्त्वाचं - माहीत नसताना लिहिलेलं जरा विनोदी असतं. आणि हे तू वारंवार करतो आहेस. असो.

१. <निमकर कुठल्या शासकीय पदावर नाहीत असं वाचल्यावर समजलं. वर्क्ड अ‍ॅज ट्रेनिंग कनसल्टंट फॉर District Primary Education Program, Government of Maharashtra. इ. माहिती शिक्षक.ओआरजी वर आहे. त्यांचा ह्या निर्णयात डायरेक्ट सहभाग होता का? २००२ ची वर्धा शिक्षक सभा आणि इतर सांगोवांगींच्या कथा नको, आणि कोण हिंदूराष्ट्राचे स्वप्न बघते असले जावईशोध ही नको. टिपिकल राईट विंग कॉन्झर्वेटिव्ह फिअर माँगरिंग अजिबात नको.
त्यांची इथली मते रॅडीकल आणि सर्वंकश बदलाची आहेत ज्याला माझा जराही पाठिंबा नाही. त्यांच्या मते सध्या आहे त्यात काही तरी चूक आहे आणि ते बरोबर करायच्या अविर्भावात त्यांना यच्चयावत सगळं बदलायचं आहे. जे मला बिलकुल योग्य वाटत नाही.>

निमकरांचं महाराष्ट्रात काम मोठं आहे. महाराष्ट्राने ज्ञानरचनावादी पद्धत स्वीकारली, त्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. म्हणजे महाराष्ट्रात आज जी काही पद्धत राबवली जाते, त्यात त्यांचाही वाटा आहे. (याची अधिक माहिती रमेश पानसे यांच्या पुस्तकांमध्ये मिळेल. ज्ञानरचनावादी पद्धत स्वीकारून नंतर अंमलबजावणी नीट न होणं, हे दु:ख आहेच.)

मी आधी उल्लेख केलेल्या 'क्वेस्ट' या संस्थेचं काम निमकर बघतात, आणि ते मोठं काम आहे. त्यामुळे त्यांची मतं वाचून सोडून देण्यासारखी नाहीत.

संख्यावाचनाच्या नियमांच्या बदलाची चर्चा जेव्हा सुरू झाली, तेव्हापासून निमकर या योजनेचे पाठिराखे आहेत. त्यामुळे या योजनेसाठी काय करावं लागेल, त्याचे परिणाम काय, हे ते चांगलं जाणतात. त्यांनी जे सर्वंकष बदल करावे लागतील, हे म्हटलं आहे, ते नुसतं वाचून सोडून देण्यासारखं नाही.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ही पद्धत ते क्वेस्टमध्ये राबवतात.

महाशब्दे आणि निमकर यांचा मी वारंवार उल्लेख करतोय कारण ज्ञानरचनावादी शिक्षणक्रमाशी त्यांचा सर्वाधिक जवळचा संबंध आहे आणि दोघांनीही या योजनेच्या परिणामांवर भाष्य केलं आहे.

त्यांनी सांगितलेले परिणाम सोडून द्यायचे, पण मूळ निर्णय योग्य आहे, असं म्हणायचं, हे विनोदी आहे. कारण वीस सात म्हणत मोठ्या होणार्‍या मुलासाठी व्यवस्थेत हे बदल करावेच लागणार आहेत. नारळीकर म्हणतात मोठेपणी आपण संख्या अक्षरात लिहीत नाही, त्यामुळे फरक पडणार नाही. पण हे सरळसरळ चुकीचं विधान आहे.

प्रत्येक निर्णयाचे परिणाम असतातच आणि हे परिणाम काय, हे त्या योजनेचा एक खंदा पाठिराखाच सांगत असेल, तर ते ऐकायलाच हवं.

मुख्य म्हणजे नारळीकरांनी याबद्दल बोलायला हवं, पण त्या सारवासारव करत आहेत.

२. वर्ध्याची बैठक वगैरे सांगोवांगीच्या गोष्टी वगैरे नाहीत. तुला माहीत नाही याचा अर्थ ते सांगोवांगी आहे, असं नाही.
महाराष्ट्रात नवी शिक्षणपद्धत राबवताना या शिक्षकांनी केलेलं काम मोठं आहे.
एक साधा दृश्यपरिणाम म्हणजे या शिक्षकांचे अनुभव, त्या योजना राबवतानाचं संशोधन यांतून 'माझी शाळा' या ४२ भागांच्या मालिकेची निर्मिती झाली आहे. यूट्यूबवर आहे. बघ.

३. निमकर आणि महाशब्दे ज्या परिणामांबद्दल आणि निर्णय घेण्याच्या घायकुतेपणाबद्दल बोलतात (महाशब्दे यांच्या भाषेत - कोरड्या जमिनीवर बी टाकण्याचा प्रकार आहे हा), त्यावर माझा मुख्य आक्षेप आहे. ही पद्धत सोपी की कठीण, याबाबत मी बोललेलो नाही, कारण सध्या ते दुय्यम आहे.

४. वर तज्ज्ञांची मतं चिकटवताना तू रमेश पानसे यांच्या मताचा उल्लेख केलेला नाहीस. तो प्रतिकूल आहे, म्हणूनच तसं असेल. पण (एक मुद्दा वगळून) त्यांच्या आक्षेपांबाबतही तू बोलावंस.

माझा सुरुवातीपासून असलेला मुद्दा हाच की, नारळीकर लपवाछपवी करत आहेत. पहिलीत जोडाक्षरं नाहीत, हा नियम पर्यायी आहेत, हे साफ चुकीचं आहे.

२००९ सालच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयासह भाषाबदल या समितीनं केला आहे, कोणत्याही चाचणीविना. हा प्रकार तुघलकीच आहे.
असे बदल करण्याचे अधिकार पाठ्यपुस्तक मंडळाला नाहीत.

पान 58 पहिले. मला समजत नाही यात नवीन काय आहे? मी पहिलीत असताना असेच अंक शिकलो. फरक इतकाच आहे की गुरुजींनी हे फळ्यावर लिहून समजावून दिले होते, आता पुस्तकातच तसे छापले आहे.
तीन दशक+दोन=तीस दोन=बत्तीस.
शेवटी बत्तीसच म्हणायचे आहे ना? बत्तिसला "तीस दोन" म्हणायचे आहे? की बत्तीस समजण्यासाठी तात्पुरते तीस दोन म्हणायचे आहे? मला वाटते समजण्यापुरते तीस दोन म्हणायचे असून 32 हा आकडा अक्षरी "बत्तीस" असाच राहणार आहे.
जो काही निर्णय घेतला गेलाय त्यात शिक्षकांचे मत घ्यायला हवे होते हे नक्की.
एक मात्र आहे, हि पद्धत योग्य अयोग्य कशीही असली तरी एक हुशार शिक्षक हा नेहमी विद्यार्थ्यांची आकलनशक्ती लक्षात घेऊन स्वतःची अशी एक पद्धत तयार करून विद्यार्थ्यांना गणित शिकवतो. मुले गणितात हुशार असणे किंवा कच्ची असणे यात चांगल्या किंवा वाईट शिक्षकाचा बराच मोठा हाथ असतो. शिक्षकांमुळे मुले एखाद्या विषयात मागे पडू शकतात. गावाकडे फक्त शिक्षकाच्या त्रासामुळे शाळा सोडलेली मुले मी पहिली आहेत.

याच पुस्तकात मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायन हे हिंदी नाव वापरलं आहे.

आपण भाषाशास्त्रज्ञ नाही, हे नारळीकरांनी सांगितलं आहे. त्यामुळे असं झालं असावं.

असो. तेच तेच लिहून कंटाळा आला. नवीन काही असलं तर लिहीन.

हे नव्या अभ्यासक्रमाचं (२०१८-१९ पासून) पहिलीचं मराठीचं पुस्तक
यात पहिल्या पाठापासून (जी कविता ऐकायची आणि म्हणायची आहे) जोडाक्षरं आहेत.
एकही पाठ असा नाही, ज्यात जोडाक्षरं नाहीत. पान ७८ वर जोडाक्षरं शिकवली आहेत.

पहिलीच्या गणिताच्या नव्या पुस्तकातल्या या बदलासं बधाने शिक्षकांना सूचना दिल्यात त्या संबंधाने
वीस तीन असा पर्याय देण्याची तीन कारणं दिलीत -
१. जोडाक्षरं नकोत (जी मरा ठीच्या पुस्तकात आहेत)
२. पा ठांतराची गरज नाही - पण पाठांतरात वावगं काय आहे? मुलां ना १०० आकडे त्यांच्या चि न्ह- नाव या जोडीसकट पाठ असणं अपेक्षित नाही का? जर हे पहिलीच्याच काय, दुसरीच्या मानानेही अवघड असेल, तर गणित तिसरीपासूनच सुरू करावं. (पुढे पाढे पाठ करायचे की नाही?)
३. पर्यायी पद्धत सोपी आहे. - मान्य आहे. पण
अ) ती कुठपर्यंत वापरणार? कायम की मुलांनी पुढे जाऊन सध्याची संख्यानामे शिकायचीच आहेत? केव्हा? नसतील, तर वर चिनूक्स म्हणताहेत, ते मुद्दे येतीलच.
आ) संख्यानामे कळत नसल्याने मुलाना गणित अवघड जाते हे कारण असेल, तर इंग्रजीतली संख्यानामे सोपीच आहेत. तिथे सोपं जातं का? माझा अनुभव - नाही. पण त्याला किंमत नाही. बदल करणार्‍यांनी याबद्दल काहीतरी अभ्यास केला असेलच. इथे अनेकांनी आधी लिहिलं तसं
प्रोजेक्ट, डेटा, इ. संख्यानामे न कळल्याने गणित अवघड, नाठरते, भीतीदायक ठरते हे खूप सोप्प उत्तर आहे.

मराठीच्या पुस्तकातलं पान ९ वरचं वाक्य - शब्दानुभवाचा सराव देताना शिक्षकांनी 'समजेपर्यंत सराव' हे सूत्र लक्षात ठेवायला हवे. हे सूत्र संख्यानामांना लागू पडत नाही का?

मराठीतली संख्यानामांची प्रचलित पद्धत गोंधळवणारी , अवघड आहे, हे मान्य आहे. त्याला पाठांतर आणि सराव यांच्याशिवाय पर्याय नाही. ती शिकायला दोन वर्षं देतोय. तरीही ती अवघड असतील तर ते शिक्षण आणखी उशिरा करता येईल का?
ती बदलायची तर तो एक मूलभूत बदल होईल. त्याचे परिणाम व्यापकहिलेला; जे चिनूक्स यांनी अनेक वेळा लिहिलं आहे.
तो 'तात्पुरता' पर्याय असेल, तर पुढे काय आणि कसं, हे आताच सांगितलं जायला हवं.

शाली, " दोनपैकी जे वाचन विद्यार्थ्याला सोपे वाटेल ते त्याने केले तरी चालेल." असं पुस्तकात म्हटलंय.
त्यावरून निर्माण होणारे प्रश्न इथे अनेकवेळा मांडले गेले आहेत.

<दोनपैकी जे वाचन विद्यार्थ्याला सोपे वाटेल ते त्याने केले तरी चालेल." असं पुस्तकात म्हटलंय.>

नाही. दुसरीच्या पुस्तकात नवीन पद्धतच शिकवा असं म्हटलंय. जुनी पद्धत कोणी वापरत असेल, तर ग्राह्य धरा.

*

अमित,
माधुरी पुरंदरे यांच्याशी बोललो. हा भाषाबदल कसा नाही, हे त्यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं.
काल बीबीसीला त्यांनी मी प्रतिक्रिया देणार नाही, असं सांगितलं होतं.
त्यानंतर जे बोलणं झालं, त्यातलं बीबीसीने निवडक छापलं.
त्यांची प्रतिक्रिया थोड्या वेळात काढून टाकतील.

<दुसरीच्या पुस्तकात नवीन पद्धतच शिकवा असं म्हटलंय.जुनी पद्धत कोणी वापरत असेल, तर ग्राह्य धरा. >
ओके. म्हणजे पहिली आणि दुसरीच्या पुस्तकांत समन्वय नाही (भाषा आणि गणिताच्या पुस्तकात नाही, ते आणखी वेगळं) आणि नारळीकर खोटं बोलताहेत किंवा नेमकं बोलत नाहीएत.

दुसरीच्या पुस्तकाबाबत शिक्षकांना असलेल्या सूचना मी आधीच्या पानांवर लिहिल्या आहेत.

<आणि नारळीकर खोटं बोलताहेत किंवा नेमकं बोलत नाहीएत.>

धन्यवाद. Happy

अमितव, शब्दकोशात जशी फोड करतात तिचा उद्देश वेगळा असतो. तसे जर इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात करायला गेलो तर ते योग्य ठरणार नाही. सध्या चिनूक्सने लिहिलंय ते बघता ३२= तीस दोन किंवा बत्तीस म्हणजे इंग्रजीच्या स्पेलिंग्सची भीती घालवायला Island =aayland आणि दोन्ही बरोबर आहेत असे म्हणण्यासारखे आहे.

चिनूक्स, तुमच्या पहिल्या पानावर असलेल्या प्रतिसादात जरी तुम्ही नारळीकर पती-पत्नींचं नाव घेतले नसले, तरी नंतरच्या प्रतिसादांतून हे स्पष्ट आहे की तुम्ही त्यांच्याबद्दलच लिहिलं आहे.
डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. मंगला नारळीकर हे दोघे हिंदू राष्ट्राचे स्वप्न बघत आहेत असं तुम्हाला का वाटतं?

वावे,
मला आणि मला माहीत असलेल्या त्यांच्या काही विद्यार्थ्यांना तसे अनुभव माहीत आहेत

मंगला नारळीकरांनी मोदींना निवडून देऊ नका, असं आवाहन केलं होतं आणि आताचा हा नियम म्हणजे सरकारला अडचणीत आणण्याचाच एक भाग आहे, असंही आताच वाचलं.

ओके.
पण तुम्ही तर त्या प्रतिसादात असं लिहिलं आहे की ' सध्याच्या सरकारी विचारसरणीला असलेला पाठिंबा लक्षात घेऊन' हा निर्णय स्वीकारला आहे. मग नेमकं काय?

हा प्रस्ताव ज्या थोर दांपत्याच्या आग्रहाला बळी पडून मंजुरीपर्यंत पोहोचला आहे, ते दांपत्य हल्ली हिंदुराष्ट्राची स्वप्नं बघतं.
या प्रस्तावाला पूर्वी अनेकांनी विरोध केला आहे. ज्ञानरचनावादासंबंधी चर्चा होत असतानाही असंख्य शिक्षकांनी विरोधच केला होता. हा सगळा विरोध, त्या सगळ्या चर्चा यांच्याकडे दुर्लक्ष करून या दांपत्याच्या मोठ्या आडनावाला भुलून आणि सध्याच्या सरकारी विचारसरणीला असलेला पाठिंबा लक्षात घेऊन हा अतिशय बुद्धिमान निर्णय घेण्यात आला आहे.

फ्रेंचांची आकदे मोजण्याची पद्धतही प्रस्तावित पद्धतीप्रमाणेच आहे. सदर दांपत्य त्या देशात वास्तव्यास होते, त्याचा काही परिणाम या प्रस्तावावर झाला आहे का, हे बघणं रोचक ठरेल.

Submitted by चिनूक्स on 18 June, 2019 - 22:38

मी या प्रतिसादाबद्दल बोलत आहे. माझ्या समजुतीप्रमाणे नारळीकर पती-पत्नींचा ' सध्याच्या सरकारी विचारसरणीला' पाठिंबा आहे असा यातून अर्थ निघतो.
आणि आत्ता तुम्ही लिहिलेल्या प्रतिसादातल्या

<<<मंगला नारळीकरांनी मोदींना निवडून देऊ नका, असं आवाहन केलं होतं आणि आताचा हा नियम म्हणजे सरकारला अडचणीत आणण्याचाच एक भाग आहे, असंही आताच वाचलं.

Submitted by चिनूक्स on 20 June, 2019 - 10:57>>

या भागाचा अर्थ उलट निघतो.

तुम्हाला आणि डॉ नारळीकरांच्या काही विद्यार्थ्यांना माहीत असलेले अनुभवही खरं तर जाणून घ्यायला आवडतील. पण ते कदाचित इथे अस्थानी होईल.

नीट वाचा.

मोदींना विरोध हे मी 'वाचलं'. ते माझं मत नाही. माझ्या मताच्या विपरीत मत आहे.

>> तुम्हाला आणि डॉ नारळीकरांच्या काही विद्यार्थ्यांना माहीत असलेले अनुभवही खरं तर जाणून घ्यायला आवडतील. पण ते कदाचित इथे अस्थानी होईल.

+१

जयंत नारळीकरांनी पौराणिक छद्मविज्ञानावर, ज्योतिषावर टीका केलेली आठवते. त्यामुळे ते हिंदुराष्ट्राची स्वप्नं बघत असतील हे सकृतदर्शनी पटलं नाही. याबाबत अधिक वाचायला आवडेल. पण वावे यांनी म्हटल्यानुसार ते इथे अवांतर होण्याचा धोका संभवतो

>>>>> आताचा हा नियम म्हणजे सरकारला अडचणीत आणण्याचाच एक भाग आहे, असंही आताच वाचलं.>>>
Maharashtra>>>>> त्यातले SSC बोर्ड असणारे विद्यार्थी>>>> त्यातले मराठी मिडीयम वाले>>>> त्यातले नियम काय आहे वगैरे जागरूकता दाखवणारे,
एवढे प्रचंड पॉप्युलेशन नाखूष झाल्याने मोदी सरकार अडचणीत येईल वगैरे स्वप्ने कोणी पाहत असेल आणि तश्या अर्थाचे सोमीवर लिहीत असेल , तर ते फार फार थोर असले पाहिजेत Lol

>>मला आणि मला माहीत असलेल्या त्यांच्या काही विद्यार्थ्यांना तसे अनुभव माहीत आहेत >> पर्सनल इंटरप्रिटेशन आणि लंच टेबल गॉसिप वरून इतके धडधडीत आरोप कसलीही फर्स्ट पर्सन शहानिशा न करता पब्लिक फोरमवर करणे! मी पहिल्या पोस्ट पासून ट्रोलिंगच्या नावाने ओरडत होतो ते खरं निघालं तर! Sad

< पर्सनल इंटरप्रिटेशन आणि लंच टेबल गॉसिप वरून इतके धडधडीत आरोप कसलीही फर्स्ट पर्सन शहानिशा न करता पब्लिक फोरमवर करणे! मी पहिल्या पोस्ट पासून ट्रोलिंगच्या नावाने ओरडत होतो ते खरं निघालं तर! Sad>

मला आलेले अनुभव हेच माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत. ते मी पब्लिक फोरमवर लिहायचे की नाही, हा माझा प्रश्न आहे.
लंच टेबल गॉसिप वगैरे हे तुझ्या नेहमीच्या माहितीच्या अभावातून आलेले आहे. त्याला इलाज नाही.

या संपूर्ण चर्चेत तू एकदाही पूर्ण व्यवस्थित माहिती घेऊन - विषयाची आणि व्यक्तींची - विधानं केलेली नाहीस. ते तू करावंस ही अपेक्षा आहे.
बीबीसीचा मजकूर चिकटवल्याबद्दल आभार. तिथून आता त्यांच्या नावावर असलेला मजकूर काढला आहे.

अजब गणित शिक्षनची गजब अंक ओळख लहान मुलांना करून देणारी पद्धती ... आता पाढे म्हणायचे कसे.. आणि वर्ष.. २०१९ दोन शून्य शून्य शून्य दहा नऊ म्हणायचे....... ... मराठी मधून गणित शिकताना. हा नवीन स्टंबलिंग ब्लाॅक... सिंबाची कमेंट हे टीपीकल बोकील स्टाईल सोल्युशन वाटते हे मात्र पटते नो बंदी झाली पण काळा पैसा अजून आहेच आणि पूर्वी स्टाईल मारणारे ... आता या विषयावर सोलुशनसहित . .. नॉट रीचेबल.... आऊट ऑफ रिच ... सोप्या मराठीत ... अ द्रू श्य..

>>>>२७ = ७ +२० = सत्तावीस >> स्वाती२, हो मध्ये + चिन्ह दिलं तर आणखी सुस्पष्ट होईल. तुम्ही आधी ७ आणि नंतर २० हे सत्ता- वीस अधोरेखित करायला लिहिलंय का? मला वाटतं पुढे करायला लागणार्‍या बेरजा वजाबाक्यात आधी २० आणि नंतर ७ लॉजिकल असेल.>>
हो अमितव. मी ते अधोरेखीत करणासाठीच लिहिले आहे. गणितासाठी चौकटीची वही वापरली तर योग्य स्थानाचा आकडा योग्य ठिकाणी असे करुन शिकणे सोपे होते. बेरीज करताना २० +७ = ७ +२० हे देखील मुलाला मग चटकन कळते. मी शिकले तेव्हा चौकटीची वही नव्हती. गणितं सोडवण्यासाठी वरती श(तक), द(शक), ए (कक) असे लिहून त्या खाली अंक लिहायला शिकवले होते. हातच्यासाठी एक वेगळी ओळ. २७ लिहिताना २ दशकाच्या रकान्यात, ७ एककाच्या रकान्यात.
मला ते चिन्ह वगळणे फार खटकले आहे. वीस सात ? Uhoh
सराव नसेल तर हे वीस सात ही मुलांना उद्या जड जाईल मग काय शॉर्ट कट शोधणार आहेत?

मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे म्हणून साहित्य संमेलनांमध्ये गळे काढायचे आणि असे भिकार नियम आणुन मराठीचा खुन पाडायचा. जोडाक्षरे येत नाहीत मराठी माध्यमाच्या मुलांना हे तर अतिशय हास्यास्पद आहे, एक वेळ इंग्रजी माध्यमाच्या मुलांकरता हा बदल आहे तर समजू शकते, जो चुकीचा आहे. आधीच शिक्षणाचे बारा वाजवले आहेत. ३०-४० वर्षांपूर्वीचा अभ्यासक्रम आणि आता असलेला म्हणजे पाणी कम आहे. दहावीच्या परीक्षेमध्ये पेपरच्या मागे पुढे सुट्टी असते तरी ही खूप अभ्यास आहे अशी रड गेले काही वर्षे चालू आहे. आता पर्यंतच्या सगळ्या शासन कर्त्यांची ही चूक आहे, केवळ आताचे सरकार जबाबदार नाही.

<<<पण पाठांतरात वावगं काय आहे?>>>
स्व॑तःला कष्ट घ्यावे लागतात, शिस्त असावी लागते.
जे यशस्वी होतात, ते अपार कष्ट करतात, कठीण परिस्थितीवर मात करतात. ते बहुधा अनेक गोष्टी करून पहातात. कुठल्यातरी बाबतीत शिस्त पाळतात. आधीच हे नको, ते नको म्हणत बसत नाहीत. मागून वाटल्यास नाद सोडतात एखाद्या गोष्टीचा.
पण हे सगळे कुणाला स्वतः काही करण्यात आनंद असेल, यश मिळवायची इच्छा असेल तर. काय शिकतो त्याचा उपयोग कसा करायचा, कुठे करायचा हे शिकण्याची इच्छा असते त्यांना.
जसे सचिन तेंडुलकर वगैरे थोडे.
बाकीचे सगळे, सारखे सारखे काय बॉल फेकायचा, बॅटने मारायचा. म्हणून काही करत नाहीत. कारण त्यातून ते काहीच शिकत नाहीत.
त्यांना व्यायाम करणे, तासन तास तेच तेच करणे हे वावगेच वाटते. मागून फक्त तेंडुलकरचे असेच चुकते, तसेच चुकते, तो काही एव्हढा चांगला नाही म्हणत बसतात.

भरत यांनी दिलेल्या पहिलीच्या नव्या पुस्तकातले पान ५८ पाहिले. त्यात ज्या रितीने tabular format मधे ‘वीस सात’ हे दाखवले आहे ते समजायला सोपे नक्कीच आहे. त्यात + चिन्हाची गरज मला तरी वाटली नाही. पान उघडुन पाहिले तर समजेल की का नाही. ज्या रितीने तो तक्ता मांडलाय त्याने दशकच्या बरोबर समोर वीस व एककच्या बरोबर समोर सात छापले आहेत त्यामुळे मांडणी कळू शकेल मुलांना. प्रचलीत शब्द पण तक्त्यात बरोबर दिलेत.
भरत, तुमचा प्रचलीत शब्द कधी वापरायचे हा मुद्दा बरोबर आहे. पुढील इयत्तांत प्रचलीत शब्दच वापरले जातील बहुधा त्यामुळे ते पाठांतर करावेच लागेल. पण वीस सात माहीत झाले की त्या तक्त्यात पुढेच सत्तावीस लिहिले आहे त्यामुळे ते सत्तावीस जास्त लवकर लक्षात राहील. अगदी समजा पहिली, दुसरीत हे पाठांतर झाले नाही तरी थोड्या मोठ्या इयत्तांत गेल्यावर मुलांनी पुन्हा हे पहिलीचे पुस्तक पण पाहिले तर लवकर पण कळेल.

जुने पुस्तक पान पण पहायचे होते पण काही केल्या उघडेना. Sad

>>मला आलेले अनुभव हेच माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत. ते मी पब्लिक फोरमवर लिहायचे की नाही, हा माझा प्रश्न आहे.
लंच टेबल गॉसिप वगैरे हे तुझ्या नेहमीच्या माहितीच्या अभावातून आलेले आहे. त्याला इलाज नाही. >>
कोणावर सिरियस डिस्कशनमध्ये/ माहिती देणार्‍या धाग्यात आरोप करताना त्या व्यक्तीला किमान एकदा विचारुन त्याची बाजू समजुन घेणे हे माझ्या एथिक्सच्या व्याख्येत सगळ्यात वर येते. तू पब्लिक फोरम वर काय लिहायचं का नाही हा सर्वस्वी तुझा प्रश्न. विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र (मग ते अन-एथिकल वागणुकीतुन जरी आलेलं असलं तरी) मी सगळ्यात पहिल्यांदा मानतो. त्यामुळे तू अवश्य लिही, त्यातील फ्लॉ मी फक्त पॉईंट आऊट करतोय.
बीबीसी मराठीने परवानगी नसताना माधुरी ताईंचा मजकुर छापला ह्यात जो स्लॉपी बेदरकारपणा आहे तोच... बहुदा त्यापेक्षा ही जास्तच काहीही रेफसंसेस न देता, दुसरी बाजू न समजता (अनुभवातुन मतं बनतात... अ‍ॅलिगेशन करताना समोरच्याला स्वच्छ शब्दात प्रश्न विचारणे अपेक्षित असते) बनवलेल्या इंटरप्रिटेशन पब्लिक फोरमवर चर्चेत लिहिण्यात आहे.
माधुरी ताईंशी बोललास आणि त्यांची परवानगी नसताना लिहिलेला मजकुर काढलास ते उत्तम केलेस.
असो. यात आता माझ्याकडून बोलण्यासारखं काही नाही. बघूया सरकार/ बालभारती आक्षेप नक्की काय आहेत ते समजुन त्यात काही बदल करते आहे का?/ आपली भूमिका क्लिअर करते आहे का ते. का अडेलतट्टूपणे हटून बसतंय.

Pages