Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिपांजली... मस्तच विश्लेषण
दिपांजली... मस्तच विश्लेषण
दीपांजली.......एकदम कडक
दीपांजली.......एकदम कडक
पण मला नेहा उजवी वाटते.शिवानीचा परागवर रिग असल्यासारखी ती सरळसरळ फिजिकल अँब्युज करत आहे,पाणी उडवण,पायात पाय घालण,थुंकण,त्यावेळी टास्क पण नव्हता.आणि आता आधी मारल मग सरळ हातच उचलायला गेली,हे तर बिगबॉसच्या घरातच राहायच्या नियमात नाही.असा गेम जर पराग खेळला तिच्याबरोबर तर,परागला घरात आणि घराबाहेर किती रोषाला समोर जाव लागेल,त्यात कायदेशीर तक्रारही असू शकते.
खरतर बिगबॉसकडूनच तिला तंबी मिळायला.हवी होती.
केळकर तर मला बावळटच वाटतो.
https://www.google.com/amp/s
https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/manoranjan-news/bigg-boss-...
लोकसत्तेच्या पत्रकारितेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चाललाय.
आपल्याच कोशात राहिलं की असं होतं.
काहीही ठोकून दिलंय!!!
@अज्ञा>>>> फ्रिज्ड/थंडगार
@अज्ञा>>>> फ्रिज्ड/थंडगार/थिजलेली/गोठलेली...
असं काहीतरी म्हणायचं असावं, शब्द कुलेस्ट सुचला (शब्द भांडार कमतरता म्हणा हवेतर)
असे कोशात राहून विचार पण गोठून जातात ना!!!
आपणही वाचल्यावर चिल्ल व्हायचे आणि सोडून द्यायचे
शिवानी कोण समजते स्वतः ला ?..
शिवानी कोण समजते स्वतः ला ?...तिला इतके का महत्व देतात बिबॉ वाले?
पाणी मारणे, थुंकणे, पाय घालुन पाडणे, हात उगारणे हे सगळं दुसर्या कोणी केलं असतं तर लगेच राडा झाला असता.
शिवानी भंगार मुलगी आहे. तिला अज्जिबात राग आवरता येत नाही आणी मग कोणीतरी नियमांची आठवण केली की , मी हे मुद्दाम केलं, त्यामागे माझा प्लॅन होता ई ई सारवासारव करत बसते जे लगेच कळुन येतं.
पराग डोकं थंड ठेवुन लोकांना उचकवतोय आणि म्हणून त्याला फुटेज पण मिळतय. बिबॉ साठी बरोबर माणुस आहे हा.
रुपाली च्या सोबत चं फ्लर्टींग पण सेफ राहुन करतोय. अटेंशन मिळवण्यापुरतं. राजेश शृंगरपुरे सारखे चाळे नाही करत आहे अजुन तरी
मला तो हुशार वाटतोय.
नेहा पण हुशार आहे. काल तिने सुरेखाला मस्त गंडवुन पैसे मिळवले किशोरी नसताना . पण चुकीच्या टीम मधे गेली आहे. शिवानी ला घरुन राहिली तर तिचं नुकसान होउ शकतं असं वाटतय.
आज चोर झालेल्या लोकांनी दुसर्या टीम ला खुप सार्या आय्डीया दिल्यात, बेड्या तोडुन पळणे, वस्तु ची पळवापळवी आणि फेकाफेकी करणे ई ई. उद्या त्यांना हे खुप महाग पडु शकते. पराग आज नुसतं सगळं निरीक्षण करतोय पण उद्या तो चोर बनुन सगळा वचपा काढेल नक्कीच. शिव आणि पराग दोघं भारी पडु शकतात उद्या चोर झाले की.
पराग प्लेयर आहे हे खरे पण काल
पराग प्लेयर आहे हे खरे पण काल न खेळण्याची काय स्ट्रॅटेजी आहे ते कळले नाही. अशाने कॅप्टन व्हायचे चान्सेस नाहीत. आज खेळला तर मिळतीलही अर्थात. शिवानी, नेहा आवडत नसल्या तरी त्याच हुषारीने खेळल्या हे खरे. बिचुकले ला काही म्हणजे काहीही झेपले नसावे! काही अॅग्रेसिवली टास्क केले नाही. नुस्ता इकडे तिकडे फिरत होता. धुतलेली चड्डी नाचवत बोलणे हे कहर होते!! टास्क अजिबात जमली नाहीत तर अवघड होईल पण त्याचे. मैथिली पण बिचारी सरळ आहे अगदी. ती शिवानीने पराग ला मारायचे नाटक केले तेव्हा तिला म्हणत होती, अग आपल्या काँट्रॅक्ट मधे आहे हात उचलता येत नाही, तू असे कसे करतीयेस वगैरे. शिवानीचा एकूण पॅटर्न लक्षात आला आहे आता. एकदम खूप जास्त ऑफेन्सिव अन ड्रामॅटिक होऊन अटेन्शन घ्यायचे. हात उगारणे वगैरे नाटकं होती सगळी. तशी धाडसी स्ट्रॅटेजी आहे एकूण, हे मान्य करावं लागेल. अर्थात डीजे म्हणते तसे चॅनल चे प्रोटेक्शन असेलसुद्धा तिला.
सुरेखाताईंनी बर्यापैकी पचका केला होता पण चोरांचा, कुठल्या वस्तूंना पॉइन्ट ऑफरच करत नव्हत्या बराच वेळ. घुंगरू साठी सुद्धा! किशोरी आणि त्यांनी चोरीचे सामान चोरले देखिल. आता आज त्यासाठी झटापट ढकलाढकल वगैरे होते का बघू .
वीणा- वैशालीचे भांडण उगीच वाटले. रुपालीला तिचे वाक्य नव्हते आवडले तर तिथेच बोलायचं ना. रडण्याइतके मोठे काहीच नव्हते तसेही. असली फुटकळ फेक भांडणं फार दिवस कामी येणार नाहीत तिथे पराग, शिवानीसारखे प्लेयर असताना.
पक्ष्याच्या टास्क मधे लोक उगीच खूप खल करत बसले. मला वाटलं होतं सहाव्या टाइम ला तरी मजा येईल आणि "तू मला केलेस तर मी तुला" असले ऑल डीलस ऑफ, त्यामुळे सगळेच धावतील पण लोक चर्चा करत बसले फक्त.
चोर बाजार मधे डीजे म्हणते तसे सगळे कफ्युजन चालले होते. शिव एंटरटेनिंग वाटला. किशोरीताई तर बिचुकले ला म्हणाजे चोरालाच सांगत होत्या त्या याला पकडा वगैरे
एकूण आवडते नावडते आणि नावडते आवडते होऊ शकतात पुढच्या ३एक आठवड्यात
शिवानी भंगार मुलगी आहे.
शिवानी भंगार मुलगी आहे.
>> अहो काय लिहिताय? जपून जरा.
बादवे, मामी बघत नाहीयत का?
बादवे, मामी बघत नाहीयत का? त्यांचे एपिसोड समरी येत नाहीत आजकाल.
च्रप्स आठवण काढल्याबददल
च्रप्स आठवण काढल्याबददल धन्यवाद. मी वूटवर बघतेय पण मागे आहे बरीच.
किशोरीताई तर बिचुकले ला
किशोरीताई तर बिचुकले ला म्हणाजे चोरालाच सांगत होत्या त्या याला पकडा वगैरे>> मुद्दाम सांगत असाव्यात असं मला वाटलं .. कारण मग चोरांपैकी सगळे आतमध्ये आणि मग त्यांचे चोरलेले सामान जे बाहेर ठेवले होते .. ते किशोरीताई ना लपवायचे होते.

पहिल्या वीक मध्ये वीणा ला चांगली खेळलीस म्हणाले मांजरेकर म्हणून तिच्या डोक्यात हवा गेलीये असं वाटतंय मला तरी .. उगाच वादावादी आणि तर स्वरात बोलत असते ..
आणि शिवानी ला कळलंय कि बिचुकले ना फेम मिळत आहे सो त्यांच्या विरोधात जायला नको.. म्हणून गोड गोड वागतेय त्यांच्याशी ..
पराग डोकं थंड ठेवुन लोकांना उचकवतोय>> अगदी अगदी
सध्या तरी माझ्या लिस्ट वर बिचुकले नेहा वीणा आणि रुपाली आहेत .. बिचुकले ना पटापट कळत नाही बहुतेक नियम वगैरे वाचतात तेव्हा .. कि मुद्दाम करतात काय माहित .. सुरेखा ताई ना पण गुंडाळणं सोप्प आहे .. त्या फक्त हो ला हो नाही ला नाही करतात असं वाटत
अरे त्या बिचुकले ना सगळे बिचकुले का म्हणतात!!
किशोरी मेक अप चे सामान पळवले
किशोरी मेक अप चे सामान पळवले म्हणुन रडत होती. येतात कशाला बिग बोस मध्ये समजत नाहि. शिवानी जरा अती करत असली तर चांगली स्ट्रौंग तरी आहे. वैशाली देखील. वीणा, रुपाली, किशोरी नुसत्याच दाखवायचा प्रयत्न करतात स्ट्रौंग आहे म्हणुन आणी रडत बसतात.
पराग तर उगाच भांडण काढतो आहे. आणी टास्क आल्यावर घाबरुन बाजुला जाउन बसला. डबल ढोलकि ला पात्र आहे एकदम पराग !
परागने आज शिवानीचा निषेध
परागने आज शिवानीचा निषेध म्हणून खेळलाच नाही , त्याला खेळताना बघायला आवडलं असतं पण त्याचा स्टँड त्याच्या जागी एकदम योग्य होता , अजुनही मला परागच सर्वात खतरनाक प्लेयर वाटतो ! >>> मम.
https://voot.app.link
https://voot.app.link/Bzg4bxZ0gX >>>नक्की बघा... धम्माल आहे..
परागने आज शिवानीचा निषेध
परागने आज शिवानीचा निषेध म्हणून खेळलाच नाही >>> तो स्वतःहा मध्ये जाउन उभा राहिला आणी शिवानी चिडली त्याच्यावर. तीने हात उगारला पण त्याला टचहि केला नव्हता तरी तो सर्वांसमोर खोटे बोलत होता की तीने मला ऐब्युज केले म्हणुन. पण टास्क चा काय संबध होता त्यात ? तो घाब रला की त्याला टारगेट केले जाइल म्हणुन. असला रडिचा डाव खेळुन त्याला कोणी मते देणार नाहि.
पराग मागच्या आठवड्यात cool
पराग मागच्या आठवड्यात cool dude वाटलं होता.
आता अतिच करतोय. बिचुकलेला उगाच बोलला
चोर पुलिस टास्क आहे आणि
चोर पुलिस टास्क आहे आणि त्यामध्ये लॉकअपच नाही.गार्डन मधल्या चेअर्सना हाथकड्या बांधल्या होत्या शो चा थोडा तरी स्टॅण्डर्ड राखावा राव यांनी.
परागने अब्युज झाला त्याचा
परागने अब्युज झाला त्याचा गवगवा केला ते एकदम आवडलं, पण ते किती वेळ धरुन बसायचं? त्याने गेम खेळायला हवा होता. अब्युजचं भांडवल पुढे करता येईल की! वीकेंडला करता येईल, येता जाता घा.पा. बोलता येईल, तिचं डोकं उठवायला करता येईल. इतकं डोकं उठलं की ती कानाखालीही मारेल. मग एकदम पारडं फिरेल. टास्कच खेळायचा नाही मध्ये त्याने त्याचंच नुकसान करुन घेतलं.
नेहा आवडली. आणि अशीच खेळली तर आवडू लागेल की काय वाटलं.
बिचुकल्यांना खेळात स्मार्टनेस न दाखवता तोंडाच्या पट्ट्याने गेम ओढून न्यायचा असेल तर हरकत नाही, पण मग रोजच्या रोज नाविन्यपूर्ण रतीब आला पाहिजे. काल काहीच केलं नाही. ते शिवानीच्या छायेत येताहेत की काय वाटलं. तसं झालं तर झाकोळून टाकेल शिवानी त्याना.
किशोरी चोरांनी चोरलेलं पळवते, माधव बेडी तोडून पळतो, किशोरी बिचुकल्यांना (चोराला) दुसरं कोणीतरी चोरी करतंय सांगते.. सगळं जाम फनी.
केळकर ही आवडला काल. पुरुन उरला. आर्ग्युमेंट्स मध्ये शिव आणि टीमला जेरीस आणलं. अर्थात चोर हे कायम वरचढच ठरतात, सो आज बघू.
मैथिली एकदम सेन गुड गर्ल आहे. हर्मायनी सारखी. ती गेली तर वाईट वाटेल. पण ती आउट ऑफ प्लेसही वाटत्येय. हर्मायनी मित्रांना वाचवताना नियम तोडू/ वाकवू लागते. ते लवकर करावं हिने.
पागल मुलगी आणि शिवच्या अॅक्सेंटला डीजेला +१. शिव डोक्याने कूल आहे. राग आला तरी जे बोलतो त्याने हसायला येतं.
वैशाली अजिबात आवडत नाही. काय भांडली! अगदीच स्क्रिप्टेड उगाचच्या उगाच होतं ते. मुद्दा काय?
विणा आणि परागने कूल राहून दुसर्या टीमच्या लोकांची डोकी उठवावी. नेहा शिवानी केळकर आमच्या कॅलिफोर्निआच्या जंगलांसारखे आहेत. कधी एकदा टेंपरेचर वाढतंय की आम्ही पेटतो.
पोपटाचा पिंजरा हा टास्क किती
पोपटाचा पिंजरा हा टास्क किती छान करता आला असता.
प्रत्येकाच्या हातात एक पक्षी द्यायचा.नाव सांंगायची नाहीत.बझर वाजला की जो पहिला कुठल्याही पिंजर्यासमोर आधी जाईल,त्याने तो पिंजरा उघडायचा,त्यातल्या चिठ्ठीत ज्याच नाव ,तो झाला नॉमिनेट.
पण बिगबॉसने वाट लावली टास्कची.>>>>> पण मग त्यामुळे आपला पोपट पिंजर्यात जायला नको म्हणून मनवा-मनवी, डिल करणे, ज्याने आपला पोपट आत टाकाला त्याबद्दल राग-भांडण या गोष्टींना वाव मिळाला नसता.
ते शिवानीच्या छायेत येताहेत
ते शिवानीच्या छायेत येताहेत की काय वाटलं. >>>+११ बिचुकलेंना आता कंबर कसावी लागेल टिकून रहायचे असेल तर. शिवाने तर करतेच पण आता सगळेच त्यांना मॅनिप्युलेट करायला बघणार. म्हणूनच तो माधव म्हणत होता "तुम्ही खेळणं आहात का?" तर त्यांना बहुतेक ऐकू आलं तुम्ही खेळणार आहात का? त्यामुळे ते म्हणाले हो हो खेळणार ना
केळकर , शिव या सुरुवातीला मागे पडलेल्या प्लेयर्स नीही गेम सुरु केला आहे आता.
शिव माझा आवडता बनायला लागलाय,
शिव माझा आवडता बनायला लागलाय, आजच्या टिजर मधे शिवानीला पुरून उरलाय, आवाज चढवलाय तिच्यावर, “माझ्यासोमोर किंचाळु नकोस आणि फिजिकल तर अजिबात होऊ नकोस , मी जर फिजिकल झालो तर सगळ्यांना पुरून उरेन “ ! वावा शिव :टाळ्या: , वे टु गो , किप धिस अॅटीट्युड !
मला शिव आवडतोय अजुनही आणि
मला शिव आवडतोय अजुनही आणि पराग पण. शिवला बिल्डर नांव ठेवलंय आणि परागला शाकाल.
अ बि जरा अतिशयोक्ती अलंकार जास्तच वापरतात असं वाटतं मला.
बिग बॉस कायम नीट खेळत नसतील तर बराच गेम पुढे गेल्यावर नियम का सांगतात. एका टीमचा फायदा होतो ना नेहेमी, नियम न पाळून.
किशोरीताई वीणाचं ऐकून ती बॅग मिळाल्यावर नाटक का करत होत्या. असं नाही करायचं. हा वस्तुंचं नुकसान झालं त्याबद्दल बोलणं ठीक होतं.
मैथिलीला बिग बॉसनी तिच्या चुकांबद्दल सांगितलं तेव्हा नेहा आणि शिवानीला आसुरी आनंद झाला, त्या खुसुखुसु हसत होत्या.
बिग बॉस कायम नीट खेळत नसतील
बिग बॉस कायम नीट खेळत नसतील तर बराच गेम पुढे गेल्यावर नियम का सांगतात. एका टीमचा फायदा होतो ना नेहेमी, नियम न पाळून.>> ते नेहमिचच आहे , काहितरी घुळुमुळु सान्गायच मग सगळ पेटल की शान्त करुन परत सुरु, ते आखाड्यात नाही का पैलवान भिडतात मग अगदीच उरावर बसायला लागले की रेफरी येवुन शिट्ट्या फुन्कतो तसच
बिचुकले जाम फनी आहेत पण त्याना, मैथिलिला आणि सुरेखाताइना टास्क अजिबात कळत नाही...तिघही खुप कन्फ्युज असतात.
शिवानी-नेहा याना चोरिचा टास्क बरोबर कळलाय बा़किचे मात्र घोळ घालतात... त्यानी तो तसा घालावा असाच बीबॉचा उद्देश पण असतो.जितका घोळ, तितकी भाण्डण आणि तितका टीआर्पी!
घरच्यानी जे स्वतः ग्रुप तयार केले ते बीबॉ पण फॉलो करतात म्हणजे पेटर राह्त.
नेहा शिवानी केळकर आमच्या कॅलिफोर्निआच्या जंगलांसारखे आहेत. कधी एकदा टेंपरेचर वाढतंय की आम्ही पेटतो.>>>> अगदी अगदी!
बिचुकलेना इमोशनल ब्लॅक मेल
बिचुकलेना इमोशनल ब्लॅक मेल करून आज रुपालीने बाजीच मारली . तिने दाखवून दिल खेळात तुम्ही तुमची कशीही स्ट्रॅटेजी आखू शकता . शिवानीने नाही का पराग वर हात उगारून त्यांचा इंसल्ट केला आणि चोर पोलीस खेळाचा अर्धा भाग ते खेळच खेळले नाहीत . परागना खेळातून थोडा काळ का होईना बाद करण्यात ती यशस्वी झाली कि नाही ? तिच्या दृष्टीने पराग स्ट्रॉंग कन्टेस्टंट असतील . हि प्रत्येकाची स्ट्रॅटेजी झाली . रुपालीला समजून चुकल बिचुकलेच्या अंगावर धावून जाण्यात आणि त्यांना जोरजोराने बोलण्यात आपण व्हिलन ठरतो . मग गोड बोलून आपलं इप्सित साध्य करा ना . रुपाली परफेकट खेळली आहे
बिचुकलेना इमोशनल ब्लॅक मेल
बिचुकलेना इमोशनल ब्लॅक मेल करून आज रुपालीने बाजीच मारली >>> बिचुकलेंना नंतर समजले की रुपाली का आली आहे . ते सरळ तीला तु जा इथुन म्हणाले. मला नाहि वाटत ते फसले वगैरे. रुपाली फार कच्ची वाटते आणी इमोशनल ही. मागच्या वेळेस हि ती बिचुकलेंवर भडकली त्यानंतर राग शांत झाल्यावर उगाचच काहिहि बोलत होती वीणा बद्दल की मी बाकि तीघांना टारगेट करत होते म्हणुन.
किशोरी आणी सुरेखा बुचुकले टिम मध्ये होत्या ना . अशी अचानक कशी टिम बदलली. आणी किशोरी शिवानीला सायको म्हणते असे प्रोमो मध्ये दाखवले होते. ते कोठे नाहिसे झाले ? काहितरी घोळ चालु आहे असे वाटते.
मला कालचा वीणाला किशोरीताईंना
मला कालचा वीणाला किशोरीताईंना बँग मिळाल्याच सांगू नका हा प्लँन आवडला.अगदी रुपालीचा इमोशनल होण्याचा प्लँनही आवडला.
शिवानीचा गेम मला तरी नाही आवडला.फिजिकल अँब्युज हा प्लँन असू शकत नाही,जरी तिने स्लँप केल नाही तरी त्या आधी तिने परागला मारल होत.बिगबॉस काय करत असतित अशा वेळी?
म्हणून मला चक्क कधीकधी शिवानीबद्दल वाईट वाटत की हिला स्वत:चा खेळ चँनेलच खेळू देत नाही का.
कारण ती सतत परागलाच का टार्गेट करत आहे हे कळत नाही
काल सुध्दा बराच वेळ ती बाहेर बसून होती आणि मला दम लागत आहे हे कारणही तिने दिल.अग, मग जोरजोरात ओरडताना नाही दम लागत.
किशोरींच्या बोलण्यात पॉईंंट होता की चोरी करा,वस्तू उवस्त करू नका कारण नंतर त्या खोलीत खूप कचरा दिसत होता.म्हणजे बर्याच गोष्टींची नासधूस झाली असावी.पण यासाठी किशोरींना रडारड करण्याची काहीच गरज नव्हती
पण एक लक्षात आल का,काल पोलिसांच्या टीम मध्ये खर्या अर्थाने तिघजणच खेळले,वीणा,रुपाली आणि शिव
पराग आधी नव्हता आणि वैशाली चोरांच्या टीमसोबत खेळत होती.हे बिगबॉसना चालत.
नेहा छान खेळत आहे,पण तिनेही खरा गेम सुरु होण्याआधीच गेम सुरू केला.
थोडक्यात एकानेही नियम पाळलेला नाही.
आणी किशोरी शिवानीला सायको म्हणते असे प्रोमो मध्ये दाखवले होते. ते कोठे नाहिसे झाले ? काहितरी घोळ चालु आहे असे वाटते........।मला वाटत ते आज दाखवतील.पण माझी इच्छा आहे की ते दाखवू नये कारण त्यात शिवानीने किशोरींचा ड्रॉवर उघडला आहे आणि ती पोलिस आहे.तिला चोरांना रंगेहात पकडायच आहे,हा गेमप्लँन होउ शकत नाही.
कारण परत शिवानी आणि त्यांचा वाद.
शिवानी हे जर चँनेलच्या गेमप्लँन म्हणून करत असेल तर मला वाईट वाटत पण स्वत:हूनच जर अँटेंशन साठी करत असेल तर मात्र ती बाहेर गेलेली बघायला आवडेल.
हो सगळीकडे चर्चा आहे कि
हो सगळीकडे चर्चा आहे कि चॅनलने शिवानी किंवा किशोरीची इमेज वाचवण्यासाठी तो सीन कट केला म्हणून, वुट वर असेल तर बघा.
मला अजिबात नाही आवडली ती खोटे अश्रु ढाळायची सो कॉल्ड स्ट्रॅटेजी, टि.व्ही. सिरीयलमधे काम करणार्या डंब बहु बेटीया टिप्पिकल त्याच मोडमधे गेल्या, चुकला फकिर मशिदीत ! याला डोकं वापरणे म्हणत नाहीत, याला बाई असण्याचा गैरवापर करणे म्हणतात !
टिम बी मधे डोकं पराग वापरत होता आणि टास्क शिव सर्वात अॅक्टिव्हली बेस्ट करत होता.
बाकीच्या बायका किशोरी- वीणा - रुपाली अत्यंत चिप !
दुसर्या टिमचे नेहा , शिवानी आणि केळ्या अॅक्टिव्ह होते.
सुरेखाताई आजही चांगल्या एन्टरटेन करत होत्या आणि सर्वांना ओरडून मस्तं गप्प केलं आज !
वैशालीने आज गद्दारी करून या सिझनचा आस्तादचा टॅग मिळवला, आय थिंक तिला मागच्या वीकेन्डला अटेन्शन मिळालं नाही म्हणून तिचा फक्तं एकच लक्श्य दिसतय ते म्हणजे मांजरेकरांचं अटेन्शन मिळवणे बाय हुक ऑर क्रुक !
मागच्या वर्षी या टास्कमधे काय राडा झाला होता, मेघा, स्मिता, आउ, ऋतुजा, रेशम राजेश मज्जाच मज्जा आली होती !
काल शिव सगळ्यात बेस्ट, शिवानी
काल शिव सगळ्यात बेस्ट, शिवानी च्या ओरडण्याला बरोबर उत्तर दिलं त्याने.
" तुझा आवाज तुझ्या घरी ठेव " असं म्हणाला....शिव इनोसंट आहे पण टास्क मधे बेस्ट आहे.
नेहा पण आवडली काल. मस्त डील करत होती वस्तुंचं ..पराग पण मस्त जाहिरात करत होता बुट विकत घेताना...नेहा न पराग एकत्र आले तर खुप स्ट्राँग बनतील. दोघं पण डोकेबाज आहेत.
रुपाली चं रडणं प्रकरण नक्की कोणत्या वस्तु साठी होतं ते कळलच नाही. पण उगीच हात उगारुन आरडाओरडा करण्यापेक्षा आवडलं मला.
वीणा दिसलीच नाही काल विशेष.
किशोरी सगळ्या सामानाची अवस्था बघुन सुरुवातीला एकदम रडकुंडीला आली होती. मुलांनी खेळताना घरभर पसारा केला की हतबल होउन रडकुंडीला आलेल्या आई सारखी दिसत होती काल ती
"पराग ने खेळु नये म्हणून मी त्याच्यावर हात उगारला" हे काहीही लॉजिक देत होती शिवानी काल. हात उगारला म्हणुन
तो खेळणार नाही कशावरुन ? उलट झालं असतं तर? तु हात उगारलास आता मी खेळात त्याचा बदला घेतो असं त्याने ठरवलं असतं तर ?
शिवानी नाहीच आवडत आहे मला कितीही प्रयत्न केला तरी. ती ज्या गोष्टी गेम प्लॅन म्हणुन खपवते त्या खर्या वाटत नाहीत.
यावेळेस सर्वच नाटकी वाटत
यावेळेस सर्वच नाटकी वाटत आहे. मागच्या वेळेस खरच लफडी करत आहेत किंवा खरच भांडत आहेत असे वाटत तरी होते. काल रात्री पराग रुपाली बोलत असताना एवढे कोरडे होते की फारच बोअरींग झाले.
काल शिव सगळ्यात बेस्ट! नेहा,
काल शिव सगळ्यात बेस्ट! नेहा, शिवानी सगळ्यांना एकट्याने मस्त हँडल करत होता. शिवानीच्या आवावावर आवाज चढवून तिला गप्प केले त्याने!
केळ्या पण बराच उपद्रवी होता. माधव अजूनही फुल्ली खेळात उतरल्यासारखा वाटत नाहीये.
वैशाली चे अधून मधूनच चोरांना मदत करणे हे लॉजिक कळले नाही. वीणाचे सामान वगैरे देत होती का मुद्दाम त्यांना?
मैथिलीने काल पण काहीतरी निरागस स्टेटमेन्ट केले. मांजरेकरांनीच मला मेकप टच अप करायला सांगितला असे काहीतरी.
पराग फायनली खेळायला आला ते बरे झाले. ते रात्री रुपालीबरोबरचा सीन बळंच वाटला पण.
मला काल पण नेहा आवडली मस्त
मला काल पण नेहा आवडली मस्त डील करत होती सु पु सोबत आणि पराग सोबत पण .. बुटांच्या जोडीला अमुक पैसे म्हंटल्यावर तिने २ वेगवेगळे चप्पल चे जोड विकायला काढले.
मैथिली फारच बिच्चारी वाटत होती काल जेवताना टेबल वर ठेवलेले पैसे तेवढ्यात कोणीतरी लंपास केले बहुतेक ..तीलाच आठवत नव्हतं कुठे ठेवले /कोणाला दिले वगैरे .. कोणी सपोर्ट हि नाही केला शोधायला.. पुढे काय झालं दाखवलं नाही ..
किशोरी सगळ्या सामानाची अवस्था बघुन सुरुवातीला एकदम रडकुंडीला आली होती. मुलांनी खेळताना घरभर पसारा केला की हतबल होउन रडकुंडीला आलेल्या आई सारखी दिसत होती काल ती>> +१ हो अगदीच .. पण नंतर मिळाल्यावर खोटं खोटं रडून गोंधळ घातला .. सगळेजणं बिचुकले ना आपल्या घोळात घ्यायला बघत आहेत ..
याला डोकं वापरणे म्हणत नाहीत, याला बाई असण्याचा गैरवापर करणे म्हणतात !>> हो मला पण नाही आवडलं ते ..
पराग डोक्याने खेळतोय पण काल उगाच बसून होता.. कोणी गेलं कसं नाही त्याला सांगायला कि बाबा एक भिडू कमी होतोय अश्याने टीम चा .. नंतर शिवानी म्हणाली कि त्याला बसवलं कि नाही !?एक पोलीस मेंबर कमी झाला त्यामुळे .. तेव्हा मग त्याची ट्यूब पेटली बहुतेक .. मग आला खेळायला ..
जिथे अशी झटापट होईल मोडतोड होईल असले गेम का प्लॅन करतात मुळात ?आणि मग खेळ स्थगित करायची वेळ येते..
Pages