मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिथे अशी झटापट होईल मोडतोड होईल असले गेम का प्लॅन करतात मुळात ?आणि मग खेळ स्थगित करायची वेळ येते.. >>>> बिग बौस चा आवडता टास्क आहे तो ! Proud

विणाने आधीच कपडे लपवले होते ते बहुतेक बिबि ठेवायला लावतील, गेम सुरु व्ह्यायचा आहे म्हणून.

शिव आता फॉर्म मधे येतोय आणि फ्रेममधे सुद्धा, काल त्याच्याबद्दल बरेच जण बोलत होते म्हणजे तो महत्वाचा वाटतोय आता, त्याने अ के दादाच्या पण बोलण्यात येऊ नये, स्वतःचं डोकं चालवावं.

पराग रुपाली सीन्स बोअर होतात मात्र.

पराग डोक्याने खेळतोय पण काल उगाच बसून होता.. कोणी गेलं कसं नाही त्याला सांगायला कि बाबा एक भिडू कमी होतोय अश्याने टीम चा .. >> संगितल असेल.आपल्याला दाखवलं नसेल...

नंतर शिवानी म्हणाली कि त्याला बसवलं कि नाही !?एक पोलीस मेंबर कमी झाला त्यामुळे .. >>ते तर उगीच बळच होत..अचानक सुचल होत शिवानी ला... आणि ती भोळी मैथिली होका.असा plan होता का अस लहान मुलांसारख विचारत होती..
तेव्हा मग त्याची ट्यूब पेटली बहुतेक .. मग आला खेळायला ..>>नाही..त्याच्या आधीच तो कपडे घालून तयार झाला होता.. जेव्हा बिग बॉस ने गेम स्थगित केला होता..तेव्हा काहितरी झाल असणार मग पराग ने टीम चे कपडे घातले होते..

मला खरच कळत नाही ती मैथिली इथवर कशी राहिली इंडस्ट्री मध्ये..!! तिला अजिबात दुनियादारी येत नाही.. खेळ चालू असताना सगळ्याना चहा प्या काय सांगत होती.. (unseen मध्ये एक clip आहे..त्यात पण केळकर म्हणतो की वीणा आणि त्याची दोरिसोबत झटापट होताना मैथिली म्हणते ब्रेक घ्या..चहा घ्या.. Lol )
कोणाला किती पैसे मिळाले याची कुठे नोंद नाही किंवा लक्षात पण नाही.. असलेले पैसे हरवते काय.. कधीच कोणासोबत गप्पा मारताना..ग्रुप मध्ये सामिल होताना दिसत नाही..

मैथिलीला काढतील यावेळी. जास्त चान्सेस तिचेच आहेत जाण्याचे, काही परफॉर्मन्स नाही.

विणाने आधीच कपडे लपवले होते ते बहुतेक बिबि ठेवायला लावतील, गेम सुरु व्ह्यायचा आहे म्हणून.>>होप सो .. असं करायला हवं
नाही..त्याच्या आधीच तो कपडे घालून तयार झाला होता.. जेव्हा बिग बॉस ने गेम स्थगित केला होता..तेव्हा काहितरी झाल असणार मग पराग ने टीम चे कपडे घातले होते..>> हां ss बरोबर बरोबर ..
आणि ती भोळी मैथिली होका.असा plan होता का अस लहान मुलांसारख विचारत होती..>> ती ते सार्कस्टिकली विचारात होती ना .. ?.. असं मला वाटलं
खेळ चालू असताना सगळ्याना चहा प्या काय सांगत होती>> हो .. सुपु आणि किशोरीं ना पण मधेच ती चहा द्यायला आलेली

सोमी वर एक जोक वाचला.. रोज सकाळी मैथीली अशी काय जोशात नाचते की बस आजचा दिवस तिच गाजवणार असं वाटतं..पण मग दिवसभर भांडी,जेवण हेच करते बिचारी...
एक unseen मधल्या clip मध्ये बाप्पा आणि शिवानी मैथिली बद्दल बोलत असतात ..शिवानी म्हणते की तिला सांगितल एकदा दोनदा की कपडे टाईट नको घालूस एवढे पण ती एइकत नाहि.. housemate नाच एवढं uncomfirtable वाटतं तर ते कैमरा वर कसं दिसत असेल..#nobodyshaming पण खरचं तिच्या शरीरयष्टी ला नाही शोभत काय घालते ती ते..

Bdw काल केळकर ने जरा मनोरंजन केल वीणा सोबत नाचून..
नंतर पराग आल्यावर तो पण चोर बाजार मधला दुकान दाराच्या भूमिकेत मस्त गेला.. ते बघुन किशोरी पण भुमिकेत शिरली.. नेहा ने टास्क मस्त केला.. आणि बारगेन पण.. बिचुकले उगीच इथे तिथे फिरत..मध्येच किशोरीच्या stall वर जाऊन हे पैसे चोरायचा विचार आहे म्हणे..केळकर.म्हणतो जे काय करायचं ते अस सांगून.मोठ्याने ओरडून करु नका... Lol काल शिवने पण मस्त तशन दिली शिवानी ला..ती मंद शिवानी coller काय धरत होती शिवची..तिला खरच warning का देत नाहित...शनिवार ची का वाट बघायची..जेव्हा moment आहे तेव्हाच चुक का दाखवून देत नाहित काय माहीत

हो केळ्या प्यार मे कभी कभी वर नाचला ते एंटरटेनिंग होतं. काल बरा वाटला तो.
जे काय करायचं ते अस सांगून.मोठ्याने ओरडून करु नका.. >>> Lol हो बिचुकले कॉमेडीच आहेत. किशोरी रडत होती तिथेही हे आपलंच घोडं दामटतायत. तुमची एक लाखाची वस्तू गेली माझी एक रुपयाची गेली तरी भावना सेमच म्हणे Rofl

आजच्या भागाच्या प्रिकँपवरून एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झाल की वीणा आणि शिवानी शेवटपर्यंत राहाणार.
आता यापैकी कुणी वैयक्तिक कारणाने एक्झिट केल तर माहित नाही.
वीणा जरी कलर्सचा चेहरा असला तरी शेवटपर्यंत ठेवतील अस वाटल नव्हत.
पण आता बिगबॉस सांगत आहेत की या दोघी अपात्र आहेत म्हणजेच या दोघी राहणार.

शिवानी आणि वीणामध्ये.वीणाला पोलिसांनी पकडल होत ,तिचे हात बांधलेले होते,शिवानी आली आणि तिला दोरी खेचत घेऊन जायला लागली म्हणून वीणाने तिला पायावर मारले .नंतर शिवानीने वीणाला लाथ मारली.
आज तरी एवढी मिरामारी झाली.प्रिकँपमध्ये जे बिगबॉसने सांगितल ते या मारामारी बद्दल होत की परत काही झाल माहित नाही.

वीणाला शिवानीने लाथ घातली असेल तर आपुनका फुल्ल सपोर्ट फॉर शिवानी Biggrin
वीणा काही केल्या नाही आवडत मला.

म्हणजे कॅप्टन व्हायला अपात्र असे जाहिर केले का?
शिवानी ची स्ट्रॅटेजीच अशी दिसते आहे. फुल्ल निगेटिव , नो लिमिट्स. स्वतःची इमेज आणि तिला नायिकेच्या भूमिकेत पाहिलेले फॅन्स हे ती कसे काय रिस्क करतेय माहित नाही! किंवा मग तिला आता हिना खान टाइप ग्लॅमरस (आणि मोस्टली बावळट नायिकेपेक्षा जास्त इंपॉर्टन्स असलेले ) निगेटिव रोल्स करायची इच्छा आणि ते मिळवायची ही स्ट्रॅटेजी असेल तर तर मेक्स सेन्स.
वीणा त्या मानाने तेवढी निगेटिव नाही वाटत अजून.

नाही.कँप्टनसाठी नाही.घरात राहण्यास.
पण आज मात्र शिवानी खरच विचित्र वागत होती.तिचे स्वत:चेच टीममेट्स हतबल झाले होते.बिचारी नेहा सांगत होती कि तिचःयाजवळ कुणीतरी बसा नाहीतर ही परत काहीतरी करेल.
रेड टीम जिंकली.आणि कँप्टन बहुतेक नेहा होईल.दुकानदार म्हणून तिचे पॉईंन्ट्सजास्त होते.

शिवानी ची स्ट्रॅटेजीच अशी दिसते आहे.......तीच चुकते ना.ती सगळ स्ट्ँटेजी च्या नावाखाली सांगते.
पण मुळात आज तिच्याच टीममेट्सनी तिचा पच्का केला,ती सांगत होती गेम क्विट करा,तर नेहा आणि माधवने नकार दिला.माधवने सांगितल हरलो तरी चालेल पण टास्क नाही सोडणार ,त्यामुळे ती आधीच वैतागली ,मग किशोरी बरोबरच ते भांडण झाल,तेव्हाही तिला सगळ्यांनी सांगितल की पोलिस असताना तू चोरांच्या बँग्जमधल सामान.नाही काढू शकत.पण ती ऐकतच नव्हती.
आता म्हणते की घरातले सगळे पपलू आहेत.मग रडत काय होती.
फारच विचित्र वागली आज.

शिवानी अति डोक्यात जातेय, स्वतःला शहाणी समजते. वीणा तिच्यासारखीच होत चाललीय पण दोघींना काढतील असं वाटत नाही, त्या राजेशसारखं सिक्रेट रूममध्ये ठेऊन एक चान्स देतील. कलर्ससाठी दोघी महत्वाच्या आहेत.

नेहाने छान वस्तू जमवल्या. शिवानी एवढी काही खेळत नाही पण मीपणा करायला पुढे, नेहा चागली खेळते. बी टीम जिंकली. कालच्यापेक्षा आज मजा आली बघायला. त्यांनी ऑलरेडी आधी वस्तू चोरल्या ते कालच्या टीमला समजलंच नाही, bb नी पण objection घेतलं नाही. शिवानी सगळ्यांना पपलू म्हणते पण पपलू त्यांचीच टीम ठरली actually.

वीणा शिवानी दोघी फिजिकल होतात पण शिवानी पहिल्यापासून होतेय, परागने तक्रार केली, शिवने केली पण समहाऊ bb तिला बरीच सूट देतायेत. वीणा आज पहिल्यांदा झाली फिजिकल.

शिवानी म्हणजे गिरे तो भी टांग उपर category तली आहे. चुका करते, बाकीचे समजवायला आले की ही माझी strategy, मी अशी आणि मी तशी हा मोठेपणा लगेच.

पराग एरवी मस्त पण रुपालीच्या मागे मागे ते बोअर होतं मला तरी.

शिवानीसाठी कालकोठरी फिक्स आहे, अजुन फुटेज, अजुन चर्चा !
नाही हो ,दीपांजली,नाही करणार तस चँनेल. मग कंटेंट कोण देईल?
काल सुध्दा शिवानीने धुडगुस घालेपर्यंत गेम हसतखेळत चालला होता.शिव,पराग मजा आणत होते.पण असा गेम बिगबॉसलाच आवडत नसावा,आणि मग शिवानी नावाच वादळ बिबॉ ने आणल ,मग एकदम सगळे आरामात बसलेले जागे झाले.
प्रॉब्लेम असा आहे की,शिवानी,वीणा यांसारख कंटेंट देणारा तिथे कुणी दिसत नाही.
पराग आणि रुपालीच्या प्रेमकथेत प्रेक्षकांना रस नाही.खर साऔगायच तर आता कधीकधी बिचुकलेंंचाही कंटाळा येतो.
जर यां दोघींना बाहेर काढायच असेल किंवा जर कालकोठरीत टाकायच असेल तर बिबॉसला लवकर असे दोन नमुने वाईल्ड कार्डने पाठवायला लागतील.जस लास्ट टाईम नंदकिशोर होता.
पण यामध्ये एक आहे,वीणा निदान टास्क तरी करते,शिवानी ते ही नीट करत नाही.
तिला काहीतरी ब्रिदिंग प्रॉब्लेम आहे वाटत.

गेम कसा खेळावा हे नेहा, पराग आणि शिव ने काल दाखवुन दिले.
मस्त खेळत होते काल आणि मजा पण येत होती बघायला.शिव चं "ये चोर मचाये शोर" भारी होतं. पराग ने सुरु केलेला लिलाव भारी. चोर चं बाजार मांडुन बसले होते आणि दुकानदार स्वतःहुन येत होते त्यांच्याकडे वस्तु घ्यायला ....ही ही ही...
मला फिनाले मधे नेहा, पराग आणि शिव ला बघायला नक्की आवडेल. Happy

पण पण पण....शिवानी..ही मुलगी नक्की काय विचार करुन आली आहे. तिला नक्की काय गेम प्लॅन करायचा आहे ते तिचं तिलाच कळत नाहिये..किशोरी म्हणाल्या तसं ती खरच सायको वाटते आहे..मधेच व्हायोलंट होते..मधेच रडते.वीणा ला दोरी ने जोरात हिसका दिला होता तिने त्याची रीअ‍ॅक्शन म्हणुन वीणाने तिला पायावर मारले जे अगदीच सहाजिक होते त्यावर शिवानी ताईंनी लाथ मारली आणि मी नाही सुरुवात केली म्हणुन कांगावा सुरु केला.

बिबॉ मधे असे लोक हवे असतील टीआर्पी साठी पण असे लोक बिबॉ जिंकु शकत नाहीत. मेघा असं कधीच वागली नव्हती. गेम मधे एखाद्याला त्रास दिला तरी नंतर जाउन गोड बोलुन सॉरी पण म्हणायची त्या लोकांना. आणि मुद्देसुत बोलायची. आपण असे का वागलो याचं ठोस कारण तिच्याकडे नेहेमिच असायचं.

मला फिनाले मधे नेहा, पराग आणि शिव ला बघायला नक्की आवडेल. >>>>मलापणsssss!!!
वैशालीने disappoint केले...चांगला कंटेंट देईल असे वाटलेले.. काहीच नाही करत..
नुसती टिंगल कुचाळक्या करत, मोठ्याने कोकीळ हास्य खिदळत इथे तिथे बसलेली असते..
... वीणा रुपाली; किशोरीला मैत्रीच्या नावाखाली चुकीचे करायला लावताहेत...
... बिचुकले तर पहिल्या पासूनच दबून, under प्रेशर खेळताहेत....
. .. किशोरी, बिचुकले (बाहेर कितीही महान असले तरी) एकाच कॅटेगरीतील वाटताहेत.. सतत सगळ्यांच्या (घरातल्यांच्या आणि बाहेरच्यांच्या) गुड बुक्स मध्ये राहण्याची त्यांची धडपड या स्पर्धेत त्यांना उपयोगी पडेल असे वाटत नाही...
केळकर सुध्दा पुढे जाईल असे वाटते आहे
.. शिवानी वीणा यांच्या सारख्या भांडकुदळ मांजऱ्या पण टिकतील बरेच दिवस..
.. मैथिली, दिगंबर, बाप्पा, सुरेखा ताई आहेत की नाहीत कळतही नाही.. सो ते लवकर जातील असे वाटते..
.. देवचक्केचा अजून अंदाज नाही येत आहे..

स्मिता श्रीपाद च्या पूर्ण पोस्ट शी 100 टक्के सहमत. काल पराग ,नेहा आणि शिव मस्त खेळले.. बाप्पा आणि पुणेकर बाई तर बसूनच होते... पुणेकर बाई.चोर टीम मध्ये होत्या तरी पण आरामात बसल्या होत्या... शिवानीचा भारी पोपट झाला जेव्हा तीच कोणीच एकल नाही की गेम सोडुयात . Lol तिने मारलेली लाथ खरच खूप राग आणणारी होती.. एवढं सगळ झाल्यावर मग रडायचं नाटक करते.. आणि ते बिचुकले का सारखं तिच्या मागे मागे करतात.. नुसता लाळ घोटेपणा..

Pages